परतोनि पाहे (परदेशातून परतलेल्या, परतू इच्छिणा-यांचे अनुभव)

Submitted by रैना on 5 January, 2010 - 01:52

इथे खालील मुद्यांवर चर्चा / अनुभव अपेक्षीत आहे. शक्यतो उपदेशापेक्षा (काय करायला हवं वगैरेंचे डोस) अनुभव लिहा. आपण विचारांती काय निर्णय घेतला, का घेतला आणि तो कसा निभावतो आहोत.

- तुम्ही भारतात का परतलात, परतावसं का वाटलं (नक्की प्राण का तळमळला?) परतल्यावर आता कसं वाटतय ? (व्यक्तिगत बरेवाईट अनुभव, ठेचा, विचारमंथन).
-- तळ्यात मळ्यात- परतावसं वाटतय, हिम्मत होत नाही? दोलायमान परिस्थिती आहे? नवराबायकोपैकी एक अत्यंत नाखुष आहे ?
- परततानाची चेकलिस्ट ( काय करावे आणि करु नये)
- केल्याने देशाटन परदेशात काय मिळवलं, काय गमावलं
-भारतातील संधी, नोकरी, व्यवसाय, आर्थिक परिस्थितीचा आढावा (अनुभव), वर्क लाईफ बॅलन्स (व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याला देता येणारा वेळ)
- मुलं आणि तदनुषंगिक शेकडो गोष्टी ( शाळा, शैक्षणिक पद्धत, पाल्याचा सर्वांगीण विकास, भाषांचा सराव, गणिताचा सराव, वातावरणाचा सराव)
- वृद्ध होत चाललेल्या मातापित्यांची जवाबदारी. पुन्हा एकत्र आल्यावरचे अनुभव. त्यांच्या दृष्टीकोनातून तुमचे परदेशगमन आणि पुनरागमन.
- समाजाचे देणे
- दोहोंचा अनुभव घेतल्यावर आता काय करायचा मानस आहे ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळेजण इथे, इथे.. असं लिहित आहेत... कृपया देशाचे नाव पोस्टमध्ये आले तर संदर्भ चांगले समजतील..

व्वा मामी लाखाचं बोललात. त्यातल्यात्यात #३ हा मुद्धा अगदी जिव्हाळ्याचा; माझ्या आईने १५ वर्षांपूर्वी मला हेच सांगीतलं होतं.

उत्तम पोस्टी. प्रत्येक पोस्टीतून आपण वेगवेळे दृष्टीकोण मांडले ते उत्तमच आहे. विचारांचे वैविध्य आणि मतामतातील फरक मान्य करुनही खूप शिकायला मिळते आहे.
आपलं मत मांडताना दुस-याचे मुद्दे खोडूनच काढाले पाहीजेत असं नाही एवढं एकच तत्व पाळुन पुढची चर्चा करुया म्हणजे प्रत्येक बाफ बंद होतो तशी घमासान लडाईची वेळ येणार नाही. Happy

-भारतातील संधी, नोकरी, व्यवसाय, आर्थिक परिस्थितीचा आढावा (अनुभव), वर्क लाईफ बॅलन्स (व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याला देता येणारा वेळ)
यातील बरेच मुद्दे मागच्या पोस्टीत आले आहेत जे वगळुन उरलेले लिहीते.
- संधी - माझ्या कामाच्या स्वरूपात (Human Resource Management मध्ये)जपान सारख्या देशात नोकरी मिळणे कठिणच. कितीही भाषा शिकली तरी Employment Law/ Labour Legislation वगैरेंची जाण येण्याइतपत जपानी आत्मसात करणे कठिणच. तात्पर्य भारतीय किंवा विदेशी कंपन्यांची कास सोडणे मला शक्य नव्हते. आधी केल्याप्रमाणे आपण स्त्री असलात तर आपल्याला फरकाची वागणूक मिळते. आणि आपल्या देशात आपल्याला किती स्वातंत्र्य आहे याची जाणीव होते. माझी मैत्रिण मस्कत येथे नोकरी करायची. तिथे जपानपेक्षा वाईट परिस्थिती. काही गुंतवणूक बँकर स्त्रियांनी मला मध्यपूर्वेचे क्लायंटस कसे सोडावे लागतात याच्या ब-याच कहाण्या सांगीतल्या आहेत. कोरियात मला जपानपेक्षा समान संधी आढळली. चीनमध्येही (ऐकीव. मी चीनमध्ये काम केलेले नाही. चीन मध्ये काम करणा-या भारतीय सहका-यांशी बोलले आहे.), वियेतनाम मध्येही ((ऐकीव. मी चीनमध्ये काम केलेले नाही. चीन मध्ये काम करणा-या भारतीय आणि विदेशी सहका-यांशी बोलले आहे.) अमेरिकेबद्दल तुम्हीच सांगु शकता.
विवीध देशात glass ceiling किती पारदर्शक आहे आणि किती तकलादू किंवा अभेद्य हा अभ्यासाचा मुद्दा आहे.
जपानमध्ये असताना अक्षरश: ३ -५ % भारतीय स्त्रिया (माझ्या पाहणीतल्या) नोकरी करत होत्या. त्यांच्या आया भारतात नोक-या करायच्या आणि या उच्चशिक्षीत मुलींना नोकरी मिळत नव्हती. (नोकरी ही जीवनाची इतिकर्तव्यता आहे की नाही यावरून कृपया गदारोळ नको. आपण संधीबाबत बोलतो आहोत. करावी की नाही हा जिचा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. करायची असल्यास नोकरी मिळायची शक्यता हा इथे मुद्दा आहे)
भारतात समान संधीचा खरोखर सुकाळ आहे असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरु नये. तुम्हाला हवी असल्यास कुठलीही छोटी, मोठी नोकरी मिळणे शक्य आहे.
मग या मुली काय करतात ? घरकाम, छंदवर्ग, भिशी,हळदीकुंकु, ग्रोटो करुन राहणे, जपानी भाषा वर्ग, नव-याच्या बिझनेसमधे मदत, बालसंगोपन, सांस्कृतीक कार्यक्रम इ.इ.
नाण्याची दुसरी बाजू- महेश, रुनी यांनी लिहील्याप्रमाणे जपानी न येता आपल्याला जपानमध्ये नोकरी द्यावी हा अट्टाहास करणे म्हणजे इंग्रजी न येता अमेरिकेत आपल्या नोकरी मिळावी असा आग्रह धरण्यासारखे आहे. पण नेटिव लेवल जपानी शिकेस्तोवर ३+ वर्ष जाऊन, तो पर्यंत नोकरी न केल्याने नोकरी न मिळण्याची शक्यताच जास्त. शिवाय तोपर्यंत कौटुंबिक जवाबदा-या वाढलेल्या असतात.
एक समाज म्हणुन डे केअर/ डोमेस्टिक हेल्प- सपोर्ट सिस्टीमचे पर्याय तेवढे विकसीत नसल्याने जपानी स्त्रियाच मुळात मुल होऊ न देणे किंवा नोकरी सोडून घरी राहणे हे पर्याय स्वीकारतात तिथे भारतीय स्त्रियांची काय कथा?
हे मी लग्न करुन नव-याबरोबर स्थलांतरीत झालेल्या भारतीय स्त्रियांबाबत लिहीत आहे. सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या आणि कामानिमीत्त जपानमध्ये आलेल्या तुरळक स्त्रियांबाबत नाही, कारण त्या मुळातच नोकरीसाठी आलेल्या असतात.
- संधी- नव-याच्या बाबतीत त्याचा जवळजवळ संपुर्ण व्यावसायिक अनुभव हा जपानमध्येच होता. कामापुरते जपानी तो शिकला, कारण अमेरिकन बँकामध्ये संगणक अभियंत्याला त्याहून जास्त येणे जरुरी नाही, आणि त्याला भाषेत रस नाही. त्याला आता भारतीय कंपन्यांच्या कामाच्या पद्धतीची सवय राहिली नाही आणि राजकारणचा त्याला अनुभव नव्हता. Buffer या प्रकाराची सवय हे काम करवुन घ्यायला परत आल्यानंतर त्याला शिकावे लागले (कारण अंगावर शेकले.) तुम्हाला जर अमुक दिवशी कोणी काही करुन द्यावे असे हवे असेल तर त्या आधीची ३ दिवसांची तारीख लोकांना आपल्याकडे द्यावी लागते. प्रत्येकजण buffer ठेवतो आणि ठेवणे अपेक्षीत असते (भारतात). लोकांच्या मागे लागावे लागते. लोकं कधीही सोडून जाऊ शकतात, आणि दिलेल्या वेळ वगैरे जपानातल्यासारखी तंतोतंत पाळावी लागत नाही, आणि कोणी पाळत नाही. ट्रॅफिकमध्ये अडकलो ही मुंबईत इंटरव्युला उशीरा येणा-यांचे ऑफीशियल कारण असते.
७ मिनीटे उशीर झाला म्हणुन क्लायंट गेला वगैरे जपानातल्यासारखे प्रकार इथे होत नाही.
(फारच बुवा तुमचे मिस्टर वेळ पाळतात अशी तक्रार घरी,दारी, काष्ठी, पाषाणी मला ऐकावे लागते Happy
१००+ % पर्फेक्शन हे जपानातील ब्रीदवाक्य आहे. आणि ९०% झालं म्हणजे पुरेसं आहे हे आपलं.
God in in the details हे आपल्याला सहजसहजी मान्य नाही. ते छिद्रान्वेषी आहेत असं आपल्याला वाटतं आणि अर्धवट गोष्टी सोडतात असं त्यांना.
नव-याला हा चक्क व्यवसायसांस्कृतीक धक्का बसला आणि अजूनही बसतो.
तात्पर्य व्यावसायिकाची व्यवच्छेदक लक्षणं ही देशाप्रमाणे बदलतात आणि त्या बदलाला पुन्हा सामोरं जाणं अपेक्षीत आहे. ब-यावाईटाची शहानिशा हा फार पुढचा मुद्दा झाला.

आम्ही देखील २ वर्षापुर्वी भारतात परतलो. अमेरिकेत असताना तिकडे एन्ज्ऑय केले आणि आता इकडे..
परतण्याचे कारण, बायकोला एकडेच राहायला आवडते. Happy

>>३) मुलांना तुम्ही एक उत्तम उत्कर्षाची संधी अमेरिकेत किंवा पहिल्या जगातील देशांत राहून देत आहात. ती >>त्यांना का नाकारायची. त्यांचा तो हक्क नाही का?
या विषयावर तर आम्हाला नातेवाईक, मित्र, ओळखीचे, इ. लोकांचा फार विरोध झाला. एकतर सगळे चांगले चालले असताना ते सोडून देशात परत येणे आणि वर मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालणे. हे बर्‍याच जणांच्या मते वेडेपणाचे होते.
मला एक कळत नाही की उत्कर्षाची संधी ही फक्त प्रगत परदेशांमधेच असते का ? उत्कर्षाचे मोजमाप काय आहे त्यावर हे अवलंबून आहे. जमेल तेवढे शिक्षण, घरात चांगले संस्कार एवढे मुलांना मिळाले की त्यांची प्रगती करून घ्यायला ते समर्थ असतात. जिथे गरज पडेल तिथे मार्गदर्शन करावे. ज्यांच्या नशिबात जेवढी प्रगती असते तेवढी ती होतच असते. त्यासाठी जरूरीपुरते प्रयत्न असावेत, आटापिटा असु नये. आजकाल बरेच पालक मुलांना रेसमधे पळायला शिकवण्याऐवजी बरेच अंतर उचलुन घेऊन पुढे नेऊन ठेवायला पहात आहेत असेच वाटते.
(यात कोणावरही वैयक्तिक टिका करण्याचा उद्देश नाहीये. कृपया आशय लक्षात घ्यावा)

रैना, जपान मधे जे perfection आहे, ते आपल्याकडे यायला किती काळ लागेल राम जाने Uhoh
अमितला जपानला जायच्या आधी देशातल्या work culture चा अनुभव असेल ना ? कारण धक्का बसला असे लिहिले आहे म्हणुन...
मी देशी कंपन्यांच्या जपान ऑफिस मधुन प्रोजेक्ट कोऑर्डिनेशन केलेले आहे, त्यामुळे मला दोन्हीकडचे work culture and trait माहित होते.
बाकी जपान मधे मुळातच भारतीयांची संख्या अजुनही ५०,००० पेक्षा कमी आहे, त्यात देशी महिलांचे नोकरी व्यवसायाचे प्रमाण असे किती असणार.

प्रत्येक बाफ बंद होतो तशी घमासान लडाईची वेळ येणार नाही
>> मग काय मज्जा राव!! (kidding)
बादवे, सगळ्यांच्या पोस्टस छान! मामींचा दृष्टीकोन तर अगदीच भन्नाट!

आपले वडील, आजोबा जे काही स्थलांतरीत झाले ते भारतातल्या भारतात असे धरुन चालु. आपण इथे ८००० मैलावर आलो आहोत <<<

त्याकळी गावातून मुंबईला जायला बैलगाडी, बोट, चालणे असा दिवसेंदिवस प्रवास असायचा..
पोस्टकार्ड टाकलं तर आठ दहा दिवसांनी मिळायचं. आता फोन लागतो. विमानात बसून जाता येता येतं.

काळाप्रमाणे बदल होतच असतात...

फरक एवढाचः तेव्हा चार पाच मुलं असायची. त्यातला एकाददुसरा मागे रहायचा. मग आईवडिलांना सोबत व्हायची. आता एकादाच मुलगा नाहीतर मुलगी. तो/ती लांब गेले की मग आईवडिल एकटेच..

सगळ्यांच्याच पोस्टस छान नी विचारप्रवर्तक आहेत. रैना, महेश, सीमा, नी मामीही.

आम्हीही जेव्हा जपानला गेलो तेव्हा २ वर्षात चंबूगबाळं आवरुन परत भारतात जायचं हे ठरवलंच होतं. पण तिकडे रहायला लागलो नी कधी आवडायला लागलं हे कळलं ही नाही.नवर्‍याचे सगळे जिवलग मित्र आजूबाजूला होते. आणि नवीन मित्रांचीही त्यात भर पडून मोठ्ठा गृप तयार झाला होता. अधेमधे परत जायचंय हा विचार डोकं वर काढायचा खरा. पण राहू अजून थोडं म्हणत ११ वर्ष गेली. मुलीची शाळा चालू झाली होती. माझा जॅपनीज मैत्रिणींबरोबर छान गृप झाला होता. त्यांच्याबरोबर इथे भटका, तिथे भटका असं छान आयुष्य चाललं होतं खरं. मग इथे आलो. इथल्या वातावरणातही लेक छान रमली. एकंदरीत लाईफस्टाईल बघता आता परत जाऊन त्यात काही उलथापालथ करावीशी वाटत नाही. नवर्‍याचे कामाचे इथले तासही भरपूर आहेत. पण विकेंड शांततेचा असतो. कम्युट कटकटीचं नाहीये. क्वचित ट्रॅफिकमध्ये अड्कला तर. पण मुंबईसारखं किचाटही नाही. तिथे परत गेलेल्यांकडून असंच काही बाही ऐकायला मिळतं. त्यामुळे वर्क लाईफ बॅलन्स जो काही मिळेल तो इथेच मिळेल त्यातल्यात्यात.

बाहेर १४ वर्ष काढून आता पुन्हा भारतात जाऊन एकत्र कुटुंबात रहायला जमेल, आवडेल असं वाटत नाही. वर रैनाने म्हटल्याप्रमाणे सोशल कमिटमेंटसही आहेत. त्याचाही अतिरेक मला नकोसा होईल. थोडक्यात सांगायचं तर मामींच्या पोस्टमधला मुद्दा क्रमांक ६.
त्यांचा मुद्दा क्रमांक ७ ही महत्वाचा आहेच. त्यामुळे उद्या परतायची वेळ आली, जावं लागलं तर तोच एक विचारात घेतला जाईल.

esp तुम्ही इथ शिकत असाल,तसच तुमच Non IT फिल्ड असेल तर तुम्हाला सामावुन घ्यायला त्रास होतोच. >>>

सीमा, हे तू कशावरून म्हणतेस ते कळलं नाही. IT field बद्दल तर माझं अगदी उलट मत झालंय. या क्षेत्रात इतके भारतीय असल्याने बरेचदा या क्षेत्रात नोकरी करणार्‍यांचे सहकारी, मित्रमंडळी सगळेच भारतीय असतात आणि तेच आपला असा वेगळा ग्रूप करून राहताना, इथल्या माणसांशी फारसे न संबंध न ठेवताना मी पाहिले आहे. अर्थात मी यायबाबतीत generalize करू इच्छित नाही, पण 'सामावून घ्यायला त्रास होणे' याचा non IT क्षेत्राशी मला काही संबंध वाटत नाही. शिकत असण्याशी तर त्याहून नाही.

वेगवेगळ्या backgroundच्या, देशोदेशीच्या व्यक्तींना भेटण्याकरता, त्यांच्याशी मैत्री करण्याकरता इथल्या Universities सारखं दुसरं ठिकाण नाही. हा स्वानुभव. इथल्या संस्कृतीची जितकी ओळख मला Universityत झाली, तितकी नोकरीत झाली असती असं खरंच वाटत नाही. मी इथे रमण्यात, सामावून जाण्यात मी शिकत असल्याचा फार मोठा वाटा आहे Happy

असो. हा बीबीचा विषय नाही. सगळ्यांची पोस्टस खूप विचारप्रवर्तक आहेत, वाचत आहे.

सखीप्रिया , मी अस लिहिलय कारण ,
इथल्या कल्चरल वॅल्यु समजावुन घेवुन इथल्या लोकांच्यात सामावुन जायला त्रास होतो असा त्याचा अर्थ आहे. जेव्हा तुम्ही IT मध्ये असता तेव्हा तुम्हाला इथल्या लोकांच्या रोजच्या जीवनाशी , फॅमिलीविषयी निगडीत आयडिया प्रेझेंट करण्याची गरज भासत नाही. उदा. इथल डेटिंग, आई वडीलांची काळजी घेण , बायकांची नवर्‍याविषयी मत ई गोष्टी आपल्या भारतीयांपेक्षा खुप वेगळ्या आहेत. तुम्ही जर मिडिया विषयी शिक्षण घेत असाल , त्या फिल्ड मध्ये काम करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्या आयडियाज भारतीयांपेक्षा फार डिफरंट असतात. इथल्या जाहीराती बघा आणि मग भारतातल्या जाहीराती बघा. तुम्हाला फरक जाणवेल. एकत्र कुटुंबाविषयीच्या जाहीराती इथे चालणार नाहीत. इथल्या लोकाना त्या विषयी रिलेट करता येणार नाही. मॉरली काही गोष्टी चुकीच्या आहेत अस माझ्या भारतीय मनाला वाटल तरी इथल्या लोकांच्या जीवनाच त्या भाग आहेत आणि त्या त्यांच्या द्रुष्टीने नॉर्मल आहेत.
एखादा मेटॅफोर सुचवताना चौकोनी कुटुंबाची व्याख्या माझ्या मनात ठासुन बसलेली आहे. त्यामुळ एखादी नविन गोष्ट , सिंगल मदर , विभक्त कुटुंब अशा समुहासाठी असु शकते हे मला पटकन सुचत नाही. त्यामुळच शिकतानाच उलट जास्त "सामावुन जायला" त्रास होतो अस मला वाटत. कारण नोकरी मिळु पर्यंत तुम्ही मॅच्युअर झालेला असता.
याउलट तुम्ही आय टी मध्ये काम करत असताना रोजच्या जीवनाशी निगडित गोष्टीवर तुम्ही काम करत नाही. सॉफ्टवेअर वापरणार्‍या लोकांची मानसिकता कशी आहे हे तुमच्या प्रोडक्ट डिझाईनशी संबधीत नसत.
हे माझ मत आहे. वेगळ असु शकेल बर्‍याचजणांच.:)
वेगवेगळ्या देशाच्या लोकांशी मैत्री करण हा भाग संपुर्ण पणे वेगळा आहे. पण तो या बीबीचा विषय नाही त्यामुळ लिहित नाही.

रैना, चांगला विषय सुरू केला आहेस. मला माझंच मन वाचत असल्यासारखं वाटलं प्रत्येक विचार वाचून. आम्ही अमेरिकेत राहतो आणि हा विषय असंख्य वेळा बोलतो, मित्रमंडळींबरोबर चर्चा करतो पण नेमकं उत्तर सापडलं नाही अजून. बिगर आयटी क्षेत्रातलं कुणी परत जाऊन स्थिरावल्याविषयी फार ऐकलेलं नाही. त्यामुळे निर्णय घ्यायचा धीर होत नाही. निर्णय घेतला आणि गोष्टी जशा घडाव्या अशी इच्छा आहे तशा नाही घडल्या तर काय करणार? असं म्हणता म्हणता पुन्हा भारतात जाऊन नोकरी मिळण्याचं वयही उलटून गेलं बहुतेक.

आपले वडील, आजोबा जे काही स्थलांतरीत झाले ते भारतातल्या भारतात असे धरुन चालु. आपण इथे ८००० मैलावर आलो आहोत <<< त्यांना आपली नाळ तुटल्यासारखं वाटलं नसेल कदाचित. माझे आजोबा मुंबईला स्थलांतरित झाले पण त्यामुळे संस्कार बदलले नाहीत. आम्ही नातवंडं आजही आपली नाती, पदार्थ, सण, गाणी, नाटकं इत्यादि सगळयात रस घेतो. हाच विचार मी माझ्या मुलीबाबत करते, तेव्हा वाटतं की, जोपर्यंत ती आमच्या बरोबर राहत असेल तोपर्यंत कदाचित आमच्या बरोबर हे सगळं करेल. त्यापुढे ती तिच्या मुलांना यातलं काय शिकवेल? बहुधा काहीच नाही. म्हणजे माझ्या पिढीतच भारतीय किंवा मराठी संस्काराला पूर्णविराम. जेव्हा जेव्हा मी इथे वाढलेल्या पिढीचं आयुष्य बघते तेव्हा हा विचार आल्यावाचून राहत नाही. यांचे पालक आपल्यासारखेच इथे अनेक वर्षं राहिले, निकराचे प्रयत्न करून आपले संस्कार, धर्म सगळं काही मुलांपर्यंत पोहोचवत राहिले पण मुलं मात्र मनाने अमेरिकनच घडली आहेत. ती मुलं यशस्वी आहेत. पण मराठी किंवा भारतीय नसायचीच. हे स्वीकारणं कठीण जातं आहे. असो. परदेसाईंच्या मुद्द्यावर वाद निर्माण करायचा नाहीये. पण हे अनेक दिवस मनात असलेलं व्यक्त करावंसं वाटलं इतकंच.

स्मिता हे खास तुमच्यासाठी.
माझे आजोबा मुंबईला स्थलांतरित झाले पण त्यामुळे संस्कार बदलले नाहीत. आम्ही नातवंडं आजही आपली नाती, पदार्थ, सण, गाणी, नाटकं इत्यादि सगळयात रस घेतो. >> यासाठी तुमचे आजोबा महाराष्ट्रात होते. माझी ही चोथी पिढी आहे हैद्राबादमध्ये. माझ्या आइपर्यंत सण-वार होते. आम्ही मराठी मिडियमध्येच शिकलो. पण फार कमी लोक जे असे टिकवुन आहेत. आता माझ्या भाच्यांना मराठी बोलतापण येत नाहि. it depends where you move. भारतातदेखिल असच आहे. हे माझे मत.

>>जोपर्यंत ती आमच्या बरोबर राहत असेल तोपर्यंत कदाचित आमच्या बरोबर हे सगळं करेल. त्यापुढे ती तिच्या >>मुलांना यातलं काय शिकवेल? बहुधा काहीच नाही. म्हणजे माझ्या पिढीतच भारतीय किंवा मराठी संस्काराला >>पूर्णविराम. जेव्हा जेव्हा मी इथे वाढलेल्या पिढीचं आयुष्य बघते तेव्हा हा विचार आल्यावाचून राहत नाही. यांचे >>पालक आपल्यासारखेच इथे अनेक वर्षं राहिले, निकराचे प्रयत्न करून आपले संस्कार, धर्म सगळं काही मुलांपर्यंत >>पोहोचवत राहिले पण मुलं मात्र मनाने अमेरिकनच घडली आहेत. ती मुलं यशस्वी आहेत. पण मराठी किंवा >>भारतीय नसायचीच.
बाहेर राहिले की असे होण्याचे प्रमाण जास्त आहे. (फक्त अमेरिकेतच नव्हे ...)
मी वर मुलांच्या शिक्षण आणि प्रगती बाबत जे लिहिले आहे, ते लिहिताना स्मिता यांच्या लिखाणातले पण विचार मनात होते. आम्ही परत आलो तेव्हा आमची मुलगी साडेचार वर्षांची होती, तिला आता तिकडचे काहीच आठवत नाहीये. कदाचित मोठी माणसे परत येऊन adjust होऊ शकत असतील, पण बहुतेकदा मुलांना एकदा कळायला व रूळायला लागले की परत आल्यावर देशात रमेनाशी होतात.

पण बहुतेकदा मुलांना एकदा कळायला व रूळायला लागले की परत आल्यावर देशात रमेनाशी होतात.
-----------------------------------------------------------
महेश,
अगदी बरोबर.
माझी मुलगीही आता साडेचार वर्षाची आहे. तीही आताच "I will live in New jersey, you go to Pune" असे वगैरे म्हणतेय. मला वाटते ५ हा कट ऑफ धरायला हरकत नाही.

निबंध, अगदी पटलं. घरीसुध्दा ही चर्चा झाली की, महाराष्ट्रात राहू शकू का? हा माझा प्रश्न असतो. त्याची खात्री नाही म्हटल्यावर निर्णयापर्यंत पोहोचण्याचा जोर आणखी थोडा क्षीण होतो. अगदी बंगलोर हैद्राबादचंच उदाहरण असतं समोर, तुम्ही लिहिल्याप्रमाणे.

पण बहुतेकदा मुलांना एकदा कळायला व रूळायला लागले की परत आल्यावर देशात रमेनाशी होतात>> मुलं कुठेही त्या मानाने अ‍ॅडज्स्ट होतात, आपण गुंतुन पडतो.
मुळातच भारतीयांची संख्या अजुनही ५०,००० पेक्षा कमी आहे, त्यात देशी महिलांचे नोकरी व्यवसायाचे प्रमाण असे किती असणार>>> महेश इथे भारतात ५०,००० च्या सँपल साईज मध्ये नोकरदार स्त्रियांच्या प्रमाणाची पाहणी करुनही आपण असचं म्हणू शकु का ?

स्मिता- निबंधना अनुमोदन. तुमची तळमळ समजते , पण बहूधा तो आपला दृष्टीकोण आहे. भारतातही फार वेगळी परिस्थिती आहे असं नाही. संक्रमण ते हेच.

सीमा, सखी सुंदर पोस्ट. भारतीय म्हणुन विचार करायची पद्धत वेगळी होते का?

मामी, परदेसाई- अल्टिमेट प्रॅक्टिकल पोस्ट.

सायो, मिनी, परदेसाई,राज, शर्मिला, फुलपाखरू, मन:स्विनी, सीमा, चिन्नु- तुमच्या Conviction ला खरोखर दाद द्यायला हवी.

विचार करून काही उत्तर मिळालं नाही की वाटतं की काहितरी चमत्कार व्हावा आणि एक सकाळ अचानक भारतातच उजाडावी म्हणजे विचार करण्याच्या स्ट्रेस पासून सुटका होईल >> सशल टाळ्या. मलाही हेच वाटायचं.

अमृता- "नक्की" भारी आहे Happy सेमपिंच

आपलीच माणसं आपल्याच माणसांना असं पीळताना बघुन वाईट वाटतं. >> राज, आपली माणसं हे बरीचशी हौस म्हणुन करतात असं आपण म्हणाल का ?. सुमारे १५-२० वर्षापूर्वी एका पिढीने तिथे अक्षरशः क्लायंटसची दारं ठोठावून कसा भारतीय कंपन्यांकडे बिझनेस आणला ही संशोधनाची बाब आहे.
आणि तरीही आर्च म्हणते ते अगदी पटलं. बिलींगच्या हव्यासापायी १२ तासात खरोखर किती काम होतं हाही संशोधनाचाच विषय आहे.
सिंडीला अनुमोदन- आयबॅंकीगमधले कामाचे तास डिफाईन करणही अवघड आहे.

'कशासाठी पोटासाठी' >> अगदी अगदी. बनगरवाडी सारखी आपण माणसं जगायला बाहेर पडतो.

रुनी/महेश- भाषेचा मुद्दा कळीचा आहे. पटलं.

भाग्या/निबंध/जामोप्या- इतक्या कमी लोकसंख्येच्या देशात/प्रदेशात कधीही राहिले नाही. कल्पना ताणुनही कसं असेल असा विचार करवत नाही. Happy

रैना धन्यवाद!. मला वाटते म्हणुन मला जास्त exposure मिळाला या संस्क्रुतीला जवळुन बघायला Happy
आम्ही जेव्हा इथे मुव झालो त्यावेळी लोकसंख्या १,००,००० च्या आसपास त्यातुन भारतीय फक्त २० फॅमिलिस तेहि सर्व डॉ. आणि गुज्जु. आम्ही IT तले.

>>सुमारे १५-२० वर्षापूर्वी एका पिढीने तिथे अक्षरशः क्लायंटसची दारं ठोठावून कसा भारतीय कंपन्यांकडे बिझनेस आणला ही संशोधनाची बाब आहे. <<
मी सुद्धा त्यातलाच एक आहे. भारतातील कंपन्यांची वाढ कशी झाली; यात काही मोठा त्याग, अपार श्रम वगैरे नाही. हे सगळं, डिमांड्-सप्लाय, लो कॉस्ट आणि right place at the right time च गणित आहे.
असो, तो या बाफचा विषय नाही. पुढे-मागे हा विषय निघाला तर बोलुया...

पण बहुतेकदा मुलांना एकदा कळायला व रूळायला लागले की परत आल्यावर देशात रमेनाशी होतात>> मुलं कुठेही त्या मानाने अ‍ॅडज्स्ट होतात, आपण गुंतुन पडतो. >> अगदी १००% अनुमोदन.. आणि मला ह्याचा अनुभव पण आहे. माझी लेक ७ वर्षांची आहे. गेल्या वर्षी परत गेलेलो तेव्हा शाळेत थोड जड गेल पण शाळेतल्या बाईंनी आणी फ्रेंड्सनी पण तिला छान मदत केली. अमेरिकन स्टाइलने शाळेत बोलायला लाजायची त्यामुळे लगेच इंडीयन स्टाइल आत्मसात केली. १ महिन्यात पोरगी रुळली. रात्री झोपताना पुस्तक वाचायचो तेव्हा कधीकधी मी खास फर्माइश करायचे अमेरिकन एक्सेंट मधे वाचायची. Proud आणि ती मस्त वाचायची.
Happy परत आल्यावर तर १५ दिवसांत रुळाली. इथे रुळण थोड जास्त सोप आहे बहुदा पण तिला पूर्ण कल्पना आहे कि आपण परत जायचय.
कधीकधी वाटत तिच्यावर अन्याय करतोय कि काय? Sad पण १२ गावच पाणी पिउन हुशार होत्ये हे नक्कि Wink

कधीकधी वाटत तिच्यावर अन्याय करतोय कि काय? पण १२ गावच पाणी पिउन हुशार होत्ये हे नक्कि >>>

अमृता असे वाईट वाटून नकोस वाटून घेवुस. ज्या लोकांची सतत २-३ वर्षांनी भारतभर किंवा भारताबाहेर नोकरी निमीत्ताने बदली होते (आर्मी, रेल्वे, बँक, एम्बसी, कॉन्सुलेट) त्यांच्या मुलांना किती वेगवेगळ्या ठिकाणचे वातावरण, खाणे पिणे, भाषा, शिक्षण, जगण्याच्या पद्धती बघायला मिळतात, अनुभवायला मिळतात. ही लोक खूप जास्त सोशल आणि अ‍ॅडजस्टेबल असतात. पटकन सगळ्यांमध्ये मिसळतात असा माझा अनुभव आहे.

हो ग रुनी.. ह्याच एका पॉसिटीव्ह पॉइंटवर भटकतो आम्ही Happy

गेल्या वर्षी जाताना अमेरिकेतल्या शाळेतली प्रिन्सिपॉल जुईला म्हणालेली .. 'Wow!! I haven't gone out of connecticut yet and you are travelling around the world' हे ऐकुन तिला मस्त स्पेशल वाटलेल. Happy

...

सशल, तुझ्या आणि माझ्या नवर्‍याची परतण्याची कारण अगदी डिट्टो आहेत. अगदी नंबर १ पासुन ते नंबर ७ पर्यंत...

खरच हा एक खुप मोठा डिसिजन आहे.. दुपारी आम्ही ह्यावर थोडा वाद पण घातला. त्यावर मला तो म्हणाला कि तु नक्कि कुठल्या बाजुची आहेस?? मलाच हे अजुन नक्कि कळल नाहिये तर त्याला काय सांगु?? Proud

ह्याच्यातून काही सांगायचे नाही पण एक अनुभव.
इथे माझ्या बहिणीच्या मुलीबद्दल लिहिते. ती वय वर्षे ५ असताना ८ महिने भारतात होती. पुर्ण मूव न्हवती झाली बहिण. व तसा प्लॅन न्हवताच. बहिणीच्या खाजगी कामासाठी ३-४ महिन्यात होइल असे असताना ८ महिने लागले. नवरा इथेच. मार्च ते नोवेंबर. पहिल्यांदाच इतका काळ मुलगी भारतात रहाणार म्हटल्यावर तिला चिंता होती की मुलगी काय करेल.
कारण मुलीचा जन्म इथलाच असल्याने व त्या आधी भारतात १ वर्षाची असताना गेली होती.
मुलीला खूप मजा आली. त्या दरम्यानचे सर्व सण होळी, गणपती, दिवाळी , फणस खल्ला, गावी गेली गोव्याला, रत्नागिरिला वासरू प्रथमच हात लावून पाहणे हे तिला इतके मजा वाटली). हे सर्व लहान मुलीला नवीन असल्याने खूप खुष. तिने खूप एन्जॉय केले. तिने असे सतत माणसे घरी येणे. रात्री काळोख झाला तरी समोरच्या बागेत खेळणे.( समोर एक छान बाग आहे व जॉगिंग पार्क आहे बहिणीच्या घरासमोर). (मुलीला एकच माहीती, when sun goes home, you have to go to bed). Happy
मुंबईत तिथे लोक उन्हाळ्यात रात्री १०-११ पर्यन्त मुले घेवून जेवल्यावर गप्पा मारतात. गुजराती वस्ती, बाजूलाच देवळं नी भरपूर माणसं व तिच्या वयाची मुले खूप आवडले तिला.

मुलांना खूप माणसे नाही तरी भरपूर लहान मुले असले पाहिजेत खेळायला,बोलायला शाळेच्या बाहेर पण सतत. प्रत्येक वेळी घर घेताना आजूबाजूला किती मुले आहेत बघून घर घेणं जमत नाही. त्यात बर्फात खूप हाल होतात लहान मुलांचे घरीच बसून.
सो प्लस मायनस दोन्ही बाजूत आहे. ठरवणे आपला निर्णय.

इथे = अमेरिका
इथुन परत जाण्याचा विचार करणार्‍यांसाठी काही मुद्दे:
इथुन परत जाणे सोपे आहे पण इथे परत येणे कठीण आहे (स्ध्यातरी).
त्यामुळे जर मनात तिथे कसे होइल अशी शंका असेल (जशी आमच्या मनात आहे) तर इथे परत येण्याचा मार्ग खुला ठेउन जाणे उत्तम. त्यासाठी
अ)नागरिकत्व घेउन जावे.
ब)ग्रीन कार्ड असेल तर २ वर्षाचे री एंट्री पर्मिट घेउन जावे.
क)री एंट्री पर्मिट पेक्षा जास्त काळ रहाणार असाल तर अमेरिकेत काही स्थावर मालमत्ता घ्यावी म्हणजे तुम्ही पर्मनंट रेसिडेन्सी इंटेंट्चा भंग केला नाही असे होते आणि परत येताना कमी त्रास होइल.
ड्)ग्रीन कार्ड नंतर ५ वर्षानी नागरिकत्वासाठी अर्ज करता येतो आणि त्याकाळात प्रत्येक वर्षातील किमान ६ महिने इथे रहावे लागते तसेच १ वर्षापेक्षा जास्त काळ अमेरिकेतुन बाहेर राहिल्यास "कंटिन्युअस रेसिडेन्सीचा" भंग होतो त्यामुळे नागरिकत्वाच्या पात्रतेत फरक पडतो. त्यामुळे ग्रीनकार्ड नंतर परत जाण्यापेक्षा नागरिकत्व घेउन गेलेले उत्तम.
इ)ज्याना परत जायचेच आहे त्यानी ग्रीनकार्ड इ च्या मार्गाला न जाणे उत्तम कारण अमेरिका ही व्यसनासारखी आहे, इथली इतकी सवय होते की आपण इथे जे आहे त्याच्याशी इतरांशी तुलना करु लागतो आणि मग आपलीच निराशा होते.

जाता जाता, सशल फार सुंदर पोस्ट.
तुमच्या न जाण्याच्या कारणातले #३ चे कारण हे माझ्या मनातलेच आहे पण तुमच्या नवर्‍याच्या परत जाण्याचे #६ चे कारण इतर सगळया कारणाना ट्रंप करते.
असो.

अशीच चांगली चर्चा इथे सुरु रहावी.

Pages