हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.
तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा. 
धन्यवाद 
अस्मिता.
दुःखाची गरज कशाला असेल, पण
दुःखाची गरज कशाला असेल, पण तशा अनुभवांनी सहृदय माणूस मोठा होतो, करूणा येते. मुळात कडवट असेल तर दुस्वासी व असुरक्षित होतो. प्रत्येकातून वेगळे काही तरी बाहेर येते. ते दरवेळी चांगले असेलच असे नाही.
हे वरचं दुःख मात्र विनोदी झाले आहे. भरत म्हणतात तसे पर्फॉर्मेटिव्ह वाटतं, खरं नाही. बसवलेले. हल्ली गाणी कविता पाहायच्या झाल्या आहेत त्यामुळे भिडण्यापेक्षा दाखवण्याकडे कल असतो. ऐकून, वाचून म्हणजे एकामितीत त्या पोचायला हव्यात. येथे व्हिज्युअली अपीलिंग करून एक सेन्स वाढवून दिला आहे. सेन्सेस म्हणजे पंचेद्रिये या अर्थाने. कमीतकमी सेन्सेस गुंतलेली असताना त्या जास्त कठीण असतात, आव्हानात्मक. असं तर फारच बंडल आहे. असो. तुम्ही एवढे पसरून वॅ वॅ करणार असाल तर हसू येणारच तुमच्या दुःखावर. "परदुःख शीतल" केले यांच्या दिखाव्याने. माझं तर हसू उत्स्फूर्तपणे बाहेर पडलं.
हे अमितच्या पोस्ट नंतर लिहिले तोवर स्वातीची पोस्ट आली.
मी या मुलाखती पाहिलेल्या
मी या मुलाखती पाहिलेल्या नाहीत पण इव्हन जेव्हा त्यांची लोकप्रियता पीक वर होती तेव्हाही मी त्यांची एकदोनच गाणी ऐकलेली लक्षात आहेत. मी मोर्चा नेला नाही हे एक आणि मी चिंता करतो-तो बागडतो अशी काहीतरी शब्दरचना असलेले दुसरे (
हा तु.क. नाही. बर्याच दिवसांत न ऐकल्यामुळे विसरलो. आठवले - मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो ). ती दोन्ही खूप इंटरेस्टिंग वाटली होती. कविता म्हणून आवडलीही होती. पण समहाऊ इतर ऐकली गेली नाहीत. आवाजात कमालीचा मृदूपणा आणून गायिलेली आणि ममवपणा ओतप्रोत भरलेली गाणी मला आवडत नाहीत.पण एकूण महागुरूंच्या वळणावर हे चालले आहे असे दिसते. कलाकार म्हणून छान. मुलाखत बोअर.
आवाजातील मृदूपणा = रफीचा आवडतो. सुरेश वाडकरचा नाही. आजकालच्या सगळ्या कौटुंबिक हिंदी जाहिरातींत असतो तो तर डोक्यात जातो.
सुरेश वाडकरचा आवाज मला पवित्र
सुरेश वाडकरचा आवाज मला पवित्र वाटतो म्हणजे काही गाणी धकधक करने लगा ने सुरु झालेली याने तोंड उघडले की ताबडतोब नसबंदी होऊन जाते.
(No subject)
'ह्यांना कसलं आलंय डोमलाचं दु
'ह्यांना कसलं आलंय डोमलाचं दु:ख!' असं म्हणायला सह्सा माझी जीभ धजावत नाही. कोणाला कधी, काय आणि किती दुखलं याचं मोजमाप आपल्या मोजपट्टीने कसं करणार? अगदी बरोबर स्वाती! शिवाय कवीने कवितेत फक्त स्वतः अनुभवलेल्या भावनांवरच आणि त्यांच्या तीव्रतेनुसारच लिहायचं असं काही नाही. मग कुसुमाग्रजांनी 'श्वासांनो जा वायूसंगे ओलांडुन भिंत' वगैरे कसं लिहून चाललं असतं?
सतत मोठ्या लोकांची नावे घेणे
सतत मोठ्या लोकांची नावे घेणे - कवितेचे गाणे होताना आणि सलीलच्या लोकसत्तेतील लेखमालेत एकदा शान्ताबाईंचा उल्लेख होता.
तर एवढ्या मोठ्या लोकांशी संबंध आला, आपण केलेलं काहीतरी त्यांना आवडलं आणि त्यांनी ते सांगितलं हे त्याच्या कायमचं लक्षात राहिलंय आणि ते आठवूनही त्याला बरं वाटतंय, असं आहे का?
हे थोडं आवडत्या शिक्षकांनी केलेल्या कौतुकाने मोहरून जाण्यासारखं आहे का? सलील कवितांचे गाणे मालिकेत मला विद्यार्थी असल्यासारखा वाटला. अनेकदा सेल्फ टॉट. अन्य काही लोकांसारखा (नाव नाही घेत, सुज्ञांना कळेलच) पंतोजी मोडमध्ये गेला नाही, असं मला आता वाटतंय. तेव्हा बघताना असंच वाटलं असेल असं नाही. पण त्याचा आविर्भाव ग्यान देण्याचा नक्की वाटला नव्हता, हे मी आधीच्या प्रतिसादातही लिहिलं आहे.
तसं असेल तर हे नेम ड्रॉ पिंग मला खटकणार नाही. ( नेम ड्रॉपिंग म्हटल्यावर मला आणखी एक नाव आठवलं
)
आता पाहिलं तर वर महागुरूंचा संदर्भ आला आहे. तिथे मी किती ग्रेट, संजीवकुमार मला भेटायला आला, असं असतं. सलीलचा आविर्भाव तसा आहे का?
>>> ममवपणा ओतप्रोत भरलेली
>>> ममवपणा ओतप्रोत भरलेली गाणी मला आवडत नाहीत.
अय्या! लुक हू इज टॉकिंग!
>>> हे थोडं आवडत्या
>>> हे थोडं आवडत्या शिक्षकांनी केलेल्या कौतुकाने मोहरून जाण्यासारखं आहे का? सलील कवितांचे गाणे मालिकेत मला विद्यार्थी असल्यासारखा वाटला. अनेकदा सेल्फ टॉट.
हो, मला तसंच वाटलं.
>>> नाव नाही घेत, सुज्ञांना कळेलच
घे की!
उखाण्यातच घ्यायला हवं असं नाही काही!>>> ऐकून, वाचून म्हणजे
>>> ऐकून, वाचून म्हणजे एकामितीत त्या पोचायला हव्यात
तू आवर्जून एकमितीत वाचायला जातेस का? खरंच जेन्युइनली विचारते आहे. इथे लिहिणार्यांपैकी किती जण मुद्दाम होऊन 'चला कविता वाचून पाहू' कॅटेगरीतले आहेत? आणि किती जण कवितांची गाणी किंवा रिळं झाली कीच ऐकतात?
ग्रेसनी 'ती आई होती म्हणुनी घनव्याकुळ मीही रडलो' म्हटलं तेव्हा त्यांची (सावत्र) आई जिवंत होती - पण लोक ही ओळ वाचून आपल्या गेलेल्या माणसाचं दु:ख अनुभवतात. आणि तरी पुनःपुन्हा ऐकतात. मग यांत परफॉर्मेटिव कवी आहे की हृदयनाथ की वाचक/श्रोता?
'मी किती ग्रेट' असा आविर्भाव
'मी किती ग्रेट' असा आविर्भाव नाही मला जाणवला. पण खरं सांगायचं तर मागच्या पानावर अमित आणि मी जे लिहिलं आहे त्याचा संदर्भ देऊन उदाहरण द्यायचं तर- शेवटी शेवटी त्याला एक प्रश्न विचारला आहे की काही गाणी म्हणावी तितकी यशस्वी झाली नाहीत याची खंत वाटते का? तर याच्या उत्तरात (परत
) हृदयनाथ मंगेशकरांना 'समईच्या शुभ्र कळ्या' तितकं प्रसिद्ध न झाल्याची खंत वाटते का? तर नाही. सुधीर मोघ्यांना अमुक एक काव्यसंग्रह आहे (मी नाव विसरले) तो तितका यशस्वी झाला नाही याची खंत वाटते का? तर नाही. तशीच मलाही नाही वाटत.
हे नेम ड्रॉपिंग विनाकारण आहे आणि म्हणून मला खटकतं. असं अनेक वेळा होतं. कुठे तरी आपल्या गाण्यांना या थोर लोकांच्या बरोबरीने बसवण्याचा प्रयत्न असू शकतो अशी शंकाही येते. तसं नसेल तर चांगलंच आहे.
नाही, मी कविता आवर्जून
नाही, मी कविता आवर्जून वाचायला जात नाही पण कुणी सुचवले तर किंवा इंटरेस्टिंग वाटल्याने बरेचदा तरफडले आहे वाचायला आपापला अर्थ काढायला पण हे क्वचित होते पण होते. वरच्या पोस्ट मधे वेस्टलॅंड बद्द्ल लिहिले आहे तसेच. ग्रेस पर्फॉर्मेटिव्ह नाहीत. भा रा तांबे सुद्धा कधीही वाटले नाहीत. हे माझं माझं आठवलं म्हणून लिहिले. कविता भिडली की संदर्भाचा काथ्याकूट करावा लागत नाही आपोआपच कालवाकालव होऊन काही तरी होते. हा माझा अनुभव.
मलाही दर्प नाही जाणवला पण ही मी पाहिलेली सलील यांची पहिलीच मुलाखत होती. आणि तीस वर्षांच्या गाण्याचा प्रवास म्हणून नेम ड्रॉपिंग, किस्से खटकले नाहीत. गाईड, मेंटर, आठवणी असं वाटलं.
यशस्वी आणि प्रसिद्ध या दोन
यशस्वी आणि प्रसिद्ध या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. यशस्वी म्हणजे माझ्या मते कलाकाराला जे इच्छित होते ते प्रत्यक्षात आणता येणे. यशस्वी असा प्रश्न असताना त्याने प्रसिद्ध म्हटलं का?
इथेही त्यांची नावं घेताना सलील मला विद्यार्थिदशेतलाच वाटतो. एवढं काम केल्यावर त्याने यातून बाहेर यायला हवं खरं तर.
>>> ग्रेस पर्फॉर्मेटिव्ह
>>> ग्रेस पर्फॉर्मेटिव्ह नाहीत. भा रा तांबे सुद्धा कधीही वाटले नाहीत
'वाटले नाहीत' इज द की! हे खूप सब्जेक्टिव आहे. फक्त 'व्यक्ती तितक्या प्रकृती' इतक्याच सीमित अर्थानेही नव्हे, आपणही (अॅज अ वाचक / श्रोता / कन्टेन्ट कन्झ्युमर) बदलत असतो. काल ग्रेट वाटलेल्या कितीतरी गोष्टी आज येडपट वाटतात आणि कधीकाळी निरर्थक वाटलेली एखादी ओळ एखाद्या हळव्या क्षणी नेमकी येऊन बोचते.
शेली म्हणाला होता : Our sweetest songs are those that tell of saddest thought.
मुळात दु:खावर कविता लिहिणं - कोणीही, ग्रेस आणि तांब्यांनीसुद्धा - इथेच परफॉर्मन्स सुरू होतो. नाहीतर माणूस कोपर्यात रडून मोकळा होईल, नाही का?!
मग लोकं ते वाचणारच नसतील आणि हृदयनाथला इतक्या सगळ्या कवितांना चाली लावणं शक्य नसेल, तर कवीनेच परफॉर्मही का नाही करायचं?
परफॉर्म केलं म्हणजे दु:ख फेक होतं असं नव्हे.
हे सगळे जनरली पटतेच पण वरचे
हे सगळे जनरली पटतेच पण वरचे नळातून येणारे दुःख
हावभाव मात्र नायगारा दाखवल्याचा. हे अर्थातच त्या कवितेपुरतेच आहे, संदीप खरे यांच्या खाजगी दुःखावर टिप्पणी नाही. कोणाचं दुःख किती मोठे याचा अंदाज लावत नाही कधी पण ही विकायला ठेवलेली कलाकृती आहे. दोन्ही स्वतंत्र गोष्टी आहेत. कविता आवडली नाही. फेकच 
आहेवाटते.स्वातीच्याच संदीप सलील आणि
स्वातीच्याच संदीप
सलीलआणि वैभव यांच्या इर्शाद कार्यक्रमावरच्या धाग्यावर ही चर्चा झाली आहे. स्वातीने तिच्या लेखातही हा मुद्दा घेतला आहे.https://www.maayboli.com/node/62430
हैं सबसे मधुर वो गीत जिन्हें
हैं सबसे मधुर वो गीत जिन्हें हम दर्द के सुर में गाते हैं
जब हद से गुज़र जाती है ख़ुशी आँसू भी छलकते आते हैं
याचं मूळ
Our sweetest songs are those that tell of saddest thought. हे आहे की काय?
शैलेंद्र पुढे म्हणतोय - पहलू में पराए दर्द बसा के हँसना-हँसाना सीख ज़रा
दु:ख स्वतःचंच हवं असं नाही. हे खरंच आहे. दु:ख वा इतर कोणतीही भावना.
सुरेश भटांची आशानेगायलेली गाणी मग व्हायलाच नको होती.
प्रिस्कर नायजेरी ही केनियन
प्रिस्कर नायजेरी ही केनियन कवयित्री स्कार पोएट्री हॅन्डलने पीडित स्त्रियांचे प्रश्न, युद्धांचे परिणाम इत्यादींबद्दल सातत्याने प्रभावीपणे लिहिते.
मला तिची 'ग्रीव, बट डु नॉट ड्राऊन' ही कविता ऐकताना संदीपच्या वर उल्लेख आलेल्या कवितेची आठवण झाली होती.
आवर्जून ऐका.
>>> हैं सबसे मधुर वो गीत
हो!
वावे
>>> आवडली नाही. फेकच
आहेवाटते.स्ट्राइकथ्रूसाठी आभार. आता मला सुखाने लंच करता येईल.
पोटभर जेव आता.
grieve but do not drown खूप
grieve but do not drown खूप आधी स्वातीनेच पाठवली होती.
आता दोन्ही कवितांतलं साम्य जाणवलं आणि माझ्याच मनातले बायसेसही लख्ख दिसले. कवितेकडे कविता म्हणून पाहता आलं पाहिजे, कवी वेगळा काढून.
यशस्वी आणि प्रसिद्ध या दोन
यशस्वी आणि प्रसिद्ध या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. यशस्वी म्हणजे माझ्या मते कलाकाराला जे इच्छित होते ते प्रत्यक्षात आणता येणे. यशस्वी असा प्रश्न असताना त्याने प्रसिद्ध म्हटलं का?>> यशस्वी म्हणजे लोकप्रिय या अर्थाने विचारलेला प्रश्न होता. पण तुम्ही म्हणताय त्या अर्थाने त्याने याच किंवा दुसऱ्या कुठल्या तरी प्रश्नाला उत्तर दिलं आहे की स्वतःचं जुनं एखादं गाणं ऐकताना आज असं वाटतं की हे अजून चांगल्या पद्धतीने करू शकलो असतो.
>>> कवितेकडे कविता म्हणून
>>> कवितेकडे कविता म्हणून पाहता आलं पाहिजे
आता दोन घास सरस जातील!
अरे! प्रिस्कर नायजेरीची कविता
अरे! प्रिस्कर नायजेरीची कविता आणि संदीपची कविता एकच आहे की! अगदी एकाच मुशीतली!
>> कवितेकडे कविता म्हणून पाहता आलं पाहिजे, कवी वेगळा काढून.>> हो!
मला संदिपच्या कविता आवडतात. परफॉर्मेटिव्ह म्हणून, सोप्या म्हणून, ममव म्हणून काय असेल ते! पण मला तर मजा येते. हेच पॅकेज असल्याने ही असेलच.
गेल्या पाच सहा वर्षांपासून पुस्तके घ्यायला गेलो की कवितांचे एखादे तरी पुस्तक घेतोच. आधी कविता या पुस्तक घेऊन क्वचित वाचल्या असतील पण हल्ली तो प्रयत्न तरी करतो. असंच आरती प्रभूंचे एक पुस्तक गेल्यावेळी घेतलेले आणि सलीलच्याच कवितांचे गाणे होताना मध्ये त्याने दोन तीन कविता अशा उलगडून सांगितल्या पण अर्थ नाही सांगितला. स्वाती जशी एखादी गाठ सोडवून देते तसे केले आणि ती कविता मला पूर्ण पुस्तकात वाचता आली. त्याने उधृत न केलेल्या ओळींचे अर्थ ही मग पटापट उकलले तो क्षण फार आनंद देऊन गेलेला.
कुसुमाग्रजांच्या कवितांचे भरतनी एक पुस्तक गेल्यावेळी दिलेले ते दोन महिन्यांपूर्वी अचानक वाचावे वाटले आणि त्यांच्या कविता अशाच सोप्या अर्थवाही आणि माझ्या विचारांशी एकदम जुळणार्या वाचनात आल्या. आता आणखी त्यांच्या कवितांची पुस्तके बघणार आहे.
बाकी कधी काय आवडेल आणि कधी बदलेल ते अर्थात बदलत असतेच.
इतकं बोललोच आहे तर आणि थोडं..
इतकं बोललोच आहे तर आणि थोडं... सलील चालीत/ गाण्यात/ कवितेत काय आहे, त्याला काय वाटतं, त्यामागची विचारप्रक्रिया उलगडून सांगतो. ती विचार प्रक्रिया केलेली असते, आणि ती उलगडून, हातचं न राखता सांगतो हे दोन्ही महत्वाचं आणि मला फार भावतं. त्यामुळे तो मला आजच्या पिढीचा वाटतो. त्याच्याकडे आहे सांगण्यासारखं तर सांगतो. कदाचित साधं असेल, कदाचित ते फार उंच नसेल ही, पण म्हणून मला गप्प बसलेली लोकं आवडत नाहीत. तुच्छता भाव मला त्याच्या मुलाखतीत दिसत नाही, जो अनेक दि:गज व्यक्तींत दिसतो.
दुसरं तो नव्या लोकांना संगीत शिकवतो, शब्द प्रधान गायकी शिकवतो. नव्या पिढीला न शिकवणारे, आपल्याकडील ज्ञान इतरांना न देणारे लोक मला आवडत नाहीत. सगळे शिक्षक नसतात वगैरे वर माझा विश्वास नाही. इट्स नॉन निगोशिएबल!
तिसरं, त्याची हल्लीची गाणी (इतकी ही हल्लीची नाही, ६-७ वर्षे झाली) जास्त भरीव, पार्श्वसंगीतावर काम केलेली जाणवतात. शब्दांच्या मागे जे संगीत वाजतं ते नुसतं फॉलो करणारं नाही तर त्याचा एक वेगळा थर जाणवतो आणि तो सुखद वाटतो. मधले पीसेस, वाद्यांचा वापर ही आवडतो. अर्थात पार्श्वसंगीत त्याचं नसेलच, पण ते करण्याची गरज त्यालाच वाटलेली असावी.
उदाहरण द्यायचं तर.. तू रहा अशीच दूर, नको करू सखी असा साजिरा शृंगार , कधी माझी कधी त्याची ही साऊली
तो गायक म्हणून काही फार ग्रेट नाही, पण त्याचीच गाणी आहेत तर गातो. ठीक आहे.
बाकी मला सुरेश वाडकर गायक म्हणून आवडतात.
त्यांचा स्वर शार्प आणि अजिबात हललेला जाणवत नाही. सलीलचा जाणवतो
एखादं कडवं जिकडून सुरू होतं तिकडे टण्णकन वाडकरांचा आवाज जातो. त्यांना कसला सपोर्ट लागत नाही असं पूर्वी जाणवलं आहे.
छान चर्चा.
छान चर्चा.
सलील कुलकर्णीची ती मुलाखत त्याच्या कारकीर्दीला तीस(?) वर्षं पूर्ण झाल्याबद्दल होती ना? त्या सिंहावलोकनात त्याने त्याची प्रेरणास्थानं, थोरामोठ्यांकडून मिळालेले आशीर्वाद, कौतुक वगैरेंबद्दल बोलणं मला स्वाभाविक वाटलं.
तो एरवीही असं 'नेम ड्रॉपिंग' करतो का याबद्दल मला माहिती नाही, आणि वारंवार केलं गेलं तर ते अनॉयिंग वाटणारच. >>>>> अगदी खूप अनुमोदन !! मी सलीलच्या फार मुलाखती पाहिलेल्या नाहीत. त्यामुळे ह्यात नेम ड्रॉपिंग खटकलं नाही. खरोखरच त्यांनी ह्या सगळ्यांबरोबर काम केलेलं आहे किंवा भेटण्याची संधी मिळाली आहे आणि त्या भारावलेपणातून सांगितलेल्या आठवणी वाटल्या. आवडो किंवा न आवडो किंवा त्यांचं सगळंच काम न आवडो, तीस वर्षांची कारकीर्द करणं सोपं नाही. अगदी सर्वसामान्य नोकरी करणारी माणसंही हल्ली लिंक्डिनवर "जॉब माईलस्टोन"च्या पोस्टी टाकून त्यात आपल्या मेंटर्सना किंवा आदर्शांना टॅग करतात. मलाही हे ही त्यासारखच वाटलं आणि म्हणून खटकलं नाही.
शिवाय कवीने कवितेत फक्त स्वतः अनुभवलेल्या भावनांवरच आणि त्यांच्या तीव्रतेनुसारच लिहायचं असं काही नाही. मग कुसुमाग्रजांनी 'श्वासांनो जा वायूसंगे ओलांडुन भिंत' वगैरे कसं लिहून चाललं असतं? >>>> वावेचं हे पोस्टही अगदी पटलं! हे लेखकांनाही लागू आहे. (थोडा टँजट मुद्दा आहे. पण मला हे डॉक्टरांच्याबाबतही वाटतं. म्हणजे प्रत्येकवेळी "मला हा अनुभव आला तरच मी ते नीट समजू शकतो" हे खरं असेलच असं नाही. मेल गायनॅक किंवा असाध्य रोंगांवर उपचार करणारे स्त्री-पुरूष डॉक्टर हे काही प्रत्येक व्याधीतून स्वत: गेलेले नसतात पण तरीही ते रूग्णाची व्यथा / मानसिकता समजून घेऊ शकतातच, तसच काहीसं..)
बाकी स्वातीने उच्चासनाच्या दिशेने जाणार्या चर्चेला जरा जमिनीवर आणलं त्याबद्दलही धन्यवाद
>> शाकाहारी आहे <<
अस्मिता,
>> शाकाहारी आहे <<
म्हणजे तुझे 'नो बुंदी नो बिझनेस' आहे तर.
>> इंग्रजी मुलाखती आणि हे
>> इंग्रजी मुलाखती आणि हे विश्वचि माझे घर <<
अस्मिता, वाक्या वाक्याशी सहमत.
" चार फूल है और दुनिया है "
https://youtu.be/CM6q9EJ58ps?si=H93pVmK44T_DT1QF
ही विनोद कुमार शुक्ल यांच्यावर अलीकडे केलेली डॉक्युमेंटरी जरूर पाहा. ही खरेतर एक विस्तृत मुलाखतच आहे.
विनोदकुमारांचा मुलगा देखील अतिशय सुंदर संतुलित बोलतो.
कधी कधी मला विनोदकुमारही प्रिटेंड करतात असे वाटते. पण ठीक आहे, त्यांना एक बेनिफिट ऑफ डाउट देऊया. की या माणसाच्या मेंदूत काव्यामीन प्रसवत असावे. यांची प्रकृतीच अशी असावी.
पण जाता जाता शुक्ल एक डीप वाक्य ठोकून जातात. म्हणजे शुक्ल यांनी वैश्विक असण्याचा विचार केला आहे की नाही, तो किती ऑर्गेनिकली केला आहे हे मला लगेच कळते.
कदाचित म्हणून शुक्ल भाषेपलीकडे जाऊन नैसर्गिकरित्या लोकांना आवडत असावेत. सध्या अगदी मराठी gen झी देखील शुक्ल यांची पुस्तके तुफान वाचते आहे. दीवार मे एक खिडकी रेहती है वगैरे.
शुक्ल म्हणतात, तुम्ही जितके लोकल असाल तितके तुम्ही वैश्विक असता. खरोखरच आहे. आपण उगाच वैश्विक असल्याचे बर्डन लादून घेतले नाही पाहिजे. म्हणजे संदर्भ संपृक्तता आणि इत्यादी.. (याचा अर्थ, बाबूजी असा शब्द उच्चारून कानाच्या पाळीला हात लावणारे डोक्यात जातात त्यांना सहन करणे नव्हे) खरेतर एका मधल्याच कुठल्यातरी बबल मधे हे सगळे मराठी मुलाखतींचे चालले असते.
यावरून एक चॅनेल आठवले. मध्यातरी मोठा राकिस नावाचा एक वीडियो वायरल झाला होता. त्याच चॅनेलचा होता.
बंदा रुपया असे चॅनेलचे नाव.
https://www.youtube.com/@Banda_Rupaya_Official/videos
यावर गावकऱ्यांच्या दीर्घ मुलाखती आहेत. काहीजण अगदी मनमोकळं बोलतात. बायकाच्या मुलाखतीत मुख्यत्वे सासुरवास, पूर्वीचे कष्टाचे दिवस असेच विषय असतात. पण सगळ्या मुलाखती गावकुसाबाहेरच्या लोकांच्या आहेत, बारा बलुतेदारांच्या आहेत. त्यात जातीय शोषण आहे पण त्याचा विखार कुठेही दिसत नाही. हे असेच होते, ते निमूटपाने सहन करणे हेच जीवन, त्याविषयी काय करायची तक्रार करून करून असा सूर असतो. सगळी अगदी सामान्य गरीब अगदी अस्सल माणसं आहेत. आप्तांच्या मुलांच्या मृत्यूने विव्हल होणारी, अपार कष्ट करून पिकलेली माणसे आहेत.
मला यातल्या काही मुलाखती खूप आवडल्या. हे विश्वच काही जणांना अनोखे वाटू शकते. काही जणांना दृष्टीआडची टॉयलेटची ड्रेन पाइप असावी तशी अगदीच तुच्छ वाटू शकेल, आवर्जून दुर्लक्ष करावे असे. काही जणांना त्यात शोषण आणि नोस्टलीजिया दिसेल, काहीना कॉमेडी, अतिशयोक्ती. एकूण सगळा मुद्देमाल आहे.
माणदेशाची भाषा आहे. जरा चेंज ऑफ टोन हवे असेल तर हे ही घ्या. अर्थात इंटरनेट वर याहून 'लोकल' काही सापडेल असे वाटत नाही. त्यामुळे शुक्ल यांच्या डेफिनिटिशन मधले लोकल आहे का ते प्रत्येकाने शोधावं.
(मी देशीवादी नाही)
कविता आवडणार्यांना, त्यावर
कविता आवडणार्यांना, त्यावर भरभरून बोलणार्यांना, कवितांसंबंधीच्या मुलाखती आवर्जून बघणार्या, त्यावर आवर्जून भरभरून पोस्टी लिहिणार्यांना _/\_
आपल्या सर्वांचे फोटो भिंतीवर लावण्यात येतील आणि रोज दर्शन घेण्यात येईल याठिकाणी _/\_
ओ. आम्हांला भिंतीवरच्या फोटोत
ओ. आम्हांला भिंतीवरच्या फोटोत पाठवायची एवढी काय घाई?
‘प्रत्यक्षाहुन प्रतिमा उत्कट’
‘प्रत्यक्षाहुन प्रतिमा उत्कट’ असं कुठल्याशा कवितेतच म्हटलंय ना?! म्हणून असेल.
>>>>> 'ग्रीव, बट डु नॉट
.
Pages