परतोनि पाहे (परदेशातून परतलेल्या, परतू इच्छिणा-यांचे अनुभव)

Submitted by रैना on 5 January, 2010 - 01:52

इथे खालील मुद्यांवर चर्चा / अनुभव अपेक्षीत आहे. शक्यतो उपदेशापेक्षा (काय करायला हवं वगैरेंचे डोस) अनुभव लिहा. आपण विचारांती काय निर्णय घेतला, का घेतला आणि तो कसा निभावतो आहोत.

- तुम्ही भारतात का परतलात, परतावसं का वाटलं (नक्की प्राण का तळमळला?) परतल्यावर आता कसं वाटतय ? (व्यक्तिगत बरेवाईट अनुभव, ठेचा, विचारमंथन).
-- तळ्यात मळ्यात- परतावसं वाटतय, हिम्मत होत नाही? दोलायमान परिस्थिती आहे? नवराबायकोपैकी एक अत्यंत नाखुष आहे ?
- परततानाची चेकलिस्ट ( काय करावे आणि करु नये)
- केल्याने देशाटन परदेशात काय मिळवलं, काय गमावलं
-भारतातील संधी, नोकरी, व्यवसाय, आर्थिक परिस्थितीचा आढावा (अनुभव), वर्क लाईफ बॅलन्स (व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याला देता येणारा वेळ)
- मुलं आणि तदनुषंगिक शेकडो गोष्टी ( शाळा, शैक्षणिक पद्धत, पाल्याचा सर्वांगीण विकास, भाषांचा सराव, गणिताचा सराव, वातावरणाचा सराव)
- वृद्ध होत चाललेल्या मातापित्यांची जवाबदारी. पुन्हा एकत्र आल्यावरचे अनुभव. त्यांच्या दृष्टीकोनातून तुमचे परदेशगमन आणि पुनरागमन.
- समाजाचे देणे
- दोहोंचा अनुभव घेतल्यावर आता काय करायचा मानस आहे ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

महेश बरे आहात नं ? Happy आम्ही तुमच्या आधी नाही का परत आलो तिन वर्षांपूर्वी ?
असो. तुम्ही तुमचे अनुभव लिहा पाहू. (मी ही लिहीते आहे) Happy

रैना तुमच्या लिखाणावरून मला असे वाटले की परत तिकडे गेला आहात आणि आता यायचे की नाही असा विचार पडला आहे. Happy
असो, विषय चांगला आहे. जमेल तसे लिहिण्याचा प्रयत्न करतो.

आंतर्जालविषयक कायद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

बाकी माझ्या लिखाणात काय, तेच ते, औपरोधिक, कंटाळवाणे नि कुणालातरी नावे ठेवणारे.

मला पुण्यात जाऊन रहावेसे वाटते आहे. पण बायकोला मुळीच इच्छा नाही.

>>>

माझी तर अजिबात इच्छा नाही तुम्ही पुण्यात येऊन राहण्याची... Proud

मला अमेरिकेत काय चांगलं वाटतं:
वर्क लाईफ बॅलन्स.
भारतात कधीच घरासाठी वेळ नाही मिळायचा - सततचं पळणं.
अमानुष कामाच्या वेळा - अमानुष ताण - लोकांची 'who is in control' दाखवण्याची प्रवृत्ती.. प्रदुषण, ट्रॅफिक जाम.. माझं घर अडीच तासावर असूनही मी जाऊ शकायचे नाही - कारण बरेचदा weekend लाही कामच करत असायचे.
परत, reservations आणि इतर फालतूची राजकारणं - माझ्या मुलांची गुणवत्ता असूनही गळचेपी होऊ नये असं मनापासून वाटतं (अर्थात - अजून मुलांचा पत्ता नाहीये, त्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर नाहिये)
अमेरिकन समाजही आपल्या पेक्षा जास्त मॅच्युअर- सुसंस्कृत वाटतो मला (समाज म्हणून - मी individual cases बद्दल बोलत नाहीये.. )

परत जावसं वाटायची कारणं:
१. आमचे नातेवाईक- मित्र मंडळी
२. आम्हाला दोघांनाही पुणं मनापासून आवडतं.
३. माझी मुळं मराठी मातीत इतकी घट्ट रुजली आहेत की आता दुसरीकडे कुठेच मी कायम स्वरूपी रुजू शकणार नाही असं मला वाटतं. तात्पुरतं ठीक आहे.
४. माझ्या देशात रहाण्यात काही (रादर बरेच) issues दिसताहेत खरे - पण त्याकरता देशच सोडणं बरोबर नाही वाटत मला - म्हणजे प्रोब्लेम्स सगळीकडेच असतात - स्वरूप बदलेल, पण प्रोब्लेम्स रहातील - पळून पळून किती पळणार- Its just about my ability to handle them..

विचार बदलेल का पुढं जाऊन माहित नाही.. पण अजूनतरी परत यावसंच वाटतय..
त्यामुळेच आम्ही भारतीय कंपनीलाच पकडून आहोत- आणि आता त्यांना सांगितलय पण की आम्हाला परत जायचय म्हणून..

मला पुण्यात जाऊन रहावेसे वाटते आहे. पण बायकोला मुळीच इच्छा नाही.
>>> माझी तर अजिबात इच्छा नाही तुम्ही पुण्यात येऊन राहण्याची...
>> हूड झक्की तुमच्या बद्दल तर बोलत नाहियेत ना? :O (Just kidding)

ग्रंथाली प्रकाशन चे स्व..देश नावाचे पुस्तक वाचा!
भारतात परतलेल्या २५ प्रातिनिधिक लोकांचे अनुभव त्यात दिले आहेत!
तुम्हाला नक्कीच आवडेल! Happy

माझी मुळं मराठी मातीत इतकी घट्ट रुजली आहेत की आता दुसरीकडे कुठेच मी कायम स्वरूपी रुजू शकणार नाही असं मला वाटतं. तात्पुरतं ठीक आहे.
>> ये हुई ना बात............. सगळ्यांचं असच असतं.
आमचे एक सहकारी १५ वर्ष अमेरिकेत राहिल्यावर भारतात परत आलेत. त्यांच म्हणन असं आहे की अमेरिकेत इंग्रजीचं शिक्षण चांगलं आहे, पण गणित व विज्ञान अमेरिकेच्या तुलनेत भारतातच चांगलं शिकविलं जातं. पोरिंचं शिक्षण इथेच करायचं व नंतर परत अमेरिकेत जायचं असं ठरलं आहे. हे गणित-विज्ञान प्रकारण किती खरं आहे कुणी सांगाल का ?

आई वडिल, भाऊ, मित्र यांच्यासाठी जावसं वाटतं! ज्यांचा आर या पार असा निण्र्य घेऊन झाला आहे त्यांचे मला नेहमीच कौतुक वाटते.

आंतर्जालविषयक कयद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

आंतर्जालविषयक कयद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

रैना,

धन्यवाद. अगदी छान बाफ.

आम्ही २०१० जुन मधे पुण्यात परतत आहोत. अमेरिकन नागरिकत्व घेतले आहे त्यामुळे परतायचा मार्ग उघडा ठेवला आहे. माझी आई दहा वर्षापुर्वी गेली. त्यानंतर वडील तिथे एकटे आहेत. त्याना इथे रहायची इच्छा नाही आणि त्यानी तिकडे एकटे रहावे हे आम्हाला पटत नाही त्यामुळे आम्ही परत जायचा निर्णय घेतला आहे.
जशी अमेरिकेच्या कंफर्टेबल आयुष्याची सवय झाली आहे तशीच भारतातील नॉट सो कंफर्टेबल आयुष्याची सवय करावी लागेल इतकेच.
मुलीचा अस्सल अमेरिकन अ‍ॅक्सेंट जाईल एवढेच काय ते दु:ख Happy असो.

आंतर्जालविषयक कयद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

>>पण गणित व विज्ञान अमेरिकेच्या तुलनेत भारतातच चांगलं शिकविलं जातं. <<
हे मत जर तुमच्या सहकार्‍याचे १५ वर्षे अमेरीकेत राहुनही असेल (त्यांना शाळेत जाणारी मुले आहेत असे ग्रहीत धरुन) तर मी म्हणेन "पालथ्या घड्यावर पाणी..."

इतर अनेक ब्लॉग्जवर यावर बराच उहापोह झालेला आहे, मी थोडक्यात माझा स्वतःचा अनुभव सांगतो. (इथे उत्तम स्कुल्-डिस्ट्रीक्ट अभिप्रेत आहे, नाहीतरी सगळे भारतीय आवर्जुन उत्तम स्कुल्-डिस्ट्रीक्ट मध्येच राहतात. Happy )

अमेरीकेत शालेय जीवनापासुन self-study ची सवय रुजवली जाते, जी पुढे कॉलेजेस मध्ये उपयोगी पडते. घोकंपट्टीवर भर न देता विषयाच्या आकलनाकडे जास्त भर दिला जातो. हायस्कुल तर सोडा, एलिमेंटरी शाळेतल्या लायब्ररीज, मिडिया सेंटर, लॅब्स ई. बघुन तुम्हाला मुलांचा हेवा वाटायला लागतो. Happy अभ्यासा व्यतिरीक्त मुलांचे इतर उपजत गुण शोधले आणि संवर्धीले जातात.

दुसरी गोष्ट: अमेरिकेत प्रत्येक विषयाची पातळी (complexity level) विध्यार्थ्याच्या बौद्धीक क्षमतेवर आणि गतीवर ठरते. भारतात हुषार आणि ढ मुले एकच अभ्यासक्रम शिकतात. इथे हुषार मुलाला त्याच इयत्तेत राहुन पुढच्या इयत्तेचा अभ्यास करता येतो. मिड्लस्कुलचा विध्यार्थी गणित, विज्ञान ई. शिकायला हायस्कुलला जातो.

तुमच्या सहकार्‍याची भारतात परत जायची कारणं वेगळी आहेत, त्यांनी वरील कारण देउन डायवर्शन केले आहे असे वाटते... Happy

एलिमेंटरी शाळेतल्या लायब्ररीज, मिडिया सेंटर, लॅब्स ई. बघुन तुम्हाला मुलांचा हेवा वाटायला लागतो.>>>

सही...

मला पण मुलाच्या वर्गात जाउन बसावेसे वाटते... Happy

उलट स्वतः गाडी न चालवता शोफर गाडीतून फिरवतो, पार्किंगची कटकट तोच करतो. घरात दोन तीन नोकर, ऑफिसात प्यून! चैनच असते भारतात.
----------------------------------------
हे तुमच्या बाबतीत खरे असेल कदाचित, आमच्या बाबतीत नाही! आम्ही अमेरिकेतही मध्यमवर्गीयच आहोत.. आणि पुण्यातही मध्यमवर्गीयच राहणार आहोत. Happy
नुकताच पहिला धक्का बसलाय्..आम्ही जिथे राहणार आहोत त्या भागात पाणीपुरवठा फार कमी आहे त्यामुळे बोअरवेल खोदावी लागणार आणि हार्ड वॉटर आहे त्यामुळे वॉटर सॉफनर बसवावा लागणार ही "शुभवार्ता" कळली आहे Wink

पाच सहा वर्षे जपान मधे वास्तव्य होते. (काम अर्थात संगणक बडविणे ...)

>>तुम्ही भारतात का परतलात, परतावसं का वाटलं (नक्की प्राण का तळमळला?) परतल्यावर आता कसं वाटतय ? (व्यक्तिगत बरेवाईट अनुभव, ठेचा, विचारमंथन).)
आई वडिल एकटे होते. तसेच मुलीला मराठी माध्यमाच्या शाळेत घालायचे होते.

>>तळ्यात मळ्यात- परतावसं वाटतय, हिम्मत होत नाही? दोलायमान परिस्थिती आहे? नवराबायकोपैकी एक अत्यंत नाखुष आहे ?
परत येऊन अडीच वर्षे झाली आहेत. दोघेही खुष आहोत.

>>परततानाची चेकलिस्ट ( काय करावे आणि करु नये)
तिकडचे सारे देणे घेणे पुर्ण करावे. (कर, इ.) नंतर मनस्ताप होतो.
दोन्हीकडच्या गोष्टींची तुलना करत बसु नये.

>>केल्याने देशाटन परदेशात काय मिळवलं, काय गमावलं
परदेशात पैसा मिळवला. आई वडिलांना आमच्या मुलीचे लहानपण एन्जॉय करता आले नाही. काही वैयक्तिक कारणांमुळे तिकडच्या संस्कृतीमधे मिसळून रहाता आले नाही.

>>भारतातील संधी, नोकरी, व्यवसाय, आर्थिक परिस्थितीचा आढावा (अनुभव), वर्क लाईफ बॅलन्स (व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याला देता येणारा वेळ)
यायच्या आधीच नोकरी शोधली होती. आर्थिक परिस्थिती, वर्क लाईफ बॅलन्स, इ. चांगले चालले होते. पण गेल्या एक वर्षापासुन मंदीच्या लाटेवर स्वार आहे.

>>मुलं आणि तदनुषंगिक शेकडो गोष्टी ( शाळा, शैक्षणिक पद्धत, पाल्याचा सर्वांगीण विकास, भाषांचा सराव, गणिताचा सराव, वातावरणाचा सराव)
मुलीला मराठी माध्यमात घालायचे हे आधीच ठरवले होते. तिची प्रगती चांगली आहे, भाषा आणि गणित दोन्हीची. आता दुसरीत आहे. वातावरणाचा सराव अजुन होत नाहीये कारण, पहिली चार वर्षे तिकडे बंदिस्त वातावरणात गेली, त्यामुळे इकडे शाळेत मिसळत नाही. बाकी घरात आणि नातेवाईकांमधे खुप बोलकी आहे. मराठी वाचन खुप चांगले आहे.

>>वृद्ध होत चाललेल्या मातापित्यांची जवाबदारी. पुन्हा एकत्र आल्यावरचे अनुभव. त्यांच्या दृष्टीकोनातून तुमचे परदेशगमन आणि पुनरागमन.
आम्ही तिकडे असताना आई वडिल नकळत मानसिक आणि पर्यायाने शारिरीक तंदुरूस्त नसायचे. आता खुष आहेत. नातीचे नाही पण नातवाचे बालपण एन्जॉय करत आहेत. Happy

>>समाजाचे देणे
तसे तर समाजाचे देणे हे कुठेही राहून देता येते. बाहेर राहून आर्थिक मार्गाने, आणि देशात असताना प्रत्यक्ष सहभागाने.
भाषा आणि शिक्षण क्षेत्रात सामाजिक काम करण्याची ईच्छा आहे. त्याचा एक भाग म्हणुन छोटे उपक्रम हाती घेतले आहेत.

>>दोहोंचा अनुभव घेतल्यावर आता काय करायचा मानस आहे ?
सद्ध्या आर्थिक आरिष्टामुळे पुन्हा परदेशात जाऊन काही काळ काम करावेसे वाटत आहे, पण गेलो तरी एकटाच काही काळ जाऊन यावे असा विचार आहे. अर्थात देशातच चांगली संधी मिळाली तर चांगलेच आहे.

मला अजून मुले नाहीत. पण मित्र-मैत्रीणी/ नातेवाईक ह्यांची मुलं बघून काही निरिक्षणं केली आहेत.
१) अमेरिकेत जन्मलेल्या आणि वाढलेल्या मुलांना अनेक गोष्टी हक्काच्या वाटू लागतात. जसे की
मोठं घरं, गाडी.
कपडे, खेळणी, खाद्यपदार्थ इ. मधे अफाट choice.
जगातल्या अनेक मुलांना ह्यातल्या निम्म्या गोष्टी माहितसुद्धा नसतात ह्याची इथे जन्मलेल्या आणि वाढलेल्या मुलांना जाणीवही नसते.
२) आई-वडिल आणि मुलं ह्यांच्या सांस्क्रुतिक आवडी भिन्न असतात. उदा. आई-वडिलांना हिंदी/ मराठी गाण्यांबद्दल कमालीचे प्रेम असते. मुलांना मात्र त्यात काहीही रस नसतो. मुलांना जी गाणी आवडतात त्यात आई-वडिलांना रस नसतो. हाच प्रकार जेवण, पुस्तकं, सिनेमा, खेळ ह्याबाबतीत कमी-अधिक प्रमाणात जाणवतो. त्यामुळे कुटुंबातील सगळ्यांनी मिळून enjoy करायच्या गोष्टी फारच limited असतात. भारतात रहाणार्या आजी-आजोबांना तर 'नातवंडाना काय आवडते' हे आकलनाच्या पलीकडे असते.
मी teenage मधे असताना मलासुद्धा अश्या अनेक गोष्टी (गाणी, सिनेमे, कपडे) आवडायच्या ज्या माझ्या आईला विशेष आवडायच्या नाहीत. पण तरीही आमच्या दोघींच्या काही समान आवडी होत्या. अनेक गाणी, सिनेमे, पुस्तकं आम्ही दोघी मिळून enjoy करायचो. माझ्या आसपासच्या भारतीय कुटुंबात हे मला क्वचितच दिसते.

ही निरिक्षणे सगळ्या कुटुंबाना लागू होतात असं नाही. काही अपवाद असतीलही. भारतातही परिस्थिती झपाट्याने बदलते आहे. त्यामुळे ही निरिक्षणे कमी-अधिक प्रमाणात तिथे ही लागू पडतील. पण भारतात हे टाळायचे असेल तर काहीतरी मार्ग निघू शकतात. आजी-आजोबा घरी असतील तर मुलांच्यावर वेगळे संस्कार होऊ शकतात. त्यामुळे मुलांना संस्कारक्षम वयात (साधारणपणे ८- १८ वर्षे) भारतात वाढवलेले बरे.
तसं केल्यास मुलं अमेरिकेतल्या चांगल्या शालेय शिक्षणाला मुकतील. पण आम्ही भारतातच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेऊन अमेरिकेत आलो आणि इथे यशस्वी career केली. मग आमच्या मुलांना ते का जमणार नाही?
उलटं, २०-२५ ह्या वयात अमेरिकेत आल्यावर, अनेक नवीन गोष्टी अनुभवायला मिळातील. त्यांचे अप्रूप असेल. आणि त्यातील चांगलं काय आणि वाईट काय हे कळायची अक्कल तोपर्यंत आली असेल.

@ महेशः तसेच मुलीला मराठी माध्यमाच्या शाळेत घालायचे होते.
>> वा! सहीच आहात तुम्ही!
------------------------
अगदी अगदी.
मराठीची जोपासना करायला हवी, मराठीचा अभिमान इ. इ नुसते बोलत न बसता प्रत्यक्ष कृती करणारे असे महेशसारखे लोक विरळा. खरच!

महेश खरचं सही...तुमच्याकडुन प्रेरणा घेतली पाहिजे. मी दहावीपर्यंत गणित, शास्त्र मराठीतच शिकले, पण मला कधीच त्याचा खेद वाटला नाही.

महेश किती स्वच्छ आणि प्रामाणिक पारदर्शक पोस्ट आहे तुमची.

नानबा- WLB बद्दल अगदी सहमत आहे.

सोहा- जगातल्या अनेक मुलांना ह्यातल्या निम्म्या गोष्टी माहितसुद्धा नसतात ह्याची इथे जन्मलेल्या आणि वाढलेल्या मुलांना जाणीवही नसते>>> सहमत. पन एक मुद्दा असा आहे की भौतिक विपुलता आहे, पण त्यांच्या पिढी पुढेही प्रश्नच नाहीत असं नाही. त्यांचे अस्तित्वाचे प्रश्न कदाचित वेगळे असतील.
आपल्याच पॅटर्न मध्ये पोरांना कोंबावे आणि त्यांनाही आपल्यालाच आले ते प्रश्न पडावेत म्हणजे आपण त्यांना मदत करु शकु हे पालक म्हणुन तळमळीने वाटले तरी हे बरोबर नाही.

राज- हायस्कुल तर सोडा, एलिमेंटरी शाळेतल्या लायब्ररीज, मिडिया सेंटर, लॅब्स ई. बघुन तुम्हाला मुलांचा हेवा वाटायला लागतो.>> खरंच ती साधनं पाहिली की प्रचंड हेवा वाटतो. आणि इथली रॅट रेस पाहून पोटात तुटते. एक उदाहरण देते. आम्ही ज्या निकषांनुसार मुलीसाठी एक शाळा मुकरर केली आहे, तिथला ICSE अभ्यासक्रम पाहून मला रोज आमच्या निर्णयाबद्दल शंका निर्माण होते. त्या शाळेतील एका तिसरीतील मुलीचा अभ्यास पाहून खूप धक्का बसला. तिसरीत रोमन नंबर्स ३००० पर्यंत ठेवायची गरज काय?

म्हणजे लोकांशी पटणार नाही, पण मला भारतात जाऊन मराठी सिनेमे, नाटके, गाण्याचे कार्यक्रम, व्याख्याने ऐकणे, क्रिकेट चे सामने पहाणे, या गोष्टी आवडतील. त्या साठी मी बाकीचे मुद्दे विसरायला तयार आहे>>> झक्की तुमच्या अनुभवाएवढेही माझे वय नाही, पण मला असं वाटतं की एकदा तुम्ही दुसरीकडे राहून आलात की "न घर का न घाट का" ही परिस्थिती होते. जुळवायच म्हणल्यावर कुठेही जुळवता येतं पण मनातून फार अस्वस्थ वाटतं. आणि तगमगीवर उपाय सापड्त नाही.

मानस्मी - निर्णय अमलात आणायला शुभेच्छा.

थोडेसे आमचे अनुभव.
नवरा ७ वर्ष जपान मध्ये नोकरीनिमित्ताने होता, व्यवसाय संगणक क्षेत्राशी निगडीत, मी ४ वर्ष व्यवसाय HRM. तिन वर्षांपूर्वी आम्ही भारतात परतलो.

- तुम्ही भारतात का परतलात, परतावसं का वाटलं (नक्की प्राण का तळमळला?) परतल्यावर आता कसं वाटतय ? (व्यक्तिगत बरेवाईट अनुभव, ठेचा, विचारमंथन).
आपल्या लोकांची, गोतावळ्याची, भाषेची, पदार्थांची, मराठी पुस्तकांची, सांस्कृतीक कार्यक्रमांची फार कमी जाणवायची. ती कमी तिथे मराठी मंडळाद्वारे पुरी करायचो. आपण कोण आहोत या प्रश्नाचं उत्तर शोधत आम्ही परतलो. आणि आणखी राहिलो तर With each passing year it becomes more difficult to return याची भिती वाटली. करून पहायचं तर आत्ता, नंतर जमणार नाही असं वाटलं.

परतल्यावर गार गार वाटतय का? हो आणि नाही.
- देशात हापिसातील Blatant राजकारण प्रचंड आहे. राजकारण जगात कुठेही असते. मग ते इथेच का जाणवते ? (तिथे(परदेशात) आपण खीजगणतीत (त्या league पर्यंत पोचलेलो) नसतो म्हणुन की काय ? ). Subtle ते उघड उघड Racism परदेशात कमीअधिक प्रमाणात अनुभवास येतो. आणि Subtle ते उघड उघड जातीयवाद देशात कमीअधिक प्रमाणात अनुभवास येतो. तात्पर्य सब घोडे बारा टक्के ?
- स्त्री म्हणुन जपान सारख्या देशात नोकरी करणे हा अनुभव तितकासा सोपा नाही (safety च्या दृष्टीने नाही तर जेंडर बायस च्या दृष्टीने. जिथे जपानीच स्त्रियांना समान संधी मिळत नाही तिकडे विदेशी ताम्रवर्णीय स्त्रीला ? आणि गौरवर्णीय पीतकेशांना शोपीस म्हणुन जरुर मान मिळतो पण त्यापलिकडे नाही) याबद्दल पुन्हा कधीतरी. भारतातील एकंदर कामच्या अनुभवात स्त्री म्हणुन अशी वागणुक कधीही मिळाली नाही हे जरुर नमुद करावेसे वाटते (safety च्या दृष्टीने जरूर काही वेचक अनुभव आले). यापैकी कोणता पर्याय बरा ?
- WLB मध्ये फार मार खाल्ला आहे परतल्यापासून. रहदारी, कामाचे तास प्रचंड आहेत. नानबाचे सर्व मुद्दे लागु आहेत. काहीही पहायला/ ऐकायला/वाचायला वेळ नाही. दोघं नोकरी करत असताना सुतार, गवंडी, इलेट्रिशन, टॅक्स, शिंपी , गॅस, रद्दी, धोबी वगैरेंच्या मागे धावण्यात खूप वेळ जातो. कोणीही दिलेली वेळ पाळत नाही. त्यांची वाट पहात सप्ताहाचा अंत कसा सरतो समजत नाही.
तिकडे नोकरी, प्रवास,घरकाम स्वतः करुन शिवाय म.मच्या लष्कराच्या भाक-या भाजणे, गाण्याच्या कार्यक्रमांच्या तालमी करणे, २०-२५ लोकांचा स्वैपाक स्वतः करणे वगैरे आरामात कसे करु शकायचो याचं उत्तर मला सापडलेलं नाही.
- देशात घर येणा-या जाणा-यांनी नांदतं असतं. बरं वाटतं. अगदी कंटाळ येइस्तोवर पाहुण्यांची येजा असते. पण तुम्हाला जर हे मुळातच आवडत नसेल तर फार चिडचीड होते हे परतलेल्या मित्र मैत्रीणींच्या अनुभवातुन सांगते. वैयक्तिक वेळ आणि अवकाश (स्पेस) नसतो. आणि त्याची सवय झाली असेल, मानसिक गरज वाटत असेल तर ते शक्य नसते. इथले जीवन ब-यापैकी सामुहीक (लाजेकाजेखातर म्हणा, लोक काय म्हणतील म्हणुन म्हणा, किंवा संस्कृती म्हणा) आहे याची पुन्हा एकदा सवय करुन घ्यावी लागते. गोतावळ्यातील ल.मु. डो.जे. नको इतके धार्मिक समारंभ वगैरे कार्यांसाठी वेळ काढणे हा एक फार महत्वाचा भाग असतो.
-महानगरातल्या टावर्समध्ये शेजारी वगैरे प्रकार फारसा नसतो. परदेशात लोकं स्वार्थासाठी का होईना, अडीअडचणीला कोणीतरी असावं म्हणुन का होईना, एकमेकांना धरून असतात, मदत करतात, हात धरून असतात, पदार्थांची देवाणघेवाण करतात. इथे तशी गरज पडत नाही असं वाटतं की काय म्हणुन फारसा संपर्क करु पाहत नाहीत. यात सत्य शोधायचे म्हणले तर स्वार्थ कुठेच चुकलेला नाही.
स्टेटस हा एक प्रकार मायदेशातील महानगरात फार बोकाळला आहे, आणि प्रचंड प्रमाणात लोकं पैसा खर्च करतात.
-महागाई जाणवते. परदेशात नवीन नवीन असताना,रुपयात धर्मांतर करुन प्रत्येक गोष्ट करताना सुरवातीला अगदी खर्च करवत नाही. पैसा गाठीला जोडायचा आणि थोडीच तर वर्ष काढायची आहेत म्हणुन लोकं तशी काटकसरीने राहतात (संगणकदुनियेतील on site लोकं), सोडून जाताना एकमेकांकडच्या वस्तु घेण्यात /देण्यात कमीपणा वाटत नाही. मायदेशातले भाव पाहिल्यास Reverse currency shock बसतो.
तुमचा पगार हा City Compensation INdex वर आधारीत असतो, म्हणजे देशात परतल्यास तो अर्थातच कमी होतो, पण खर्च वाढतात ही काळ्या दगडावरची रेघ आहे. (नाहीतर तुम्ही खरोखरच साधेपणानी रहायला हवं आईवडलांच्या पिढीसारखे). होतं काय की इतके वर्ष तात्पुरता फकिरी संसार केलेल्या, किंवा भौतिकसुखसोयींना सरावलेल्या दंपत्तींना परतल्यावर उत्तम हवे असते असे निरीक्षण आहे. तात्पर्य खर्चाचा ताळमेळ सहजी बसत नाही.

हे म्हणजे मारूतीच्या शेपटासारखे वाढत चालले आहे. आत्ताशी एका मुद्द्यावर लिहून झालं आहे. शक्यतोवर संयमी आढावा घ्यायचा प्रयत्न आहे आणि शेवटी स्वतःच्या आणि परिचयातल्यांच्या महानगरी(च) अनुभवांची मर्यादा आहे याची जाणीव आहे.
तुम्ही तुमची मतं सांगा.

सर्वांनी केलेल्या कौतुकाबद्दल धन्यवाद !
मातृभाषेतुन शिक्षण (निदान प्राथमिक तरी) अत्यावश्यकच आहे.
अर्थात हा वेगळा विषय असल्याने येथे त्याबद्दल जास्त लिहित नाही.

रैना यांनी लिहिल्याप्रमाणे, देशात आले की जीवन फार सामुहिक होते.
आता आम्ही परत आल्यापासुन बहुतेक कार्यक्रमांना आम्हाला जावे लागते.
आई वडिल आणि नातेवाईक यांना वाटते की आम्ही लग्न झाल्या झाल्या परदेशात गेलो होतो त्यामुळे आम्हाला सार्वजनिक / धार्मिक कार्यक्रमात भाग घेण्याची न मिळालेली संधी आता भरभरून दिली पाहिजे Happy
अर्थात आम्हाला पण अशा गोष्टींची आवड आहेच.

खर्चाचे म्हणाल तर तो पण सवयींचा आणि संस्कारांचा भाग आहे.
हॉटेलीन्ग चित्रपट आणि भरमसाठ खरेदीची दोघांनाही कधीच आवड आणि सवय नसल्याने,
खर्चाचे प्रमाण आपोआपच मर्यादित राहिले आहे.
(याचा अर्थ अजिबात नाही असे नाही, पण प्रमाण फार म्हणजे फारच कमी ...)

माझ्या ओळखीतल्या, देशात परत येऊन मध्यंतरी मंदीमुळे नोकरी गेलेल्या एक दोन जणांकडून मला कळाले की मी त्यांच्यापेक्षा खुप सुखी आहे. कारण मी वर उल्लेखिलेल्या गोष्टींवर खर्च करत नाही, तसेच माझी मुले मराठी माध्यमाच्या शाळेत आहेत. खरेतर तो पर्यन्त मला अन्दाज नव्हता की इंग्रजी माध्यमाचे प्राथमिक शिक्षण पण खुप महाग असते.

बाकी दोन्हीकडच्या पब्लिक लाईफ कम्फर्ट मधे जमिन अस्मानाचा फरक असतो हे खरे.
पण परदेशात कितीही कम्फर्ट असला तरी सतत एक प्रकारचे दडपण असते की आपण परक्यांच्या देशात आहोत, आपल्या हातुन कळत नकळत काही नियम मोडला तर जाणार नाही ना, इ.
हेच आपल्या देशात कितीही problems असले तरी एक प्रकारचा मानसिक मोकळेपणा जाणवतो.
कदाचित काहीही झाले तरी आपण कसेही निभावून नेऊ शकू या आत्मविश्वासामुळे पण असेल.
तो योग्य की अयोग्य हा वेगळ्या चर्चेचा विषय होऊ शकेल.

>>उघड उघड Racism परदेशात कमीअधिक प्रमाणात अनुभवास येतो.

अनुमोदन. Racism चा त्रास होतो. म्हणून आपला देशच बरा वाटतो कितीही प्रॉब्लेम्स असले तरी. आम्ही ४ वर्ष बाहेर होतो. पण परत आल्यावर एक प्रकारची मानसिक स्टॅबिलिटी जाणवते. कदाचित ती आमची मानसिक गरज असू शकेल.

रैने, इथे लिहायला आले आणि अगदी माझ्या मनातले लिहिलेस.

अगदी प्रामाणिकपणे लिहायचे तर हो, माझी तरी स्थिती धोबी का कुत्ता अशीच आहे. मला बाहेर येउन साधारण १२ वर्षे झालीत. आणि मी रोजच अगदी विचित्र मनस्थितीत सापडते. एकीकडे इथून जाववत नाही. कारण इथले कामाचे तास ७-८ च असतात, अगदी मॅक्झिमम. त्यात कॅनबेराची लोकसंख्या अवघी ३,६०,००० आणि क्षेत्रफळ मुंबईइतके. साहजिकच एका टोकाच्या सबर्बपासून दुसर्‍या टोकापर्यंत जास्तीत्जास्त ४५ मि. जाता येते. हवा स्वच्छ, प्रदूषण नाही. सगळीकडे हिरवी झाडी आणि गवताळ मैदाने, त्यावर बागडणारे कांगारु. रंगीबेरंगी पक्षी. भारतीय सगळ्या गोष्टी आता इथे मिळतात.

भारतात जाऊन कमी पगाराची, ज्यास्त वेळाची नोकरी धरण्याचे धाडस नाही. आम्हाला तिथे मिनिमम १२ तास काम करावे लागेल. तिथली कॉस्ट ऑफ लिव्हिंग, इथल्या स्टँडर्डसाठी मला अगदी जास्त वाटते. मुले आता १२ व ९ वर्षांची झालीत. (त्यांना मराठी शाळेत घालण्याचे धाडस नाही माझ्यात) त्यांना तिथल्या जीवघेण्या स्पर्धेत ढकलायची इच्छा नाही. तिथली अभ्यासपद्धती पटत नाही.

दुसरीकडे रेसिझम आहेच, जरी अगदी स्पर्शून गेला नाही तरी. मला त्याबद्दल तुरळक बातम्या सुद्धा अस्वस्थ करतात. नवरा म्हणतो "टू हेल विथ दॅट. हे xxxxx आपल्यावर राज्य करुन आपल्याला लुटून गेले, आता आपण भारतीय जगभर पसरून यांना लुटू.
मला घरच्या माणसांची पण उणीव जाणवते, जरी मोठा मित्रपरिवार आसला तरी. प्रत्येक काम आप्लयाला करावे लागते व त्यातून सुटका नाही हे ही सारखे जाणवत राहते.

सध्या तरी इथेच अडकलोत. पुढे बघू न या काय होतंय ते.

आंतर्जालविषयक कयद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

Pages