क्रिकेट - ९

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला तरी पिच फ्लॅट होत जात आहे असे वाटतेय. बॉल थोडाफार काही तरी करत असला तरी एकंदर ट्रेंड ईझी बॅटींग कडॅ झुकत चाललाय असे वाटते. पाऊस हवा म्हणजे मजा येईल Happy

३०० लीड ७ आउट.
जडेजा सुंदर कसे खेळतात ते बघू.
शेवटच्या ३-४ विकेट्स १०-१५ धावात गमवायची परंपरा मोडली तर बरं.

उद्या ही मॅच निकाली होईल. भारताच्या बाजूने किंवा विरुध्द.

जडेजा ५०० धावा
आणि बाद नाही झाला तर सरासरी १००+ राहील..

“ मला तरी पिच फ्लॅट होत जात आहे असे वाटतेय.” - टी ब्रेकमधे पाँटिंग म्हटला कि ‘३५०+ चा तरी लीड हवा. स्पिनर्स चा काही रोल नसेल. विकेट अजूनही सीमर्सना धार्जिणी आहे आणि दोन्ही टीम्सकडे एक सीमर कमी आहे.’

कळीचा मुद्दा म्हणजे भारतीय बॉलर्सनी टिच्चून बॉलिंग करायला हवी. पहिल्या इनिंगसारखं इंग्लिश ओपनर्सना तडाखेबंद सुरूवात करू द्यायला नको कारण ह्या मॅचमधे वेळ भरपूर शिल्लक आहे.

७ ओवर २७
आकाशदीप मस्त टाकत आहेत. विकेट यायला हवी आज..
सिराज आला आता..

सुरुवात तर झाली आहे. इंग्लंड उद्या दिवसभर टिकणार का?.
मला वाटत नाही.
भाऊसाहेब मॅच परवा नाही रहाणार.
राहिली तर 50 रन पाहिजेत अणि दोन विकेट्स. जरा टेन्शन असेल पण अस झाले तरी मी जाईन आणि जिंकून दाखवेन. बोकलत या तुम्ही पण. . Happy

कोणी बघतेय का मॅच..
फॉर ए चेंज कृष्णा धमाल बॉलिंग टाकतोय
सिराजचे लक साथ देत नाहीये..

दुसर्‍या सेशन मधे तरी सुंदरला बोलिंग देणार का ? लॉर्ड्स वर चार विकेट्स घेतल्यानंतर आज पर्यंत त्याला ५-६ ओव्हर्सचा स्पेल टाकूच दिला नाहीये. गिलला बोलिंग रोटेशन करायला जमत नाहिये असं वाटतं.

लंचच्या आधी एखादी ओव्हर देऊन बघायला हवं होतं...

सिराजची #२०१९वर्ल्डकपफायनलट्रेंटबोल्ट मोमेंट भारतासाठी डोकेदुखी ठरलीय. ब्रूक १९ वर होता त्यावेळी. Sad

हरलो

ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि आता इंग्लंड...

गंभीरच्या कारकिर्दीतली सलग तिसरी कसोटी मालिका हरणार भारत असं दिसतंय.

हवे ते खेळाडू, हवा तो सपोर्ट स्टाफ देऊनही फारसं काही हाती नाही आलं.
फुकाची वादावादी, खेळाडू आऊट होऊन परततानाच त्यांना कॅमेरासमोरच काहीबाही बोलणं अशा काही गोष्टींमुळे कोच कसा नसावा ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे गंभीर.

अनावश्यक गोष्टींकडे जास्त लक्ष, परफॉर्मन्स पेक्षा उगाचच नको तिथे आक्रमकपणा दाखवणे या सर्व गोष्टींना गंभीर जबाबदार आहे

मी कालच येणार होतो इकडे पण बोललो जाऊ दे खुश आहेत सगळे विनाकारण मिठाचा खडा नको टाकायला. असू दे मॅच संपल्यावर येतो.

<<<मी कालच येणार होतो इकडे पण बोललो जाऊ दे खुश आहेत सगळे विनाकारण मिठाचा खडा नको टाकायला. असू दे मॅच संपल्यावर येतो.>>>
कसला मिठाचा खडा! मायबोलीवर लिहिणारे विषसुद्धा पचवतात नि आपलाच मुद्दा परत परत मांडत बसतात.
त्यासाठीच तर मायबोली चालू केली.

जर(?!) हा सामना हरलो तर खेळाडूंना नावे ठेवण्यास जागा नाही.
भरपूर धावा काढल्या, गोलंदाजीहि बर्‍यापैकी होती.
बुमराह नि आर्शदीप नसल्याने सिराज नि कृष्णावर नि आकाशदीप वर जास्त भार पडला त्यातून सिराज सोडला तर बाकीचे नवखे.
कप्तान हि नवीन. त्याच्या हि बर्‍याच चुका झाल्या असतील, गोलंदाजी वेळच्या वेळी बदलणे, क्षेत्ररचना चुकीची असणे वगैरे. पण त्यातले मला काही कळत नाही, त्यामुळे असे नक्की म्हणणार नाही की कप्तान नवीन असल्याने चुका झाल्या.
एकूण सर्व संघाला अनुभवाची कमतरता दिसून आली,
गंभीरचे काय काम असते ते मला माहित नाही, म्हणून त्याच्याहिबद्दल बोलणे कठिण.

एक खेळाडू मनात भरला - जडेजा! सहा अर्धशतके, सहा बळी

पाचवी विकेट गेली..
रूट जायला हवा आता ताबडतोब...

शी थांबली मॅच..
आता जसा बॉल हलत होता तसे कदाचित उद्या हलणार नाही..
पूर्ण प्रेशर मध्ये होती इंग्लड.. ६ ओवर ८ रन २ विकेट..

Stumps Sad

उद्या त्यांना रोलरचा सुद्धा फायदा मिळेल. आज तीन चार विकेट जातील अशी सिच्युएशन होती. उद्या मात्र काहीतरी अदभुत खेळावे लागेल. आल्या आल्याच एक विकेट काढून प्रेशर बनवावे लागेल.

पांड्याला अर्जंट कॉल करावा. हा मंत्र घेण्यासाठी. 😀

शिवाय विक्रमसिंह जाणारच आहेत ओव्हलला.त्यांचीही शक्ती असेल भारतासोबत. Happy

सर
तीन ओवर्स नंतर नवीन चेंडू घेतला जाईल, मग भारताचा विजय निश्चित.
मात्र ब्रुकचा गुंडा गर्दी -गार्डिअन प्रमाणे - खेळ आवडला.
पण आता प्रश्न असा आहे की इंग्लंड उरलेल्या ३.४ओवर्स तरी वाचतील का?

*शिवाय विक्रमसिंह जाणारच आहेत ओव्हलला.त्यांचीही शक्ती असेल भारतासोबत. * - पण बोकलतजी देखील जाणार आहेत म्हणे रस्सीखेचीत उलट्या बाजूला शक्ती लावायला ! Wink
शक्यता : इंग्लंड जिंकेल की भारत जिंकेल - 70: 30
प्रार्थना. : इंग्लंड ही मॅच हरावी व भारताने जिंकावी !!!

भाऊ
आपले, म्हणजे माझे हो, क्रिकेट चे काही सखोल ज्ञान नाही पण ज्या ज्या वेळी बुमारा सामना खेळत नाही, त्या त्या वेळी आपण सामना जिकला आहे. मग तुमच्या "शक्यता" काहीही म्हणोत.

Pages