क्रिकेट - ९

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*... माझे हो, क्रिकेट चे काही सखोल ज्ञान नाही * - केशवकूलजी, माझं ज्ञान तर उथळही नसावं पण इतकी तपं मी क्रिकेट बघतो म्हणून ज्ञान असल्याचा थोडा आव तर आणावाच लागतो ना ! Wink

*बुमारा सामना खेळत नाही, त्या त्या वेळी आपण सामना जिकला आहे. * - पूर्वी , सचिन स्वार्थी आहे कारण त्याचं शतक होतं तेंव्हा भारत जिंकत नाही, अशीही एक थिअरी कुणी तरी मांडली होती, त्याची आठवण झाली ! Wink

भाऊ
आपले, म्हणजे माझे हो, क्रिकेट चे काही सखोल ज्ञान नाही पण ज्या ज्या वेळी बुमारा सामना खेळत नाही, त्या त्या वेळी आपण सामना जिकला आहे. मग तुमच्या "शक्यता" काहीही म्हणोत.
Submitted by केशवकूल on 4 August, 2025 - 11:40

सही पकडे हो, अशीच एक सिरीज आपण रोहित, विराट, बुमरा असे सगळे दिग्गज नसताना हि जिंकलो होतो, त्यावरून साक्षात्कार होऊन रोहित विराटने निवृत्ती घेतली, आता बुमरानेपण निवृत्त होऊन फक्त आयपीएल खेळात राहावे, पैशापरी पैसा आणि शरीराला पण आराम, हाय काय नाय काय
सही पकडे हो, अशीच एक सिरीज आपण रोहित, विराट, बुमरा असे सगळे दिग्गज नसताना हि जिंकलो होतो, त्यावरून साक्षात्कार होऊन रोहित विराटने निवृत्ती घेतली, आता बुमरानेपण निवृत्त होऊन फक्त आयपीएल खेळात राहावे, पैशापरी पैसा आणि शरीराला पण आराम, हाय काय नाय काय

खरे तर आपण हि पूर्ण टीम घरी बसवून नवीन रणजी खेळाडूंची टीम पाठवावी परदेशात कसोटी सामने जिंकायला , कुणालाच कॉम्प्लेक्स नको किंवा कुणावर दोषारोप नकोत.

Chris Woakes, right handed bat, comes to the crease, but will bat left-handed and one handed!
देश के लिये!

जिंकलो !!!
सर्व विकेट्स फास्ट गोलंदाजांनी घेवून आपण जिंकलेली ही पहिली कसोटी असावी. कुणी शोधून सांगेल का ?
अभिनंदन भारत (व केशवकूलजी ) !!!
इंग्लंड, चांगली झुंज दिलीत !!

राहिली तर 50 रन पाहिजेत अणि दोन विकेट्स. जरा टेन्शन असेल पण अस झाले तरी मी जाईन आणि जिंकून दाखवेन.
>>

35 रन आणि 4 विकेट्स...
जिंकलो

त्रिविक्रम, गेला होतास का??

मस्त मॅच जिंकली. सीराजने काल सोपा कॅच टाकला आज स्पेशल स्पेल.

खरं सांगायच झालं तर मी मॅच घरूनच पाहिली. तिकीट मिळालही असतं. Happy

आज नेटवर्क इश्यूमुळे क्रिकइंफो कॉमेन्ट्री आणि व्हाट्सअप ग्रुप वरचा राडा यावरच थरार अनुभवला.. एकही बॉल पाहिला नाही.

पण आज घरी गेल्यावर पहिले कालच्या दिवसाची हायलाईट बघणार. आधी ब्रूक आणि रूटने आपल्याला चोपलेला बघणार. मग आजचा थरार बॉल टू बॉल अनुभवणार. विकेटच नाही तर सगळ्या बीट झालेल्या एजेस, मिस झालेले चान्स, तेव्हाची कॉमेंट्री, आपल्या रिॲक्शन... सगळे एखाद्या ब्लॉकबस्टर मूवीसारखे एन्जॉय करणार.. अश्या स्क्रिप्ट रोज रोज लिहिल्या जात नाहीत. लाईव्ह बघता नाही आले तरी नुसते चार विकेट न बघता आजची पूर्ण मॅच बघणार. म्हणजे दृश्यम मेमरी सारखे कायमचे डोक्यात कोरले जाईल. जसे टूटा है गाबा का घमेंड मालिका. पुढे मागे आठवणी उगाळल्या की छान वाटले पाहिजे Happy

सत्तर धावा ६ विकेट्स नि ३५ धावा ४ विकेट्स इंग्लंडला जमल्या नाहित ! हॅट्स ऑफ टू मिया नि प्रसिद्ध ! काय जीव तोडून बॉलिंग केली आहे दोघांनीही. रूट ने पात एकदा वाईट शॉट खेळून मॅच ओपन केली.

ह्या सिरीजचा मानकरी सिराज आहे. पाच टेस्ट्स पठ्ठ्याने न थकता त्याच इंटेंसिटीने बॉलिंग केली आहे. बुमरा नसताना लीड केले आहे. खायचे काम नाही. पंत, सिराज नि सुंदर ह्यांना फूल मार्क्स. गिल, राहुल, बुमरा, आकाश दिप, प्रसिद्ध, जाडेजा ह्यांना थोडे कमी मार्क्स. (काहि ना काही तरी उणीव राहून गेलीये प्रत्येकाकडून) . गिलला कॅप्टन म्हणून स्पिनर्स कसे वापरायचे हे अजून शिकायला हवेय.

स्पेअर अ थॉट फोर जेमी स्मिथ. पाच सामने किपिंग करणे सोपे नाही. त्याच्या बॅटींगचा दर्जा घसरत गेला ह्यात नवल नाही.

ह्या सिरीजचा मानकरी सिराज आहे. पाच टेस्ट्स पठ्ठ्याने न थकता त्याच इंटेंसिटीने बॉलिंग केली आहे. बुमरा नसताना लीड केले आहे. खायचे काम नाही
>>
Can't agree more
मॅन ऑफ द सिरीज त्याला हवा होता
सर्वाधिक विकेट्स

अन् बुमरा असताना / नसताना सिराज ला नवा चेंडू द्यायला हवा. त्यानी फर्स्ट चेंज म्हणून येणं कुठेतरी बरोबर वाटलं नाही...

ज्यांनी लाईव्ह पाहिली नाही त्यांनी हॉटस्टारवर फुल रिप्लेच बघा. मध्ये जाहिराती सुद्धा दाखवत नाहीयेत. त्यामुळे मूड आणि माहोल टिकून राहतो. कॉमेन्ट्री क्लास आहे. सगळ्या डावपेचांचे मस्त विश्लेषण केले आहे. बॉल स्विंग होताना बघायला सुद्धा मजा येते. इंग्लंडमध्ये दोन्हीकडचे पब्लिक जसे प्रत्येक बॉल चिअर करतात ते बघणे अमेझिंग असते. आपला सामना नसला तरी मजा येते. हा तर आपला होता.

सिराजचे कौतुक होणारच पण गिलला सुद्धा मानला आज. सुरुवातीला दोन फोर जाऊन सुद्धा त्याची बॉडी लँग्वेज कमालीची सकारात्मक होती. कुठलाही शो ऑफ न करता प्रेशर हॅण्डल करत होता. हे त्याचे खरे कॅरेक्टर असावे जे आता बाहेर पडत आहे.

लाईव्ह बघितलेल्यांनी सुद्धा पुन्हा बघा. कारण लाईव्ह बघताना डोक्यात मॅचचे टेन्शन असल्याने बरेच गोष्टी निसटतात. त्याही टिपता आल्या. मी उद्या घरी कोणाला तरी पकडून अजून एकदा बघणार.

भारतीय संघाला मानले पाहिजे.
पहिला सामना हरताच सोशल मीडियावर जिथे तिथे संघ निवडीपासून टीका चालू होती. ना पुरेसे अनुभवी गोलंदाज ना फलंदाज होते. आणि बुमराह सुद्धा फक्त तीन सामने खेळणार होता. कर्णधार नवा, इंग्लंडचा अनुभव नाही आणि टॉस सुद्धा पाच पैकी पाच हरला होता. पण त्याला किंवा या संघाला या गोष्टीची कधीच सहानुभूती मिळाली नाही.

दुसरीकडे इंग्लंड टीम काही तोफ नव्हती पण संधी मिळताच चढून बसणारी होती. पण शेवटी आपण करून दाखवले. आणि तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी आपल्याकडेच राखली. ही बरोबरी नाही तर या संघाचा विजय आहे. तो देखील निसटता नाही तर फार मोठा आहे.

आणि तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी आपल्याकडेच राखली. >> ट्रॉफी नसून मेडल्स आहेत जि दोघांनाही मिळणार. स्पाँन्सर्स नी दिलेली ट्रॉफी वेगळी आहे. आधीची पतौडि ट्रॉफी आपल्याकडे नाहिये. आधीचा दौरा पण ड्रॉ होता. त्याच्या आधी इंग्लंड जिंकले होते त्यामूळे त्यांच्याकडे राहणार.

ती आधी पतौडी ट्रॉफी होती जी फक्त इंग्लंड मध्ये खेळणाऱ्या सिरीजला होती. भारतात खेळल्या जाणाऱ्या ट्रॉफीचे जे काही नाव होते आता विसरलो.
पण आता अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी झाली जी बहुधा या दोन देशातील मालिका मध्ये दिली जाणार जसे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मग ती कुठल्याही देशात का असेना..
हे या ट्रॉफीचे पहिलेच वर्ष असल्याने शेअर म्हणू शकतो. पण या दोन देशातील मागची सिरीज बघितली तर ती भारतातली आपण जिंकल्याने बॉर्डर गावस्कर धर्तीवर आपण ट्रॉफी राखली म्हणू शकतो. याचा एक वेगळाच आनंद आहे Happy

*गिलला कॅप्टन म्हणून स्पिनर्स कसे वापरायचे हे अजून शिकायला हवेय.* -
असामीजी, आधी स्पिनवर विश्वास ठेवायला शिकायला हवं! ह्या सामन्यात, पहिल्या डावात इंग्लंडच्या 200 धावा झाल्यावर गिलला जडेजाची व दुसऱ्या डावात 190 धावा झाल्यावर सुंदरची आठवण झाली ! आपला स्पीनवरचा विश्वासच डळमळीत झालाय, ही खरी गोची आहे !

या सामन्यात मात्र कुलदीपला न घेणे हा निर्णय अचूक ठरला. जडेजा सुंदर यांची फलंदाजी कामाला आली आणि तीन प्रॉपर वेगवान गोलंदाजच जिंकून देणार होते इथे.

*आणि तीन प्रॉपर वेगवान गोलंदाजच जिंकून देणार होते इथे. * -
आपल्याकडे आता चांगले वेगवान गोलंदाज तयार होत आहेत, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे . पण, म्हणून आपण अशा एकांगी गोलंदाजीवरच विसंबून रहाणं फारसं शहाणपणाचं नाही. आणि प्रॉपर फिरकी गोलंदाज संघात घ्यायचेच नाहींत , ऑलराऊंडर स्पिनरना वापरायचेच नाही व म्हणायचे " तीन प्रॉपर वेगवान गोलंदाजच जिंकून देणार होते इथे " !!! नाही पटत.

खेळपट्टी आणि कंडीशन बघून घेतलेला निर्णय आहे तो आणि योग्य ठरला आहे.
आपण आधीही आश्विन बरेचदा खेळवला आहे पण बाहेर जिथे मदत नाही तिथे निष्प्रभ ठरला आहे.
सेना देशात एकही स्पिनर न घेता न वापरता चार वेगवान खेळवून सुद्धा जिंकलो आहोत.
कुलदीप इंग्लंडमध्ये एकच कसोटी खेळला आहे आणि त्यात विकेटलेस आहे. त्यामुळे तो येईल आणि इंग्लंड एकदम क्लूलेस होत विकेट टाकेल असेही नाही. त्यालाही काही मदत मिळणे गरजेचे.
स्पिन गोलंदाजी आपली ताकद आणि इंग्लड कमजोरी असली तरी कंडीशन सुद्धा बघणे गरजेचे आहे.
त्याच प्रकारे इंग्लंड न्यूझीलंड यांची ताकद स्विंग आणि वेगवान गोलंदाजी असली तरी भारतात त्यांनी जेव्हा कसोटी मालिका जिंकल्या आहेत त्या फिरकी गोलंदाजीच्या जीवावरच जिंकल्या आहेत.

*खेळपट्टी आणि कंडीशन बघून घेतलेला निर्णय आहे तो आणि योग्य ठरला आहे.* - जिंकले म्हणूनच अचूक ठरला आहे, असंही म्हणता येईल !! Wink

जिंकले म्हणूनच अचूक ठरला आहे, असंही म्हणता येईल !! Wink
>>>>

इंग्लड पाचव्या दिवशी थोडक्यात जिंकली असती तरी असेच म्हटले असते की हा निर्णय अचूक ठरला.

फायनल स्कोअर लाईन 2-2 असली तरी आपण या मालिकेत त्यांच्या देशात जाऊन वर्चस्व गाजवले आहे असे मला वाटते.

आणि आपण 3-1 ने हरलो असतो तरी मी याला बरोबरीची टक्कर म्हटले असते. सुदैवाने तसे झाले नाही हे बरे, अन्यथा हा संघ उगाच सोशलमिडीयावर झोडपला गेला असता जे हा डिसर्व करत नव्हता...

*फायनल स्कोअर लाईन 2-2 असली तरी आपण या मालिकेत त्यांच्या देशात जाऊन वर्चस्व गाजवले **आणि आपण 3-1 ने हरलो असतो तरी मी याला बरोबरीची टक्कर म्हटले असते. * -
अहो, जिंकले ते कौतुकास्पद आहे, हरले असते तरी टक्कर दिली असंच असतं वगैरे मुद्दाच नाही. मला जास्त नसेल पण तुमच्या इतकंच अप्रूप व आनंद आहे ह्या सामन्यातील व मालिकेतील आपल्या कामगिरीबद्दल. फास्ट गोलंदाजीचं श्रेयही मी यत्किंचितही कमी लेखलेलं नाहीं. फिरकी गोलंदाजीबद्दल असामीजिंचं निरीक्षण मला योग्य वाटलं म्हणून माझं मत मांडलं इतकंच. अशा चर्चेसाठीच तर असा धागा असतो ना. कुणाला चूक ठरवण्याचा अजिबात हेतू नाही किंवा माझंच खरं हा अट्टाहासही नाही. आपल्या संघाच्या गुणवत्तेबद्दल साशंकता तर नाहींच नाहीं !!

अहो मी सुद्धा माझे मत मांडले आहे. मी काही कुलदीप विरोधात नव्हतो. पण तीन वेगवान हवेच होते. जडेजा आणि सुंदर फलंदाज म्हणून गरजेचे होतेच. कुलदीपचा विचार यात झालाच तर साई किंवा नायर जागी फलंदाज कमी करून झाला असता. पण पंत गेल्याने भरवश्याचा फलंदाज कमी झाला त्यामुळे तो पर्याय सुद्धा बाद झाला.
आपण म्हणायला कुलदीप हवा असे लाख म्हणतो पण त्याला कुठे फिट करायचा उत्तर आपणही देऊ शकत नाही.

*त्याला कुठे फिट करायचा उत्तर आपणही देऊ शकत नाही* -
याला सविस्तर उत्तर देणार होतो पण अनिरुद्धनी " तुमच्या बाबतीत हे अगदी यथार्थ आहे भाऊ ", असं म्हणून माझं तोंडच बंद केलंय !! Wink

तसे मलाही उत्तराची अपेक्षा नव्हती आणि आता मालिका संपल्यावर फायदा सुद्धा नाही आता.
पण मालिका सुरू असताना गंभीर आणि गिल यांनाच सापडले नाही तिथे आपण कोण पामर Happy

Pages