धुरंदर पाहिला
पहिला आवडला असेल तर हा आवडेलच.
ऍक्शन अक्टिंग अदाकारी जुन्या गाण्यांचा वापर वगैरे वगैरे..
शेवटच्या ट्विस्टबद्दल फार ऐकून गेलेलो. त्यामुळे तो काय असेल याचा अंदाज मध्येच बांधला आणि तोच खरा निघाला. म्हणजे काही आऊट ऑफ द बॉक्स नव्हता. जसे त्या बास्टर्ड ऑफ बॉलीवूडमध्ये होता.
अक्षय खन्नाचे गाजलेले अरेबिक गाण्यातील सेम सीन दीदी गाणे घेऊन रणवीर सिंग वर चित्रीत केले पण त्यात मजा नाही आली.
बाकी बघा..
चार तास पिक्चर बघण्यात राहिलेली झोप पूर्ण करतो आधी.. म्हटले तर चार तास तसा कंटाळा आला नाही. पण चित्रपट अजून अर्धा तास कमी करता आला असता.
आणि हो चित्रपटात प्रोपगंडा तर आहे. मोदी भाजपा अगदीच नावडते असतील तर थिएटर मध्ये बघायला जाऊ नका. काही सीन वर लोकं ओरडतात तेव्हा जीवाला त्रास होईल
आजूबाजूचे प्रेक्षक आपल्याला मारतील का?>>> आपल्या जबाबदारीवर हसा बाकी as usual this part is also banned in middle east. But we have thrill with actual war. No need for this fake thrill
>>पहिला आवडला असेल तर हा आवडेलच.<<
ऋन्म्या, माधवनची एंट्रि (सिगरेट शिलगावत जिन्यावरुन चढताना) कशी वाटली? गाड्या उडवणे नाहि, हेलिकॉप्टर लँडिंग नाहि.. कोल्ड यट फरोश्यस, त्रिशुलच्या बच्चन स्टाइलमधे...
@ राज,
माधवन एन्ट्री आणि अभिनय 1 नंबर.
गेल्यावेळी सुद्धा त्याने भारी अदाकारी दाखवली होती. पण तेव्हा त्याची बाजू पडती होती. या भागात Revenge असल्याने बॉडी लँग्वेजमध्ये तशीच ठसन दाखवता आली.
@ विकु
प्रोपॅगंडा आवडत नसलेल्यानी काय करावे?
>>>>
मलाही आवडत नाही. पण मला तो टाळून, त्या प्रभावाखाली न येता चित्रपट बघता येतो
मी धुरंधर १ पाहिला. खूप रटाळ वाटलेला.
नंतर मी शतक पाहिला.
मला धुरंधर १ आवडला असे वाटू लागले.
काल गुढीपाडव्याला गावात अग्निशमन दलाने आणि होम गार्ड्स यांनी संचलन केले. (?) एक माणूस म्हणा उद्या ईद आहे म्हणून हे चालले आहे. मी म्हणालो या आधी गावात असे वातावरण कधीच नव्हते. तो म्हणाला खूळ लागले का? कुठून आला आहेस शहाण्या?
मग मी धुरंधर २ पाहिला.
मग मला दोन्ही आवडले.
नंतर कळालं की रमजान ईद च्या दिवशीच गावात विराट हिंदू समेलन वगैरे भरवले आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून नगरपरिषदेच्याच या लोकांनी हे सगळे केले होते. संचलन वगैरे.
मग ६ जणांच्या घरी शिरखुर्मा पिल्यावर मला पुन्हा दोन्ही चित्रपट रटाळ वाटले.
शिरखुरम्याचे दोन प्रकार असतात. त्यावरून त्या घराची सुबत्ता कळते.
१. भरपूर दुधात खूप ड्राय फ्रूट्स घालून बारीक शेवया घालून केलेल्या.
२. खोबरे वगैरे पेरून गूळ आणि गहू यांची केलेली खीर.
मला दुसरी फार फार आवडते.
ती तिघांकडे प्यायला मिळाली.
त्यानंतर मला जाणवले की यावेळेस अगदी कमी जणांकडून बोलावणे आले होते. पूर्वी किमान १५ घरे तरी व्हायचीच. आणि घरी डबे देखील यायचे.
यावेळेस फक्त ६ आणि घरी एकही डबा नाही.
मला खूप वाईट वाटत आहे की दोन्हीकडून प्रचंड ध्रुवीकरण झालेले आहे. ते दबून आणि सावध वागत आहे. शिवाय त्यांच्यात देखील तबलीगी जमात ने इतके खोलवर हातपाय पसरले आहेत की माझ्या आजू बाजूचे भले भले लोक दाढ्या वाढवून आणि घोट्यांच्यावर लेंगे घालून विद्रूप होऊन हिंडत आहेत.
म्हणून परत धुरंधर आवडून घ्यावे म्हंटले तर गावात विराट हिंदू समेलन भरलेलं आहे त्याचे फोटो दिसले. त्यामुळे "धुरंधर १ आणि २ - एक आवडणे" लांबणीवर पडले आहे.
Gandhi Talks बघितला. वेगळा प्रयत्न म्हणुन एकदा बघण्यासारखा आहे. मला sethupathi आवडतो आणि त्याने कामही बर केलय. अरविंद स्वामी ही ok. मुलाखतीत gandhi talks म्हणजे पैसा बोलता हैं, असे दिग्दर्शकाने सांगितले होते. पण तसे फारसे दिसले नाही. म्हणजे श्रीराम राघवनच्या Johny Gaddar किंवा Badlapur जसा सिनेमा पैश्याभोवती फिरतो, त्यामानाने जरा विस्कळित वाटतो. कदाचित मी वेगळी अपेक्षा ठेवून बघीतला असेन. Background score A R rehman चा आहे
नेटफ्लिक्सवर यश चोप्राचे अनेक पिक्चर आलेले आहेत. त्यातला एक "फासले". रमड ने यात काहीच पाहण्यासारखे नाही लिहील्यामुळे असे चित्रपट आपण नाही पाहिले तर कोण पाहणार अशा चॅरिटेबल हेतूने पाहिला. पुढे पुढे बोअर असला तरी नेटाने पाहिला.
सुनील दत्त, फराह, फारूख शेख, रोहन कपूर, रेखा आणि राजकिरण. हिमालय ते स्विस आल्प्स या रेंज मधे कोठेतरी असलेले बर्फाळ प्रदेशातील गाव.
तुम्हाला कभी कभी मधे राखीचे लग्न होते तेव्हा तेथेच रस्त्यापलिकडे अमिताभ प्रेमभंग अवस्थेत दु:खी रागीट चेहरा करून उभा असलेला आठवतो का? यातील अर्ध्या सीन्स मधे रोहन कपूर तसा उभा आहे. मायनस इण्टेन्सिटी, संवादफेक आणि स्क्रीन प्रेझेन्स. तसा तो अभिनय काही वाईट करत नाही, दिसतोही ठीकठाक. पण टोटल उर्दू गटणे. चार पावसाळे पाहिलेल्या व्यक्तीसारखा उर्दू संवाद म्हणतो. तोच काय, इतरही तसेच बोलतात. किंबहुना स्क्रीनप्ले, दिग्दर्शन, ड्रामा या ऐवजी संवाद वापरले आहेत. बर्याचदा अभिनयाऐवजी सुद्धा. फराह सुरूवातीच्या २-३ पिक्चर्स मधे खूप सुंदर दिसली होती. यातही तशीच दिसते.
रोहन-फराह, सुनील दत्त-रेखा आणि फारूख शेख-दीप्ती नवल अशा तीन जोड्या आहेत. सर्वांच्याच प्रेमाच्या आयक्यूबद्दल दारूण परिस्थिती आहे.
- फारूख शेख व दीप्ती नवल हे त्याकाळी प्रेमाच्या दुनियेच्या "नाही-रे" वर्गातील पर्मनंट निवासी असलेले लोक इथे "आहे-रे" वर्गात आहेत. हे एक नावीन्य. फारूख शेख फ्लर्ट दाखवला आहे. तुमको देखा तो ये खयाल आया गाण्यात 'आज फिर दिलने एक तमन्ना की' म्हणताना त्याने जी काय तमन्ना केली असेल ते सगळे यश चोप्राने त्याच्या कॅरेक्टरला देऊन टाकले आहे. तो आणि (सुनील दत्तने सांभाळलेली) दीप्ती नवल एकाच घरात राहात असतात. पण फारूख शेखला तिच्या साधीभोळी मीरा तुला कळली नाही टाइप प्रेमाचा पत्ता नसतो. मात्र एकदा तो जखमी असताना (म्हणजे कपाळावर पट्टी) त्याच्या बेडच्या बाजूला ती सोबत म्हणून बसलेली बघून व तिच्याकडच्या ड्रॉइंग बुक मधे तिचे व त्याचे तिने एकत्र काढलेले चित्र बघून त्याला साक्षात्कार होतो. व नंतर काही मिनिटांतच तो तिच्याशी लग्न करायचे ठरवतो.
- सुनील दत्त व रेखा यांचे अफेअर असते. पहिली पत्नी मेल्यावर याने दुसरे लग्न केलेले नसते. पण रेखाशी अफेअर असते व ते गपचूप भेटत असतात. गपचूप म्हणजे इतके की ते बेडवर असताना रेखा गाणे अशा आवाजात म्हणते, की जेथून नाव वल्हवत यावे लागेल इतक्या लांब असलेल्या पाण्यापाशी उभे असलेल्या रोहन-फराहला बाजूच्या धबधब्याच्या आवाजातही तिचे गाणे ऐकू येते. तिचे सुनील दत्तबरोबरचे संवाद म्हणजे अशा स्त्रीने फार कटकट न करता राहावे असे वाटणार्याने जर तिचे संवाद लिहीले तर ते जसे असतील तसे आहेत. म्हणजे मला लग्नाची काय गरज आहे, तुझे प्रेम आहे ते बास आहे, मी एकटी सुखाने राहते वगैरे वगैरे.
तिला रात्री पाण्यात एका शिकार्यात बसून फिरायची सवय असते. एकदा रोहन पाण्याजवळ असताना तिच्या शिकार्याला आग लागते. त्यातून ते नक्की कसे वाचतात, पाण्यात उडी मारून काठावर येतात की आग विझवून मग येतात आणि हे सगळे रोहन कपूर शिवायही ती करू शकली असती वगैरे एकदा पाहताना नीट समजले नाही.
एकतर बहुतांश निर्मनुष्य गाव. त्यात सुनील दत्त व रोहन हे दोघेच घोडेस्वारी करतात. तरीही एकमेकांना ओळखत नाहीत. आता पोर्श वाल्यांचे क्लब असतात अगदी तसे नसेल पण तरी बाकी लोक जीप वगैरे चालवत असताना आपल्याखेरीज इथे एकचजण घोड्यावरून फिरतो, तो किमान माहीत असावा? दोघांनाही पत्ता नसतो.
तर रोहन-फराह मुख्य जोडी. यांचाही प्रेम-आयक्यू वरच्यांप्रमाणेच रानोमाळ हरवला आहे:
- एक फराह लेव्हलची सुंदर मुलगी तुमच्या गावात आहे. तुमचे वयच प्रेमात पडण्याचे आहे. अशा वेळेस ती मुलगी तुम्हाला लिटरली घोडेबाजारातच पहिल्यांदा माहीत होते
- दोघे प्रेमात पडल्यावर लपून म्हणून जेथे भेटतात ते लोकेशन असे आहे की एका चौरस मैलाच्या परिसरात कोठूनही ते सहज दिसतील.
- आणि अशा एखाद्या वेळी तुम्ही नवीन प्रेमाच्या अनावर ओढीने वगैरे भेटत आहात. पण त्या वेळी तुम्हाला दूर कोठेतरी एक बाई गाताना ऐकू येते. तेव्हा तुम्ही अनावर ओढीने भेटणे सोडून तो आवाज कोठून आला ते बघायला जाता.
कोण तुमचे प्रेम सिरीयसली घेणार आहे? त्यामुळे त्यांच्याकडे उगाच चकरा मारणार्या राजकिरणशी सुनील दत्त फराहचे लग्न लावून टाकतो. मात्र तोपर्यंत तिच्या जाम मागे असलेल्या राजकिरणचा तिच्यातला इण्टरेस्ट लग्न झाल्या झाल्या संपतो. त्याचे घरातच कोणाशीतरी अफेअर चालू असते. तो तिला कन्व्हिनियंटली मारहाणही करतो. मग ही घरी येते तेव्हा (तिचा भाऊ) फारूख शेखला शंका आल्यावर 'रडका चेहरा करून मी सासरी खूप खुष आहे हे सांगणे' हा टॉप क्लिशे सीन येतो.
पिक्चरची कथा नक्की का तशी घडते याचा पत्ता पिक्चर बघून लागत नाही. लोकांना उपरती अर्धा तास आधी झाली असती तर पिक्चर तासाभरात संपला असता
यात वातावरण कभी कभी व सिलसिला सारखे आहे. गाणी सुरू होतानाचे सीन्स व सुरू होणारे पार्श्वसंगीत पाहून तितके काहीतरी भारी ऐकायला मिळणार असे वाटते पण कोणतेतरी अगम्य गाणे सुरू होते. हा यश चोप्राचा ट्रान्झिशन फेज मधला पिक्चर आहे. सलीम-जावेद वाल्या पिक्चर्स चा काळ संपून चाँंदनी, लम्हे व नंतर शाखाचे पिक्चर सुरू होण्यापूर्वीचा. हीरोचे नाव विजय व हिरॉइनचे चाँदनी, हे पाहूनही तसेच वाटले
माझा मेंदू काय काय लक्षात ठेवतो, त्याचं मलाच नवल वाटतं. रोहन कपूर महेंद्र कपूरचा मुलगा आणि त्याचा फासले चित्रपट एवढं लक्षात आहे. बघितला असण्याचा प्रश्नच नाही.
फारेण्डचा हा अहवाल पुढे वाचायचाय.
असे चित्रपट आपण नाही पाहिले तर कोण पाहणार >>
मायनस इण्टेन्सिटी, संवादफेक आणि स्क्रीन प्रेझेन्स. >>> कुणाची ?
फारूख शेख व दीप्ती नवल हे त्याकाळी प्रेमाच्या दुनियेच्या "नाही-रे" वर्गातील पर्मनंट निवासी >>>
त्यामुळे आपलेपणा वाटतो
गपचूप म्हणजे इतके की ते बेडवर असताना रेखा गाणे अशा आवाजात म्हणते, की जेथून नाव वल्हवत यावे लागेल इतक्या लांब असलेल्या पाण्यापाशी उभे असलेल्या रोहन-फराहला बाजूच्या धबधब्याच्या आवाजातही तिचे गाणे ऐकू येते. >>> :हगहलो:
दोघे प्रेमात पडल्यावर लपून म्हणून जेथे भेटतात ते लोकेशन असे आहे की एका चौरस मैलाच्या परिसरात कोठूनही ते सहज दिसतील. >>
या दिसण्याच्या, ऐकण्याच्या काळज्या आहेत त्या अनुभवातून आल्यासारख्या वाटतात. पुण्यातल्या लोकांना झेड ब्रीज सुरक्षित ठिकाण वाटत असावे. बरोबर का फारेण्ड ? कि संभाजी बाग ?
ज्यांच्यावर अशी संकटं आली नाहीत त्यांना असे संकट आपल्यावर यावे असेच वाटणार. गेले आता ते दिवस, आता पुढच्या जन्मी चूक सुधारायची. धाडकन बोलून टाकायचं आणि काळज्या घ्यायच्या.
हा यश चोप्राचा ट्रान्झिशन फेज मधला पिक्चर आहे. >> यश चोप्रा मारामारी करू लागले तेच अमिताभ आणि सलीम जावेद मुळे संगत का असर. नंतर पुन्हा ते माणसात आले. दाग (द फायर नाही), कभी कभी, सिलसिला हे आधीचे सिनेमे आहेत. नूरी त्यांचाच आहे.
नूरी हा एकमेव पिक्चर असा आहे जी लव्ह स्टोरी आहे. बाकीची लफडी आहेत. स्टोरी सुरू कुठून होईल आणि कुठे जाईल हे त्यांना सुद्धा माहीत नसावं असे पिक्चर आहेत. विशेषतः लम्हें, चांदनी.
फारेंड, लौलित्याने ओतप्रोत भरलेला हा प्रतिसाद वाचून रविवार सकाळची मस्त सुरुवात झाली.. हा हा हा. अजूनही हसत आहे..
>> एकाच घरात राहूनही उच्चाराशिवाय किंवा क्लिशे शिवाय प्रेम आहे याचा पत्ता नसणे <<
जरा विचार केला असता असे केवळ प्रेमाबद्दलच असते असे नव्हे हे जाणवलं. एकूणच काही क्लिशे हे सत्यच असतात. म्हणून हे चित्रपट असेच सुचले असावेत आणि तसेच पब्लिकला पटले देखील असावेत..
फा
धुरंधर -२ बघायची इच्छा होती पण तिच्यावर फासलें बघायच्या इच्छेने मात केली आहे. आदित्य धर रागवेल तुझ्यावर त्याचं कलेक्शन कमी झालं तर.
रोहन कपूर कोण इथपासून सुरूवात आहे त्यामुळे मजा येणार हे नक्की.
फक्त याचा वेगळा धागा काढला तर बरं होईल.
फा, जबरदस्त ! उर्दू गटणे परिच्छेद तर कहर आहे.
फारूख शेख आणि दीप्ती नवल दोघेही फार आवडतात मला. त्यांचं सुद्धा असं झालं. मला रोहन कपूर माहिती होता आणि आठवतही होता. हेच डोकं अभ्यासात वापरलं असतं तर आज कुठल्याकुठे गेले असते पण येथे हे टाईप करतेय.
सध्या नेटफ्लिक्सवर यश चोप्रा आणि डायनासोरचाच सुळसुळाट आहे. मी दोन डायनासोरचे पाहिले आता चोप्रा कडे वळू की काय!
बाकी परीक्षण वाचून यश चोप्रांना कमर्शिअल चित्रपट निर्माण करायचा होता की प्रायोगिक अशी शंका येते. जिंदगी जब भी तेरी बज्म मे म्हणणारा फारुख शेख फ्लर्ट? हे म्हणजे इफ्तिकारला लंपट ठाकूरच्या भुमिकेत पाहण्यासारखे आहे. आणि नेहमी सेल्फ अश्युअर्ड वाटणारी दीप्ति नवल आकाच्या भुमिकेत? चलो एक बार फिर से म्हणणाऱ्या सुनील दत्तचे विबासं? परीत्यक्ता महिलांचा आधारस्तंभ राजकिरणचे विबासं? काय चाल्लंय काय?
त्यातल्या त्यात रेखाला वो असण्याची हातखंडा भुमिका दिली आहे का? आणि शिकारा घेऊन रात्री बेरात्री कोण फिरतं? रेखा की फराह? त्यावर ‘पानी मे कैसी ये आग लगायी’ची व्हॅलिडिटी ठरेल. फराह स्वतःच भिजलेल्या कागदासारखी. तिच्याच्याने काय आग लागणार?
अस्मिता डायनासोर काय किंवा फासले काय? काहीही बघितलंस तरी शेवटी फॉसिल्स. फार चॉईस नाही तुला इथे.
हा सिनेमा आम्ही ठाण्याहून ग्रँट रोडला जाऊन थेट्रात पाहिला होता. का? तर त्या थेट्राचं रिनोव्हेशन झालं होतं आणि इंटिरिअर खूप छान केलं होतं, ते आमच्या सिनेमा-प्रेमी बाबांना बघायचं होतं.
'फांसले'तली एकच गोष्ट आवडते - 'हम चुप हैं के दिल सुन रहें हैं' हे गाणं :बदामः
Submitted by ललिता-प्रीति on 23 March, 2026 - 00:19
गावात विराट हिंदू समेलन भरलेलं आहे >>> याचा सुड म्हणून तुम्ही (आवडला तरीही) विराट हिंदू संमेलनवाल्यांना धुरंधर टुकार आहे असं सांगा. तबलिगी जमातवाल्यांना काही सांगू नका.
आणि उरलेल्या लोकांनी गॅस की किल्लत के कारण शीरखूर्मा कमी प्रमाणात बनवला का याचा शोध घेऊन सोमिवर व्हिडीओ टाका किंवा उघडा डोळे बघा नीट वगैरे चॅनेल्सना बातमी पुरवा. पण त्या आधी गेल्या वर्षी फराळाचा डबा दिलेला का हे आठवा.
कथा' फार लहानपणी पाहिलाय. आता आठवत नाही. पण फारूख शेख मला नेहमी वर्गात पहिल्या बेंचवर बसून शिक्षकांचं सगळं ऐकणाऱ्या गुणी विद्यार्थ्यांसारखा वाटतो. आता कथा बघितला पाहिजे.
अंजू , यावरून त्या काळातली आणखी एक आठवण. गोविंदा फरहाचा तनबदन नावाचा पिच्चर होता. त्यात गोविंदानेच तनबदन दाखवलं होतं यावर तेव्हाच्या मायापुरी वा तत्सम मॅगॅझिनमध्ये (ही केशकर्तनालयात वाचायला मिळत) मुखपृष्ठावरच जहाल कमेंट होती.
"बिनकामाचा नवरा"-> +++++++++
"बिनकामाचा नवरा"-> ++++++++++११११११११११११११११११११११११११
>>>>संजय दत्त पहिल्या
>>>>संजय दत्त पहिल्या सिनेमातही बोअर वाटलेला
अगदी अगदी!
धुरंदर पाहिला
धुरंदर पाहिला
पहिला आवडला असेल तर हा आवडेलच.
ऍक्शन अक्टिंग अदाकारी जुन्या गाण्यांचा वापर वगैरे वगैरे..
शेवटच्या ट्विस्टबद्दल फार ऐकून गेलेलो. त्यामुळे तो काय असेल याचा अंदाज मध्येच बांधला आणि तोच खरा निघाला. म्हणजे काही आऊट ऑफ द बॉक्स नव्हता. जसे त्या बास्टर्ड ऑफ बॉलीवूडमध्ये होता.
अक्षय खन्नाचे गाजलेले अरेबिक गाण्यातील सेम सीन दीदी गाणे घेऊन रणवीर सिंग वर चित्रीत केले पण त्यात मजा नाही आली.
बाकी बघा..
चार तास पिक्चर बघण्यात राहिलेली झोप पूर्ण करतो आधी.. म्हटले तर चार तास तसा कंटाळा आला नाही. पण चित्रपट अजून अर्धा तास कमी करता आला असता.
आणि हो चित्रपटात प्रोपगंडा तर आहे. मोदी भाजपा अगदीच नावडते असतील तर थिएटर मध्ये बघायला जाऊ नका. काही सीन वर लोकं ओरडतात तेव्हा जीवाला त्रास होईल
प्रोपॅगंडा आवडत नसलेल्यानी
प्रोपॅगंडा आवडत नसलेल्यानी काय करावे ?
विकु, स्क्रीनवर मोदी आले आणि
विकु, स्क्रीनवर मोदी आले आणि आपल्याला हसू आलं तर आजूबाजूचे प्रेक्षक आपल्याला मारतील का?
आजूबाजूचे प्रेक्षक आपल्याला
आजूबाजूचे प्रेक्षक आपल्याला मारतील का?>>> आपल्या जबाबदारीवर हसा
बाकी as usual this part is also banned in middle east. But we have thrill with actual war. No need for this fake thrill
धुरंधर २ हिट होऊ नये
धुरंधर २ हिट होऊ नये म्हणूनच इराण इस्त्राएल युद्ध सुरू केलं.
किती जळावं शांतीप्रेमी लोकांनी ?
>>पहिला आवडला असेल तर हा
>>पहिला आवडला असेल तर हा आवडेलच.<<
ऋन्म्या, माधवनची एंट्रि (सिगरेट शिलगावत जिन्यावरुन चढताना) कशी वाटली? गाड्या उडवणे नाहि, हेलिकॉप्टर लँडिंग नाहि.. कोल्ड यट फरोश्यस, त्रिशुलच्या बच्चन स्टाइलमधे...
अहो एक लेखक मी अबुधाबीत रहातो
अहो एक लेखक मी अबुधाबीत रहातो म्हणून तस लिहिलय. असो.
...
मनदरडी, स्वतंत्र कमेण्ट
मनदरडी, स्वतंत्र कमेण्ट म्हणून बघा.
@ राज,
@ राज,
माधवन एन्ट्री आणि अभिनय 1 नंबर.
गेल्यावेळी सुद्धा त्याने भारी अदाकारी दाखवली होती. पण तेव्हा त्याची बाजू पडती होती. या भागात Revenge असल्याने बॉडी लँग्वेजमध्ये तशीच ठसन दाखवता आली.
@ विकु
प्रोपॅगंडा आवडत नसलेल्यानी काय करावे?
>>>>
मलाही आवडत नाही. पण मला तो टाळून, त्या प्रभावाखाली न येता चित्रपट बघता येतो
मी धुरंधर १ पाहिला. खूप रटाळ
मी धुरंधर १ पाहिला. खूप रटाळ वाटलेला.
नंतर मी शतक पाहिला.
मला धुरंधर १ आवडला असे वाटू लागले.
काल गुढीपाडव्याला गावात अग्निशमन दलाने आणि होम गार्ड्स यांनी संचलन केले. (?) एक माणूस म्हणा उद्या ईद आहे म्हणून हे चालले आहे. मी म्हणालो या आधी गावात असे वातावरण कधीच नव्हते. तो म्हणाला खूळ लागले का? कुठून आला आहेस शहाण्या?
मग मी धुरंधर २ पाहिला.
मग मला दोन्ही आवडले.
नंतर कळालं की रमजान ईद च्या दिवशीच गावात विराट हिंदू समेलन वगैरे भरवले आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून नगरपरिषदेच्याच या लोकांनी हे सगळे केले होते. संचलन वगैरे.
मग ६ जणांच्या घरी शिरखुर्मा पिल्यावर मला पुन्हा दोन्ही चित्रपट रटाळ वाटले.
शिरखुरम्याचे दोन प्रकार असतात. त्यावरून त्या घराची सुबत्ता कळते.
१. भरपूर दुधात खूप ड्राय फ्रूट्स घालून बारीक शेवया घालून केलेल्या.
२. खोबरे वगैरे पेरून गूळ आणि गहू यांची केलेली खीर.
मला दुसरी फार फार आवडते.
ती तिघांकडे प्यायला मिळाली.
त्यानंतर मला जाणवले की यावेळेस अगदी कमी जणांकडून बोलावणे आले होते. पूर्वी किमान १५ घरे तरी व्हायचीच. आणि घरी डबे देखील यायचे.
यावेळेस फक्त ६ आणि घरी एकही डबा नाही.
मला खूप वाईट वाटत आहे की दोन्हीकडून प्रचंड ध्रुवीकरण झालेले आहे. ते दबून आणि सावध वागत आहे. शिवाय त्यांच्यात देखील तबलीगी जमात ने इतके खोलवर हातपाय पसरले आहेत की माझ्या आजू बाजूचे भले भले लोक दाढ्या वाढवून आणि घोट्यांच्यावर लेंगे घालून विद्रूप होऊन हिंडत आहेत.
म्हणून परत धुरंधर आवडून घ्यावे म्हंटले तर गावात विराट हिंदू समेलन भरलेलं आहे त्याचे फोटो दिसले. त्यामुळे "धुरंधर १ आणि २ - एक आवडणे" लांबणीवर पडले आहे.
Gandhi Talks बघितला. वेगळा
Gandhi Talks बघितला. वेगळा प्रयत्न म्हणुन एकदा बघण्यासारखा आहे. मला sethupathi आवडतो आणि त्याने कामही बर केलय. अरविंद स्वामी ही ok. मुलाखतीत gandhi talks म्हणजे पैसा बोलता हैं, असे दिग्दर्शकाने सांगितले होते. पण तसे फारसे दिसले नाही. म्हणजे श्रीराम राघवनच्या Johny Gaddar किंवा Badlapur जसा सिनेमा पैश्याभोवती फिरतो, त्यामानाने जरा विस्कळित वाटतो. कदाचित मी वेगळी अपेक्षा ठेवून बघीतला असेन. Background score A R rehman चा आहे
नेफिवर यश चोप्राचे अनेक
नेटफ्लिक्सवर यश चोप्राचे अनेक पिक्चर आलेले आहेत. त्यातला एक "फासले". रमड ने यात काहीच पाहण्यासारखे नाही लिहील्यामुळे असे चित्रपट आपण नाही पाहिले तर कोण पाहणार अशा चॅरिटेबल हेतूने पाहिला. पुढे पुढे बोअर असला तरी नेटाने पाहिला.
सुनील दत्त, फराह, फारूख शेख, रोहन कपूर, रेखा आणि राजकिरण. हिमालय ते स्विस आल्प्स या रेंज मधे कोठेतरी असलेले बर्फाळ प्रदेशातील गाव.
तुम्हाला कभी कभी मधे राखीचे लग्न होते तेव्हा तेथेच रस्त्यापलिकडे अमिताभ प्रेमभंग अवस्थेत दु:खी रागीट चेहरा करून उभा असलेला आठवतो का? यातील अर्ध्या सीन्स मधे रोहन कपूर तसा उभा आहे. मायनस इण्टेन्सिटी, संवादफेक आणि स्क्रीन प्रेझेन्स. तसा तो अभिनय काही वाईट करत नाही, दिसतोही ठीकठाक. पण टोटल उर्दू गटणे. चार पावसाळे पाहिलेल्या व्यक्तीसारखा उर्दू संवाद म्हणतो. तोच काय, इतरही तसेच बोलतात. किंबहुना स्क्रीनप्ले, दिग्दर्शन, ड्रामा या ऐवजी संवाद वापरले आहेत. बर्याचदा अभिनयाऐवजी सुद्धा. फराह सुरूवातीच्या २-३ पिक्चर्स मधे खूप सुंदर दिसली होती. यातही तशीच दिसते.
रोहन-फराह, सुनील दत्त-रेखा आणि फारूख शेख-दीप्ती नवल अशा तीन जोड्या आहेत. सर्वांच्याच प्रेमाच्या आयक्यूबद्दल दारूण परिस्थिती आहे.
- फारूख शेख व दीप्ती नवल हे त्याकाळी प्रेमाच्या दुनियेच्या "नाही-रे" वर्गातील पर्मनंट निवासी असलेले लोक इथे "आहे-रे" वर्गात आहेत. हे एक नावीन्य. फारूख शेख फ्लर्ट दाखवला आहे. तुमको देखा तो ये खयाल आया गाण्यात 'आज फिर दिलने एक तमन्ना की' म्हणताना त्याने जी काय तमन्ना केली असेल ते सगळे यश चोप्राने त्याच्या कॅरेक्टरला देऊन टाकले आहे. तो आणि (सुनील दत्तने सांभाळलेली) दीप्ती नवल एकाच घरात राहात असतात. पण फारूख शेखला तिच्या साधीभोळी मीरा तुला कळली नाही टाइप प्रेमाचा पत्ता नसतो. मात्र एकदा तो जखमी असताना (म्हणजे कपाळावर पट्टी) त्याच्या बेडच्या बाजूला ती सोबत म्हणून बसलेली बघून व तिच्याकडच्या ड्रॉइंग बुक मधे तिचे व त्याचे तिने एकत्र काढलेले चित्र बघून त्याला साक्षात्कार होतो. व नंतर काही मिनिटांतच तो तिच्याशी लग्न करायचे ठरवतो.
- सुनील दत्त व रेखा यांचे अफेअर असते. पहिली पत्नी मेल्यावर याने दुसरे लग्न केलेले नसते. पण रेखाशी अफेअर असते व ते गपचूप भेटत असतात. गपचूप म्हणजे इतके की ते बेडवर असताना रेखा गाणे अशा आवाजात म्हणते, की जेथून नाव वल्हवत यावे लागेल इतक्या लांब असलेल्या पाण्यापाशी उभे असलेल्या रोहन-फराहला बाजूच्या धबधब्याच्या आवाजातही तिचे गाणे ऐकू येते. तिचे सुनील दत्तबरोबरचे संवाद म्हणजे अशा स्त्रीने फार कटकट न करता राहावे असे वाटणार्याने जर तिचे संवाद लिहीले तर ते जसे असतील तसे आहेत. म्हणजे मला लग्नाची काय गरज आहे, तुझे प्रेम आहे ते बास आहे, मी एकटी सुखाने राहते वगैरे वगैरे.
तिला रात्री पाण्यात एका शिकार्यात बसून फिरायची सवय असते. एकदा रोहन पाण्याजवळ असताना तिच्या शिकार्याला आग लागते. त्यातून ते नक्की कसे वाचतात, पाण्यात उडी मारून काठावर येतात की आग विझवून मग येतात आणि हे सगळे रोहन कपूर शिवायही ती करू शकली असती वगैरे एकदा पाहताना नीट समजले नाही.
एकतर बहुतांश निर्मनुष्य गाव. त्यात सुनील दत्त व रोहन हे दोघेच घोडेस्वारी करतात. तरीही एकमेकांना ओळखत नाहीत. आता पोर्श वाल्यांचे क्लब असतात अगदी तसे नसेल पण तरी बाकी लोक जीप वगैरे चालवत असताना आपल्याखेरीज इथे एकचजण घोड्यावरून फिरतो, तो किमान माहीत असावा? दोघांनाही पत्ता नसतो.
तर रोहन-फराह मुख्य जोडी. यांचाही प्रेम-आयक्यू वरच्यांप्रमाणेच रानोमाळ हरवला आहे:
- एक फराह लेव्हलची सुंदर मुलगी तुमच्या गावात आहे. तुमचे वयच प्रेमात पडण्याचे आहे. अशा वेळेस ती मुलगी तुम्हाला लिटरली घोडेबाजारातच पहिल्यांदा माहीत होते
- दोघे प्रेमात पडल्यावर लपून म्हणून जेथे भेटतात ते लोकेशन असे आहे की एका चौरस मैलाच्या परिसरात कोठूनही ते सहज दिसतील.
- आणि अशा एखाद्या वेळी तुम्ही नवीन प्रेमाच्या अनावर ओढीने वगैरे भेटत आहात. पण त्या वेळी तुम्हाला दूर कोठेतरी एक बाई गाताना ऐकू येते. तेव्हा तुम्ही अनावर ओढीने भेटणे सोडून तो आवाज कोठून आला ते बघायला जाता.
कोण तुमचे प्रेम सिरीयसली घेणार आहे? त्यामुळे त्यांच्याकडे उगाच चकरा मारणार्या राजकिरणशी सुनील दत्त फराहचे लग्न लावून टाकतो. मात्र तोपर्यंत तिच्या जाम मागे असलेल्या राजकिरणचा तिच्यातला इण्टरेस्ट लग्न झाल्या झाल्या संपतो. त्याचे घरातच कोणाशीतरी अफेअर चालू असते. तो तिला कन्व्हिनियंटली मारहाणही करतो. मग ही घरी येते तेव्हा (तिचा भाऊ) फारूख शेखला शंका आल्यावर 'रडका चेहरा करून मी सासरी खूप खुष आहे हे सांगणे' हा टॉप क्लिशे सीन येतो.
पिक्चरची कथा नक्की का तशी घडते याचा पत्ता पिक्चर बघून लागत नाही. लोकांना उपरती अर्धा तास आधी झाली असती तर पिक्चर तासाभरात संपला असता
यात वातावरण कभी कभी व सिलसिला सारखे आहे. गाणी सुरू होतानाचे सीन्स व सुरू होणारे पार्श्वसंगीत पाहून तितके काहीतरी भारी ऐकायला मिळणार असे वाटते पण कोणतेतरी अगम्य गाणे सुरू होते. हा यश चोप्राचा ट्रान्झिशन फेज मधला पिक्चर आहे. सलीम-जावेद वाल्या पिक्चर्स चा काळ संपून चाँंदनी, लम्हे व नंतर शाखाचे पिक्चर सुरू होण्यापूर्वीचा. हीरोचे नाव विजय व हिरॉइनचे चाँदनी, हे पाहूनही तसेच वाटले
माझा मेंदू काय काय लक्षात
माझा मेंदू काय काय लक्षात ठेवतो, त्याचं मलाच नवल वाटतं. रोहन कपूर महेंद्र कपूरचा मुलगा आणि त्याचा फासले चित्रपट एवढं लक्षात आहे. बघितला असण्याचा प्रश्नच नाही.
फारेण्डचा हा अहवाल पुढे वाचायचाय.
असे चित्रपट आपण नाही पाहिले
असे चित्रपट आपण नाही पाहिले तर कोण पाहणार >>
कुणाची ? 

मायनस इण्टेन्सिटी, संवादफेक आणि स्क्रीन प्रेझेन्स. >>>
फारूख शेख व दीप्ती नवल हे त्याकाळी प्रेमाच्या दुनियेच्या "नाही-रे" वर्गातील पर्मनंट निवासी >>>
त्यामुळे आपलेपणा वाटतो
गपचूप म्हणजे इतके की ते बेडवर असताना रेखा गाणे अशा आवाजात म्हणते, की जेथून नाव वल्हवत यावे लागेल इतक्या लांब असलेल्या पाण्यापाशी उभे असलेल्या रोहन-फराहला बाजूच्या धबधब्याच्या आवाजातही तिचे गाणे ऐकू येते. >>> :हगहलो:
दोघे प्रेमात पडल्यावर लपून म्हणून जेथे भेटतात ते लोकेशन असे आहे की एका चौरस मैलाच्या परिसरात कोठूनही ते सहज दिसतील. >>
या दिसण्याच्या, ऐकण्याच्या काळज्या आहेत त्या अनुभवातून आल्यासारख्या वाटतात. पुण्यातल्या लोकांना झेड ब्रीज सुरक्षित ठिकाण वाटत असावे. बरोबर का फारेण्ड ? कि संभाजी बाग ?
ज्यांच्यावर अशी संकटं आली नाहीत त्यांना असे संकट आपल्यावर यावे असेच वाटणार. गेले आता ते दिवस, आता पुढच्या जन्मी चूक सुधारायची. धाडकन बोलून टाकायचं आणि काळज्या घ्यायच्या.
हा यश चोप्राचा ट्रान्झिशन फेज
हा यश चोप्राचा ट्रान्झिशन फेज मधला पिक्चर आहे. >> यश चोप्रा मारामारी करू लागले तेच अमिताभ आणि सलीम जावेद मुळे संगत का असर. नंतर पुन्हा ते माणसात आले. दाग (द फायर नाही), कभी कभी, सिलसिला हे आधीचे सिनेमे आहेत. नूरी त्यांचाच आहे.
नूरी हा एकमेव पिक्चर असा आहे जी लव्ह स्टोरी आहे. बाकीची लफडी आहेत. स्टोरी सुरू कुठून होईल आणि कुठे जाईल हे त्यांना सुद्धा माहीत नसावं असे पिक्चर आहेत. विशेषतः लम्हें, चांदनी.
फारेंड, लौलित्याने ओतप्रोत
फारेंड, लौलित्याने ओतप्रोत भरलेला हा प्रतिसाद वाचून रविवार सकाळची मस्त सुरुवात झाली.. हा हा हा. अजूनही हसत आहे..
>> एकाच घरात राहूनही उच्चाराशिवाय किंवा क्लिशे शिवाय प्रेम आहे याचा पत्ता नसणे <<
जरा विचार केला असता असे केवळ प्रेमाबद्दलच असते असे नव्हे हे जाणवलं. एकूणच काही क्लिशे हे सत्यच असतात. म्हणून हे चित्रपट असेच सुचले असावेत आणि तसेच पब्लिकला पटले देखील असावेत..
फा
फा
धुरंधर -२ बघायची इच्छा होती पण तिच्यावर फासलें बघायच्या इच्छेने मात केली आहे. आदित्य धर रागवेल तुझ्यावर त्याचं कलेक्शन कमी झालं तर.
रोहन कपूर कोण इथपासून सुरूवात आहे त्यामुळे मजा येणार हे नक्की.
फक्त याचा वेगळा धागा काढला तर बरं होईल.
फा Lol = फा हासले = फा सले
फा Lol = फा हासले = फा सले ( हा सायलेण्ट)
फारएण्डला सतत अशा कमेण्टस येत असल्याने आपोआप फासले सुचवला असेल युट्यूबने.
फा प्रत्येक वाक्याला हसले
फा प्रत्येक वाक्याला हसले

फा, जबरदस्त ! उर्दू गटणे
फा, जबरदस्त !
उर्दू गटणे परिच्छेद तर कहर आहे.
मला रोहन कपूर माहिती होता आणि आठवतही होता. हेच डोकं अभ्यासात वापरलं असतं तर आज कुठल्याकुठे गेले असते पण येथे हे टाईप करतेय. 
फारूख शेख आणि दीप्ती नवल दोघेही फार आवडतात मला. त्यांचं सुद्धा असं झालं.
सध्या नेटफ्लिक्सवर यश चोप्रा आणि डायनासोरचाच सुळसुळाट आहे. मी दोन डायनासोरचे पाहिले आता चोप्रा कडे वळू की काय!
@भरत >>>> महेंद्र कपूर कोण?
@भरत >>>> महेंद्र कपूर कोण? गायक महेंद्र कपूर का?
बाकी परीक्षण वाचून यश चोप्रांना कमर्शिअल चित्रपट निर्माण करायचा होता की प्रायोगिक अशी शंका येते. जिंदगी जब भी तेरी बज्म मे म्हणणारा फारुख शेख फ्लर्ट? हे म्हणजे इफ्तिकारला लंपट ठाकूरच्या भुमिकेत पाहण्यासारखे आहे. आणि नेहमी सेल्फ अश्युअर्ड वाटणारी दीप्ति नवल आकाच्या भुमिकेत? चलो एक बार फिर से म्हणणाऱ्या सुनील दत्तचे विबासं? परीत्यक्ता महिलांचा आधारस्तंभ राजकिरणचे विबासं? काय चाल्लंय काय?
त्यातल्या त्यात रेखाला वो असण्याची हातखंडा भुमिका दिली आहे का? आणि शिकारा घेऊन रात्री बेरात्री कोण फिरतं? रेखा की फराह? त्यावर ‘पानी मे कैसी ये आग लगायी’ची व्हॅलिडिटी ठरेल. फराह स्वतःच भिजलेल्या कागदासारखी. तिच्याच्याने काय आग लागणार?
अस्मिता डायनासोर काय किंवा फासले काय? काहीही बघितलंस तरी शेवटी फॉसिल्स. फार चॉईस नाही तुला इथे.
फारएन्ड मस्त लिहिलंय.
फारएन्ड मस्त लिहिलंय
रोहन कपूर, गायक महेंद्र कपूरचा मुलगा. भरत मलाही पटकन तेच आठवलं.
तो और इस दिलमे क्या रखा है गाण्यातही आहे. संजय दत्त, फरहा आणि हा, तीन ठोकळे एका गाण्यात आहेत असं माझं पर्सनल मत. बाकी गाणं मस्त आहे, मला खूप आवडतं.
रोहन कपूरचे त्यावेळी दोन चित्रपट आलेले, ते ही फरहा बरोबर.
धमाल पोस्ट आहे फारएण्ड.
धमाल पोस्ट आहे फारएण्ड.
फांसले पोस्ट
फांसले पोस्ट
हा सिनेमा आम्ही ठाण्याहून ग्रँट रोडला जाऊन थेट्रात पाहिला होता. का? तर त्या थेट्राचं रिनोव्हेशन झालं होतं आणि इंटिरिअर खूप छान केलं होतं, ते आमच्या सिनेमा-प्रेमी बाबांना बघायचं होतं.
'फांसले'तली एकच गोष्ट आवडते - 'हम चुप हैं के दिल सुन रहें हैं' हे गाणं :बदामः
गावात विराट हिंदू समेलन
गावात विराट हिंदू समेलन भरलेलं आहे >>> याचा सुड म्हणून तुम्ही (आवडला तरीही) विराट हिंदू संमेलनवाल्यांना धुरंधर टुकार आहे असं सांगा. तबलिगी जमातवाल्यांना काही सांगू नका.
आणि उरलेल्या लोकांनी गॅस की किल्लत के कारण शीरखूर्मा कमी प्रमाणात बनवला का याचा शोध घेऊन सोमिवर व्हिडीओ टाका किंवा उघडा डोळे बघा नीट वगैरे चॅनेल्सना बातमी पुरवा. पण त्या आधी गेल्या वर्षी फराळाचा डबा दिलेला का हे आठवा.
माझेमन, फारुख शेखने 'कथा
माझेमन, फारुख शेखने 'कथा'मध्ये भरपूर फ्लर्टिंग (आणि अजून बरंच काही ;-)) केलंय, तेही दीप्ती नवल (आणि मल्लिका साराभाई) बरोबर! मस्त सिनेमा आहे तो एक.
फारएण्ड, 'फासले'वरची पोस्ट मस्त!
कथा' फार लहानपणी पाहिलाय. आता
कथा' फार लहानपणी पाहिलाय. आता आठवत नाही. पण फारूख शेख मला नेहमी वर्गात पहिल्या बेंचवर बसून शिक्षकांचं सगळं ऐकणाऱ्या गुणी विद्यार्थ्यांसारखा वाटतो. आता कथा बघितला पाहिजे.
अंजू , यावरून त्या काळातली

Pages