हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.
तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा. 
धन्यवाद 
अस्मिता.
>>>>> मुंग्यांबद्दल अद्भुत
>>>>> मुंग्यांबद्दल अद्भुत माहिती ऐकायला मिळाली!
अर्रे! काय जबराट माहीती आहे. मुंग्यांची कमाल आहेच परत शास्त्रज्ञांना हॅट्स ऑफ.
धन्यवाद वावे.
मला खालील व्यक्तींना ऐकायला
मला खालील व्यक्तींना ऐकायला आवडेल पॉडकास्ट्/मुलाखतीत. (मुलाखतींनाच पॉडकास्ट म्हणायचे का? की काही फरक आहे दोन्हीत. पॉडकास्ट हा शब्द मी पहिला अॅपल आयफोन घेतला तेव्हा प्रथम पाहिला होता बहुतेक..)
उषा सोमण (मिलिंद सोमणच्या आई).
- यांना कुठे फारसं ऐकलेलं नाही स्वतंत्रपणे. खासकरुन मराठीत. मिलिंदबरोबरच्या मुलाखतींमध्ये दिसल्या आहेत पण फार मोजकंच बोलणार्या वाटल्या. मितभाषी असाव्यात. पण त्यांचा फिटनेस खरंच वाखाणण्याजोगा आहे. मिलिंद-अंकिता-उषा सोमण यांच्यावरचे "कीप मूव्हींग" पुस्तक सध्या वाचतेय. त्यामुळे त्यांच्याविषयी जास्त कुतूहल वाटते आहे. त्यांना बोलतं करणारा/री कुणीतरी मस्त व्यक्ती भेटावी.
पुण्याच्या स्वाती भागवत (जपानी दुभाषी) (पुण्याच्या जपानी येणार्या माबोकरांना ठाऊक असाव्यात कदाचित)
- यांना मी लिन्क्डइन वर फॉलो करते. यांची जपानी इंटरप्रिटेशन करण्याची कारकिर्द जबरदस्त आहे. इंटरप्रिटेशन करणे किती जोखमीचे काम आहे याची थोडीबहुत कल्पना आहे त्यामुळे यांच्याबद्दल फारच आदर वाटतो.
तुम्ही द्वैभाषिक घरातच जन्माला आलात तर बाळपणापासूनच दोन भाषा कानावर पडून त्या उत्तम येऊ शकतात पण एखादी भाषा पुढे मुद्दाम शिकून त्यात इतके उच्च दर्जाचे प्राविण्य मिळवायचे की त्यातून तुम्ही इंटरप्रिटेशन लीलया करु शकता तेही, मोठमोठे पॉलिसी मेकर्स्/लीडर्स यांच्यासाठी, हे सोपे नाही. असे स्कीलसेट असणारे लोक तसे कमी दिसतात.
अजून एक तिसरी व्यक्ती होती (अशीच नॉन ग्लॅमरस क्षेत्रातली) लक्षात ज्यांना ऐकायला आवडेल, नाव आठवले की लिहेन.
सुयश टिळकचे "जंगल एकोज" चॅनेल इथेच कुणीतरी सुचविले होते. तेही फार आवडते. एका मर्यादेनंतर अभिनेते/अभिनेत्रींना ऐकायचा कंटाळा येतो ओवरडोस झाला की, तसं काहीसं झालं आहे.
एका मर्यादेनंतर अभिनेते
एका मर्यादेनंतर अभिनेते/अभिनेत्रींना ऐकायचा कंटाळा येतो >> अगदी!
काल विजया मेहता गेल्यावर पार्ल्याला कार्यक्रम झालेला तो ऐकला. प्रतिमा कुलकर्णी, अंबरिश मिश्र, स्वाती चिटणीस आणि अजित भुरे असे प्रथितयश आणि विजयाबाईंच्या जवळची म्हणावी अशी माणसं. पण दीड- पावणे दोन तासांची मुलाखत ऐकुन पदरात काहीच नवं म्हणावं असं पडलं नाही. स्मृतीप्रित्यर्थ होती, त्यामुळे आठवणींना उजाळा असणार हे आलंच, पण अगदी काहीच तयारी न करता अशा विस्कळित गप्पा, आता स्पॉंटेनिअस म्हणता येतील, पण विजयाबाई, ज्या मुलाखतीची देखिल तालिम करत, पुस्तक प्रकाशनाची सुद्धा रंगीत तालिम ज्यांनी घेतलेली त्यांच्याच आठवणी अशा रानोमाळ ऐकुन खेद सोडा, पण उगा वेळ दवडला झालं.
एका मर्यादेनंतर अभिनेते
एका मर्यादेनंतर अभिनेते/अभिनेत्रींना ऐकायचा कंटाळा येतो >> ह्याला अनुमोदन. आपल्याकडे सेलिब्रिटी म्हणजे नट नट्या त्यामुळे त्यांच्या अनेक मुलाखती घेतल्या जातात आणि त्या सगळीकडे तेच तेच सांगत असतात . नवीन काही नाही. ते ही बरोबर आहे. कॅन्सिस्टन्स राहण्यासाठी ते गरजेचं ही आहेच. एकीकडे एक सांगितलं दुसरीकडे दुसरचं हे त्या करू शकत नाहीत.
मात्र ह्या एवढ्याश्या पोरी जेव्हा जीवनाचं तत्वज्ञान आपल्याला शिकवतात ते डोक्यात जातं फार.
यात doctors सुद्धा समाविष्ट
यात doctors सुद्धा समाविष्ट करायला हवेत. उदंड जाहलेत मेडीकल podcasts
एका मर्यादेनंतर अभिनेते
एका मर्यादेनंतर अभिनेते/अभिनेत्रींना ऐकायचा कंटाळा येतो >>> यावरून ती माबोवरच दिलेली एक लिंक आठवली. त्या स्किटकर्तीचे नाव लक्षात नाही पण फार धमाल शॉर्ट क्लिप्स आहेत तिच्या, त्यातच एक होती मराठी सेलिब्रिटीजच्या मुलाखतीची.
या वरुनच, एल स्कॉटिश जेन
या वरुनच, एल स्कॉटिश जेन -अल्फा मुलगी आहे. ती या जेन-झी इन्फ्लुएंसर्सची मस्त खेचत असते. टिकटॉकवर आहे, बाकी इन्स्टा/ युट्युबवर असेल तर कल्पना नाही.
वर्षा अगदी! मी साफ बंद केलेय
वर्षा अगदी! मी साफ बंद केलेय सध्या.
फराह खान लोकांच्या म्हणजे सेलेब्रिटींच्या घरी जाऊन खाऊन येते. ते मी बघत असते. बरेच सेलेब्रिटी मला माहितीही नसतात. अशाच एका एपिसोड मधे डॉ राज मदन नावाची बाई दिसली. तिचे डिल्युजनल तोडगे शॉर्ट्स मधे ( युट्यूब शॉर्ट) पाहिले होते. पांचट गोष्टींत मन रमतं कधीकधी, फार जड बघायची बॅंडविड्थ नसते. ती एकदम सुंदर सुंदर साड्या, अंबाडा वर फूल अशी सेक्सी लेडी ऑन द फ्लोअर -सायकिक होऊन गादीवर बसून तोडगे सांगते. एकदम चलता फिरता फॅशन शो, ये बिजलीकी नंगी वायरसे! संदर्भ - बेबी को बेस पसंद है. आणि मी त्यामुळेच पाहात होते.
ती स्वतःला स्पिरिच्युअल म्हणते आणि उपाय जादूटोणा टाईप सांगते. उशी खाली दालचिनी ठेवा - कामं होतील, उशीखाली गुलाबाच्या पाकळ्या ठेवा-लव्हलाईफ सुधारेल, उशीखाली हळकुंड ठेवा लक्ष्मी येईल. मी म्हंटले मसाल्याचा डबाच ठेवा सरळ. पण ती एकदम सुंदर आहे, तिच्या कडे मकॉ पोपट आहेत. मला आधी वाटले आपल्याच अपार्टमेंट मधून करत असेल पण तिचं घर पाहिले ह्या फराहच्या शो मधे. ती अतिशय श्रीमंत आहे, घर महाल आहे. दिल्ही बेस्ड बिझनेसमन नवरा आहे. तिने काही बाही curate करून एकेक पेंटिंग बनवून घेतलेल्या आहेत. मी फारच रमले सगळं पाहात. नंतर तिची फीडमधे एक मुलाखत आली तर ती मोदींची अंधभक्त वाटली, अंगात आले अचानक. बाधा झाल्यासारखं बोलू लागली. सगळं कौतुक ओसरलं. असं एक आठवडा चाललं.
पर्दाफाश झाला. असं काही बाही होत राहतं जीवनात. हल्ली अजेंड्याशिवाय कुणी नाही. न्युमरॉलॉजी पायी बहुतेक तिने स्वतःचे स्पेलिंग राज मदान केले आहे, मग फराह तिला मदानच म्हणाली. न्युमरॉलॉजी गेलं चुलीत, तुम्ही जसे स्पेल केले तसेच लोक वाचणार. मला एक आठवड्याच्या वर कुणीच आवडत नाही सध्या, मग मी दुसरीकडे जाते. 
>>मसाल्याचा डबाच>>
>>मसाल्याचा डबाच>>
"तुमचे पॉडपिव्ह्ज कोणते?"
"तुमचे पॉडपीव्ह्ज कोणते?" असा धागा काढायला वाव आहे.
अजून एक बिनमहत्त्वाची गोष्ट
>> मसाल्याचा डबा, पॉडपीव्ह्ज
>> मसाल्याचा डबा, पॉडपीव्ह्ज

सापडली सापडली https://www
सापडली सापडली
https://www.youtube.com/shorts/o8wkvyp4oN4
प्रिया बापटच आली माझ्या
हो, अगदी. ब्रह्मांडात भारी
एका मर्यादेनंतर अभिनेते
एका मर्यादेनंतर अभिनेते/अभिनेत्रींना ऐकायचा कंटाळा येतो >> ह्याला अनुमोदन. एका चॅनेलवर आले की तीनचार चॅनेलवर तीच लोकं तेच डॅायलॅाग. चिन्मयीला इतर काहीजणांना नॅाट इंटरेस्टेड केलंय .अमुकतमुक जोडगोळीला इग्नोर करते. वक्ते चांगले बोलावतात विदर्भ .मराठवाड्यात राहून तिथला इतिहास काहीच माहीत नव्हता. तेदोन्ही एपिसोड आवडले आणि नंदू मुलमुले आवडतातच. आरोग्यविषयक पाहतच नाही एकजण एक सांगतो तर दुसरा अगदी त्याच्या विरूध्द! आपणच आहोत आपल्या आरोग्याचे शिल्पकार
नंदू मुलमुले तो पॉडकास्टका/
नंदू मुलमुले तो पॉडकास्टका/ यूट्यूबका अच्युत गोडबोले निकला. आता फक्त क्वांटम AI वरती यांना बोलताना ऐकायचे बाकी आहे.
यूट्यूबच्या फीडमधून यांना (म्हणजे हे अमुक तमुक, बोल भिडू, किंवा तत्सम पॉडकास्टवाले) कायमचे कसे हाकलून द्यायचे हे अजूनही नीट जमत नाही.
अच्युत गोडबोले म्हटल्यावर
अच्युत गोडबोले म्हटल्यावर कळलं काय प्रकरण असेल.
त्यांचे म्हणजे मुलमुलेंचे लेख लोकसत्तेत वाचलेत.
सायकॉलॉजीवर होते बहुतेक.
ती वरची क्लिप बघून प्रिबा
ती वरची क्लिप बघून प्रिबा लग्गेच कळली. खरंतर प्रिबा आवडते पण हे मराठी स्टार्स खरंच इतकी ओवरअक्टिंग का करतात साधं बोलतानाही हे गुढ आहे. "मी सच्ची आहे ना.." वर जोरात हसले.. कशाला हे उथळ लोक फिलाॅसाॅफी पाजळतात, अरे देवा!
बीअर बायसेप महामाठ आहेच पण
बीअर बायसेप महामाठ आहेच पण त्याचा चेहरा आणि त्यावरचे वेडगळ भाव बघून त्याला अखिल ब्रम्हांडातील सगळ्यात मंद व्यक्ती म्हणून किताब द्यावासा वाटतो.
प्रिया बापट वाली क्लिप भारी
प्रिया बापट वाली क्लिप भारी आहे... अगदी अशीच ओवरअक्टिंग करते ती..
पूजा nailed it!
Pages