Submitted by मानव पृथ्वीकर on 2 April, 2025 - 05:31
कायप्पावर, फेसबुक किंवा इतरत्र अनेकदा काहीच्या काही वाटावे असे निनावी लिखाण फिरत असते.
त्यातील काही खास वाटले तर आणि निनावी असले तरच शेअर करण्यास हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ते मेकप चं काय शतृत्व आहे
ते मेकप चं काय शतृत्व आहे कळतं नाही>>
तुझं शत्रुत्वशीच शत्रुत्व आहे हे पाहुन आदर वाढला.
पावकी निमकीची मजा
पावकी निमकीची मजा कॅल्क्युलेटर मधे नाही? पावकी निमकीची कसली मजा ? काहीही
आज ६० पेक्षा कमी वय असलेल्या
आज ६० पेक्षा कमी वय असलेल्या कुणालाही पावकी निमकी येत नसेल. ३० च्या खालची मुले तर पावकी निमकी म्हणजे काय असेच विचारतील.
माझेही अॅडिशन : वस्तर्याने केलेल्या दाढीची मजा इलेक्ट्रिक शेवर मध्ये नाही.
माझेही अॅडिशन :
माझेही अॅडिशन : संतोषीमातेच्या पत्राच्या चेनची मजा व्हाट्स अॅप फॉरवर्डच्या चेनमधे नाही.
स्वत: सांगितल्याशिवाय
स्वत: सांगितल्याशिवाय प्रेमासारखं निरागस प्रेम नाही>>> अरे कहना क्या चाहते हो?
काय सांगायचंय स्वतः?
>>>
हे मात्र मलाही नाही समजलं
ह्या काकाफॉला चरख्यातून
ह्या काकाफॉला चरख्यातून काढायचा खूप प्रयत्न केला पण ह्या काकाफॉची सर कोणत्याही काकाफॉला नाही.
माझ्याकडे पण कधी नव्हे ते एक
माझ्याकडे पण कधी नव्हे ते एक काकाफॉ आहे आज - अलबेला सजन आयो रे - झाले मला.
--------------
*जेवणावरून स्वभाव....*
माणसाच्या स्वभावाचा अंदाज घेण्याचे अनेक मार्ग आहेत.
जसे: हस्ताक्षर, सही, दिसणे, काही लकबी, वगैरे वगैरे.
पण कधीकधी असे वाटते की पंगतीत वाढलेले ताट--
जेवताना,
जेवण्याच्या आधी वा
नंतर ...
जेवणाराची जी प्रतिक्रिया असते त्यावरूनही त्याच्या स्वभावाचा थोडा अंदाज येऊ शकतो.
म्हणजे बघा .....
समोर जेवणाचे ताट वाढून झाले आहे आणि आता खायला सुरुवात करायची आहे, तेव्हा पहिला पदार्थही त्याच्या स्वभावाला अनुसरून तो उचलतो.
जसे की,
१) ताटातील गोड पदार्थ पहिल्यांदा उचलणारी माणसे स्वभावाने पण *गोड* असतात.
२) तळण, पापड उचलणाऱ्या आणि पापड लवकर मोडतो अश्या माणसांत, *संयम* कमी असतो.
३) वरणभात पहिल्यांदा खाणारी माणसे *साधी सरळ* असतात, ती कुठेही, कोणत्याही परिस्थितीत राहू शकतात.
४) भजी उचलणारी माणसे भज्या सारखीच कुरकुरीत, नर्मविनोदी आणि गप्पात प्रसन्नता आणणारी असतात, यांच्या सोबत असताना कधी कंटाळा येत नाही.
५) जेवणाची सुरुवात खिरीपासून आणि शेवट दहिभाताने करणारी नियम पाळणारी, आणि बऱ्यापैकी *निरोगी* असतात.
६) लोणचे कुठले आहे? आंब्याचे, लिंबाचे कां मिक्स? हे पाहणारे *आंबटशौकीन* असतात.
७) काही सगळ्या पदार्थाची थोडी थोडी चव घेऊन बघतात ते लोक *अतिचिकित्सक* असतात.
यात आणखी दोन उपप्रवाह आहेत.
अ) पहिला जेवणाच्या आधी काही प्रतिक्रिया असणारे आणि
ब) दुसरा जेवणा नंतरची प्रतिक्रिया असणारे.
१) जेवणाच्या आधी ताट,
भांडी वाढायला सुरुवात झाली की भांडी स्वच्छ आहेत कां नाह?
हे बघणार आणि ताट वाढून झाल्यावर किंवा आधी पाणी चांगले आहे कां नाही?
हे बघून त्याची चर्चा करणारे लोक जेवणाचा आनंद घ्यायचा सोडून यावरून मूड बिघडवून घेतात .
अशी माणसे *कटकट्या* स्वभावाची आणि जुळवून घेणारी नसतात, अशांना मित्रमंडळी कमी किंवा असतीलच तर ते पण याच Category तील असतात.
२) पंगतीत वाढणे सुरु आहे, अशा वेळेला समोरच्याच्या पानात अमुक आहे...
माझ्या पानात नाही..
आत्ताच हवे म्हणून वाढप्याला (चार चार वेळेला) बोलावून वाढवून घेतात, भले त्यांना तो पदार्थ आवडणारा असो वा नसो.
हे लोक *मत्सरी* असतात. सतत त्यांना स्वतःची तुलना इतरांशी करायची सवय असते .
३) गोड पदार्थ वाढला जात असताना
*"मी काय म्हणतो? फक्त बासुंदीच आहे, म्हणजे १६० रुपये ताट! स्वस्त पडले"*
असा डायलॉग मारणारे, मुलाकडचे असतात वा अत्यंत व्यवहारी *कंजूष* मनोवृत्तीचे असतात.
४) जेवणाच्या आधी वा जेवताना जे लोक
*"बाकी सगळे ठीक होते, पण टॉयलेट काही नीट स्वच्छ नव्हते"*
म्हणणारी अत्यंत *निगेटिव्ह* मनोवृत्तीची असतात.
समोर चांगले ताट वाढले आहे. त्याचा आस्वाद घ्यायचा सोडून असले काहीतरी फालतू विषय काढून ते स्वतःची जागा दाखवून देतात.
५) ताट वाढल्यावर त्यावर यथेच्छ ताव मारून मस्त ढेकर देणारे एकतर *खवय्ये* असतात किंवा स्वभावतःच *आनंदी !*
या सर्वांपलिकडे एक विशेष Category आहे.
६)जेवण झाल्यावर
"ताक आहे का?" म्हणून विचारणार आणि नाही म्हणल्यावर
*"अरेरे, ताक असते ना तर, मजा आली असती."*
असा शेरा मारणारे *कुजकटच..!*.
*वाचा आणि ठरवा!*
*तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता?*
हे असलं काहीतरी लिहीणार्
हे असलं काहीतरी लिहीणार्यांची कॅटेगरी कुठली असेल याचा विचार करतेय
जजमेंटल लोकांना आयुष्यात
जजमेंटल लोकांना (आपण तर काहीच नाही या विचाराने) आयुष्यात खच्ची करणारा काकाफॉ आहे हा.
तुझं शत्रुत्वशीच शत्रुत्व आहे
तुझं शत्रुत्वशीच शत्रुत्व आहे हे पाहुन आदर वाढला 😂
वस्तर्याने केलेल्या दाढीची मजा इलेक्ट्रिक शेवर मध्ये नाही 😂
सगळ्या पदार्थांचा काला करून खावा का?
आदिमानवाने दगड घासून
आदिमानवाने दगड घासून शोधलेल्या आगीची सर अग्निहोत्राला नाही.
खाजवून उचकटून काढलेल्या कुरुपाची सर कॉर्न कॅपला नाही.
कंठ फुटल्यावर जमेल तसे
कंठ फुटल्यावर जमेल तसे वेगवेगळे ध्वनी काढत मानव संवाद साधु लागला त्याची सर कुठल्याही भाषेला नाही.
भा को स
भा को स
तुझं शत्रुत्वशीच शत्रुत्व आहे
तुझं शत्रुत्वशीच शत्रुत्व आहे हे पाहुन आदर वाढला>>मुद्दाम लिहिलंय तसं
काका फॉ ला टक्कर
अगदीच का च्या का फॉरवर्ड
अगदीच का च्या का फॉरवर्ड अस्मिता!
आता का च्या का फॉरवर्डस मधेही सर्वात वाईट असे बक्षीस मिळण्यास पात्र आहे हे!
पंगतीत वाढणे सुरु आहे, अशा वेळेला समोरच्याच्या पानात अमुक आहे...
माझ्या पानात नाही..
आत्ताच हवे म्हणून वाढप्याला (चार चार वेळेला) बोलावून वाढवून घेतात, भले त्यांना तो पदार्थ आवडणारा असो वा नसो.
..
काही! कोण करतं असं?
अगदीच का च्या का फॉरवर्ड
अगदीच का च्या का फॉरवर्ड अस्मिता!
हो, अगदी चिरफाड करायच्या लायकीचाही नाही.
हो हो, या काकाफॉ पुढे मी पण
हो हो, या काकाफॉ पुढे मी पण निःशब्द झाले आहे. असं फार क्वचित होतं.
हे माझ्या शाळेतल्या मैत्रिणी पाठवतात. काकाफॉंच्या मुकुटावरचा शिरोमणी आहे.
>>>>>सगळ्या पदार्थांचा काला
>>>>>सगळ्या पदार्थांचा काला करून खावा का?

>>>>>अलबेला सजन आयो रे

खतरनाक आहे हे. "Where do I
खतरनाक आहे हे. "Where do I start" कॅटेगरी
बर्यापैकी निरोगी हे काय असते? हे म्हणजे एखाद्या प्युअर व्हेज खाणार्या व्यक्तीला "ही डिश बर्यापैकी व्हेजी आहे" सांगितल्यासारखे आहे.
लोणचे कुठले आहे? आंब्याचे, लिंबाचे कां मिक्स? हे पाहणारे *आंबटशौकीन* असतात. >> या व्यक्तीला या शब्दाचा अर्थ माहीत नसावा. त्याचा आचाराशी संबंध आहे. अचाराशी नाही
पंगतीत वरणभात सुरूवातीला
पंगतीत वरणभात सुरूवातीला वाढतात का? आधी मसालेभात येतो ना? आपल्याकडचे पाहुणे साधे सरळ नाहीत याची यजमानाला खात्री असते म्हणून का? पुरी श्रीखंड/बटाटा भाजीने जेवणाची सुरूवात करणारे कोणत्या कॅटेगरीत मोडतात?
@अस्मिता >>> यासाठी एक रिव्हर्स फॉरवर्ड तो बनता है.
>>>>>आधी मसालेभात येतो ना?
>>>>>आधी मसालेभात येतो ना? आपल्याकडचे पाहुणे साधे सरळ नाहीत याची यजमानाला खात्री असते म्हणून का?
आहाहा! काय लॉजिके काय लॉजिके. मान गये.
ही डिश बर्यापैकी व्हेजी आहे
ही डिश बर्यापैकी व्हेजी आहे >>>
फुटलेच!
आचाराशी संबंध आहे. अचाराशी नाही

>>>
आपल्याकडचे पाहुणे साधे सरळ नाहीत याची यजमानाला खात्री असते
>>>
त्याच चालीत पुढे वाचा..
त्याच चालीत पुढे वाचा.. चपलेने बडवल्याची सर चाबकाला नाही
ते 160 रुपयाला बासुंदी सोबत
ते 160 रुपयाला बासुंदी सोबत कुठे मिळते थाळी
तिथे जाउन येईन म्हणतो
मी नवी टेस्ला घेतली आहे.
मी नवी टेस्ला घेतली आहे. चार्ज करण्यासाठी सुपर चार्जर कडे गेलो तर तिथे सर्व जण आपापली टेस्ला चार्जिंग ला लावून आपापल्या गाडीत बसून फोन वर व्यस्त होते. ते पाहून माझे खेड्यातले बालपण आठवले. गावात एकच पार, सकाळी व सायंकाळी एकेकदा येणारी यस्टी, पारावर बसून होणार्या ग्रामस्थांच्या गप्पा, तंबाखूची देवाण घेवाण, जमणारी मुलांची लग्ने, आपूलकीचा ओलावा, हे सारे कुठे हरवले ? खरेच या नव्या टेक्नॉलॉजीने फोन चार्ज होतील, गाड्या चार्ज होतील, पण मने चार्ज करणारा तो माणूसकीचा झरा कुठे गेला?
लेखक : विकु
तुमच्या या टेक्नॉलॉजीने
चार्ज होईल टेस्ला
पण माणूसकीचा ओलावा
त्यात आलाय कस्ला ?
कवी : विकु
तुमच्या या टेक्नॉलॉजीने
तुमच्या या टेक्नॉलॉजीने

चार्ज होईल टेस्ला
पण माणूसकीचा ओलावा
त्यात आलाय कस्ला ? >>>>
'टेस्ला गं बाई टेस्ला' लावणीची ही माझी टेस्लाची रिक्षा. 'टेस्ला' शब्द मिळाला तेवढ्यावरूनच चान्स मारला आहे.
>किती ओढूनताणून.
>किती ओढूनताणून.
बरं बरं, तुमच्या लावणीतली यमके खुद्द सरस्वती देवीनेच स्वर्गातून उतरून जुळवून दिली आहेत !
मला वाटलं ते ओरिजनल काकाफॉ
बदललं, बदललं. टोमणा मारू नका. माणुसकीचा ओलावा राहू द्या.
ता क - खरेच जमले आहे हे फाफॉ कारण काकाफॉ सुद्धा ओढूनताणून माणुसकी, प्रेम, नाती व संसाराशी जोडतात. आणि मला ओरिजनल वाटले, त्यामुळे टेक ईट ॲज अ कॉम्प्लिमेंट.
तुमच्या या टेक्नॉलॉजीने
तुमच्या या टेक्नॉलॉजीने
चार्ज होईल टेस्ला
पण घरच्या जेवणाची सर
कशी येईल मेसला ?
यमक चांगलं जुळतंय पण चारोळी मार खातेय, तेव्हा विकुंची मूळ चारोळीच योग्य आहे.
विकु सही कविता. मस्त जमलिये.
विकु सही कविता. मस्त जमलिये. तुमच्या मधेमधे पेरलेल्या कमेन्टसैतकीच खतरनाक.
Pages