काहीच्या काही फॉरवरर्ड्स - २

Submitted by मानव पृथ्वीकर on 2 April, 2025 - 05:31

कायप्पावर, फेसबुक किंवा इतरत्र अनेकदा काहीच्या काही वाटावे असे निनावी लिखाण फिरत असते.
त्यातील काही खास वाटले तर आणि निनावी असले तरच शेअर करण्यास हा धागा.

हा पहिल्या भागाचा दुवा.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्यासाठी तुम्ही काही ठेवलेय की नाही हे चेक करण्यासाठी पूर्ण फॉरवर्ड वाचलं>>> Lol
प्रतिसादांवरूनच काहीतरी लिहायचं असतं अशा वेळी, कुठं पूर्ण वाचत बसता.
(मी खरं तर वाचलं असतं, पण डोक्यात रंभा उर्वशी आणि मेनका नाचत आहे सोमवार पासुन Proud
पण कोड्यातल्या.)

--------
अस्मिता मस्त Lol . ५, ६, ८ विशेष आवडले.

माझ्यासाठी तुम्ही काही ठेवलेय की नाही हे चेक करण्यासाठी पूर्ण फॉरवर्ड वाचलं, कुफेहेपा. >> Lol

म्हशी इतका दुसरा 'चिल' प्राणी फक्त गेंडाच आहे, हिंमत असेल तर त्याच्यावर काकाफॉ करा. >>> आणि कोणी हिंमत केली तरी काही उपयोग नाही. कारण त्याची कातडी लिटरली गेंड्याची असते. गेंड्याचे स्त्रीलिंग काय? तिची कातडी कशी असते? हिंमत असेल तर ते कोणीतरी चेक करा.

मोबाईलपासून निघणाऱ्या किरणांचा (मूळ काकाफॉ तील रेज हे rage - राग या अर्थाने वाचले जातेय) माऱ्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी खिशात गोवरीचा तुकडा ठेवून अहोरात्र काकाफॉरवर्ड तयार करता येतात. >>> Lol हे म्हणजे मोबाईल किरण से गोवरी का तुकडा मुझे बचायेगा. लेकिन मेरे फॉर्वर्ड से तुम्हे कौन बचायेगा Happy

गाईचे दूध अमृतासारखे असेल तर म्हशीचे करीनासारखे झाले की काय मग ? >>> किंवा मलाईकासारखे (अमृता व मलाईका - अरोरा भगिनी. टू बी क्लिअर, एकमेकींच्या भगिनी Wink ). तिच्या नावातच दुधाचा संदर्भ आहे.

कारण त्याची कातडी लिटरली गेंड्याची असते. गेंड्याचे स्त्रीलिंग काय? तिची कातडी कशी असते? हिंमत असेल तर ते कोणीतरी चेक करा.
>>> Lol आता एका रिव्हर्स-काकाफॉ साठी गेंड्यांवर संशोधन केले तर आपल्यात आणि काकाफॉ करांत साम्य काय? आपण पण ठोकून द्यायचे वपुंच्या नावाने. त्याची कातडी जाड म्हणून संसाराचा तोल साधण्यासाठी तिला आपली कातडी मऊ ठेवावी लागते. शेवटी संसार म्हणजे काय चिखलातला खेळ, एकाने उडवायचा दुसऱ्याने सारवायचा. प्लीज नोट - सावरायचा नाही. Happy

गाई- म्हशींच्या टशनची तुलना अमृता सिंग आणि करीना कपूर यांच्याप्रमाणे केली होती आणि आता अमृता अरोरा आली कारण तिची बहीण मलैका आहे. त्यामुळे काकाफॉ साठी आदर्श रिव्हर्स -घसरगुंडी झाली आहे. कुणीकडूनही कुठेही जाऊन जेथे जोडायचे तेथे जोडायचं. आपले काकाफॉ परिपूर्ण झाले आहे. Happy

थॅंक्यू. Lol Happy
@सर्वांना - रेड्याची बाजू मांडली गेली म्हणून म्हशीची मांडावी लागली. Happy Happy

@सर्वांना - रेड्याची बाजू मांडली गेली म्हणून म्हशीची मांडावी लागली. >> बैल राहिलाय असे अखिल विश्व सांड मंडळातर्फे नम्रपणे नमूद करतो अस्मिता. Wink

कहर
धमाल Rofl
.
.
परफेक्ट. हियर रेडा वॉज प्रिफर्ड. नाहीतर आळंदीत काय बैल नव्हते ? आजही आहेत>>>> काय म्हणायचंय तुम्हाला नक्की??
आजही आहेत म्हणजे??
Proud

परफेक्ट. हियर रेडा वॉज प्रिफर्ड. नाहीतर आळंदीत काय बैल नव्हते ? आजही आहेत
Submitted by अनिंद्य on 8 June, 2025 - 11:19

हे लिहून आपण आळंदीतल्या बैलांना आव्हान देत आहात , "आ (आळंदीतल्या) बैल मुझे मार "

गाय रस्त्यात फतकल मारून बसते. एकटी दुकटी नाही, ग्रुपने बसतात. ट्रॅफिक जॅम हतो. गायीचं दूध पिल्याने कामधंदा सोडून रस्त्यात उभे राहून चकाट्या पिटत बसावं लागतं.

गाय रवंथ करते. गायीचं दूध पिल्याने लोक गुटखा - तंबाखू - पान चघळत बसतात.

योग्य मुद्दे.
यावरून आठवलं.
एकदा रस्त्यात एका वळणावर गाय रस्त्याच्या मध्यभागी बसली होती आणि सहाजिकच ट्राफिक तिच्या भोवतून जात होती. कारमध्ये बसलेला स्विस माणुस आश्चर्य चकित झाला आणि "वा! गाईचा असाही (डिव्हायडर म्हणुन) तुम्ही उपयोग करता! वा!" असे म्हणाला.

हा विनोद माझ्या बॉस (डायरेक्टर) ने त्याच्या सोबत खरोखरच घडलेला किस्सा म्हणुन सांगितला. तो खखोतोजा. (असे अनेक विनोद तो स्वतःच्या प्रत्यक्ष जीवनात घडलेले किस्से म्हणुन सांगत असे. त्या पदावरील अनेकांना अशी सवय असते.)

bail application

आ (आळंदीतल्या) बैल मुझे मार

गाईचा डिव्हायडर म्हणुन उपयोग

धमाल चालली आहे इथे 😀

काकाफॉ सुरू केल्यापासून मोजकेच अपवाद वगळता निनावीच पोस्ट केले आहेत सगळ्यांनी. आणि अपवाद सुद्धा अनवधानाने झालेले आहेत.
पुढील निनावी काकाफॉ पोस्ट करावेत.

नवर्‍याचा मित्र रात्री मोटरसायकलवरुन येताना मध्ये रस्त्यात म्हैस बसलेली होती ती न दिसल्याने जे उडाला ते तिच्या पाठीवरुन स्लाईड होउनच जमिनीवर आपटला.

Pages