चित्रपट कसा वाटला १२

Submitted by धनि on 4 August, 2025 - 10:36

२००० झाले पण Lol

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/86233?page=66#new

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी फासले थेटरात जाऊन पाहिला होता…

'फांसले'तली एकच गोष्ट आवडते - 'हम चुप हैं के दिल सुन रहें हैं' हे गाणं :>>>>
मलाही हे गाणे खुप आवडते.

गाणं बघितलं. तो रोहन कपूर थोडासा विनोद मेहरा + शशी कपूर + शाहिद कपूर वाटतो आणि वान्नाबी अमिताभसारखे कपडे घालतो आणि हात खिश्यात ठेवून उभा राहतो. मॉडेल म्हणून चालला असता.

फारएण्ड म्हणतो तसं काहीतरी भन्नाट ऐकायला मिळेल अशी आशा वाटते पण भ्रमनिरास होतो.

माझेमन (हे लिहिताना जानेमन लिहिल्याचा फील येतोय :-))
कथा प्लिज परत बघ . अफलातून सिनेमा आहे . मला फार आवडतो . फील गुड पिक्चर.
बाय द वे आपण rmd च्या गटग ला भेटलो ना ?

बॉर्डर २ सुरू केला.बहुतेक मायबोलीवर बरेच जण बघत असावेत म्हणून हा सर्वात वर दिसतोय.

पोलिटिकली मोटिवेटेड मूवीजचं आता अजीर्ण झाल्याने कुठलाही चांगला वाटेल. त्या मानाने सत्य परिस्थितीवर, युद्धावर असलेला सिनेमा बरा. पण आता अशा युद्धपटातले संवाद खूप चीप वाटतात. बॉण्डपटावरून काढलेल्या कोणत्याही हेरपटात असावे तसे.

हा संवाद बघा.

" सर मैने सारे एअरक्राफ्टस चेक किये "
" गुड ! क्या रिपोर्ट है ?"
" सर छह ऑपरेशनल है "
आता टेबलावर वरिष्ठ अधिकारी म्हणून बसलेला माणूस गंभीर झाल्याचा आव आणतो.
" सिर्फ छह ?"
" हां सर "
" छह से क्या होगा ?"
" सर छह बहोत कम है "
" अरग हमे श्रीनगर कि रक्षा करनी है, तो और एअरक्राफ्टस कि जरूरत होगी "

हा वरिष्ठ अधिकारी ज्युनिअर सोबत अशा गप्पा हाणतोय.

सन्नीचं वय दिसतं युनिफॉर्म मधे, पण साहेबाच्या केबिनमधे पण ओरडून संवाद म्हणतोच. लागलीच क्वार्टर मधे बंद केलं असतं खर्‍या आयुष्यात.
सुबोध खरे इकडे फिरकत नाहीत तेच बरं.

रोहन कपूर अन् गोविंदा 'लव्ह 86' मध्ये होते
समोर बहुदा फराह आणि नीलम असाव्या

>>> एस्स! तेव्हा खूप हवा होती या सिनेमाची

फासले, लव ८६ बद्दल ऐकले नाही.
इल्जाम आणि "तू रूठा तो मै रो दूंगी सनम" हे माहीत आहेत.

बॉर्डर २ आला का? मग धुरंधर २ पण येईल लवकर.

बॉर्डर २ खूपच कंटाळवाणा आणि रटाळ झालाय. काही तुकडे चांगले तेव्हढ्यासाठी साडेतीन तासाचा पिक्चर बघण्यात अर्थ नाही. करायला गेला तुका झाला माका. बघायचाच असेल तर दोन तासाच्या पुढे बघा. पहिले दोन तास पूर्ण स्किप करा. ग्राफिक्सचा कंटाळा आला.

मर्दानी ३ चे रिव्ह्यूज वाईट होते , पण आवडतोय. भयानक आहे कथानक. बिल गेटसचं नाव अशा प्रकरणात वाचलंय. खखोदेजा.

जाने जान सुरू केलाय आता. एरव्ही कधी बघून नसते झाले अशा मूव्हीजचा धडाका सुरू आहे.

जाने जान सर्वांची कामं खूप आवडली. कमाल केलीय ती जयदीप अहलावतने. कसला अफाट आणि अचाट अ‍ॅक्टर आहे.
त्याच्यासाठी बघायलाच पाहीजे. मर्डर मिस्टॄ आहे पण..

स्पॉईलर अ‍ॅलर्ट
शेवट उलगडतो तो कहानी १, २ च्या तंत्राने. पण अगदी शेवटी जो शेवट केला आहे तो टाळला असता तर दुसर्‍या एका पिक्चरचा प्लॉट उचललाय असे वाटले नसते.

बॉर्डर २ खूपच कंटाळवाणा आणि रटाळ झालाय.
>>
परवा बॉर्डर 1 लावला. भयानक बोअर झालं.
सगळ्यांच्या ओव्हर ॲक्टिंग ची स्पर्धा चालू असल्यासारखं होतं.

ओव्हर ऍक्टिंगच नव्हे तर कथानकात घुडसलेले असे ओव्हर उमाळे सुद्धा होते.
लहानपणी आपल्याकडे क्रिकेट खेळायला येऊन आपल्या ग्राऊंडला नंतर नावे ठेवली म्हणुन भांडण झाल्याचे आठवते.

जाने जान खरेच मस्त आहे. मला खुप आवडलेला. सर्वात प्रथम येणार्‍या दृष्याचा - अहलावत फास लाऊन घ्यायची तयारी करत असतो - संदर्भ सगळ्यात शेवटी कळला.

Srd
मूकपटांच्या links
F.W.Murnau - The Last Laugh(Der letzte Mann) - 1924 - (4K VINTAGE GERMAN EXPRESSIONIST MOVIE)
https://www.youtube.com/watch?v=Djqmwlj3ZqQ
Le Voyage dans la Lune (1902) - Georges Méliès - (HQ) - Music by David Short - Billi Brass Quintet
https://www.youtube.com/watch?v=ZNAHcMMOHE8&list=RDZNAHcMMOHE8&start_rad...
Nosferatu (1922) | HD | Full Horror
https://www.youtube.com/watch?v=dCT1YUtNOA8
(4K FULL MOVIE SUB ENG)Robert Wiene - The Cabinet of Dr. Caligari (1920)
https://www.youtube.com/watch?v=gEpAFK8mLuI
Enjoy!

धुरंधर-२ काल बघितला.
मला अगदीच रटाळ वाटला. धुरंधर-१ मला आवडलेला. २ मध्ये कथा, पटकथा, संवाद सगळंच गंडलेलं आहे. हिंसा आणि गोर दृष्ये भरपूर असुनही ती अजिबातच अंगावर येत नाहीत. भिती, किळस, घृणा, राग, चीड हे सगळं मेंदुत तयार झालं पाहिजे. नुसतं डोळ्याला दिसून त्यात काहीच मजा येत नाही. रणवीर सिंग चांगलाच आहे पण पहिल्यात तो जसा स्क्रीन व्यापुन होता तसा तो यात नाही. खुजा वाटला मला. त्याला फ्री हँड मिळाल्यावर चेकमार्क खून करतो ते तर बोर झालं. केले बाबा ५० खून, चला पुढे. त्यात ना धक्का ना काही एंटरटेनमेंट!

गाणी तर मला काहीच लक्षात नाहीत. तुझसे नैना भरे आणि त्यावरचा सतारीचा पीस छान आहे, त्याचा म्युझिक स्कोरही छान आहे. बाकी गदारोळात त्या हिंसेशी मी जोडलाच गेलो नाही त्यामुळे अलिप्त भाव येऊन रक्त सांडलं, डोस्कं कापलं, हातपाय कापले की जो रश आला पाहिजे, किंवा किळस, चीड आली पाहिजे त्यातलं काहीच झालं नाही. मॅटर ऑफ फॅक्टली हिंसा बघण्यासारखं बोर काही या जगात नाही. जॉन विक बघावा का? पार्ट ४ नेफ्लिवर आलाय दिसला.
बाकी प्रोपगंडा वगैरे हु केअर्स!
मला जे काही अपेक्षित होतं त्यामानाने अगदीच निराशा झाली.

गोविंदा नीलम माझी आवडती जोडी होती तेव्हा. पिक्चर्स tv वर आले कीच बघायचे, मुद्दाम थेटरात बघायला जात नव्हते, हत्या आठवतोय त्या दोघांचा. नीलम कसली बाहुली दिसायची, फार गोड. ईलजामच्या एका गाण्यात तर अगदी डॉल.

तनबदन आठवत नाहीये मला. तेव्हा गोविंदाचे लागोपाठ पिक्चर्स यायचे, नीलम बरोबरचे जास्त लक्षात राहीले बहुतेक.

कथा फार सुरेख चित्रपट आहे, थोडा स्लो वाटलेला तेव्हा. सई परांजपे यांचा आहे, ससा आणि कासव या कथेवर आधारित आहे (बहुतेक त्यांनीच लिहिलेली कथा) .

मला चष्मे बद्दूर फार आवडतो मात्र फारुख, दीप्तीचा. बघायला हवा परत. हम तुम एक कमरेमे बंद हो हे गाणं रेडिओवर लागलेले असतं आणि दीप्ती नवल सेल्सगर्ल असते, ती चमको नावाची साबण पावडर का काहीतरी विकायला आलेली असते आणि हा तिला घरात घेतो, हे गाणं लागल्यावर पटकन जाऊन दार उघडून ठेवतो, असा काहीतरी सीन अजून आठवतो, कसले हसलेलो आम्ही तेव्हा, एकदाच बघितलाय. मे बी काही संदर्भ चुकत असतील पण असंच आठवतंय.

अमितव,

मला धुरंधर २ मधली Destiny Mann Atkeya, Jaiye Sajna, main aur tu आवडली.
Music apps वर ऐकून बघितलीस का?

अन्जू चष्मे बद्दूर मस्त होता.

तिला तो धुतलेलाच टॅावेल धुवायला देतो.
ती आल्यावर त्या एका सेक्सी पोस्टर वर टॅावेल टांगून ठेवतो, तो टॅावेल मधेच पडतो वगैरे सीन मजेदार जमले होते…

लॉन्ड्रीतुन आणलेला शर्ट देतो. Happy

खरेच खुप मस्त होता. सई परांजपेच्या वाढदिवशी तिची मुलाखत परत ऐकवणार होते विविधभारतीवर पण मी दुर्दौवाने चुकवली Sad त्यात काली घोडी द्वार खडीचा उल्लेख होता.

ससा आणि कासव नावाचे नाटक होते, तिचेच असावे.

सख्खे शेजारी नाटक तर मस्तच होते. त्याला नाटक न म्हणता दुसरेच काहीतरी म्हणत असत. तिची टिम मस्त होती, ती, अरुण जोगळेकर, भुतनाथ (नाव बिसरले), चंदु पारखी वगैरे…

revue

अगं बाई, नभोनाट्य म्हणजे रेडिओवर सादर केलेले नाटक. रेडिओला नभोवाणीही म्हणतात. नभ/आकाशवाणी.

>>>>>>हिंसा आणि गोर दृष्ये भरपूर असुनही ती अजिबातच अंगावर येत नाहीत. भिती, किळस, घृणा, राग, चीड हे सगळं मेंदुत तयार झालं पाहिजे.
वाक्य आवडले. मार्मिक!!

सख्खे शेजारी दूरदर्शन वर गाजलेली मालिका होती. सई परांजपे यांचं त्यावेळी खूप काहींना काही असायचं. एक नंदिनी आत्मसिद्धची प्रमुख भूमिका बालकलाकार म्हणून, बालचित्रपट आठवतोय. नंतर नंदिनी आत्मसिद्ध शिकायला परदेशात गेली असं म टा त वाचलेलं. असे तुकडे तुकडे एकदम आठवतात.

सई यांनी अनेक हिंदी, मराठी मालिका केल्या, त्यांची मुलगी सुरेख काम करायची. संदीप कुलकर्णी बरोबर जोडी आवडायची मला, एक नाटकही केलेलं. पंछि हिंदी मालिका तसेच सख्खे शेजारी हिंदीतून केली अडोस पडोस तीही आठवते, आम्ही मुलं जाम एन्जॉय करायचो.

दोन्ही मुलं अभिनय उत्तम करतात. गौतम जोगळेकर हल्ली काही वर्षे दिसतो कुठेना कुठे.

मर्दानी 3 पाहिला
छान होता. आवडला. आधीचे दोन पाहिले नसल्याने त्यांच्याशी तुलना करू शकत नाही. पण आता हा बघून ते बघणे मस्ट आहे.

राणीची एन्ट्री बघून जवान आठवला. सेम कुठलीतरी जंगलातील एक फाईट, ज्यात तिथे शाहरुखची आणि इथे राणीची पूर्ण तोंडावर पट्टी बांधून एन्ट्री आणि हाणामारीत पट्टी उघडताच मुखदर्शन!
जवान v/s धुरंदर सारखे जवान v/ मर्दानी झाले माझे.

पण मर्दानीची व्हिलन अम्मा भारी होती. तिच्याकडे बघूनच भीती वाटत होती. क्लायमॅक्स सीनमध्ये अचाकन उसळून उठली तेव्हा मी सोफ्यावर बसल्याजागी अक्षरशा तीनताड उडालो आणि हातात असलेल्या वाटीतील केळावेफर खाली सांडल्या.

एकंदरीत मर्दानी 4 सुद्धा येईल असे वाटत आहे.

हिंसा आणि गोर दृष्ये भरपूर असुनही ती अजिबातच अंगावर येत नाहीत. भिती, किळस, घृणा, राग, चीड हे सगळं मेंदुत तयार झालं पाहिजे.> परफेक्ट , शोले मध्ये ठाकूर च्या फॅमिली ला मारताना च्या सिन मध्ये झोपाळ्याचा आवाज हि अंगावर काटा आणतो. लहान मुलाला मारताना दाखवले नाही तरी ते दृश्य अजूनही बघवत नाही .

Pages