परतोनि पाहे (परदेशातून परतलेल्या, परतू इच्छिणा-यांचे अनुभव)

Submitted by रैना on 5 January, 2010 - 01:52

इथे खालील मुद्यांवर चर्चा / अनुभव अपेक्षीत आहे. शक्यतो उपदेशापेक्षा (काय करायला हवं वगैरेंचे डोस) अनुभव लिहा. आपण विचारांती काय निर्णय घेतला, का घेतला आणि तो कसा निभावतो आहोत.

- तुम्ही भारतात का परतलात, परतावसं का वाटलं (नक्की प्राण का तळमळला?) परतल्यावर आता कसं वाटतय ? (व्यक्तिगत बरेवाईट अनुभव, ठेचा, विचारमंथन).
-- तळ्यात मळ्यात- परतावसं वाटतय, हिम्मत होत नाही? दोलायमान परिस्थिती आहे? नवराबायकोपैकी एक अत्यंत नाखुष आहे ?
- परततानाची चेकलिस्ट ( काय करावे आणि करु नये)
- केल्याने देशाटन परदेशात काय मिळवलं, काय गमावलं
-भारतातील संधी, नोकरी, व्यवसाय, आर्थिक परिस्थितीचा आढावा (अनुभव), वर्क लाईफ बॅलन्स (व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याला देता येणारा वेळ)
- मुलं आणि तदनुषंगिक शेकडो गोष्टी ( शाळा, शैक्षणिक पद्धत, पाल्याचा सर्वांगीण विकास, भाषांचा सराव, गणिताचा सराव, वातावरणाचा सराव)
- वृद्ध होत चाललेल्या मातापित्यांची जवाबदारी. पुन्हा एकत्र आल्यावरचे अनुभव. त्यांच्या दृष्टीकोनातून तुमचे परदेशगमन आणि पुनरागमन.
- समाजाचे देणे
- दोहोंचा अनुभव घेतल्यावर आता काय करायचा मानस आहे ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्याना परत जायचेच आहे त्यानी ग्रीनकार्ड इ च्या मार्गाला न जाणे उत्तम कारण अमेरिका ही व्यसनासारखी आहे, इथली इतकी सवय होते की आपण इथे जे आहे त्याच्याशी इतरांशी तुलना करु लागतो आणि मग आपलीच निराशा होते. >>> एकदम सही बोला.
हा मुद्दा कळेपर्यंत आणि कळून वळेपर्यंत किमान पाच-सहा वर्षे तरी निघून जातात तो पर्यंत वाळू हातातून आजिबातच निसटून गेलेली असते.

>>अ)नागरिकत्व घेउन जावे. <<
त्याचबरोबर, एखाद्या चांगल्या सीपीए चा सल्ला घेऊन टॅक्स बाबतचा योग्यतो खुलासा करुन घ्यावा. मला वाटतं ओवर्सीज सीटीझन्सना $६५,००० पर्यंत टॅक्स द्यावा लागत नाही; त्यावरील उत्पन्नावर टॅक्स भरावा लागतो. दोन्ही केसेस मध्ये IRS returns file करावा लागतो (अंकल सॅम पासुन सुटका नाही. :)) भारतातील टॅक्सची कल्पना नाही. जाणकारांनी माहीती द्यावी.

मामी, एकदम मुद्देसुद मांडणी! मला आत्तपर्यंत जे जे वाटलं तेच जणु तुम्हच योग्य शब्दांत मांडलय. #७ खरचच नॉन निगोशियेबले!

सगळ्यांनी छान लिहिलय.. Happy मागे मी अशाच विषयावर ब्लॉग लिहिल होता पण तो इतका सिरियस नव्हता.. Happy
मी गेले ४.५ वर्ष अमेरीकेत जाऊन येऊन आहे. मधे २ वेळा साधारण ६ महिने पुण्यात होतो. त्यातली पहिली वारी २.५ वर्षांनी झाली होती. मला अमेरीकेत रहाणं खूप आवडलं. इतके दिवस एकटा होतो शिवाय घरात शेंडेफळ असल्याने तिथलीही काही जबाबदारी नव्हती. पुण्याला आई-वडिल आणि दादा-वहिनी सगळं बघतात. त्यामुळे ऑफिसमधे सांगतील तेव्हा इथे या किंवा परत जा ह्याला माझी काहिच हरकत नव्हती आणि त्यामुळे आहे ही कंपनी सोडून इथल्या कंपनीत जॉब बघावा असा विचारही कधी केला नाही. आता मात्र सेटल होण्याच्या दृष्टीने काही निर्णय घ्यायचाय म्हणजे ३-४ वर्ष इथे राहू मग परत जाऊ किंवा मग आत्ताच परत जाऊ आणि मग यायचच नाही किंवा मग सध्या इथेच राहू आणि पुढचं पुढे बघू ह्या पैकी काहिच ठरत नाहिये. दोन्ही कडचा विचार करता खालील मुद्दे सुचले :

१. भारतात रहायला काहिच प्रॉब्लेम नाही. पण तिथे कॉलेज मधले किंवा ऑफिसमधले ऑलमोस्ट कोणीच मित्र-मैत्रिणी उरलेले नाही. सगळं जग अमेरीका, युके किंवा ऑस्ट्रेलियात आहे. माझ्या बरोबरचे ऑफिसमधले लोकं ऑनसाईट आहेत / तिकडेच सेटल झालेले आहेत किंवा जॉब सोडून गेलेल आहेत. त्यामुळे मी जेव्हा पुण्यात असतो तेव्हा बरोबर ज्यूनियर्स असतात किंवा सिनियर्स. त्यामुळे तितका मोकळेपणा रहात नाही.
२. वर लोकांनी लिहिलय तसं मधल्या काळात भारतात असताना सोशल सर्कल चा जरा त्रासच झाला. मी नातेवाईकांपेक्षा मित्र-मैत्रिणींमधे जास्त रमतो. नातेवाईकांना भयंकर इगो प्रॉब्लेम्स असतात आणि शिवाय एखाद्याशी नाही पटलं तर "हाड" करता येत नाही. उगीच ओढून ताणून रिलेशन्स ठेवावी लागतात. भारतात गेल्यावर अश्याप्रकारच्या नातेवाईकांशी उगाच संबंध येतात आणि मग कधी कधी डोक्याला शॉट बसतो.
३. शिवाय बाकीच्यांनी लिहिलं तसं पायाभूत सुविधा, भ्रष्टाचार, ऑफिसला जाण्या येण्याचा वेळ, आयटी कंपनी असली तरीही ऑफिसमधलं कलचर ह्या सगळ्या गोष्टी असतातच. भयंकर ट्रॅफिक मधून आणि घामाघूम होउन ७:३०/८ ला घरी आल्यावर कुठे जिम ला जाणार किंवा टेनिस / बॅडमिंटन खेळणार ? शिवाय आमच्य ऑफिसमधे अजूनही WFH करता येत नाही. त्यामुळे इथल्या पेक्षा घरी यायला उशिरच होतो.
४. भारतात रहावसं वाटायचं मुख्य कारण म्हणजे घरचे सगळे जणं. काही झालं तरी घरातले सगळे जणं काही इथे येऊ शकणार नाहित.
५. शिल्पाला इथे रहायला आवडेल की नाही ते अजून नक्की ठरत नहिये. त्यामुळे तो एक वेगळा आणि फारच महत्त्वाचा मुद्दा आहे. Happy
६. बाकी इथे म्हणजे अमेरीकेत कॉमन मॅन चं आयुष्य भारतातल्या पेक्षा सोप्पं आहे असं मला तरी वाटतं. शिवाय मलातरी कधी दडपण किंवा मोकळेपणाचा अभाव वगैरे काही जाणवलं नाही. उलट कोणी कोणच्या अध्यात-मध्यात नसतात. आपण बरे आपलं काम बरं असं सगळ्यांचं चालू असतं.

हे सगळं असलं तरी प्रोजेक्ट-विसा, दोघांच्याही घरच्यांचा विचार ह्या सगळ्या गोष्टींवर बरच काही अवलंबून आहे. त्यामुळे सध्यातरी वर लिहिलेले सगळेच पर्याय खुले आहेत.

जरा विस्कळीत लिहिलय. समजुन घ्या.. Happy

पग्या: पॉइण्ट नं दोन अतिशय बरोबर आहे.
मी काही परदेशात नाही, परप्रांतात आहे पण इथे वर्क लाइफ बॅलन्स चांगला आहे. क्वालिटी ऑफ लाइफ, स्वस्ताइ आहे. पुण्यात फ्लॅट घेणे जरा अवघड वाट्ते. मुम्बैततर अशक्यच आहे.

दुसरे महत्त्वाचे लंड्न स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, हार्वर्ड, व्हार्टन, येल, कॅल्टेक अश्या जगप्रसिद्ध जागातून डिग्री मिळविण्याची संधी मुलांना मिळत असेल तर ती त्यांना दिली पाहिजे. त्याचे नुसते प्रेस्टीज किंवा पैसे कमविणे या साठीच नाही. त्यांच्या आयुष्यात एक क्वालिटेटिव चांगला बदल होण्या साठी.

इथे ही आपली आवड व मुलांची आवड यात खूपच फरक आहे. आपण इप्रसारण वर हिन्दी मराठी गाणी ऐकतो तर ते दुसरेच काहीतरी. दे कांट रीलेट टू समथिन्ग लाइक नटरंग. बट दे अ‍ॅक्सेप्ट ट्वाय्लाइट नॅचरली. हे घरी मराठी वातावरण, खायला कधीकधी तूप मेतकूट भात असे असताना. गणपती दिवाळी साजरी करूनही.

दोन उदाहरणे:
१) माझा भाचा मला विचारत होता. हे मायबोली म्हण्जे मराठी लोकांचे फेसबूक आहे का?
२) नाचाचा सराव करून मुलीचे शाळेत घालायचे मोजे फाटले.
मी तिला म्हणे: अगं पुर्वी मुलीचे लग्न ठरविताना लोकांचे जोडे झिजत तुझे नाचून झिजले मोजे.
तर ती सीरीअस्ली म्हणे : झिजवायचे असतात काय जोडे?
मी : नाही ग असे म्हणतात, कधी कधी अवघड असते ना मुलीचे लग्न जमवायला.
ती: ओ, मला वाट्लं काहीतरी रिच्युअल असतं लग्नात जोडे झिजवायचे असं.

बाकी इथे म्हणजे अमेरीकेत कॉमन मॅन चं आयुष्य भारतातल्या पेक्षा सोप्पं आहे असं मला तरी वाटतं. शिवाय मलातरी कधी दडपण किंवा मोकळेपणाचा अभाव वगैरे काही जाणवलं नाही. उलट कोणी कोणच्या अध्यात-मध्यात नसतात. आपण बरे आपलं काम बरं असं सगळ्यांचं चालू असतं.>> अगदी अगदी. हे असं असणंच आजकाल एक गरज बनली आहे. इथे म्हण्जे मायबोली वर जेवढा सोशल कॉन्टॅक्ट आहे तो बास आहे. बाकी आहेच मेहनत व त्यानंतर मजा करणे. फेसबुक नि केबल टीवी.

जर काहीच निर्णय होत नसेल तर एक विचार करुन पहायला हरकत नसावी????

जर भारतात जगणे इतके अवघड असते तर भारतातले सुशिक्षित मध्यमवर्ग सोडा पण श्रीमंत लोक सहज पी आर, सिटीझनशित घेउन परदेशी गेले असते. पण ते गेले नाहीच! उलट त्यांनी तिथेच एक नवे जग निर्मान केले...!

हा अगदी आदर्शवाद झाला.

... पण मेंदु अन मन ह्यात जर द्वंद चालु असेल तर मनाचे ऐकुन बघा!!! Happy

जे लोक बाहेरच कायमचे रहाणे चांगले असे लिहित आहेत,
ते मनाने तिकडेच मुरले आहेत असे वाटते.
शेवटी जो जे वांछिल तो ते लाहो हेच खरे.
मला रामाचे एक वाक्य फार आवडते,
अपि स्वर्णमयी लंका, न मे रोचते लक्ष्मण |
जननी जन्मभुमिश्च, स्वर्गादपि गरियसी ||

>>जर भारतात जगणे इतके अवघड असते तर भारतातले सुशिक्षित मध्यमवर्ग सोडा पण श्रीमंत लोक सहज पी आर, सिटीझनशित घेउन परदेशी गेले असते. पण ते गेले नाहीच! उलट त्यांनी तिथेच एक नवे जग निर्मान केले...!

हे फारसे खरे नाही. भारतातील अमेरिकन कॉन्सुलेट समोर पहाटेपासून लागलेल्या रांगा काय सांगतात ? सर्वसामन्य मध्यमवर्गाचे अमेरिकेतील जीवन तुलनेने सोपे आणी बिन कटकटीचे आहे हे नाकारण्यात अर्थ नाही.

ज्यांना भारतात परत जाउन एखादा व्यवसाय/समाजकार्य करायचे आहे त्यांची गोष्ट वेगळी,

>> जर भारतात जगणे इतके अवघड असते तर श्रीमंत लोक सहज पी आर, सिटीझनशित घेउन परदेशी गेले असते.
त्यांना भारतात जगणे अवघड नाही. उलट इथे येऊन बस्तान बसवावे लागेल (हे श्रीमंत लोक मुख्यतः व्यवसाय करणारे आहेत असे मानले तर) कष्ट करावे लागतील. कदाचित सामान्य मध्यमवर्गीयाचे जीवन जगावे लागेल. तिथे पैश्यामुळे नोकरचाकर ठेवणे ही चैन त्यांना इथे परवडणार नाही.
>> श्रीमंत लोक सहज पी आर, सिटीझनशित घेउन
पी आर म्हणजे काय? आणि सिटिझेनशिप मिळण्याचा आणि पैश्याचा काही संबंध नाही.

>>जननी जन्मभुमिश्च, स्वर्गादपि गरियसी ||
हे सुदान, रवांडामधल्या लोकांना कसे सांगणार? Happy भारताची तुलना करण्याचा उद्देश नाही, पण भारतात आज तशी परिस्थिती असती तर?

चंपक,

तुम्ही एक शब्द वापरला त्याने खुप फरक पडतो. "श्रीमंत".

श्रीमंत लोकांसाठी भारत काय किंवा जगात इतर कुठे काय..काहीही फरक पडत नाही. मध्यमवर्गीय लोकाना ज्या काही गोष्टींसाठी भारतात आटापीटा करावा लागतो, त्या इथे सहज उपलब्ध होतात.उदा.

वाहतुक आणि कामावर जाण्याचा वेळः
-------------------------------
मुलुंड ते सीप्झ हे साधारण २५ किमी अंतर जायला किमान १.३० तास लागतो.
हे झाले वेळाचे. जाउन येउन श्रमाने थकवा येतो तो वेगळा.
इथे मी माझ्या कंपनीपर्यतंचे अंतर साधारण ३० माईल म्हण्जे ४८ किमी ३५ मिनिटात जातो.
रस्त्यांच्या परिस्थितीबद्दल न बोललेले(लिहिलेले) चांगले.

पाणी पुरवठा/वीजपुरवठा/कचरा निर्मुलन्/सार्वजनिक आरोग्य:
-------------------------------------------------
२४ तास पाणी आणि वीजपुरवठा, नियमित कचरा निर्मुलन, साथीच्या रोगांवर त्वरीत उपाययोजना ही काही खुप मोठी अपेक्षा आहे का? स्वाईन फ्लु च्या वेळेस उडालेला गोंधळ सर्वश्रुत आहे. (पुण्यात १६० बळी झाले..अजुनही जात आहेत).

शाळा प्रवेशः
----------
भारतात शाळा प्रवेशासाठी किती मारामार असते हे आपल्याला माहित आहे.(मी नुकतीच अनुभवली) अमेरिकेत शाळा प्रवेश हे बर्‍यापैकी सहज आहे.

उच्च शिक्षणः
----------
जर साधारण बर्‍यापैकी मार्क असतील तर कॉलेज मधे प्रवेश मिळुन जातात. र्रॅट रेस मधे पडायची गरज पडत नाही. ९५.९७ वगैरे गरज नाही Happy उच्च शिक्षण महाग आहे खरे पण कर्जाची वगैरे सोय होउन जाते. (सरकार कडुनही कर्ज मिळते).

भ्रष्टाचार आणि राजकीय इच्छा
------------------------
अमेरिकेत सगळे दुध के धुले आहेत असे मी मानत नाहीत पण तो वरच्या पातळीवर चालत असावा आणि जीवनावश्यक गोष्टी मधे लोकांचा जीव धोक्यात घालुन ते करत नाहीत.(नसावेत). रस्ते बांधणी/डागडुजी इ. सुरु असते. भारतात रीलायन्स /लोकमत च्या कार्यालयासमोर वाशी इथल्या रस्त्याची वाईट अवस्था झाली असताही तो तसाच पडुन होता. (आता काय परिस्थिती आहे ठाउक नाही).

आता या गोष्टी म्हणजे काही ग्रेट आहेत का? पण भारतात या गोष्टी झाल्या की जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते ज्या अमेरिकेत लोक गृहीत धरतात.
शेवटी सामान्य मध्यमवर्गीय माणुस या साध्या साध्या गोष्टीनी खुश होतो..आणि या गोष्टी सहज मिळत असतील त्या सोडुन जावे असे कोणाला वाटेल?

पी आर म्हणजे काय? आणि सिटिझेनशिप मिळण्याचा आणि पैश्याचा काही संबंध नाही.
--------------------------------------------------
१.पी.आर = पर्मनंट रेसिडेन्सी/ग्रीनकार्ड म्हणायचे असावे.

२.इथे $५००,००० च्या वर गुंतवणुक केली तर ग्रीनकार्ड मिळते (ईबी ५ च्या अंतर्गत)
http://www.eb5greencard.com/
माझ्याकडे २.५ करोड/$५००,००० असते तर इथे कशाला आलो असतो Wink

अशा श्रीमंत लोकांना परदेशी स्थाईक व्हायला आवडत नाही याचे आणखी एक कारण म्हणजे तिथे तुमच्या बी एम डब्ल्यू ने चार पादचारी उडविले तर ते प्रकरण पैसे देउन मिटविणे अवघड असते. Happy

आणखी एक मुद्दा म्हणजे भारतात आधीच मूलभूत सोयी ( पाणी, वीज, शाळा, नोकर्‍या) यांची कमतरता आहे. आपण परत जाऊन त्यात आणखी एक वाटेकरी वाढवित आहोत याचेही भान ठेवणे जरूरीचे आहे. आपल्या मुलाला मेडिकल ला प्रवेश मिळाला याचा अर्थ दुसर्‍या एक मुलाचा हुकला.
आपल्या परत जाण्याने भारताचा फायदाच होईल असे नाही. किंवा न जाण्याने नुकसानच होईल असेही नाही.
May be we are better off here from an average Indians point of view.

आपण परत जाऊन त्यात आणखी एक वाटेकरी वाढवित आहोत याचेही भान ठेवणे जरूरीचे आहे >>> खूपच विनोदी आहे हे Lol

चर्चा वाचली. दोन्ही कडचे मुद्दे पण बरेच पटन्यासारखे आहेत त्यामुळे जर ही चर्चा वाचून कुणी ठरवत असेल तर ते चुकीचेच होय.

बर्‍याच लोकांनी मुलांना परदेशात राहील्यावर मोठ्या शाळेत, युनी मध्ये सहज प्रवेश मिळेल हे लिहीले आहे, तसे असते तर इथले सगळेच गोरे मोठ्या शाळेत शिकले असते. जर मुलात कॅलीबर असेल तर तो कुठूनही वर येतो. इथे बहुतांश लोक भारतात शिकूनच अमेरिकेत आले आहेत, मग जे आपण करु शकतो ते आपलेच मुलं करु शकत नाहीत असा "आत्मविश्वास" का बाळगायचा?

बरं लहान मुलांचे इथे प्रॉब्लेम नाहीत असेही नाही. कळत्या-नकळत्या वयात सेक्स, टिनेज प्रेग्नंसी, ड्रग अ‍ॅडिक्शन, सिगारेट्स आणि शाळेत नेहमी गोळीबार असे प्रॉब्लेम इथे जास्त आहेत. (भारतात तुलनाच करायची असेल तर हे प्रॉब्लेम कमी आहेत, स्टॅटप्रमाने तुमचे अपत्य यात अडकायचे प्रमाण तिथे कमी आहे.) पण ह्या विषयाला इथे कुणी आधी मांडले नाही.
भारतात मात्र वर्गात तुलनेने जास्त मुलं असतात (असायचे) आता बर्‍याच शाळांमध्ये तुम्ही विचार करता तसे चांगले शिक्षण दिले जाते.

कॉमन लाईफ इथे अगदी सहज आहे हे अगदी मान्य. पोल्युशन, इतरांची भोचक मते यांना शुन्य किंमत इथे आपण देउ शकतो पण भारतात नातेवाईक किंवा शेजार्‍यांचे ऐकुन घ्यावे लागते. पण त्याची दुसरी बाजू अशीही आहे की आपण दुसर्‍या देशात असताना घरी तेच मदत करतात. आपले आई वडिल आपण तिथे नाही आहोत हेच समजून घेउन अश्या लोकांना मान देतात हे विसरता कामा नये.

WLB जनरलाईज करायला गेले तर तिथे थोडे कमी आहे पण हे केस टू केस व्हेरी होते, माझे अनेक मित्र आता तिथे जाऊन फक्त ९ तास काम करतात. घरुनही काम करु शकतात. माझे अनेक रिसोर्स बरेचदा दिवस दिवस ऑफिस मध्ये न येता भारतात घरुन काम करतात. ही ऐकीव नाही तर खरी माहीती आहे. प्रमाण कमी आहे, पण हे कल्चर तिथेही सुरु झाले आहे. Happy निव्वळ माझ्या बाबतीत बोलायचे असे तर मी इथे चार दिवस नेहमी बाहेर असतो, म्हणजे नो लाईफ विथ किड्स न फॅमिली. कदाचित तिथे हे करायची गरज नाही पडणार. त्यामुळे अ‍ॅस आय सेड केस टू केस व्हेरीज. Happy

इथे मात्र पोल्युशन फ्रि लाईफ आहे. पुण्यात एक शर्ट फक्त एकदाच घालता येईल. पण हे पुण्याचे झाले, मी इतर भारतात फिरलो तिथे तुलनेने पोल्युशन कदाचित कमी असेल.
पण इथे भांडे घासने, कपडे धुणे, कपड्यांच्या घड्या करने इ इ घरची काम स्वःत कराव्या लागतात. ज्याला तिथे मात्र योग्य मुल्यात माणसं मिळतील.

सोशल लाईफ ला इथे मिक्स व्हा असे काही जणांनी लिहीले आहे, ते योग्य जरी असले तरी ९० टक्के भारतीय अमेरिकन सोशल लाईफ मध्ये सामील नसतात. त्यांना मग आपल्या मिंत्राशी "जुळवून"घेउन शनि-रविवारी पॉटलक करावे लागतात. कितीश्या अमेरिकन्स सोबत तुमचे रोजचे सोशल व्यवहार आहेत? इथे अमेरिकन लोकांनाच सोशल प्रॉब्लेम आहेत हे ही सांगीतले जाते की. तुलनेने भारतात सोशल लाईफ आहे, त्याची किंमत मग त्याचा भोचक मताला स्विकारुन / न विरोध करुन द्यावी लागते.

माझे नातेवाईक म्हणतात की "एकदा चान्स मिळाला, आता कश्याला वापस येता" अश्या टाईपचे लोक स्वतःवर विश्वास नसणारे असतात, असे चान्सेस अनेकदा पैदा करु शकतो. कारण चान्स मिळने हयावर निदान माझा विश्वास नाही, मी इथे आलो ते चान्स मुळे नाही तर माझ्यात असणार्‍या कॅलिबर मुळे. हा विश्वास जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात कामी येउ शकतो. Happy

इथे राहने वा न राहने हा व्यक्तिगत निर्णय आहे. इथे राहत आहे त्यातही आनंद आहेच, पण वर सशलने मांडले तसे जसे आल्हादला वाटते तसेच मला वाटते, इथे मी आयुष्यभर राहू शकणार नाही. माझे मित्रही पुण्यातच आहेत, ते अजूनही दर आठवड्याला भेटतात, त्यामुळे मित्रांचा प्रश्न, जो महत्वाचा आहे तो ही सुटतो.

माझ्यासाठी महत्वाचा मुद्दा असा आहे की आता जो भारत आहे, तो येत्या २० वर्षात नसणार, आजच्या पेक्ष कितीतरी प्रगत व अनेक संधींचा असणार. तशी वाटचाल सुरु आहे, थोडा वेळ लागेल, तेवढी माझी थांबन्याची तयारी आहे. माझी मुलं जेंव्हा मोठी होतील तेंव्हा त्यांना कदाचित अमेरिकेत (प्रगत देशात) येण्याची गरजच राहणार नाही.

केदारचे वरील पोष्ट आवडले कारण ते इतरांपेक्षा वेगळे वाटले.

देशात परत गेलेले परत मेल वरुन तितकासा संबंध ठेवू शकले नाहीत. थोडे निराशही वाटले. इथे १५ वर्ष राहिलेल्या एका मित्राकडे मी भेट दिली. तेंव्हा तो मला म्हणाला की आम्ही एके काळी सिंगापुरात होतो असे आता वाटतही नाही. परदेशात राहत असलेल्या लोकांनी बोललो तर आमची मनं दुखतात की काहीका कारणाने असेना पण आम्हाला इथे परत यावे लागले. इथे त्या संधी सोयी मिळाल्या नाहीत. पण तिथे असताना सारखा जीव तुटायचा. परत कधी जाऊ कधी नाही.

देशात परत जावून परत परदेशातल्या सारखेच कमी अधिक फरकाने जीवन जगणारी मित्र मंडळी मी पाहिली नाहीत. देशातून इथे येणे आता सोपे वाटते पण परदेशातून सर्व सोडून परतणे १०००० वेळा विचार करुन देखील नक्की काय ठरवावं हे कळत नाही.

देशातून परदेशात गेल्यानंतर लोकांना कसे वाटते यावर खूप मते वाचायला ऐकायला मिळालीचं नाहीत.

शोभा चित्रांच्या गोठलेल्या वाटा या पुस्तकात एक वाक्य छान आहे की. इथे परदेशात आपला जसा जीव तुटतो आपल्या देशासाठी, आपल्या माणसांसाठी, आपल्या संस्कृतीसाठी तसा जीव देशातील आपल्या लोकांचा आपल्यासाठी तुटताना दिसत नाही. मुळात त्यांना आपल्या भावना देखील कळत नाही Sad

कळत्या-नकळत्या वयात सेक्स, टिनेज प्रेग्नंसी, ड्रग अ‍ॅडिक्शन, सिगारेट्स आणि शाळेत नेहमी गोळीबार असे प्रॉब्लेम इथे जास्त आहेत. (भारतात तुलनाच करायची असेल तर हे प्रॉब्लेम कमी आहेत, स्टॅटप्रमाने तुमचे अपत्य यात अडकायचे प्रमाण तिथे कमी आहे.) पण ह्या विषयाला इथे कुणी आधी मांडले नाही.
>>> तुमची पोस्ट वाचून असं वाटतंय की इथे सगळ्याच शाळात सर्रास गोळीबार, ड्रग्ज वगैरे चालतं की काय. पटलं नाही हे.
स्टॅट्बद्दलच बोलायचे असेल तर इथे किती टक्के शाळांत असले प्रकार किती वेळा होतात ? फार कमी, तेही ठराविक भगात, ठराविक लोकॅलिटीत. आपण घर घेताना उत्तम शाळा असलेला स्कूल डिस्ट्रिक्ट बघूनच घेतो ना! आमच्या (आणि इतरही अनेक )स्कूल डिस्ट्रिक्ट मधे कधी ड्रग्ज, गन्स असले प्रकार झालेले नाहीत. त्यामुळे देशात हे प्रकार कमी आणि हे स्टॅट इथे काही वेगळे आहेत असे वाटत नाही.
टीनेज प्रेग्नन्सी, सिगारेट्स हेही तसंच. घरच्या शिकवणीवर आणि मूल कोणत्या कंपनीमधे आहे त्यावर अवलंबून आहे ते. इथे किंवा भारतात कुठेही असलात तरी तेच.

सशल आणि केदार ल पूर्ण अनुमोदन.
आम्हाला इथे येऊन ७-८ वर्षे झाली. इथेच राहु शकू असे आधीपासून कधी वाटले नाही आणि अजूनही वाटत नाही. माणसे/ सोशल लाईफ हाच मुख्य मुद्दा. दोघेही मोठ्या (एकत्र नाही) कुटुंबात वाढलो आणि फक्त आई-बाबाच नव्हे तर इतर नातेवाईक, भाऊ-बहीणी, कझिन्स पण खूप जवळचे होते. इकडे आल्यावर अंतरामुळे फरक पडतोच. मनानी जवळ आहोत ना, मग अंतराचं काही नाही वगैरे बोलायला ठीक आहे. इथे दर शनि-रवि भेटायला मित्र्-मैत्रिणी असले तरी साधारण तेच तेच लोक भेटत राह्तात. भारतात वेगळे-वेगळे ग्रुप्स असतात (असं आम्हाला वाटतं). इथे आम्ही अगदी small town मधे आणि NJ सारख्या बरेच भारतीय / मराठी असणार्‍या अशा दोन्ही ठीकाणी राहिलो. हवामानामुळे बाहेर जाणे कमी होते त्यामुळे वर्षातले ६ महिन्याहून जास्त काळ मुले घरात/ डे केअरमधे बंद असतात याचे मला वाईट वाटते.
दुसरा मुद्दा: इथे परत यायचा मार्ग खुला ठेवावा हे practically बरोबर वाटते पण सध्या immigration सोप्पं राहिलं नाही. नागरिकत्व मिळायला बराच वेळ लागतो, नियम कधिही बदलू शकतात म्हणजे अनिश्चितता आली, या सगळ्यामुळे नक्की किती वर्षे इथे राहयचं हा निर्णय घेणे अवघड आहे.
आमच्यापुरते तरी आम्ही २०१० मधे परत जायचे असे ठरवले आहे. यात देखील जर्...तर आहेत पण परतीच्या द्रुष्टिने पावले टाकायला सुरुवात केली आहे.
माझा दीर अमेरिकेत पहिल्यांदा आल्यावर २-३ तासात मी त्याला फोन केला तर तो म्हणाला होता की मला अमेरिका जाम आवडली आणि मी इथेच राहिन, भारतात परत जाईन असं वाटत नाही. त्यावेळि तो किती immature आहे असं वाटलं होतं पण आता वाटतं की असा निर्णय घेणे चंगले. त्यानी आधी ठरवल्यामुळे द्विधा मनःस्थिती वगैरे झाली नाही त्याची. आम्ही मात्र matured, well-thought निर्णय घ्यायच्या नादात रोज सकाळ- संध्याकाळ तेच मुद्दे आणि तेच विचार उगाळत बसलोय.

>>देशातून परदेशात गेल्यानंतर लोकांना कसे वाटते यावर खूप मते वाचायला ऐकायला मिळालीचं नाहीत. <<
आतापर्यंततरी फक्त १-२... आम्ही (NRI) लोकं, आमचीच टीमकी वाजवतोय असं वाटतय...

BTW, वरील केदारच्या पोस्ट मध्ये बरेच होल्स (माझ्या मते) आहेत; लिहुका? पण त्या आधी भारतात परतलेल्यांचे अनुभव वाचायला आवडेल...

टीनेज प्रेग्नन्सी, सिगारेट्स हेही तसंच. घरच्या शिकवणीवर आणि मूल कोणत्या कंपनीमधे आहे त्यावर अवलंबून आहे ते आपण घर घेताना उत्तम शाळा असलेला स्कूल डिस्ट्रिक्ट बघूनच घेतो ना! >>

अगदी योग्य. माझा एक चांगला मित्र आहे. माझ्या सारखाच नेपरविल मध्ये राहतो. नेपरविल हे अमेरिकेत टॉप ५ मधल्या सबर्ब मध्ये आहे. Happy त्याचा हुशार मुलगा जो ऑक्टोबर मध्ये गजाआड गेला कारण तो ड्रग विकत होता. घरची शिकवन अगदी साधी, सरळ. कोण्याही मध्यमवर्गांयासारखी. भांडने जेवढी आपण करतो तेवढीच. तो ड्रग का विकत होता तर ईट वॉज कुल हे त्याचे उत्तर होते. हे उदाहरण सर्वांच्याच बाबतीत आहे असे बिलकुल म्हणने नाही. पण असेही होते / होउ शकते हेच मला वर सांगायचे आहे. आणि एवढेच नाही तर त्यासोबत आणखी दोन देशी मुलं देखील ड्रग विकायची / घ्यायची ते पण बेष्ट नेबरहुड मधल्या सुप्रसिद्ध शाळेत. शाळेतला गोळीबार एक होल आहे, पण दर एक दोन महिन्यात अश्या न्युज इथे दिसत नाहीत का?अजूनही ड्रग डिलींगचे प्रमाण भारतात कमी आहे. ड्रग फ्री स्कुल्स ही चळवळ इथे का चालू होत आहे मग? आपला मुलगा त्यात अडकेल असे काही नाही, पण इतर गोष्टी दिसत असताना त्यात अडकणार नाहीच असेही होणार नाही. घरची शिकवन, " यु आर नॉट कुल" मध्ये नेहमी कामी येईल असे नाही.

शिवाय मी हे जनरलाईज करतोय असे वाटत असले तर ते चुक आहे कारण मी येथील व तेथील शाळा व त्या अनुषंगाने येणारे प्रॉब्लेम्स मांडले इतकेच. ते ही इथे लिहीणारे मुलांचे शिक्षण निर्णयात आणत होते पण त्याची दुसरी बाजूही आहे हे सांगायचे इतकेच.

कुणीही काहीही निर्णय घेतो (राहणे / जाणे) तो माझ्या मते क्रिटीसाईज होऊ शकत नाही असे मात्र मला नक्कीच वाटते.

राज अगदी बिनधास्त लिहा. Afterall to here or to go is personal again!

झक्की,
कोणतरी पूर्वी म्हणले की "कोलकत्ता इज अ डाईन्ग सिटी"
त्यावरुन काहूर माजले होत
याच धर्तीवर आज मी जर म्हणलो की "अमेरिका जॉईन्टली वुईथ गल्फ कन्ट्रीज" आर डाईन्ग नेशन्स, तर मग तुम्हाला अन झक्कीवहिनीन्ना भारतात परतायला हरकत नसावी ना?
मात्र, हो, सध्याच्या मनूप्रमाणे भारतात तुम्हाला "जानवे" घालून फारसे दिवस कन्ठता येणार नाहीत हे नक्की! Proud Lol [अर्थात नट्स हे लिहायला मी सोईस्कररित्या विसरतोय]

मैत्र्येयी,
>>>>> आणि मूल कोणत्या कंपनीमधे आहे त्यावर अवलंबून आहे ते. इथे किंवा भारतात कुठेही असलात तरी तेच.
हे महत्वाचे,
अन तुमच्या आजवरच्या पोस्ट्स्मधे, मी कधीही, या बाबी "पालकान्च्या हातबाहेर" असू शकतात याचि "जाणिव" अनुभवली नाहीये, भारतात वा भारताबाहेरही!
माझ पोरग रस्त्यावर एकट[ फिरल भारतात, तर त्यास किती गर्दुले भेटतील? किती नशेबाज भेटतील? किती गुण्ड भेटतील? किती किडन्यापर्स भेटतील? याचा विचार करावाच लागतो! मुलीन्बाबत तर वेगळाच गम्भिर इश्यू!
या तुलतेन विचार करुन बघा, सगळेच एनाअराय भारतीय काही तुमच्यासारखे "सुरक्षित" व तुलनेत "अमेरिकन सदाशिव पेठतुन" आर्थिक कारणान्नी राहू शक्त नाहीत. तेव्हा तुमचा. "आर्थिकदृश्ट्या सबलतेचा अनुभव" सार्वत्रिक असूच शकेल, असे कृपया मानू नका, व, तसा तो नसेल, तर "असले लोक आर्थिक दृष्ट्या सबल नस्ताना इकडे येतातच कशाला, वा असे येणे हा त्यान्चा अपराध नाही का? वा यामुळेच ते तसे, तर त्यान्नी रडावे कुन्थावे कशाला? सरळ भोगावे" अशा स्वरुपाची मते आपण माण्डणार नाहीच!
असो.
आजचा कोटा सम्पलाहे

>>>>>>> टीनेज प्रेग्नन्सी, सिगारेट्स हेही तसंच. घरच्या शिकवणीवर आणि मूल कोणत्या कंपनीमधे आहे त्यावर अवलंबून आहे ते आपण घर घेताना उत्तम शाळा असलेला स्कूल डिस्ट्रिक्ट बघूनच घेतो ना! >>

माफ क्ररा पण भारतात हे प्र्श्ण तुलनेत खूपच कमी प्रमाणात आहेत! पण असो, आलेलेतच, ! सेक्स स्कॅणडलच्या रुपाने!
तरीही,
प्रश्ण उरतोच......
माझ्या नात्यातील कोणा एका "ब्राह्मण" मुलीने मुसलमानाशी लग्न केले आहे! (केरळात गाजत आसलेल्या सेक्स स्कॅन्डलचा महाराष्ट्रिय अवतर")
अन मग तिने एकदा "प्रेमापोटी व कशपोटी" ते लग्न केल्यावर जर तिथे "भले गोमांसही" खायला लागले तर तक्रार कशाच्या आधारावर करावी?
वरिल चर्चा मला या धर्तीचीच वाटते आहे Sad

सशलची पोस्ट एकदम आवडली. दोन्ही बाजू छान लिहिल्या आहेत तिने. त्यातले दोन मुद्दे मला पटले:
१. एका विशिष्ट मर्यादेनंतर अमेरिकन लाइफस्टाईलशी जुळवून घेता येत नाही / घ्यावेसे वाटत नाही.
२. म्हातारपणी एकटं रहायला आवडणार नाही.

पराग, तू म्हणालास ते मित्रांचे उदाहरण अगदी खरे आहे. माझेही असेच आहे, माझे सगळे मित्र आता इकडेतिकडे आहेत. पण जेव्हा मी इकडे शिकायला आलो तेव्हा त्यांना सोडून आलोच की. आणि इथे आल्यावर नवीन मित्र झाले. त्यामुळे आपण जाऊ तिथे नवीन मित्र होत राहतील असे मला वाटते.

केदारने लिहिले आहे की आपली मुलं कॅलिबरची असतील ती स्वतः इथे शिकायला येतील. एकदम पटले! माझा इंजिनिअरींग कॉलेजमधला मित्र आहे अनिकेत मुळे नावाचा. तो पाचवीत असताना त्याचे कुटुंब अमेरिकेतून भारतात परत आले. तोच आता एमबीए करायला अमेरिकेत आला आहे.

हा मुळे पाचवीपर्यंत अमेरिकेत शिकला असल्यामुळे फर्मास इंग्रजी बोलायचा. आमच्या बीईच्या प्रोजेक्ट प्रेझेंटेशनसाठी आम्ही त्याला सांगितले की, मुळे तू फक्त प्रेझेंटेशनची सुरुवात आणि शेवट फक्कड इंग्रजीतून कर, बाकी टेक्निकल गोष्टी आम्ही बघून घेतो... Lol अजूनही आठवलं की हसू येतं.

अमेरिकेविषयी आवडणार्‍या गोष्टी म्हणजे WLB. त्यामुळे उरलेला वेळ सत्कारणी लावता येतो. काहीतरी छंद वगैरे असतील तर जोपासता येतात. पोल्युशन फ्री वगैरे आहेच. तसेच इथे चांगल्या प्रकारचे काम करायला मिळते.

अमेरिकेतल्या न आवडणार्‍या गोष्टी म्हणजे इकडचे सोशल लाईफ. इकडचे सण आणि ते साजरा करण्याच्या पध्दती मला आवडत नाहीत. नुसतंच बरोबर जाऊन दारू पिऊन आलो की सोशल लाईफ झाले असे वाटत नाही.

वर बर्‍याच लोकांनी 'आपल्या मुलांना उत्तम शिक्षणाची संधी मिळत आहे तर का देऊ नये' वगैरे काहीतरी लिहिले आहे. अजिबात पटले नाही. भारतातले शिक्षण काही निकृष्ट दर्जाचे नाही. त्याशिवाय सर्व प्रगत देशांमध्ये इतके भारतीय गेले नसते. भारतातले शिक्षण चांगलेच आहे, हे माझे ठाम मत आहे. तिथेही उत्तम शिक्षणसंस्था आहेत. फक्त विद्यार्थ्यांच्या मानाने त्या कमी आहेत त्यामुळे स्पर्धा खूप आहे. ती परिस्थितीही नक्कीच बदलेल. रॅट रेस जरी असली तरी त्या पीअर प्रेशरमुळे मुलं अभ्यास करण्याची शक्यता जास्त आणि इतर गोष्टींमध्ये अडकण्याची शक्यता कमी वाटते.

तेव्हा 'आम्हाला जायचेच होते, पण मुलांसाठी इथे राहिलो' वगैरे कारणं अजिबात पटत नाहीत. आधी आपण आपले जीवन सुखी करावे, मुलांचे जीवन आपोआप सुखी होते असे मला वाटते. त्यामुळे मला आणि माझ्या (भावी) बायकोला इथे रहायला आवडते आहे असे वाटले तर राहणार, नाही तर परत जाणार.

>>राज अगदी बिनधास्त लिहा. Afterall to here or to go is personal again! <<
ओके, हिअर यु गो...

प्रथम ड्रग्स, सेक्स यावर बोलु. या सगळ्या बाबींकरता इथले वातावरण थोड्याफार प्रमाणात कंड्युसीव आहे यात शंका नाही. म्हणुनच पालकांची जबाबदारी अजुन वाढते. योग्य संस्काराबरोबरच मुलांबरोबरचा संवाद (त्याचे मित्र कोण आहेत, शाळेच्या अ‍ॅक्टीविटीज, स्पोर्ट्स्/विडीओ गेम्स) चर्चा घडवणे अत्यंत आवश्यक ठरते. जे आपण बरेच पालक करतो. इतकं असुन सुद्धा काही प्रकार घडतात पण त्यांचे प्रमाण (भारतीयांत) नगण्य आहे; त्याचं जनरलायझेशन होउ शकत नाही. असले प्रकार जगाच्या पाठीवर सगळीकडे होत असतात (मुंबई अपवाद नाही); फक्त त्यांना एक्स्पोजर मिळत नाही.

शिक्षणाच्या बाबतीत एक वेगळेपण म्हणजे; हुशार मुलाला योग्यतो वाव मिळतोच पण त्याचबरोबर अ‍ॅवरेज किंवा बीलो अ‍ॅवरेज मुलांना सुद्धा योग्य मार्गदर्शन करुन यशस्वी होण्यास मदत केली जाते. आपली मुलं अभ्यासात हुशारच निपजतील याची गॅरंटी कोणिही देउ शकत नाही. Happy

वर केदारने म्हटल्याप्रमाणे इथे राहणे वा परतणे हा ज्याचा-त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे. तुम्ही जेव्हढ्या लवकर हा कीडा डोक्यातुन काढुन टाकाल (आर या पार), तेव्हढे लवकर सुखी व्हाल. जाता जाता एक मित्रत्वाचा सल्ला. मुलं लहान असतानाच परता. मोठी मुलं घेउन परतलेल्यांचे अनुभव खुप वाईट आहेत (बरेचसे माघारी परतलेत). त्यात सगळ्यात जास्त नुकसान मुलांचं होतं.

बाकी नंतर कधीतरी...

लिम्बू
अन तुमच्या आजवरच्या पोस्ट्स्मधे, मी कधीही, या बाबी "पालकान्च्या हातबाहेर" असू शकतात याचि "जाणिव" अनुभवली नाहीये, भारतात वा भारताबाहेरही! >>>>
हे काही कळलं नाही?? माझ्या आजवरच्या पोस्ट्समधे म्हणजे कुठल्या पोस्ट्स मधे? अशी चर्चा आपल्यात पूर्वी झाली असेल तर मला आठवत नाहिये , क्रुपया संदर्भ द्या.

बाकी तुम्ही त्या पोस्ट मधे बरंच काय काय लिहिले आहे , अमेरिकन सदाशिव पेठ इ.इ Happy , ते मलाच उद्देशून असे गृहित धरते - तर इथे परदेशी राहणार्‍यांचे परत जावं की रहावं या विषयावरचे अनुभव अन मतं लिहिणे अपेक्षित आहे ना, मग मी तेच लिहितेय, लिहिणार! अन मी माझेच माझ्या आर्थिक सबल /दुर्बलतेनुसार / राहणीनुसार बनलेले मत लिहिणार ना. इतर कुणी एनाराय सबल आहेत की दुर्बळ, रडतायत की कुंथताय्त त्यावर माझं जाणं /रहाणं कसं अवलंबून असेल? Proud

>>
मुलं लहान असतानाच परता. मोठी मुलं घेउन परतलेल्यांचे अनुभव खुप वाईट आहेत (बरेचसे माघारी परतलेत). त्यात सगळ्यात जास्त नुकसान मुलांचं होतं.

हे एक्दम पटेश !

Pages