चित्रपट कसा वाटला - ११

Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53

नवीन चिकवा.

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फेफ Lol

विमी दिसायला छान, अभिनयात ठोकळा त्या एका गाण्यातच समजतं. तिच्याबद्दल माबो वर वाचलेलं, तीच लिंक शेअर केली बहुतेक सामोने.

परवीन बाबी चेहेऱ्यावर गोडवा असलेली, झीनत पेक्षा चांगली अभिनयात. शशी कपूर जाम आवडायचा, फक्त अमिताभ सोबत असेल तेव्हा सर्व लक्ष अमिताभकडे.

मोळी डोक्यावर ठेवायला गेल्या की चोळी वर गेलीच इतकी कापडटंचाई
>>>>>
काय उपमा! काय उपमा!!!

सत्यं शिवम् सुंदरम् नंतर लताचं राज कपूरशी फाटलं. लता म्यूज होती म्हणे त्याची. आणि चेहरा महत्वाचा नाही तर मनाचं सौंदर्य महत्वाचं असा कायतरी मेसेज त्याला द्यायचा होता. त्यातलं त्याने चेहरा महत्वाचा नाही तेवढं मनावर घेतलं. बाकी सग्गळं सौंदर्य दाखवायचा अट्टाहास किळसवाणा होता. सत्यंची गाणी खरं तर चांगली आहेत पण चारचौघात बोलायची चोरी.
मी पाहिला नाही पिक्चर पण गाण्याचे व्हिडीओसुद्धा बघवत नाहीत. कसली कर्माची शीतल कोमल देवी…..

मोळी डोक्यावर ठेवायला गेल्या की चोळी वर गेलीच इतकी कापडटंचाई >>> Lol उपमा, श्लेष, प्रास सगळंच आलं कि.

राज कपूर आणि शशी कपूर मधे किती फरक आहे ना ?
मोठ्या भावाचा आदर्श नाही घेतला हे बरंच झालं.
सत्यम शिवम आणि राम तेरी , मेरा नाम वगैरे आर के च्या पिक्चर्सला आमच्या घरी बंदी असल्याने ओटीटीवर सुद्धा हे घरात बसून बघता येत नाहीत. चोरून बघावं तर गिल्टी फिल होतं.

एव्हढं करून सत्यम शिवम सुंदरमची स्टोरी काय ? तर जळालेला चेहरा लपवून ती शशी कपूरशी लग्न करते. तिचं खूप प्रेम असतं, पण तो चेहर्‍याला महत्व देतो आणि शेवटी पूर आल्यावर त्याला उपरती होते. उगीचच त्यात पवित्र वगैरे अँगल आणलाय. जे दाखवायचं ते धंदेवाईक पद्धतीने केलंय. आर के आणि एकता कपूर मधे काडीचाही फरक नाही. कितीही उदात्ततेचा आव आणला, प्रेमाला पवित्र वगैरे दाखवलं तरी शेवटी व्यंग लपवून लग्न केलं आणि ते उघड झालं तर जोडीदारावर थोपता येतात का या गोष्टी ? व्यवहारात असं होतं का ?

वरून धमकी कि पवित्रसं, उदात्तंसं काही तुम्ही भौतिक सौंदर्यासाठी नाकारणार असाल तर धरणफुटी, ढगफुटी, भूकंप, महामारी, त्सुनामी येऊ शकते. त्यासाठी प्रत्येकाला अध्यात्माचे क्लास नको का लावायला ? किंवा पुरोगामित्वाचे ?

काहीही पाहावे - हाकानाका या अनावश्यक उपक्रमांतर्गत
>>>
Lol

'भूतनी' नावाचा बंडल सिनेमा पाहिला
>>>
हा मौनी रॉयसाठी निघालेल्या रोजगार हमी योजनेपैकी एक होता का? नशिब लग्न झालं बिचारीचं नाहीतर अजून काय काय बघावं लागलं असतं.

सत्यं शिवम सुंदरम हे गाणे लताने एकही टेक न घेता ३० मिनिटांत संपवले आणि स्टुडिओ सोडला असे विकिवर वाचले, खखो ते दोघेच जाणे. संगितकार म्हणुन हृदयनाथ मण्गेशकर घेणार असे ठरुन नंतर राज कपुरने लक्ष्मी प्यारे घेतले त्यावरुन वाद झाला म्हणे.

मेरा नाम पासुन राज कपुर सुटलाच. सॉफ्ट पॉर्न वाटावे असे प्रदर्शन पडद्यावर मांडले. सत्यम शिवम.. ला फुसकी कथा होती.. शशीच्या तोंडचे संवाद इतके कंसिटेड आहेत की त्यालाही लाजिरवाणे वाटले असणार..

त्या चंचल शीतल इ इ गाण्याला मुकेशचा आवाजही महान बोअर आहे!

अनावश्यक उपक्रम, रोजगार हमी योजना, दगड - सगळेच Rofl

मी गेल्या दोन दिवसात एक ईन्ग्रजी, एक ईतालियन, एक पोलिश आणि अर्धा स्पॅनिश चित्रपट पाहिला. (नेफ्लि)

कोणकोणते ते निवांत लिहिते पण आत्ता हे फक्त एवढ्यासाठी लिहिले की स्पॅनिश चित्रपटातील मुख्य व्यक्तीरेखा पाहताना अश्विनीमामींची खुप खुप आठवण आली. त्याच भुमिका करताहेत असे वाटले.

चित्रपट - a widow’s game. अभिनेत्री कारमेन माची.

त्या 'किसी पत्थर की मूरत से' गाण्यात एक गोष्ट पाहिली का? पार्टीमध्ये गेस्ट म्हणून ज्या जुनिअर आर्टिस्ट बायका आहेत त्यांचे चेहरे पांढरे फट्ट रंगवलेत. त्यांचे हात आणि चेहऱ्याचा रंग जुळत नाही. त्यामुळे एक बाई घुबडासारखी मान पुढे काढून बघतेय असं काहीतरी वाटतंय. एवढं काय ऑब्सेशन गोऱ्या रंगाचं? आणि तुमची हिरोईन फिल्मी स्टँडर्ड्सना हवी तशी नुसतीच गोरी नाही तर देखणीही आहे. मग त्या जुनिअर आर्टिस्ट बायका त्यांच्या मूळ रंगात दिसल्या तर काय हरकत आहे?

माझे मन >> Rofl
तुफान पोस्ट आहे ही. कसलं बारीक निरीक्षण.
क्राईम पॅट्रोल किंवा सीआयडी मधे स्कोप आहे Happy

ते हात बहुतेक नांगरणी, पेरणी, कापणी, उफाणणी अशी उन्हातली कामे करून रापले असतील. तोंडावर स्कार्फ असल्याने ते पांढरंच राहीलं.

त्या गाण्यात महेंद्र कपूरचा आवाज अजिबात चपखल नाही. त्याचा खडा आवाज आहे आणि थोडासा जाडसर. पुढच्या चढया कडव्याच्या शेवटी इन्कलाब जिंदाबाद किंवा गांधी सुभाष हे टीपेला जाऊन म्हणेल असं वाटत राहतं.
मुकेश किंवा रफी च्या आवाजात ऐकायला छान वाटलं असतं.

रवीचा आवडता गायक महेंद्र कपुर. चोप्रा कँप म्हणजे रवी-साहिर - म कपुर. आशा लता यांना पर्याय नव्हता. त्यांनी स्वत:चा कॅम्प केला होता. बाकीचे कँप यांच्याकडे जायचे. यांना कोणाकडे जायची गरज नव्हती. Happy

लहानपणी अशी गाणी पाहिली की आपण निदान एकदा तरी अशी पार्टी अटेंड करावी असे वाटत असे, युनिफॉर्म घातलेले वेटर्स ड्रिंक्स घेऊन इकडे तिकडे फिरत आहेत, कुणीतरी पियानोवर गाणे गात आहे, सूट, बूट, सिगार्स, स्लीव्हलेस एखादा आर्मी ड्रेस मध्ये ई ई.

महेंद्र कपूरचं नाव निघाल्यामुळे सगळी गाणी सोडून हे गाणं आठवलं -
https://www.youtube.com/watch?v=1G5nNdme9h0

प्रत्येक कडव्याची पहिली ओळ तो अगदी विचित्र पद्धतीने संपवतो. ते ऐकून जाम हसू येतं Proud

Submitted by rmd on 2 August, 2025 - 02:17 >>> Lol

त्या नटाचं नाव श्रीराम गोजुमगुंडे आहे. दादा कोंडकेंचा फॅन. तो स्वत:ला दादाच म्हणवून घ्यायचा.
डबल मीनिंगचे संवाद आणि महेंद्र कपूर हे सगळं दादांचंच उचललंय.

अनिता पाध्ये यांनी दादा कोंडकेंचं "एकटा जीव" हे चरित्र लिहीलंय. पूर्वी जयवंत कुलकर्णी हे दादांचा आवाज होते. ते याच पद्धतीने गाणं म्हणायचे. दादा कोंडकेंना सूट होईल अशी सर्वानुमते शैली होती. एकदा लता दिदींनी उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णींचं गाणं ऐकलं आणि त्यांनी उषाला सांगितलं कि "कसला बेसूर गायक आहे हा. हे गाणं रिलीज झालं तर लोक म्हणतील लता मंगेशकरची बहीण कुणाबरोबरही गाते का ? हे गाणं पुन्हा रेकॉर्ड कर" जयवंत कुलकर्णींना ह मेसेज गेल्यानंतर ते म्हणाले कि " कोण लता मंगेशकर ?"
दादा कोंडकेंपर्यंत हा किस्सा गेलाच होता. त्यांनीही जयवंत कुलकर्णींना निमंत्रण पाठवलं होतं. पण ते आलेच नाहीत.
जेव्हां ते भेटले तेव्हां दादा म्हणाले कि "तुम्ही आला असता तर मी तुमची बाजू घेतली असती. पण तुम्ही लता मंगेशकर यांच्या बद्दल जे काही बोललात ते खटकलं. इथून पुढे तुम्ही माझ्यासाठी गाणार नाहीत" या घटनेनंतर जयवंत कुलकर्णीच्या जागी महेंद्र कपूरची वर्णी लागली , ती याच अटीवर कि गाणं जयवंत कुलकर्णींच्या शैलीने म्हणायला पाहीजे.

मी या धाग्यावर चित्रपटांचे रेको घेण्यापेक्षा अस्मिता, रानभुली, फारएंड यांच्या प्रतिसादांसाठीच येतो. अस्मिताचे प्रतिसाद तर वाचून तर दिवस हलका होऊन जातो. एक गोष्ट जाणवली ती म्हणजे बॉलीवूड गॉसिप पेक्षा रानभुली आणि तत्सम लोक जो ट्रिविया सांगतात तो खूप एंजॉयेबल आहे आणि असे लोक खूप कमी कमी होत आहेत.

सर अभिनंदन!
Superstar Shah Rukh Khan says he was overwhelmed with gratitude, pride and humility after being named best actor at the 71st National Film Awards,

थँक्स रॉय.
कुणी तरी आवर्जून वाचतंय ही भावना सुखद आहे. धन्यवाद तुम्हाला.

'झटपट करु दे खटपट >> जेव्हढं गोजुमगुंडे हे नाव विशेष आहे तेव्हढंच हे ही Lol

रवीचा आवडता गायक महेंद्र कपुर. >> गम्मत म्हणजे रवी जेंव्हा दिल्लीहून मुंबईमधे आला तेंव्हा त्याला रफीच्या सांगण्यावरून कोणी तरी कामावर ठेवले होते. पुढे त्याच्या पहिल्या सिनेमाला रफीने गायन केले होते. रवी रफीबद्दल एव्हढा आदार बाळगून होता कि रफी गेल्यावर तो रवीच्या घरी ज्या जागेवर बसत असे तिथे रवीने त्याचा हार्मोनियन ठेवला जेणेकरून तिथे अजून कोणी कधीच बसू नये.

रानभुली, मी नक्की एकटा जीव मध्ये वाचले की अन्यत्र आठवत नाही. मी जे वाचले ते असे होते की ज कु नी एक गाणे गायले ते थोडे बेसुरे गायले गेले असे निर्माता दादा कोंडके यांना वाटले. त्यावर ज कुंनी लताही अधुन मधुन बेसुरी गाते, मी गायलो तर काय.. असे उद्गार काढले जे हळूहळू योग्य जागी पोचले आणि जकुचा पत्ता कट झाला.

जकु गातांना रंगात येऊन ज्या हरकती करायचे त्यावरुन सहगायिका उषा मंगेशकर यांचा गैरसमज होऊन त्यांनी तक्रार करुन जकुंचा पत्ता काटला असेही आठवतेय.

आता आठवले. जकु आमच्या घरी दोनचारदा आले होते. तेव्हा त्यांनी वरचा किस्सा क्र २ सांगितला होता. ते म्हणाले होते की माझ्याबद्दल गैरसमज करुन घेतला गेला आणि पत्ता कट झाला. जकु पार्ल्यात राहायचे आणि बहुतेक स्वामी समर्थांचे भक्त होते. ते तिथल्या कुठल्यातरी मठात माझ्या वडलांना घेऊन जायचे.

पहिला किस्सा एकटा… मध्येच वाचला होता. तो बहुतेक फेक असावा. एकटा जीव… मध्ये लता आशाबद्दल इतके ढिगानी किस्से आहेत की पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा दादा हयात असते तर लता आशाने काय प्रतिक्रिया दिली असती देव जाणे. ते हयात नसल्याने बहुधा बहिणींनी दुर्लक्ष केले असावे.

मी जे वाचले ते असे होते की ज कु नी एक गाणे गायले ते थोडे बेसुरे गायले गेले असे निर्माता दादा कोंडके यांना वाटले. >>> साधना ताई,थोडे बेसुरे हे बरोबर आहे. पण एकटा जीव च्या लेखिका अनिता पाध्ये यांनी कुठे तरी बोलतानाही सांगितले आहे कि आधी लता मंगेशकर यांनीच ते गाणं ऐक्ले होते.
https://youtu.be/HFDN0hFPUZs?t=175

द अमेच्युर The Amateur नावाचा सिनेमा पाहिला. Rami malek चा आहे. आवडला. त्याच्या बायकोला ज्यांनी मारलं त्यांना तो ज्याप्रकारे शोधतो ते आवडलं.

टिपिकल हॉलिवूड मध्ये असतो तसा ट्विस्ट ( CIA ने मुद्दाम त्याच्या बायकोला मारलं म्हणजे मग तो ती गँग शोधून काढेल असा) येईल असं शेवटपर्यंत वाटत राहिलं. खूप क्राइम सिनेमे पाहिल्याचा परिणाम!

“ एकटा जीव… मध्ये लता आशाबद्दल इतके ढिगानी किस्से आहेत” - त्यातच दादा कोंडके आणि आशा भोसले प्रेमप्रकरणही आहे का? अनिता पाध्येंच्या यूट्यूब चॅनेलवर त्यांनी एक पूर्ण एपिसोड त्यावर केलाय. (अर्थातच हीरो: दादा कोंडके)

Pages