क्रिकेट - ९

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तीन सीमर्स ओव्हल वर इंग्लंडच्या २० विकेट्स घेतील हा विश्वास कुठून येतो कळत नाही.

आठव्या क्रमांकापर्यंत बॅटिंग असलीच पाहिजे हा अट्टाहास का? सामना जिंकण्यापेक्षा हरता कामा नये, भले ड्रॉ झाला तरी चालेल अशा विचारानेच आजची संघनिवड झालेली दिसतेय.

तीन वेगवान आणि दोन फिरकी टोटल पाच आहेत.
सहावा यात जोडला असता तर तो शार्दुल किंवा कुलदीप असता.
कदाचित शार्दुलच असता अन्यथा शेपूट अजून वाढले असते.
पण तो नसल्याने गोलंदाजीत फार मोठा फरक पडणार नाही असे वाटले असेल.
मला वाटते ऋषभ पंत नसल्याने जास्तीचा फलंदाज खेळवण्यात आला.

हा तर सिंगल सुद्धा नव्हता.. पण दरवेळी सिंगल कुठून मिळेल या शोधात असतात. अरे पण मेंटल प्रेशर किती पडते त्याने. दरवेळी नॉन स्ट्रायकर एंडल जो असतो त्यालाही नेहमी चिकी सिंगल साठी तयार राहावे लागत असेल. प्रत्येक बॉलवर. मेंटल दमछाक आहे ही सुद्धा. निवांत उभे राहायला हवे कसोटीत..

सिंगल नव्हता.. पण दरवेळी सिंगल कुठून मिळेल या शोधात असतात. अरे पण मेंटल प्रेशर किती पडते त्याने. दरवेळी नॉन स्ट्रायकर एंडल जो असतो त्यालाही नेहमी चिकी सिंगल साठी तयार राहावे लागत असेल. प्रत्येक बॉलवर. मेंटल दमछाक आहे ही सुद्धा. निवांत उभे राहायला हवे कसोटीत..

किती घाई व अविचार !! ह्या दर्जाच्या क्रिकेटमध्ये न शोभणारा धावचीत !! गिल देखील स्वत:ला माफ नाही करणार ह्याबद्दल !! Sad

एकूण ग्रास कव्हर बघता तीन स्पिनर्स न घेतले हे फारसे चूक वाटले नाही. आता दोन कुठले हवे होते ह्याबद्दल वाद घालूया Happy

निवांत उभे राहायला हवे कसोटीत.. >> गावस्कर नि हॉब्ज्स (बहुधा) ह्यांचे मत होते कि कसोटिमधे सर्वात सेफ जागा म्हणजे नॉन स्ट्राईकर एंड Happy चिकी संगल्स बद्दल मला आक्षेप नाही पण नसलेली सिंगल घेण्याचा अट्टाहास नडतोय.

राहूल ने स्टंप्सच्या जवळ असलेला बॉल कट करण्याचा केलेला प्रयत्न आणि गिल ने नसलेल्या सिंगलच्या नादात घालवलेली विकेट, दोन्ही अनावश्यक गिफ्ट्स होत्या.

आज बरेच जण म्हणाले की हल्ली तीन विकेट पडल्या की आम्ही टीव्ही लावायचो....
पंत लवकरात लवकर परत यावा...

जश्या चिकी सिंगल हे लोक पूर्ण सिरीज घेत आहेत तश्या कधी गावस्करने घ्यायचा विचार सुद्धा केला नसेल. नॉन स्ट्रायकर एंडला सिंगल घेऊन जा याचा अर्थ नक्कीच चिकी सिंगल घेऊन जा असा अभिप्रेत नसणार गावस्करला.

क्लोज सिंगल घेतात आणि नंतर काय कोणाचा कॉल डिस्कशन करतात असे चित्र पूर्ण सिरीज बघतोय. पंत आणि गिल खेळताना तर हेच चालू असते. गिलबाबत खरे तर आश्चर्य वाटते जेव्हा त्याच्यासारखा दर तिसऱ्या डावाला शतक मारायची क्षमता असलेला खेळाडू अश्या मेंटेलिटीने खेळतो जेव्हा खरेच तश्या फॉर्ममध्ये सुद्धा आहे.

Live
Derbyshire vs Northants, 41st Match
County Championship Division Two

DER 377 & 41/1 (15.2 ov)
NOR 550/9d
Luis Reece* 9(29)
Zak Chappell 22(51)
Justin Broad 0/5 (3.2 ov)
Day 3 - Derbyshire trail by 132 runs.

इथे पहिल्या इनिंगला यूझवेंद्र चहलने ६ विकेट काढल्या आहेत.

गेला ज्यूरेल.. ६ विकेट झाल्या.
जडेजा आणि साई चांगल्या बॉल वर बाद झाले..
याने चुकीचा फटका मारला..
राहुल फालतू बाद झाला..
आणि गिल विचारायलाच नको..
पंत नसल्याने वेगळे काही बघायला मिळाले नाही..
करून नायर सोबत त्याचे त्रिशतक व्हायला कोण थांबणार हा प्रश्न आहे आता

<<काय मेंटेलिटी आहे समजत नाही.>>
टी २० नि वन डे यांचा अर्तिरेक, विशेषतः आय पी एल, त्यातून मिळणारे खूप जास्त पैसे यापुढे टेस्ट खेळणे म्हणजे पैशाच्या दृष्टीने वेळ घालवणे आहे असे वाटत असेल.

टी २० नि वन डे यांचा अर्तिरेक, विशेषतः आय पी एल, त्यातून मिळणारे खूप जास्त पैसे यापुढे टेस्ट खेळणे म्हणजे पैशाच्या दृष्टीने वेळ घालवणे आहे असे वाटत असेल. >> झक्की तुम्ही त्यांच्या जागी असता तर तुम्ही काय केले असते ? पैसे सोडून दिले असते का टेस्ट खेळण्यासाठी ?

*...२० नि वन डे यांचा अर्तिरेक, ..*. -
मी देखील वैतागून मर्यादित षटकांच्या सामन्यांना दोष देत असतो पण तें तितकंसं खरं नसावं असं मलाही आता वाटू लागलं आहे. कोणताही चांगला खेळाडू सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळताना स्वतःच्या खेळात आवश्यक ते बदल करू शकतो, हे अनेक खेळाडूंनी सिद्ध केलंय. ( अर्थात, सेहवाग, पंत सारखे अपवाद , ज्यांची प्रतिभा त्यांच्या शैलिशी व मानसिकतेशीच जखडलेली असते ) शिवाय, फक्त कसोटी सामन्यांच्या युगातही आपली कधीही त्रेधातिरपीट उडतच नव्हती, असंही नाही. कसोटी खेळताना केलेल्या चुकांबद्दल ( उदा. काल गिलचं धांवबाद होणं ) क्रिकेटरना दोष द्यावा पण क्रिकेटच्या इतर प्रकाराना मात्र नको, हे आता माझं मत झालं आहे.

अर्थात, दोष द्यायचाच तर माझ्यासारखा खवडूस तो कसाही देतोच -

अरे, मेल्याना साधा टॉस जिंकता येत नाही, ते मॅच काय जिंकणार !!IMG_20250730_170901.jpg

हे खेळाडू कसोटी सिरीयसली खेळत नाही हे चुकीचे आहे.
म्हणजे पैसे हे कारण मानले तरी देशासाठी खेळल्याने त्यांना ब्रँड व्हॅल्यू मिळते आणि त्यातून पैसा.
पाच दिवसांची कसोटी, महिनाभर चालणाऱ्या मालिका आणि तुमचे नाव बातम्यात आणि चर्चेत राहणे..
एकीकडे गिल आणि पंत हवा करत आहेत तर तेच आज रोहीत कोहली यांचे कुठे नाव नाही..
प्रत्येक नावाजलेला खेळाडू पीआर वर पैसे का खर्च करतो. कारण त्या लोकप्रियतेमुळे त्याहून जास्त रिटर्न मिळतात.
गिल तर कप्तान आहे. त्याची एक वेगळी ब्रँड व्हॅल्यू असते.
त्यामुळे या चुकांना आयपीएल मधील पैसे जबाबदार नाहीत तर या बेसिक चुका आहेत ज्या चुकीच्या एप्रोचने खेळल्याने होत आहेत.

कसोटीत सुद्धा कसा अप्रत्यक्षरीत्या पैसा आहे हे सांगायला वरचे पोस्ट केली आहे.
याचा अर्थ असा नाही की त्या पैशावर डोळा ठेवूनच हे खेळत आहेत.
सर्वात पहिले हे खेळाडू आहेत. आणि आपले टॅलेंट सिद्ध करायला कसोटीपेक्षा मोठा प्लॅटफॉर्म दुसरा नाही. आणि कोहली शर्मा नंतर गिल पंत राहुल बुमराह वगैरे यांचे कसोटीला महत्त्व देणे हे कौतुकास्पद आहे

पैसे, प्रसिद्धी ह्या गोष्टी आहेतच पण क्रिकेटची आत्यंतिक आवड व क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची अखंड जिद्द , याही तितक्याच, किंबहुना त्याहूनही अधिक, प्रभावी अशा प्रेरणा असाव्यात; त्याशिवाय, इतक्या प्रचंड स्पर्धेत , वर्षानुवर्ष इतकी प्रचंड मेहनत घेवून राष्ट्रीय संघात स्थान मिळवणे अशक्य आहे !

नायर गेला..
सुंदर गेला..
बाकी दोन सुद्धा जातील पटकन..
संपवा लवकर.. आणि काढा त्यांच्या सुद्धा पटापट

पहिल्या डावात इंग्रजांसमोर २२४ धावांचे मोठ्ठे आव्हान! बघुया आमच्या प्रसिद्ध भेदक गोलंदाजी समोर आता काय दिवे लागतायेत ते!

आज दिवस अखेर किमान १००+ धावांची आघाडी इंग्रज घेतील का? त्यासाठी पहात रहा भारत - इंग्लंड अंतिम कसोटी सामना!

सध्या या रेटने धुलाई सुरु आहे. आजच्या ७६ ओव्हर्स बाकी आहेत.

* ५ च्या सरासरीने ६० ओव्हर्सच धरल्या तरी आज दिवस अखेर अजून ३०० धावा कुटतील हे ब्रिटिश.

Pages