चित्रपट कसा वाटला १२

Submitted by धनि on 4 August, 2025 - 10:36

२००० झाले पण Lol

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/86233?page=66#new

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'हम पंछी एक चाल के' हिंदी मालिका सई परांजपेंचीच होती ना? दूरदर्शनवर लागायची बहुतेक. चाळीतल्या गमतीजमती असायच्या.


मर्दानी बऱ्यापैकी टेम्प्लेट फॉलो करतो
पहिल्या दोन्ही पार्ट मधेही सिमिलर टेम्प्लेट होतं. पार्ट 3मधे राहून राहून दिल्ली क्राइम 3 ची आठवण येत होती...
मला अम्मा पेक्षा पार्ट 2 मधला विशाल जेठवा चा व्हिलन भयानक आवडला होता. केवळ त्याच्या परफॉर्मन्स साठी ही सिनेमा बघू शकतोस...
पार्ट 4 नक्कीच येणार. राणी साठी कॅशिंग काऊ आहे मर्दानी सिरीज.
आदी चोप्रा नक्कीच काढणार.

विशाल जेठवा चा व्हिलन भयानक आवडला होता.
>>>
अच्छा तो २ मध्ये आहे का.. मग १ आधी २ बघतो. त्याबद्दल कौतुक ऐकून आहे आणि त्या कौतुकाला जागणारा त्याचा एक सीन सुद्धा पाहिला आहे.

प्रोजेक्ट हेल मेरी पाहिला. छानच आहे.

ग्रेस (रायन गॉसलिंग) एका दीर्घ कोमातून अनोळखी जागेवर उठतो. तिथे समजते की तो स्पेसशिप मध्ये आहे. त्याचे सहप्रवासी मेले आहेत, तो एकटाच जिवंत आहे. त्याला एका वैश्विक संकटापासून पृथ्वीस सोडवायचे आहे हे त्याला हळू हळू आठवते. अजूनही दीर्घ कोमामुळे त्याला मागचे फारसे आठवत नसते, ते तुकड्या तुकड्यात आठवत जाते.

ह्यापेक्षा स्पॉयलर देत नाही. पण सिनेमा छान आहे, आणि दोन पात्रांच्या घट्ट मैत्रीवर बेतलेला आहे.

The martian आणि ह्या सिनेमाच्या मूळ पुस्तकाचा लेखक एकच आहे. हा सिनेमा चांगलाच असला तरी मार्शन सरस आहे. कारण इथे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग वर भर कमी आहे तर ड्रामावर भर जास्त आहे.

प्रॉजेक्ट हेल मेरी मलाही पाहायचा आहे. धन्यवाद कॉमी. ट्रेलर वरून काही कळाले नव्हते.

धुरंधर बद्दलची उत्सुकता आटून गेली अचानक. इतकी चर्चा वाचनात आली की आता घरीच बघेन बहुतेक.

धुरंधर बद्दलची उत्सुकता आटून गेली अचानक. इतकी चर्चा वाचनात आली की आता घरीच बघेन बहुतेक.
>>
असंच सेम मला गली बॉय ला झालं होतं.
ऑफिस मधे कलीग त्याच्या हेडफोनवर मेरी गली में आणि अपना टाइम आएगा हे इतक्या जोरात लावायचा की मला व्यवस्थित ऐकू यायचं. अन् ओलामोस्ट म्युझिक लाँच पासून एक महिना लूप वर हीच दोन गाणी ऐकायचा... अतिरेकी नॉशिया आला होता. नंतर एकदा विमानात गली बॉय पाहिला, पण परत पहायची इच्छा कधीच झाली नाही...

Happy गली बॉय मधे "भाग, भाग शेर आया शेर आया शेर" आहे, ते मला माबोवर शेरोशायरी दिसली की आठवते. सतत एक्स्पोज झालो की रस निघून जातो. बघू तेव्हा बघू. पिक्चर बघून काही आपण सुधारणार नाही किंवा बिघडणार नाही. काय गडबड आहे, आता तर फोमोही येईना असं झालंय. फोमोच्या उलट जोमो - जॉय ऑफ मिसिंग आऊट Lol

>>मे बी काही संदर्भ चुकत असतील पण असंच आठवतंय.

अन्जूताई बरोबर असाच आहे तो सीन. तिला लाडू तो एका चहा प्यायच्या कपातून खायला देतो ते पण. पूर्ण सीनच कमाल आहे. Lol

बघायला हवा परत चष्मे बद्दूर. वर्षा, अतरंगी धन्यवाद, मला तुम्ही दोघांनी लिहिलेलं आठवत नाहीये मात्र, बघायलाच हवा परत.

Pages