Submitted by मानव पृथ्वीकर on 2 April, 2025 - 05:31
कायप्पावर, फेसबुक किंवा इतरत्र अनेकदा काहीच्या काही वाटावे असे निनावी लिखाण फिरत असते.
त्यातील काही खास वाटले तर आणि निनावी असले तरच शेअर करण्यास हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जेव्हा कुणाचे बारा वाजणार
जेव्हा कुणाचे बारा वाजणार
असेल, तेंव्हा सगळे
एकत्र पाहिजे
>>> कशाला? आम्ही हे आधीच सांगितलं होतं असं म्हणायला?
पण जेव्हा कुणाचे बारा वाजणार
पण जेव्हा कुणाचे बारा वाजणार
हे फारच आवडलेलं आहे. 
असेल, तेंव्हा सगळे
एकत्र पाहिजे ...>>
हर्पेन
हर्पेन
हर्पेन
हर्पेन
पण दिवसातून २४ वेळा सगळे एकत्र येतात ना? एक वाजून पाच मिनिटे व काही सेकंद, दोन वाजून दहा मिनिटे व काही सेकंद ई ई?
काही सेकंद असे लिहीले कारण ते नक्की किती हे मोजायचा आळस केला.
१२ तासांत ११ वेळा येतील ना?
१२ तासांत ११ वेळा येतील ना? २४ तासांत २२ वेळा. त्यातले जोकवर्दी फक्त २

अकरा वाजून ५९ मिनिटे ६० सेकंदानी जो एकत्र येईल तोच बारा वाजताचा..मग एकदम एक वाजून पाच मिनिटे काही सेकंदाचा असेल.
या सगळ्यांत सेकंद काटा पण घेतला तर मग फक्त १२ वाजताच येतील.. कारण १:०५ काही सेकंदांनी मिनिट काटा हा १:०५ पेक्षा किंचित पुढे गेला असेल थोडक्यात तेव्हा तास आणि मिनिट एकमेकांवर नसतील.
सो जोक बरोबर आहे.
सो जोक बरोबर आहे >>> हो
सो जोक बरोबर आहे >>>
हो समजले आता.
फा, योग्य मुद्दा. अमित, अचूक.
फा, योग्य मुद्दा. अमित, अचूक.
माणसांचंही असंच आहे. दिवसातून
माणसांचंही असंच आहे. दिवसातून भले २२ वेळा एकत्र येतील, पण बारा वाजल्याशिवाय नक्की एकत्र येऊन काय केलं ते सांगता येत नाही.
बारा वाजल्याशिवाय नक्की एकत्र
बारा वाजल्याशिवाय नक्की एकत्र येऊन काय केलं ते सांगता येत नाही. >>
जास्त बारा वाजता चावटपणा केलात तर अॅडमिन तीन तेरा वाचवतील!
रच्याकने: तीन तेरा ची व्युत्पत्ती काय आहे? आणि बाराची तरी काय आहे?
बाराच्या भावात गेला म्हणजे डझनाला भाव पाडून... हे माहित आहे. पण चेहेर्यावर बारा वाजलेले, म्हणजे तास मिनिट आणि सेकंद काटा एकमेकांवर ... म्हणजे असा काही विचार करुन फॉरवर्ड वर्दी काही आहे सुचायचा प्रयत्न करावा का कसं?
राखली की मर्जी तुमच्या जोडीनं
राखली की मर्जी तुमच्या जोडीनं मी आले
पिरतीच्या या रंगी राया चिंब ओली मी झाले
राया सोडा आता तरी काळ येळ न्हाई बरी
पुन्हा भेटू कवातरी साजणा
मला जाऊ द्या ना घरी
आता वाजले की बारा
मला गणित करायचं नव्हतं फक्त गाणं म्हणायचं होतं.
काकाफॉ वाल्यांचेही असेच वाजले असावेत. तुम्ही चावट अर्थ घ्या, कुटुंबवत्सल नका घेऊ. कधी नव्हे ते स्कोप मिळाला आहे, लाभ घ्या.
जेव्हा कुणाचे बारा वाजणार
जेव्हा कुणाचे बारा वाजणार असेल, तेंव्हा सगळे एकत्र पाहिजे
>>>>
१०००-१२०० वर्षांनंतर एखाद्या चॅनेलवरची सनसनीखेज खबर
मायबोली नामक संवादस्थळावर सापडले काव्य
गजरने किया है इशारा
घडीभर का है खेल सारा
मला जाऊ द्या ना घरी
आता वाजले की बारा
यावरून प्रेक्षकांना समजेल की
~ २१ व्या शतकातले कुटुंब म्हणजे आपल्यातल्या कुणाचे तरी कधीतरी १२ वाजतील या आंतरिक ओढीने एकत्र आलेली माणसं.
माणसांचंही असंच आहे. दिवसातून
माणसांचंही असंच आहे. दिवसातून भले २२ वेळा एकत्र येतील, पण बारा वाजल्याशिवाय नक्की एकत्र येऊन काय केलं ते सांगता येत नाही. >>>
आणि बाकी वेळेस एकत्र आल्यासारखे वाटतील पण प्रत्यक्षात लांबच असतील, असे काहीतरी 
हा घ्या चावट अर्थ अजून एक
https://www.youtube.com/watch?v=yOIYc624F_8
हर्पेन
हर्पेन
घडाळ्याचे फॉरवर्ड काळाच्या पुढे आहे. १ मूल पुरे हे कुटुंब नियोजन स्विकारुन ते समाजात पसरुन काही पिढ्या जाऊन पुढल्या पिढीचे आहे ज्यांच्या डोक्यात तिघांपेक्षा मोठे कुटुंब नाहीच.
बारा वाजणे हा वाक्प्रचार ते टिकवून आहेत म्हणजे मराठीचे त्या काळापर्यँत तरी बारा वाजलेले नाही.
हे काकाफॉ म्हणजे 'एक फॉरवर्ड
हर्पा
हर्पेन
*"सम्राट अशोक" यांची जयंती
*"सम्राट अशोक" यांची जयंती आपल्या देशात का साजरी केली जात नाही??*
*खूप विचार करूनही मला "उत्तर" मिळत नाहीये! तुम्हीही या "प्रश्नांवर" विचार करायला हवा!*
*सम्राट अशोक*
*वडिलांचे नाव - बिंदुसर गुप्त*
*आईचे नाव - सुभद्राणी*
*जगभरातील इतिहासकार ज्यांच्या नावापुढे "महान" हा शब्द लावतात तो "सम्राट"*
**"सम्राट" ज्यांचे राजेशाही चिन्ह "अशोक चक्र" हे भारतीय त्यांच्या ध्वजात वापरतात**
*"सम्राट" ज्यांचे राजेशाही चिन्ह "चार तोंडी सिंह" हे भारतीय त्यांचे सरकार चालवण्यासाठी "राष्ट्रीय प्रतीक" मानतात आणि "सत्यमेव जयते" हा पुरस्कार स्वीकारला गेला आहे*
*ज्या देशात सम्राट अशोकाच्या नावाने सैन्याचा सर्वात मोठा युद्ध सन्मान दिला जातो तो "अशोक चक्र"*
*या सम्राटाच्या आधी किंवा नंतर, "अखंड भारत" (आजचा नेपाळ, बांगलादेश, संपूर्ण भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान) इतक्या मोठ्या भूमीवर राज्य करणारा कोणताही राजा किंवा सम्राट नव्हता.*
*सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत २३ विद्यापीठे स्थापन झाली. त्यापैकी तक्षशिला, नालंदा, विक्रमशीला, कंधार इत्यादी प्रमुख विद्यापीठे होती. या विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशातील विद्यार्थी भारतात येत असत.*
*जगातील बुद्धिजीवी आणि इतिहासकार या "सम्राटाच्या" कारकिर्दीला भारतीय इतिहासाचा "सुवर्णकाळ" मानतात.*
*"सम्राट" च्या कारकिर्दीत भारत "विश्व गुरु" होता. तो "सोन्याचा पक्षी" होता. येथील लोक आनंदी आणि भेदभावमुक्त होते.*
*"सम्राट" च्या कारकिर्दीत सर्वात प्रसिद्ध "ग्रँड ट्रंक रोड" सारखे अनेक महामार्ग बांधण्यात आले.* *संपूर्ण २००० किलोमीटर लांबीच्या "रस्त्याच्या" दोन्ही बाजूला झाडे लावण्यात आली. "सराय" बांधल्या गेल्या..*
*माणस तर विसरा.., पहिल्यांदाच प्राण्यांसाठीही "रुग्णालये" उघडली गेली.*
*प्राण्यांची हत्या थांबवली गेली*
*असे*
*"महान सम्राट अशोक"*
*त्यांची जयंती त्यांच्याच देशात भारतात का साजरी केली जात नाही?? किंवा कोणतीही सुट्टी जाहीर केलेली नाही?*
*हे दुःखद आहे की ज्या नागरिकांना ही जयंती साजरी करायची आहे... ते त्यांचा इतिहास विसरले आहेत आणि ज्यांना माहिती आहे त्यांना हे माहित नाही की ते तो का साजरा करू इच्छित नाहीत??*
*"जो जीता वही चंद्रगुप्त"*
*नसणे,* *"जो जीता वही सिकंदर"* *हे कसे घडले??*
*सर्वांना माहित आहे की चंद्रगुप्त मौर्यचा प्रभाव पाहून अलेक्झांडरच्या सैन्याने लढण्यास नकार दिला होता. मनोबल खूपच खचले होते आणि अलेक्झांडरला "परत" जावे लागले.*
*आपण सर्वजण ही "ऐतिहासिक चूक" दुरुस्त करण्याची शपथ घेऊया.*
*किमान पाच गट पाठवा*
*काही लोक पाठवणार नाहीत*
*पण मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच पाठवाल*
*|| सौजन्य ||*
अशोकावरून चंद्रगुप्तावर उडी?
अशोकावरून चंद्रगुप्तावर उडी? आधी चंद्रगुप्त ना? आणि सिकंदराला चंद्रगुप्ताने हरवले असेल (खरं तर सिकंदराच्या मृत्यूनंतर प. पंजाब जिंकला. पण असो) तर त्याचा अशोकाच्या जयंतीशी काय संबंध?
"सत्यमेव जयते" हा पुरस्कार कसा? “सत्यमेव जयते हे अमुचे घोषवाक्य आहे” विसरले काय?
भारत सोन्याचा पक्षी कसा नी कधी झाला?
‘जहां डाल डाल पर सोने की चिडीया’चं अगदीच दुसऱ्या यत्तेतलं भाषांतर वाटतंय.
तक्षशीला हेच्च गांधार प्रांतातलं विद्यापीठ होतं. अजून कुठलं कंदाहार विद्यापीठ? आणि शारदापीठाचं नावच नाही.
ग्रँड ट्रंक रोड चंद्रगुप्ताच्या काळातला. आज्याने बांधलेला हायवे परत बांधायला काढायला अशोक काय सा बां वि चा खास कॉंट्रॅक्टर वाटला काय?
ग्रँड ट्रंक रोड >> शेरशाह
ग्रँड ट्रंक रोड >> शेरशाह सूरी ने ना?
>> किंवा कोणतीही सुट्टी जाहीर
>> किंवा कोणतीही सुट्टी जाहीर केलेली नाही? >> पण अशोकाच्या जन्माची तिथी काय? जोवर तिथीचा जन्म सुटीशी येत नाही तोवर काही खरं नाही.
जोवर तिथीचा जन्म सुटीशी येत
जोवर तिथीचा जन्म सुटीशी येत नाही तोवर काही खरं नाही. >>> अगदी खरं!
बाकी कुठूनही कुठेही काहीही जोडायची ताकद अफाट आहे या फॉर्वर्डमधे!
ग्रँड ट्रंक रोड >> शेरशाह
ग्रँड ट्रंक रोड >> शेरशाह सूरी ने ना?
>>>> नाही. चंद्रगुप्त मौर्याच्या काळात बनलेला हा मार्ग काही ठिकाणी नष्ट झाला होता. धर्मशाळा वगैरे तुटल्या होत्या. शेरशहा सुरीने रादर त्याच्या तत्कालीन वजिराने हेमचंद्र भार्गवने हा मार्ग दुरुस्त केला, परत सैनिकी ठाणी वसवली. व्यापाऱ्यांचा निर्धास्त वावर सुरु झाल्यावर चांगला महसूल मिळवून शेरशहा सुरीचा खजिना भरला. अकबराने ज्या हेमूचा पानिपतवर पराभव केला आणि दिल्लीची सत्ता काबीज केली तोच हा हेमू ऊर्फ हेमचंद्र भार्गव (हे काकाफॉ नाही. सापडलं तर पुस्तकाचे नाव सांगेन.)
"जो जीता वही चंद्रगुप्त"*
"जो जीता वही चंद्रगुप्त"*
*नसणे,* *"जो जीता वही सिकंदर"* *हे कसे घडले??*
>>> आमिर खानने "पहेला नशा पहेला खुमा, नया प्यार है, नया इंतजार" गाण्यात वाऱ्यापेक्षाही हलक्या उड्या मारल्याने.
सततच्या ॲस्ट्रिक्सने मुंग्यांची रांग लागल्यासारखी वाटते. काकाफॉवाल्यांना काही तरी ऑब्सेशन आहे विनाकारण अवतरण चिन्हं, विनाकारण ॲस्ट्रिक्स.
हेमुची गोष्ट आठवतेय माझेमन. सिकंदर आणि त्याला 'ग्रेट अलेक्झांडर' का म्हणू नये (निदान भारतीयांनी तरी) याचा संपूर्ण काथ्याकूट 'सहा सोनेरी पाने' मधे आहे. तेथूनच सुरुवात होते त्या पुस्तकाची.
जोवर तिथीचा जन्म सुटीशी येत
जोवर तिथीचा जन्म सुटीशी येत नाही तोवर काही खरं नाही.
>>> तिथीचा संबंध आलाच पाहिजे असं काही नाही. तिथी की कॅलेंडरमधली तारीख यावरून सरकारी लेव्हलवर गोंधळ घालून दोन्ही दिवशी लाऊड स्पीकर लावून बड्डे साजरा करायची आपली महान परंपरा आहे.
@अस्मिता >>> हेमुची गोष्ट
@अस्मिता >>> हेमुची गोष्ट 'सहा सोनेरी पाने'मध्ये आहे का? आठवत नव्हतं. परत वाचले पाहिजे. दाहीरच्या कन्यांविषयी वाचलेले आठवतेय.
हेमुची नाही, सिकंदरची आहे
हेमुची नाही, सिकंदरची आहे 'सहा सोनेरी पाने' मधे. हेमुची मी दुसरीकडे टिव्हीवर पाहिली आहे.
अस्मिता सततच्या ॲस्ट्रिक्सने
अस्मिता
सततच्या ॲस्ट्रिक्सने मुंग्यांची रांग लागल्यासारखी वाटते. काकाफॉवाल्यांना काही तरी ऑब्सेशन आहे विनाकारण अवतरण चिन्हं, विनाकारण ॲस्ट्रिक्स. खूपच हसले!
ग्रँड ट्रंक रोड
ग्रँड ट्रंक रोड चंद्रगुप्ताच्या काळातला. आज्याने बांधलेला हायवे परत बांधायला काढायला अशोक काय सा बां वि चा खास कॉंट्रॅक्टर वाटला काय? >>>
हे भन्नाट आहे 
सततच्या ॲस्ट्रिक्सने मुंग्यांची रांग लागल्यासारखी वाटते. काकाफॉवाल्यांना काही तरी ऑब्सेशन आहे विनाकारण अवतरण चिन्हं, विनाकारण ॲस्ट्रिक्स. >>>
हो टोटली खरे आहे. कधीकधी तर फाफॉ चालेल पण कोट्स आवरा असे होते.
पण अशोकाच्या जन्माची तिथी काय? जोवर तिथीचा जन्म सुटीशी येत नाही तोवर काही खरं नाही. >>>
हो! परत अवतरणं, अॅस्ट्रिक्स,
हो! परत अवतरणं, अॅस्ट्रिक्स, कंस .. असं काही आलं की माझी नजर अर्जुनाची बनुन सगळे अॅस्टिक्स बंद झाले आहेत ना यावर खिळते.
हो सगळे वाक्य "सिण्टॅक्टिकली"
सिलिकॉन व्हॅली सिरीज मधे टॅब वापरायचा की चार स्पेसेस यावर त्या एकाचा ब्रेकअप होतो हे अगदी रिलेटेबेल वाटते.
Python वाला असेल तर रेलशनशिप
Python वाला असेल तर रेलशनशिप मध्ये space नसणार
फक्त टॅब
.
.
#हे सत्य आहे
फॉ नाही
मलाही कंस बंद केलेत की नाही
Pages