Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकूण मालिकेतील जास्त सेशन
एकूण मालिकेतील जास्त सेशन आपणच वरचढ होतो<<<<
ह्यावरून टेनिस सारख्या खेळात. पहिले दोन सेट ६-०, ६-० असे जिंकले आणि नंतरचे तीन सेट ६-७, ६-७, ६-७ असे टायब्रेकर मध्ये हरले तरी हार ती हारच . शेवटी कोण जिंकले ते महत्त्वाचे.
Sunil Gavaskar blasts Gambhir
Sunil Gavaskar blasts Gambhir:
“I’ve never seen Indian cricket in such a poor state. Gambhir got everything from BCCI, brought his KKR staff, forced Rohit & Kohli out, holds more power than the captain. Full credit for this poor state of Team India goes to him.”
*Full credit for this poor
*Full credit for this poor state of Team India goes to him.* -
खरंच गंभीर हे एक कोडंच आहे. पण तो संघातल्या खेळाडूंना कसा वाटतो, हा खरा निकष आहे व ते प्रत्यक्ष काय आहे हे माहीत नाही. कोहली व रोहित शर्मा यांच्या निवृत्तीला खरंच तो कारणीभूत आहे का, हेही स्पष्ट नाही. शिवाय, गावसकर व गंभीर यांच्यात आता व्यक्तिगत वैर असल्यासारखी स्थिती निर्माण झाल्यासारखी आहे.
थोडक्यात, गंभीरच्या कार्यपद्धतीचं निःपक्षपाती व वस्तुनिष्ठ मूल्यमापन होणं अत्यावश्यक आहे व बीससीआयने त्या गोष्टीला अग्रक्रम देणं अपरिहार्य आहे. सध्याची या बाबतीतील संदिग्धता भारतीय क्रिकेटसाठी घातक आहे.
“ संदिग्धता भारतीय
“ संदिग्धता भारतीय क्रिकेटसाठी घातक आहे” - हे वाक्य बीसीसीआय च्या हेडक्वार्टर्सच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोरून ठेवायला हवं.
forced Rohit & Kohli out
forced Rohit & Kohli out
>>>
गंभीरमध्ये खरेच ईतकी ताकद आहे???
आणि गावस्करकडे काही पुरावे आहेत ईतके भरमसाठ आरोप करायचे की बस न्यूजमध्ये राहायला..
म्हणजे बोर्डाला आणि निवड्समितीवर टिका करू शकतो, पण हे म्हणजे गंभीरवर व्यक्तीगत आरोप झाले..
गावस्कर क्रिकेटच्या ज्ञानाबाबत युनिवर्सिटी आहे, त्याचे पॅशन तरुणांना लाजवेल ईतके कमाल आहे..
पण त्याचे टिका करताना बरेचदा वैयक्तिक अजेंडे असतात. कोहलीच्या मागे सुद्धा तो हात धुवून लागतो. आता गंभीर. दिल्लीवाले आवडीचे नाही वाटते
इंग्लडने तिन्ही रिव्ह्यू
इंग्लडने तिन्ही रिव्ह्यू गमावले
दिवसाची छान सुरुवात
भारताने राहुल गमावला...
भारताने राहुल गमावला...
सुंदर आला जडेजा आधी..
“ आणि गावस्करकडे काही पुरावे
“ आणि गावस्करकडे काही पुरावे आहेत” - टीव्हीवर पाहून गंभीरच्या मनातलं ओळखलं असणार
राहुल बॉल खाली राहत बाद झाला
राहुल बॉल खाली राहत बाद झाला आणि आता गिलच्या हातावर बॉल उसळून बसला..
नॉट गूड साईन
तीन दिवस पडणारा पाऊस कुठे आहे
तीन दिवस पडणारा पाऊस कुठे आहे ते आधी तथाकथित 100% बरोब्बर भाकीत करणाऱ्या इंग्लिश वेधशाळेला विचारायला हवं !!
Gill completes third century.
Gill completes third century.
But he has to bat on and on and on.
Saving the match and his
Saving the match and his wicket is more important than individual milestones.
Washington is also playing good.
सुन्दरचे अर्धशतक झाले...
सुन्दरचे अर्धशतक झाले... चेंडूंचे
टीव्हीवर पाहून गंभीरच्या
टीव्हीवर पाहून गंभीरच्या मनातलं ओळखलं असणार Lol >>> मग आता काय बोलाल
गिल बाद झाला, आता सामना
गिल बाद झाला, आता सामना संपायला वेळ लागणार नाही... Tea च्या आधीच संपेल
35 ओवर बाकी
35 ओवर बाकी
पूर्ण खेळायची सुद्धा गरज नाही.
लीड घेतला आहे
आणि इनिंग चेंज होताना सुद्धा 2 कमी होतात.
चहापान स्कोअर -322 - 4 !!!
चहापान स्कोअर -322 - 4 !!!
सुंदर व जडेजा दोघांचीही अर्धशतके व चांगले स्थिरावलेले ; पावसाची मदत न घेता स्वतःच्या हिंमतीवर सामना वाचवणार हे पठ्ठे !! शाब्बास व शुभेच्छा !!
आत्ताची भारतीय टीमची आणि
आत्ताची भारतीय टीमची आणि त्यांच्या चाहत्यांची अवस्था कशी झाले सांगू का. अमावस्येच्या भयाण मध्यरात्री माणूस बाहेर पडतो आणि एखाद्या डेंजर भुताच्या तडाख्यात सापडतो. ते भूत त्याला सळो की पळो करून सोडतं आणि शेवटी एकदाचा तो माणूस भुताच्या हद्दीतून बाहेर पडतो. भूत दात विचकत बोलतं वाचलास रे वाचलास. ते दोन शब्द कानावर पडल्यावर जसं त्या माणसाला हायसं वाटतं तशी अवस्था झाले. वाचलात रे वाचलात.
पुनश्च शाब्बास, सुंदर व जडेजा
पुनश्च शाब्बास, सुंदर व जडेजा आणि अभिनंदन !
आता इंग्लंडची गोलंदाजी निष्प्रभ म्हणायची का, हा एक चघळायचा विषय !
*भूत दात विचकत बोलतं वाचलास रे वाचलास. * इंग्लंडला भूत म्हणणं इथपर्यंत तरी ही उपमा फीट्ट वाटते !
अहो, आत्ताच इंग्लंड व आपला मोठ्ठा व्यापार करार झाला, त्यांत एकमेकांच्या भरपूर धांवा व्हायला द्यायचं कलमही आहे वाटतं !
सुंदर आणि जडेजा मस्त खेळले.
सुंदर आणि जडेजा मस्त खेळले.
इंग्लंड नी पण शेवटी ब्रुक ला वगैरे बॉलिंग देऊन दोघांचे वेल डिजरविंग 100 व्हायला हातभार लावला. ऑस्सीज नी हे कधीच केलं नसतं...
आता ओव्हल वर जिंकणं मस्ट आहे...
आता इंग्लंडची गोलंदाजी
आता इंग्लंडची गोलंदाजी निष्प्रभ म्हणायची का, हा एक चघळायचा विषय !
>>>>
मी दुसरीकडे आता हेच चिडवून आलो
पहिल्या डावात गोलंदाजांना मदत होती म्हणून आपल्यावर अशी वेळ आली. दुसऱ्या डावात जवळपास चौघांनी शतके मारून दाखवून दिले खेळपट्टीच अशी होती.
प्रेशर असताना असे खेळले हे विशेष!
आता इंग्लंडची गोलंदाजी
आता इंग्लंडची गोलंदाजी निष्प्रभ म्हणायची का, हा एक चघळायचा विषय ! >> स्टोक्स इंजर्ड असणे हा नक्कीच फॅक्टर म्हणता येईल. दर वेळी त्याच्या स्पेलमधे काही ना काही होत आले आहे. वोक्स चा पेस कमी कमी झालाय.
दोघांच्या सेंच्युर्या होण्यामधे स्टोक्सला काय प्रॉब्लेम होता ? फ्रंट लाईन बॉलर नको वापरू म्हणावे ना. न्व्वडीमधे असलेल्यांनी का करू नये पुर्या सेंच्युर्या जर वेळ असेल तर ?
राहूल, गिल, जडेजा, सुंदर कमाल
राहूल, गिल, जडेजा, सुंदर कमाल खेळले. प्रामाणिकपणे सांगायचं तर दिवसाच्या सुरूवातीला जरी ड्रॉ ची आशा असली, तरी खूप अंधूक होती. किंबहूना पराजयाची शक्यता जास्त वाटत होती. I’m so happy to be proven wrong!! आता ह्यातून प्रेरणा घेऊन भारतीय संघाने ओव्हलवर मॅच जिंकून मालिका बरोबरीत सोडवावी.
*स्टोक्स इंजर्ड असणे हा
*स्टोक्स इंजर्ड असणे हा नक्कीच फॅक्टर म्हणता येईल. * - तसा तर भारताचा हुकमी एक्का बुमरा पण पूर्ण फिट नव्हता. मग फक्त आपलीच गोलंदाजी निष्प्रभ कां म्हणावी ?
तसा तर भारताचा हुकमी एक्का
तसा तर भारताचा हुकमी एक्का बुमरा पण पूर्ण फिट नव्हता... >>> आणि आकाशदीप नसल्याचा सुद्धा फटका बसलाच... दुखापत फिटनेस वगैरे फटके आपल्याला बरेच बसले आहेत. काही ठिकाणी दुर्दैव तर कुठे आयपीएल कारणीभूत त्याचा दोष आपल्याकडे..
आता शेवटच्या सामन्यात पंत नसणे याचा फटका फलंदाजीला बसला तरी तो कवर करायला त्याचा फटका पुन्हा गोलंदाजीला बसू शकतो.
वेगवान गोलंदाज कुठून तीन जमा करायचे हा प्रश्न असल्यामुळे शेवटच्या सामन्यात कुलदीप कडे जाऊ शकतात. निदान स्पिनरमध्ये तरी विकेट टेकिंग ऑप्शन हवा.. पण त्याच वेळी जडेजा आणि सुंदर हे देखील असतीलच. जर खेळपट्टी अशीच असणार असेल तर तीन प्रॉपर वेगवान आणि हे तीन स्पिनर खेळवायला हरकत नाही. अन्यथा हा निर्णय देखील धाडसीच. कोणाचा फिटनेस काय आहे आणि खेळपट्टीचे स्वरूप कसे आहे हे बघून निर्णय घेतील. आपण अंदाज न बांधलेलेच बरे..
*..प्रश्न असल्यामुळे शेवटच्या
*..प्रश्न असल्यामुळे शेवटच्या सामन्यात कुलदीप कडे जाऊ शकतात * - कुलदिपकडे असं नाईलाज म्हणून नाही, तर हुकमी स्पिनरचा जाणीवपूर्वक अंतर्भाव असा सकारात्मक बदल म्हणून पाहिलं पाहिजे !
कुलदीप फॅब फोर काळात असता तर
कुलदीप फॅब फोर काळात असता तर हरभजन कुंबळे प्रमाणे परदेशात सातत्याने अकरात खेळला असता. तेव्हाचे फलंदाज तर भरवश्याचे होतेच पण गरज पडली तर स्विंग गोलंदाजी टाकायला गांगुली होता आणि स्पिन मिळाल्यास सचिन होता.
इथे तर हार्दिक पांड्या सुद्धा कसोटी खेळत नसल्याने ऑल राऊंडर मध्ये वेगवान गोलंदाज नसल्याचा फटका बसतो परदेशात. शार्दुल ठाकूर किंवा रेड्डी घेतो तर संघात, पण त्यांच्यातील एकाही डिपार्टमेंटवर पूर्ण भरवसा नसल्याने पुन्हा फिरून एक्स्ट्रा ऑल राऊंडर किंवा एक्स्ट्रा वेगवान घ्यावा लागतो आणि कुलदीप बाहेरच राहतो.
*...आणि कुलदीप बाहेरच राहतो.*
*...आणि कुलदीप बाहेरच राहतो.* - खरी गोची धोरणात्मक विचारसरणीत आहे; जसं वेगवान गोलंदाज हवेतच असं वाटतं, तसंच संघात एक तरी खराखुरा स्पिनर हवाच असंही तितक्याच तीव्रतेने वाटलं पाहिजे. आपला फिरकीवरचा जर विश्वासच डळमळीत झालाय, तर संघात एखादी जागा उरलीच तर स्पिनर घेवू, असं होणारच. फिरकीच्या ह्या खच्चीकरणामुळे आपल्याकडे ना चांगले फिरकी गोलंदाज तयार होत आहेत, ना आपल्याकडे फिरकी खेळायचं कसब दिसत आहे ! उलट, इतर संघ आपल्या पीचेसवरही चांगल्या तऱ्हेने फिरकी वापरून व खेळून आपलीच वाट लावत आहेत !!
इति फिरकी पुराणं समाप्तम !!
भारतात आपण तीन स्पिनर्ड घेऊन
भारतात आपण तीन स्पिनर्ड घेऊन खेळतोच कि नेहमी ! बाहेर तीन खेळवणे तेंव्हाच शक्य होईल जेंव्हा कोणी तरी फास्ट बॉलिंङ ऑल राऊंडर असेल किंवा पहिल्या सहामधले कोणी जुजबी का होईना बॉलिंग करेल. तोवर हे दोन बाहेर स्पिनसाठी दोन स्पिनर्स हे सुद्धा पाईप ड्रिमच आहे , तीन कुठले घेऊन बसला आहात !
पंतचे नसणे, बुमरा-सिराजच्या फटीगचा प्रश्न, साई-जुरेलचा गुलदस्त्यातला फॉर्म ह्या गोष्टींमूळे ऑल राऊंडरचा भोक्ता असलेला गंभीर कुलदीपला खेळवेल असे वाटत नाही.
<<<दुखापत फिटनेस वगैरे फटके
<<<दुखापत फिटनेस वगैरे फटके आपल्याला बरेच बसले आहेत. काही ठिकाणी दुर्दैव तर कुठे आयपीएल कारणीभूत त्याचा दोष आपल्याकडे..???
सहमत.
<<<पंतचे नसणे, बुमरा-सिराजच्या फटीगचा प्रश्न,>>>
हार्दिक पांड्या म्हणायचे आहे का?
एक प्रश्न. एकूण किती खेळाडू घेऊन परदेशी जायचे याबद्दल काही नियम आहेत का? समजा ३० लोकांना नेले तर?
पैसे तर इतके झाले आहेत भारतात, की खर्च कुठे करावेत हा प्रश्न. मग जाऊ दे आणखी काही खेळाडूंना. पांड्या. सूर्यकुमार यादव, आणि कुणि.
Pages