क्रिकेट - ९

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहा आणि सात गेल्या....
इंग्लंड 215 ला 7 बाद..

विश्वास ठेवा माझ्यावर...
एका सेशन मध्ये 6 विकेट आल्या..

शाब्बास भारत !!
*विश्वास ठेवा माझ्यावर...* - कां , आमचा टिव्ही काय खोटं दाखवतो ? Wink

म्हणजे माझ्या शब्दावर ओ भाऊ..
मी बघत नव्हतो सामना पण बॉल जुना होताच स्विंगवर कंट्रोल मिळू लागेल.. कंडिशन फेवरेबल असतील तर दुसऱ्या तिसऱ्या सेशनला विकेट येतील अशी आशा होती..
पूर्ण सिरीज दोन्ही संघात काटे की टक्कर चालू होती.. एखादा संघ फार पुढे जाणार नाही असेही एक वाटत होते.

पण नवीन चेंडूवर फार पळू दिले त्यांना.. अन्यथा 50 धावा कमी असत्या त्यांच्या

*नवीन चेंडूवर फार पळू दिले त्यांना.. * - कदाचित, जडेजाला मध्येच 2-३ ओव्हर्स देवून बघणं लाभदायक ठरलं असतं. ( त्याला पाहिलं षटक दिलं इंग्लंडच्या 200 धांवा झाल्यावर ! )
*म्हणजे माझ्या शब्दावर ओ भाऊ..* - गंमत केली, एवढंच ! अहो, माझ्या घरचेही मला कधी सिरीयसली घेत नाहीत ! Wink

पाऊस आला.. सामना थांबला..
मला आता या ब्रूकची भिती वाटत आहे.. त्याने वेगात काही धावा मारायला नको ज्या निर्णायक ठरतील..
लवकर हवी शेवटची विकेट

मॅच पाच दिवस चालली पाहिजे. म्हणजे मला ओव्हलला बघता येईल. म्हणजेच आपल्याला 400 च्या वर धावा करायला लागतील. त्या आपण करूच. चौथ्या दिवशी संपणार असली तर निकाल आपल्या बाजूने असेलच याची खात्री नाही. पण पाचव्या दिवसावर गेल्यास आपलाच.

सिराजला स्लॉग स्वीप सिक्स. असे ४-५ टोले दिले तर ६०-७० ची आघाडी मिळेल इंग्लंडला. ९वी विकेट महत्वाची. वोक्स बॅटिंगला उतरेल असं वाटत नाही.

भारताची पहिली वॉकिंग विकेट ठरलेली आहेच नेहमीप्रमाणे.

जे गेल्या ओव्हल कसोटीत रोहीत शर्माने केले होते ते आता यशस्वीला करावे लागणार.
कसोटी त्याच मार्गावर आहे....

IMG-20250801-WA0035.jpg

येशूने स्वताला बॅक केले पाहिजे. आणि आपला खेळ खेळायला हवा. चांगली सुरुवात आपल्याला गेममध्ये कायम पुढे ठेवेल.. आणि टिकलाच तो जास्त तर गेम दूर घेऊन जाईल जसे ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या कसोटीला केलेले.

बाकी आज देवाकडे दुसरे काही मागितले तर ते पण मिळाले असते..
ऑफिसहून निघताना विकेट मागितल्या विकेट आल्या..
येशू खेळावा इच्छा व्यक्त केली तर तो अर्धशतक करून आणि त्यातही दोन जीवदान मिळवून नाबाद आहे..

ज्याप्रमाणे पूर्ण मालिका चालू आहे ते पाहता शेवट फार टक्करचा, थरारक आणि रोचक होणार आहे..
उद्या संध्याकाळच्या आत इतर सगळे विकेंड प्लान उरकून घ्यावे लागणार.

*...शेवट फार टक्करचा, थरारक आणि रोचक होणार आहे.* - खरंय. पहिला डाव भारताच्या फास्ट गोलंदाजांनी गाजवला, दुसरा डाव फलंदाज व फिरकी गोलंदाज गाजवून सामना जिंकून देतील ! ( देवा, सध्या तरी लई नाही मागणं !! Wink )

भाऊ अजून फिरकीवर अडकला आहात का Happy
खराखुरा फिरकी गोलंदाज खेळत नाहीये. आणि आतापर्यंतचा सामना पाहता तो योग्य निर्णय वाटत आहे.
इतर जे दोन फिरकी गोलंदाज खेळत आहेत त्यांनी फलंदाज म्हणून आतापर्यंत उत्तम कामगिरी केली आहे जी शेवटचे एकदा पुन्हा करावी आणि त्यात आपले योगदान द्यावे.

सिराज काल अगदी गँगस्टरसारखी गोलंदाजी करत होता. पाच सलग कसोटी खेळल्यानंतर हा आवेश कौतुकास्पद आहे. त्याने शेवटचा एकदा जोर काढावा आणि या कसोटीचा हिरो बनावे.

*भाऊ अजून फिरकीवर अडकला आहात का* - 20 विकेट फक्त एकाच प्रकारच्या गोलंदाजीने घेणं हे फिरकीने आपण कदाचित केलं असावं, फक्त फास्ट गोलंदाजीने नाही ! तसं आता केलं तर मला आनंदच आहे !

102 - 2 !
गोलंदाजांना कर्तबगारी गाजवायला आधी फलंदाजीने पाया रचायला हवा. त्याची सुरुवात !

या कालच्या पोस्ट साठी सॉरी आकाशदीप Happy

<<<<< आकाशदीप ऐवजी सुंदरच पाठवला असता.. आता बिचाऱ्याला पुन्हा मागे अजून कोण उरणार नाही..>>>>>

असाच खेळत राहा आणि फ्रस्ट्रेट कर इंग्लिश गोलंदाजांना Happy

आकाश दीप ओव्हर टाईम करतोय मॉर्निंग वॉचमन म्हणून. Happy
T20 मुळे झालेल्या सुधारणांबरोबर दोन गोष्टी आज काल जास्त दिसायला लागल्या आहेत. Inside edge लागून बोल्ड होणे आणि स्लिप मध्ये झेल सुटणे. फालतू रन आउट होणे हे ही अजून एक.

आकाशदीप अर्धशतक
गौतम गंभीर सुद्धा हसतोय Happy
ड्रेसिंग रूमचे वातावरण बदलले..

आकाशदीप गेला.. ६६ .. मजा आली..
गिलचे आल्या आल्या फोर बघून बरे वाटले. तो खेळला तर चिंताच मिटली. तो आपली रन मशीन घेऊन सुरू झाला तर शतक मारूनच थांबेल. मग पूर्ण गेम कंट्रोल मध्ये राहील.

*आकाशदीप ऐवजी सुंदरच पाठवला असता.* -.
वॉशिंग्टन जरी सुंदर खेळत असला, तरीबीनाईट वॉचमन म्हणून आकाशदीपच योग्य !! Wink

शाब्बास मेरे शेर मेरे चितेह..
आता मोठे शतक कर. हे महत्वाचे सेशन आहे. इंग्लंडला गेम मध्ये आणू नका परत.

नायरची टेक्निक कॉन्फिडंट कधीच वाटली नाही. साई सुदर्शन सुद्धा कम्फर्टेबल वाटला नाही.
या दोघांपैकी एका जागी श्रेयस अय्यरला संधी मिळाली असती तर तो चांगला खेळला तरी असता किंवा शिकला तरी असता..

करुणची करुणास्पद कामगिरी.

सर सरस आहेत. सुंदर सुंदर खेळतो. जुरेल टिकेल.
आता 400 पर्यंत जायला पाहिजे.

301 - 6 !
*म्हणजेच आपल्याला 400 च्या वर धावा करायला लागतील. * * आता 400 पर्यंत जायला पाहिजे.* -
विक्रमसिंहजी, डरो मत ! तुम्ही ही मॅच रोमांचभरी होवून भारत जिंकताना मैदानावर प्रत्यक्ष पाहणार आहात !! शुभेच्छा !

Pages