सुमती क्षेत्रमाडे नाव वाचलं कि घोड्यावरून पाठलाग, गोळीबार, बदला अशा कथा असतील असं वाटायच. कवर वर एक टिळा लावलेला हिरो एक हेमाडपंती हसरी स्त्री तिच्या डोक्यात फूल ( क च्या जागी ळ आलेला) टिकली, मधून भांग आणि डोळ्यात (इथे बरोबर) इंतजार. खाली मोठ्या अक्षरात सुमति क्षेत्रमाडे, कुमुदिनी रांगणेकर अशी नावे असायची. असंं भव्य नाव डावीकडून सुरू करून उजवीकडे संपेपर्यंत हा लेखक खूप भारी आहे असं वाटू लागायचं. असंच चिंतामणी लागू हे नाव वाचून फारच भारी वाटलेलं आणि ते पुस्तक घरी नेल. ते वाचल्यावर वडील ओरडले होते.
त्यात गल्लीतला दादा तरूण मुलांचं जे रॅगिंग करायचा त्याची एव्हढी तपशीलवार वर्णने होती कि त्या वेळचे गे पॉर्न वाटवे. पुस्तक वाचल्यावर काय घरी आणलं हे समजलं. पुढच्या महिन्याभरात वडलांच्या नजरेच्या टप्प्यात येणार नाही असाच वावर होता.
मला अमुकच टेम्प्लेटचे चित्रपट हवेत असे नाही. वर फारेंड आणि अस्मिताने लिहिलेय ते मुद्दे असले की चित्रपट आवडतो.
मराठीत रॉय यांना हवे तसे चित्रपट फारसे नाहीत कारण चित्रपट ही कला समजुन तसे चित्रपट बनवायची आंच माणसात पक्षी दिग्दर्शकात असावी लागते. तर तो चित्रपट तसा बनतो. मराठीतले जुने नावाजलेले दिग्दर्शक पाहिले तर त्याण्ची टेम्प्लेट ठरलेली होती. राजा परांजपे सामाजिक बनवणार, दिनकर पाटील ग्रामिण बनवणार वगैरे वगैरे. ही मंडळी मुख्यत्वे धंदा म्हणुन चित्रपटाकडे पाहात होती. चालणारा चित्रपट बनवायचा हे उद्दिष्ट होते. मला चित्रपट या कलामाध्यमातुन व्यक्त
व्हायचेय म्हणुन मी चित्रपट बनवतोय असे म्हणणारे खुपच कमी दिग्दर्शक मराठीला लाभले. सचिनला चांगले चित्रपट बनवायचे असते तर त्याने हिंदीतले गाजलेले चित्रपट मराठीत आणले नसते. त्याने सेफ गेम खेळत चित्रपट बनवले. त्याचा आत्मविश्वास हा एक वेगळी कथा असलेला चित्रपट होता जो फारसा चालला नाही.
आता १० वाजता विविधभारतीवर नीरज घायवानची मुलाखत होती. मला शेवटची दहा मिनिटेच ऐकायला मिळाली. पण त्यातुनही त्याची चित्रपट बनवायची तडफड लक्षात आली. त्याला स्वातंत्र्य देणारा प्रोडुसर लाभला आणि त्याने दोन उत्कृष्ट चित्रपट बनवले.
घायवान हा दलित समाजात जन्मलेला मराठी माणुस जो हैद्राबादेत लहानाचा मोठा झाला. होमबाऊंडच्या पहिल्या स्क्रिनिंगचा अनुभव त्याने सांगितला. ‘ मी जे आयुष्य पाहिले, त्याबद्दल मला जे वाटले ते मी पडद्यावर मांडले आणि ते मोठ्या स्क्रिनवर पाहिल्यावर पुर्णतः मोकळे झाल्याची भावना मला दाटुन आली. शेजारी बसलेल्या प्रोड्युसरला धरुन मी खुप रडलो’ या शब्दात त्याने आपली भावना मांडली. पडद्यावर मांडलेल्या विषयाबद्दल इतकी आंच असलेली मराठी दिग्दर्शक मंडळी मोजायला हाताची पाच बोटे पुरेशी असावीत.
माझा आक्षेप असा आहे की एंटरन्टेनमेन्ट साठी भरपूर मसाला असून्ही जे मराठी चित्रपट बनले ते कल्पनादारिद्र्याने एवढे गांजलेले असत की बस्स. मी ते अतिवास्तववादी किंवा वास्तववादीच असावेत असा आग्रह धरत नाही पण त्यांच्यात एंटरटेनिंग तरी काही असावे.
गावाचा पाटील म्हणजे जणू जन्मजात रेपिस्टच. आणि जिप शाळेवरची बाई म्हणजे सदगुणांची मूर्तीच.
साबरबोंड आवडला. या गोष्टीला नावच नाही सुरवात चांगली वाटली नंतर रटाळ झाला. जुन्या जमान्यात समांतर प्रायोगिक चित्रपट निघत त्या टेम्प्लेटमधला वाटला. संदीप सावंतांचा श्वास व नदी वाहते दोन्ही आवडले होते. नदी वाहते जास्त आवडलेला.
रॉय यांच्या छिद्रान्वेषी धोरणामुळे चिकवावर गजबजाट !
काल रात्रीतून आलेल्या सगळ्या पोस्टी वाचल्या. चिल्ड्रन ऑफ हेवन, साबर बोंडं हे पाहायचे आहेत.
माझेमन, कुठे अव्हेलेबल आहे "चिल्ड्रन ऑफ हेवन"?
रानभुलीच्या कालच्या पोस्ट वरून - Fourteen stories that inspired Satyajit Ray - नावाचे पुस्तक ऐकले काही दिवस. त्यात त्यांनी आणि इतर लेखकांनी लिहिलेल्या अशा निवडक कथा आहेत ज्यावर नंतर त्यांनी हिंदी व बंगाली चित्रपट बनवले. शर्मिला टागोरची प्रस्तावना आहे. गूगल केल्यास चित्रपटाची यादी मिळेल.
सुमती क्षेत्रमाडेंचे "याज्ञसेनी" वाचले आहे, शाळेत का कॉलेज मधे. हां 'मैं हुं खलनायक' चालीत कबुलीजबाब.
मी स्नेहलता दसनुरकर, योगिनी जोगळेकर, कुसुम अभ्यंकर, सुमती क्षेत्रमाडे, बाबा कदम यांचे भरपुर साहित्य वाचले आहे. लायब्ररी आईची होती, माझा रोल फक्त पुस्तक बदलुन आणणे इतकाच होता, पुस्तक कुणाचे आणायचे हे आई सांगायची. काकोडकरांची आणायची नाहीत हे तिने बजाऊन ठेवले होते. घरी आलेले प्रत्येक पुस्तक मी वाचायचे. आता ह्या साहित्याचे एक पानही वाचवणार नाही पण तेव्हा चालायचे. व पु
काळ्यांचीही भरपुर पुस्तके वाचलीत. तेव्हा दवणे सिद्धहस्त लेखक झाले नव्हते, त्यामुळे मी वाचले. म्हणजे वाचायच्या संकटातुन वाचले. असो. आपल्याला काय.. आपण भजी गुंडाळलेला रद्दी कागदही भजी खाऊन झाल्यावर वाचणार्या कॅटेगरीतले. जे मिळते ते वाचायचे.
एकदा तेव्हा नुकताच प्रकाशित झालेला पुल एक साठवण
हा ग्रंथ मला लायब्ररीत दिसला आणि मी तो घरी आणला. गोष्टीचे पुस्तक आणायचे सोडुन हे असले भलतेच काहीतरी आणल्याबद्दल आई मला खुप ओरडली होती.
अस्मिता, चिल्ड्रेन ऑफ हेवन पाहणारच असशील तर where is the friends home आणि The Way Home (2002) हातोहात (किंवा डोळ्यासरशी.) पाहून घे.
मला the way home खूप म्हणजे खूपच आवडतो. जेव्हा कळलं की ती आजी खरी आहे, तिचे जीवन अस्सल आहे (म्हणजे चित्रपटात) दाखवलं आहे अगदी तसेच खरे खुरे तेव्हा मला प्रचंड धक्का बसला होता. हा चित्रपट प्रत्येक नातवाने पहावा असा आहे. म्हणजे मला एक नातू म्हणून तर पूर्ण भावविवश करून टाकतो हा चित्रपट. बरं उगीच हा चित्रपट इतका व्याकूल केला आहे असे म्हणायला जावे तर जितकं वाचले त्यावरून दिग्दर्शकला सलामच ठोकावा.
आणि कळसाध्याय म्हणजे turtles can fly हा चित्रपट.
हा चित्रपट तुम्हाला थोडेफार हसवताना असां धाडकन जमिनीवर आदळवतो की त्यानंतर तुम्ही पूर्वीचे राहत नाही.
चिल्ड्रन ऑफ हेवन पाहिला आहे. नंतर या दिग्दर्शकाचे अजून पाहावे म्हणून "बरान" सुद्धा पाहिला. तो आवडला होता का लक्षात नाही. पण इतर बघितलेले नाहीत.
ब्राह्मणी हा शब्द खूप निगेटिव्ह झाला आहे. माझे खरेतर या जातीबरोबर काहीही शत्रुत्व नाही. हा शब्द अलीकडे समाजातल्या एका लेयरची संस्कृती आणि त्याची नीतीमूल्ये दाखवण्यासाठी तेवढाच त्या अर्थी मी वापरतो >>> यातला पुढचा भाग आहे त्याबद्दलच विचारत होतो. जातीबद्दल काही आहे असे मुळातच वाटले नव्हते.
बाकी स्टीरीओटाइप्स हे मराठीच काय, हिंदीतही मुबलक आहेत. इव्हन हॉलीवूडमधे. त्या त्या इण्डस्ट्रीतील ग्रूपथिंकचाही प्रभाव असतोच.
चिकवावरची ही आजची चर्चा खूप वाचनीय झाली आहे. म्हणजे पूर्वी आवडलेल्या चित्रपटाबद्दल थोडक्यात लिहावे असा एक नियम वाचल्याचे आठवते. तो आताच्या धाग्यामधे नाही याबद्दल धागाकर्त्याचे आभार मानावेत तेव्हढे थोडे आहेत. काही जण इतके सुंदर लिहीतात चित्रपटाबद्दल कि चित्रपट कसाही असो, त्यांचे लिखाण मात्र खूप आवडते. चित्रपट ही सुद्धा कला आहे हे नव्याने समजते. '
अस्मिता, फारेण्ड हे विशेष आवडते आहेत. साधना, माझे मन यांचे लिखाणही आवडते. फेरफटका गायब आहेत, पण त्यांच्या दाद देणार्या पोस्टसची आठवण येते. अजून खूप जण आहेत.
रॉय यांच्या आजच्या पोस्टस आवडल्या.
नीरज घायवान नाव ऐकून माहिती आहे. त्याचा सिनेमा बघायचा आहे. त्यासाठी वेगळा मूड बनवावा लागतो. कधी कधी आपोआप बनतो कि आता बास, वेगळं हवं. त्या वेळी पाहीन.
अस्मिता तुझं वाचन दांडगं आहे. त्याबद्दल रिस्पेक्ट आहे. मी सत्यजित रेंचं काहीही वाचलेले नाही. सिनेमे खूप पाहीले. काही काही समजले नाहीत. पण सिनेमाच्या भाषेतलं वेगळेपण लक्षात आहे. एक घर आहे त्यात काळे पांढरे चौकोन, त्या चौकोनात मोठ्या आकारचे काळे पांढरे क्युब्ज, त्यावर बसून किंवा उभी असणारी दोन माणसं. विशेष म्हणजे लाईटिंग. प्रखर प्रकाशाचा झोत फिरत राहतो. त्यात हे काळं पांढरं दृश्य अक्षरशः बोलतं. कधी हा फोकस बोलणार्याच्या चेहर्यावर , तर कधी बोलणारा अंधारात जातो. खूप कमी संवाद. हा सीन आयुष्यभरासाठी मनावर कोरला गेला आहे. हा सत्यजित रें च्याच सिनेमातल आहे कि इटालियन हे आज नक्की सांगता येत नाही.
इथे मी लिहीलेय का नौका डुबी बद्दल ? कुठेतरी ( मायबोलीवरच बहुतेक ) सत्यजित रेंच्या या लघुकथेबद्दल वाचून शोधाशोध केली तेव्हां कश्मकश नावाने हिंदी सिनेमा ओटीटीवर पहायला मिळाला. हा सुभाष घईंनी दिग्दर्शकाची परवानगी न घेता हिंदीत डब केलाय. घईंचा निषेध पण त्यांच्यामुळे हा सिनेमा पहायला मिळाला. हा पॅरलल सिनेमा नाही. कथेतली गुंतागुंत आणि पंचतंत्र कि इसापनीती मधली नात्यांच्य गुंत्याची गोष्ट नेमकी पडद्यावर मांडता आलेली नाही तरी सिनेमा आवडला. पॉप्युलर सिनेमाप्रमाणे घेतलाय ऋतुपर्ण घोष यांनी. रेको देत नाही, कारण थोडी जुनी शैली आहे.
सी नो एव्हिल , हिअर नो एव्हिल वरून एक आलेला होता, त्यात बहुतेक अशोक सराफ नाही. एकापेक्षा एक का ?
>>
एकापेक्षा एक च तो
पण अशोक सराफ आहे त्यात, इन्स्पेक्टर च्या रोल मधे
नऊ धान्यांचा धान्यवडा वाल्या निशिगंधा वाड चा नवरा
मी गावी आलो आहे आणि आमच्या गावाच्या थेटरात १०० हा चित्रपट लागला आहे. मी गावी आलो की एक रुल असतो तो म्हणजे आमची गँग घेऊन जो चित्रपट थेटरात असेल तो बघणे म्हणजे बघणेच.
त्या नियमाला अनुसरून मी जात आहे. अभिप्राय जर अनपेक्षित असेल तरच देतो.
मी हे आधीही लिहिलं आहे. माणसं, संस्था, कलाकृती - यात साहित्य, नाटकं , चित्रपट सगळे आले. त्या त्या काळाचं प्रॉडक्ट असतात. तुम्ही त्या त्या काळात ते चित्रपट पाहिले आणि आवडले नाहीत, असं झालं असेल तर तुम्ही खरंच आधीपासून स्वतंत्र विचार करू लागलात किंवा a faultfinding captious critic या अर्थानेcynic असाल. यात काही वावगं वाटत नाही.
मी वर चर्चेत आलेले बरेच चित्रपट दूरदर्शनवर पाहिले. आधी रेशनच्या धान्यावर , मग फक्त रेशनच्या साखरेवर आणि दुसर्या दुकानातल्या धान्यावर आणि दूर दर्शन दाखवत असलेल्या चित्रपटांवर मी वाढलो आहे. त्यामुळे समोर येईल ते बघावं अशी सवय. खाण्याच्या बाबत समोर येईल ते टाकावं अशी पुढे बदलली.
तर त्या त्या चित्रपटांना त्या त्या काळात प्रेक्षक होते. आशा काळे, सुलोचना इत्यादींचा घरांत छळ होई त्याच्याशी त्या काळातल्या सुना रिलेट करत असतील. दादा कोंडकेंचे सिनेमे विक्रमी चालले म्हणजे लोकांच्या डोक्याला मनोरंजन देत होते. त्यांचे सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव आणि आंध ळा मारतो डोळा हे चांगले होते. पुढे त्यांनी फॅक्टरी टाकली. सुरुवातीला वसंत सबनीस त्यांचे लेखक होते. पुढे तेच होते का माहीत नाही. अशी ही बनावबनवीचे लेखकही वसंत सबनीस.
सध्या राष्ट्र प्रथम , हिं दुत्वाच्या वार्यात शिवकालावर टांकसाळ उघडली आहे आणि लोक ते चित्रपट भक्तिभावाने पाहतात. वर आम्हांला हे शाळेत शिकवलं नाही, असं सांगायलाही तयार. याची सुरुवात टीव्ही मालिकांतून झाली.
सासरी छळ सोसणार्या स्त्रियांचा जमना मागे पडला. आता शिकलेल्या तरी मन मारून जगणार्या बायकांना लंडन बिंडनला फिरवून मोकळा श्वास घेताना दाखवलं की त्या वर्गातल्या बायका आपलंच आयुष्य पडद्यावर दाखवलं म्हणून खुष. याची सुरुवात केसरी ट्रॅव्हल्सच्या माय फेअर लेडीपासून झाली असावी.
आणखी एक गोष्ट म्हणजे त्याच गोष्टी काही वर्षांनी फिरून फॅशनेबल होतात. मी लहान असताना कानेटकरांच्या ऐतिहासिक नाटकांचे दिवस होते. आता चित्रपटांचे आहेत. माझ्या जन्माआधी भालजींचे इतिहासपट होते.
माझी मोठी बहीण कॉलेजात असताना बेल बॉटमची फॅशन होती. ती आता आजी झाली तर ही फॅशन परत आली.
अरे, कुठे नेऊन ठेवला चिकवा माझा ?
अँकी नं १ थँक्स कन्फर्म केल्याबद्दल. आठवला आता.
चिल्ड्रेन ऑफ हेवन आठवत नाहीये. पुस्तक होतं का ते ?
आज ब्रिज ऑफ स्पाईज बघायचा होता. प्राईम वर आहे म्हणून सबस्क्रीप्शन रिन्यू केलं, आता सांगतात राईटस एक्स्पायर झाले . टॉम हँक्स _ स्टिवन स्पिलबर्ग काँबो + ऑस्कर अॅवॉर्ड म्हणून बघायची इच्छा झालेली.
प्राईम वर अॅक्युज्ड दिसला. इथे चर्चा चालू आहे म्हणून सुरू केला पण तिथे इंग्रजी आहे.
नेफ्लिवर शोधाशोध करताना माबो अॅक्युज्ड सापडला. बघेन नंतर. काही स्पाय मूवीज सापडलेत.
अरेंज मॅरेजसाठी हिरो हिरोईन भेटतात. योगायोगाने एकाच शाळेचे निघतात. एकमेकांना शाळेची अधुरी लव्हस्टोरी सांगतात. मग त्यांना एक किडा सुचतो. तेव्हा जे प्रेम व्यक्त करता आले नव्हते ते आता त्यांना भेटून करायचे ठरवतात. बाकी बघा स्वतःच.
हलकाफुलका रोमँटिक माझ्या आवडीचा जॉनर.. मस्त जमून आला आहे.
स्पिलबर्गचे सगळेच सिनेमे शिंडलर्स लिस्ट प्रमाणे नाहीत. कधी कधी तो डेव्हीड धवनप्रमाणे इंडीयाना जोन्स बनवतो ( मसाला चित्रपट). कधी कधी आपत्तीपट म्हणून जॉज बनवतो. तो सगळ्या प्रकारचे सिनेमे बनवतो. अगदी रामसे त्याच्यात शिरतात तेव्हां पोल्टरगिज पण बनवतो. द शुगरलँड एक्सप्रेस नावाचा सिनेमा तुकड्या तुकड्यात युट्यूबवर होता. जांभया आलेल्या. हाच का स्पिलबर्ग असे वाटावे असा. बहुतेक तो खूप सुरूवातीचा असेल. त्याचे आधीचे सिनेमे नष्ट झालेले आहेत. त्याचे नाव खूप गाजले ते ईटी मुळेच बहुतेक.
जुरासिक पार्क सिरीज मधले फक्त स्पिलबर्गने स्वतः दिग्दर्शित केलेले पहिले दोन भागच आवडलेत. बाकीचे अजिबात आवडले नाहीत. तेच तेच आहे. जॉज हिट झाल्यावर पिर्हाना आला, मग १,२ , ३ भाग आले तसं झालंय.
अरारारारा स्पिलबर्ग नावामुळे ट्रिगर झालो ते केव्हढा घरंगळत गेलो. थांबतो आता. ( अत्यंत टुकार कथांचा भडीमार करून मायबोलीकरांना वीठीस धरायचे हे या आयुष्याचे उद्दीष्ट होते, त्या पासून भरकटलो याबद्दल क्षमा मागतो. आता लवकरच उद्दीष्टांशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करीन. फक्त टायपिंगचा त्रास आहे).
'ब्रिज ऑफ स्पाइज' थेटरला आला होता तेव्हा पाहिला होता.
नंतर बर्लिनजवळचा तो ब्रिज मुद्दाम प्रत्यक्ष जाऊन पाहिला.
त्यानंतर पुन्हा टीव्हीवर तो सिनेमा पाहिला.
फर्क पडता है! (माझ्यासारख्या इतिहास, सिनेमा दोन्हीची आवड असणार्यांसाठी नक्कीच)
Submitted by ललिता-प्रीति on 18 March, 2026 - 02:07
आ देखे जरा,
२००७ चा सायन्स फिक्शन film, नील नितीन मुकेश आणि बिपाशा बसू राहुल देव ह्यांच्या प्रमुख भूमिका .
नील नितीन मुकेश हा स्ट्रगल करणारा फोटो जर्नालीस्ट आहे. त्याला कुठेही ब्रेक मिळत नाहीये, त्याच्या आजोबांनी बनवलेला एक क्यामेरा त्याला मिळतो . ह्या ल्यामेरयाचे वैशिष्ट्य म्हणजे तो भविष्यात जे होणार आहे त्याचे फोटो काढतो.
हे जेव्हा नितीनला समजते तेव्हा त्याचा उपयोग करून लॉटरी, रेसकोर्स वर तो पैसे कमवायला लागतो. ह्याच सुमारास त्याची ओळख बिपाशाशी होते. तसेच दोन विलनपण त्याच्या मागे लागतात. तशात साधारण त्याच वेळी नितीनला दिसते कि आपला मृत्यू काही दिवसात होणार आहे, तिथून तो दिवस मग तास मोजायला सुरवात करतो . टेन्शन वाढत जाते. पण बिपाश सर्व परिस्थिती हाताळते,
शेवट अर्थात सुखांत आहे.
कान्सेप्ट चान आहे . पण बॉक्स ऑफिसवर फेल गेलेला.
यू ट्यूब वर बघू शकाल.
ह्यात मोदींचे कौतुक तर भरभरून होतेच, आणि ते अपेक्षितही होते. (प्रोपोगंडा हा शब्द जाणूनबुजून टाळतोय)
पण सिनेमा मनोरंजक नसेल हे स्वप्नातही आले नव्हते. पण नेमके तसेच झाले आहे. चार तास कसे बसे काढले.
ह्यातही गाणी चांगली आहेत, पण पहिल्याइतकी नाहीत.
संजय दत्त पहिल्या सिनेमातही बोअर वाटलेला इथेही वाटला. रणवीर सिंहने उत्तम अभिनय केला आहे.
हा जुना सिनेमा बघायचा राहिला होता. मध्यंतरी यूट्यूबवर दिसला. पॉलिटिकल थ्रिलर, गुलझारचं लेखन. कथा आजही रिलेट होते.
ओम पुरी, कुलभूषण खरबंदा, मनोहर सिंग, असे आर्ट फिल्मचे नेहमीचे यशस्वी कलाकार आहेत.
मुख्य भूमिकेत मध्यमवयीन शशी कपूर. त्याने त्याचं आधीचं ग्लॅमर सगळं बाजूला ठेवून इथे एडिटरची भूमिका मस्त केली आहे. त्याची बायको म्हणून शर्मिला टागोर. हिला मात्र ग्लॅमर बाजूला ठेवता आलेलं नाही. तसंच बोअर लाडिक बोलणं, तेच चेहर्यावरचे हावभाव. खूप कंटाळा येतो. पण तिला फार फुटेज नाहीये.
आजही नक्की बघण्यासारखा आहे सिनेमा.
Submitted by ललिता-प्रीति on 20 March, 2026 - 02:09
सुमती क्षेत्रमाडे नाव वाचलं
सुमती क्षेत्रमाडे नाव वाचलं कि घोड्यावरून पाठलाग, गोळीबार, बदला अशा कथा असतील असं वाटायच. कवर वर एक टिळा लावलेला हिरो एक हेमाडपंती हसरी स्त्री तिच्या डोक्यात फूल ( क च्या जागी ळ आलेला) टिकली, मधून भांग आणि डोळ्यात (इथे बरोबर) इंतजार. खाली मोठ्या अक्षरात सुमति क्षेत्रमाडे, कुमुदिनी रांगणेकर अशी नावे असायची. असंं भव्य नाव डावीकडून सुरू करून उजवीकडे संपेपर्यंत हा लेखक खूप भारी आहे असं वाटू लागायचं. असंच चिंतामणी लागू हे नाव वाचून फारच भारी वाटलेलं आणि ते पुस्तक घरी नेल. ते वाचल्यावर वडील ओरडले होते.
त्यात गल्लीतला दादा तरूण मुलांचं जे रॅगिंग करायचा त्याची एव्हढी तपशीलवार वर्णने होती कि त्या वेळचे गे पॉर्न वाटवे. पुस्तक वाचल्यावर काय घरी आणलं हे समजलं. पुढच्या महिन्याभरात वडलांच्या नजरेच्या टप्प्यात येणार नाही असाच वावर होता.
रॉय यांची पोस्ट आवडली. छान
रॉय यांची पोस्ट आवडली. छान लिहिलेय.
मला अमुकच टेम्प्लेटचे चित्रपट हवेत असे नाही. वर फारेंड आणि अस्मिताने लिहिलेय ते मुद्दे असले की चित्रपट आवडतो.
मराठीत रॉय यांना हवे तसे चित्रपट फारसे नाहीत कारण चित्रपट ही कला समजुन तसे चित्रपट बनवायची आंच माणसात पक्षी दिग्दर्शकात असावी लागते. तर तो चित्रपट तसा बनतो. मराठीतले जुने नावाजलेले दिग्दर्शक पाहिले तर त्याण्ची टेम्प्लेट ठरलेली होती. राजा परांजपे सामाजिक बनवणार, दिनकर पाटील ग्रामिण बनवणार वगैरे वगैरे. ही मंडळी मुख्यत्वे धंदा म्हणुन चित्रपटाकडे पाहात होती. चालणारा चित्रपट बनवायचा हे उद्दिष्ट होते. मला चित्रपट या कलामाध्यमातुन व्यक्त
व्हायचेय म्हणुन मी चित्रपट बनवतोय असे म्हणणारे खुपच कमी दिग्दर्शक मराठीला लाभले. सचिनला चांगले चित्रपट बनवायचे असते तर त्याने हिंदीतले गाजलेले चित्रपट मराठीत आणले नसते. त्याने सेफ गेम खेळत चित्रपट बनवले. त्याचा आत्मविश्वास हा एक वेगळी कथा असलेला चित्रपट होता जो फारसा चालला नाही.
आता १० वाजता विविधभारतीवर नीरज घायवानची मुलाखत होती. मला शेवटची दहा मिनिटेच ऐकायला मिळाली. पण त्यातुनही त्याची चित्रपट बनवायची तडफड लक्षात आली. त्याला स्वातंत्र्य देणारा प्रोडुसर लाभला आणि त्याने दोन उत्कृष्ट चित्रपट बनवले.
घायवान हा दलित समाजात जन्मलेला मराठी माणुस जो हैद्राबादेत लहानाचा मोठा झाला. होमबाऊंडच्या पहिल्या स्क्रिनिंगचा अनुभव त्याने सांगितला. ‘ मी जे आयुष्य पाहिले, त्याबद्दल मला जे वाटले ते मी पडद्यावर मांडले आणि ते मोठ्या स्क्रिनवर पाहिल्यावर पुर्णतः मोकळे झाल्याची भावना मला दाटुन आली. शेजारी बसलेल्या प्रोड्युसरला धरुन मी खुप रडलो’ या शब्दात त्याने आपली भावना मांडली. पडद्यावर मांडलेल्या विषयाबद्दल इतकी आंच असलेली मराठी दिग्दर्शक मंडळी मोजायला हाताची पाच बोटे पुरेशी असावीत.
माझा आक्षेप असा आहे की
माझा आक्षेप असा आहे की एंटरन्टेनमेन्ट साठी भरपूर मसाला असून्ही जे मराठी चित्रपट बनले ते कल्पनादारिद्र्याने एवढे गांजलेले असत की बस्स. मी ते अतिवास्तववादी किंवा वास्तववादीच असावेत असा आग्रह धरत नाही पण त्यांच्यात एंटरटेनिंग तरी काही असावे.
गावाचा पाटील म्हणजे जणू जन्मजात रेपिस्टच. आणि जिप शाळेवरची बाई म्हणजे सदगुणांची मूर्तीच.
एंटरन्टेनमेन्ट साठी भरपूर
एंटरन्टेनमेन्ट साठी भरपूर मसाला असून्ही जे मराठी चित्रपट बनले ते कल्पनादारिद्र्याने एवढे गांजलेले असत की बस्स. >> +१००
आणि अतिशय नाटकी असतात.
मला वपु काळे कधीही वाचले
मला वपु काळे कधीही वाचले नसल्यामुळे आवडतात.
@भरत, आंदेव.
मी तुम्हाला सुबोध भावेचे आत्मचरित्र भेट देतो.
माझेमन,
माझेमन,
>> ततक्षणी <<
काश जग तुमच्यासारखं नितळ मनाचं असलं असतं तर.
मी काही चित्रपटांचा उल्लेख
मी काही चित्रपटांचा उल्लेख केला नाही.
१. सोबर बॉण्ड
२. या गोष्टीला नावच नाही. ( संदीप सावंत कृत..)
या दोन्ही चित्रपटात मस्त दीर्घकथा आहेत. दोन्ही चित्रपट साधे आहेत आणि त्यांच्यात अगम्य असे काही नाही.
अहेंद्र गजिरे छाप एखादा दिग्दर्शक करतो तसे एखादा रोग घेऊन त्याला पिळून काढणे नाही.
उगाच शून्यात हरवून करंडकप्राप्त एकांकिकेच्या वाचिक अभिनयचे उत्तेजनार्थ पारितोषक प्राप्त छापाचे स्वगत नाही.
साबरबोंड आवडला. या गोष्टीला
साबरबोंड आवडला. या गोष्टीला नावच नाही सुरवात चांगली वाटली नंतर रटाळ झाला. जुन्या जमान्यात समांतर प्रायोगिक चित्रपट निघत त्या टेम्प्लेटमधला वाटला. संदीप सावंतांचा श्वास व नदी वाहते दोन्ही आवडले होते. नदी वाहते जास्त आवडलेला.
रॉय यांच्या छिद्रान्वेषी
रॉय यांच्या छिद्रान्वेषी धोरणामुळे चिकवावर गजबजाट !
काल रात्रीतून आलेल्या सगळ्या पोस्टी वाचल्या. चिल्ड्रन ऑफ हेवन, साबर बोंडं हे पाहायचे आहेत.
माझेमन, कुठे अव्हेलेबल आहे "चिल्ड्रन ऑफ हेवन"?
रानभुलीच्या कालच्या पोस्ट वरून - Fourteen stories that inspired Satyajit Ray - नावाचे पुस्तक ऐकले काही दिवस. त्यात त्यांनी आणि इतर लेखकांनी लिहिलेल्या अशा निवडक कथा आहेत ज्यावर नंतर त्यांनी हिंदी व बंगाली चित्रपट बनवले. शर्मिला टागोरची प्रस्तावना आहे. गूगल केल्यास चित्रपटाची यादी मिळेल.
सुमती क्षेत्रमाडेंचे "याज्ञसेनी" वाचले आहे, शाळेत का कॉलेज मधे. हां 'मैं हुं खलनायक' चालीत कबुलीजबाब.
मी स्नेहलता दसनुरकर, योगिनी
मी स्नेहलता दसनुरकर, योगिनी जोगळेकर, कुसुम अभ्यंकर, सुमती क्षेत्रमाडे, बाबा कदम यांचे भरपुर साहित्य वाचले आहे. लायब्ररी आईची होती, माझा रोल फक्त पुस्तक बदलुन आणणे इतकाच होता, पुस्तक कुणाचे आणायचे हे आई सांगायची. काकोडकरांची आणायची नाहीत हे तिने बजाऊन ठेवले होते. घरी आलेले प्रत्येक पुस्तक मी वाचायचे. आता ह्या साहित्याचे एक पानही वाचवणार नाही पण तेव्हा चालायचे. व पु
असो. आपल्याला काय.. आपण भजी गुंडाळलेला रद्दी कागदही भजी खाऊन झाल्यावर वाचणार्या कॅटेगरीतले. जे मिळते ते वाचायचे.
काळ्यांचीही भरपुर पुस्तके वाचलीत. तेव्हा दवणे सिद्धहस्त लेखक झाले नव्हते, त्यामुळे मी वाचले. म्हणजे वाचायच्या संकटातुन वाचले.
एकदा तेव्हा नुकताच प्रकाशित झालेला पुल एक साठवण
हा ग्रंथ मला लायब्ररीत दिसला आणि मी तो घरी आणला. गोष्टीचे पुस्तक आणायचे सोडुन हे असले भलतेच काहीतरी आणल्याबद्दल आई मला खुप ओरडली होती.
अस्मिता, चिल्ड्रेन ऑफ हेवन
अस्मिता, चिल्ड्रेन ऑफ हेवन पाहणारच असशील तर where is the friends home आणि The Way Home (2002) हातोहात (किंवा डोळ्यासरशी.) पाहून घे.
मला the way home खूप म्हणजे खूपच आवडतो. जेव्हा कळलं की ती आजी खरी आहे, तिचे जीवन अस्सल आहे (म्हणजे चित्रपटात) दाखवलं आहे अगदी तसेच खरे खुरे तेव्हा मला प्रचंड धक्का बसला होता. हा चित्रपट प्रत्येक नातवाने पहावा असा आहे. म्हणजे मला एक नातू म्हणून तर पूर्ण भावविवश करून टाकतो हा चित्रपट. बरं उगीच हा चित्रपट इतका व्याकूल केला आहे असे म्हणायला जावे तर जितकं वाचले त्यावरून दिग्दर्शकला सलामच ठोकावा.
आणि कळसाध्याय म्हणजे turtles can fly हा चित्रपट.
हा चित्रपट तुम्हाला थोडेफार हसवताना असां धाडकन जमिनीवर आदळवतो की त्यानंतर तुम्ही पूर्वीचे राहत नाही.
चिल्ड्रन ऑफ हेवन पाहिला आहे.
चिल्ड्रन ऑफ हेवन पाहिला आहे. नंतर या दिग्दर्शकाचे अजून पाहावे म्हणून "बरान" सुद्धा पाहिला. तो आवडला होता का लक्षात नाही. पण इतर बघितलेले नाहीत.
ब्राह्मणी हा शब्द खूप निगेटिव्ह झाला आहे. माझे खरेतर या जातीबरोबर काहीही शत्रुत्व नाही. हा शब्द अलीकडे समाजातल्या एका लेयरची संस्कृती आणि त्याची नीतीमूल्ये दाखवण्यासाठी तेवढाच त्या अर्थी मी वापरतो >>> यातला पुढचा भाग आहे त्याबद्दलच विचारत होतो. जातीबद्दल काही आहे असे मुळातच वाटले नव्हते.
बाकी स्टीरीओटाइप्स हे मराठीच काय, हिंदीतही मुबलक आहेत. इव्हन हॉलीवूडमधे. त्या त्या इण्डस्ट्रीतील ग्रूपथिंकचाही प्रभाव असतोच.
स्टीरीओटाईप्सना मम!
स्टीरीओटाईप्सना मम!
रॉय, स्क्रीन शॉट घेऊन ठेवला. नक्की पाहेन आणि येथेही लिहेन. थॅंक्यू.
चिकवावरची ही आजची चर्चा खूप
चिकवावरची ही आजची चर्चा खूप वाचनीय झाली आहे. म्हणजे पूर्वी आवडलेल्या चित्रपटाबद्दल थोडक्यात लिहावे असा एक नियम वाचल्याचे आठवते. तो आताच्या धाग्यामधे नाही याबद्दल धागाकर्त्याचे आभार मानावेत तेव्हढे थोडे आहेत. काही जण इतके सुंदर लिहीतात चित्रपटाबद्दल कि चित्रपट कसाही असो, त्यांचे लिखाण मात्र खूप आवडते. चित्रपट ही सुद्धा कला आहे हे नव्याने समजते. '
अस्मिता, फारेण्ड हे विशेष आवडते आहेत. साधना, माझे मन यांचे लिखाणही आवडते. फेरफटका गायब आहेत, पण त्यांच्या दाद देणार्या पोस्टसची आठवण येते. अजून खूप जण आहेत.
रॉय यांच्या आजच्या पोस्टस आवडल्या.
नीरज घायवान नाव ऐकून माहिती आहे. त्याचा सिनेमा बघायचा आहे. त्यासाठी वेगळा मूड बनवावा लागतो. कधी कधी आपोआप बनतो कि आता बास, वेगळं हवं. त्या वेळी पाहीन.
अस्मिता तुझं वाचन दांडगं आहे. त्याबद्दल रिस्पेक्ट आहे. मी सत्यजित रेंचं काहीही वाचलेले नाही. सिनेमे खूप पाहीले. काही काही समजले नाहीत. पण सिनेमाच्या भाषेतलं वेगळेपण लक्षात आहे. एक घर आहे त्यात काळे पांढरे चौकोन, त्या चौकोनात मोठ्या आकारचे काळे पांढरे क्युब्ज, त्यावर बसून किंवा उभी असणारी दोन माणसं. विशेष म्हणजे लाईटिंग. प्रखर प्रकाशाचा झोत फिरत राहतो. त्यात हे काळं पांढरं दृश्य अक्षरशः बोलतं. कधी हा फोकस बोलणार्याच्या चेहर्यावर , तर कधी बोलणारा अंधारात जातो. खूप कमी संवाद. हा सीन आयुष्यभरासाठी मनावर कोरला गेला आहे. हा सत्यजित रें च्याच सिनेमातल आहे कि इटालियन हे आज नक्की सांगता येत नाही.
इथे मी लिहीलेय का नौका डुबी बद्दल ? कुठेतरी ( मायबोलीवरच बहुतेक ) सत्यजित रेंच्या या लघुकथेबद्दल वाचून शोधाशोध केली तेव्हां कश्मकश नावाने हिंदी सिनेमा ओटीटीवर पहायला मिळाला. हा सुभाष घईंनी दिग्दर्शकाची परवानगी न घेता हिंदीत डब केलाय. घईंचा निषेध पण त्यांच्यामुळे हा सिनेमा पहायला मिळाला. हा पॅरलल सिनेमा नाही. कथेतली गुंतागुंत आणि पंचतंत्र कि इसापनीती मधली नात्यांच्य गुंत्याची गोष्ट नेमकी पडद्यावर मांडता आलेली नाही तरी सिनेमा आवडला. पॉप्युलर सिनेमाप्रमाणे घेतलाय ऋतुपर्ण घोष यांनी. रेको देत नाही, कारण थोडी जुनी शैली आहे.
अस्मिता चिल्ड्रन ऑफ हेवन
अस्मिता चिल्ड्रन ऑफ हेवन ऍमेझॉन प्राईम (इंडिया)वर आहे पण रेंट करावा लागेल. मी फार पूर्वी पाहिलेला तेव्हा रेंट करावा लागला नव्हता.
सी नो एव्हिल , हिअर नो एव्हिल
सी नो एव्हिल , हिअर नो एव्हिल वरून एक आलेला होता, त्यात बहुतेक अशोक सराफ नाही. एकापेक्षा एक का ?
>>
एकापेक्षा एक च तो
पण अशोक सराफ आहे त्यात, इन्स्पेक्टर च्या रोल मधे
नऊ धान्यांचा धान्यवडा वाल्या निशिगंधा वाड चा नवरा
मी गावी आलो आहे आणि आमच्या
मी गावी आलो आहे आणि आमच्या गावाच्या थेटरात १०० हा चित्रपट लागला आहे. मी गावी आलो की एक रुल असतो तो म्हणजे आमची गँग घेऊन जो चित्रपट थेटरात असेल तो बघणे म्हणजे बघणेच.
त्या नियमाला अनुसरून मी जात आहे. अभिप्राय जर अनपेक्षित असेल तरच देतो.
मी हे आधीही लिहिलं आहे. माणसं
मी हे आधीही लिहिलं आहे. माणसं, संस्था, कलाकृती - यात साहित्य, नाटकं , चित्रपट सगळे आले. त्या त्या काळाचं प्रॉडक्ट असतात. तुम्ही त्या त्या काळात ते चित्रपट पाहिले आणि आवडले नाहीत, असं झालं असेल तर तुम्ही खरंच आधीपासून स्वतंत्र विचार करू लागलात किंवा a faultfinding captious critic या अर्थानेcynic असाल. यात काही वावगं वाटत नाही.
मी वर चर्चेत आलेले बरेच चित्रपट दूरदर्शनवर पाहिले. आधी रेशनच्या धान्यावर , मग फक्त रेशनच्या साखरेवर आणि दुसर्या दुकानातल्या धान्यावर आणि दूर दर्शन दाखवत असलेल्या चित्रपटांवर मी वाढलो आहे. त्यामुळे समोर येईल ते बघावं अशी सवय. खाण्याच्या बाबत समोर येईल ते टाकावं अशी पुढे बदलली.
तर त्या त्या चित्रपटांना त्या त्या काळात प्रेक्षक होते. आशा काळे, सुलोचना इत्यादींचा घरांत छळ होई त्याच्याशी त्या काळातल्या सुना रिलेट करत असतील. दादा कोंडकेंचे सिनेमे विक्रमी चालले म्हणजे लोकांच्या डोक्याला मनोरंजन देत होते. त्यांचे सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव आणि आंध ळा मारतो डोळा हे चांगले होते. पुढे त्यांनी फॅक्टरी टाकली. सुरुवातीला वसंत सबनीस त्यांचे लेखक होते. पुढे तेच होते का माहीत नाही. अशी ही बनावबनवीचे लेखकही वसंत सबनीस.
सध्या राष्ट्र प्रथम , हिं दुत्वाच्या वार्यात शिवकालावर टांकसाळ उघडली आहे आणि लोक ते चित्रपट भक्तिभावाने पाहतात. वर आम्हांला हे शाळेत शिकवलं नाही, असं सांगायलाही तयार. याची सुरुवात टीव्ही मालिकांतून झाली.
सासरी छळ सोसणार्या स्त्रियांचा जमना मागे पडला. आता शिकलेल्या तरी मन मारून जगणार्या बायकांना लंडन बिंडनला फिरवून मोकळा श्वास घेताना दाखवलं की त्या वर्गातल्या बायका आपलंच आयुष्य पडद्यावर दाखवलं म्हणून खुष. याची सुरुवात केसरी ट्रॅव्हल्सच्या माय फेअर लेडीपासून झाली असावी.
आणखी एक गोष्ट म्हणजे त्याच गोष्टी काही वर्षांनी फिरून फॅशनेबल होतात. मी लहान असताना कानेटकरांच्या ऐतिहासिक नाटकांचे दिवस होते. आता चित्रपटांचे आहेत. माझ्या जन्माआधी भालजींचे इतिहासपट होते.
माझी मोठी बहीण कॉलेजात असताना बेल बॉटमची फॅशन होती. ती आता आजी झाली तर ही फॅशन परत आली.
अरे, कुठे नेऊन ठेवला चिकवा
अरे, कुठे नेऊन ठेवला चिकवा माझा ?
अँकी नं १ थँक्स कन्फर्म केल्याबद्दल. आठवला आता.
चिल्ड्रेन ऑफ हेवन आठवत नाहीये. पुस्तक होतं का ते ?
आज ब्रिज ऑफ स्पाईज बघायचा होता. प्राईम वर आहे म्हणून सबस्क्रीप्शन रिन्यू केलं, आता सांगतात राईटस एक्स्पायर झाले . टॉम हँक्स _ स्टिवन स्पिलबर्ग काँबो + ऑस्कर अॅवॉर्ड म्हणून बघायची इच्छा झालेली.
प्राईम वर अॅक्युज्ड दिसला. इथे चर्चा चालू आहे म्हणून सुरू केला पण तिथे इंग्रजी आहे.
नेफ्लिवर शोधाशोध करताना माबो अॅक्युज्ड सापडला. बघेन नंतर. काही स्पाय मूवीज सापडलेत.
जर युद्धकथा/जिओपॉलिटिक्स आवडत
जर युद्धकथा/जिओपॉलिटिक्स आवडत असेल तर ब्रिज ऑफ स्पाईज आवडेल. एकदा बघायला हरकत नाही. अगदी शिंडलर्स लिस्ट किंवा सेविंग प्रायव्हेट रायन च्या तोडीचा नाही.
With Love - नेटफ्लिस
With Love - नेटफ्लिस
ऑर्जिनल तामिळ - हिंदी डब
मस्त आहे!
अरेंज मॅरेजसाठी हिरो हिरोईन भेटतात. योगायोगाने एकाच शाळेचे निघतात. एकमेकांना शाळेची अधुरी लव्हस्टोरी सांगतात. मग त्यांना एक किडा सुचतो. तेव्हा जे प्रेम व्यक्त करता आले नव्हते ते आता त्यांना भेटून करायचे ठरवतात. बाकी बघा स्वतःच.
हलकाफुलका रोमँटिक माझ्या आवडीचा जॉनर.. मस्त जमून आला आहे.
स्पिलबर्गचे सगळेच सिनेमे
स्पिलबर्गचे सगळेच सिनेमे शिंडलर्स लिस्ट प्रमाणे नाहीत. कधी कधी तो डेव्हीड धवनप्रमाणे इंडीयाना जोन्स बनवतो ( मसाला चित्रपट). कधी कधी आपत्तीपट म्हणून जॉज बनवतो. तो सगळ्या प्रकारचे सिनेमे बनवतो. अगदी रामसे त्याच्यात शिरतात तेव्हां पोल्टरगिज पण बनवतो. द शुगरलँड एक्सप्रेस नावाचा सिनेमा तुकड्या तुकड्यात युट्यूबवर होता. जांभया आलेल्या. हाच का स्पिलबर्ग असे वाटावे असा. बहुतेक तो खूप सुरूवातीचा असेल. त्याचे आधीचे सिनेमे नष्ट झालेले आहेत. त्याचे नाव खूप गाजले ते ईटी मुळेच बहुतेक.
जुरासिक पार्क सिरीज मधले फक्त स्पिलबर्गने स्वतः दिग्दर्शित केलेले पहिले दोन भागच आवडलेत. बाकीचे अजिबात आवडले नाहीत. तेच तेच आहे. जॉज हिट झाल्यावर पिर्हाना आला, मग १,२ , ३ भाग आले तसं झालंय.
अरारारारा स्पिलबर्ग नावामुळे ट्रिगर झालो ते केव्हढा घरंगळत गेलो. थांबतो आता. ( अत्यंत टुकार कथांचा भडीमार करून मायबोलीकरांना वीठीस धरायचे हे या आयुष्याचे उद्दीष्ट होते, त्या पासून भरकटलो याबद्दल क्षमा मागतो. आता लवकरच उद्दीष्टांशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करीन. फक्त टायपिंगचा त्रास आहे).
लिहा हो तुम्ही. इथं आशा
लिहा हो तुम्ही. इथं आशा काळेंवर पानंच्या पानं खर्ची घातली आहेत. स्पिलबर्गनं काय घोडं मारलंय?
'ब्रिज ऑफ स्पाइज' थेटरला आला
'ब्रिज ऑफ स्पाइज' थेटरला आला होता तेव्हा पाहिला होता.
नंतर बर्लिनजवळचा तो ब्रिज मुद्दाम प्रत्यक्ष जाऊन पाहिला.
त्यानंतर पुन्हा टीव्हीवर तो सिनेमा पाहिला.
फर्क पडता है! (माझ्यासारख्या इतिहास, सिनेमा दोन्हीची आवड असणार्यांसाठी नक्कीच)
जर युद्धकथा/जिओपॉलिटिक्स आवडत
जर युद्धकथा/जिओपॉलिटिक्स आवडत असेल तर ब्रिज ऑफ स्पाईज >> हो आवडतात.
मिळाला . ऑपरेशन क्रोमाईट पण मिळाला. आता निवांत बघेन.
आ देखे जरा,
आ देखे जरा,
२००७ चा सायन्स फिक्शन film, नील नितीन मुकेश आणि बिपाशा बसू राहुल देव ह्यांच्या प्रमुख भूमिका .
नील नितीन मुकेश हा स्ट्रगल करणारा फोटो जर्नालीस्ट आहे. त्याला कुठेही ब्रेक मिळत नाहीये, त्याच्या आजोबांनी बनवलेला एक क्यामेरा त्याला मिळतो . ह्या ल्यामेरयाचे वैशिष्ट्य म्हणजे तो भविष्यात जे होणार आहे त्याचे फोटो काढतो.
हे जेव्हा नितीनला समजते तेव्हा त्याचा उपयोग करून लॉटरी, रेसकोर्स वर तो पैसे कमवायला लागतो. ह्याच सुमारास त्याची ओळख बिपाशाशी होते. तसेच दोन विलनपण त्याच्या मागे लागतात. तशात साधारण त्याच वेळी नितीनला दिसते कि आपला मृत्यू काही दिवसात होणार आहे, तिथून तो दिवस मग तास मोजायला सुरवात करतो . टेन्शन वाढत जाते. पण बिपाश सर्व परिस्थिती हाताळते,
शेवट अर्थात सुखांत आहे.
कान्सेप्ट चान आहे . पण बॉक्स ऑफिसवर फेल गेलेला.
यू ट्यूब वर बघू शकाल.
काल मनपिशाच्च सुरू केलेला.
https://www.maayboli.com/node/87966
मनपिशाच्च : युट्यूबवर राही बर्वेने रिलीज केलेला संपूर्ण ए आय चित्रपट.
धुरंधर २: द रिव्हेंज पाहिला.
प्रचंड बोअरिंग वाटला.
ह्यात मोदींचे कौतुक तर भरभरून होतेच, आणि ते अपेक्षितही होते. (प्रोपोगंडा हा शब्द जाणूनबुजून टाळतोय)
पण सिनेमा मनोरंजक नसेल हे स्वप्नातही आले नव्हते. पण नेमके तसेच झाले आहे. चार तास कसे बसे काढले.
ह्यातही गाणी चांगली आहेत, पण पहिल्याइतकी नाहीत.
संजय दत्त पहिल्या सिनेमातही बोअर वाटलेला इथेही वाटला. रणवीर सिंहने उत्तम अभिनय केला आहे.
बाकी स्पॉयलर्स देत नाही, आवरता घेतो.
न्यू दिल्ली टाइम्स
न्यू दिल्ली टाइम्स
हा जुना सिनेमा बघायचा राहिला होता. मध्यंतरी यूट्यूबवर दिसला. पॉलिटिकल थ्रिलर, गुलझारचं लेखन. कथा आजही रिलेट होते.
ओम पुरी, कुलभूषण खरबंदा, मनोहर सिंग, असे आर्ट फिल्मचे नेहमीचे यशस्वी कलाकार आहेत.
मुख्य भूमिकेत मध्यमवयीन शशी कपूर. त्याने त्याचं आधीचं ग्लॅमर सगळं बाजूला ठेवून इथे एडिटरची भूमिका मस्त केली आहे. त्याची बायको म्हणून शर्मिला टागोर. हिला मात्र ग्लॅमर बाजूला ठेवता आलेलं नाही. तसंच बोअर लाडिक बोलणं, तेच चेहर्यावरचे हावभाव. खूप कंटाळा येतो. पण तिला फार फुटेज नाहीये.
आजही नक्की बघण्यासारखा आहे सिनेमा.
पाहिला आहे. हा आणि रूका हुआ
पाहिला आहे. हा आणि रूका हुआ फैसला एकाच वेळी पाहिले होते.
Pages