चित्रपट कसा वाटला १२

Submitted by धनि on 4 August, 2025 - 10:36

२००० झाले पण Lol

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/86233?page=66#new

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'बादल यू गरजता है' गाण्यात प्रत्येकवेळी समेवर(च) बिजली चमकते आणि हिरॉइन घाबरून हिरोला मिठी मारते. बिजली बघते बघते आणि शेवटी >> मला हे वाचताना स्वदेस मधली “बिजली” म्हणणारी आजीबाई आठवली.

अनुराग कश्यप चा नो स्मोकिंग बघितल्यापासून मी बघतेय तो कुठे भेटतोय का ??? डोकं आपटून घेणं फक्त बाकी होतं . तेव्हापासून अनुराग कश्यप चा सिनेमा म्हटलं कि भीती वाटते मला

‘केनेडी’ बघण्यासारखंच त्याचं म्युझिक ऐकणं, पेक्षा, जाणणं ही पर्वणी आहे. It firmed its chokehold from the song ‘मेरा मेहबूब‘. I have a backlog of two weeks of exploring new music just because Kennedy soundtrack has completely taken over my listening time and it’s playing in loop. Aamir Aziz is an exceptional poet. Nobody writes like him, nobody! His words … oooh! No wonder he was mentioned by Roger Waters (Pink Floyd) as ‘this kid’s got a future’ after his anti-establishment, anti-CAA ‘सब याद रखा जायेगा’. Aamir and Boyblanck (new-school/wave trap rapper) have collaborated on this soundtrack. Unbelievable output given their styles, realms and creativity! They have delivered something very unique! As usual, Anurag again … has to be credited for exceptional music for his movies, may that be Amit Trivedi, Sneha Khanwalkar or bringing Aamir and Boyblanck together. If you want to follow more, listen to what Prague Philharmonic has done with Tchaikovsky’s violin concerto in D major Op 35 (which is used remarkably in the movie, the vinyl record in the beginning is Campoli’s performance … starts at the surface and then keeps drilling your brain throughout). Peace Out!!!

This hits on so many levels ..

कभी तू भी रो के देख

हाज़रीन हाज़रीन हाज़रीन दिल थाम कर बैठिए, ये कहानी अब बस इख़्तिताम/ख़त्म पर है।
होंठों पर रखी है मर जाने की कैफ़ियत,
जीने का दारोमदार ज़ख़्म पर है।

कहते हैं ज़िंदगी एक बेईमानी का खेल है,
जीत गए तो महल मुनासिब, हार गए तो जेल है।
आप कहिए, आपका भी कुछ लगा क्या दांव पर है?
आपकी ज़िंदगी का नमक मेरे घाव पर है।

मेरी तो उम्र सारी तड़पते हुए गुज़री है,
रेलगाड़ी के दरवाज़ों से लटकते हुए गुज़री है।
मैं तो यूँ तड़पा हूँ जैसे तड़पते हैं वो लोग
जो अपने बच्चों की ख़ातिर कोई डरावना सा भूत बन जाते हैं,
जिसको मिटाना शहर के लिए लाज़िमी हो जाए ऐसा सबूत बन जाते हैं।

चौराहों पर नीलाम उठाया जाता है जिनका बदन,
जिनसे छीन लिया जाता है उनका वतन।
जो अपने ही घर में मेहमान रह जाते हैं,
जो अपने ही जिस्म में बेजान रह जाते हैं।

आप कहिए, आपको मज़ा आया कि नहीं?
तफ़रीह हुई पूरी या यूँ ही बोर हैं?
कमरे में बैठे गली का शोर हुए।

..
..
..

बैठे-बिठाए अक्सर कुछ सोच लेते हैं लोग,
रोने की वजह मिलती नहीं, खोज लेते हैं लोग।
मरहूम के घर में लोग रुदाली हुए जाते हैं,
अश्क़ों के क़तरों से खाली हुए जाते हैं।

तुम्हारी आँखों में हुई एक बहुत बड़ी लूट है,
तुम्हारी आँखों से जो बह रहा वो आँसू नहीं, झूठ है।
साँस-साँस को तरस गई हवा है,
मेरी रगों में कुछ ज़र्द सा रवाँ है।

जवान आँखों में बूढ़े ख़्वाब पलकों के पीछे से
ऐसे झाँक कर देखते हैं जैसे इफ़्रीत बच्चों से उम्र माँगता हो।

सुबह ज़िंदा थे वो लोग, शाम तलक मर गए।
मेरे इनबॉक्स में आठ घंटे इंतज़ार करके
ज़िंदगी की गुहार करके सो गए लोगों का एक श्मशान है
जिसका क्षेत्रफल अरब सागर जितना है।

..
..
..

मैं पूछता हूँ, कौन है वो जिसने उनकी साँस चुराई?
किस पर इल्ज़ाम है?
किस पर रखा जाए?

ज़िंदगी के नाम पर कब तलक मौत चखी है?
कहते हैं समंदर नमक चाटकर बड़ा हुआ है,
और वो कमीना गला काटकर बड़ा हुआ है।

गला काटकर अक्सर बड़े हो जाते हैं लोग,
गला घोंटकर हो जाते हैं शहंशाह।
पत्थर में लिपटी हुई मेरी साँस है,
मेरी छाती से उग रहा अमलतास है।

आख़िरी साँस लेना क्या होता है मुझे मालूम नहीं,
लेकिन मुझे मालूम है आख़िरी साँस की आवाज़
जो मेरे कानों में गूँजती रहती है सुबह, शाम, रात भर
जैसे हर शै में समा गई हो।

मैं इतिहास में ली गई तमाम आख़िरी साँसों को मिलाकर
एक गीत कहना चाहता हूँ,
जिस पर नाच सकें नंगी तलवारें लिए हुए लोग और उनकी भीड़
और जिस पर नगाड़ा बजा सके राजा का राजा बेटा।

नाव - Mana Shankara Vara Prasad Garu
झी 5 वर आहे. फुल ड्रामा ऍक्शन रोमँटिक मसाला पिक्चर आहे.

चिरंजीवी आणि नयनतारा डिव्होर्स झालेले कपल. त्यांना दोन मुले. नयनतारा फार मोठी बिझनेसवूमन, चिरंजीवी सुपरकॉप आणि नयनताराचा बाप सचिन खेडेकर हा दोघांच्या नात्यात काडी करणारी आण्टी. शेवट गोड.

चिरंजीवीला रजनीकांत स्टाईल बघून मजा आली. नयनतारा तर नयनसुख आहे. एका हिरोईनीशी लग्न माफ केले तर मी ते नयनताराशी करेन. व्यंकटेशचा cameo सुद्धा मस्त. दोघांच्या अदाकारीत साउथ इंडियन swag आहे. चित्रपट रिपीट व्हॅल्यू असलेला ब्लॉकबस्टर आहे. कधीतरी पुन्हा बघायलाही आवडेल. चित्रपटातील लोकेशन मस्त आहेत. कॅनव्हास मोठा आहे. मराठी चित्रपट कधीतरी या लेव्हलला गेलेला बघायला आवडेल.

फारेण्ड , केकु >> रिव्ह्यू आवडला यासाठी धन्यवाद. Happy
दक्षिणा तुलाही आवडला केनेडी हे वाचून छान वाटले.
विजिगीषु - हो , ते शब्द खासच आहेत. साधे आहेत.

मयसभा, फेबल , केनेडी हे लोकप्रिय चित्रपटांसारखे नाहीत. संजय भावे यांनी थेटच मी फक्त लोकप्रिय सिनेमेच बघतो हे सांगितलं हे खूप आवडलं. एकदम स्पष्ट. मला रोज कुणी पुरणपोळी दिली तर मी आठवडाभर खाईन, कदाचित पंधरा दिवस पण खाईन, पण मग नंतर चटणी भाकर खाविशी वाटेल. तसं झालंय मसाला मूवीजचं. फक्त स्टारकास्ट वेगळी असते, क्रू वेगळा असतो, लोकेशन्स वेगळी पण इथून तिथून स्टोरी तीच. समाधान मिळत नाही. मग काही तरी वेगळं बघावंसं वाटतं. खूप भारी काही बघितलं हे सांगायचं नसतं. असाही सिनेमा असतो, असंही सिनेमाचं रूप असतं ते स्विकारलं कि बघता येतो. सायकलिंग ग्रुपमुळे अशा मूव्हीजचे रेको मिळतात. मोठी राईड झाल्यावर दमून बसले असताना सिनेमाच्या गप्पा होतात तेव्हा माझा हिरो सर्वात भारी, मी पाहिलेला सिनेमाच भारी, तुझा पाणी कम असली काही भानगड नसते. Lol
एक जण तर फक्त इटालियन मूव्हीज बघतो. त्याची नावे लक्षात सुद्धा राहत नाहीत, इथे उपलब्ध पण नसतात.
एकदम माहौल बदलतो सिनेमाच्या गप्पांनी. इथेही तसेच होतं.

फक्त सिनेमाच्या गप्पांचा आपला वेगळा ग्रुप झालाय जो आता इतर गप्पात जास्त रमत नाही. Happy त्याच गप्पांच्या ओढीने इथे येणं होतं. आताही जायच्या आधी इथे डोकवावंसं वाटलं. सांभाळून घ्याल नेहमीप्रमाणे. Happy

जो भेजी थी दुआ आणि अभय देओल वाला का?

काल कॅथरीन बिगलोचा द हाऊस फुल ऑफ डायनामाईट पाहिला. थ्रिलर्स आवडत असतील तर जरूर बघा.

काल कॅथरीन बिगलोचा द हाऊस फुल ऑफ डायनामाईट पाहिला. >>> हा कुठे पाहिला माझेमन ?
मी काल "कंपॅनियन" नावाचा मूव्हि पाहिला प्राइम वर. डार्क थ्रिलर . साधारण ब्लॅक मिरर ची आठवण येइल अशी थीम . एकदम एन्गेजिंग आहे. इन्टरेस्टिंग वाटला.

नेफिवर "द बँक ऑफ डेव्ह" चांगला आहे. कोणाला फील गुड पिक्चर पाहायचा असेल तर पाहा. साधा सोपा वाटला तरी खर्‍या घडामोडींवर आधारित आहे, त्यामुळे कदाचित ड्रामा फार घातला नसेल. लीड्सची कामे मस्त आहेत त्यामुळे एंगेज करतो पिक्चर.

सुबेदार… अनिल कपूर खूप दिवसांनी दिसला. सिनेमा हुकलाय. बेट एकीकडे, चेंडु भलतीकडेच. अनिल कपूरचे काम तर चांगलेच असते, त्या व्हिलन पोरानेही चांगलं केलंय, मोना सिंग बंडल.

तोच बघतोय.
कायच्या काय चालू आहे.

द वॉर मशीन - नेफि. चांगला आहे थ्रिलर म्हणून. थोडी प्रिडेटरची आठवण येते पण बराच वेगळा आहे. अ‍ॅमेझॉन वरच्या "रीचर" मधला अ‍ॅलन रिचसन मुख्य लीड आहे.

सुबेदार कोठे आहे? ब्राउज करताना कोठेतरी दिसला होता पण लक्षात नाही.

War Machine बघायचा ठरवलं पण मुहूर्त लागेना. Sci Fi मूव्ही ला अपशकुन होत असल्याने आता इथला रिव्ह्यू वाचून ठरवेन.

नेफ्लिवर दोन चित्रपट पाहिले.

१. रिवोलुशनरी रोड - केट विंस्लेट व लिओ डिकॅप्रिओचा २००८
चा चित्रपट आहे. चित्रपटाचा काळ १९५५ चा आहे व ज्या कादंबरीवरुन बेतलाय ती अजुन दहा वर्षे जुनी आहे. रोजचेच रटाळ आयुष्य जगणारे, संसारात सेट झालेले जोडपे. म्हणजे तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे ती चांगली गृहिणी, तो चांगल्या नोकरीत, स्वतःचे घर, गाडी वगैरे. ते दोघे सुरवातीपासुनच सामान्य दाखवलेत. तिने अभिनयाचे शिक्षण घेतलेय पण अभिनय जमत नाहीय, तो इतर चार चौघांसारखा ऑफिसात जाणरा.

तिला अचानक आपण असामान्य आहोत, नवर्‍याचे टिनेजमध्ये पॅरिसला जाऊन स्वतःला हवे तसे जगायचे स्वप्न होते ते स्वप्न आपण जगू तर खरे आयुष्य जगू असे वाटायला लागते. यामागचा पुर्ण कार्यकारणभाव कदाचित कादंबरीत असेल पण चित्रपटात तो तितका प्रभावाने येत नाही व त्यामुळे मला पटला नाही. त्याला आधी पटत नाही पण ती गळी उतरवते. हा निर्णय मित्रमंडळीत बोलुन दाखवल्यावर त्यांचे हसे होते. विशेषतः तो घरी राहुन स्वतःला हवे तसे जगणार आणि ती सरकारी ऑफिसात सेक्रेटरी म्हणुन नोकरी करुन संसार चालवणार हे ऐकल्यावर. तिच्यात असले कुठलेही स्किल असलेले दिसत तर नाही. पुढे गेल्यावर त्याला ऑफिसात प्रमोशन मिळते, पगार वाढतो आणि ही चुकुन गरोदर राहते. पगार वाढतोय म्हटल्यावर त्याचा निर्णय डळमळीत होतो. गरोदर आहे हे कळल्यावर ही रागावते कारण मुलामुळे तिच्या नोकरी करुन सपोर्ट करायच्या प्लॅनमध्ये अडथळे येणार.

चित्रपटाला नक्की काय सांगायचे याबद्दल माझा गोंधळ झाला. आनंदी होण्यासाठी दुसरीकडे जाणेच आवश्यक आहे का, आहे तिथेही आनंदी होऊ शकतो हे तो एकदा बोलतो, कदाचित हेच सांगायचे असेल. पण ज्या कारणावर चित्रपट बेतला म्हणजे त्याचे स्वप्न .. ते तो स्वतः कधी उच्चारत नाही. तोही रोजच्या रुटिनला कंटाळलाय पण त्यातुन बाहेर पडावे असे त्याला वाटत नाही. हीच अचानक तुझे स्वप्न पुरे करुया म्हणुन मागे लागते आणि नंतर तो स्वतःची स्वप्ने बाजुला ठेऊन, खरे आयुष्य जगायचे सोडुन नकली, पैशांच्या आयुष्यात रमतोय म्हणुन भडकत राहते. कदाचित कादंबरीवरुन चित्रपट बनताना काही गोष्टी राहिल्या किंवा मलाच नीट आकलन झाले नाही.

तरीही चित्रपट उत्तम आहे. दोघांनीही छान कामे केलीत. आअजुबाजुचा समाज, लोकांचे वागणे मस्त टिपलेय.

२. द अक्यु़ज्ड - कोन्कणा सेन व प्रतिभा रान्नता (लापता लेडिज). ब्रिटिश हॉस्पिटलातल्या एका सिनियर डॉक्टरवर सेक्श्युअल हॅरॅसमेंटचा निनावी आरोप होतो आणि त्याचा तिच्यावर व तिच्या रिलेशनवर काय परिणाम होतो ही कथा. दोघींची कामे छान झालीत.

कामात पर्फेक्ट असलेले लोक इतरांकडुन तीच अपेक्षा ठेवतात हे त्यांच्यापुरते ठिक आहे. पण अशा पर्फेक्शनिस्ट माणसाच्या हातात सत्ता असेल तर हे लोक जास्त कठोर निर्णय घेतात, चुका करणार्‍यांना त्या दुरुस्त करायची संधी नाकारतात, पाणउतारा करताना परिस्थितीचे भान न राखता तोंड सोडतात हाही सत्तेचा दुरुपयोगच आहे हा विचार पटला.

परंपरेने पुरुषी समजल्या जाणार्‍या अधिकाराच्या जागी स्त्री दाखवायची आणि ती न चुकता लेस्बियन दाखवायची हे याआधी दोन नेफ्लि चित्रपटात पाहिलेय. त्यांना काय संदेश द्यायचाय देव जाणे.

Accused च्या रेकोसाठी धन्यवाद साधना. थोडा अंदाज आला होता ट्रेलर वरून. पहाणार आहे.
केनेडीच्या रेकोसाठी सुद्धा धन्यवाद बब्बन आणि राभु. तोही नोट केला होता.

"जब खुली किताब" नावाचा कुणालाच माहीत नसलेला सिनेमा पाहिला. सौरभ शुक्ला दिग्दर्शक आहे म्हणून. पंकज कपूर, डिंपल कपाडिया, अपारशक्ती खुराणा, नौहिद सायरसी, समीर सोनी आहेत. सगळ्यांनी मस्त कामं केली आहेत. पंकज कपूर कोमामधल्या बायकोची दोन वर्षे सेवा करतो, ती उठल्यावर सांगते की पन्नास वर्षांपूर्वी एक अफेअर होऊन झालेला पहिला मुलगा तिच्या प्रियकराचा आहे. प्रियकर फक्त एका उन्हाळ्यापुरता बदली होऊन आलेला असतो. नवरा बदली होऊन गेलेला असतो. मग बरीच धमाल होते. घटस्फोटापर्यंत जाते प्रकरण. शेवटचा अर्धा मात्र कंटाळवाणा वाटला. तरीही पूर्ण पाहिला. त्याला सत्य स्विकारता येतच नाही. मुलाचा आणि सुनेचाही राग येतो. शेरोशायरी ऐकवून प्रेमात पाडलेला कुणीतरी कवी तिच्या आयुष्यात येऊन गेला आहे हे त्याला सहनच होत नाही. तिला मात्र आयुष्य संपण्याआधी खरं बोलून सोक्षमोक्ष लावायचा असतो पण अचानक सगळी समिकरणं बदलून जातात. खूप प्रेम असतं दोघांचं एकमेकांवर पण तो फार दुखावला जातो. मग पुन्हा ते हळूहळू जवळ येतात, तो कवी मेला आहे हे इंटरनेट वर वाचल्यानंतर हा घरी पार्टीच देतो. आधी सेवाभावी वृत्तीने तिची शुश्रुषा करणारे त्याचे पात्र प्रतारणेबद्दल कळाल्यानंतर पूर्ण स्खलनशील वागायला लागते. पंकज कपूर आणि डिंपल, उत्तम कामं आहेत दोघांचीही. आवर्जून बघण्यासारखा नाही, नेहमीसारखाही नाही, तरीही येथे नोंदवून ठेवतेय.

हल्ली रोज एक सिनेमा बघतो आहे.
सध्या Dark City तुकड्या तुकड्यात बघत आहे. साय फाय निओ नुअर आहे.
काल Death on the Nile 1978 बघितला. पीटर उस्तिनोव डेवीड निवेन आय एस जोहर आणि इतर बरेच अशी जोरदार कास्ट आहे. Agatha Christie प्रेमी लोकांनी अवश्य पाहावा. नवीन २०२२ आहे तो बघायाचा आहे.
Odd Man Out jems mason चा क्लासिक film noir. बघितला. डोळ्यात पाणी आणणारा शेवट.
असे पिक्चर आता होत नाहीत.

आत्ता विविधभारतीवर आज के फनकारमध्ये आय एस जोहरवर कार्यक्रम त्यात डेथ ओन नाइलचा उल्लेख ऐकला Happy

२०२२ चा मी पाहिलाय. छान आहे.

अस्मिता, केनेडी तुला आवडेल कि नाही कल्पना नाही. अ‍ॅकुज्डचा रिव्ह्यू आला कि मग ठरवीन.
बब्बन, वॉर मशीन च्या रेकोबद्दल धन्यवाद. या आठवड्यात आता बघेनच.

अक्यूज्ड मी पाहिला.

***** स्पॉइलर वॉर्निंग *****
घटनाक्रम अआअ आहे, फक्त कोकणाचं कॅज्युअल लायर / गॅसलायटर टाईप कॅरेक्टर बरोब्बर दाखवलंय.
त्यामुळे 'हॅपिली एव्हरआफ्टर' शेवटाचा आणखीनच एक्स्ट्रा स्पेशल वैताग आला.

पिपल वी मीट ऑन वेकेशन पाहिला (नेफ्लि). प्रेडिक्टेबल आहे पण कंटाळा आला नाही. टिपी आहे एकदम. फ्लॅशबॅक छान घेतलेत. हिरो अगदी आय कँडी आहे. हिरोइनही छान आहे.

हिंदीत कोणी आणला नाही म्हणजे झाले. हिंदीत आणला तर शेवटी फुकट मेलोड्रामा टाकतील. नकोच ती भानगड.

स्वाती पुर्वार्धात दाखवली तशी घटना घडू शकते पण उत्तरार्धात जी डिटेक्टिवगिरी केली ती बोरिंग आहे.

स्पोयलर………..

गीतिका तुझ्यासाठी योग्य नाही हे तिच्या मित्राचे मत हाच उत्तरार्धातला एकमेव चांगला मुद्दा होता. तिने परतुन जायला नकोच होते.

हो ना?! मलाही तसंच वाटलं.
त्यात भर म्हणून 'गोरे' कलाकार कोण घेतलेत ते अगदीच सुमार वाटले. ही कथा लंडनमध्ये बेस्ड दाखवण्याचं काय कारण होतं हेही मला लक्षात आलं नाही. भारतात सेक्शुअल हरॅसमेन्टबद्दल कायदे नाहीयेत का?

मी ही पाहिला 'अ‍ॅक्युज्ड'.

खरंतर बेसिक प्लॉट उत्तम आणि महत्त्वाचा आहे. आतापर्यंत हे पुरुषांच्या बाबतीत होतं हे पाहिलं आहे. पण स्त्री लेस्बियन असल्याचा फायदा घेऊन तिच्या करीयरमध्ये अशाप्रकारे अडथळा आणणे हा मुद्दा असू शकतो.

पण.. पण.. पण.... त्या सिनेमात सतत उगंच बळंच संघर्ष आणलाय हे जाणवतं. गीतिका आणि मीरा (आणि त्यातल्या त्यात जास्त करून गीतिका) केवळ डायरेक्टरनं सांगितलंय म्हणून एकमेकींबद्दल गैरसमज करून घेतात असं वाटत राहिलं. त्या गीतिकाला कंपलसरी एकच भाव तोंडावर ठेवायची परमिशन मिळालीये. कपाळाला आठ्या आणि तोंडात कारल्याचा रस घेऊनच ती वावरते. तो भार्गव सगळी तपासणी एका टेबलावर बसून करतो. तो डिटेक्टिव उगंच ' कॅरॅक्टर कसं बारीक सारीक तपशीलात जाऊन उभं केलंय' अशी वाहवा मिळावी असे ठळक मॅनॅरीझम्स घेऊन वावरतो. अजिबात ऑरगॅनिक वाटत नाही ते. शिवाय या आचरट कॅरॅक्टरच्या इन्वेस्टिगेशनमधून प्रकटलेला रिपोर्ट मीरा स्वतः गीतिकाला न देता व्हाया अंगद देते आणि हा प्राणी मधल्यामधे स्वतःची अक्कल लावून (मीराला वाचवायला आणि म्हणून तिच्या आणि गीतिकाच्या मध्ये संशय निर्माण होईल असा) रिपोर्टचा एकच भाग गीतिकाला देतो. मग काय! लगेच लगेच रिबासं (रिलेशनबाह्य संबंध) ची एक खमंग फोडणी आधीच्या संघर्षाला दिली जाते. खरंच अ आणि अ आहे. एक चांगला विषय वाया घालवलाय.

Pages