क्रिकेट - ९

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

“ सर्व पोस्ट मुद्द्यावरच आहेत की” - हो? ती परिघावरची पोस्ट कुठल्या मुद्द्यावर होती?

आपण दोघे दोन वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोलतोय. परत परत एकच गोष्ट समजावून सांगण्यात अर्थ नाही. तुला समजत नसेल तर सोडून दे

क्रिकेट मध्ये ज्या काही बेसिक गोष्टी असतात, त्या फॉरमॅट प्रमाणे बदलत नसतात हा मुद्दा आहे पण ऋन्मेऽऽष यांना तो समजत नाहीये किंवा नेहमीप्रमाणे समजून घेत नाहीये.

अरे सर
तो मुद्दा सोडा.
इकडे सामना काट्यावर आला आहे . तो पहा,

कसोटीत असे सिंगल घ्यायचे असतात की नसतात हा खरा मुद्दा आहे. बाकी सारे स्पष्टीकरणे Happy

सोशल मीडिया चाळले तर हजारो पोस्ट दिसतील की तो सिंगल नव्हताच म्हणून.. आणि त्यावर लाखो लाईक आढळतील.. आता आम्ही सारेच समजून घेणारे नसलो तर ठीक आहे. मी आम्हा सर्वांच्या वतीने आमची कबूल करून हा विषय संपवतो Happy

इकडे सामना काट्यावर आला आहे . तो पहा,
>>>>
तोच बघत आहे.. चालू आहे समोर
ट्वेंटी वर्ल्डकप आठवतोय..

In 2015, Healy became engaged to fast bowler Mitchell Starc. They were married in April 2016
हिने १४२ रन्स केल्या. १०७ चेंडूत!

“ बाकी सारे स्पष्टीकरणे” - उगाच संभावितपणा चा आव आणू नकोस रे. ‘मिड-ऑफला गेलेल्या बॉलवर स्ट्रायकरचा कॉल असतो‘ इतकं साधं सरळ आहे ते.

आणि सोशल मिडियावर ह्या आशयाच्या सुद्धा लाखो पोस्ट्स आहेत.

सुद्धा Happy

‘मिड-ऑफला गेलेल्या बॉलवर स्ट्रायकरचा कॉल असतो‘ इतकं साधं सरळ आहे ते.>>>

फेफ, जाऊ द्या हो. तो योग्य कॉल जयस्वालचा होता त्याचे त्यालाच गील ने पाठ फिरवून भोगायला लावले. असाच एकदा शतकाजवळ असताना कोहलीने त्याला धाव बाद केलेले. क्रिकेटचे बेसिक काहीही असो. समोर चेंडू मारल्यास फलंदाजाचा कॉल असतो मागे गेल्यास नॉन स्ट्राईकरचा हा मुलभूत ट्रेनिंगचा भाग आहे. आहे आणि तो पाळताना जयस्वाल २ वेळा बाद झालेला मी पाहिला आहे. असो. आणि क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव महत्वाची असते मग फॉर्मॅट कोणतेही असो हे आपण कित्येकदा पाहिले आहे.

“ फेफ, जाऊ द्या हो” - खरंय. पालथ्या घड्यावर पाण्याचा प्रकार आहे. कधी कधी काळ सोकावतो म्हणून लिहिलं जातं.

विंडीजने दुसर्या डावात चिकाटीनं बॅटिंग केलीय. अशीच बॅटिंग करत राहिले तर पाचव्या दिवशी ही टेस्ट रंगतदार होऊ शकेल.

“ सुद्धा” - तुझे आणि माझे फीड्स वेगळे आहेत.

विंडीजने दुसर्या डावात चिकाटीनं बॅटिंग केलीय. >>>

काल जवळपास ९० षटके गोलंदाजी केलेल्या गोलंदाजांना पुन्हा बॉलींग करायला लावणे तेही दिल्लीच्या भरदुपारी हे तितकेसे सायुक्तिक नव्हते. त्या पेक्षा जलद २००-२२५ धावा करून चौथ्या डावात फिरकीसमोर आणणे जास्त सायुक्तिक ठरले असते बोलरही ताजेतवाने झाले असते.
बुमराह आपला मुख्य गोलंदाज ह्याला पाचवा गोलंदाज म्हणून आणले.

Lunch
India vs West Indies, 2nd Test
West Indies tour of India

WI (fo) 248 & 252/3 (78 ov)
IND 518/5d
Shai Hope* 92(189)
Roston Chase 23(34)
Washington Sundar 1/68 (19.0 ov)
Day 4 - Session 1: West Indies trail by 18 runs.

गेले दोन सेशन फक्त १ विकेट आली
आणि विंडीज फक्त १८ धावांनी मागे

फॉलो-ऑन दिल्यामुळे दोन्ही डावांची मिळून जवळपास २०० षटके भारतीय गोलंदाजांना सलग गोलंदाजी करावी लागली.

एकाचा कॉल असताना दुसर्याने कितपत विश्वासाने प्रतिसाद द्यायचा हे सुद्धा रिस्क कितपत घेतली जात आहे यावरच अवलंबून आहे. शेवटी हा माईंड गेम आहे. >> मला वाटले क्रिकेट गेम आहे पण इथे आपले भलतेच सुरू आहे Lol

कसोटीतच नाही, क्रिकेटमधे. बॉल नजरेच्या टप्प्यात नसताना, पार्टनरचाच कॉल घ्यायचा असतो. कोचिंगमधेच हे बाळकडू मिळालेले असतात. ते असे फॉर्मॅटप्रमाणे बदलत नाहीत. >> ह्याला अनुमोदन ! ह्यापेक्षा अजून वेगळे असल्याचे कधी ऐकले वाचलेले नाहि. माईंड वाचता येत नसल्यामूळे सर्वमान्य संकेतांवर खेळतात लोक.

“मला वाटले क्रिकेट गेम आहे पण इथे आपले भलतेच सुरू आहे” Lol

“माईंड वाचता येत नसल्यामूळे सर्वमान्य संकेतांवर खेळतात लोक.” Lol

माझ्यामते हे कसोटी क्रिकेट नाही. >> कसोटी क्रिकेट असेच असले पाहिजे अशी एक व्याख्या आहे असे मला वाटत नाही. दहा वर्षांच्या काळामधेही कसोटी कशी खेळली जाते ह्यात फरक पडला आहे. बदलले नाहित हे सर्वमान्य संकेत जसे "बॉल नजरेच्या टप्प्यात नसताना, पार्टनरचाच कॉल घ्यायचा असतो. " खरच त्या धावेची गरज होती का हा तुझा मुद्दा बरोबर आहे पण धाव घेणे - न घेणे हा कॉल जयस्वालचा होता, गिलचा नाही.

पण धाव घेणे - न घेणे हा कॉल जयस्वालचा होता, गिलचा नाही.
>>>>
पण समोरचा अशी धाव घेणारा असेल तर नॉन स्ट्रायकर एंड खेळाडूला सुद्धा त्याला सपोर्ट करायला सतत अलर्ट राहावे लागते जे त्याला नको असेल. त्याला त्याच्या पद्धतीने कसोटी क्रिकेट खेळायचे असेल तर मग काय करणार. त्याच्यावर का आपले माईंडसेट बदलायची सक्ती..

त्याच्यावर का आपले माईंडसेट बदलायची सक्ती.. >> शंभरातले ९५ लोक जे करतात ते माईंडसेट बदलायची सक्ती जैस्वालवर का ? गिल ने ते बदलणे सोपे नाहि का ह्यापेक्षा ?

मूळात तुला "बॉल नजरेच्या टप्प्यात नसताना, पार्टनरचाच कॉल घ्यायचा असतो. " हे मान्य आहे का ?

Pages