काहीच्या काही फॉरवरर्ड्स - २

Submitted by मानव पृथ्वीकर on 2 April, 2025 - 05:31

कायप्पावर, फेसबुक किंवा इतरत्र अनेकदा काहीच्या काही वाटावे असे निनावी लिखाण फिरत असते.
त्यातील काही खास वाटले तर आणि निनावी असले तरच शेअर करण्यास हा धागा.

हा पहिल्या भागाचा दुवा.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol सगळेच. माझेमन, भाद्रपदात प्यार का मौसम असतो असे ठरलं होतं ना Wink

बॉलीवूड पूजा >>> Lol माझ्या देवांना सवय आहे हिंदी गाण्यांची. रोज कुठलं तरी वेगळं गाणं चालू असतं स्तोत्रं म्हणायच्या आधी Proud

या फॉर्वर्ड मधे कुठल्या खेळात हे लॉजिक कसं अप्लाय करायचं हे नाही लिहिलंय काकांनी. असं कसं चालेल? Proud

भाद्रपदात प्यार का मौसम >> त्यावरून आठवलं, सा हा एकच असतो, पण भा मात्र दोन असतात. सा-वन भा-दो

सा-वन , भा- दो >> Lol आणि क्लू फोडला म्हणून पुढे मनात येणारे "फिरभी मेरा मन प्यासा" लिहून आत्मा शांत करते.

अस्मिता Lol

तो सा तू प्यायला सांगते आहेस.

रामन Lol

सगळेच। Rofl

भाद्रपदात प्यार का मौसम असतो असे ठरलं होतं ना
>>> कोकणात गं.
पण बाकीच्यांचा विचार नको का करायला?

तुझ्या पिरतीचा इंचू मला चावला
>>> भारतात देवांना ‘वाट बघतोय रिक्षावाला’ ते ‘या अली’पर्यंत सगळ्या गाण्यांवर डीजे लावून, ढोल ताशे वाजवून, नागिण डान्स केलेला पाहण्याची सवय आहे. मग तुझ्या देवांना जरा चेंज नको Lol

भा मात्र दोन असतात
>>> अधिक भाद्रपद हो. बघा आपल्या पूर्वजांना किती ज्ञान होते. अधिक मास लक्षात रहावा म्हणून एका महिन्याच्या नावात जोडून टाकला.

"फिरभी मेरा मन प्यासा" <<
तो सा तू प्यायला सांगते आहेस. <<
ते ती रामन ला सांगते आहे
<<<<< Lol

मे (महिना) असल्यामुळे रामन प्यासा आहे असासुद्धा अर्थ निघतोय.

अरे काय सुरुय इथे Lol

विकू,
रफीसाहेब ह्यांचे जितकेही भ्रष्ट नकला करत गाणारे गायक आहेत त्यांची गाणी ऐकायला लावलीत लागोपाठ तरी कडक जेलर, नाद नको अशी किर्ती मिळेल बघा.

लग्नात काड्या करणाऱ्या नातेवाईकांची ओळख कशी करायची?

ते कायम...

• आनंदाच्या क्षणी नकारात्मक विचार आणतात.

• "बरंय पण..." किंवा "म्हणतात ना..." अशा वाक्यांमधून शंका पेरतात.

• दुसऱ्यांच्या यशात स्वतःची नाराजी व्यक्त करतात.

• थेट बोलण्याऐवजी कुजबुज करतात.

• एकत्र येण्याऐवजी फूट पाडण्याचं काम करतात.

• जुन्या गोष्टी उकरून नवीन प्रश्न निर्माण करतात.

• मुली किंवा मुलाबद्दल नको त्या अफवा पसरवतात.

• आपल्या शब्दांमधून थेट किंवा अप्रत्यक्षपणे न्यूनगंड निर्माण करतात.

• सतत तुलना करतात – "त्यांचं तसंच झालं होतं", "त्यांना फसवलं गेलं होतं..." इ.
---

• त्यांना ओळखण्याची सोपी लक्षणं:

जेव्हा त्यांचं बोलणं ऐकून मनात आनंद नाही तर भीती वाढते.
जेव्हा त्यांच्या शब्दांनी संशयाची बीजं पेरली जातात.
जेव्हा त्यांच्या उपस्थितीमुळे वातावरणात उगाचच तणाव निर्माण होतो.
जेव्हा कुठलीही गोष्ट त्यांनी सांगितली की मनात खळबळ माजते.
---

अशा लोकांशी वागताना काय करावं?

१. संयम ठेवा: त्यांच्या टोचणाऱ्या बोलण्याला लगेच प्रतिसाद देऊ नका.
२. विश्वास ठेवा: तुम्ही आणि तुमचं कुटुंब जे ठरवत आहे, तेच सर्वात महत्त्वाचं आहे.
३. संवाद साधा: कोणतीही शंका आल्यास थेट संबंधित व्यक्तीशी बोला, तिसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवू नका.
४. दूर अंतर ठेवा: नकारात्मक लोकांपासून मानसिक अंतर ठेवा. प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणं गरजेचं नाही.
५. आनंद जपा: आयुष्यातील गोड क्षणांवर त्यांच्या कटुत्वाची सावली पडू देऊ नका!
---

लहानशा वाक्यात निष्कर्ष:

"ज्यांचं काम तुम्हाला फोडणं आहे, त्यांचं ऐकणं सोडून द्या; ज्यांचं काम तुम्हाला जोडणं आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवा."

आई वडिलांसारखी छाया नाही आणि भावंडांसारखी माया नाही.
*साडीतलं सौदर्य कुठल्याचं पोशाखात नाही आणि कितीही मेकअप करा साधेपणा सारखं सौदर्य नाही.*

कितीही कलमं करा गावठी गुलाबाला तोड नाही आणि कितीही अत्तरं आणा जुई आणि मोगऱ्याची सर नाही.
*शेताची सर बागेला नाही आणि बागेची सर टेरेसला नाही.*

भाजीभाकरीची चव पिझ्झा बर्गर ला नाही आणि ग्राउंडची सर जिमला नाही.
*स्वत: सांगितल्याशिवाय प्रेमासारखं निरागस प्रेम नाही आणि जीवनांत प्रेम करणा-या जोडीदारासारखा आधार नाही*...

कितीही tally वापरा त्याला खतावणीची सर नाही आणि पावकी-निमकीची मजा कॅलक्युलेटरमधे नाही.
कितीही परिश्रम करा दैवाशिवाय काही मिळत नाही आणि कितीही हुशार असा ईश्वरापुढं कुणाचंच चालत नाही.

कितीही पाणी द्या पावसाशिवाय झाड काही खुलत नाही कितीही पैसे असुद्या पण माणसांशिवाय काही भागत नाही.
*खरे प्रेम केल्याशिवाय प्रेमाची गोडी समजत नाही आपल्या आवडत्या व्यक्तिबरोबर बोलल्याशिवाय मन मोकळे होत नाही.*
अनुभवासारखा शिक्षक नाही आणि आयुष्य जगल्याशिवाय समजतचं नाही.
*मुलांशिवाय घराला शोभा नाही आणि नातवंडासारखा परमानंद जगात नाही*...

शालीनतेसारखा दागिना नाही आणि झोपडीचं प्रेम बंगल्यात नाही.
स्वार्थापेक्षा मोठा शत्रू नाही आणि परोपकारासारखं पुण्य नाही.
*सुखाच्या क्षणी माणसांशिवाय शोभा नाही पण दुःखाशिवाय आपलं कोण ते कळतंच नाही*...

भक्त्ती सारखी शांतता कशातच नाही आणि भगवंता एवढं बलवान कुणीच नाही.
*घरची माया वृद्धाश्रमात नाही आणि म्हातारपणी कुटूंबाशिवाय कुणीचं नाही.*

❝ आपुलकीच्या माणसांसाठी ❞

बरं
ते मेकप चं काय शतृत्व आहे कळतं नाही Lol

मेकप चं काय शतृत्व आहे >>> पिझ्झा बर्गरशी आहे तेच Proud

झोपडीचं प्रेम बंगल्यात नाही >>> या लिहीणार्‍यांना झोपडीत रहायला पाठवा ताबडतोब

कितीही व्हॉटस अॅप काकाफॉ पाठवा, त्याला सोळा घरी जाऊन हळदी कुंकू लावून संदेश देण्यातली सर नाही.

झोपडीचं प्रेम बंगल्यात नाही. >>>
नक्की काय म्हणायचंय? झोपडीबद्दलचं प्रेम की झोपडीत राहून केलेलं प्रेम?

स्वत: सांगितल्याशिवाय प्रेमासारखं निरागस प्रेम नाही
>>> अरे कहना क्या चाहते हो?

Pages