कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी / आम्रचर्चा

Submitted by अनिंद्य on 10 April, 2025 - 06:57

कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा

भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.

आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.

617389ef-2ed4-409d-9c77-679aaddec669.jpegपन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.

e06f854a-ccc5-48f2-b10e-37ed0beafb74.jpeg

देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.

8557ffd6-bc55-4a19-bdb9-663450d5f197.jpeg

तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.

भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !

a123d0e0-8fb6-408e-87e0-575c581b70b5.jpeg

चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …

Man, go, get a Mango !!

* * *

(वरील सर्व फोटो माझेच. जुन्या मोबाइलने काढलेले.. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेसिपी लिहा माधव…

+ १

शॉर्ट रेसिपी विल डू 👍

शेप्रेट धागा काढून लिहिलीत तर इथे लिंक डकवा प्लीज.

IMG_20250620_212629_0.jpg

फणस आणि आंबा साटं गावाहून मागवलेली. यंदा आमची घरची नाहीत, गरेही नाहीत त्यामुळे गावातील दोन जणांकडून विकत घेतलं आम्ही, जे आमचे नातेवाईकच आहेत. सगळ्यांचे एकेक पाकीट माहेरीही दिलं. दिर देवगडला कामासाठी येणार होते, त्यामुळे ते कुरियर करू शकणार होते, अजून काही हवं का विचारलं त्यामुळे कुळीथ पीठ पाव kg आणि हातसडीचे लाल तांदूळ एक किलो सांगितले. दिरांनी घरचे तूप पाठवलं, ते फ्री Lol . अजूनही प्रॉपर रेट सांगितला नाहीये दिरांनी, ते पुढच्या महिन्यात येतील इथे तेव्हा देऊ, सध्या पुण्यात आलेत.

अंजूताई, साटं बघून जीव अर्धाअर्धा झाला! Happy

मायबोलीवरची नं.१ लोकप्रिय 'मलई बर्फी', आंब्याचा आटवलेला रस घालून.
फोटो जुना आहे, पण उत्साह नव्याने आला आहे. Proud करेनही पुन्हा, कोणी सांगावं! Happy

maba2.jpg

“आम के आम, गुठलियों के दाम” या म्हणीचे दृष्यरूप.

आधी आमरस रिचवला. 😍
IMG_8843.jpeg

मग बी पेरले.

IMG_8842.jpeg

आता थोडे मोठे झाले की रोप जमीनीत लावायला योग्य व्यक्तीला देणार. 👆

वा वा, मी ही वेगवेगळ्या आंब्यांचे बाठे कुंडीत पेरलेत, काही रोपं आली. कदाचित खाली जाऊन लावेन, पेरते व्हा कर्म करीत रहा करत, फळाची आशा धरायची नाही, अर्थात सर्व सोसायटीसाठी लावते कारण ती जागा सोसायटीची. सर्व नीट लाऊन, आजूबाजूने दगड विटा ठेऊनही रान साफसफाई करायला येतात त्यांच्याकडून उपटली जातात. मी दिवसा झोपते म्हणून मला समजतही नाही, कधी आलेले साफसफाई करायला, नवरा फार लक्ष देत नाही.

… पेरते व्हा कर्म करीत रहा करत, फळाची आशा धरायची नाही…

हो हो, लष्कराच्या भाकऱ्याच ह्या. पण मिळणारे समाधान अनमोल.

Pages