Submitted by मानव पृथ्वीकर on 2 April, 2025 - 05:31
कायप्पावर, फेसबुक किंवा इतरत्र अनेकदा काहीच्या काही वाटावे असे निनावी लिखाण फिरत असते.
त्यातील काही खास वाटले तर आणि निनावी असले तरच शेअर करण्यास हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सगळे कृष्णावतार आहेत इथे.
सगळे कृष्णावतार आहेत इथे.
टॅब वापरायचा की चार स्पेसेस
टॅब वापरायचा की चार स्पेसेस यावर त्या एकाचा ब्रेकअप होतो >> अगदीच समजू शकतो.
अनलेस किल्ली म्हणत्येय तशी लॅग्वेज फोर्स करत असेल.
टॅब!! नो वे!
Python वाला असेल तर रेलशनशिप
Python वाला असेल तर रेलशनशिप मध्ये space नसणार >>>
सगळे कृष्णावतार आहेत इथे. >>> पण कंस सोडवायचे आहेत. मारायचे नाहीत
हे दुःखद आहे की ज्या
हे दुःखद आहे की ज्या नागरिकांना ही जयंती साजरी करायची आहे... ते त्यांचा इतिहास विसरले आहेत आणि ज्यांना माहिती आहे त्यांना हे माहित नाही की ते तो का साजरा करू इच्छित नाहीत??*
कुणाला याचा अर्थ समजला का?
किल्ली
किल्ली

सगळे कृष्णावतार/ 'सिन्टॅ्क्स सायकोज' गोळा होत आहेत.
पण कंस सोडवायचे आहेत. मारायचे
पण कंस सोडवायचे आहेत. मारायचे नाहीत >>
(कुणीतरी सुरू केलेले) कंस संपवायचे आहेत या अर्थी.
(कुणीतरी सुरू केलेले) कंस
(कुणीतरी सुरू केलेले) कंस संपवायचे आहेत या अर्थी. >>>
हो आले लक्षात. यात इथेही एक येउन गेला 
ते Python वाला "नसेल तर" असे
ते Python वाला "नसेल तर" असे हवे का?
की database मधल्या relationships बद्दल आहे हे?
कंसाच्या बाबतीत मी पण नुसते
कंसाच्या बाबतीत मी पण नुसते कंसच नाही तर अवतरण चिन्हं पण क्लोज केली की नाही चेक करते….
अॅस्टेरिक्स म्हणजे मुंग्या!
अॅस्टेरिक्स म्हणजे मुंग्या!
माहितीबद्दल आभार, माझेमन.
माहितीबद्दल आभार, माझेमन.
किमान पाच गट पाठवा >>> कुठे
किमान पाच गट पाठवा >>> कुठे गट पाठवायचेत? गटग शब्दाला नवीन आयाम वगैरे देतायत का?
सराय इतकंच शुद्ध मराठी पाच गट
सराय इतकंच शुद्ध मराठी पाच गट पाठवा हे आहे. द्या ढकलून झालं.
मला आलेलं ताजं फॉरवर्ड
मला आलेलं ताजं फॉरवर्ड
=====
अवश्य वाचा व अग्रेशीत करा.
२२ एप्रिल २०२५ — तो दिवस खरं तर जल्लोषाचा असायला हवा होता, पण नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं.
१. डॉ. विजय देशमुख: लखनौच्या किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर. त्यांनी आरामदायी वैद्यकीय व्यवसाय सोडून नागरी सेवेचा खडतर मार्ग निवडला होता. गेल्या तीन वर्षांपासून ते दिल्लीत या परीक्षेची तयारी करत होते.
२. संजय अहलुवालिया: मुझफ्फरनगरच्या रस्त्यांवरून येऊन नागरी सेवेचं स्वप्न पाहणारा, आयआयटी दिल्लीचा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदवीधर. तोही तीन वर्षांपासून मुखर्जी नगरमध्ये राहून तयारी करत होता.
३. बरखा सिंग: लेडी श्रीराम कॉलेजची माजी विद्यार्थिनी — जिच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात दृढनिश्चयाचं एक ध्येय होतं. ती सहा वर्षांपासून आयएएसची तयारी करत होती.
४. चंदना मुखर्जी: कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजची एक गंभीर विचार करणारी, समजूतदार, शांत मुलगी. तीही तीन वर्षांपासून दिल्लीत तयारी करत होती.
या चौघांनीही संघर्ष आणि स्वप्नांच्या गर्दीत, वजिराम आयएएस अकादमीच्या वर्गात कठोर अभ्यास केला. मैत्रीत त्यांनी प्रत्येक परीक्षेत, प्रत्येक मॉक मुलाखतीत, प्रत्येक आत्म-शंकेच्या क्षणी एकमेकांना साथ दिली.
१५-१७ एप्रिल २०२५ — यूपीएससी व्यक्तिमत्त्व चाचणीचा दिवस. तणावपूर्ण हसू, औपचारिक कपडे, धडधडणारी हृदयें. एक एक करून ते धोलपूर हाऊसच्या भव्य इमारतीत शिरले. आणि प्रचंड अपेक्षा घेऊन एक एक करून मुलाखतीतून बाहेर आले.
वर्षांनुवर्षांचा ताण घालवण्यासाठी, त्यांनी त्यांची खूप दिवसांपासून ठरवलेली योजना प्रत्यक्षात आणली — "काश्मीरकडे एक प्रवास."
१८ एप्रिल २०२५ — चार मित्र श्रीनगरला पोहोचले.
हवेत वसंत ऋतूचा सुगंध होता. सकाळचे किरण दाल लेकवर चमचमत होते. शिकारातून काहवा पीत ते मुघल गार्डनच्या गल्ल्यांमध्ये हरवून गेले. गुलमर्गमधील बर्फात ते मुलांसारखे हसले. त्यांनी जगातील सर्वात उंच ठिकाणी गोंडोला राइड केली — दरीच्या पलीकडे त्यांची वाट पाहणाऱ्या वादळापासून ते अनभिज्ञ होते.
२२ एप्रिल, ते पहलगामला पोहोचले.
हा तो दिवस होता, ज्या दिवशी त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आणि स्वप्नं साजरी करायची होती — नागरी सेवा परीक्षेचा निकाल लागणार होता. ते दऱ्याखोऱ्यात फिरले, लिडर नदीच्या काठावर नाचले आणि खूप फोटो काढले. पण, दुपारी २:१५ वाजता, सर्व काही बदललं.
शांत दऱ्याखोऱ्यात गोळीबाराचा आवाज घुसला. पहलगाम बाजार परिसरात दहशतवादी हल्ला झाला — स्वर्गासारख्या ठिकाणाचं रूपांतर नरकात झालं. लोक किंचाळले. रक्त सांडलं. सर्वत्र गोंधळ होता. दहशतवादी नावं आणि धर्म विचारून गोळ्या झाडत होते.
घबराट! चार मित्र जीव वाचवण्यासाठी धावले. त्यांना एक मारुती व्हॅन मिळाली, १०,००० रुपये दिले आणि चालकाला विनंती केली, "आम्हाला कुठेतरी घेऊन चला, फक्त इथून दूर."
व्हॅन चालक त्याच गावचा होता, दऱ्याखोऱ्यातून पलीकडे जाऊन त्याने त्यांना अनंतनागजवळ, पाकिस्तान सीमेच्या अगदी जवळ सोडलं.
आणि मग जे घडलं, ते ऐकून सर्वांना धक्का बसला.
दुपारी ४:५० वाजता, पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना घुसखोर समजून पकडलं.
त्याच दिवशी, दुपारी ३:०३ वाजता, यूपीएससी २०२५ चा निकाल लागला. आणि काय सांगायचं?
विजय: रँक ६७
संजय: रँक ७१
बरखा: रँक ६१
चंदना: रँक ७३
भारतात सर्वत्र या नावांनी पडदे उजळून निघाले — पण ते चौघे तिकडे पाकिस्तानातील अनंतनागजवळच्या तुरुंगात बंद होते, याबद्दल त्यांना काहीच माहिती नव्हती.
दिल्लीत, कुटुंबांनी निकाल पाहिले. त्यांनी फोन केले, मुलं बेपत्ता असल्याचं कळलं. शोध घेण्यात आला, तक्रारी दाखल करण्यात आल्या, काही दिवसांनी गृह मंत्रालयाकडे एक विनंती करण्यात आली: "आमची मुलं बेपत्ता आहेत. त्यांनी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आहे. कृपया त्यांना शोधा."
आता मोदींच्या नव्या भारताकडे वळूया:
प्रत्युत्तर म्हणून, भारताने दहशतवादविरोधी मोहीम सुरू केली.
भारतीय डीजीएमओने गुप्त मोहिमा सुरू केल्या. स्लीपर सेल नष्ट करण्यात आले. गुप्तचर यंत्रणांना सतर्क करण्यात आले.
पाकिस्तानसोबत तणाव वाढला. सीमेवर आगीच्या ज्वाळा दिसल्या. नियंत्रण रेषेपार हवाई हल्ले करण्यात आले.
१० मे २०२५, संध्याकाळी ५:०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
— पाकिस्तानी डीजीएमओने युद्धविराम विनंती केली. चर्चेदरम्यान, नवीन भारतीय लष्करप्रमुखांनी चार बेपत्ता तरुणांचा मुद्दा उपस्थित केला.
दीर्घ शोध आणि आंतरराष्ट्रीय दबावानंतर, १३ मे रोजी याची पुष्टी झाली: ते चौघेही जिवंत होते — पाकिस्तानमधील अनंतनाग चौकीजवळील एका तुरुंगात.
१६ मे २०२५: भारतीय शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली.
"त्यांना 'द हिंदू' वर्तमानपत्राची एक प्रत देण्यात आली — ज्याची तारीख २२ एप्रिल २०२५ होती."
मुख्यपृष्ठावर: त्यांची नावं आणि रँक छापले होते.
एका तुरुंगाच्या कोठडीत, त्यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा विजय साजरा केला.
नव्या भारताचा चमत्कार:
सर्व कायदेशीर प्रक्रिया त्वरित पूर्ण करून आणि आंतरराष्ट्रीय दबावामुळे, पाकिस्तानी सरकारला त्यांची सुटका करावी लागली.
१८ मे २०२५: चार तारे वाघा सीमेवरून भारतीय लष्कराच्या संरक्षणाखाली भारतात परतले.
ते फक्त पदव्या आणि रँक घेऊन कलेक्टर होणार नाहीत, तर संघर्ष, देशभक्ती, सरकार आणि नियतीची एक कहाणी घेऊन कलेक्टर बनतील. त्यांना नेहमी आठवण राहील की भारतमाता त्यांच्या मदतीसाठी धावून आली आणि त्यांचं आयुष्य भारतमातेचं ऋणी आहे.
या घटनेमुळे इतिहास घडला आहे. हा तोच भारत आहे, जो ९३,००० पाकिस्तानी कैद्यांना सोडूनही आपले सैनिक परत आणू शकला नाही.
हा तोच भारत आहे, ज्याला विमान अपहरणकर्त्यांना मुक्त करण्यासाठी दहशतवाद्यांना सोडावं लागलं होतं.
हा तोच भारत आहे, ज्याच्या सैन्याला हात बांधून दहशतवाद्यांनी फेकलेल्या दगडांचा सामना करावा लागत असे.
जय हिंद
काॅपी पेस्टेड.
अग्रेषित करा म्हणजे काय ते
अग्रेषित करा म्हणजे काय करा ते मला विचारू नका. अनंतनाग पाकिस्तान सीमेजवळ कधी गेले हे मी पण शोधते आहे.
अग्रेषित > forward .
अग्रेषित > forward .
आता बाकीच वाचते
विजय: रँक ६७
संजय: रँक ७१
बरखा: रँक ६१
चंदना: रँक ७३
भारतात सर्वत्र या नावांनी पडदे उजळून निघाले >>> या चौघांचेच नाव का बरं ??
"आमची मुलं बेपत्ता आहेत. त्यांनी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आहे. कृपया त्यांना शोधा." >>>> अगदीच सॉरी , पण , नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाली नसती तर ... ???
"त्यांना 'द हिंदू' वर्तमानपत्राची एक प्रत देण्यात आली — ज्याची तारीख २२ एप्रिल २०२५ होती."
मुख्यपृष्ठावर: त्यांची नावं आणि रँक छापले होते. >>>>> निकाल २२ एप्रिल २०२५ - दूपारी ३:०३ वाजता लागला . आव्रुत्ती सन्ध्याकाळची होती का ?
बनावट वाटतोय फॉर्वर्ड.
बनावट वाटतोय फॉर्वर्ड.
मुद्दाम कुणाला तरी ट्रोल करण्यासाठी असे फॉर्वर्डस रचले जातात असं दिवसेंदिवस वाटतं.
काश्मीरच्या भूगोलाची ऐशी की
काश्मीरच्या भूगोलाची ऐशी की तैशी करून ठेवलीय.
शिकारा मेला मुघल गार्डन च्या गल्लीत कुठे घुसला?
कंस चर्चा वाचून मी-अनु
कंस चर्चा वाचून मी-अनु ह्यांची आठवण आली
त्या देखील आवर्जून कंस बंद झालेत का उल्लेख असायचा
अनु या परत
पिसे काढायला तुम्हीही हव्यात की
एवढा मोठा msg वाचायचे सत्तर
एवढा मोठा msg वाचायचे सत्तर रुपये पडतील
सत्तर रुपये वारले.
सत्तर रुपये वारले.
एकाच फॉर्वर्डमध्ये अनंतनाग पाकिस्तानच्या सीमेजवळ आणि पाकिस्तानात जाऊ शकते तर शिकारा मुघल गार्डनमध्ये का नाही जाऊ शकत?
हा देशी गाईचे महत्व सांगणारा
हा देशी गाईचे महत्व सांगणारा अजून एक कायप्पा वरील कायपण फॉरवर्ड...
*देशी गाईचे महत्त्व....!!!*
*२४ जून १८१३ म्हणजे २०७ वर्षापूर्वी ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये*
*"देशी गाय" नष्ट करून भारतीय गरीब कसे करायचे? यावर चर्चा होऊन बिल मंजूर झाले. भारताचा सहा महिने ब्रिटिश तज्ज्ञांनी अभ्यास केला, तेव्हा त्यांच्या लक्षात आले...*
*१) भारत ९५ % शेतीप्रधान देश आहे. कारण इथली शेती अतिशय समृध्द आहे.*
*२) उत्तम धनधान्य मुबलक आहे. घरोघरी सोनं नाणं भरपूर आहे.*
*३) या शेतीचा मुळ आधार आहे गाय, आणि ही गाय नष्ट झाली तर शेती व्यवस्था नष्ट होईल. व गरीब झालेले लोक ख्रिस्त होतील.*
*आणि यासाठी १८२० साली गाईंच्या कत्तलीसाठी पहिला कत्तलखाना कलकत्त्याला सुरू झाला, आणि त्यानंतर गोवंशाची बेसुमार कत्तल झाली. देश स्वतंत्र झाल्यावर सुध्दा कत्तली चालूच राहिल्या. गोमांसाचे (मीट ) महत्त्व परदेशात वाढत गेले. यामुळं गेल्या २०० वर्षानंतर फक्त एक टक्का देशी गाय देशात शिल्लक आहे. हे एक आंतरराष्ट्रीय षडयंत्र होतं व त्याला आमच्याच राज्यकर्त्यांनी नंतर मोठ्याप्रमाणात सहकार्य केले आहे.*
*गोधन नष्ट करताना दूध कमी पडू नये म्हणून गेल्या ७० वर्षात जर्सी, होस्टन सारख्या गायींची पैदास वाढवली. यामुळं कॅन्सर सारखे रोग पसरले.*
*कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात कॅन्सर ने थैमान घातले ते केवळ संकरित गाईच्या विषारी दुधामुळे आहे, हे आता सिद्ध झाले आहे. याबाबत सखोल संशोधन करणारे कणेरी मठाचे पूज्य काडसिद्धेश्र्वर महाराज म्हणतात*,
*१) संकरित गायीचं दूध विष आहे. तर देशी गाईचं दूध आईच्या दुधा प्रमाणे अमृत आहे.*
*२) संकरित गाईच्या दुधामुळे शरीरातील इंद्रियां च्या कार्यक्षमतेवर वाईट परिणाम होतो, तर देशी गाईच्या दुधामुळे प्रतिकारक्षमता वाढते व सर्व इंद्रिय उत्तम कार्यक्षम होतात.*
*३) संकरित गाय भरपूर दूध देणाऱ्या म्हणून चौपट महाग आणि देशी गाय कमी दूध देते म्हणून स्वस्त आहे. पण संकरित गायींच्या दुधामुळे शरीर जर्जर व रोगग्रस्त होतं, ( मधुमेहाच प्रमाण वाढण्याचं एकमेव कारण हे दूध आहे) तर देशी गाईच्या दुधामुळे प्रतिकारक्षमता वाढल्याने शरीर मजबूत व व्याधिमुक्त होते.*
*४) आज अनेक गर्भश्रीमंत कारखानदार, नटनट्या, उद्योगपती स्वतःच्या शरिरस्वास्थ्यासाठी एक हजार रुपये प्रति लिटर भावाने देशी गाईचे दूध, आठ ते दहा हजार रुपये किलो दराने तूप घेऊन खात आहेत. यांच्यासाठी खास देशी गाईचे गोठे तयार केले आहेत.*
*भारतीय गीर (काठीयवाडी) गाय ब्राझीलमध्ये नेली, इथल्या वळूना त्यांनी नेलं, आणि संशोधन करून ६४ लिटर दूध देणारी गाय तयार केली. गीर, लाल सिंधी, साहिवाल, कांकरेज या भरपूर दूध देणाऱ्या गायींची पैदास राज्यकर्त्यांनी वाढवली नाही, उलट संकरित गाईंच विषारी दूध पाजून परदेशी अँलोपथ्यी औषधांसाठी बाजारपेठ तयार bकरण्यासाठी या देशातील लोकांचे शरीर व्याधीग्रस्त कसे होईल याची व्यवस्था केली.*
*मुळ भारतातून नष्ट नामशेष झालेली ब्राह्मण ही देशी गायींची जात फक्त अमेरिकेत आहे. या गायींची करोडो रुपये किंमत मोजून ऑस्ट्रेलिया, मलेशिया देश विकत घेत आहेत. परदेशातील शास्त्रज्ञांनी प्रत्येक प्रकारची गाय व वळूंना नेले. संशोधन करून गाय पैदास केली. उत्तम प्रकारचे दूध मिळवलं आणि आमच्या राज्यकर्त्यांनी विषारी दुधाच्या जर्सी, हॉस्टन सारख्या विषारी दुधाच्या गायींची पैदास करण्याचं कारस्थान करून आपल्याच जनतेला व्याधीग्रस्त केले आहे.*
*जगात कोणत्याही गायीला वशिंड नाही फक्त भारतीय गायींना वशिंड आहे. या वशिंडात सूर्य किरणातील काही उपयुक्त किरण शोषून घेण्याची क्षमता आहे. या उपयुक्त किरणांमुळे गायीच्या जीन्स मध्ये प्राकृत शारीरिक प्रतिकारक्षमता तयार होते. ती क्षमता दुधात उतरते आणि असे पौष्टीक दूध मानवाला मिळते. देशी गाईचे दूध आईच्या दुधा इतकेच पौष्टीक शरीराचे उत्तम पोषण करणारे आहे, शिवाय मानव शरीर तंदुरुस्त व व्याधीमुक्त राहते. यामुळं पूर्वीच्या माणसांचं आयुष्यमान उत्तम होतं*.
*अर्थात दूध हा गायीचा उपपदार्थ आहे. गाय दूध फक्त व्याल्यावर काही काळ देते. सतत देत नाही. गायीपासून कायम मिळणारा मुख्य पदार्थ म्हणजे शेण (गोमय) आणि मूत्र (गोमूत्र).*
*गायीच्या शेणात व मुत्रात जीवाणू निर्माण करण्याची प्रचंड क्षमता असते. हे जीवाणू वनस्पतींना वाढीसाठी असणारे सेंद्रिय खत जमिनीत तयार करतात. त्यामुळे विषमुक्त अन्न निर्माण होते.*
*गोमूत्र हे आयुर्वेदिक औषधात उपयुक्त आहे. आयुर्वेदिक गुटी वटी गोळ्यांना केवळ गोमूत्राची भावना दिल्याने ( गोळ्यांना वरून लावल्याने) गोळ्यांची क्षमता अनेक पटींनी वाढते. कॅन्सर सारख्या अनेक दुर्धर व्याधीमध्ये गोमुत्राचा चांगला उपयोग होत आहे, असे सिध्द झाले आहे.*
*गोमूत्र शिंपडल्याने घातक जंतू, विषाणू नष्ट होतात. तसेच घातक किरणोत्सारापासून रक्षण होते, याची अनुभूती अणुशक्तिकेंद्र दुर्घटनेत काहींनी घेतली आहे.*
*धेनु त्वां कामधेनु l सर्व पापं विनाशिनी l*
*मोक्षफल दायीनीच l मातृदेवी नमोस्तुते ll*
*अशाप्रकारे देशी गाय ही कामधेनु आहे. सर्व व्याधींचा नाश करून मोक्षफळ देणारी, पवित्र अशी मातृदेवी आहे म्हणून प्रत्येक हिंदू गायीपुढे नतमस्तक होतो.*
*सबब वेद व पुराणकाळापासून हिन्दू गायीला विश्वाची माता .. गो विश्वस्य मातरम् .... असे म्हणतात.*
शिकारा, मुघल गार्डन, अनंतनाग,
शिकारा, मुघल गार्डन, अनंतनाग, पहलगाम, वाघा बॉर्डर द हिंदू ची छापील प्रत… सर्व हाकेच्या अंतरावर … बढ़िया है. 😀
हा तोच भारत आहे, जो ९३,००० पाकिस्तानी कैद्यांना सोडूनही आपले सैनिक परत आणू शकला नाही….
Fact Check ? ते काय असतं?
गाय जर इतकी चांगली तर गोमांस
गाय जर इतकी चांगली तर गोमांस ...कंसात मीट... सुपर से भी उपर असणार ना? तुमच्या जठराग्नीत साक्षात गोमाता प्रविष्ट झाली तर तो दुग्धशर्करा (ऑफ कोर्स देशी गाईचे दुग्धच! ) योगच की! आज पासून फक्त देशीगाईचा हॅम्बर्गर खा!
हॅम देशी हवं का विदेशी ते तुम्ही तुमचं ठरवा.

*अर्थात दूध हा गायीचा
*अर्थात दूध हा गायीचा उपपदार्थ आहे. गाय दूध फक्त व्याल्यावर काही काळ देते. सतत देत नाही. गायीपासून कायम मिळणारा मुख्य पदार्थ म्हणजे शेण (गोमय) आणि मूत्र (गोमूत्र).* >> हे वाचून दूधाऐवजी आता मुख्य पदार्थ घेत जा अशा रूळावर गाडी येते कि काय असे वाटले होते पण तशातला काही "चिमित्कार" नाही बघायला मिळाला
देशी गाईचे दूध आईच्या दुधा इतकेच पौष्टीक शरीराचे उत्तम पोषण करणारे आहे >> देशी गाईचे दूध शरीर पौष्टीक नसेल तर उत्तम पोषण करत नाही असे सुचवतायेत का ?
*भारतीय गीर (काठीयवाडी) गाय ब्राझीलमध्ये नेली, इथल्या वळूना त्यांनी नेलं, आणि संशोधन करून ६४ लिटर दूध देणारी गाय तयार केली. >> कय जबरा संशोधन आहे ! आक्ख्या आयुष्यात ६४ लिटर धूध म्हणजे मानले पाहिजे.
"सखोल संशोधन करणारे कणेरी
"सखोल संशोधन करणारे कणेरी मठाचे पूज्य काडसिद्धेश्र्वर महाराज म्हणतात " >>> हे वाक्य सर्वात विनोदी वाटले
गायीच्या शेणात व मुत्रात जीवाणू निर्माण करण्याची प्रचंड क्षमता असते >>>
आणि गोमूत्र शिंपडले असता जंतू नष्ट करण्याची ताकद असते हे किंचित, जर्रासं कॉन्ट्रॅडिक्टरी वाटत आहे ना?
मधुमेहाच प्रमाण वाढण्याचं एकमेव कारण हे दूध आहे >>> ग्राउंड ब्रेकिंग रीसर्च आहे!
इतकं दूध वाईट्ट आहे तर दूध
इतकं दूध वाईट्ट आहे तर दूध पिणे बंद करुन टाका.. की ना रहेगा मधुमेह!
“पण तशातला काही "चिमित्कार"
“पण तशातला काही "चिमित्कार" नाही बघायला मिळाला” -
“गाय जर इतकी चांगली तर गोमांस ...कंसात मीट... सुपर से भी उपर असणार ना?” - सौं ट़के किं बात हैं
"आमची मुलं बेपत्ता आहेत.
"आमची मुलं बेपत्ता आहेत. त्यांनी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आहे. कृपया त्यांना शोधा." >>>> अगदीच सॉरी , पण , नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाली नसती तर ... ??? >>> नेकेड गन मधला हा संवाद आठवला. क्लिपच्या अगदी शेवटी आहे
"You killed five actors. Good ones!"
https://www.youtube.com/watch?v=kFEK0Sbq4o8
*२४ जून १८१३ म्हणजे २०७
*२४ जून १८१३ म्हणजे २०७ वर्षापूर्वी ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये*
*"देशी गाय" नष्ट करून भारतीय गरीब कसे करायचे? यावर चर्चा होऊन बिल मंजूर झाले >>>
१८१३ पर्यंत ब्रिटनमधे महत्त्वाच्या सर्व विषयांवर कायदे करून झाल्याने सभागृहात सदस्यांचा वेळ जात नसे. तेव्हा एखाद्या कंपनीचा अधिकारी ज्याबद्दल स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतो अशा बाबतीतही चर्चा करून डायरेक्ट ब्रिटनमधेच कायदे करू असे ठरलेले दिसते. तेव्हा तर भारतात राणीचा अंमलही नव्हता . एका खाजगी कंपनीने (ईस्ट इण्डिया कंपनी) भारतात कत्तलखाना सुरू करणे अशा गोष्टीही थेट हाउस ऑफ कॉमन्स मधे चर्चिल्या जाऊ लागल्या (त्यातूनच काही लोकांचे आडनाव चर्चिल असे झाले. पुढे त्यांच्यापैकीच एकजण पंतप्रधान झाला. त्याचे बोलणे फार फेमस होते). १८१८ साली भारतातून तार आली की खडकीजवळ पेशव्यांची फौज आली आहे. ताबडतोब कायदा करा म्हणजे आम्ही लढायला उतरतो. असे तेव्हा कामकाज चालत असे.
संकरित गाईच्या दुधामुळे शरीरातील इंद्रियां च्या कार्यक्षमतेवर वाईट परिणाम होतो >>> हे फक्त मानवांच्या बाबतीत की त्यांच्या वासरांवरही? त्यांच्यावरही तोच परिणाम असता तर हा "सेल्फ फिक्सिंग प्रॉब्लेम" असला असता
संकरित गायींची पैदास कमी होऊन पुन्हा देशी गायीच आणाव्या लागल्या असत्या.
गाय जर इतकी चांगली तर गोमांस ...कंसात मीट >>>
जगात कोणत्याही गायीला वशिंड नाही फक्त भारतीय गायींना वशिंड आहे >>> "दीवार" पुलाखाली जर्सी व देशी गाई उभ्या आहेतः
जर्सी "मेरे पास इतना गोमांस (मीट) है, ६४ लीटर दूध है. क्या है तुम्हारे पास?"
देशी: "मेरे पास वशिंड है"
एक हजार रुपये प्रति लिटर भावाने देशी गाईचे दूध, आठ ते दहा हजार रुपये किलो दराने तूप घेऊन खात आहेत >>> यातल्याच एखाद्या गुज्जू किंवा सिंधी/मारवाडी उद्योगपतीने भाव पाडून दूध घेउन तूप विकायलाही सुरूवात केली असेल
गोमय व गोमूत्र याची महती गायीच्या पचनसंस्थेला माहीत नाही हे किती मानवजातीवर उपकार आहेत! नाहीतर ते बाहेरच आले नसते!
मुळ भारतातून नष्ट नामशेष झालेली ब्राह्मण ही देशी गायींची जात फक्त अमेरिकेत आहे. या गायींची करोडो रुपये किंमत मोजून ऑस्ट्रेलिया, मलेशिया देश विकत घेत आहेत. परदेशातील शास्त्रज्ञांनी प्रत्येक प्रकारची गाय व वळूंना नेले >>> मला एक मिनिट हे गायींबद्दलच बोलत आहेत ना की यात काही सांकेतिक आहे अशी शंका आली. मात्र यावरून भारतातून ब्राह्मण बाहेर गेले असे ठोकून नरो वा कुंजरो वा स्टाइलने नरो वा धेन्वो(?) वा असे काहीतरी म्हणता येईल
Pages