चित्रपट कसा वाटला १२

Submitted by धनि on 4 August, 2025 - 10:36

२००० झाले पण Lol

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/86233?page=66#new

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@फारएंड - Happy Happy Happy
बऱ्याच दिवसात तुमचा चित्रपट रिव्ह्यू आला नाही... धुरंधर वर वाचायला आवडेल.

काल 'रात अकेली है -बन्सल मर्डर्स' बघितला. नवाजुद्दीन, चित्रांगदा, रजत कपूर, संजय कपूर, रेवती, इला अरुण, राधिका आपटे असे बरेच लोक आहेत. एका उद्योगपती बड्या खानदानातील लोकांच्या हत्या होतात आणि नवाजुद्दीन तो तपास करणारा इन्स्पेक्टर आहे. सुरुवातीला त्या बन्सल परिवारातील कोणाचे नक्की कोण नातेवाईक आहेत हे कळायला थोडा वेळ लागतो, ते जरा अजून नीट सांगता आलं असतं. तसंच अजून crisp करता आला असता पण सस्पेन्स चांगला आहे.

आमच्या कोकणात तर सापच साप असतात. फुरसं कडकडून चावतं. काठी घेऊन चाललं कि सापाचा त्रास होत नाही.

आमच्या घाटावर पण उन्हाळ्यात साप निघायचे. रोज कुणाच्या ना कुणाच्या घरात साप निघायचाच. मग सोहळाच असायचा. आख्खं गाव घराबाहेर जमा. गावात साप पकडणारे असायचेच. दोन काठ्या असल्या कि साप जेरबंद व्हायचाच.

अमरावतीला मामाच्या घराच्या आजूबाजूला साप निघायचे. जमीन तापलेली असली कि साप बिळाच्या बाहेर पडतात. घाटावर धामण निघते. ती गायीचं दूध पिते. एकदा का धामणीने गायीचं दूध पिलं कि तिला परत पान्हा फुटत नाही असं म्हणतात. शास्त्रीय कारण माहीत नाही.
जंगलात अजगरानं बकरीचं पिल्लू अर्धवट गिळून टाकून दिलं होतं. ते तेव्हांच मेलं. ब्रिटीश असताना कुणाला तरी लपेटून अजगरानं मारलं होतं. हाडाचा भुगा करून मारतो अजगर. धामण सुद्धा हाताला विळखा घालते तर हात सुन्न पडतो. वेढा आवळला तर हाडाचा चुरा होतो. धामणीला अजगरच म्हणतात आमच्यात. पाखराची पिल्लं खायला येते. म्हणून घराच्या आढ्याला घरटं होऊ देत नाहीत.

साप निघाला कि त्या रात्री कुणीच झोपत नाही. साप जंगलात सोडून येईपर्यंत अर्धा गाव गेलेला असतो आणि ते येईपर्यंत बाकीचे वाट बघत असतात. ते आल्यावर मग सापाच्या गप्पा निघतात. मजा यायची.

Pages