Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ढोसा तो चहा आणि बसा देवळात
*तसे मलाही उत्तराची अपेक्षा नव्हती * - पण त्याचं हे कारण तुम्हाला अपेक्षित नसावं -
ढोसा तो चहा आणि बसा गुपचूप देवळात जावून प्रवचनाला ! ' फिरकी ' चा इथे जप करत बसता, म्हणून सगळे फिरकी घेतात तुमची, एवढंही नाही कळत !
भाऊ, मस्तच!
भाऊ,
मस्तच!
पण मी तुमच्याशी १००% सहमत आहे. इंग्लंडच्या बझबॉलच्या तडाख्याला कुलदिपच्या अपारंपारीक डावखुर्या फिरकीने वेसण घातली असते असे वाटले होते मलाही. असो. गंभीर, गिल आणि इतरांना असे वाटले नाही त्यामुळे आपल्या वाटण्याला वाटाण्याच्या अक्षता देऊन बोळवण करुयात.
*त्यामुळे आपल्या वाटण्याला
*त्यामुळे आपल्या वाटण्याला वाटाण्याच्या अक्षता देऊन बोळवण करुयात. * - हो s s य , महाs s राजा !!!
भाऊ
भाऊ
लिहायला उशीरच झाला, पण काय
लिहायला उशीरच झाला, पण काय जबरदस्त झाली मॅच!! टेस्ट क्रिकेट अॅट इट्स बेस्ट!! आणि अश्या मॅचमधे भारत जिंकला!! अवर्णनीय आनंद!! कहर केला सिराज-कृष्णाने किया ओव्हलवर.
खरं तर दोन्ही टीम्सकडे एक बॉलर कमी होता. इंग्लंडचा अपघाताने आणि भारताकडे बाय डिझाईन. हे ह्या वेळी चाललं, यशस्वी ठरलं. पण लाँग टर्म भारताने चार प्रमुख बॉलर्स खेळवावे. (एक तरी प्रॉपर स्पिनर).
गील बॉलर्सना योग्य प्रकारे
गील बॉलर्सना योग्य प्रकारे वापरण्यात कमी पडला हे नक्की.
कोच जरा बरा असता तर आपण ही सिरीज आरामात 4-0 जिंकली असती. दोन्ही हरलेल्या मॅचेस आपण जिंकायच्या परिस्थितीत होतो. ऑस्ट्रेलियात तेच झाले. तिथेही आपण बरोबरी तरी साधू शकलो असतो.
टीम सिलेक्शन बर्याच वेळा चुकलय.
महत्त्वाच्या वेळेस रन आउट होणे, बॉलर विसरणे, फिल्डर boundry लाईन पासून आत असणे (आकाशदीप) ही सगळी कोच बंडल असण्याची लक्षणे आहेत़
'ठेविले अनंते तैसेचि रहावे l
'ठेविले अनंते तैसेचि रहावे l चित्ती असो द्यावे समाधान ||
इंग्लंडच्या बझबॉलच्या
इंग्लंडच्या बझबॉलच्या तडाख्याला कुलदिपच्या अपारंपारीक डावखुर्या फिरकीने वेसण घातली असते असे वाटले होते मलाही >> मलाही हे पटते. सामना संपला असला तरी क्रिकेट संपलेले नाही. गिल अजून बरीच वर्षे कप्तान असेल नि आपण इंग्लंड मधे २०२७ मधे बहुधा परत खेळतोय. अश्विनच्या ब्लॉग वर त्याने "गिल फिरकी चांगला खेळतो त्यामूळे त्याला फिरकी इफेक्टीव्ह ठरेल असे वाटाले नसावे " असे लिहिलय. हे फारसे पटाले नाही. गिल फिरकी बेटर दॅन एव्हरेज खेळतो - मास्टरी आहे वाटली नाही (हेच जैस्वाल ला बघा म्हणजे फरक कळतो). पण ह्याचा त्याने फिरकी गोलंदाजांवर अविश्वास दाखवण्यामागे किती भाग आहे ह्याबद्दल मला संशय आहे. खुद्द गंभीर दिल्ली कडून खेळताना स्पिनर्स्चा वापर करत असे म्हणून हे अजूनच पझलिंग आहे. मला एक शक्यता वाटते ती मॉर्केल बद्दल. तो अशा देशातून आला आहे जिथे स्पिनर्स हा आफ्टर थॉट असतो (हे चूक कि बरोबर हे बाजूला ठेवतो) त्यामूळे त्याचा कल प्लॅनिंग करताना त्याच्या शक्ति स्थळांकडे अधिक असावा असे वाटते. शेवटच्या सामन्यामधे रूट नि ब्रूक सुसाट सुटले असताना एक प्रयोग म्हणून तरी जाडेजा किंवा सुंदर ( ज्याने मागच्या टेस्टमधे फ्लाईट चा खुबीने वापर करून विकेट्स घेतल्या होत्या) त्यांना बर्याच आधी १-२ ओव्हर्स द्यायला हरकत नव्हती. कुल्पदीप शेवटच्या टेस्टमधे न खेळणे मला पटले होते पण तोच ट्रेंड वेस्ट इंडीजमधे सुरू राहिला तर नक्कीच आपण पेसर वर अधिक अवलंबून राहू लागलो आहोत असे म्हणायला लागणार आहे.
गावस्करचे वर्क लोडमॅनेजमेंटबद्दल ताशेरे ओढाणारे वक्तव्य वाचले नि गम्मत वाटली. हे ज्यांना जास्त लागू होते ते (रोहित, कोहली) सध्या खेळत नाहियेत नि बुमराला व्हाईट ग्लोव्ह ट्रीटमेंट देऊन हाताळायला हवे ह्याबाबत कॉमन सेन्स असणार्या कोणालाही शंका नसावी. त्यामूळे गावस्करला हे मधेच का सुचले असावे ह्याची गम्मत वाटते. मात्र हे जर बुमराशी रिलेटेड असेल तर 'तुला दीर्घ कारकिर्द हवी असेल तर तुझा पेस कमी कर ' हा सल्ला कपिलला देणार्या गावस्करबद्दल सॅडली गावस्कर हॅज लॉस्ट हिज मार्बल ह्यापलीकडे काही म्हणता येणार नाही.
*हे जर बुमराशी रिलेटेड असेल*.
*हे जर बुमराशी रिलेटेड असेल*. - असामिजी, बुमराची विश्रांती दुखपतीशी निगडित असल्याने त्याला लोडमॅनेजमेंट विषयीचे आपले आत्ताचे मत लागू होत नाही, हे गवसकरने स्पष्ट केलंय.
*त्यामूळे गावस्करला हे मधेच का सुचले असावे ह्याची गम्मत वाटते. * - बीसीसीआय ने आज खेळाडूंना सामना
निवडीचे अधिकार नाकारण्याचा निर्णय जाहीर केलाय. त्या संदर्भातच गावसकर यांनी री ओढली असावी !
अग, नवीन ' लोड मॅनेजमेंट ' पॉलिसीनुसार मला आता ही हलकी ऑफिस बॅग देण्यात आली आहे !!
भाऊ, वर्कलोड व्यंचि मस्तच!
भाऊ, वर्कलोड व्यंचि मस्तच!
गावस्करचा वा तेंडुलकरचा स्ट्रेट ड्राईव्ह, विश्वनाथचा स्क्वेअर कट किंवा कोहलीच्या कव्हरड्राईव्ह इतकंच कमालीचे टायमिंग असते तुमच्या तरल विनोदी चित्रांत!
हलकी बॅग
हलकी बॅग
कृष्णाजी, तुम्ही ज्या व
कृष्णाजी, तुम्ही ज्या व ज्यांच्या फटक्यांचा उल्लेख केलाय, ते तर अविस्मरणीय, अमूल्य ठेवा आहेत क्रिकेटचा !! कुठे इंद्राचा ऐरावत व कुठे माझी तट्टाणी !! ( आणि हो, मी खूपदा मंत्रमुग्ध होत पाहिली आहे विश्वनाथची ती स्क्वेअर कट ! इतकी सहजसुंदर, सफाईदार व जादुई ! Simply, out of this world !!! )
मी खूपदा मंत्रमुग्ध होत
मी खूपदा मंत्रमुग्ध होत पाहिली आहे विश्वनाथची ती स्क्वेअर कट >>>
गांवी टी व्ही नव्हता दिसत. आणि त्या काळी सामने फारसे नव्हते लाईव्ह टीव्हीवर पण मला एकदाच विश्वनाथचा खेळ टीव्हीवर पहायला मिळालेला. २२२ केलेल्या. तेंव्हा शाळेत होतो घरा पासून २-३ किमी चालत गेलेलो एका इरिगेशन इन्जिनियरच्या बंगल्यावर टीव्ही पहायला तेंव्हा पाहिलेला आता अंधुकसा आठवतोय. पण ती मनगटी नजाकत अजुनही आठवतेय.
*मनगटी नजाकत * - यू सेड इट!!!
*मनगटी नजाकत * - यू सेड इट!!!!
विश्वनाथ चा खेळ कधी पाहिला
विश्वनाथ चा खेळ कधी पाहिला नाही (वय आड आलं), पण ज्यांचा पाहिला आहे त्यात मला स्क्वेअर कट कायमच डाव्यांचा जस्त नजाकतदार वाटत आला आहे. हाय बॅकलिफ्ट वाला लारा, कांबळी टाइप कुणी असेल तर अजूनच सुंदर
ऐकावे तें नवलच ! माझ्या
ऐकावे तें नवलच ! माझ्या मित्राने आत्ताच मला पाठवलेल्या पोस्टचा सारांश -
इंग्लंड - भारत मालिकेतल्या ( 2025 ) अनेक खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीचं आपण कौतुक करतो आहोत. 1966ला इंग्लंडच्या दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिजच्या संघाने मालिकेत 3. - 1 विजय मिळवला होता. व आत्ता आपण कौतुक करतो आहोत, ती सर्व कामगिरी त्या संघातल्या एकाच खेळाडूने करून दाखवली होती - द ग्रेट गारफील्ड सोबर्स !! त्यांची कामगिरी -
1 कर्णधार म्हणून पांचही सामन्यात टॉस जिंकला,
2 वैयक्तिक धांवा - 722,
3 विकेट्स - 20
व
4 झेल - 10
!!!
- द ग्रेट गारफील्ड सोबर्स
- द ग्रेट गारफील्ड सोबर्स
>>
कमाल
बॅट, बॉल आणि टॉसचा कॉइन सगळे
बॅट, बॉल आणि टॉसचा कॉइन सगळे आपल्या घरून आणले असतील
बॅट, बॉल आणि टॉसचा कॉइन सगळे
बॅट, बॉल आणि टॉसचा कॉइन सगळे आपल्या घरून आणले असतील Happy
>>
आपल्या लाडक्यांनी खेळलं तरच कौतुक करायचं, नाहीतर उपरोधिक कमेंट पास करायची ही अटीट्यूड बदलून बघ की कधीतरी
एका दिग्गजाच्या फार मोठ्या कामगिरीला चांगलं म्हणण्यात काय कमीपणा वाटतो कोण जाणे...
*...सगळे आपल्या घरून आणले
*...सगळे आपल्या घरून आणले असतील * -
उलट, सोबर्सच्या हातात आल्यामुळे बॅट, बॉल व नाणेफेकीचं तें नाणं धन्य झाले असतील !!!
अँकी नं.१
अँकी नं.१
ते कौतुकच होते
समजले नसेल तर सोडून देऊ
मोठे उपकारच की..
मोठे उपकारच की..
सोबर्सचं नशीब थोर की त्याच्या
सोबर्सचं नशीब थोर की त्याच्या वेळेला मायबोली आणि सर नव्हते. नाहीतर त्याने 'हवं तर रन्स/विकेट्स कमी करतो/घेतो, पण कौतुक आवरा' असं जाहीर केलं असतं.
एक fwd what's app post
एक fwd what's app post
जशीच्या तशी कॉपी पेस्ट
------------------
वॉशिंग्टन सुंदरच्या या मालिकेतील कामगिरीचं विश्लेषण:
284 धावा सरासरी 47.33 ने
7 बळी सरासरी 38 ने
फक्त वरवर पाहिलं तरी तो एक उत्तम अष्टपैलू ठरतो. पण खोलात गेल्यावर त्याच्या कामगिरीची खरी परिणामकारकता समजते — केवळ अष्टपैलूपणाच नाही, तर सामन्याचे प्रवाह बदलणारी भूमिका.
दुसरी कसोटी, बर्मिंगहॅम:
८व्या क्रमांकावर येत शुभमन गिलसोबत 144 धावांची भागीदारी केली, स्वतः 42(103) धावा करत सामना सावरला. चौथ्या डावात स्टोक्सचा महत्त्वाचा बळी घेतला आणि भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
तिसरी कसोटी, लॉर्ड्स:
तिसऱ्या डावात 4-22 अशी मॅचविनिंग स्पेल टाकली, ज्यात रूट, स्टोक्स आणि स्मिथ यांना बाद केलं. इंग्लंडचा डाव 192 धावांत संपवला. सामना भारताच्या बाजूने झुकवला, जरी आपण सामना जिंकू शकलो नाही.
चौथी कसोटी, मँचेस्टर:
७०व्या षटकापर्यंत गोलंदाजीला बोलावलं नाही, पण लगेच पोप आणि ब्रूक यांना बाद केलं. नंतर 206 चेंडूत नाबाद 101 धावा करत ऐतिहासिक ड्रॉ वाचवला — एक अविस्मरणीय पुनरागमन!
पाचवी कसोटी, ओव्हल:
भारत 153/6 अशा कठीण स्थितीत असताना 26(55) अशा संयमी खेळीने संघाला सावरलं. दुसऱ्या डावात भारत 357/9 असताना मैदानात आला आणि 46 चेंडूत 53 धावा करत झंझावाती फटकेबाजी केली. भारताचा स्कोअर 396 वर नेला. भारताने केवळ 6 धावांनी सामना जिंकला.
तर, 2 विजय, 1 ड्रॉ आणि 1 पराभव अशा 4 सामन्यांमध्ये त्याने निर्णायक योगदान दिलं. त्याचं एकूण अष्टपैलूपणं स्पष्ट आहेच, पण या मालिकेने सिद्ध केलं की केवळ बॅटिंग अॅस्पेक्टमधूनही तो किती मौल्यवान आहे.
कधी परिस्थितीची गरज असेल तर 26(100) अशी संयमी खेळी करत उत्कृष्ट बचावात्मक कौशल्य दाखवतो, आणि कधी 53(46) धावांची धडाकेबाज खेळी करत इंग्लिश सीमर्सना त्यांच्या घरच्या मैदानावर 140 किमी/तास वेगाने टाकलेल्या बाऊन्सरवरही सिक्सर मारून झटका देतो.
अश्विन निवृत्त झाला आणि जडेजा ३७ वर्षांचा झाला आहे — त्याच्या हातात आता २ वर्षं उरली असतील. त्यामुळे वॉशिंग्टन सुंदरसाठी ही सर्वोत्तम संधी होती — भारताचा पुढचा महान स्पिन-बोलिंग अष्टपैलू बनण्याची. आणि त्याने ही संधी खऱ्या अर्थाने साधली!
टीप: तरीसुद्धा मी म्हणेन की तो बॅटिंग अष्टपैलू आहे.
उलट, सोबर्सच्या हातात
उलट, सोबर्सच्या हातात आल्यामुळे बॅट, बॉल व नाणेफेकीचं तें नाणं धन्य झाले असतील !!! >> वाह ! क्या बात आहे भाऊ ! व्य.चि. आवडले.
एका दिग्गजाच्या फार मोठ्या कामगिरीला चांगलं म्हणण्यात काय कमीपणा वाटतो कोण जाणे... >> सिरीयसली, स्वतःला क्रिकेटप्रेमी समजतोस नि हे असे शिंतोडे जाता येता उडवत असतोस. मागे ब्रॅडमन झाला, मधे सचिन झाला (तो रेकॉर्ड साठी खेळला) , आता सोबर्स झाला. बाय द वे हे तुझे कौतुक आहे. समजले नसेल तर सोडून दे
भारताचा पुढचा महान स्पिन
भारताचा पुढचा महान स्पिन-बोलिंग अष्टपैलू बनण्याची. आणि त्याने ही संधी खऱ्या अर्थाने साधली!
टीप: तरीसुद्धा मी म्हणेन की तो बॅटिंग अष्टपैलू आहे. >> सॉर्टा अॅग्री. सुंदर आधी फलंदाज होता नि नंतर बॉलिंग सुरू केली. तो एकंदर हुशार वाटतो तेंव्हा अॅश जसा बहरत गेला बॉलिंग मधे तसा बहरेल अशी आशा ठेवूया.
विश्वनाथ चा खेळ कधी पाहिला
विश्वनाथ चा खेळ कधी पाहिला नाही (वय आड आलं), पण ज्यांचा पाहिला आहे त्यात मला स्क्वेअर कट कायमच डाव्यांचा जस्त नजाकतदार वाटत आला आहे. हाय बॅकलिफ्ट वाला लारा, कांबळी टाइप कुणी असेल तर अजूनच सुंदर >> +१. फक्त व्हिडियो मधे पाहिलाय तो कट. मला गावस्करचा पण तेव्हढाच आवडतो. हाय बॅकलिफ्ट डावखुर्याचे टायमिंङ ची देण असेल तर सगळेच शॉट्स चांगले वाटतात. उजव्यांमधे असा सिल्कन प्रकार लक्ष्मण नि मार्क वॉ मधे जाणवायचा.
*तेंव्हा अॅश जसा बहरत गेला
*तेंव्हा अॅश जसा बहरत गेला बॉलिंग मधे तसा बहरेल अशी आशा ठेवूया.* _ +१ !
( *तिसऱ्या डावात 4-22 अशी मॅचविनिंग स्पेल टाकली, ज्यात रूट, स्टोक्स आणि स्मिथ यांना बाद केलं.* - असं असूनही नंतरच्या सामन्न्यांत त्याच्यावर गोलंदाज म्हणून किती वेळा विश्वास दाखवला गेला ? गोलंदाजी बहरण्यासाठी हे अत्यावश्यक असं विश्वासाचं खतपाणी त्याला मिळावं एवढीच प्रार्थना ! )
बाय द वे हे तुझे कौतुक आहे.
बाय द वे हे तुझे कौतुक आहे. समजले नसेल तर सोडून दे Happy
>>>>
कौतुकाचे घेऊन बसला आहात.

मी माझ्यावरची टीका सुद्धा सोडून देतो
किंबहुना मजा वाटते जेव्हा लोकं आपल्या सोयीने आणि मनाने अर्थ काढून टीका करायला धडपडतात हे बघून
असं असूनही नंतरच्या
असं असूनही नंतरच्या सामन्न्यांत त्याच्यावर गोलंदाज म्हणून किती वेळा विश्वास दाखवला गेला ?
>>>
चौथ्या सामन्यात सगळ्यांनाच मार पडला.
आणि अखेरच्या सामन्यात वेगवान गोलंदाजच सामना जिंकून देणार होते.
शेवटच्या क्षणी शुभमन गिल ने सिराज आणि कृष्णा वगळता आकाशदीपला सुद्धा गोलंदाजी दिली नाही. कर्णधाराला असे निर्णय घ्यावे लागतात कोणाला वाईट वाटू दे किंवा चांगले वाटू दे.. शेवटी पराभवाची जबाबदारी त्यालाच घ्यायची असते आणि शिव्या सुद्धा त्यालाच खायच्या असतात. त्यामुळे गोलंदाजांनी संधी मिळेल तेव्हा सातत्याने चांगली कामगिरी करावी आणि कर्णधाराचा विश्वास कमवावा हेच उत्तम!
पाचव्या सामन्यात वेगवान गोलंदाजांनी वीस विकेट घेऊन जिंकून दिले आणि कर्णधाराने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवला.
आता मायदेशात मालिका खेळू तेव्हा कुलदीप आणि सुंदरवर पुरेसा विश्वास दाखवला जाईल आणि तो सुद्धा ते सार्थ ठरवतील अशी अपेक्षा
Pages