काहीच्या काही फॉरवरर्ड्स - २

Submitted by मानव पृथ्वीकर on 2 April, 2025 - 05:31

कायप्पावर, फेसबुक किंवा इतरत्र अनेकदा काहीच्या काही वाटावे असे निनावी लिखाण फिरत असते.
त्यातील काही खास वाटले तर आणि निनावी असले तरच शेअर करण्यास हा धागा.

हा पहिल्या भागाचा दुवा.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला एकदम वाईट वाटलं की मी स्वतःच्या लेखाची रिक्षा फिरवून तुमच्या कवितेवर अनावधानाने हसले. खरंच लक्षात आले नाही, ओरिजनल वाटले. क्षमस्व विकु. Happy

विकु Lol

अस्मिता, तुझा प्रतिसाद एडिट केलेला दिसतोय. पण तुझी कविता मानवकृपेने वाचायला मिळाली (की ती त्यांचीच आहे?). त्यातही तितकेच साहित्यिक मूल्य असल्याने त्यावरही Lol

ती त्यांचीच आहे हर्पा. काकाफॉ चुकीच्या नावाने आलेले फॉरवर्ड झाले आज. कोणी काय लिहिलेय त्याचा गोंधळ होतोय. Lol

रमड Proud

विकु, मस्तच.

तुमच्या या टेक्नॉलॉजीने
चार्ज होईल टेस्ला
पण मनाचे चार्जिंग करायचा
प्रयोग मात्र फस्ला .

हे आलंय का इकडे?

*गाय आणि म्हशीच्या दुधात फरक फार कमी लोकांना माहीत आहे.*

म्हैस आपल्या मुलापासून दूर पाठ करून बसते, जरी तिचे मूल कुत्र्यांनी खाल्ले तरी ती त्याला वाचवणार नाही. तर गाईच्या पिल्लाकडे अनोळखी व्यक्ती आल्यास ( वाघ सुद्धा )जीव देईल पण तो जिवंत असताना बाळावर आच येऊ देणार नाही.
त्यामुळेच त्याच्या दुधात आपुलकीचा गुण मुबलक आहे.

म्हशीला घाण आवडते, चिखलात देखील बसेल ,
पण गाय शेणावरही बसणार नाही, तिला स्वच्छता आवडते.

म्हशीला घरापासून 2 किमी अंतरावर तलावात सोडून या, ती घरी येऊ ।शकत नाही, तिची स्मरणशक्ती शून्य आहे. गायीला घरापासून ५ किमी अंतरावर सोडा. तिला घरचा रस्ता माहित आहे, ती येईल. गायीच्या दुधात स्मरणशक्ती तीक्ष्ण असते.

दहा म्हशी बांधा आणि त्यांच्या पिल्लांना 20 फूट दूर सोडा, एकही मूल आईला ओळखू शकत नाही तर गोशाळांमध्ये दिवसभर गाई-वासरांना स्वतंत्र शेडमध्ये ठेवले जाते, संध्याकाळी जेव्हा प्रत्येकजण आईला भेटतो तेव्हा सर्व वासरे ( मुले हजारोच्या संख्येने) आपल्या आईला ओळखतात आणि दूध पितात, ही गाईच्या दुधाची आठवण आहे.

म्हशीचे दूध काढल्यावर म्हैस सर्व दूध देते, पण गाय थोडं दूध शिल्लक ठेवते पान्हा चोरते व वासरू पिवू लागल्या नंतर पान्हा सोडते आणि जेव्हा ती आपली पिल्लं दूध पाजायला घेते तेव्हा शिल्लक दूध पाजते. हे गुण आईचे आहेत जे म्हशीत नाहीत.

रस्त्यावर मुले खेळत असतील आणि म्हैस धावत आली तर ती नक्कीच मुलांवर पाय ठेवते. पण गाय आली तर ती मुलांवर कधीच पाय ठेवत नाही.

म्हशीला सूर्य आणि गरमी सहन होत नाही...
तर गाय मे-जूनमध्येही उन्हात बसू शकते.

म्हशीचे दूध तामसिक असते. गाईचे सात्विक असते.

म्हशीच्या दुधात आळस भरलेला असतो, तिचे पिल्लू दिवसभर भांग खाल्ल्यासारखे पडून असते. जेव्हा दूध काढण्याची वेळ येईल तेव्हा मालक ते उचलतो ...पण गायीचे वासरू एवढी उडी मारेल की तुम्ही दोरी सोडू शकणार नाही.

तरीही लोक म्हशी खरेदीसाठी लाखो रुपये खर्च करतात. तर गाईचे दूध हे अमृतासारखे आहे.
आपल्या अहिराणीत "गाय आणि माय" अशी म्हण प्रचलित आहे.

उपरोक्त गाय व म्हैस यातील गुणात्मक फरक सांगीतला आहे तो बुध्दी , मन, धर्म, शास्त्र,विज्ञान यांच्या कसोटी वर उतरणारा विवेक बुद्धीला पटणारा आहे म्हणूनच गाईला गोमाता संबोधले आहे . ते शास्त्र संमत आहे . म्हणूनच ती गोमाता आहे. म्हशीला माता म्हटले जात नाही . तसेच हिंस्र प्राणी पांचसहा पिलांपैकी एक पिलू खावून टाकतात . [ मांजर डुक्कर इत्यादी ]
आज ही गाईच्या मस्तकापासून वशींढ व पाठीवरून व मानेखालील पोळी वरून हात फिरवून शेपटाचा गोंडा कपाळाला लावला जातो व गोदर्शन व गोस्पर्श श्रेष्ठ मानला जातो व बी पी नॉर्मल होण्यास साह्यभूत होतो.
माकड देखील नाका पर्यंत पाणी आल्यास पिलाला खाली ठेवून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी वर ऊभे राहते . [ पण गोमाता नव्हे ] नुकतेच मोबाईल रेज ( किरण ) शरीरास अपायकारक आहेत म्हणून गाईच्या गोवरीचा छोटा तुकडा खिशात ठेवल्यास दुष्परीणामा पासून संरक्षण होते हा प्रयोग वैज्ञानिकांनी केल्याचे सिद्ध झाले आहे .पूर्वी श्रावणीला पंचगव्य प्राशन आम्ही जानवे बदलतांना करत होतो . दुधापासून गोमुत्र व शेणाचे सर्व फायदे व स्पर्श सुद्धा मानवाला विज्ञानाच्या कसोटीवर फायदेशीर ठरला आहे . अशी ही गोमाता माते एवढीच श्रेष्ठ आहे . गाईला गोग्रास खावु घालतानाचा मंत्र
॥ गाय गुरळी मुखी हरळी ॥
॥ शिंग पोलादी पाठ काशी ॥
॥ शेपुट वारानसी ॥
॥ गाई गाई गोग्रास घे ॥
॥ अंतः काळी विष्णूचे दर्शन दे ॥
हा गोग्रस खावू घालण्याचा प्राकृतमंत्रच सर्व काही सांगुन जातो.

नरेंद्र जोशी धोंडापुरा बीड

म्हशीला सूर्य आणि गरमी सहन होत नाही...
तर गाय मे-जूनमध्येही उन्हात बसू शकते. >>> Lol उन्हात बसता येणे हा सात्विकपणाचा क्रायटेरिया कधीपासून झाला?

म्हशीला घरापासून 2 किमी अंतरावर तलावात सोडून या, ती घरी येऊ ।शकत नाही >>> म्हैस किमान काही अंतरावरून घरी येऊ शकते हे "अगं अगं म्हशी" म्हणीतून सिद्ध होते Happy

म्हैस किमान काही अंतरावरून घरी येऊ शकते हे "अगं अगं म्हशी" म्हणीतून सिद्ध होते>> Lol

आणि
॥ शिंग पोलादी पाठ काशी ॥
॥ शेपुट वारानसी ॥

पाठ काशी, शेपुट वाराणसी. Lol म्हणजे काय? आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी ऐकलंय. 'पाठ काशी, शेपुट वाराणसी' हे त्या सोमेश्वर आणि रामेश्वरचं लोकलायझेशन केलेलं वर्जन आहे का? बाकी काशी आणि वाराणसी समानार्थी शब्द आहेत ना? व्हिटी आणि छशिमट सारखे?
बाकी२: हे आधी मी शेपुट वानरासी वाचलं. म्हटलं वानर कुठे आलं मधेच. Wink

हा काकाफॉ लिहिणाऱ्या सरांनी गुजरातच्या मारकुट्या गाईंचा अनुभव घेतलेला दिसत नाही.

BTW, गाय गो-माता तर म्हशीला किमान गो-मावशी म्हणायला हरकत नाही. आळशी, ठिम्म म्हणून बदनाम असल्या तरी फार शांत आणि relaxed वाईब्ज असतात म्हशीच्या, माझा आवडता प्राणी Happy

दुधाला स्मरणशक्ती असते?? त्यात बोर्नव्हिटा घालतात म्हणून का? Proud

बाकी काय रेंज आहे - गाय म्हैस पासून थेट पिल्लं खाणारे हिंस्त्र प्राणी आणि माकड. केहना क्या चाहते हो?

बी पी नॉर्मल होण्यास साह्यभूत >>> सगळ्या डॉक्टरांना एक गाय दवाखान्यात उभी करून ठेवायला सांगायला हवी Lol

गाईच्या गोवरीचा छोटा तुकडा खिशात >>> त्यापेक्षा मोबाईल केसेस गाईच्या शेणापासून करायला लागू. तेवढीच एक रोजगाराची संधी - गाईंना Proud

.. मोबाईल केसेस गाईच्या शेणापासू…..

रमड, अरे नका असे आयडिया पुरवू त्यांना. पुढचा काकाफॉ त्यावरच येईल 😀

Lol

दुधापासून गोमुत्र व शेणाचे सर्व फायदे व स्पर्श सुद्धा मानवाला विज्ञानाच्या कसोटीवर फायदेशीर ठरला आहे
>>> मी अजून हे वाक्य डिकोड करते आहे Lol

Happy बाकी ही खरे आहे का?
की गाईची पिल्ले आईला बरोब्बर ओळखतात व म्हशीची नाही...हे वगैरे?

जबरी आहे.
म्हशीला सूर्य आणि गरमी सहन होत नाही...>>>>> कारण ती टॅन होऊन काळी झालेली असते.

म्हैस आपल्या मुलापासून दूर पाठ करून बसते, जरी तिचे मूल कुत्र्यांनी खाल्ले तरी ती त्याला वाचवणार नाही.>>>>>> रेडकू कुत्रे का खातील?

तर गाईच्या पिल्लाकडे अनोळखी व्यक्ती आल्यास ( वाघ सुद्धा )जीव देईल पण तो जिवंत असताना बाळावर आच येऊ देणार नाही.>>>>> अनोळखी व्यक्ती - वाघ..व्वा.
आच नहीं आने दुंगी. Lol

त्यामुळेच त्याच्या दुधात आपुलकीचा गुण मुबलक आहे.>>>>> दुधाचा हा गुण आजच कळला.

म्हशीच्या दुधात आळस भरलेला असतो, तिचे पिल्लू दिवसभर भांग खाल्ल्यासारखे पडून असते>>>> मी म्हशीचे दूध पित असल्याने हे गुण माझ्यात आले की काय.
उद्यापासून आपुलकीच्या दुधाचे प्राशन.

मी अगदी हेच म्हणणार होतो. लहानपणापासून कायम म्हशीचे दूध प्यायल्याने हा आळस आला आहे माझ्यात.

वरील काकाफॉत गाय व म्हशीच्या डोळ्यातला फरक तसेच गोवंशातील बैल व वळू यांचे उपयोग असतात पण रेडा फक्त बळी देण्यासाठी वापरतात वगैरे कसं नाही?

दादा कोंडकेंच्या एका पिक्चरमध्ये ते म्हैशीवर बसून कुठे तरी चालले असतात मग तिला डायरेक्शन कशी कळली? का ती स्पेशल म्हैस विथ जीपीएस होती

मी तर दूधच पीत नाही. पण पूर्वी म्हैस व सध्या गायीच्या दूधाचा चहा पीते मग माझा आळस का जात नाही?

आता इथे दोन चमचे ॲट ए टाईम गाईचं दूध पितो. ते ही कॉफीत घालून त्यामुळे आळस कमी झालाय माझा. मला वाटायचं कॉफी पिऊन तरतरी येते, पण ती त्या दोन चमचे दुधाची किमया होती तर!

दादा दोन किमी च्या आतल्या अंतरावर जात होते. मग तेवढा मॅप मावेल इतकी मेमरी असते म्हशीची.
स्लायडिंग विंडो अल्गोरिदम म्हशींवरून मेमरी मॅप वरून करायला सुचला म्हणे. माशेलकरांनी पेटंट अर्ज दिलाय.

Pages