Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारतासारख्या क्रिकेटवेड्या
भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात धोनी कोहली शर्मा अश्या तीन सर्वोच्च क्रेझ असलेल्या तीन कर्णधारांनंतर शुभमन गिल सारखा नवख्या खेळाडूने भारतीय संघाची सूत्रे हातात घेतल्यावर त्याचा मार्ग फार खडतर होता. कारण या खेळाडूंचे कित्येक आंधळे चाहते सोशल मीडियावर टपलेले होते.
त्यामुळे पहिला सामना हरल्यापासून आणि दुसरा सामना जिंकूनही तिसरा हरताच... गिल आणि गंभीर जिथे तिथे शिव्या खात होते. जणू काही भारतातच खेळत होते अश्या लोकांच्या अपेक्षा होत्या.. या आधीच्या दोन कसोटी मालिकात आपली काय धूळधाण उडालेली हे सुद्धा जणू लोकं विसरून यांच्याकडून जास्तीच्या अपेक्षा ठेवत होते.
मला वाटते सगळ्यात जास्त विश्वासाची गरज भारतीय संघाला होती, भारतीय कर्णधाराला होती जो भारतीय क्रिकेटप्रेमीनी दाखवणे गरजेचे होते. म्हणून मी माझ्यापरीने तो पहिल्या सामान्यापासून दाखवत होतो. अखेर तो विश्वास सार्थ ठरल्याचा जो आनंद झाला त्याची मोजदाद नाही.. आणि अखेरच्या क्षणी ३-१ असा निकाल असता तरी दुःख नसते. उलट आपली पोरे लढल्याचा आनंद असता.. पण मला ते नको होते.. कारण ३—१ या निकालाने त्यांच्यावर तोंडसुख घ्यायला टपलेल्या ट्रॉलर जमातीचे फावले असते. जे या भारतीय संघासाठी अन्यायकारक ठरले असते.
उगवत्या सूर्याला सारेच नमस्कार करतात. संघर्षाच्या वेळी सपोर्ट करणे जास्त महत्वाचे असे मला वाटते.
धोनी कोहली शर्मा अश्या तीन
धोनी कोहली शर्मा अश्या तीन सर्वोच्च क्रेझ असलेल्या तीन कर्णधारांनंतर .... कारण या खेळाडूंचे कित्येक आंधळे चाहते सोशल मीडियावर टपलेले होते. >> मी इथेच पोस्ट वाचायचे सोडले
जे आपल्या आवडत्या खेळाडूचे
जे आपल्या आवडत्या खेळाडूचे अफाट कौतुक करतात ते आंधळे चाहते नसतात तर जे एखाद्या खेळाडूचे भक्त होतात आणि ज्यांना त्यांच्याबद्दल एखादी खरी पण अप्रिय गोष्ट ऐकवल्यास जे थयथयाट करतात ते आंधळे चाहते असतात.
शुभ रात्री
झोप तू, तू काय बोलतो आहेस हे
झोप तू, तू काय बोलतो आहेस हे तुझे तुलाच कळत नाहिये हे दर वेळी ठासून दाखवून द्यायची गरज नाही. चाहते काय, भक्त काय कसलाच पायपोस कशात नाही. नुसते लहान मुलांच्या नाकातून शेंबूड गळावे तसे भसाभसा ओतलेले बिना अर्थाचे अनेक शब्द पोस्टमधे लोळत असतात. मागे जॉनर शब्द कळला तर जिथे तिथे जॉनर लिहून उच्छाद मांडला होता. सध्य भक्त , सकारात्मक वगैरे ची पाळी आहे.
ओके
ओके
ऋषभ पंत रेकॉर्ड अलर्ट!
ऋषभ पंत रेकॉर्ड अलर्ट!
इंग्लंडमधील कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा विकेटकीपर फलंदाज या विक्रमाला ऋषभ पंत (४७९ धावा) याने गवसणी घातली आहे.
या आधीचा विक्रम इंग्लंडचाच ॲलेक स्टीवर्ट (४६५ धावा) याचा होता.
जेमी स्मिथ याला देखील संधी होती पण तो ५ सामन्याअखेरीस ४३४ धावांवरच थांबला.
भारतीय विकेटकीपरमध्ये सर्वाधिक धावा बुधी कुंदरन ५२५ धावा यांच्या आहेत जेव्हा १९६३ साली इंग्लडचाच संघ ५ सामन्यांची मालिका खेळायला भारतात आला होता.
वर्ल्ड रेकॉर्ड आफ्रिकेच्या लिंडसे यांचा ६०६ धावांचा आहे जो त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात खेळताना १९६६ साली केला होता.
ऋषभ पंतचे दुखापतीमुळे शेवटचे दोन सामने डब्यात गेले नसते तर त्याला हे सारे विक्रम तोडायची छान संधी चालून आलेली. पण आता बेटर लक नेक्स्ट टाईम म्हणू शकतो.
तूर्तास, इंग्लडच्या मातीतील विक्रम त्यांच्या खेळाडूचा नसून एका भारतीय खेळाडूचा आहे हे ही नसे थोडके
सहज आठवलं माझं एक आवडतं गाणं
सहज आठवलं माझं एक आवडतं गाणं -
कहनेको तो बहुत कुछ था
अगर कहेनेपे आते,
हमको तो यह आदत है
.. हम कुछ नही कहते
कुछ नही कहते II
किंबहुना मजा वाटते जेव्हा
किंबहुना मजा वाटते जेव्हा लोकं आपल्या सोयीने आणि मनाने अर्थ काढून टीका करायला धडपडतात हे बघून
जे आपल्या आवडत्या खेळाडूचे अफाट कौतुक करतात ते आंधळे चाहते नसतात तर जे एखाद्या खेळाडूचे भक्त होतात आणि ज्यांना त्यांच्याबद्दल एखादी खरी पण अप्रिय गोष्ट ऐकवल्यास जे थयथयाट करतात ते आंधळे चाहते असतात.
>>
कधीतरी एकदा त्रयस्थपणे स्वतः कडे बघ (बीपीएल चा शाखा अन् एलीजी चा स्वजो वगैरे चष्मा बाजूला ठेऊन)
व्वा भाऊ!! कलाई का उपयोग करते
व्वा भाऊ!! कलाई का उपयोग करते हुए, मिडविकेटकीं तरफ चार रन!!
या सिरीजमधे भारताची कॅचिंग
या सिरीजमधे भारताची कॅचिंग पार ढेपाळलेली होती. ५ सामन्यांमधे भारताने २३ झेल सोडले आहेत. ते फार महागात पडले. नाहीतर....
असो.
फील्डिंग कोच कोण होता ?
फील्डिंग कोच कोण होता ?
फील्डिंग कोच कोण होता ?
>>
गेली काही वर्ष टी दिलीप आपला फील्डिंग कोच आहे. पुढच्या समर पर्यंत तोच असेल. दिलीप नी आपली फील्डिंग बऱ्यापैकी टाईट केली आहे. या सिरीज मधे कुठे माशी शिंकली कोण जाणे.
मला वैयक्तिक रित्या आपण गेल्या काही सिरीज मधे (वर्ल्डकप 23 फायनल नंतर) बऱ्यापैकी अवांतर धावा देतो आहोत असं वाटतं (स्टॅट काढले नाहीत). तसंच, टी 20 मुळे बॉलर्स इकॉनॉमी रेट चं फार मनावर घेत नाहीत असं ही वाटतं. पूर्वी टेस्ट मधे 4 च्या वरची इकॉनॉमी असेल तर बॉलर्स शेल मधे जायचे, आता 5-6 चं ही प्रेशर वाटत नाही. अन् हे फक्त आपल्याच बाबतीत नाही, तर सगळ्याच टीम्स बद्दल वाटतं...
इतर
*..टी 20 मुळे बॉलर्स इकॉनॉमी रेट चं फार मनावर घेत नाहीत ...* - यावर कांहीतरी लिहिणार होतो, पण आत्ताच हा घरचा अहेर मिळाला मला ! -
तुमचा तिथला इकॉनॉमी रेट भलताच सुधारलाय वाटतं हल्ली ! दिवसातनं चार पांचदा जात होता , ते आता चार पांच दिवसात एकदाही जात नाहीं तुम्ही
बकबक करायला त्या धाग्यावर !!
मस्तंच भाऊ
मस्तंच भाऊ
*मस्तंच भाऊ* - खुपच दुर्लक्ष
*मस्तंच भाऊ* - खुपच दुर्लक्ष होत होतं या धाग्याकडे म्हणून म्हटलं, " धागा धागा अखंड विणूया " !!
(No subject)
अशियायी T-20 साठी श्रेयस
अशियायी T-20 साठी श्रेयस अय्यरला का डावलले असावे? गिलसाठी??
अय्यर घेतला नाही.
अय्यर नावडता आहे. त्यामुळे त्याचे नसणे बिलकुल आश्चर्य नाही.
आणि गिल याला तीन फॉरमॅट कप्तान करणार असे वाटते. त्याची ही सुरूवात आहे.
ब्रँड व्हॅल्यू
गिलच्या समावेशामुळे संजू सॅमसन देखील टेन्शनमध्ये आला असावा. कारण जर त्याला टॉप ऑर्डर मध्ये जागा मिळाली नाही तर ट्वेंटी वर्ल्डकप मध्ये तो बाहेर जाणार आणि कीपर म्हणून लोअर मिडल ऑर्डरमध्ये खेळणारा पंत संघात येणार.
आशिया कप 2025 भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कप्तान), शुभमन गिल (उपकप्तान) संजू सैमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंह, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जितेश शर्मा, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
यातल्या कुणा कुणाला प्रत्यक्ष
यातल्या कुणा कुणाला प्रत्यक्ष खेळवतात व खेळवत नाहींत, हे खरं तर अधिक महत्त्वाचे !!
खरं तर इंडियाने त्या
खरं तर इंडियाने त्या दुबईतल्या टी२० वर्ल्डकप मधल्या अधःपतनानंतर जो ब्रँड आत्मसात केलाय त्यात गिल आणि अय्यर दोघेही बसत नाहीत. ह्यावर मत-मतांतरं असू शकतात. पण गिलच्या टेस्ट मधल्या यशाचं बक्षिस त्याला टी२० (प्लेयिंग ११) मधे बसवून देण्याचं लॉजिक विचित्र वाटतं. ह्यात टीमचा बॅलन्स विनाकारण बिघडतोय (संजू आणि रिंकू बाहेर जातील.)
ह्या सगळ्यातून गिलने सिलेक्टर्सचा विश्वास सार्थ ठरवत काहीतरी नेत्रदिपक केलं तर त्याचं कौतूक वाटेल.
त्यात गिल आणि अय्यर दोघेही
त्यात गिल आणि अय्यर दोघेही बसत नाहीत. ह्यावर मत-मतांतरं असू शकतात.
>>>>
माझ्याही मते गिल नाही बसत.
अय्यरबाबत वेगळे मत.
पण त्या संघात देखील एखाद्या कोहलीची जागा होती तर एक जागा गिल सुद्धा राखू शकतो.
माझ्याही मते गिल नाही बसत.
माझ्याही मते गिल नाही बसत.
अय्यरबाबत वेगळे मत. >> +१ जैस्वालचा स्ट्राईक रेट नि एव्हरेज गिलपेक्षा अधिक आहे त्यामूळे गिलपेक्षाही तो जास्त योग्य होता. (पण दोन डावखुरे ओपन नको करायला असा विचार केला असावा). गिल तीन वर आला तर तिलक ची जागा खाणार नि ओपन केले तर सॅमसन नि रिंकू (जितेश आत येईल) खाणार. अय्यर कसा नाही ५-६ साठी हे खरच कोडे आहे. बहुधा त्याला वन डे स्पेशालिस्ट बनवत आहेत.
ह्या सगळ्यातून गिलने सिलेक्टर्सचा विश्वास सार्थ ठरवत काहीतरी नेत्रदिपक केलं तर त्याचं कौतूक वाटेल. >> +१
विपराज निगमला राखीव म्हणून अॅडा करायला हवे होते असे वाटले.
“अय्यर कसा नाही ५-६ साठी हे
“अय्यर कसा नाही ५-६ साठी हे खरच कोडे आहे. बहुधा त्याला वन डे स्पेशालिस्ट बनवत आहेत.” - अय्यर मिस-आऊट झाला हे खरंच. मिडल ऑर्डर मधे सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक आहेत. नंतर रिंकू, अक्षर येतील. अय्यरला फार खाली खेळवण्यात अर्थ नाही - ती त्याची जागाही नाही आणि एक ऑलराऊंडर कमी होतो.
वनडे मधे सूर्यकुमारच्या जागी तो येतो आणि मोठा इंपॅक्ट करतो.
माझ्या मते सुंदर la घ्यायला
माझ्या मते सुंदर la घ्यायला हवे होते, no 8 चा प्रोब्लेम येईल, तिथे आता राणा ला खेळवावे लागेल, कारण बाकी गोलंदाजांमध्ये कोणीच थोडी पण फलंदाजी करत नाही
Gill la घ्यायला नको होत,
Gill la घ्यायला नको होत, अय्यर पण नाही. 11 चा संघ असा पाहिजे होता
1 सॅमसन
2 अभिषेक
3 तिलक
4 सूर्या
5 हार्दिक
6 रिंकू
7 अक्षर
8 सुंदर
9 अर्शदीप
10 बुमराह
11 वरुण
उरलेल्या 4 जागी
12 जितेश
13 kuldeep
14 हर्षित
15 दुबे
गील ओपन करणार.
गील ओपन करणार.
गिल कसोटीत कर्णधार झाला आहे.
गिल कसोटीत कर्णधार झाला आहे. वन डे मध्ये शर्मानंतर हमखास होणार कारण तो त्याचा बेस्ट फॉरमॅट आहे. राहिला प्रश्न ट्वेंटीचा तर त्यात त्याला vice captain केले हा सिग्नलच आहे. २०२६ चा ट्वेंटी वर्ल्डकप सूर्याच कर्णधार राहील. त्यानंतर दुसरा कुठला पर्याय नाही. एक अय्यर होता त्याला तर हे संघातच घेत नाहीयेत. जर गिलने वाईट खेळून संघातली जागा नाही घालवली तर तिन्ही फॉरमॅट कर्णधार तोच हे नक्की आहे
वर्षानुवर्षे आपल्याकडे हीच पद्धत आहे. आधी तिन्ही फॉरमॅट धोनी होता, मग कोहली झाला, मग शर्मा आला. अन्यथा आयडीयली कोहली कसोटी कर्णधार आणि रोहीत लिमिटेड ओवर कर्णधार हे कॉम्बिनेशन बेस्ट होते.
गिल रेड अन् अय्यर व्हाईट बॉल
गिल रेड अन् अय्यर व्हाईट बॉल कॅप्टन व्हायला हवेत.
पण कुणाच्यातरी डोळ्यात अय्यर खुपतोय अन् सतत डावलला जातोय.
गिल ला खेळवायच्या नादात सॅमसन पण विनाकारण बळी जाणार. तो पण टॉप ऑर्डर बॅटर आहे अन् आपली टॉप ऑर्डर फुल आहे. लोअर ऑर्डर मधे जितेश शर्मा यायचे चान्सेस वाढतात.
इंज्युअरी मधून रिकव्हर झालेला पंत गेल्या टी 20 वर्ल्डकप मधे कीपर म्हणून सॅमसन च्या वरचढ चॉईस ठरला अन् सगळ्या मॅचेस खेळला. नंतर अचानक तो बाहेर अन् सॅमसन रेग्युलर चॉईस झाले. ते बरं चाललं होतं तर आता सॅमसन वर परत एकदा गदा येतीये. अन् यात पंत कन्सिडर ही होत नाहीये...
सिलेक्षन कमिटी बहुतेक ठराविक जागा आधी भरते अन् बाकीच्यांसाठी चिठ्या टाकते...
मधे सॅमसनच्या वडलांनी
मधे सॅमसनच्या वडलांनी बोंबाबोंब केली होती ती डोळ्यावर आली असावी बहुधा. द्रविडच्या जाण्याने रॉयल्सच्या प्लेयर्सचा नंबर घसरलाय - सॅमसन, पराग, जैस्वाल.
जेंव्हा भरपूर प्रतिभाशाली
जेंव्हा भरपूर प्रतिभाशाली खेळाडू स्पर्धेत असतात, तेंव्हा संघ निवडीचं काम खरंच खूपच जिकिरीचं असतं. आगरकरशी ह्यावर सहमत असूनही मला वाटतं -
श्रेयस अय्यर आता 30 वर्षाचा आहे, त्याने विश्वासार्ह फलंदाज व चांगला कर्णधार म्हणून आपली लायकी सातत्याने व परिश्रम घेवून सिद्ध केली आहे. त्याची गुणवत्ता व उपयुक्तता जर वादातीत असेल, तर त्याचं वय लक्षात घेवून त्याला संघ निवडीमध्ये थोडा अग्रक्रम देणं न्याय्य ठरलं असतं. ( आगरकर यांनी मुलाखतीत श्रेयसचा खास उल्लेख केल्याचं ऐकलं, त्याअर्थी त्याची उपयुक्तता त्यांनाही मान्य असावी ). इंग्लंडच्या दौऱ्यावर व आताही त्याला डावलून त्याचा पूर्ण हिरमोड करून मग कधीतरी त्याला संधी देणं किंवा कधीच न देणं, हे तर्कशुद्ध वाटतं नाही.
एवढं टॅलेंट ओसंडून वाहतंय, तर
एवढं टॅलेंट ओसंडून वाहतंय, तर तीन फॉर्मॅटसाठी तीन संघ आणि तीन कर्णधार करायला काय हरकत आहे? तशीही फिटनेसची बोंब इंग्लंडमध्ये होतीच.
इतका आटापिटा एवढं करून कायम बेस्ट खेळणार, जगज्जेते होणार असंही नाही.
Pages