मुलाखत कशी वाटली.

Submitted by अस्मिता. on 28 June, 2023 - 21:16

हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.

तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा. Happy
धन्यवाद Happy
अस्मिता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://www.maayboli.com/node/79167?page=65#comment-4918655 इथून पुढे सुरवात करते.

सोनाली कुलकर्णी चांगली आहे, मला चैत्र व मुक्ता मधे आवडली होती. पण ती अतिशय वाईट नाचते. सैफ सोबत वो लडकी है कहां मधे सगळे लॉन्ग शॉट आहेत, जवळचे आहेत ते अप्पर बॉडीचे आहेत. ठुमका बरोबर मारता येत नाही. भारतीय अभिनेत्रींना ठुमका यावाच लागतो , कारण कधी ना कधी मारावाच लागतो. तिची विक्रम गोखले यांच्या सोबतची मुलाखत बघितली होती. चांगली वाटली होती.

दिल के करीब मधली सुहासिनी मुळे यांची मुलाखत आवडली, खूप मोकळेपणाने बोलल्या आहेत. वेगळी पार्श्वभूमी आहे. सुविद्य आणि आधुनिक तरीही प्रामाणिक वाटल्या. साठी नंतर लग्न केलंय. Agriculture मधे संशोधन केलंय. त्यांच्या आईने एकटीने वाढवलं आहे, त्याही काळाच्या पुढे वाटल्या. कुठलाही अभिनिवेश नाही.

अश्विनी भावे मला आवडतेच, पण मुलाखत अशीच होती. 'कदाचित'ला व्यावसायिक यश न मिळाल्याने तिनं काम बंद केलं होतं. कारण ती त्याची निर्मातीही होती. स्मिता तळवलकर बद्द्ल खूप छान बोलली आहे. त्या तिच्या गॉडफादर होत्या.

ट्विंकल खन्नाचा टॉक शो आहे, Tweak. त्यात सुश्मिता सेन आणि विद्या बालन छान बोलल्या आहेत. करण जोहरचाही चांगला वाटला, प्रामाणिक कमी रंजक जास्त. Happy सुप्रिया पाठक आणि रत्ना पाठक शहा यांचाही मस्त आहे. रत्ना फार कूल आहे.

धन्यवाद धाग्याबद्दल. फक्त देशीच मुलाखती याव्यात की इतर ठिकाणच्या सुद्धा? Happy

त्यातल्या गप्पा समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. >> याने आगामी लिंक्स बद्दल फारच अपेक्षा वाढवून ठेवल्या आहेत, इतक्यात बघितलेल्या मराठीतील मुलाखतींवरून हा अंदाज Happy

देशी-विदेशी कुठल्याही चालतील. कारण माझीच गैरसोय होईल. 'गप्पा समृद्ध करणाऱ्या' या शब्दांच्या आधी क्वचित लिहिते. Happy

छान धागा. अमेरिकेत होतो तेव्हा 'फ्रेश एअर' बाय टेरी ग्रोस नियमित ऐकायचो. हल्ली कधी कधी पॉडकास्ट ऐकतो. अनेक अजिबात ओळख नसलेल्या व्यक्ती आणि क्षेत्रातील मुलाखती. हिट ऑर मिस ही असतात अनेकदा.
सीबीसी चा 'क्यू ' ही आवडतो. कला क्षेत्रातील मुलाखती असतात. याच्याशी काही संबंध नसल्याने बऱ्याच नव्या गोष्टी समजतात. आता नव्या ऐकल्या की इथे लिहित जाईन.

छान केले धागा काढून. मुलाखत इतकेच वाचले आणि काही प्रश्न पडले. पण...

फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी >>> इथे शंकासमाधान झाले. हे ब्येस केले. लक्षात आले नाही कधी, पण अधूनमधून कुणी न कुणी मुलाखतींबद्दल बोलत टंकत राहतं. ही सोय झाली. हे झालं धाग्याबद्दल.

एखाद्या व्यक्तीने आपण एकदम बिनडोक आहोत अशा आविर्भावात एखाद्या तज्ञाला प्रश्न विचारणे व त्यातून निर्माण होणारे विनोद यावर सध्या एक फिलोमिना कंक ही व्यक्तिरेखा खूप प्रसिद्ध झाली आहे. ब्रिटिश इतिहास, जागतिक इतिहास यावर ती अनेक लोकांना खतरनाक बिनडोक प्रश्न विचारते.
https://www.youtube.com/watch?v=JWS-qfR6K3w

याचीच एक वेगळी व जुनी आवृत्ती म्हणजे "डा अली जी शो". हे शोज सुमारे वीस वर्षांपूर्वी एचबीओ वर प्रसारित होत. साशा बॅरन कोहेन या महा टॅलेण्टेड माणसाने ज्या तीन व्यक्तिरेखा फेमस केल्या आहेत त्यातली ही एक. इतर दोन म्हणजे बोरात व ब्रुनो. हा "अली जी" ब्रिटन मधल्या एका विशिष्ठ अ‍ॅक्सेंट मधे धमाल बोलतो. तो बहुधा एक रॅपर आहे. त्याचे एकेक स्किट्स अक्षरशः लोळवतात हसून. जाणूनबुजून चुकीचे इंग्रजी ग्रामर वापरणे ही एक त्याची खासियत आहे. या एक दोन क्लिप्सः

एडविन ("बझ") ऑल्ड्रिन
https://www.youtube.com/watch?v=AwARY7Kk8ek

ड्रग्ज एन्फोर्समेण्ट एजन्सीमधल्या एका अधिकार्‍याची मुलाखत
https://www.youtube.com/watch?v=wPFMHg-Pp3Q

ड्रग्जचे परिणाम त्याने समजावल्यावर ज्या निर्विकारपणे तो हे विचारतो ते ऐकून आपण लोळतो.
"and is there any negative effect?" Happy

मी आजकाल लल्लनटाॅपवरच्या बैठकी व किताबे (लेखकाशी गप्पा) ऐकायला सुरूवात केलीये. थिंक बॅंकवरची वैशाली करमरकरची आवडली वेगळंच क्षेत्र
https://youtu.be/LuSGpJ1G48U

इतक्यात ज्यूलिया लुई ड्रायफसचा ‘वाइजर दॅन मी’ हा पॉडकास्ट ऐकला. निरनिराळ्या क्षेत्रांत दखलपात्र काम केलेल्या ‘वाइजर’ स्त्रियांच्या मनमोकळ्या मुलाखती घेतल्या आहेत. मला आवडल्या ऐकायला.

भारतीय सिनेकलावंतांच्या अनुपमा चोप्राने घेतलेल्या काही मुलाखती यूट्यूबवर पाहण्यात आल्या. चांगल्या घेते आणि चित्रपटक्षेत्राबद्दल पॅशन आहे तिला. मला आवडते.

मला मुलाखती पहायला जास्त आवडत नाहीत. त्यातच त्या सेलेब्रिटींच्या असतील तर खूप तोलून मापून व्यक्त झालेले असतात. काही कहाण्या या खोट्या , अर्धसत्य देखील असतात.

समजा आजच्या एका यशस्वी उद्योगपतीची मुलाखत चालू आहे. ते सांगतील कि मी खूप कष्ट केले. सायकलवरून यायचो, आज जगातला दोन नंबरचा श्रीमंत व्यक्ती आहे. याच मुलाखतीत ते सांगतील का कि एका राजकारण्याने मला सगळेच सरकारी कंत्राट मिळवून दिले. त्यासाठी बँकांना कर्ज द्यायला लावले. सरकारी कंपन्या मला स्वस्तात विकल्या. नाहीतर कसलं जमतंय ओ ? Proud

अमिताभ बच्चन चं अदबीने वागणं आवडतं. पण त्याच्ची तबस्सुम ने घेतलेली मुलाखत पाहिली होती. आवडली होती. त्याने जी इमेज बनवली ती जपली. बहुतेकांचे असेच असते. अमिताभ आणि जया भादुरीची बीबीसीने घेतलेली मुलाखत

या बाबतीत रेखा आवडते. एकदम बिनधास्त. तिच्या मुलाखतीमुळे अनेकांच्या पोटात गोळा येतो. तिची एक मुलाखत ब्रिटन मधे घेतलेली. लाल रंगाची साडी, केस मोकळे सोडलेले. कातिल दिसते. तिला बघत बघत लहानाचा मोठा झालो. मोठा झाल्यावर अशीच गर्लफ्रेंड मिळेल असे वाटायचे. माझे वय वाढले पण ती आहे तशीच राहिली. अशीच दुसरी अभिनेत्री म्हणजे सिमी ग्रेवाल.

सिमी पण खूप चांगल्या मुलाखती घेते. तिने घेतलेली रेखाची मुलाखत बघण्यासारखी आहे.
https://www.youtube.com/watch?v=PfmXm6ucyOM&t=94s
रेखाची बीबीसीने घेतलेली हिंदीतून मुलाखत. अमिताभची मुलाखत बीबीसीने घेतल्याबरोबर लगेचच योगायोगाने रेखाचीही मुलाखत घेतली. असे योगायोग खूप आहेत.
https://www.youtube.com/watch?v=c-scScD5zVk&t=68s

याशिवाय रतन टाटांच्या मुलाखती आवडल्या. राहुलकुमार बजाज सुद्धा बिनधास्त होते अगदी रेखासारखे. शक्यतो बिझनेस टायकून राजकीय मतं मांडत नाहीत. बजाज बिनधास्त होते. अपवाद होते.

नेत्यांकडून मात्र खरे बोलण्याची अपेक्षाच नसते. उलट आंतरराष्ट्रीय बाबतीत त्यांच्या मुत्सद्देगिरीलाच गुण असतात.
इंदिरा गांधींची मुलाखत एका अमेरोकन आणि एका ब्रिटीश पत्रकाराने घेत्लेली पाहिली. . बांग्लादेश निर्मितीच्या वेळची मुलाखत आहे बाई त्याच्या डोळ्यात रोखून पाहून शांतपणे उत्तरं देतात. प्रश्न उलटवतात. त्यांची ती भेदक नजर आणि शालीन , सुसंस्कृत वागणूक हे काँबिनेशन डेडली होतं. त्या सुंदर होत्या वगैरे नंतर लक्षात येतं.
हा पत्रकार खूपच चिकट होता. . त्याच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे अदबीने पण निर्भयपणे दिलेली दिसतात. फ्रेंच मुलाखत सुद्धा बघण्यासारखी आहे.

भारतीय पत्रकार त्यांना प्रश्न विचारू शकत होते. पण त्यांच्या नजरेचा सामना करताना त्यांची गाळण उडत असे. अपवाद होतेच. १९८४ ला त्यांची हत्या होण्याआधीची ही मुलाखत. बहुतेक बरखा दत्त आहेत.

बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरेंच्या मुलाखती रंगतदार व्हायच्या. पण दोघेही पत्रकारांना प्रतीप्रश्न करत. आज अजूनही करतात. राज ठाकरेंकडे तोच वारसा आहे. त्यांची ती भेदक नजर, फुटेज खात प्रतिप्रश्न करणं हे एकाच पत्रकारासमोर चालले नाही. तो पत्रकार म्हणजे बिनोद दुआ.

विनोद दुआ यांनी भारतीय पत्रकारितेत टीव्ही जर्नलिझम करताना बेधडक मुलाखत कशी घ्यावी याचा अध्याय सुरू केला. दूरदर्शनवर असताना ते जनवाणी नावाचा कार्यक्रम चालवायचे. त्यात मंत्र्यांना बोलावून त्यांच्या कामाचे ऑडिट व्हायचे. त्यांचे प्रश्न इतके भेदक असत की मंत्र्यांची गाळण उडायची. दुसर्‍या दिवशीच्या वर्तमानपत्रात त्या विषयी अग्रलेख असायचे. ज्याने काहीही काम केलेले नाही त्याने उडवाउ डवीची उत्तरे दिली कि विनोद दुआ त्याला प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत. ये कोई जवाब नही हुआ. आप सीधा मुद्दे पे आईये म्हणत.

शेवटी मंत्र्यांनी राजीव गांधींकडे तक्रार केली. ते म्हणाले तुम्हाला त्यांना तोंड द्यावेच लागेल. किमान ते काय प्रश्न विचारणार आहेत ही प्रश्नपत्रिका तरी द्यायला सांगा अशी मागणी केली. त्यावर राजीव गांधी म्हणाले होते कि तुम्ही कामं केली असतील तर कोणताही प्रश्न विचारू द्या, का घाबरता ? स्वतःच्या विभागाची संपूर्ण माहिती असेल तर घाबरायचे कारण नाही.

पुढे सततच्या तक्रारींमुळे हा कार्यक्रम बंद पडला.

मंजूताईं नी उल्लेख केलेल्या लल्लनटॉपच्या मुलाखती रंजक असतात. सौरभ द्विवेदी खूप छान हलक्या फुलक्या शैलीत मुलाखत घेतो. ती मुलाखत कधीच वाटत नाही. निवडणुकीच्या काळात त्याने ठिकठिकाणची खाद्यसंस्कृती दाखवणार्‍या विशिष्ट हॉटेल्स, ठेले आदींच्या मालकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. कोल्हापूरजवळचं सात / बारा आणि टिळक रोडवरचं अमर्यादित थाळीचं ठिकाण या लक्षात राहिलेल्या मुलाखती. काही काही सपक होतात. पण चालायचंच.

कोल्हापूर सात बारा
https://www.youtube.com/watch?v=yQF-BWY8hjE
दुर्वांकुर अमर्यादीत थाळी
https://www.youtube.com/watch?v=EMRAQd57BAU
जोशी वडापाव
https://www.youtube.com/watch?v=0gsX5lh0JLA
गुजराथी थाळी अहमदाबाद
https://www.youtube.com/watch?v=G1g36xA6W20
बेंगलोर डोसा
https://www.youtube.com/watch?v=be5fJlmoY6w

या मुलाखती थोड्या वेगळ्या आहेत. इथे चालणार असतील तर ठीक आहे. अन्यथा संपादीत करता येईल.

मस्त धागा.
.....
'ग गप्पांचा' हा एक छान कार्यक्रम ठाण्यात होत असतो.
https://www.youtube.com/watch?v=gd-GgAjogWE

त्याचे आतापर्यंत ११ भाग झालेले आहेत.
लेखन, नाट्य, चित्रपट, अर्थशास्त्र, पोलीस अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती.
सुंदर संयोजन !!

दिल के करीब - आवडतो. ती सर्वांना खूप छान बोलतं करते. सुरुवातीचा गिफ्टचा भाग मी जनरली पुढे पळवतो. त्यात भरत दाभोळकर आले होते तेव्हा त्यांनीच तिला गिफ्ट्स दिले - तो गुगली आवडला होता.

मध्यंतरी 'तिसरी घंटा' नावाखाली प्रशांत दामले आणि त्यांचा/ची एक सहकलाकार - अश्या काही मुलाखती झाल्या. त्यातली विनय येडेकर यांच्याबरोबरची मुलाखत धमाल आहे.

https://youtu.be/yMJxY5zF4ak
https://youtu.be/9QJQpk80AVw

अगदी अलीकडेच बघितल्या. खूप छान आहेत दोन्ही.
दिलीप प्रभावळकर यांची एक मुलाखत विक्रम गोखले ने घेतली आहे आणि दुसरी मुलाखत नाही पण ओपन माईक सारखा आहे.

मला आवडलेल्या आणि लक्षात राहिलेल्या मुलाखती. कला/पॉलिटीक्स इ. क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखतींपेक्षा (त्याही आवडतात पण तुलनेने त्या बर्‍याच जणांनी घेतलेल्या असतात) सामान्य जनतेतील हटके वाटा चोखाळून त्यात यशस्वी करीयर करणार्‍या लोकांच्या मुलाखती जास्त आवडतात.
ठाण्याच्या आयपीएच च्या चॅनेलवर अशा काही जणांच्या मुलाखती ऐकल्या होत्या. लिंका नंतर शोधून टाकेन.
बहुतेक भाडीपामध्ये फोरेन्सिक अकाउंटींग (किंवा तत्सम टायटल असलेल्या) करणार्‍या एका मुलीची मुलाखत ऐकली होती. ती सीए होती आणि आर्थिक गुन्हे घडतात तेव्हा त्यातल्या शोधमोहिमेत तिचा सहभाग असतो. हे अगदी नवीन होते माझ्यासाठी.
बाकी डॉ. जगन्नाथ दिक्षितांच्या झालेल्या सर्व मुलाखतींमध्ये माझा कट्टावरील मुलाखत सर्वात आवडली. तेवढ्या तासाभरात बहुतेक सर्व मुद्दे कवर झाले होते. माझा कट्टावरील सोनाली बेंद्रेची मुलाखतही आवडली होती.

बहुतेक भाडीपामध्ये फोरेन्सिक अकाउंटींग (किंवा तत्सम टायटल असलेल्या) करणार्‍या एका मुलीची मुलाखत ऐकली होती. ती सीए होती आणि आर्थिक गुन्हे घडतात तेव्हा त्यातल्या शोधमोहिमेत तिचा सहभाग असतो. हे अगदी नवीन होते माझ्यासाठी.>>> हो ही ऐकली. छान होती. मला आठवतंय ती ज्ञान प्रबोधिनीची विद्यार्थिनी होती. वेधच्या सगळ्याच मुलाखती छान असतात.

मला अतिशय आवडलेली मुलाखत: कुठलाही आरडाओरडा न करता मुलाखतकाराने शांतपणे घेतलेली मुलाखत, JRD Tata यांची अतिशय मुद्देसूद उत्तरे आणि विनम्र स्वभाव दिसून येतो.
In conversation - J.R.D.Tata

लल्लनटॉपवर छान असतात मुलाखती. पुस्तकांवरही अन काही समाज धुरिणांच्याही.
मला आवडलेली पुष्पेश पंत यांची मुलाखत.
विद्यापीठामधे त्यांनी वर्णन केलेल्या, क्लासबाहेरच्या चर्चा अन त्यातून शिकायला मिळालेलं किती तरी जास्त, आकर्षक, जास्त खोलवर पोहोचणारं होतं, ते समजावं.
त्यांचे गुरुपण, ज्ञान, आणि हे सगळं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची तळमळ फार आवडली, आदरणीय ___/|\___
https://youtu.be/lTVpZYUxFdM

मलाही मुलाखती ऐकायला वा पहायला खूप आवडतात. रंगपंढरी, व ट्विकवरच्या बऱ्याचश्या मुलाखती पहिल्या आहेत. अनुक्रमे, मधुराणी व ट्विंकल दोघीही छान मुलाखतकार आहेत. ग गप्पांचाही छान असतो. पण सध्या मी सुलेखा तळवलकरच्या 'दिलके करीब' चा प्रचंड चाहता झाला आहे. प्रत्येक शनिवारी कोण येणार आहे ह्याची उत्सुकता गुरुवार/शुक्रवारपासूनच लागली असते. तिने मध्यंतरी 'टेलकथा' नावाचा पाळीव प्राण्यांच्या सेलेब्रेटी पालकांच्या मुलाखतींचा सेगमेंट सुरु केला होता, त्यात सुलेखाऐवजी अन्य एक प्रसिद्ध अभिनेत्री मुलाखती घेत असे. पण त्याबद्दल लोकांच्या फारश्या चांगल्या कंमेंट्स न आल्याने सध्या हा सेगमेंट होल्डवर ठेवल्याचे सुलेखाने मला DM वर सांगितले.

डीडी सह्याद्रीवर कधीतरी 'दूसरी बाजू' नावाचा मुलाखतींचा कार्यक्रम येत असावा. त्यांचे Youtube वर अधिकृत व्हिडिओज आहेत, ज्यात विक्रम गोखले मुलाखती घेत असत. माफ करा, पण माझ्या मते मुलाखत कशी घेऊ नये ह्याचे उत्तम उदाहरण आहे.

मलाही मुलाखती आवडतात.
ऐकायला पहायला तर आवडतात पण वाचायला देखील. तर छापून आलेल्या मुलाखतींचे दुवेही इथे दिले तर चालतील का?
खूप छान धागा. इथे येत राहणार.

संसद टीव्ही या यू ट्यूब चॅनल वर अनेक मान्यवरांच्या छान मुलाखती आहेत.
अलीकडे पाहिलेल्या -
गुलजार - https://youtu.be/eJQ0sh-BU_8
नसरुद्दीन शाह - https://youtu.be/3-4VjMgnnRQ

संसद टीव्ही या यू ट्यूब चॅनल वर अनेक मान्यवरांच्या छान मुलाखती आहेत >>> होय, गुफ्तगु ह्या सेगमेंटमध्ये इरफान खूप छान मुलाखती घेतात. एकदा सुभाष घई जेव्हा खूप आत्मप्रौढी मारत होते, त्यांना इरफानने खूप काळजीपूर्वक हाताळले होते.

मस्त आहे कल्पना आणि धागा कारण मला ही मुलाखती आवडतात.
मायबोलीवर ही अनेक त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती आहेत. जर कोणाची मुलाखत घेतली गेली असेल तर इथे लिंक द्या म्हणजे पहाता येईल.

ज्यात विक्रम गोखले मुलाखती घेत असत. माफ करा, पण माझ्या मते मुलाखत कशी घेऊ नये ह्याचे उत्तम उदाहरण आहे. >> १०० टक्के अनुमोदन राहुल बावनकुळे

मायबोलीवर संयुक्ता नावाचे एक सदर होते, त्यावर अनेक मायबोलीकरांनी विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींच्या घेतलेल्या मुलाखती वाचल्याचे आठवते.

छान धागा. छान कल्पना.
मला शाहरुख आवडण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याच्या मुलाखतीत दिसून येणारा ह्युमर आणि स्मार्टनेस.
या व्यतिरिक्त क्रिकेटरच्या बऱ्याच मुलाखती पाहिल्या आहेत आणि आवडल्या आहेत.
सावकाश शेअर करतो. तूर्तास रुमाल.

छान धागा.
'डीएसके गप्पा' नावाचा एक कार्यक्रम पुण्यात डीपी रोडवरच्या घरकुल (?) लॉन्स या ठिकाणी व्हायचा/होतो. तिथे मी खूप वर्षांपूर्वी सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली अतुल कुलकर्णीची मुलाखत पाहिली होती. अतुल कुलकर्णी मला त्याआधीही आवडायचाच, पण ती मुलाखत पाहिल्यावर मी त्याची फॅन झाले. अनेक विषयांवरची त्याची स्पष्ट मतं त्याने मांडली होती. तेव्हा 'मारुती आणि शँपेन' या नाटकाच्या नावावर काही संघटनांनी आक्षेप घेऊन ते नाव बदलायला लावलं होतं. (माकडाच्या हाती शँपेन झालं मग ते.) त्यावर त्याचं असं मत होतं की नाव बदलायला नको होतं Happy
बहुधा त्याच वर्षी तिथे अच्युत गोडबोले यांचीही मुलाखत सुधीर गाडगीळांनी घेतली होती. तीही फार छान झाली होती.

२००६ च्या 'पुलोत्सवा'त गुलजारांची मुलाखत माधव वझे यांनी घेतली होती. पण मला माधव वझ्यांचा पवित्रा नव्हता आवडला. 'गीतकार' आणि 'कवी' यात गीतकाराचं काम कमी दर्जाचं, अशा अर्थाने ते काही तरी बोलले होते. तेव्हा गुलजार त्यांच्या खास शैलीत म्हणाले होते की हलवाई ने जलेबी खुद से बनाई हो या उससे किसी ने बनवाई हो, हलवाई तो हलवाई ही रहता है Lol छान बोलले होते गुलजार!

ई टीव्हीवर पूर्वी राजू परुळेकर उत्तम मुलाखती घ्यायचे. तो कार्यक्रम लक्षात आहे. निखिल वागळे - ग्रेट भेटमधेही चांगल्या मुलाखती असायच्या.
अजून आठवतील तसं लिहीन.
वर अनेक नावं आली आहेत, त्यातल्या काही मुलाखती बघितल्या आहेत, आवडल्या आहेत.

मस्त धागा.

मला भारतीय लोकांनी घेतलेल्या भारतीय लोकांच्या लो एफर्ट मुलाखती अजिबात आवडत नाहीत. उदा. तो आयबीएन लोकमत वरचा राजीव खांडेकर की कोण तो तर टाकाऊ पेक्षा टाकाऊ दर्जाच्या मुलाखती घेतो. मुलाखतकार मुलाखतकार म्हणून नावाजलेले मराठीतले महानुभाव तर अक्षरश: पोत्यात घालून तुडविण्याच्या लायकीचे आहेत. जुने राजू परुळेकर बऱ्यापैकी सहनीय आहेत. नवे राजू परुळेकर मात्र खूप अग्रेसिव्ह आहेत. विनायक पाचलग हा चांगला मुलाखतकार आहे तरी तो जे लोक गोळा करतो आणि बोलते करतो ते लोक काही सन्मानीय अपवाद वगळता इतके सुमार असतात की बस्स. आपल्याकडे मान्यवर नावाचा एक अत्यंत न समजलेला प्रकार रूढ आहे. बीयरबायसेप्स नावाचा एक मुलाखतीचा चॅनेल तर दोन मिनिट सुद्धा ऐकवत नाही. बापरे, काय भंगार स्टॅंडर्ड आहे.

माझे आवडते मुलाखतकार ( चढत्या भाजणीत) आणि पॉडकास्टस -

१. Lex Fridman : या मुलाखतकाराने घेतलेल्या मुलाखती. खूप चांगल्या दर्जाचे वैज्ञानिक अनेक विषयांनवर चर्चा करतात. दर्जा, नो नॉन्सेन्स हा एकमेव निकष. अनेक महानुभाव ऐकायला मिळतात.
२. Andrew Huberman : हा एक अत्यंत लोकप्रिय नो नॉन्सेन्स न्यूरोबायलॉजिस्ट आहे. त्याचे सगळे पॉडकास्टस खूप लाभदायक ठरले आहेत. त्याने घेतलेल्या मुलाखती सुद्धा अप्रतिम.
३. Jordan Peterson : हा माणूस मला व्यक्तिश: आवडत नाही तरी त्याने घेतलेल्या मुलाखती चांगल्या आहेत. पण आधी गेस्ट कोण आहे ते पाहून मुलाखत पाहावी. अलीकडे जरा गंडला आहे.
४.
५.
६.
...

उरलेले अनेक मुलाखतकार इतरांना गरज असेल तेव्हाच पोतडीतून काढले जातील.

नीलेश साबळे, कपिल शर्मा यांच्याबद्दल पण लिहा कुणी तरी. Lol

आधीच्या प्रतिसादात राहून गेलेला हा बिनधास्त रेखाचा प्रसंग.
https://www.youtube.com/shorts/Im-l1lyEKd0

हा ही..
https://www.youtube.com/shorts/Qg_3aBazJKI

Pages