ही पोस्ट मस्त आहे राभु. मला याबद्दल अजिबात कल्पना नव्हती. खऱ्या माणसावर बेतले आहे वगैरे. बाकी माहितीही इंटरेस्टिंग. खरोखरच वेगळा आहे पिक्चर, नायक किंवा खलनायक अशी लेबलं न देता कुण्या एका माणसाची गोष्ट असं म्हणून पहायला हवं. मग तो माणूस स्खलनशीलपणे जगला असेल किंवा सचोटीने त्याला कुठल्याही चौकटीत न बसवता, नायकाचा मुलामा न देता पाहायचे. अनुराग कश्यपची अश्या सिनेमात हातोटीच आहे. पण तो एरवी जितके प्रामाणिक क्राफ्ट तयार करतो आणि मानवी पण रॉ ह्यूमन ईमोशन्स दाखवतो ती पकड यात जाणवली नाही. सैल पडल्यासारखी वाटली. खरेतर त्याची तीच ताकद आहे. पण मला ते निसटल्यासारखं वाटलं.
अशा व्यक्ती सिनेमाच्या मध्यवर्ती भागात असल्या कि त्याला noir म्हणतात. ही पूर्ण डार्क फिल्म असते. noir ही १९४० ची फिल्म आहे, ज्यात असं मध्यवर्ती कॅरेक्टर होतं, ज्याला हिरो म्हणायचं कि व्हिलन असा प्रश्न पडला होता. मग हाच शब्द रूढ झाला>>>> नाही . हे बरोबर नाही. गॅगस्टर खून खराबा इत्यादी film noir ची व्यवच्छेदक लक्षणे नाहीत. film noir मध्ये दैवाच्या फेर्यात सापडलेला prtogonist आणि त्याला विनाशाकडे घेऊन जाणारी स्त्री Femme Fatale ह्या महत्वाच्या गीष्टी असतात. केनेडी ही माझ्या मते सायकोपाथ ची कथा आहे, थोडीशी रामन राघवची आठवण करून देणारी. Detour आणि/किंवा Nightmare Alley ही film noir ची टिपिकल उदाहरणे म्हणून सांगता येतील.
एक डाव भुताचा मध्ये एवढी मस्त कल्पना असून देखील तो तत्कालीन मराठी चित्रपटाचा ब्राह्मणी टेम्प्लेट मोडत नाही. त्यामुळे तो पुन्हा पुन्हा मला पाहवासा वाटत नाही. मागणी प्रमाणे पुरवठा केल्याने, सगळे चित्रपट कर्ते लोक टेम्पलेटी (क्वचित पुचाट ) असल्याने मिरासदार असून्ही काही मजा येत नाही.
खालील चित्रपट आवडत नाहीत -
१. कोर्ट, विहीर आणि एक दोन अत्यंत सन्मानीय अपवाद वगळता सगळे मराठी चित्रपट
२. गजेंद्र अहिरे आणि अनंत महादेवन कृत सगळे (भिकार) चित्रपट
३. 'सुकथन' केलेले आर्टसी चित्रपट मला अजिबात 'भाव'त नाहीत.
४. कोठारे कृत पंचांक्षरी पो
५. केदार शिंदे कृत wanna be ब्राह्मणी चित्रपट तसेच जत्रासम इनोदी चित्रपट
६. रवी जाधव कृत अडीच तासांच्या ऍडव्हर्टस
७. लांजेकर किंवा तरडे कृत हास्यास्पद ऐतिहासिक वग
८. कोंडकेकृत कथा नावाच्या अदृश्य धाग्याने bind केलेला डबलमिनिंग जोकसंग्रह
९. सर्व अलकाकुबलपट
१०. NFDC ने दिलेल्या चुरमुऱ्यांवर झालेल्या संदेश वगैरे देणाऱ्या चित्रपटभेळी
११...
'गजब' (हिंदी, धर्मेन्द्रचा डबल रोल ना?) आणि 'खरा वारसदार' (मराठी, अशोक सराफचा डबल रोल) - यांची स्टोरी एकसारखी आहे.
बहुतेक मराठी पिक्चर आधी आलाय, हिंदी नंतर आलाय.
Submitted by ललिता-प्रीति on 14 March, 2026 - 06:09
ओके ओके. म्हणजे काही तरी आवडतंय याचा आनंद वाटला. नाहीतर " बाजारातून बैल चालला, चालला, चालला, चालला त्याला कुणी तरी थांबवा " अशा नावाचा चित्रपट आवडतोय कि काय अशी शंका येऊ लागली होती.
रच्याकने कोर्ट वर मायबोलीवर सडकून टीका झाली होती. म्हणजे सर्वांच्या आवडी निवडी सारख्या असू शकत नाहीत हा बापूसस्टाईनचा सिद्धांत इथे सिद्ध झाला.
रॉय तुमच्या उच्च अभिरुचीमुळे किती उत्तम आनंदाला तुम्ही मुकलात…. फक्त चारच मराठी चित्रपट तुम्हाला आवडले.
जुन्या मराठीतल्या नुसत्या लावण्या जरी ऐकल्या तरी वेळ सत्कारणी लागतो. जाउदे. परत तुम्ही म्हणणार नोसटाल्जीयात रमणारे लोक आले.
बाकी तुमच्या लिस्टीतल्या सैराटचे बाकी माबोकरही दिवाने आहेत हा तुमच्यातला आणि बाकी माबोकरातला एक कमकुवत दुवा असावा… सैराटवर तेव्हा ५०-१०० पाने तरी लिहिली गेली होती.
आवडलेले चित्रपट म्हणून न आवडलेले का दिले आहेत ? >>> एले
मी घाबरलो होतो. मला वाटले रॉयना "तू ही रे", "मितवा" वगैरे स्वप्नीलजोशीपट आवडतात की काय. पण त्याही ब्राह्मणी टेम्प्लेटच. फक्त तेलुगू इण्डस्ट्रीतील टेम्प्लेट ने गॅल्व्हनाइज केलेल्या. एक हीरो दोन हिरॉइन, सीन्समधे अनावश्यक स्टायलाइझिंग, वयाच्या मानाने अचाट कर्तृत्व असलेला हीरो.
पण तुमची ब्राह्मणी टेम्प्लेट ही बरीच मोठी रेंज दिसते. "आनंदाचं झाड" किंवा अलिकडचा "अमलताश" वगैरे पिक्चर असतात ममव लोकांकरता बनवलेले ते उघड आहेत. पण पूर्वी बरीच मराठी इण्डस्ट्री कोल्हापुरात होती असा माझा समज आहे. कलाकारांपासून ते दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांपर्यंत बहुजन लोक भरपूर होते. त्यांच्या अनेक पिक्चर्सना कोल्हापुरी गावरान लुक आहे. तो नक्कीच ब्राह्मणी नाही.
झेंडा, मुळशी पॅटर्न, सैराट, घराबाहेर, वाळवी, एक कप च्या, चेकमेट, लाइक अॅण्ड सबस्क्राइब - हे गेल्या वीसेक वर्षांतले मला आवडलेल्यांपैकी सहज आठवलेले चित्रपट. त्यापैकी झेंडा, सैराट आणि मुळशी पॅटर्न जास्त आवडतात. मुळशी पॅटर्न हा फार अंडररेटेड पिक्चर आहे. सैराटचा पहिला अर्धा भाग जादुई आहे. हळद पिवळी गाणे आणि त्यात ती वर्गात शिरते तो सीन मी किती वेळा पाहिला असेल गणतीच नाही. बाकी "बघणेबल" कॅटेगरीत बरेच आहेत. घरत गणपती, फसक्लास दाभाडे ई.
रॉय - मग पुणे-५२ बद्दलही मत सांगा. होऊन जाऊ दे. त्यावेळी माबोवर एखाद्या राजकीय पक्षाप्रमाणे दुफळी माजली होती
हे तर विचारूच नका. अगदी भाषा हा जरा criteria घेतला तरी या चित्रपटातली मराठी तर अक्षरश: उबग आणणारी ग्रामीण. पेंढारकर कर वगैरे मंडळींनी अत्यंत काळजीपूर्वक ही चित्रपटात आणली. त्यांना साधा शिवरायांचा जिरेटोप देखील रिप्लिकेट करता आला नाही, आज सगळीकडे शिवराय दिसतात तो पूर्ण अनऐतिहासिक जिरेटोप घालूनच दिसतात एवढा या इमेजरीचा इम्पॅक्ट आहे.
बाकी तमाशापट वगैरे तर विचारू नका. दिग्दर्शक दिनकर पाटील मात्र कथा आणि डायलॉग सगळे करान्त लोकांनी लिहायचे. त्या प्रभात वाल्यांचे तर काडीचेही कौतुक वाटत नाही.
मायबोलीवर एखाद्या आयडीला दुसरा आयडी आवडणे ही अत्यंत दुर्मिळ घटना होय. अगदी टडोपाच. पण यातल्या एका आयडीला गणपती बनवता येत नसावा असा अंदाज आहे. बेकरी आयटेम सगळे बंद केल्याने कुठलाही सिनेमा आवडत नाही असे वाटत होते, पण ती टेम्प्लेट आहे हे समजल्यावर बेकरी आयटेम ही सुद्धा एक टेम्प्लेटच असणार असे आता वाटू लागले आहे. बटाटा, साखर आणि साखरेचे पदार्थ, तळलेले पदार्थ हे सर्व त्या विशिष्ट टेम्प्लेटमधे असल्याने त्याचा त्याग करावा लागला असेल.
निखिल महाजन आणि त्यांचे फंटे ते सुहृद गोडबोले वगैरे लोकांना फायनान्स तरी कसा मिळतो हेच मला कळत नाही.
कुणाला एवढे पैसे जड झालेले असतात. तो मेनन सारखा मायक्रोग्रीन मराठी चित्रपट नायकांच्या जोंधळ्यांत कसा काय फिट होतो? कुठला चित्रपट होतं त्याचा मध्ये नाव देखील आठवत नाही. आईशप्पथ काय बंडल चित्रपट आहेत या निखिल महाजनचे.
पुणे ५२ : काय त्या गोपूंचा केमिओ झाला म्हणून सर्व समीक्षकांच्या अर्थनिर्णयनाला काय अफाट उकळ्या फुटल्या? काय भारी आहे त्या चित्रपटात? गिरीश कुलकर्णीचा टेम्प्लेट अभिनय? का किस? त्या किसच्या बोल्डनेसची नवलाई या समीक्षकांना आवडावी? आणि सगळी कथा म्हणे पोस्ट उदारीकरणानंतर ढासळत गेलेली मध्यमवर्गाची नितिमूल्यता तिच्यावर रूपक? असले एक ओव्हर सिम्प्लिफाइड रूपक असलेला एक सामान्य दर्जाचा चित्रपट आहे.
आयला हा काय प्रकार असतो? कुठला मध्यमवर्ग नितीवान होता उदारीकरणापूर्वी? आं? फाटक्या समाजाला असल्या नीतीमूल्यांचेच कौतुक असते.
कसल्यातरी समीक्षकी खाजेतून किस वगैरे पेरून मार्केटदक्ष चित्रपट मार्केटवरच टीका करणारे म्हनून मोठे केले जातात. या सर्व समीक्षकांना उदरीकरणाचा तर प्रचंडच फायदा झालेला असतो. नाहीतर हे गावभर चित्रपट एप्रिसीएशनचे कोर्स करत हिंडले नसते. यांची लाल ढुंगणे इंटरनेट ने व्यवस्थित सोलून दाखवली आणि त्यांचा दंभ उघडा पाडला आहे. आता या समीक्षकांना तर कुत्रंही विचारत नाही. AI ने तर यांचा बाजारच उठवला आहे.
हा निखिल महाजन झकावा आणि सचिन कुंडळकर काढावा. या दोघांच्या चित्रपतांची रिले गोदावरीत वाहून द्यायला हवीत आणि प्रभात च्या चित्रपटात असतें तसें एक हालते दृश्य सांदृश्य वैकुंठविमान यावे आणि यांना कुठेतरी भूमध्य सागारातल्या बेटावर सोडून यावे
रॉय @पुणे मायनस बावन.
त्यातल्या इंटीमेट सीन्सना अनाकर्षक इव्हन ओंगळ म्हंटले होते मी. ते बघून माणूस वासनामुक्त होऊन डायरेक्ट हिमालयावरच. "रीड बिटवीन द लाईन्स" हेच होते पुणे ५२ चे.
फा ला अनुमोदन.
ए ले
@ब्राह्मणीपट - मलाही बरेचदा कंटाळवाणे वाटतात कारण त्यात नाविन्यपूर्ण काहीही नसतं. पण ग्रामीण भागातील कथानकांवर सुद्धा भयंकर कंटाळवाणे सिनेमे आहेतच. आणि आता उठसूठ सबसिडी साठी लंडनला जाऊन शूट करतात तीही एक नवीन कंटाळवाणी कॅटेगरी आहे. त्यामुळे हे सगळे टेम्प्लेट वगैरे पूर्वग्रह असू शकतात, कधीकधी या तडाख्यातून सुटून चांगले, त्यातल्या त्यात बरे सिनेमेही सापडतात. आपल्याला जनरली चांगली कथा, चांगला अभिनय व चांगली मांडणी असलेला कुठल्याही टेम्प्लेटचा चित्रपट आवडू शकतो. यातलं एकही नसेल तर पूर्णपणे नवीन विषय असला तरी तो आवडणार नाही. आपल्याला प्रेक्षक म्हणून फक्त इंटेलिजन्ट करमणूक हवी असते. ती नाही मिळाली की हे गणित कोसळतं. चित्रपटाची युनिव्हर्सल लॅंग्वेज इमोशन्सच आहेत, एकदा त्या जाणवल्या की कुठल्याही भाषेतला चित्रपट आवडू शकतो. त्यानेच आपण एकमेकांशी आणि क्राफ्टशी जोडले जातो, बाकी खरेतर काही फारसं महत्त्वाचं नाही.
मला स्वतःला सुकथनकर+ भावे यांचे (ग्रामीण) दिठी आवडला होता आणि बाईचं घर का काहीतरी तो पूर्णपणे ब्राह्मणी व पुणेरी वाटावा असा, तोही आवडला होता. प्रत्येक चित्रपट आवडेल असे नाही पण जनरली यांचे सिनेमे इमोशनली इंटेलिजन्ट वाटतात.
केदार शिंदे तितका आवडत नाही. फारच बेगडी व वरवरची मांडणी वाटते. पण कधीतरी मालिका आवडल्या होत्या. बिझनेसच्या दृष्टीने बनवलेले मसाला, बाईपण टाईप काही तरी असते. जे कालबाह्य वाटते.
लांजेकर असह्य. महेश मांजरेकरचा काकस्पर्श मला अजिबात आवडला नव्हता. तोही ब्राह्मणी होता पण त्यामुळे आवडला नाही असे नाही. मला फारच कृत्रिम आणि अटेंशन सीकिंग दुःख पाहायला आवडत नाही. ते खरं वाटायला हवं. तेच ममांचा शिवाजीराजे भोसले बोलतोय हाही फार लाऊड वाटला होता. तो काही ब्राह्मणी वगैरे नव्हता. एकुणात मला ममा आवडत नाहीत. मुंबई पुणे मुंबई - हा फक्त पहिला आवडला नंतर नाही मजा आली. टेम्प्लेट एकच होते.
मुंबई - पुण्याचा/ कोकणाचा नॉस्टॅल्जिया मला नाही त्यामुळे रिलेटेबल नाही. पण प्रेक्षक म्हणून दुसरं काही ऑफर केलेलं असलं की करमणूक होते फक्त तेवढंच असलं की परकं आणि कंटाळवाणे आणि फक्त लोकल प्रेक्षकांचाच - त्यांच्या नॉस्टॅल्जियाचाच विचार करून बनवल्या गेल्यानं एक आऊटसायडर फील येतं. ते तिथल्या लोकांना खूप आवडतात. लिमिटेड ऑडियन्ससाठी समजायचं. पण सायकल अतिशय आवडला होता. कारण दुसरं खूप काही देतो तो सिनेमा, मग तो तिथल्यापुरता राहात नाही. तेच "घरत गणपती" विशेष आवडला नाही. नांदेडच्या कथानकावर आलेला पाणी खरोखरच आवडला होता, रिलेटेबल होता व चित्रपट म्हणून सुद्धा चांगला होता. पण अजून असेच येत गेले तर मी फक्त तिथला आहे म्हणून पाहणार नाही. सिनेमाच्या बाबतीत असं सतत स्वतःचे इमोशनल बॅगेज ठेवता येत नाही मला. दुसरा माणूस काय म्हणतोय ते पहायचं असतं. मग ते क्वचित जुळून आले की आवडतेच. नाही आले तरी, आपल्यापेक्षा वेगळे आयुष्य, कथा पाहण्याचा सुद्धा आनंदच आहे.
सैराट मला आवडला होता पण पुन्हा पुन्हा नाही पाहू शकत. तेच 'बनवाबनवी' मी कितीही वेळा पाहू शकते आणि 'गुपचूप गुपचूप' सुद्धा. त्याला कारण फक्त मूड हलका करणे किंवा नॉस्टॅल्जिया, इतकाच.
ही उदाहरणे वरच्या परिच्छेदाला पुष्टी देण्यासाठी. भट्टी जमायला कधी, कधी काहीही कारण लागत नाही. ती सगळी camaraderie असते टीमची. त्यात प्रेक्षक फिट बसला की चित्रपट आवडतो.
आपल्याला जनरली चांगली कथा, चांगला अभिनय व चांगली मांडणी असलेला कुठल्याही टेम्प्लेटचा चित्रपट आवडू शकतो >>> बरोबर आहे. अशा पिक्चर्स मधे दाखवलेले विश्व आपल्या जवळपासचे किंवा रिलेट करता येणारे असो वा नसो. कलाकृती एंगेजिंग असली, त्यातल्या गोच्या पहिल्यांदाच बघताना खटकल्या नाहीत इतके त्याने आपल्याला गुंग केले - इतके बास आहे. नंतर त्याबद्दल विचार करताना "पण असे कसे होईल" वाटले तरी चालेल. ते बघताना डोक्यात न येणे हे पिक्चरचे यशच आहे.
त्यातल्या इंटीमेट सीन्सना अनाकर्षक इव्हन ओंगळ म्हंटले होते मी. ते बघून माणूस वासनामुक्त होऊन डायरेक्ट हिमालयावरच. >>> हो. लोकांनी निवृत्त झाल्याशिवाय बघू नयेत ते सीन्स नंतरचे माहीत नाही.
रिलेटेबल असायचीही इतकी गरज नाही. "स्थळ" ही शॉर्टफिल्म मला आवडली (शेवट वगळता - तो आवडला नाही असे नाही पण बघणार्याला पुरेसे क्लोजर मिळत नाही त्यातून. मला शेवटी सगळे साग्रसंगीत चांगले झालेले बघायला आवडते. त्याबदल्यात पूर्वीच्या मराठी पिक्चर्ससारखे शेवटच्या सीनम्धले क्लिशे संवादही सहन करेन). त्या फिल्ममधले काहीही रिलेटेबल नाही. भाषा, प्रथा, वातावरण, लोकेशन काहीच. तरीही एंगेज झालो. इव्हन सैराटबद्दलही तेच.
मला पुण्याचा नॉस्टॅल्जिया आहे. सदाशिव पेठेचा आहे - जरी तेथे वाढलो नाही तरी. खूपदा राहिल्याने. त्यामुळेच अमलताश मधे एंगेज झालो. कोकणचा नॉस्टॅल्जिया नाही पण कोकणाशी काहीतरी एक कनेक्शन वाटते. त्यामुळे ते पिक्चरही सहसा आवडतात.
भट्टी जमायला कधी, कधी काहीही कारण लागत नाही. ती सगळी camaraderie असते टीमची. त्यात प्रेक्षक फिट बसला की चित्रपट आवडतो. >>> परफेक्ट.
मस्त चर्चा !
खूप दिवसांनी १६ नवीन , ५२ नवीन असं चिकवावर दिसू लागलंय.
नाहीतर पडून असायचा धागा.
माझं मूडवर असतं. चांगला मूड असेल तर जॉनी मेरा नाम पण बघू शकेन. चांगला म्हणजे सहनेबल. हा खूप दिवस टिकतो.
या मूडमधे बरेच सिनेमे पाहिले कि अजीर्ण होतं. मग एकदम बंद
२०१४ - १५ पर्यंत लक्ष्मीकांत बेर्डे - अशोक सराफचे चित्रपट आवडायचे. आता त्यातले बरेच नाहीत आवडत. महेश कोठारेचे सिनेमे आता बालीश वाटतात. तेव्हां ते मराठीत हिंदीचं "ग्रॅज्जर" आणणारे वाटलेले. सचिनचे पण असेच खूप बालीश वाटतात.
स्मिता तळवलकरांचे काही सिनेमे आवडलेत. सुबोध भावेने स्वतः बनवलेया सिनेमांना दाद द्याविशी वाटते. त्याला जे आवडतील तेच तो बनवणार. इतरांनी त्यांना आवडतील तसे बनवले पाहीजेत. चित्रपट म्हणजे काही कारखाना नाही. जी गोष्ट आवडते तीच निगुतीने बनवता येते. गणानं घुंगरू हरवलं हा उत्कृष्ट ग्रामीण चित्रपट आहे असं एका समीक्षकाने काही वर्षांपूर्वी लिहीलं होतं. तो शोधून पाहिला. नाही आवडला. तमाशापटच वाटला. तमाशापट असून इथे वाचलेला मुक्काम पोस्ट ढेबेवाडी आवडला. ( व्यंकटेश माडगूळकर.)
ग्रामीण असो किंवा शहरी, चांगला असेल तर आवडतोच. व्हरायटी हवीच. मराठीचं कसं आहे एक चालला कि एक ते एकच लाट येते. ती कितीतरी वर्षे टिकून राहते. तमाशा, मग विनोदी. मग ऐतिहासिक. नव्या सूनबाईला फक्त शिराच येत असावा, मग तिने सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त शिराच करावा. मग भात शिकल्यावर फक्त भातच.
जे नेहमीच्या साच्यात बसत नाहीत, पण सिनेमेच असतात ते बघायला कुणीतरी शिकवावं लागतं. अंकूर, पार पासून सुरूवात झाली. सत्यजित रें चे खूप उशिरा पाहिले. यांना कधी कधी कथाही नसते. निओ रिअॅलिझम वगैरे. पण अनेक वर्षातून एखादा एव्हढीच क्षमता आहे.
ब्राह्मणी हा शब्द खूप निगेटिव्ह झाला आहे. माझे खरेतर या जातीबरोबर काहीही शत्रुत्व नाही. हा शब्द अलीकडे समाजातल्या एका लेयरची संस्कृती आणि त्याची नीतीमूल्ये दाखवण्यासाठी तेवढाच त्या अर्थी मी वापरतो. अगदी फक्त आणि फक्त सौंदर्यशास्त्र आणि मराठी चित्रपटाचे एक मार्केट या संदर्भातच मी वापरू इच्छितो.
त्यामुळे मला या जातीबद्दल आकस आहे असे नाही. खरेतर आमच्या गावात ब्राह्मण हा जातीय दृष्ट्या बराच मागास वर्ग आहे. सांगलीत मात्र तो अत्यंत पॉवरफुल वर्ग आहे. आमच्या गावात लिंगायत लोकांचा वरचष्मा आहे. खरेतर असल्या सांस्कृतिक पार्शवभूमी मुळे आमच्या गावात मराठी चित्रपट चालतच नाहीत. कारण ते कुणालाच रिलेट होतं नाहीत.
एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते ते म्हणजे माझे आणि चित्रपटांचे एक अत्यंत वेगळे नाते आहे. माझ्या घरी अगदी परवा परवा पर्यंत सांगते ऐका, कुंकू या चित्रपतांची रीले होती. होय, रीले.
माझा मुत्या सरकारी नोकरी करता करता चित्रपटगृहात ऑपरेटर म्हणून देखील काम करत असे. आणि सरकारी नोकरीत देखील सरकार तर्फे चित्रपट दाखवायचे काम करत असे. त्यात पुन्हा सगळे टूरिंग टॉल्किंज वाले ओळखीचे. यात्रे मध्ये या टूरिंग वाल्यांसाठी आमच्या घरी दोन बोकड कापले जात.
अगदी १९५६ पासून त्याने अनेक चित्रपट लोकांना दाखवले. नंतर गावांत खरोखर एक मोठे चित्रपट आले. आणि जुने बंद पडले. तरी आमच्या आज्ज्याचे वेड काही कमी झाले नाही. मोठ्या मुलाला थेट टीव्ही आणि VCR वगैरे असल्या गोष्टींचे दुकान घालून दिले. आमच्या पप्पाने तीन किलोमीटर लांब स्वखर्चने टाकून घरी ती को ऍक्सिअल केबल आणली. नंतर गाव वाढले तसें त्या केबलचे फाते वाढले त्यामुले आजन्म आम्हाला केबल फुकट होती. त्यामुळे किमान पन्नाशीपासून मीडिया आणि टेकनॉलॉजि, चित्रपट क्रमाक्रमाने जसे बदलत गेले तसे तसें त्यांचे साक्षीदार आम्ही ठरलो. रामायण मधले युद्ध पाहायला आमच्या घरी एवढी गर्दी झाली की आम्हाला घरापुढे मांडव घालायला लागला होता!
श्वास पासून मराठीत न्यू व्हेव सुरु झाली ती लाट काही आमच्या गावांपर्यंत आलीच नाही.
नंतर लक्षात आले की मराठी चित्रपटानी काही टेम्प्लेट्स कधी ओलांडलेच नाहीत. आणि रिलेटिबिटी तर खूपच लांबची गोष्ट आहे.
तमाशापट पाहिले तर चित्रपटातला तमाशा आणि प्रत्यक्षातला तमाशा यांच्यात एवढे मोठे अंतर होते की यांना अशा स्टोरी सुचतात तरी कशा असा प्रश्न मला पडे. त्यात तमासे सुद्धा बदलले. मी तर अगदी लहानपणापासून तमासे पहिले आहेत आता ते तर अगदीच विचित्र झालेले आहेत. त्यांच्यावर चित्रपटांनी पूर्ण संस्कृतीक आक्रमण केलेलं आहे आणि बिचाऱ्या मंगलाबाई बनसोडे यांना देखील किलोभर मेकअप थापून भारताचा झेंडा घेऊन एकातरी देशभक्तीपर गाण्यावर स्टेजवर इंग्रजी आठ आकाराची प्रभातफेरी काढावी लागे.
आणि गंम्मत म्हणजे हे अगदी कालपरवापर्यंत चालू होते. नटरंग हा चित्रपट असो किंवा प्राजु माळी चा तो फुलवंती का काय असो. टेम्प्लेटच्या बाहेर जायचं नाहीच.
आपल्याला जनरली चांगली कथा, चांगला अभिनय व चांगली मांडणी असलेला कुठल्याही टेम्प्लेटचा चित्रपट आवडू शकतो >> +१
मला प्रिया बापट फारशी आवडत नाही तरी आम्हि दोघि खुप आवडला होता.
सैराटच्या यशात अजय-अतुलच अफाट सन्गित याचा सिहाचा वाटा आहे..त्यामुळे गाणी असख्य वेळा बघितली पण मुव्हि एकदाच बघितला..
मुबै-पुणे-मुबै सिरिज क्लिशे असुन बघायला आवडली..मुक्ता असल्याने असेल.
आज्या खूपच आवडल्या!
मला काही तुम्हाला आकस आहे वगैरे वाटले नाही पण टेम्प्लेट आहे हे माहीत आहे. त्यामुळे मी सुद्धा फक्त टेम्प्लेट पुरतेच लिहिले आहे. मला लांबलचक लिहायचं निमित्त मिळालं. तुम्ही लिहिलेले वाचून मजाच आली, उलट त्यामुळेच लिहावं वाटलं. मी कुठेही- कशानेही ट्रिगरबिगर होऊन लिहीत नाही, जेथे मजा येते, आवडते तेथेच लिहिते.
लिंगायत समाज लातूर जिल्ह्यात भरपूर आहे. माझा भरपूर संबंध आलेला आहे.
भालू तर कुत्र्याचा आहे ना ... नाना पाटेकर व्हिलन आहे. तेरी मेहेरबानीयां आहे मराठीतला, हिरोईन वर केलेल्या. मी पाहिला आहे.
आपल्याला जनरली चांगली कथा, चांगला अभिनय व चांगली मांडणी असलेला कुठल्याही टेम्प्लेटचा चित्रपट आवडू शकतो
>>>> १००++.
रॉय यांना प्रतिवाद करायचा म्हणून नाही तर स्वतःशी विचार केला आणि जाणवले की तत्क्षणी मनाला भिडला तर तो चित्रपट मला आवडतो. अर्थात त्या वेळच्या मनस्थितीवर ते आवडणे अवलंबून असल्याने एकदा आवडलेला चित्रपट नंतर सो सो वाटू शकतो.
काही चित्रपट एखादं गाणं, सीन, संवाद किंवा अभिनयाचा नमुना यासाठी आवडू शकतात.
पण यातलं काहीही नंतर मनात रेंगाळत राहिलं तर तो नक्कीच आवडता होतो. त्यामुळे मला फॅंड्री, पळशीची पीटी, तिसरी कसम, तिसरी मंझिल, पी एस, चिल्ड्रन ऑफ हेवन, गन्स ऑफ नॅवरॉन ते डॉ. झिवागो असे कुठल्याही रेंजमधले, टेम्प्लेटमधले चित्रपट आवडतात.
फक्त आम्ही कायतरी भन्नाट करतोय जे समजण्याची प्रेक्षकांची लायकी नाही असा अविर्भाव आणत जगावर उपकार केल्याच्या थाटात रिलीज केलेले पिक्चर आवडत नाहीत. कशाशीस प्रामाणिक नसलेले पिक्चर आवडत नाहीत. उदा. मनमोहन देसाई स्टाईल पिक्चर बनवताना दिग्दर्शकाला सत्यजित रे बनण्याचा झटका आला तर जी कडबोळी बनतात ती आवडत नाहीत.
मी सुद्धा रॉयशी संवाद वाढवायलाच लिहितोय. मला त्याचं असं चकमक मोड मध्ये लिहिलेलं वाचायला आवडतं. हे इथे अवांतर आहे, पण मी व पु काळेंची पुस्तकं वाचून (अजून एकही वाचलेलं नाही) त्यावर मायबोलीवर अभिप्राय लिहिणार आहे आणि मग गटगमध्ये ती रॉयला भेट देणार आहे.
आशा बगेंचं जेवढं वाचलंय ते आवडलं. सुमती क्षेत्रमाडे फार मागच्या. त्यांचं काही मलाच वाचवेल असं वाटत नाही. सोपं म्हणून व पु काळे. मग प्रवीण दवणे. पुस्तकांच्या दुकानांत यांची पुस्तकं हार्याने दिसतात , पण त्यांचं एकही पुस्तक कोणी वाचल्याची मायबोलीवर नोंद नाही. हा अन्याव आहे.
भुताचा भाऊ "गजब" वरून
भुताचा भाऊ "गजब" वरून बेतलेला होता ना ? सचिनचे जवळजवळ सगळेच गाजलेल्या हिंदी किंवा इंग्रजी सिनेमावरून बेतलेले सिनेमे आहेत.
सी नो एव्हिल , हिअर नो एव्हिल वरून एक आलेला होता, त्यात बहुतेक अशोक सराफ नाही. एकापेक्षा एक का ?
ही पोस्ट मस्त आहे राभु. मला
ही पोस्ट मस्त आहे राभु. मला याबद्दल अजिबात कल्पना नव्हती. खऱ्या माणसावर बेतले आहे वगैरे. बाकी माहितीही इंटरेस्टिंग. खरोखरच वेगळा आहे पिक्चर, नायक किंवा खलनायक अशी लेबलं न देता कुण्या एका माणसाची गोष्ट असं म्हणून पहायला हवं. मग तो माणूस स्खलनशीलपणे जगला असेल किंवा सचोटीने त्याला कुठल्याही चौकटीत न बसवता, नायकाचा मुलामा न देता पाहायचे. अनुराग कश्यपची अश्या सिनेमात हातोटीच आहे. पण तो एरवी जितके प्रामाणिक क्राफ्ट तयार करतो आणि मानवी पण रॉ ह्यूमन ईमोशन्स दाखवतो ती पकड यात जाणवली नाही. सैल पडल्यासारखी वाटली. खरेतर त्याची तीच ताकद आहे. पण मला ते निसटल्यासारखं वाटलं.
अशा व्यक्ती सिनेमाच्या
अशा व्यक्ती सिनेमाच्या मध्यवर्ती भागात असल्या कि त्याला noir म्हणतात. ही पूर्ण डार्क फिल्म असते. noir ही १९४० ची फिल्म आहे, ज्यात असं मध्यवर्ती कॅरेक्टर होतं, ज्याला हिरो म्हणायचं कि व्हिलन असा प्रश्न पडला होता. मग हाच शब्द रूढ झाला>>>> नाही . हे बरोबर नाही. गॅगस्टर खून खराबा इत्यादी film noir ची व्यवच्छेदक लक्षणे नाहीत. film noir मध्ये दैवाच्या फेर्यात सापडलेला prtogonist आणि त्याला विनाशाकडे घेऊन जाणारी स्त्री Femme Fatale ह्या महत्वाच्या गीष्टी असतात. केनेडी ही माझ्या मते सायकोपाथ ची कथा आहे, थोडीशी रामन राघवची आठवण करून देणारी. Detour आणि/किंवा Nightmare Alley ही film noir ची टिपिकल उदाहरणे म्हणून सांगता येतील.
सहमत नाही.
सहमत नाही.
या फिल्म्सना सुरूवातीला डार्क फिल्म्स असे नाव होते. नॉईर ( नुआर) हे नाव त्यातल्या एका पात्राचे आहे.
आज निओ नॉईरचा ट्रेण्ड आहे. नॉईर आज कुणी बनवत नाही.
एक डाव भुताचा मध्ये एवढी मस्त
एक डाव भुताचा मध्ये एवढी मस्त कल्पना असून देखील तो तत्कालीन मराठी चित्रपटाचा ब्राह्मणी टेम्प्लेट मोडत नाही. त्यामुळे तो पुन्हा पुन्हा मला पाहवासा वाटत नाही. मागणी प्रमाणे पुरवठा केल्याने, सगळे चित्रपट कर्ते लोक टेम्पलेटी (क्वचित पुचाट ) असल्याने मिरासदार असून्ही काही मजा येत नाही.
तुम्हाला हव्या असलेल्या
तुम्हाला हव्या असलेल्या टेम्प्लेट मधे आवडलेले चित्रपट कुठले आहेत त्याची यादी देऊ शकाल का ?
खालील चित्रपट आवडत नाहीत -
खालील चित्रपट आवडत नाहीत -
१. कोर्ट, विहीर आणि एक दोन अत्यंत सन्मानीय अपवाद वगळता सगळे मराठी चित्रपट
२. गजेंद्र अहिरे आणि अनंत महादेवन कृत सगळे (भिकार) चित्रपट
३. 'सुकथन' केलेले आर्टसी चित्रपट मला अजिबात 'भाव'त नाहीत.
४. कोठारे कृत पंचांक्षरी पो
५. केदार शिंदे कृत wanna be ब्राह्मणी चित्रपट तसेच जत्रासम इनोदी चित्रपट
६. रवी जाधव कृत अडीच तासांच्या ऍडव्हर्टस
७. लांजेकर किंवा तरडे कृत हास्यास्पद ऐतिहासिक वग
८. कोंडकेकृत कथा नावाच्या अदृश्य धाग्याने bind केलेला डबलमिनिंग जोकसंग्रह
९. सर्व अलकाकुबलपट
१०. NFDC ने दिलेल्या चुरमुऱ्यांवर झालेल्या संदेश वगैरे देणाऱ्या चित्रपटभेळी
११...
अजून अनेक कॅटेगरी आहेत.
>>रंजना काय ताकदीची कलाकार
>>रंजना काय ताकदीची कलाकार होती!<<
बहुतेक टेनिस खेळायची. बायसेप्स वगैरे दिसायचे तिने जर स्लीवलेस झम्परे घातली तर.
आवडलेले चित्रपट म्हणून न
आवडलेले चित्रपट म्हणून न आवडलेले का दिले आहेत ? तुम्हाला काहीच आवडत नाही हे माहीत आहे.
काय आवडतं हे सांगा. मराठीत काय आवडलं ?
'गजब' (हिंदी, धर्मेन्द्रचा
'गजब' (हिंदी, धर्मेन्द्रचा डबल रोल ना?) आणि 'खरा वारसदार' (मराठी, अशोक सराफचा डबल रोल) - यांची स्टोरी एकसारखी आहे.
बहुतेक मराठी पिक्चर आधी आलाय, हिंदी नंतर आलाय.
गजब -१९८२
गजब -१९८२
खरा वारसदार १९९८ आणि २०१७ ( रीमेक) - मूळ चित्रपट- खिलौना ( बंगाली कादंबरीवर)
सौजन्य - गुगल.
एक लेखक मला खाली मराठी
एक लेखक मला खाली मराठी चित्रपट आवडतात :
१. कोर्ट
२. विहीर
३. सैराट
४. डिसायपल
ओके ओके. म्हणजे काही तरी
ओके ओके. म्हणजे काही तरी आवडतंय याचा आनंद वाटला. नाहीतर " बाजारातून बैल चालला, चालला, चालला, चालला त्याला कुणी तरी थांबवा " अशा नावाचा चित्रपट आवडतोय कि काय अशी शंका येऊ लागली होती.
रच्याकने कोर्ट वर मायबोलीवर सडकून टीका झाली होती. म्हणजे सर्वांच्या आवडी निवडी सारख्या असू शकत नाहीत हा बापूसस्टाईनचा सिद्धांत इथे सिद्ध झाला.
रॉय तुमच्या उच्च अभिरुचीमुळे
रॉय तुमच्या उच्च अभिरुचीमुळे किती उत्तम आनंदाला तुम्ही मुकलात…. फक्त चारच मराठी चित्रपट तुम्हाला आवडले.
जुन्या मराठीतल्या नुसत्या लावण्या जरी ऐकल्या तरी वेळ सत्कारणी लागतो. जाउदे. परत तुम्ही म्हणणार नोसटाल्जीयात रमणारे लोक आले.
बाकी तुमच्या लिस्टीतल्या सैराटचे बाकी माबोकरही दिवाने आहेत हा तुमच्यातला आणि बाकी माबोकरातला एक कमकुवत दुवा असावा… सैराटवर तेव्हा ५०-१०० पाने तरी लिहिली गेली होती.
आवडलेले चित्रपट म्हणून न
आवडलेले चित्रपट म्हणून न आवडलेले का दिले आहेत ? >>> एले
मी घाबरलो होतो. मला वाटले रॉयना "तू ही रे", "मितवा" वगैरे स्वप्नीलजोशीपट आवडतात की काय. पण त्याही ब्राह्मणी टेम्प्लेटच. फक्त तेलुगू इण्डस्ट्रीतील टेम्प्लेट ने गॅल्व्हनाइज केलेल्या. एक हीरो दोन हिरॉइन, सीन्समधे अनावश्यक स्टायलाइझिंग, वयाच्या मानाने अचाट कर्तृत्व असलेला हीरो.
पण तुमची ब्राह्मणी टेम्प्लेट ही बरीच मोठी रेंज दिसते. "आनंदाचं झाड" किंवा अलिकडचा "अमलताश" वगैरे पिक्चर असतात ममव लोकांकरता बनवलेले ते उघड आहेत. पण पूर्वी बरीच मराठी इण्डस्ट्री कोल्हापुरात होती असा माझा समज आहे. कलाकारांपासून ते दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांपर्यंत बहुजन लोक भरपूर होते. त्यांच्या अनेक पिक्चर्सना कोल्हापुरी गावरान लुक आहे. तो नक्कीच ब्राह्मणी नाही.
झेंडा, मुळशी पॅटर्न, सैराट, घराबाहेर, वाळवी, एक कप च्या, चेकमेट, लाइक अॅण्ड सबस्क्राइब - हे गेल्या वीसेक वर्षांतले मला आवडलेल्यांपैकी सहज आठवलेले चित्रपट. त्यापैकी झेंडा, सैराट आणि मुळशी पॅटर्न जास्त आवडतात. मुळशी पॅटर्न हा फार अंडररेटेड पिक्चर आहे. सैराटचा पहिला अर्धा भाग जादुई आहे. हळद पिवळी गाणे आणि त्यात ती वर्गात शिरते तो सीन मी किती वेळा पाहिला असेल गणतीच नाही. बाकी "बघणेबल" कॅटेगरीत बरेच आहेत. घरत गणपती, फसक्लास दाभाडे ई.
रॉय - मग पुणे-५२ बद्दलही मत सांगा. होऊन जाऊ दे. त्यावेळी माबोवर एखाद्या राजकीय पक्षाप्रमाणे दुफळी माजली होती
कोल्हापूर आणि मराठी
कोल्हापूर आणि मराठी चित्रपटांचे टेम्प्लेट :
हे तर विचारूच नका. अगदी भाषा हा जरा criteria घेतला तरी या चित्रपटातली मराठी तर अक्षरश: उबग आणणारी ग्रामीण. पेंढारकर कर वगैरे मंडळींनी अत्यंत काळजीपूर्वक ही चित्रपटात आणली. त्यांना साधा शिवरायांचा जिरेटोप देखील रिप्लिकेट करता आला नाही, आज सगळीकडे शिवराय दिसतात तो पूर्ण अनऐतिहासिक जिरेटोप घालूनच दिसतात एवढा या इमेजरीचा इम्पॅक्ट आहे.
बाकी तमाशापट वगैरे तर विचारू नका. दिग्दर्शक दिनकर पाटील मात्र कथा आणि डायलॉग सगळे करान्त लोकांनी लिहायचे. त्या प्रभात वाल्यांचे तर काडीचेही कौतुक वाटत नाही.
मायबोलीवर एखाद्या आयडीला
मायबोलीवर एखाद्या आयडीला दुसरा आयडी आवडणे ही अत्यंत दुर्मिळ घटना होय. अगदी टडोपाच. पण यातल्या एका आयडीला गणपती बनवता येत नसावा असा अंदाज आहे. बेकरी आयटेम सगळे बंद केल्याने कुठलाही सिनेमा आवडत नाही असे वाटत होते, पण ती टेम्प्लेट आहे हे समजल्यावर बेकरी आयटेम ही सुद्धा एक टेम्प्लेटच असणार असे आता वाटू लागले आहे. बटाटा, साखर आणि साखरेचे पदार्थ, तळलेले पदार्थ हे सर्व त्या विशिष्ट टेम्प्लेटमधे असल्याने त्याचा त्याग करावा लागला असेल.
अशाने (चार चौघातलं) वजन कमी होतं मग.
पुणे -५२
पुणे -५२
निखिल महाजन आणि त्यांचे फंटे ते सुहृद गोडबोले वगैरे लोकांना फायनान्स तरी कसा मिळतो हेच मला कळत नाही.
कुणाला एवढे पैसे जड झालेले असतात. तो मेनन सारखा मायक्रोग्रीन मराठी चित्रपट नायकांच्या जोंधळ्यांत कसा काय फिट होतो? कुठला चित्रपट होतं त्याचा मध्ये नाव देखील आठवत नाही. आईशप्पथ काय बंडल चित्रपट आहेत या निखिल महाजनचे.
पुणे ५२ : काय त्या गोपूंचा केमिओ झाला म्हणून सर्व समीक्षकांच्या अर्थनिर्णयनाला काय अफाट उकळ्या फुटल्या? काय भारी आहे त्या चित्रपटात? गिरीश कुलकर्णीचा टेम्प्लेट अभिनय? का किस? त्या किसच्या बोल्डनेसची नवलाई या समीक्षकांना आवडावी? आणि सगळी कथा म्हणे पोस्ट उदारीकरणानंतर ढासळत गेलेली मध्यमवर्गाची नितिमूल्यता तिच्यावर रूपक? असले एक ओव्हर सिम्प्लिफाइड रूपक असलेला एक सामान्य दर्जाचा चित्रपट आहे.
आयला हा काय प्रकार असतो? कुठला मध्यमवर्ग नितीवान होता उदारीकरणापूर्वी? आं? फाटक्या समाजाला असल्या नीतीमूल्यांचेच कौतुक असते.
कसल्यातरी समीक्षकी खाजेतून किस वगैरे पेरून मार्केटदक्ष चित्रपट मार्केटवरच टीका करणारे म्हनून मोठे केले जातात. या सर्व समीक्षकांना उदरीकरणाचा तर प्रचंडच फायदा झालेला असतो. नाहीतर हे गावभर चित्रपट एप्रिसीएशनचे कोर्स करत हिंडले नसते. यांची लाल ढुंगणे इंटरनेट ने व्यवस्थित सोलून दाखवली आणि त्यांचा दंभ उघडा पाडला आहे. आता या समीक्षकांना तर कुत्रंही विचारत नाही. AI ने तर यांचा बाजारच उठवला आहे.
हा निखिल महाजन झकावा आणि सचिन कुंडळकर काढावा. या दोघांच्या चित्रपतांची रिले गोदावरीत वाहून द्यायला हवीत आणि प्रभात च्या चित्रपटात असतें तसें एक हालते दृश्य सांदृश्य वैकुंठविमान यावे आणि यांना कुठेतरी भूमध्य सागारातल्या बेटावर सोडून यावे
रॉय @पुणे मायनस बावन.
रॉय @पुणे मायनस बावन.
त्यातल्या इंटीमेट सीन्सना अनाकर्षक इव्हन ओंगळ म्हंटले होते मी. ते बघून माणूस वासनामुक्त होऊन डायरेक्ट हिमालयावरच. "रीड बिटवीन द लाईन्स" हेच होते पुणे ५२ चे.
फा ला अनुमोदन.
ए ले
@ब्राह्मणीपट - मलाही बरेचदा कंटाळवाणे वाटतात कारण त्यात नाविन्यपूर्ण काहीही नसतं. पण ग्रामीण भागातील कथानकांवर सुद्धा भयंकर कंटाळवाणे सिनेमे आहेतच. आणि आता उठसूठ सबसिडी साठी लंडनला जाऊन शूट करतात तीही एक नवीन कंटाळवाणी कॅटेगरी आहे. त्यामुळे हे सगळे टेम्प्लेट वगैरे पूर्वग्रह असू शकतात, कधीकधी या तडाख्यातून सुटून चांगले, त्यातल्या त्यात बरे सिनेमेही सापडतात. आपल्याला जनरली चांगली कथा, चांगला अभिनय व चांगली मांडणी असलेला कुठल्याही टेम्प्लेटचा चित्रपट आवडू शकतो. यातलं एकही नसेल तर पूर्णपणे नवीन विषय असला तरी तो आवडणार नाही. आपल्याला प्रेक्षक म्हणून फक्त इंटेलिजन्ट करमणूक हवी असते. ती नाही मिळाली की हे गणित कोसळतं. चित्रपटाची युनिव्हर्सल लॅंग्वेज इमोशन्सच आहेत, एकदा त्या जाणवल्या की कुठल्याही भाषेतला चित्रपट आवडू शकतो. त्यानेच आपण एकमेकांशी आणि क्राफ्टशी जोडले जातो, बाकी खरेतर काही फारसं महत्त्वाचं नाही.
मला स्वतःला सुकथनकर+ भावे यांचे (ग्रामीण) दिठी आवडला होता आणि बाईचं घर का काहीतरी तो पूर्णपणे ब्राह्मणी व पुणेरी वाटावा असा, तोही आवडला होता. प्रत्येक चित्रपट आवडेल असे नाही पण जनरली यांचे सिनेमे इमोशनली इंटेलिजन्ट वाटतात.
केदार शिंदे तितका आवडत नाही. फारच बेगडी व वरवरची मांडणी वाटते. पण कधीतरी मालिका आवडल्या होत्या. बिझनेसच्या दृष्टीने बनवलेले मसाला, बाईपण टाईप काही तरी असते. जे कालबाह्य वाटते.
लांजेकर असह्य. महेश मांजरेकरचा काकस्पर्श मला अजिबात आवडला नव्हता. तोही ब्राह्मणी होता पण त्यामुळे आवडला नाही असे नाही. मला फारच कृत्रिम आणि अटेंशन सीकिंग दुःख पाहायला आवडत नाही. ते खरं वाटायला हवं. तेच ममांचा शिवाजीराजे भोसले बोलतोय हाही फार लाऊड वाटला होता. तो काही ब्राह्मणी वगैरे नव्हता. एकुणात मला ममा आवडत नाहीत. मुंबई पुणे मुंबई - हा फक्त पहिला आवडला नंतर नाही मजा आली. टेम्प्लेट एकच होते.
मुंबई - पुण्याचा/ कोकणाचा नॉस्टॅल्जिया मला नाही त्यामुळे रिलेटेबल नाही. पण प्रेक्षक म्हणून दुसरं काही ऑफर केलेलं असलं की करमणूक होते फक्त तेवढंच असलं की परकं आणि कंटाळवाणे आणि फक्त लोकल प्रेक्षकांचाच - त्यांच्या नॉस्टॅल्जियाचाच विचार करून बनवल्या गेल्यानं एक आऊटसायडर फील येतं. ते तिथल्या लोकांना खूप आवडतात. लिमिटेड ऑडियन्ससाठी समजायचं. पण सायकल अतिशय आवडला होता. कारण दुसरं खूप काही देतो तो सिनेमा, मग तो तिथल्यापुरता राहात नाही. तेच "घरत गणपती" विशेष आवडला नाही. नांदेडच्या कथानकावर आलेला पाणी खरोखरच आवडला होता, रिलेटेबल होता व चित्रपट म्हणून सुद्धा चांगला होता. पण अजून असेच येत गेले तर मी फक्त तिथला आहे म्हणून पाहणार नाही. सिनेमाच्या बाबतीत असं सतत स्वतःचे इमोशनल बॅगेज ठेवता येत नाही मला. दुसरा माणूस काय म्हणतोय ते पहायचं असतं. मग ते क्वचित जुळून आले की आवडतेच.
नाही आले तरी, आपल्यापेक्षा वेगळे आयुष्य, कथा पाहण्याचा सुद्धा आनंदच आहे.
सैराट मला आवडला होता पण पुन्हा पुन्हा नाही पाहू शकत. तेच 'बनवाबनवी' मी कितीही वेळा पाहू शकते आणि 'गुपचूप गुपचूप' सुद्धा. त्याला कारण फक्त मूड हलका करणे किंवा नॉस्टॅल्जिया, इतकाच.
ही उदाहरणे वरच्या परिच्छेदाला पुष्टी देण्यासाठी. भट्टी जमायला कधी, कधी काहीही कारण लागत नाही. ती सगळी camaraderie असते टीमची. त्यात प्रेक्षक फिट बसला की चित्रपट आवडतो.
आपल्याला जनरली चांगली कथा,
आपल्याला जनरली चांगली कथा, चांगला अभिनय व चांगली मांडणी असलेला कुठल्याही टेम्प्लेटचा चित्रपट आवडू शकतो >> अनुमोदन.
पण पुणे५२, घरात गणपती मला कंटाळवाणे वाटले होते.
आपल्याला जनरली चांगली कथा,
आपल्याला जनरली चांगली कथा, चांगला अभिनय व चांगली मांडणी असलेला कुठल्याही टेम्प्लेटचा चित्रपट आवडू शकतो >>> बरोबर आहे. अशा पिक्चर्स मधे दाखवलेले विश्व आपल्या जवळपासचे किंवा रिलेट करता येणारे असो वा नसो. कलाकृती एंगेजिंग असली, त्यातल्या गोच्या पहिल्यांदाच बघताना खटकल्या नाहीत इतके त्याने आपल्याला गुंग केले - इतके बास आहे. नंतर त्याबद्दल विचार करताना "पण असे कसे होईल" वाटले तरी चालेल. ते बघताना डोक्यात न येणे हे पिक्चरचे यशच आहे.
त्यातल्या इंटीमेट सीन्सना अनाकर्षक इव्हन ओंगळ म्हंटले होते मी. ते बघून माणूस वासनामुक्त होऊन डायरेक्ट हिमालयावरच. >>>
हो. लोकांनी निवृत्त झाल्याशिवाय बघू नयेत ते सीन्स
नंतरचे माहीत नाही.
रिलेटेबल असायचीही इतकी गरज नाही. "स्थळ" ही शॉर्टफिल्म मला आवडली (शेवट वगळता - तो आवडला नाही असे नाही पण बघणार्याला पुरेसे क्लोजर मिळत नाही त्यातून. मला शेवटी सगळे साग्रसंगीत चांगले झालेले बघायला आवडते. त्याबदल्यात पूर्वीच्या मराठी पिक्चर्ससारखे शेवटच्या सीनम्धले क्लिशे संवादही सहन करेन). त्या फिल्ममधले काहीही रिलेटेबल नाही. भाषा, प्रथा, वातावरण, लोकेशन काहीच. तरीही एंगेज झालो. इव्हन सैराटबद्दलही तेच.
मला पुण्याचा नॉस्टॅल्जिया आहे. सदाशिव पेठेचा आहे - जरी तेथे वाढलो नाही तरी. खूपदा राहिल्याने. त्यामुळेच अमलताश मधे एंगेज झालो. कोकणचा नॉस्टॅल्जिया नाही पण कोकणाशी काहीतरी एक कनेक्शन वाटते. त्यामुळे ते पिक्चरही सहसा आवडतात.
भट्टी जमायला कधी, कधी काहीही कारण लागत नाही. ती सगळी camaraderie असते टीमची. त्यात प्रेक्षक फिट बसला की चित्रपट आवडतो. >>> परफेक्ट.
मस्त चर्चा !
मस्त चर्चा !

खूप दिवसांनी १६ नवीन , ५२ नवीन असं चिकवावर दिसू लागलंय.
नाहीतर पडून असायचा धागा.
माझं मूडवर असतं. चांगला मूड असेल तर जॉनी मेरा नाम पण बघू शकेन. चांगला म्हणजे सहनेबल. हा खूप दिवस टिकतो.
या मूडमधे बरेच सिनेमे पाहिले कि अजीर्ण होतं. मग एकदम बंद
२०१४ - १५ पर्यंत लक्ष्मीकांत बेर्डे - अशोक सराफचे चित्रपट आवडायचे. आता त्यातले बरेच नाहीत आवडत. महेश कोठारेचे सिनेमे आता बालीश वाटतात. तेव्हां ते मराठीत हिंदीचं "ग्रॅज्जर" आणणारे वाटलेले. सचिनचे पण असेच खूप बालीश वाटतात.
स्मिता तळवलकरांचे काही सिनेमे आवडलेत. सुबोध भावेने स्वतः बनवलेया सिनेमांना दाद द्याविशी वाटते. त्याला जे आवडतील तेच तो बनवणार. इतरांनी त्यांना आवडतील तसे बनवले पाहीजेत. चित्रपट म्हणजे काही कारखाना नाही. जी गोष्ट आवडते तीच निगुतीने बनवता येते. गणानं घुंगरू हरवलं हा उत्कृष्ट ग्रामीण चित्रपट आहे असं एका समीक्षकाने काही वर्षांपूर्वी लिहीलं होतं. तो शोधून पाहिला. नाही आवडला. तमाशापटच वाटला. तमाशापट असून इथे वाचलेला मुक्काम पोस्ट ढेबेवाडी आवडला. ( व्यंकटेश माडगूळकर.)
ग्रामीण असो किंवा शहरी, चांगला असेल तर आवडतोच. व्हरायटी हवीच. मराठीचं कसं आहे एक चालला कि एक ते एकच लाट येते. ती कितीतरी वर्षे टिकून राहते. तमाशा, मग विनोदी. मग ऐतिहासिक. नव्या सूनबाईला फक्त शिराच येत असावा, मग तिने सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त शिराच करावा. मग भात शिकल्यावर फक्त भातच.
जे नेहमीच्या साच्यात बसत नाहीत, पण सिनेमेच असतात ते बघायला कुणीतरी शिकवावं लागतं. अंकूर, पार पासून सुरूवात झाली. सत्यजित रें चे खूप उशिरा पाहिले. यांना कधी कधी कथाही नसते. निओ रिअॅलिझम वगैरे. पण अनेक वर्षातून एखादा एव्हढीच क्षमता आहे.
फारेण्ड, अस्मिता मस्त पोस्टस.
येऊ द्या अजून.
रॉयसाठी रेको.
रॉयसाठी रेको.
घरगंगेच्या काठी
पाहुणी
भाऊबीज - यातल्या लावण्या ब्राह्मणी वाटतील.
असला नवरा नको ग बाई
बाप माझा ब्रह्मचारी
अवघाची संसार
भालू
सुषमा शिरोमणींचे चित्रपट
चटक चांदणी
ब्राह्मणी हा शब्द खूप
ब्राह्मणी हा शब्द खूप निगेटिव्ह झाला आहे. माझे खरेतर या जातीबरोबर काहीही शत्रुत्व नाही. हा शब्द अलीकडे समाजातल्या एका लेयरची संस्कृती आणि त्याची नीतीमूल्ये दाखवण्यासाठी तेवढाच त्या अर्थी मी वापरतो. अगदी फक्त आणि फक्त सौंदर्यशास्त्र आणि मराठी चित्रपटाचे एक मार्केट या संदर्भातच मी वापरू इच्छितो.
त्यामुळे मला या जातीबद्दल आकस आहे असे नाही. खरेतर आमच्या गावात ब्राह्मण हा जातीय दृष्ट्या बराच मागास वर्ग आहे. सांगलीत मात्र तो अत्यंत पॉवरफुल वर्ग आहे. आमच्या गावात लिंगायत लोकांचा वरचष्मा आहे. खरेतर असल्या सांस्कृतिक पार्शवभूमी मुळे आमच्या गावात मराठी चित्रपट चालतच नाहीत. कारण ते कुणालाच रिलेट होतं नाहीत.
एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते ते म्हणजे माझे आणि चित्रपटांचे एक अत्यंत वेगळे नाते आहे. माझ्या घरी अगदी परवा परवा पर्यंत सांगते ऐका, कुंकू या चित्रपतांची रीले होती. होय, रीले.
माझा मुत्या सरकारी नोकरी करता करता चित्रपटगृहात ऑपरेटर म्हणून देखील काम करत असे. आणि सरकारी नोकरीत देखील सरकार तर्फे चित्रपट दाखवायचे काम करत असे. त्यात पुन्हा सगळे टूरिंग टॉल्किंज वाले ओळखीचे. यात्रे मध्ये या टूरिंग वाल्यांसाठी आमच्या घरी दोन बोकड कापले जात.
अगदी १९५६ पासून त्याने अनेक चित्रपट लोकांना दाखवले. नंतर गावांत खरोखर एक मोठे चित्रपट आले. आणि जुने बंद पडले. तरी आमच्या आज्ज्याचे वेड काही कमी झाले नाही. मोठ्या मुलाला थेट टीव्ही आणि VCR वगैरे असल्या गोष्टींचे दुकान घालून दिले. आमच्या पप्पाने तीन किलोमीटर लांब स्वखर्चने टाकून घरी ती को ऍक्सिअल केबल आणली. नंतर गाव वाढले तसें त्या केबलचे फाते वाढले त्यामुले आजन्म आम्हाला केबल फुकट होती. त्यामुळे किमान पन्नाशीपासून मीडिया आणि टेकनॉलॉजि, चित्रपट क्रमाक्रमाने जसे बदलत गेले तसे तसें त्यांचे साक्षीदार आम्ही ठरलो. रामायण मधले युद्ध पाहायला आमच्या घरी एवढी गर्दी झाली की आम्हाला घरापुढे मांडव घालायला लागला होता!
श्वास पासून मराठीत न्यू व्हेव सुरु झाली ती लाट काही आमच्या गावांपर्यंत आलीच नाही.
नंतर लक्षात आले की मराठी चित्रपटानी काही टेम्प्लेट्स कधी ओलांडलेच नाहीत. आणि रिलेटिबिटी तर खूपच लांबची गोष्ट आहे.
तमाशापट पाहिले तर चित्रपटातला तमाशा आणि प्रत्यक्षातला तमाशा यांच्यात एवढे मोठे अंतर होते की यांना अशा स्टोरी सुचतात तरी कशा असा प्रश्न मला पडे. त्यात तमासे सुद्धा बदलले. मी तर अगदी लहानपणापासून तमासे पहिले आहेत आता ते तर अगदीच विचित्र झालेले आहेत. त्यांच्यावर चित्रपटांनी पूर्ण संस्कृतीक आक्रमण केलेलं आहे आणि बिचाऱ्या मंगलाबाई बनसोडे यांना देखील किलोभर मेकअप थापून भारताचा झेंडा घेऊन एकातरी देशभक्तीपर गाण्यावर स्टेजवर इंग्रजी आठ आकाराची प्रभातफेरी काढावी लागे.
आणि गंम्मत म्हणजे हे अगदी कालपरवापर्यंत चालू होते. नटरंग हा चित्रपट असो किंवा प्राजु माळी चा तो फुलवंती का काय असो. टेम्प्लेटच्या बाहेर जायचं नाहीच.
आपल्याला जनरली चांगली कथा,
आपल्याला जनरली चांगली कथा, चांगला अभिनय व चांगली मांडणी असलेला कुठल्याही टेम्प्लेटचा चित्रपट आवडू शकतो >> +१
मला प्रिया बापट फारशी आवडत नाही तरी आम्हि दोघि खुप आवडला होता.
सैराटच्या यशात अजय-अतुलच अफाट सन्गित याचा सिहाचा वाटा आहे..त्यामुळे गाणी असख्य वेळा बघितली पण मुव्हि एकदाच बघितला..
मुबै-पुणे-मुबै सिरिज क्लिशे असुन बघायला आवडली..मुक्ता असल्याने असेल.
कोल्हापूर मधे लिंगायत जास्त
आज्या खूपच आवडल्या!
तुम्ही लिहिलेले वाचून मजाच आली, उलट त्यामुळेच लिहावं वाटलं. मी कुठेही- कशानेही ट्रिगरबिगर होऊन लिहीत नाही, जेथे मजा येते, आवडते तेथेच लिहिते.
मला काही तुम्हाला आकस आहे वगैरे वाटले नाही पण टेम्प्लेट आहे हे माहीत आहे. त्यामुळे मी सुद्धा फक्त टेम्प्लेट पुरतेच लिहिले आहे. मला लांबलचक लिहायचं निमित्त मिळालं.
लिंगायत समाज लातूर जिल्ह्यात भरपूर आहे. माझा भरपूर संबंध आलेला आहे.
भालू तर कुत्र्याचा आहे ना
... नाना पाटेकर व्हिलन आहे. तेरी मेहेरबानीयां आहे मराठीतला, हिरोईन वर केलेल्या. मी पाहिला आहे.
आपल्याला जनरली चांगली कथा,
आपल्याला जनरली चांगली कथा, चांगला अभिनय व चांगली मांडणी असलेला कुठल्याही टेम्प्लेटचा चित्रपट आवडू शकतो
>>>> १००++.
रॉय यांना प्रतिवाद करायचा म्हणून नाही तर स्वतःशी विचार केला आणि जाणवले की तत्क्षणी मनाला भिडला तर तो चित्रपट मला आवडतो. अर्थात त्या वेळच्या मनस्थितीवर ते आवडणे अवलंबून असल्याने एकदा आवडलेला चित्रपट नंतर सो सो वाटू शकतो.
काही चित्रपट एखादं गाणं, सीन, संवाद किंवा अभिनयाचा नमुना यासाठी आवडू शकतात.
पण यातलं काहीही नंतर मनात रेंगाळत राहिलं तर तो नक्कीच आवडता होतो. त्यामुळे मला फॅंड्री, पळशीची पीटी, तिसरी कसम, तिसरी मंझिल, पी एस, चिल्ड्रन ऑफ हेवन, गन्स ऑफ नॅवरॉन ते डॉ. झिवागो असे कुठल्याही रेंजमधले, टेम्प्लेटमधले चित्रपट आवडतात.
फक्त आम्ही कायतरी भन्नाट करतोय जे समजण्याची प्रेक्षकांची लायकी नाही असा अविर्भाव आणत जगावर उपकार केल्याच्या थाटात रिलीज केलेले पिक्चर आवडत नाहीत. कशाशीस प्रामाणिक नसलेले पिक्चर आवडत नाहीत. उदा. मनमोहन देसाई स्टाईल पिक्चर बनवताना दिग्दर्शकाला सत्यजित रे बनण्याचा झटका आला तर जी कडबोळी बनतात ती आवडत नाहीत.
मी सुद्धा रॉयशी संवाद
मी सुद्धा रॉयशी संवाद वाढवायलाच लिहितोय. मला त्याचं असं चकमक मोड मध्ये लिहिलेलं वाचायला आवडतं. हे इथे अवांतर आहे, पण मी व पु काळेंची पुस्तकं वाचून (अजून एकही वाचलेलं नाही) त्यावर मायबोलीवर अभिप्राय लिहिणार आहे आणि मग गटगमध्ये ती रॉयला भेट देणार आहे.
व पु पेक्षा आशा बगे, सुमती
व पु पेक्षा आशा बगे, सुमती क्षेत्रमाडे वगैरे जास्त इफेक्टिव्ह ठरेल का?
आशा बगेंचं जेवढं वाचलंय ते

Pages