
कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा
भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.
आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.
पन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.

देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.

तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.
भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !

चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …
Man, go, get a Mango !!
* * *
(वरील सर्व फोटो माझेच. जुन्या मोबाइलने काढलेले.. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)
अनिंद्य,
अनिंद्य,
छान आहेत श्लोक.
संदर्भ: मेघदूत>>>>>> माझ्या मते मेघदूत नाही. त्यात असा श्लोक नाही आहे.
ऋतुपालट धाग्यावर डकवा>>>>> त्या लेखांची फोटोंची पीडीएफ केली आहे मी त्यामुळे धाग्यावर पीडीएफ डकवायला येईल का ते माहित नाही.
माझेमन, तुम्हाला पण पाठवतो.
माझ्या मते मेघदूत नाही.…
माझ्या मते मेघदूत नाही.…
मग तुमचे बरोबर असेल कारण या नोटस् खूप जुन्या आणि विस्कळित/ random आहेत.
दुरुस्ती केली.
माझ्याकडे त्याची सचित्र
माझ्याकडे त्याची सचित्र कात्रणे आहेत.>>>>>>>इथेच दिलेत तर सर्वांनाच पाहता येईल
फार सुंदर माहिती आणि
फार सुंदर माहिती आणि इंटरेस्टिंग चर्चा!
Funskrit क्रेडिट दिलेले आहे ती चित्ररूपातील माहिती फार मस्त आहे.
कोणत्या वृक्षाजवळ काय करायचे आहे ती लिस्ट भारी आहे
पण हे कामसूत्रातील असेल तर हा भाग फक्त सुरूवातीचा "beating around the उद्यान" असून पुढे बरेच वृक्ष व बरेच काही असेल असे वाटते 
beating around the उद्यान >>>
beating around the उद्यान >>>

बरेच वृक्ष व "बरेच काही" >>>
तुम्हाला निबीड अरण्यात नेमकं काय चाललंय ह्याची उत्सुकता आहे असं ह्या वरून लक्षात येत आहे. आता पर्यावरणाचं महत्त्व पटले ना?
Funskrit वरील माहिती छान आहे.
(No subject)
फा, अस्मिता
फा, अस्मिता
तरी बरं त्या वेळी निबीड अरण्यात डायनो नसायचे.
>>> beating around the उद्यान
>>> beating around the उद्यान

हे राखीने गुलजारला सांगितलं
हे राखीने गुलजारला सांगितलं होतं - झाडांशी बोलायचं असतं. अजूनही आवडेल का ही कल्पना? >>>> भरत
अजितच्या लिक्विड ऑक्सीजन जोक सारखे झाले हे. गुलजार मुळे आवडेल पण राखीमुळे नाही.
बाय वे, रोमॅण्टिक गाण्यांतही आंब्याच्या झाडाचे संदर्भ इतर झाडांपेक्षा जास्त असतील का? फुलझाडे वगळून? चितचोर मधल्या 'जब दीप जले आना' मधे
जहाँ पहली बार मिले थे हम, जिस जगह से संग चले थे हम
नदिया की किनारे आज उसी अमवा के तले आना
ही फार सुंदर ओळ आहे. इतर गाण्यांतही असतील.
>>> रोमॅण्टिक गाण्यांतही
>>> रोमॅण्टिक गाण्यांतही आंब्याच्या झाडाचे संदर्भ इतर झाडांपेक्षा जास्त असतील का?
याचं उत्तर कदाचित इथे सापडेल.
अरे हो की तो धागा विसरलोच
अरे हो की
तो धागा विसरलोच होतो.
प्राचीन काळी आम्रमंजिरीचा
प्राचीन काळी आम्रमंजिरीचा वापर 'कर्णपूर' किंवा कर्णावतंस (कर्ण+अवतंस) म्हणजे कानावर ठेवायचा अलंकार म्हणून करत असत.
धमाल प्रतिसाद.
धमाल प्रतिसाद आले आहेत.
…. beating around the उद्यान ? Or it should be love-ambush around the bush ?
निबिड अरण्यात ऋषी-मुनी आणि उद्यानात रतीचळ लागलेली तरुण मंडळी अशी विभागणी असणार. No trespassing in each other’s territory 😜
@ स्वाती,
“अमवा के तले” सुंदर.
आपण “अमवा की डारी” वर बसून युगानुयुगे गाणाऱ्या कोयलिया ची चर्चा पूर्वी केल्याचे आठवते.
BTW, “कामसूत्र” प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी नीट वाचले पाहिजे, विशेषत: पन्नाशीत. निदान “क्या खोया क्या पाया” टाइप mature life views साठी
निबिड अरण्यात ऋषी-मुनी आणि
निबिड अरण्यात ऋषी-मुनी आणि उद्यानात रतीचळ लागलेली तरुण मंडळी अशी विभागणी असणार
>>>> असं काय नाय हो. निबिड अरण्यातसुद्धा ऋषि मुनींचं हनी ट्रॅपिंग व्हायचे ना बरेचदा इंद्राच्या आज्ञेवरून?
उलट ते अंबुवा की डाली काय, गुंजारव करणारे भ्रमर काय, रतिक्रीडेत मग्न असलेले क्रौञ्च किंवा हरीण जोडपं काय हातभारच लावत असतील मूड बनानेको.
ऋषि मुनींचं हनी ट्रॅपिंग …
ऋषि मुनींचं हनी ट्रॅपिंग, मूड एनहान्सर्स … 😂
@ ऋतुराज
@ ऋतुराज
'कर्णपूर' / कर्णावतंस.. ❤
अती सुंदर, अर्थपूर्ण शब्द. कानातले दागिने आम्रफुलांचे. क्या बात है, वाह. 👌
हिंदी साहित्यातला एक कर्णभूषण म्हणून वापरलेल्या आम्रमंजरींचा संदर्भ:
कामशास्त्र में 'सुवसंतक' नामक उत्सव की चर्चा है. 'सरस्वती कंठाभरण' में लिखा है कि सुवसंतक वसंतावतार के दिन को कहते हैं, अर्थात जिस दिन वसंत पृथ्वी पर अवतरित होता है.
“सरस्वती कंठाभरण” में महाराज भोजदेव ने सुवसंतक पर्व की एक हल्की-सी झाँकी दी है. इस दिन उस युग की ललनाएँ कंठ में कुवलय की माला और “कान में दुर्लभ आम्रमंजरियाँ धारण करके” सारे नगर को जगमग कर देती थीं. 😍
कर्णावतंस वरून कुलावतंस आठवला
कर्णावतंस वरून कुलावतंस आठवला. आतापर्यंत नक्की अर्थ काय असा प्रश्न पडला नव्हता.
आता कळलं - कुलाचं भूषण
मला पण कुलावतंस आठवला.
मला पण कुलावतंस आठवला.
For those interested :
For those interested :
अवतंस = पुष्पे, रत्ने इत्यादिकांचे केलेले शिरोभूषण; झुबका; गुच्छ; तुरा; मुगुट; किरीट ; कुंडल; कर्णभूषण.
कुलावतंस = कुळांचे, जातीचे भूषण, अलंकार, मुकुटमणी
(संदर्भ : मराठी विश्वकोश)
ऋषि मुनींचं हनी ट्रॅपिंग>>>>>
ऋषि मुनींचं हनी ट्रॅपिंग>>>>>>
कर्णावतंस वरून कुलावतंस आठवला. >>>>> मलाही लिहिताना ते आठवलं होतं.
BTW, “कामसूत्र” प्रत्येकाने
BTW, “कामसूत्र” प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी नीट वाचले पाहिजे, विशेषत: पन्नाशीत. निदान “क्या खोया क्या पाया” टाइप mature life views साठी >>>>
पण आधीही एकदातरी वाचायचे ना? "नीट" ला खूप हसलो. आधी नीट वाचण्यापेक्षा त्यावर अंमल करण्यातच जास्त इंटरेस्ट असेल म्हणून का? पण पन्नाशीत कामसूत्र म्हणजे नोकरी सोडून दुसरीकडे अॅप्लाय केल्यावर चालू नोकरीतले एम्प्लॉयी हॅण्डबुक वाचून त्यातले "अर्र हे 'बेनेफिट्स' आपण अजून वापरलेच नाहीत" असा विचार करण्यासारखे आहे
>>> आता कळलं - कुलाचं भूषण
>>> आता कळलं - कुलाचं भूषण
मलाही!
फा

फ्रीलान्सिंग सुरू करायला मोटिव्हेशन?
माझा समज आहे की पन्नाशीला
प्लीज माझ्यावर ॲटॅक करू नका वानप्रस्थ पीप्स!
हा माझा अंदाज आहे. हा धागा नॉटी झालाय त्यामुळे भाषेचा धागा ओस पडणार आहे.
>>> हा माझा अंदाज आहे.
>>> हा माझा अंदाज आहे.
अस्मिता नवीन अंदाजात!
हे 'बेनेफिट्स' आपण अजून
हे 'बेनेफिट्स' आपण अजून वापरलेच नाहीत >>>
Fifty is new twenty असा नवा पायंडा पाडता येईल.
वानप्रस्थ पीप्स >>> इथे कोणी
वानप्रस्थ पीप्स >>> इथे कोणी आहे का तसे? बहुधा कोणीच नाही
निसर्ग आपलं काम चोख बजावतो - हे कांदबरीतले गुळगुळीत वाक्य उलट अर्थाने चिकटवते >>>
अस्मिता नवीन अंदाजात >>>
फ्रीलान्सिंग
Fifty is new twenty असा नवा पायंडा पाडता येईल. >>> हो
सगळेच.
आता नॉटी लिहून सिद्ध करा, तुम्ही च्यवनप्राश स्टेजला आलेला नाहीत, "मन भोला तन बेईमान" स्टेजवरच अजूनही आहात.
काय मस्त फोटो आहेत या
काय मस्त फोटो आहेत या धाग्यातले? गेले १-२ दिवस थेट नवीन प्रतिक्रियाच वाचल्या. पुन्हा आता धागा बघायला सुरूवात केली तर ३० पाने आहेत!
तो पहिलाच हापुसचा केशरी रंग एकदम माहौल तयार करतो. आंबा आईसक्रीम मात्र माझे फेवरिट नाही. अतिपरिचयामुळे असेल.
… धागा नॉटी झालाय…. होय
… धागा नॉटी झालाय…. होय 😄
आमराईत आंब्याच्या झाडाखाली नॉटी लोकांचा वसंतमेळा भरलाच आहे तर …
ते वाक्य ऑन परपज तसे लिहिले आहे - प्रत्येक शब्द. आयुष्यात एकदातरी नीट वाचावे. “नीट” ची खोच लक्षात घेतल्याबद्दल अभिनंदन.
फारच अवांतर होईल पण …तरुण वयात वाचले तर बेस्टच. “पन्नाशीत तरी” यासाठी की कामसूत्राच्या तरुण नायकाला (नागरक) कामकेलिच्या युक्त्या-प्रयुक्त्या सांगतांना लेखक वात्स्यायन मल्लनाग स्वत: पन्नाशीच्या वयाचा आहे. So, experience makes you an authority, experience counts big time. 😎
दुसरे म्हणजे कामसूत्र ग्रंथाचे एकूण सात खंड आणि ६४ उपखंड आहेत पैकी फक्त दुसऱ्या खंडात प्रत्यक्ष रतिसुखाची आणि यौनमुद्रा आसने वगैरे वर्णने आहेत, which obviously is the most popular part. Rest six chapters cover a vast variety of subjects related to love, passion, courtship, beauty, fitness, art forms, performing arts, theatre, architecture, asthetics, astronomy, music, poetry, medicine and healthcare… even management of horse stables and elephant riding techniques !!
ग्रंथातली भाषा-काव्य- imagery सर्व बावनकशी सोनं. संस्कृत समजत असल्यास बेस्टच पण माझ्यासारखे ५० मार्कांसाठी संस्कृत शिकलेले सुद्धा शब्दकोशांच्या साथीने वाचनसुख घेऊ शकतात, नव्हे घ्यावेच.
सर रिचर्ड बर्टन यांचे English version मात्र avoidable.
इति अवांतरम् एक्सप्लेनेशनम् च संपूर्णम्.
@ फारएण्ड,
@ फारएण्ड,
३० पाने आणि ९००+ प्रतिसाद माबोकरांचे 🥭 आंबा प्रेम दर्शवतात.
मूळ धाग्यातल्या फोटोंमधे मँगो आइसक्रीमचा फोटो नाही, प्रतिसादात मात्र भरभरून आहेत. सायो यांचे अख्खा आंबा कोरून त्यात भरलेल्या मँगो कुल्फीचे experiments तर “वारी जावॉं” क्याटेगिरी. 😍
Pages