चित्रपट कसा वाटला १२

Submitted by धनि on 4 August, 2025 - 10:36

२००० झाले पण Lol

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/86233?page=66#new

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असामी, नोटेड. Happy
तो धुरंधर धाग्यावर सुचवलेला ग्रे सुद्धा नोट केला होता. मी सध्या प्रॉजेक्ट हेल मेरी आणि नोलनच्या ओडीसीची वाट पाहतेय.

रणवीरच्या कौतुकाला मम. दिंडी पताका असू द्या हो! मागे चिकवा तुषार कपूरच्या फॅन क्लबने प्रेग्नंट होता. मला वाटलं होतं की काय लेकरू पण वेळीच थांबले. Proud त्यापेक्षा हे बरेच!

नापतोल डॉट कॉमच्या हनुमान नजररक्षा सुरक्षा कवचच्या चालीत वाचा - (पहले मैं ऐसा था, फिर मुझको ये ये मिला...., और मेरी जिंदगी बदल गयी )

पहले मला रणबीर कपूर आवडायचा, खूप खूप आवडायचा. ह्योच हिरो क्रशून घ्यावा इतका! बर्फी म्हणू नका, जग्गा जासूस म्हणू नका, रॉकेट सिंग, ये जवानी है दिवानी, अजब प्रेम की गजब, सगळं सगळं आवडलं. हिरो असावा तर असा वाटायचं. पर जब मैंने धुरंधर देखा , मुझको आठवणे लगा की रणवीरचे काम सुद्धा गली बॉय, लेडीज व्हर्सेस, बॅंड बाजा बारात मधे किंवा सगळ्यातच जवळजवळ आवडले आहे. धुरंधर मधल्या त्याच्या दमक्या दमक्या केसांचाच स्वतंत्र फ्यान क्लब व्हायला हवा. दीदी गाणं पाहून तर केस जास्तच सुंदर होऊन द्रौपदी इतके लांब वाटले. इतकी वर्षे महिलाप्रधान पाहून कंटाळलेल्या महिलांसाठी हा सिझलिंग हंकोत्तम म्हणजे वाळवंटातले ओएसिस! मग मला वाटलं आपल्याला कुठे क्रशसोबत नांदायचं आहे, एका जन्मात सात क्रश चालतात म्हणून मी रणबीरची जागा रणवीरला दिली. हे कोणते ध्रूवपद आहे , आपलंच राज्य आहे. Happy

सिझलिंग हंकोत्तम Lol
...आपल्याला कुठे क्रशसोबत नांदायचं आहे, एका जन्मात सात क्रश चालतात म्हणून मी रणबीरची जागा रणवीरला दिली.…… Happy
मस्त लिहिलेय अस्मिता.
रणवीरच्या कौतुकाला मम. Happy +1

पहिल्या पार्ट पेक्षा दुसरा बोर आहे तर, उलट दुसराच जास्त भारी आहे ही दोन टोकाची मतं घेऊन शेवटी धुरंधर रिव्हेंज पाहिला. सर्वात आवडला असेल तर रणवीर .जबरदस्त काम केलंय त्याने. बाकी मारधाड वगैरे ठीक गाणी परत एकदा ऐकावी लागतील.संजय दत्त च गाणं त्याच्यावरच शूट करून मस्त जमून आलंय. पहिल्या भागात एव्हढी आवडली नव्हती ती हिरोईन सारा अर्जुन या भागात बरी वाटली. पण पूर्ण पिच्चर शेवटी रणवीरचाच.

बँड बाजा मध्येच त्याच्यातील पोटेन्शियल दिसले होते >> टोटली!

83 मी चार पाच वेळा पाहिला आहे >>> मीही Happy कम्फर्ट वॉच आहे तो. पिक्चर म्हणून किती भारी आहे माहीत नाही पण खिळवून ठेवतो हे नक्की. खूप अंडररेटेड रोल आहे रणवीरचा. तो प्रत्यक्षात कपिल नाही हे आपल्याला स्वतःला सांगावे लागते.

सिझलिंग हंकोत्तम >>> Lol

वरच्या लिस्ट मधे (मराठी वाटणार्‍या अ‍ॅक्सेण्ट सकट) बाजीराव आणि दिल धडकने दो सुद्धा. मला डान्सेसची आवड नाही. पण त्याचा बजने दे धडक धडक आणि तत्तड तत्तड चा डान्स मी खूपदा पाहतो. त्यावर परदेशी लोकांच्या रिअ‍ॅक्शन्स असलेले व्हिडीओ सुद्धा पाहतो Happy

बाजीराव मस्तानी मधे तो "चला!" म्हणतो ते सुद्धा अस्सल वाटते.

हो हो. रणवीर सिंग सध्याच्या स्टार अभिनेत्यांमध्ये उजवा आहे. भूमिकेची - दिग्दर्शकाची मागणी भूमिकेत झोकून देऊन पूर्ण करतो. एकदा हिरो म्हणून नाव कमावल्यावर व्हिलनच्या भूमिका साकारण्याचे आव्हान पेलण्यासाठीही कौतुक आहे.

रणबीर कपूरचा चेहरा बोलतो. देखण्या लोकांचा अभिनय त्यांच्या सौंदर्यापुढे झाकोळला जातो - मधुबाला, ऋषी कपूर.

आज नेटफ्लिक्सवर 'बारामुल्ला' नावाचा पिक्चर बघितला. चांगला आहे असं ऐकून होते.
काश्मीरमधे घडणारी लहान मुलांची अपहरणं, तपास करणाऱ्या डीएसपीचं कुटुंब, त्याच्या मुलीशी त्याचा निर्माण झालेला दुरावा, भूतकाळात घडलेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्या, हे सगळं एकत्र गुंफलेलं आहे. अमानवी भागही आहे. पण तो या सगळ्यात अतिशय चांगला जुळवलेला आहे.
आदित्य सुभाष जांभळे दिग्दर्शक आहे आणि आदित्य धर निर्माता. मानव कौल सोडल्यास बाकी कलाकार ओळखीचे नाहीत, पण सगळ्यांची कामं चांगली आहेत.
मला आवडला.

मला रणबीर कपूर कायम "मोठा झालेला बाल कलाकार" टाइप फेस वाटतो (जसे आफ्ताब शिवदासानी, जुगल हंसराज वगैरे तसाच) आणि कायम ते नशेत असल्यासारखे डोळे. अभिनय वगैरे कडे लक्षच गेले नाही.

तेरी मेहेरबानियाँ थोडाफार पाहिला. यात कुत्र्याने घेतलेला बदला आहे हे माहीत होते. पण एखाद्या हीरोच्या पिक्चरमधे त्या दिग्दर्शकाचा दुसरा आवडता हीरो पाहुणा कलाकार म्हणून यावा तसा एक नागही आहे. तो एका हिरॉइनची साडी लहान मुलाने ओढावी तशी ओढतो. ही बहुधा स्वप्ना नावाची हिरॉइन आहे. मग त्या अ‍ॅक्शनवरून तो आपल्याला कोठेतरी त्याच्याबरोबर यायला सांगतो आहे असे आपोआप कळून ती, राजकिरण व अजून कोणीतरी त्याच्या मागे जातात. तर तो एक व्हिडिओ कॅमेरा ठेवलेल्या ठिकाणी यांना नेतो. त्यातील कॅसेटमधे जॅकीला अमरीश पुरी ई. नी मारल्याचा पुरावा असतो. पण मुळात हे सगळे इतके नाग-फ्रेण्डली कसे काय? तो येउन साडी धरे पर्यंत यांना काय माहीत तो हे करायला येतोय की डसायला? दाराशी गाय यावी इतक्या सहजतेने ते दाराशी आलेल्या नागाबद्दल बोलत असतात. नागावरच्या कथेत घरात शिरलेल्या नागाशी लोक सहजतेने वागतील हे ठीक आहे. पण कुत्र्यावरच्या पिक्चरमधे नागाला ते स्पेशल प्रिविलेज कसे?

आता मी थोडा नंतरचा भाग पाहिला आहे. त्यामुळे हा पाहुणा कलाकार नसून आधीपासूनच तो त्यांना फॅमिली फ्रेण्डसारखा असल्यास माहीत नाही.

त्याआधी तो कुत्रा. तो तर काय काय करतो. हीरो काच फोडून एण्ट्री मारून फायटिंग करतात तसा यात तो कुत्रा करतो. राजकिरण व स्वप्ना भुकेले असताना ओळखीच्या घरात जाउन खाणे मागतो व स्वतः न खाता यांना आणून देतो. ज्या घरात तो कधीच गेलेला नाही त्या घरातील बेडवरच्या उशीखाली लपवलेली किल्ली तो शोधतो (फॅमिली फ्रेण्ड व इतर कॅव्हिअ‍ॅट लागू).

अमरीश पुरीचे पोलिस स्टेशन मधले अनेक सीन फेमस आहेत. पण शहरात एक पिसाळलेला कुत्रा फिरतोय त्याला मारा अशी मागणी करणारा सीन युनिक असेल. त्यातही पागल कुत्ता म्हंटल्यावर तो एखाद्या हीरोला म्हणतोय असे वाटेल. पण इथे ते शब्दश: घ्यायचे. मात्र तो इन्स्पेक्टर भ्रष्ट नसतो. त्याला हा कुत्रा तो रेकॉर्डिंगवाला कॅमेरा आणून देतो तेव्हा "ये कुत्ता पागल नही हो सकता" असे सांगून तो एका हवालदाराला त्याला मारण्यापासून परावृत्त करतो. त्यात तो पुरावा असतो.

अर्थात तो पुरावा बहुधा तेव्हा खुनाचा आळ असलेल्या राजकिरणला निर्दोष ठरवता यावे म्हणून असेल. कारण व्हिलन लोकांना ज्या पद्धतीने मारले जाते त्याला पुराव्याची काहीच गरज नव्हती. राजकिरणवर खुनाचा आरोप असताना पोलिस त्याला उघड्या गाडीतून बेड्या वगैरे न घालता मोकळाढाकळा नेत असतात सहज पळून जाता यावे म्हणून. नंतर कुत्राच त्याला मदत करतो.

आणि इतकी मेहेरबानियाँ करून सुद्धा बिचारा नंतर झाकोळला जातो. नागामुळे. अंधा कानूनमधे पाहुणा कलाकार म्हणून बच्चन घ्यावा आणि बच्चननेच तो पिक्चर खावा असे काहीतरी झाले आहे. कारण शेवटी हा कुत्रा अमरीश पुरीला पळवत पळवत जॅकीच्या "समाधी" पाशी आणतो. तेथे हा नाग आधीच तयार असतो. मग इकडे कुत्रा तर तिकडे नाग अशा पेचात अमरीश पुरी सापडतो. तेथे हा कुत्रा त्याच्यावर हल्ला करतो. पण बर्‍याच झटापटीनंतरही अमरीश पुरी जिवंतच असतो. मग नाग पुढे येतो व एकाच दंशात त्याला आडवा करतो.

त्यानंतर जॅकीच्या पुतळ्याचे अनावरण वगैरे होते. पण तो पुतळा जॅकीपेक्षा राजकिरणचाच जास्त वाटतो. तेव्हा मला शंका आली की मूळ कथेत राजकिरणला मारायचे असावे व आयत्या वेळेस ते बदलले आणि त्या गडबडीत पुतळा तसाच राहिला. असे काहीतरी असेल.

मलाही रणबीर कपूर चांगला कलाकार वाटतो. त्याचे डोळे बोलके आहेत. डान्सिंग पण जास्त रिफाईन्ड वाटते. ऐ दिल है मुश्किल, बर्फी आणि रॉकस्टार मधला त्याचा अभिनय बेहद्द आवडला होता. नेहमीच आवडतो तो. मला दोघेही आवडतात, रणवीर हळूहळू चढणाऱ्या नशेसारखा झाला इतकेच.

रणवीर जरा रगेड, सावळा व दणकट बांधा असलेला आहे त्यामुळे जास्त मादक वाटतो. सावळे पुरुष जास्त आकर्षक दिसतात आणि आपल्या चित्रपटातल्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये चांगले मिसळून जाऊ शकतात.

फा , पुरुषांना ऑब्जेक्टिफाय करून झाले की वाचते तुझी पोस्ट, फक्त कुत्र्यांवर हसला असशील तर माझं झिपरं कुत्रं सोडेन अंगावर. संदर्भ - झिपरं कुत्रं सोडा गं बाई हे भुलाबाईचे गाणे. Proud

नाग तसा ओळखीतला असतो. म्हणजे देवळातला. तरीही तो सीन खटकणारा आहेच. घरात एखादा लहान मुलगा आला की लोक कुणाचा बरं हा असा अंदाज घेत "अरे हा तर पाचव्या मजल्या वरच्या मंजुचा ना! " करतात, तेवढ्याच सहजेतेने इथे घरात आलेल्या नागाकडे बघुन हा कुणाचा बुबा करत कुणी तरी हा तर देवळातला नाग म्हणतं.
पुतळा बनवणार्‍याकडे बहुतेक राजेश खन्नाचा पुतळा पडुन होता. या चित्रपटाच्याऑर्डर वेळी घासाघीस फार झाली असावी आणि मग त्याने "ठीक आहे त्याच पुतळ्यात बदल करुन देऊ" असा मनात विचार करत ऑर्डर स्विकारली असावी. त्याचा जॅकी श्रॉफ करण्याच्या नादात जरा राजेश खन्ना, जरा कमल हसन, जरा राज किरण असे काही तरी झाले असावे. दिग्दर्शकाने तक्रार केल्यावर "एवढ्या पैशात एवढेच जमेल साहेब!" म्हणत हात वर केले असतील.

फा
Lol

हा चित्रपट फार फेमस झालेला त्या काळात.
रेडिओवर गाणे।लागायचे 'तेरी~~~~~~~ मेहेरबानिया~~~~~
हा चित्रपट पाहून कुत्रा पाळणाऱ्या लोकांची संख्या वाढली असेल नै.
नाग पाळणारे मात्र कोणी नव्हते.

एकदा हुक्की आलेली म्हणून युट्युबवर पाहिलाय हा चित्रपट

"मेरे मुन्ने भूल न जाना, तू अपना फर्ज निभाना, मेरे दूध का कर्ज चुकाना"
असं ऐकु आलं कानात. या चित्रपटाची जाहिरात रेडिओवर खूप झाली होती.

तेरी मेहेरबानिया वरून हसीना मान जाएगी मधला गोविंदा - सतीश कौशिकाचा रेस्टॉरंट मधला सीन आठवला... जब हम गए तो आप मुगले आजम थे, जब हम आए तो आप पगले आजम है..

तुने मेरा दूध पिया है, तू बिलकुल मेरे जैसा है....
कसमss पै दा करने वाले की...
अजून दोन तीन गाणी ऐकू आली माझ्या कानात

'तेरी मेहरबानियां'साठी स्वतंत्र बाफ पायजेलाय! Proud खतरनाक लिहिलंय. Lol

पण बर्‍याच झटापटीनंतरही अमरीश पुरी जिवंतच असतो. मग नाग पुढे येतो व एकाच दंशात त्याला आडवा करतो.
<<<<<< १९८५मध्ये अमरीश पुरी या सिनेमात नाग चावून मेला,मग तो ८६मध्ये नगीना मध्ये मांत्रिक बनून आला. तरी पुन्हा नाग चावून मेला. ८७मध्ये कुठलाही प्राणीदार सिनेमा न केल्याने त्याची हॅटट्रिक हुकली.

पुतळा बनवणार्‍याकडे बहुतेक राजेश खन्नाचा पुतळा पडुन होता. या चित्रपटाच्याऑर्डर वेळी घासाघीस फार झाली असावी आणि मग त्याने "ठीक आहे त्याच पुतळ्यात बदल करुन देऊ" असा मनात विचार करत ऑर्डर स्विकारली असावी. त्याचा जॅकी श्रॉफ करण्याच्या नादात जरा राजेश खन्ना, जरा कमल हसन, जरा राज किरण असे काही तरी झाले असावे.
<<<<<< Lol
एकदा 'निगाहें'मधला अमरीश पुरीचा पुतळा पाहायला हवा. कदाचित तोसुद्धा हाच पुतळा असेल. एवीतेवी पडूनच राहणार त्यापेक्षा.... Proud

८३ बघितला आहे मी. मला रणवीर आणि पिक्चर एवढा काही आवडला नव्हता. ठीक वाटला होता.

त्याच्या धुरंधरमधल्या केसांचा फॅन क्लब काढलात तर मी पण आहे. इथे असे केस मोकळे ठेवून चहा करायचा म्हटलं तरी जीवावर येतं. तो कराची काय, बलुचिस्तान काय, मुरीदके काय, पावसाळा म्हणू नका, कडकडीत ऊन म्हणू नका, कुठेही, कधीही हाणामाऱ्या, खून, बॉम्ब ब्लास्ट करत फिरतो. ५-५ लिटर शॅम्पू आणि कंडिशनरचे कॅन आणून ठेवतो का काय घरात?

सिझलिंग हंकोत्तम नाही वाटला. आमच्या भावंडं ग्रूपमध्ये अशांना तंदूरी (पण टेम्पटिंग नाही या अर्थाने) म्हणतात. अर्थात त्या रोलसाठी बिफी बॉडी आणि एकंदरीतच रणवीर प्रचंड सूट झालाय.
उज़ैर बलोच (दानिश पंडोर)चा हिम्बो लूक, विश्वास टाकल्यावरचा व्हल्नरेबल स्वभाव आवडला मला. रणवीर त्याला अक्षरशः फिजिकली हॅण्डल करताना दाखवून आदित्य धरने बऱ्याच गोष्टी हिंट केल्यात असं वाटलं.

तत्तड तत्तड >>> प्रिसाईझली या गाण्याच्या वेळी मी थिएटरमध्ये केस उपटायला सुरुवात केली होती.

रणबीर आवडतो. त्याच्या डोळ्यांना काही बोलायचं नाही हां. नितुचे डोळे चालतात तुम्हाला. तिच्या लेकाचे तस्सेच डोळे चालत नाहीत. ये सरासर अन्याय हैं.

दाराशी गाय यावी इतक्या सहजतेने ते दाराशी आलेल्या नागाबद्दल बोलत असतात. >>> Lol
तेरी मेहरबानियां'साठी स्वतंत्र बाफ पायजेलाय >>> या मागणीला माझे अनुमोदन आहे.

त्याच्या धुरंधरमधल्या केसांचा फॅन क्लब काढलात तर मी पण आहे. इथे असे केस मोकळे ठेवून चहा करायचा म्हटलं तरी जीवावर येतं. तो कराची काय, बलुचिस्तान काय, मुरीदके काय, पावसाळा म्हणू नका, कडकडीत ऊन म्हणू नका, कुठेही, कधीही हाणामाऱ्या, खून, बॉम्ब ब्लास्ट करत फिरतो. ५-५ लिटर शॅम्पू आणि कंडिशनरचे कॅन आणून ठेवतो का काय घरात?

>>

रस्त्याकडेच्या दुकानात काम करूनही रंबा हो वाल्या मारामारीत वेल मेंटेन्ड केस
गाणं बघून मुलगी माझ्या मागे लागली आहे, की तसे केस उडवून दाखव... आता इतके सरळ केस असते तर आणखी काय हवं होतं...

रस्त्याकडेच्या दुकानात काम करूनही रंबा हो वाल्या मारामारीत वेल मेंटेन्ड केस
गाणं बघून मुलगी माझ्या मागे लागली आहे, की तसे केस उडवून दाखव... आता इतके सरळ केस असते तर आणखी काय हवं होतं... >> कसलं गोड Happy

सावळे पुरुष जास्त आकर्षक दिसतात >> सावळा रंग त्वचेत असलेल्या मिलानिन मुळे बनते. त्यामुळे सावळ्या रंगाच्या व्यक्तींना व्हिटॅमिन डी बनण्यासाठी इतरांपेक्षा तीन ते चार पट जास्त वेळ सूर्यप्रकाशात वावरावे लागते. सकाळच्या उन्हात व्हिटॅमिन डी ची मात्रा कमी असते. तसेच भारतीय लोकांमधे चहाचं सेवन जास्त असल्याने व्हिटॅमिन डीला अडथळा निर्माण होतो. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे व्हिटॅमिन बी १२ आणि अन्य व्हिटॅमिन्स बनण्यासाठी अडथळा निर्माण होतो. याला उपाय नॉन व्हेज जेवणाचा आहे. पण चहामुळे त्याचाही परिणाम होत नाही. सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत अशा व्यक्तींनी उन्हात वावरावे असे म्हणतात. पण या काळात इनडोअर कामे करत राहिल्याने नुकसान होते. त्यामुळे सावळ्या रंगाच्या व्यक्ती आकर्षक वाटल्या तरीही त्यांचे मेडीकल सर्टिफिकेट सुद्धा पहायला हवे.

कपूर घराणे व्हाईट हूण वंशाचे असल्याने त्यांच्या मधे व्हिटॅमिन डी खूप असते, यामुळे पुढील व्हिटॅमिन्सची मात्रा सुद्धा भरपूर असते. यामुळे त्याच्यामधे लवकर एजिंग होत नाही. ते चिरतरूण राहू शकतात. फक्त खाण्यावर नियंत्रण ठेवल्यास.

>>>>उज़ैर बलोच (दानिश पंडोर)चा हिम्बो लूक, विश्वास टाकल्यावरचा व्हल्नरेबल स्वभाव आवडला मला.
डिट्टो!!! फार आवडला मला तो.

Pages