अगं मामे, तो डिटेक्टिव मीराने गीतिकामागे सोडलेला असतो, त्याने मीराला अपडेट देणे अपेक्षित असते तर तो ते अंगदमार्गे देतो.
आणि त्याचा दिवसाला 250£ + चरणे फिरणे इत्तादी खर्च् परवडणारी डॉ. मीरा दत्तक पोर घेऊन ते साभाळत घरी बसणार हे कळल्यावर तिच्या कानाखाली आवाज काढावा वाटला. आईबाबानी मेरठवरुन यासाठी पाठवले होते का तिला??
पण.. पण.. पण.... त्या सिनेमात सतत उगंच बळंच संघर्ष आणलाय हे जाणवतं. गीतिका आणि मीरा (आणि त्यातल्या त्यात जास्त करून गीतिका) केवळ डायरेक्टरनं सांगितलंय म्हणून
>>
यातल्या अन् बाकी साऱ्या 'पण' ची उत्तरं -
अक्यूज्ड अनुभूती कश्यप (अनुराग अन् अभिनव ची बहीण) चा सिनेमा आहे, धर्मा नी प्रोड्युस केलेला...
स्क्रीम ७ - एएमसी मधे - काहीच नाविन्य नाही. प्लॉट माहितीचा असला तरी रहस्य चांगले करता येऊ शकते. हा उगाचच बनवायचा म्हणुन बनवला आहे. (मी ही नोकरी सोडुन एफबीआयला जाणार आहे कारण खुनी पडद्यावर आल्याआल्या ओळखला/ओळखले).
काल रात्री युट्यूबवर समोर आला म्हणून "एक डाव भूताचा" पुन्हा पाहिला. कसला निरागस विनोद आहे.
दमा मिरासदारांची कथा आहे. हा माणूस वेड्यासारखा आवडतो. त्यांच्या काही कथांची पारायणं झालीत. काही नाही आवडल्या तरी दमा आवडायचे कमी होत नाही. अगदी त्यांनी ते संघ शिक्षक आहेत असे सांगितले तरीही. त्यांची विचारसरणी अमूक तमूक आहे म्हणून त्यांच्यावर फुली मारायचा करंटेपणा करू शकत नाही आणि ते आवडतात म्हणून वैमनस्य ठेवणारे आयुष्यात असले काय नसले काय काहीही फरक पडत नाही. दमांचे ग्रामीण विनोद खूप आवडतात. पुलंचे आवडतात पण शाब्दीक सर्कशीची सवय झाल्यावर. व्यंकटेश माडगूळकरांची गावात वान्हेर आला ही कथा पण अशीच धमाल. यावर पण सिनेमा यायला हवा. एव्हढे चांगले लेखक, त्यांच्या धमाल कथा असताना मराठी सिनेमा का दरिद्री विनोदी सिनेमे बनवत असेल त्यांचं त्यांना ठाऊक.
म्हैस ही पुलंची अनेकांना आवडणारी कथा मला विशेष आवडली नाही. त्याबद्दल टीका पण सहन केली. पण म्हैस वर सिनेमा निघाला तो पडला. सर्वांना आवडेल असा विनोदाचा बाज दमांकडे होता.
एक डाव भुताचा जबरदस्त पिक्चर आहे. आणि अशोक सराफ व दिलीप प्रभावळकरने मज्जा आणलीय.द मा मिरासदार तर आवडीचे. पेंड वगैरे कथा जाम आवडतात. ते जो ग्रामिण इरसालपणाचा बाज कथांत पकडतात त्याला तोड नाही.
बाकी म्हैस कथा पूर्णतयाः कोकणी आहे. जर कोकणात राहिला नसाल तर नाही आवडणार कदाचित.
बरोबर मी पण कोकणात नाही राहिलो. पण कोकणी नसलेल्या वाचकांना आवडते ही कथा.
शंकर पाटील यांच्या ताजमहाल मधे सरपंच या कथेवर एक ओळखीचा निर्माता चित्रपट बनवणार होता. त्याची स्क्रिप्ट वाचायला मिळाली. ती अक्षरशः बेर्डे टाईप सिनेमा डोक्यात ठेवून लिहिली होती. त्याला हा सिनेमा असा बनवू नको सांगितले. मीच नाही अजून काही लोकांनी सांगितले. त्याला पटले. ज्या विनोदाचा जसा बाज आहे त्याच्याशी प्रामाणिक राहून चित्रपट बनला तर लोकांना आवडतो.
अशोक सराफ तुमचं आमचं जमलं, एक डाव भुताचा या सिनेमात विनोदी भूमिकेत शोभतो. पण बेर्डेच्या सिनेमात त्याच्या विनोदाशी adjust करणारा अशोक सराफ केविलवाणा वाटतो.
द मां ची झोप ( नागु गवळी असलेली ) कथा वाचून खोखो हसलो होतो.
तो एक किस्साच आहे.
तेव्हा बॅचलर होतो.
आम्ही लायब्ररी मेम्बरशीप घेतलेली.
TV वै distraction नसल्याने भरपूर वाचन होई.
तर हे पुस्तक वाचताना झोप कथा वाचताना एक रूम मेट मित्र खो खो हसू लागला, अगदी डोळ्यातून पाणी येईपर्यंत.
काय झाले काय झाले म्हणत दुसऱ्याने ती कथा वाचायला सुरुवात केली, त्याची अवस्थाही तशीच, असे करत आम्ही चौघेही नंतर खो खो खो खो हसत बसलो होतो किती तरी वेळ.
एक डाव भुताचा छानच आहे चित्रपट
त्यात रंजना देखील आवडली ह्या दोघांसोबत
पुलं किंवा दमांवर कुणी छान लिहीले असेल ( वेगळी मतं चालत असतील अशा आयडीने) तिकडे पुढचं लिहीतो. हे चिकवाचं पान आहे याचा विसर पडतो.
पुण्यातून येताना नारायण खमण, लक्ष्मीनारायण चिवडा आणि स्टेशनचे भाजी समोसे घेऊन ये असा निरोप देण्यासाठी हे योग्य पान आहे.
मास्तुरे आणि "नवकोट नारायण" यदुनाथ जवळकर अशोक सराफचे दोन कहर रोल्स. मी प्यार किये जा व त्यातला किशोर कुमार पाहिलेला नाही. तो अतरंगी असणारच पण अशोक सराफनेही धमाल उडवली आहे.
एक डाव भुताचा मस्त आहे. मिरासदारांचे लेखन आहे हे श्रेयनामावलीत असावे पण लक्षात नव्हते.
मला "बिनकामाचा नवरा" चित्रपट पण खुप आवडतो...रन्जना आणी अशोक मामाची केमेस्ट्री इतकी अफलातुन आहे...त्याच गिव्ह अॅन्ड टेक..त्यातही रन्जनाने बाजी मारलिये..टिपिकल गुडघ्यापर्यतची नौवार ,खोचलेला पदर, दागिने चन्चीतुन काढून पान खाण!!..
dark city बघितला. साय फाय film noir, आहे. Blade Runner आणि सार्क सिटी हे दोन cult सिनेमा आहेत. दोबाही सिनेमांचा थीम एकच आहे. WHAT IS IT TO BE HUMAN?, असे सिनिमे आवडत असतील तर पहा. चुणूक म्हणून आधी ट्रेलर पहा. https://www.youtube.com/watch?v=30mmoegSQCs
आणि हा iconic सीन आहे. त्यावरून तुम्हाला कल्पना यावी. https://www.youtube.com/watch?v=P6N00Uo3l4s
Matrix ह्या सिनेमाची बीजे ह्यात आहेत.
सुरवातीचाच सीन चक्रावून टाकणारा आहे.
सुरवात तर करा,
स्पूफ पिक्चर आहे. कसला स्पूफ आहे ते बघताना समजेल. अनेकांना पोस्टरवरूनही समजेल अगदी खिळवून वगैरे ठेवत नाही पण मजेदार आहे. थोडाच पाहिला आहे. शाब्दिक विनोदही बरेच आहेत. काही निसटले असावेत. लग्न, नवरा हेच सर्वस्व मानणार्या दोन बहिणींची नावे बेख्डेल सिस्टर्स वगैरे.
राभु, बब्बन तुमच्या पोस्टी आवडल्या आणि इंटरेस्टिंग वाटल्या होत्याच. ही आपलं माझी बाजू समजा. हाकानाका. पिक्चरचे काही नाही, एक जातो दुसरा येतो.
केनेडी पाहिला. विशेष आवडला नाही. कथा वेगळी आहे. सायकोपॅथचीच गोष्ट आहे. राहुल भट जॉन अब्राहम पेक्षा मख्खतर आहे. (तर-तम भाव) इतके निर्जीव डोळे आहेत की ज्याचं नाव ते. भुवया नकली कोरलेल्या व चिकटवलेल्या वाटतात. माझं तेथेच लक्ष जात होतं. कथा नाविन्यपूर्ण आहे आणि काही क्षणात ती वेधक होते पण ओव्हरऑल पिक्चर प्रभाव पाडू शकला नाही. मला राहुल सोडून बाकी सर्वांचा अभिनय सहज वाटला. विजय कदमला खूप वर्षांनी -समाजसेवक, तत्वनिष्ठ माणसाच्या भूमिकेत पाहून छान वाटले. भरपूर मराठी कलाकार व मराठी संवाद आहेत. आणि खरंतर त्यांचेच काम सफाईदार झाले आहे. मराठी माणसांसाठी टाळ्या! मुळात मराठी कलाकार कष्टाळू , प्रामाणिक आणि गुणीच आहेत आणि हे कायम जाणवतं.
हिरो आधी पोलिस मग पोलिसांचा हस्तक, एन्काऊंटर स्पेशालिस्ट ते नंतर घसरतघसरत फक्त एक सतत खून करणारा सायको वाटत जातो. त्याला काही नीतिमूल्ये नाहीत आणि तो व्यवहारकुशल सुद्धा नाही. चित्रपट अनुराग कश्यपचाच आहे, कुणाचाच नाही. पण हिरोला मुळीच क्लॅरिटी नाही. तो सोडलेल्या वळूसारखा आहे, कुठेही गोळ्या घालत फिरतो. तो आतून मृत आहे, बाहेरून वेडसर. त्यामुळे निर्जीव नजर चालून जाते. पण हे दांडगे व विशेष चपळ न वाटणारे शरीर आणि meaningless पणे मुडदे पाडणे. थोडा कॅरेक्टरचा आणि कथेचा कार्यकारण भाव दाखवायला हवा होता. नायकाचं मन उलगडायला हवं होतं, ते दिसलेच नाही. त्यात त्याला थोडंफार गिल्ट/ विवेक असल्याने त्याने ज्यांना मारलेय ते लोक दिसू लागतात, बोलतात. सल्ले देतात. खास करून जे निष्पाप होते. त्याला संवादच नाहीत. फारसं बोलत नाही. मधल्या कविता ज्या गाण्याच्या स्वरूपात येतात त्या मात्र अतिशय निवडक आणि काळजात घुसणाऱ्या आहेत.
सनी लिओनी पारशी वेशभूषेत एकदम आकर्षक दिसते, अभिनयाची बोंब आहे आणि दारू चढवून हसत सुटते. काही तरी इंग्रजी उच्चारात बोलते पण काही दम नाही. काही तुकडे बरे आहेत पिक्चरचे पण तेवढ्यासाठी आवर्जून बघण्यासारखे काही नाही ओव्हरऑल. नायक मुळात क्रूर आणि विकृत आहे. तो त्याच्या मुलाच्या खुनाचा बदला घेतोय असं म्हंटले तरी पुष्कळ वेळा कथा विस्कळीत वाटली. ती त्या दिशेने जातच नव्हती. त्याला समजून घ्या वगैरे म्हंटले नाही पण तो निष्काळजीपणे - मनस्वीपणे जगतोय ते फक्त पहायचं आहे. ह्यातच त्याचा शेवटही होतो. भरीव काही मिळत नाही शेवटी, प्रेक्षकांना!
एक डाव भुताचा व भुताचा भाऊ दोन्हींमधेही अशोक सराफच भूत आहे ना ?!. दोन्ही आवडले होते. रंजनाचा अभिनय एकदम मस्त असायचा. त्या काळात इतर नायिकांमधे ती एकटीच फटाकडी होती. तिचे मुंबईचा फौजदार, गुपचूप -गुपचूप आणि बिनकामाचा नवरा(+१ प्राजक्ता आणि सुनिधी.) धमाल आहेत.
Fakham Hall >> एच बी ओ नाही माझ्याकडे. दुसरीकडे असेल तर पाहीन.
अस्मिता - नेहमीप्रमाणेच छान लिहीले आहे. प्रामाणिक रिव्ह्यू आहे.
केनेडीची कथा खर्या पोलीस अधिकार्यावर आहे. त्याचे नाव समजून पण मुद्दाम लिहीले नव्हते , नाहीतर इथेच दोन पक्ष झाले असते. या अधिकार्याने जे कांड केले त्या घटना कोविड काळात गाजल्या होत्या. त्याचं निलंबन, निलंबनाच्या काळात त्याने केलेले कथित उद्योग हे सर्व सिनेमात आलं आहे पण थोडे संदर्भ बदलून. अशा व्यक्ती सिनेमाच्या मध्यवर्ती भागात असल्या कि त्याला noir म्हणतात. ही पूर्ण डार्क फिल्म असते. noir ही १९४० ची फिल्म आहे, ज्यात असं मध्यवर्ती कॅरेक्टर होतं, ज्याला हिरो म्हणायचं कि व्हिलन असा प्रश्न पडला होता. मग हाच शब्द रूढ झाला. यावरून हिंदीत रतन नावाचा सिनेमा आला होता, ज्यात अशोक कुमार हिरो होता. पण तो त्या काळची निगेटिव्ह कामं करणारा हिरो होता. पूर्णपणे noir फिल्म दाखवणे बॉलिवूडमधे कधीच झाले नाही. तो असा का झाला याची एक बॅक स्टोरी तरी असेल किंवा दीवारचा निगेटिव्ह रोल मधला हिरो असेल. पण ते कधीही सुधरू शकतात. कुणीही त्यांना "कसम"देऊ शकते, एखादा भगवान त्यांना चांगल्या मार्गावर आणू शकतो.
केनेडीत पण राहुल भटच्या कॅरेक्टरला एक ठिगळ जोडलेच आहे. त्याने सलीमच्या बायकोला अरेस्ट करताना तिच्या भावाला हकनाक मारले होते. त्याच्या बायकोला बेकायदा अरेस्ट केल्याने सलीमने त्याच्या मुलाला मारले. सलीम पण गुन्हेगार आहे पण पोलिसांचा खबरी कम त्यांना एण्काऊंटरची सुपारी देणारा आहे. त्यामुळे सलीमला पळवून लावण्यात कमिशनरचा रोल आहे.
या सलीमला शोधणे एव्हढेच केनेडीचे काम आहे. सलीमला कुणी लपवले, तो मेलेला नाही जिवंतच आहे या प्रश्नांचा शोध घेत तो निव्वळ दगड बनला आहे. त्याला काहीही उद्दीष्ट नाही. कौटुंबिक आयुष्य, कुटुंब या आघाडीवर तो पराभूत आहे. अगदी शेवटच्या क्षणी त्याला कुटुंबात परतण्याची शेवटची आशा दिसते, पण तसे केले तर त्याच्या मुलीला अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. तिचं आयुष्य नरक बनेल हा त्याचा शेवटचा माणुसकीचा विचार. नंतर शेवट प्रेक्षकांवर सोडून दिला आहे.
असा सिनेमा आवडणे, न आवडणे या कॅटेगरीत बसतच नाही. चालणे तर शक्यच नाही. ओटीटी मुळे बघायला मिळतात इतकंच.
Accused अत्यंत बकवास सिनेमा.
Accused अत्यंत बकवास सिनेमा. मला आजीबात म्हणजे अजिबातच आवडला नाही.
जब खुली किताब कुठे आहे?
अगं मामे, तो डिटेक्टिव
अगं मामे, तो डिटेक्टिव मीराने गीतिकामागे सोडलेला असतो, त्याने मीराला अपडेट देणे अपेक्षित असते तर तो ते अंगदमार्गे देतो.
आणि त्याचा दिवसाला 250£ + चरणे फिरणे इत्तादी खर्च् परवडणारी डॉ. मीरा दत्तक पोर घेऊन ते साभाळत घरी बसणार हे कळल्यावर तिच्या कानाखाली आवाज काढावा वाटला. आईबाबानी मेरठवरुन यासाठी पाठवले होते का तिला??
साली मोहोब्बत मागल्या वर्षीचा
साली मोहोब्बत मागल्या वर्षीचा कोणी पाहिलाय का? बबलू भैया & राधिका आपटे आहे. बघावासा वाटतोय
कोणत्या साली?
.
पण.. पण.. पण.... त्या सिनेमात
पण.. पण.. पण.... त्या सिनेमात सतत उगंच बळंच संघर्ष आणलाय हे जाणवतं. गीतिका आणि मीरा (आणि त्यातल्या त्यात जास्त करून गीतिका) केवळ डायरेक्टरनं सांगितलंय म्हणून
>>
यातल्या अन् बाकी साऱ्या 'पण' ची उत्तरं -
अक्यूज्ड अनुभूती कश्यप (अनुराग अन् अभिनव ची बहीण) चा सिनेमा आहे, धर्मा नी प्रोड्युस केलेला...
मध्यंतरी याच धाग्यावर अरिजीत
मध्यंतरी याच धाग्यावर अरिजीत सिंगच्या निवृत्तीबद्दल पोस्टस आल्या होत्या.
त्या संदर्भात एक माहिती.
https://www.youtube.com/watch?v=-nzLQbljIKI
स्क्रीम ७ - एएमसी मधे - काहीच
स्क्रीम ७ - एएमसी मधे - काहीच नाविन्य नाही. प्लॉट माहितीचा असला तरी रहस्य चांगले करता येऊ शकते. हा उगाचच बनवायचा म्हणुन बनवला आहे. (मी ही नोकरी सोडुन एफबीआयला जाणार आहे कारण खुनी पडद्यावर आल्याआल्या ओळखला/ओळखले).
काल रात्री युट्यूबवर समोर आला
काल रात्री युट्यूबवर समोर आला म्हणून "एक डाव भूताचा" पुन्हा पाहिला. कसला निरागस विनोद आहे.
दमा मिरासदारांची कथा आहे. हा माणूस वेड्यासारखा आवडतो. त्यांच्या काही कथांची पारायणं झालीत. काही नाही आवडल्या तरी दमा आवडायचे कमी होत नाही. अगदी त्यांनी ते संघ शिक्षक आहेत असे सांगितले तरीही. त्यांची विचारसरणी अमूक तमूक आहे म्हणून त्यांच्यावर फुली मारायचा करंटेपणा करू शकत नाही आणि ते आवडतात म्हणून वैमनस्य ठेवणारे आयुष्यात असले काय नसले काय काहीही फरक पडत नाही. दमांचे ग्रामीण विनोद खूप आवडतात. पुलंचे आवडतात पण शाब्दीक सर्कशीची सवय झाल्यावर. व्यंकटेश माडगूळकरांची गावात वान्हेर आला ही कथा पण अशीच धमाल. यावर पण सिनेमा यायला हवा. एव्हढे चांगले लेखक, त्यांच्या धमाल कथा असताना मराठी सिनेमा का दरिद्री विनोदी सिनेमे बनवत असेल त्यांचं त्यांना ठाऊक.
म्हैस ही पुलंची अनेकांना आवडणारी कथा मला विशेष आवडली नाही. त्याबद्दल टीका पण सहन केली. पण म्हैस वर सिनेमा निघाला तो पडला. सर्वांना आवडेल असा विनोदाचा बाज दमांकडे होता.
एक डाव भुताचा जबरदस्त पिक्चर
एक डाव भुताचा जबरदस्त पिक्चर आहे. आणि अशोक सराफ व दिलीप प्रभावळकरने मज्जा आणलीय.द मा मिरासदार तर आवडीचे. पेंड वगैरे कथा जाम आवडतात. ते जो ग्रामिण इरसालपणाचा बाज कथांत पकडतात त्याला तोड नाही.
बाकी म्हैस कथा पूर्णतयाः कोकणी आहे. जर कोकणात राहिला नसाल तर नाही आवडणार कदाचित.
बरोबर मी पण कोकणात नाही
बरोबर मी पण कोकणात नाही राहिलो. पण कोकणी नसलेल्या वाचकांना आवडते ही कथा.
शंकर पाटील यांच्या ताजमहाल मधे सरपंच या कथेवर एक ओळखीचा निर्माता चित्रपट बनवणार होता. त्याची स्क्रिप्ट वाचायला मिळाली. ती अक्षरशः बेर्डे टाईप सिनेमा डोक्यात ठेवून लिहिली होती. त्याला हा सिनेमा असा बनवू नको सांगितले. मीच नाही अजून काही लोकांनी सांगितले. त्याला पटले. ज्या विनोदाचा जसा बाज आहे त्याच्याशी प्रामाणिक राहून चित्रपट बनला तर लोकांना आवडतो.
अशोक सराफ तुमचं आमचं जमलं, एक डाव भुताचा या सिनेमात विनोदी भूमिकेत शोभतो. पण बेर्डेच्या सिनेमात त्याच्या विनोदाशी adjust करणारा अशोक सराफ केविलवाणा वाटतो.
द मां ची झोप ( नागु गवळी
द मां ची झोप ( नागु गवळी असलेली ) कथा वाचून खोखो हसलो होतो.
तो एक किस्साच आहे.
तेव्हा बॅचलर होतो.
आम्ही लायब्ररी मेम्बरशीप घेतलेली.
TV वै distraction नसल्याने भरपूर वाचन होई.
तर हे पुस्तक वाचताना झोप कथा वाचताना एक रूम मेट मित्र खो खो हसू लागला, अगदी डोळ्यातून पाणी येईपर्यंत.
काय झाले काय झाले म्हणत दुसऱ्याने ती कथा वाचायला सुरुवात केली, त्याची अवस्थाही तशीच, असे करत आम्ही चौघेही नंतर खो खो खो खो हसत बसलो होतो किती तरी वेळ.
एक डाव भुताचा छानच आहे चित्रपट
त्यात रंजना देखील आवडली ह्या दोघांसोबत
एक डाव भुताचा परत बघायला हवा.
एक डाव भुताचा परत बघायला हवा.
एले तुम्हाला म्हैस ही कथा आवडली नाही असं होऊ शकतं.
पुलं किंवा दमांवर कुणी छान
पुलं किंवा दमांवर कुणी छान लिहीले असेल ( वेगळी मतं चालत असतील अशा आयडीने) तिकडे पुढचं लिहीतो. हे चिकवाचं पान आहे याचा विसर पडतो.
पुण्यातून येताना नारायण खमण, लक्ष्मीनारायण चिवडा आणि स्टेशनचे भाजी समोसे घेऊन ये असा निरोप देण्यासाठी हे योग्य पान आहे.
एक डाव भुताचा , म्हणजे तो
एक डाव भुताचा , म्हणजे तो 'मास्तुरे' ना?
बघायला पाहिजे परत
एले गब्बसा हो, का उगिच मूड
.
दक्षिणा, नाही समजलं.
दक्षिणा, नाही समजलं.
एक डाव भुताचा , म्हणजे तो
एक डाव भुताचा , म्हणजे तो 'मास्तुरे' ना? >> तोच
बरोबर आहे स्वस्ति..
बरोबर आहे स्वस्ति..
अव्वा सो सॉरी एले, मला वाटलं
अव्वा सो सॉरी एले, मला वाटलं मी पेट पीव्ह वर बोलते आहे. माफ करा. गल्ली जोरात चुकली आहे माझी. कमेंट उडवते.
मास्तुरे आणि "नवकोट नारायण"
मास्तुरे आणि "नवकोट नारायण" यदुनाथ जवळकर
अशोक सराफचे दोन कहर रोल्स. मी प्यार किये जा व त्यातला किशोर कुमार पाहिलेला नाही. तो अतरंगी असणारच पण अशोक सराफनेही धमाल उडवली आहे.
एक डाव भुताचा मस्त आहे. मिरासदारांचे लेखन आहे हे श्रेयनामावलीत असावे पण लक्षात नव्हते.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=5oNgJusIO0w
ही घ्या - झोप.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=RcaWoKh8vrg
हे एक डाव भुताचा मधील गाणे. पिक्चर काही खास आवडला नाही पण हे गाणे अप्रतीमं.
हे पण ऐका
https://www.youtube.com/watch?v=h8IxIyWkJBw
मला "बिनकामाचा नवरा" चित्रपट
मला "बिनकामाचा नवरा" चित्रपट पण खुप आवडतो...रन्जना आणी अशोक मामाची केमेस्ट्री इतकी अफलातुन आहे...त्याच गिव्ह अॅन्ड टेक..त्यातही रन्जनाने बाजी मारलिये..टिपिकल गुडघ्यापर्यतची नौवार ,खोचलेला पदर, दागिने चन्चीतुन काढून पान खाण!!..
इथेही रंजनाचा अभिनय मस्त
इथेही रंजनाचा अभिनय मस्त जमला आहे.
dark city बघितला. साय फाय
dark city बघितला. साय फाय film noir, आहे. Blade Runner आणि सार्क सिटी हे दोन cult सिनेमा आहेत. दोबाही सिनेमांचा थीम एकच आहे. WHAT IS IT TO BE HUMAN?, असे सिनिमे आवडत असतील तर पहा. चुणूक म्हणून आधी ट्रेलर पहा.
https://www.youtube.com/watch?v=30mmoegSQCs
आणि हा iconic सीन आहे. त्यावरून तुम्हाला कल्पना यावी.
https://www.youtube.com/watch?v=P6N00Uo3l4s
Matrix ह्या सिनेमाची बीजे ह्यात आहेत.
सुरवातीचाच सीन चक्रावून टाकणारा आहे.
सुरवात तर करा,
रंजना काय ताकदीची कलाकार होती
रंजना काय ताकदीची कलाकार होती! वाईट वाटतं तिच्याबद्दल.
Fakham Hall - एचबीओ
Fakham Hall - एचबीओ
स्पूफ पिक्चर आहे. कसला स्पूफ आहे ते बघताना समजेल. अनेकांना पोस्टरवरूनही समजेल
अगदी खिळवून वगैरे ठेवत नाही पण मजेदार आहे. थोडाच पाहिला आहे. शाब्दिक विनोदही बरेच आहेत. काही निसटले असावेत. लग्न, नवरा हेच सर्वस्व मानणार्या दोन बहिणींची नावे बेख्डेल सिस्टर्स वगैरे.
राभु, बब्बन तुमच्या पोस्टी
राभु, बब्बन तुमच्या पोस्टी आवडल्या आणि इंटरेस्टिंग वाटल्या होत्याच. ही आपलं माझी बाजू समजा. हाकानाका. पिक्चरचे काही नाही, एक जातो दुसरा येतो.
केनेडी पाहिला. विशेष आवडला नाही. कथा वेगळी आहे. सायकोपॅथचीच गोष्ट आहे. राहुल भट जॉन अब्राहम पेक्षा मख्खतर आहे. (तर-तम भाव) इतके निर्जीव डोळे आहेत की ज्याचं नाव ते. भुवया नकली कोरलेल्या व चिकटवलेल्या वाटतात. माझं तेथेच लक्ष जात होतं. कथा नाविन्यपूर्ण आहे आणि काही क्षणात ती वेधक होते पण ओव्हरऑल पिक्चर प्रभाव पाडू शकला नाही. मला राहुल सोडून बाकी सर्वांचा अभिनय सहज वाटला. विजय कदमला खूप वर्षांनी -समाजसेवक, तत्वनिष्ठ माणसाच्या भूमिकेत पाहून छान वाटले. भरपूर मराठी कलाकार व मराठी संवाद आहेत. आणि खरंतर त्यांचेच काम सफाईदार झाले आहे. मराठी माणसांसाठी टाळ्या! मुळात मराठी कलाकार कष्टाळू , प्रामाणिक आणि गुणीच आहेत आणि हे कायम जाणवतं.
हिरो आधी पोलिस मग पोलिसांचा हस्तक, एन्काऊंटर स्पेशालिस्ट ते नंतर घसरतघसरत फक्त एक सतत खून करणारा सायको वाटत जातो. त्याला काही नीतिमूल्ये नाहीत आणि तो व्यवहारकुशल सुद्धा नाही. चित्रपट अनुराग कश्यपचाच आहे, कुणाचाच नाही. पण हिरोला मुळीच क्लॅरिटी नाही. तो सोडलेल्या वळूसारखा आहे, कुठेही गोळ्या घालत फिरतो. तो आतून मृत आहे, बाहेरून वेडसर. त्यामुळे निर्जीव नजर चालून जाते. पण हे दांडगे व विशेष चपळ न वाटणारे शरीर आणि meaningless पणे मुडदे पाडणे. थोडा कॅरेक्टरचा आणि कथेचा कार्यकारण भाव दाखवायला हवा होता. नायकाचं मन उलगडायला हवं होतं, ते दिसलेच नाही. त्यात त्याला थोडंफार गिल्ट/ विवेक असल्याने त्याने ज्यांना मारलेय ते लोक दिसू लागतात, बोलतात. सल्ले देतात. खास करून जे निष्पाप होते. त्याला संवादच नाहीत. फारसं बोलत नाही. मधल्या कविता ज्या गाण्याच्या स्वरूपात येतात त्या मात्र अतिशय निवडक आणि काळजात घुसणाऱ्या आहेत.
सनी लिओनी पारशी वेशभूषेत एकदम आकर्षक दिसते, अभिनयाची बोंब आहे आणि दारू चढवून हसत सुटते. काही तरी इंग्रजी उच्चारात बोलते पण काही दम नाही. काही तुकडे बरे आहेत पिक्चरचे पण तेवढ्यासाठी आवर्जून बघण्यासारखे काही नाही ओव्हरऑल. नायक मुळात क्रूर आणि विकृत आहे. तो त्याच्या मुलाच्या खुनाचा बदला घेतोय असं म्हंटले तरी पुष्कळ वेळा कथा विस्कळीत वाटली. ती त्या दिशेने जातच नव्हती. त्याला समजून घ्या वगैरे म्हंटले नाही पण तो निष्काळजीपणे - मनस्वीपणे जगतोय ते फक्त पहायचं आहे. ह्यातच त्याचा शेवटही होतो. भरीव काही मिळत नाही शेवटी, प्रेक्षकांना!
एक डाव भुताचा व भुताचा भाऊ
एक डाव भुताचा व भुताचा भाऊ दोन्हींमधेही अशोक सराफच भूत आहे ना ?!. दोन्ही आवडले होते. रंजनाचा अभिनय एकदम मस्त असायचा. त्या काळात इतर नायिकांमधे ती एकटीच फटाकडी होती. तिचे मुंबईचा फौजदार, गुपचूप -गुपचूप आणि बिनकामाचा नवरा(+१ प्राजक्ता आणि सुनिधी.) धमाल आहेत.
बेख्डेल सिस्टर्स>>>>
Fakham Hall >> एच बी ओ नाही

Pages