Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हार्दिक पांड्या म्हणायचे आहे
हार्दिक पांड्या म्हणायचे आहे का? >> नाही . पंत नसणार पुढच्या सामन्यामधे फ्रॅक्चरमूळे.
एक प्रश्न. एकूण किती खेळाडू घेऊन परदेशी जायचे याबद्दल काही नियम आहेत का? >> जनरली १६ नेतात. बहुधा तेव्हढा खर्च दोन बोर्ड मिळून करत असतील. पुढचे स्वतःला करावे लागत असतील.
पाच सेशन्स खेळून काढतील असं
पाच सेशन्स खेळून काढतील असं अजिबात वाटलं नव्हतं. गिल राहुल जडेजा सुंदर चांगलेच खेळल्रे. इंग्लंडनेही २-३ झेल सोडून आपल्याच पायावर धोंडा मारुन घेतला. शेवटच्या दिवशी लंच नंतर खेळपट्टीनेही रंग बदलला.
हरणार असेच संकेत असताना प्रचंड दडपणाखाली खेळून कसोटी अनिर्णित ठेवली हे कौतुकास्पद.
ओव्हलला खरा कस लागेल.
<इंग्लंड नी पण शेवटी ब्रुक ला
<इंग्लंड नी पण शेवटी ब्रुक ला वगैरे बॉलिंग देऊन दोघांचे वेल डिजरविंग 100 व्हायला हातभार लावला> त्या आधी बरंच काही झालं ना? त्यावरून भरपूर चर्चा होते आहे.
ओव्हल टेस्ट बुमरा खेळणार नाही
ओव्हल टेस्ट बुमरा खेळणार नाही.
इश्वरन
राहुल
नायर
गिल
जुरेल
जडेजा
ठाकुर
कुलदीप
आकाशदीप
अर्शदीप
सिराज
असा संघ असावा.
जैस्वाल पहिली कसोटी सोडून सातत्याने अनाकलनीय शॉट्स खेळून बाद होतोय.
नायरला शेवटची संधी द्यावी.
त्या रन्स देण्यात कुप्रसिद्ध कृष्णाला मात्र अजिबात घेऊ नये असं वाटतं.
सुंदर खेळला असूनही वॉशिंग्टनला बाहेर बसावे लागेल.पण कसोटी जिंकायची असेल तर ओव्हल वर तीन स्पिनर्स खेळवून नाही चालणार.
सुंदर खेळला असूनही
सुंदर खेळला असूनही वॉशिंग्टनला बाहेर बसावे लागेल
>>
इथे थोडं अडखळायला झालं
अँकी, मलाही.
अँकी, मलाही.
मस्त वाक्य आहे. आवड्या..
मलाही
मलाही
पण तो बसत नाही. सुंदर खेळणाऱ्यांना बसवावे आपण या पोझिशनमध्ये नाही आहोत.
बुमराह नसल्याने आपली जिंकायची शक्यता वाढली आहे पण त्यामुळे गाफिल राहू नये.
जर सुंदर हा आजच्या घडीला करून नायर किंवा साई सुदर्शन इतकाच विश्वासार्ह फलंदाज वाटत असेल तर त्याला निव्वळ फलंदाज म्हणून बघावे. त्याला बसवून कुलदीप घेण्यापेक्षा मग का नाही या फलंदाजांना बसवून कुलदीपला घ्यावे. तीन वेगवान गोलंदाज त्यांच्या फलंदाजीचा विचार न करता घ्यावे. शार्दुल त्यात बसत नसेल तर बाहेर बसेल.
पण शार्दुलसह चार वेगवान हवे असतील तर मग कुलदीपच बाहेर राहणार. सुंदर नाही.
मला तीन फिरकी आणि तीन वेगवान बघायला आवडतील.
आणि हो, यशस्वी कुठे जात नाही. गेल्या सामन्यात पहिल्या इनिंगला गोलंदाजांना मदत असताना त्याने आपल्या नैसर्गिक खेळाला मुरड घालून छान खेळी केली होती. तो गेल्या काळातील आपला सर्वात यशस्वी फलंदाज आहे. शैली आक्रमक असल्याने तो असा जज होत राहणार. संघव्यवस्थापन मात्र त्याच्यावर विश्वास दाखवतील.
जैस्वाल पहिली कसोटी सोडून
जैस्वाल पहिली कसोटी सोडून सातत्याने अनाकलनीय शॉट्स खेळून बाद होतोय. नि सुंदर खेळला असूनही वॉशिंग्टनला बाहेर बसावे लागेल. ह्या दोन्ही विधानांवर अडखळलो नाहि तर सपशेल पडलो.
ओव्हल वर ट्रेडिशनली स्पिनर्स फारसे उपयोगी पडत नाहीत. अजून तरी हिरवेगार ग्राऊंड आहे. खुद्द इंग्लंड ने स्पिनसाठी बेथेल नि रूट्स वर जबाबदारी ढकलून ४ पेसर्स खेळायचे ठरवले आहेत त्यामूळे आपण दोन पेक्षा अधिक स्पिनर्स खेळवू असे मला वाटत नाही. पंत नाहीये ह्या मुख्य मुद्द्यामुळे किमान सात नंबरपरयंत बॅटिंग असणे जरुरी आहे. पर्यायाने सुंदर नि जडेजा हे मस्ट आहेत. बुमरा आहे कि नाही ह्याबद्दल एव्हढे संदिग्ध पोस्ट्स आहेत कि तो खरच नसणार कि हि स्ट्रेटेजिक वावडि आहे कळात नाही. तो असेल तर कुलदिपही हवा (ठाकूरच्या जागी = तीन पेसर्स + तीन स्पिनर्स - तीन पेसर्स मधे एक प्रसिद्द - कारण तो एकच फ्रेश नि १००% इंजरी फ्री आहे. बुमरा नि सिराज/आकाशदिप चा लोड तो कमी करू शकतो. त्याचा प्रत्येक बॉल शॉर्ट पिच्डच असला पाहिजे हा मॉर्केलचा अनाकलनीय आग्रह सोडला तर फरक पडेल. कुलदीप असल्यामूळे बुमराला कव्हर करायला एक पॉसिबल मॅच विनर ). बुमरा नसेल तर मात्र दोन स्पिनर्स + ४ पेसर्स (सिराज, अर्शदिप, आकाशदीप नि प्रसिद्द - शेवटचा परत वर्क हॉर्स म्हणून नि आधीच्या तिघांमधला कोणी तरी एक मधेच मोडला तर म्हणून. बुमरा नसला कि सिराज मॅच विनर होतो
) असावेत.
पहिले सात जैस्वाल, राहुल, साई, गिल , जुरेल, सुंदर, जाडेजा हे फिक्स्ड आहेत. फार तर सुंदर किंवा जडेजाला तीन वर पाठवून साईला खाली ओढता येईल. जुरेल च्या जागी जगदीशन आला तरी फार फरक पडेल असे वाटत नाही.
टीम मॅनेजमेंट चा कुलदीपावरचा
टीम मॅनेजमेंट चा भरोसा बघता अन् जडेजा सुंदराचा गेल्या सामन्यातला खेळ बघता कुलदीप यायचे चान्सेस कमी आहेत.
जयस्वाल अन् ईश्वरन ला ओपनिंग ला खेळवून राहुलला 3 वर टाकतील कदाचित. ओपनार लवकर आउट झाला तर राहुल फॉर्म च्या जोरावर स्थैर्य देऊ शकतो.
मधल्या फळीत गिल जुरेल जडेजा नक्की. खाली सुंदर, सिराज, आकाशदीप सुद्धा. अन् प्रसिद्ध / अर्शदीप, शार्दुल / बुमरा (बुमरा च्या उपलब्धतेनुसार)
यात जुरेल चा नंबर सिच्युएशन प्रमाणे वर खाली होऊ शकतो, पण 4 पेसर्स अन् दोन स्पिन ऑल राउंडर खेळतीलच असं वाटतंय...
फक्त आकाशदीप च्या केवळ नव्या बॉल वर विकेट घेण्याच्या लिमिटेशन मुळे बुमरा असताना सिराज उशीरा येतो अन् त्यात त्याची धार कमी होते असं मला वाटतं
ईश्वरन चा एकंदर सराव
ईश्वरन चा एकंदर सराव सामन्यांमधला खेळ बघता ईश्वरनची वर्णी लागणे कठीण वाटते. त्यापेक्षा करूण कडे जातील परत.
ईश्वरन चा एकंदर सराव
ईश्वरन चा एकंदर सराव सामन्यांमधला खेळ बघता ईश्वरनची वर्णी लागणे कठीण वाटते
>>
मान्य
पण ईश्वरन संघाचा भाग झाल्यानंतर 15- 16 जणांचा डेब्यू झालाय
पत्ता विचारायचा नाही या तत्वाला मुरड घालण्यासाठी का होईना त्याला चान्स मिळेल असं वाटतं
माझ्या मते संघ असा असेल
माझ्या मते संघ असा असेल
1 जैस्वाल
2 राहुल
3 साई सुदर्शन
4 गिल
5 सुंदर
6 जाडेजा
7 jurel
8 ठाकूर
9 आकाशदीप
10 अर्शदीप
11 सिराज
साधा माणूस लॉक करून टाकूया
साधा माणूस लॉक करून टाकूया
फक्त अर्शदीप की परत कृष्णा याबाबत साशंक आहे.
कृष्णा सिराज आकाशदिप हे त्रिकूट असताना आपण जिंकलो आहोत.
साईने मागच्याच मॅचला ६०+ रन्स
साईने मागच्याच मॅचला ६०+ रन्स केल्यामुळे तोच तिसर्या क्रमांकावर खेळेल बहुदा. ओपनिंग बदलायचे चान्सेस - इंज्युरी वगळता - मला तरी वाटत नाहीत. बॅटिंगमधे पंतच्या जागी जुरेल हा एकच बदल संभवतो.
बॉलिंगमधे कुलदीप हवाच हे माझं मत असलं तरी त्याला खेळवतील का ह्याबद्दल मी साशंक आहे. बहुदा सिराज, आकाश, कृष्णा/अर्शदीप हे तीन मुक्ख्य बॉलर्स आणि ठाकूर, जडेजा, सुंदर हे ऑलराऊंडर्स खेळतील.
आपल्याला बरोबरी करायची असेल
आपल्याला बरोबरी करायची असेल तर कुलदीप ओव्हल वर खेळलाच पाहिजे ठाकूरच्या बदली. सरांना फलंदाज म्हणून धरा. कंबोज ऐवजी प्रसिद्ध आणि बूमरा ऐवजी आकाश.
जिंकू आपण. बोकलत बसाल बोंबलत.
त्या दुसर्या सरांचे काहीतरी करा ना. इथे यावंसं वाटतच नाही. नुसत्या आरत्या.
आज शेवटची कसोटी!
आज शेवटची कसोटी!
सिरीज अजून सुद्धा ओपन आहे आणि दोन्ही संघांनी पुरेसे लफडे करून वातावरण तापलेले ठेवले आहे.
निर्णायक कसोटीत हमखास खेळणारा ऋषभ पंत नसल्याचा फटका आपल्या संघाला तसेच कसोटी मनोरंजनाला सुद्धा बसणार आहे. त्यात बुमराह सुद्धा नाही. पण इंग्लडमध्ये सुद्धा चार बदल झालेत. स्टोक्स आर्चर देखील नाहीत.
इंग्लंड खेळपट्ट्याना कितीही नावे ठेवा पण सर्व सामने पाचव्या दिवशीपर्यंत गेल्याने आणि निकाल काय लागणार याची शेवटच्या दिवसापर्यंत खात्री नसल्याने मजा आली. दर दिवसानंतर सिच्युएशन बदलणे आणि त्यावर चर्चा करत झोपणे ही मजा तीन दिवसात संपणाऱ्या कसोटीत येत नाही.
दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने आणि खेळपट्टी काही वेगळी असेल अशी अपेक्षा नसल्याने ही कसोटी सुद्धा अशीच होईल असा अंदाज.
पण मालिका जिंकायची असेल तर आता ड्रॉ हा पर्याय आपल्याकडे नाही त्यामुळे जिंकायला वीस विकेट घ्यायला उतरायचे आहे हे ध्यानात ठेवूनच खेळावे लागेल. काहीतरी वेगळे करावे लागेल.
आणि त्याची सुरुवात फायनली एक तरी टॉस जिंकून शुभमन गिल करेल अशी अपेक्षा
पंत उपलब्ध नसणं हे दुर्दैवी
पंत उपलब्ध नसणं हे दुर्दैवी आहे. पण पंत हे एक पॅकेज आहे आणि ते तस्सेच आहे. त्याला इलाज नाही.
गिल कर्णधार म्हणुन अजून स्थिरावले नाहीत ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. सुंदरला उशिरा आणणे ठाकूर ला
विसरणे ही काही उदाहरणे.
इंग्लंडची खेळपट्टी बाबत भेकड प्रवृत्ती त्यांनाच मारक ठरली आहे. घरच्या वातावरणही फायदा झाला नाही.
*बॉलिंगमधे कुलदीप हवाच हे
*बॉलिंगमधे कुलदीप हवाच हे माझं मत असलं तरी...* - माझे तर हे आत्ताही ठाम मत आहे; जिंकायला 20 विकेट घ्याव्या लागतात व त्यासाठी आपल्या संघात एक तरी खराखुरा हुकमी फिरकी गोलंदाज असणं अपरिहार्य, विशेषतः इंग्लिश फलंदाज, अगदी तळाचेही, सहजतेने आपली फास्ट गोलंदाजी खेळतात हे पाहून ! 3 फास्ट, 1 फिरकी व 2 फिरकी ऑलराऊंडर्स ही माझ्यामते ह्या इंग्लंड विरुद्ध जिंकून देणारी गोलंदाजी ! ( कुलदीप हा मन लावून फलंदाजी करतो, हाही त्याचा प्लस पॉइंट आहेच )
भाऊ किती तो गोंधळ
भाऊ किती तो गोंधळ
सहा वेळा तरी पोस्ट बदललीत
आपली अशी स्थिती तर गिलची मनस्थिती काय असेल...
पण त्याला आता पुढचे पाच दिवस गोंधळून चालणार नाही
ओव्हल ट्रॅक रेकॉर्ड पाहता आणि
ओव्हल ट्रॅक रेकॉर्ड पाहता आणि इंग्लंडने सुद्धा स्पिनर घेतला नसल्याने त्यांनाही ग्रीन टॉप हवा असेल हे पाहता मला वाटते कुलदीप नसेल.
अश्या पिचवर बुमराह नसताना केवळ तीन वेगवान खेळवणार नाहीत. जे भरवश्याने कोण क्लिक होईल सांगता येत नसल्याने शार्दुल पकडून चार घेतील.
मला अशी टीम वाटते —
जयस्वाल
राहुल
साई
गिल
ज्युरेल
जडेजा
सुंदर
शार्दुल
सिराज
आकाशदीप
अकरावा कृष्णा किंवा अर्शदीप यापैकी एखादा. कोण ते आपण इथे बसून सांगू शकत नाही. अशा तळ्यात मळ्यात निर्णयात नेट मध्ये कोण कसे परफॉर्म करते हे सुद्धा मॅटर करते.
*सहा वेळा तरी पोस्ट बदललीत* -
*सहा वेळा तरी पोस्ट बदललीत* - गोंधळ डोक्यात अजिबात नाही, माझ्या टायपिंग मध्ये आहे व तोही डोळ्यांमुळे, डोक्यामुळे नाही !

*अश्या पिचवर बुमराह नसताना केवळ तीन वेगवान खेळवणार नाहीत..... शार्दुल पकडून चार घेतील* - मला वाटतं बहुधा टिळकांचं एक वाक्य आहे, " दोन बारा वर्षांच्या मुली मिळून 24 वर्षांची नवरी मुलगी होत नाहीं ! "
एकंदरीत, निवडसमिती काय करेल हा त्यांचा प्रश्न, मला तीव्रपणे काय वाटतं तें सांगणं, हा माझा इथला जन्मसिद्ध अधिकार !!
भाऊ २
भाऊ
२
आत्ता पर्यन्त बॅटिंग विकेट्स
आत्ता पर्यन्त बॅटिंग विकेट्स होत्या. ओव्हल येथे फास्ट विकेट असेल तर फक्तं चार फलंदाज असणे धोकादायक ठरेल. सर आणि सुंदर दोघेही शतक वीर. कसे ड्रॉप करणार. कुलदीप हवा.
फास्ट विकेट असेल तर खरच टीम निवडणे सोपे नाही.
आज पाउस पडायचा अंदाज आहे,
आज पाउस पडायचा अंदाज आहे, नाही पडला तर माला ट्रोल करू नका. मी काही नंदी बैल भोला नाथ नाहीये.
*नाही पडला तर माला ट्रोल करू
*नाही पडला तर माला ट्रोल करू नका * - अहो, गेल्या सामन्यात तर तीन दिवस पडणार असं भाकित असून एकही दिवस पडला नाही, तरीही कुणालाही कुणी साधा जाबही विचारला नाही !
इंग्लिश फलंदाजांना फास्ट विकेटवर अत्युत्तम फास्ट गोलंदाजी खेळायचा सराव आहे. आपले फास्ट गोलंदाज चांगले असले तरी ते इंग्लिश फलंदाजीची त्रेधा उडवतील ही शक्यता कमीच. उलट, चांगले स्पिनर्स फास्ट विकेटचा कल्पकतेने वापर करून इंग्लिश फलंदाजीसाठी घातक ठरू शकतात.
. We've got three changes.
. We've got three changes. Jurel, Karun and Prasidh in for Pant, Shardul and Bumrah.
India have actually made four changes, not just the three like Gill mentioned. Looks like he forgot to mention that Akash Deep is also coming in for Anshul Kamboj.
टॉस जिंकून इंग्लंडची बॉलिंग.
टॉस जिंकून इंग्लंडची बॉलिंग. चार बदलः कृष्णा, नायर, जुरेल आणि आकाश आत. बुमराह, ठाकूर, पंत आणि कुंभोज बाहेर.
कुलदीप बाहेरच. नाईलाज.
कुलदीप बाहेरच. नाईलाज.
करूण आत हे त्यातल्या त्यात बरे आहे.
जयसवाल ३र्या षटकात
जयसवाल ३र्या षटकात विश्रांती कक्षात परत.
५ ही सामन्यात नाणेफेक गमावली. आणि ही सलग १५वी वेळ भारताने नाणेफेक गमावली म्हणे.
72 - 2 , पावसामुळे लवकर लंच !
72 - 2 , पावसामुळे लवकर लंच !
आपली निवडसमिती मुख्यतः फास्ट गोलंदाजीवर विसंबून. त्यांचा हा विश्वास खरा ठरावा, ही अपेक्षा व इच्छा !
Pages