काहीच्या काही फॉरवरर्ड्स - २

Submitted by मानव पृथ्वीकर on 2 April, 2025 - 05:31

कायप्पावर, फेसबुक किंवा इतरत्र अनेकदा काहीच्या काही वाटावे असे निनावी लिखाण फिरत असते.
त्यातील काही खास वाटले तर आणि निनावी असले तरच शेअर करण्यास हा धागा.

हा पहिल्या भागाचा दुवा.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमित हॉट योगा, टर्मरीक लाते सारखं अवेकन/वोक मिल्क वगैरे नाव देऊन पेटंट घे तत्काळ. हे पाश्चात्य देशातले लोक एवढे मोठ्ठाले मग भरून कोरी कॉफी पितात तरतरी आणण्यासाठी. दो चम्मच गाय के दूध की किमत वो क्या जाने?
महान संस्कृती के सर का ताज है गाय का दूध, विस्मृती का इलाज है गाय का दूध.

अमित: D
म्हणजे म्हैस स्वतःहुन दोन किमीच्या रेडियस बाहेर जात नाही.
जर तिला आपण नेलंच समजा २.५ किमी तर आता तिच्या मेमरीत तिथुन २ किमी रेडियसचा नविन मॅप जाईल.
ती मग घरापासून ०.५ किमी पर्यँत परत येऊ शकेल आणि स्वतःहुन परत येत असल्याने त्यापूढे ती येणार नाही.

मिटरची व्याख्या:
म्हशीला एका सरळ रेषेच्या रस्त्यावर एका बिंदुवर सोडले तर ती जास्तीत जास्त जेवढ्या लांब जाईल त्या अंतराचा दोन हजारावा भाग.

प्रेमाचा, आपुलकीचा, पंढरपुरी...बरेच निघाले आहेत.

नुकतेच मोबाईल रेज ( किरण ) >>> Lol या सीन नंतर असा उल्लेख पहिल्यांदाच ऐकला : https://youtube.com/clip/UgkxVG6C3KUjcKL-6_Monk4FdRmgT1FD-mJC?si=A5k9Rr2...>>>>>>
धनि, भारीच शोधलं हे Lol

“ म्हैशीना होम्योपदी चालते गायींना नाही” Lol

“ महान संस्कृती के सर का ताज है गाय का दूध, विस्मृती का इलाज है गाय का दूध” Lol

धमाल आहे गाय म्हैस सिरीज.

नरेंद्र जोशी धोंडापुरा बीड >> हा फाऊल आहे. मला वाटलं की मानव कानउघाडणी करतील. Happy

>>>>>>>>> त्यापेक्षा मोबाईल केसेस गाईच्या शेणापासून करायला लागू. तेवढीच एक रोजगाराची संधी - गाईंना Proud
काय तो कल उद्योजगतेकडे
---------
म्हैस टॅन
Lol

हपा बरोबर Happy
मी हे फॉरवर्ड पूर्ण वाचलंच नाहीय अद्यापही.
तुमची कॉमेंट पण पटकन कळली नाही, मला वाटले कुणाच्या प्रतिसादाबद्दल आहे ते, म्हणुन खालुन वर चेक करत गेलो तेव्हा मूळ फॉरवर्ड मध्ये खाली नाव दिसले.

हे गाय म्हैस दुध पुराण वाचून कपिल शर्मा आठवला. ' तुने मेरा दुध पिया है तू बिलकुल मेरे जैसा है" या गाण्यावर त्याची काॅमेंट, ' हमने तो बचपन से भैंस का दूध पिया फिर हम क्या ......?

हे पाश्चात्य देशातले लोक एवढे मोठ्ठाले मग भरून कोरी कॉफी पितात तरतरी आणण्यासाठी. दो चम्मच गाय के दूध की किमत वो क्या जाने?
महान संस्कृती के सर का ताज है गाय का दूध, विस्मृती का इलाज है गाय का दूध. >>> Lol

रेडा हा प्राणी एकाच वेळेस ताकदवान व बुद्धिमान असतो. ताकदीचे मोजमाप करताना रेड्यासारखी ताकद म्हणतात, बैलासारखी नाही. ओझ्याचा बैल किंवा घाणीला जुंपलेला बैल ही उपमा कोणी रेड्याला द्यायची डेअरिंग केलेली नाही. रेडा या शब्दातच जो "नाद करायचा नाय" लेव्हल टर्रेबाजपणा आहे तो बैल शब्दात नाही.

आणि बुद्धीचे म्हणाल, तर ज्ञानेश्वरांनी वेद रेड्याच्या तोंडून वदवले. बैलाच्या नाही. गेम सेट मॅच रेडा.

हे याला रिव्हर्स-फॉरवर्ड उत्तर.

सही फारएन्ड Lol . तुमचं अग अग म्हशी ही आवडलं.

गाईचं महात्म्य सांगायला म्हशीला का वाईट ठरवायचं, तुलना का करायची तेच समजलं नाही. गाईचं दूध, तूप नक्कीच औषधी असतं. म्हशीचे दूध मात्र जास्त चविष्ट असतं, मला कॉफीसाठी तेच हवं असतं. सायही जास्त येते आणि तूपही जास्त होतं.

चला या निमित्याने आपल्या माबोकरांच्या प्रतिभेला बहर आला, सुसाट गाडी सुटली आहे Lol

गायीचे /म्हशीचे दूध, जात्यावर दळलेले पीठ, रवीने घुसळलेले लोणी, पाट्यावर वाटलेली चटणी, यावर पीळ काकाफॉ लिहिणारे व पुढे पाठवणारे यांना एक किलो गहू देऊन जात्यावर बसवले पाहिजे.

यमाला स्वतःचे वजन + जात्या जिवाचे वजन असे डबलसीट यायचे असते त्यामुळे तो रेड्यासारख्या भक्कम प्राण्याचा वापर करतो...परत मेलेला मनुष्य पापी असेल तर त्याची काळी कृत्ये झाकली जावी यात रेड्याचा काळा रंग कामी येत असेल

.. ज्ञानेश्वरांनी वेद रेड्याच्या तोंडून वदवले…

परफेक्ट. हियर रेडा वॉज प्रिफर्ड. नाहीतर आळंदीत काय बैल नव्हते ? आजही आहेत

रिव्हर्स-फॉरवर्ड = 😂

गाईचं महात्म्य सांगायला म्हशीला का वाईट ठरवायचं, तुलना का करायची तेच समजलं नाही >> तेच ना! नाही, तुमची गाय असेल गुणकारी; पण आमच्या म्हयशीन काय घोडं मारलंनीत?

संस्कृती के सर का ताज >>> Lol
रिव्हर्स-फॉरवर्ड, रेडा व्हर्सेस बैल >>> Lol
रेड्याची बाजू आधी कोणी अशी हिरीरीने मांडली नसेल.
हे फॉरवर्ड भयंकर स्फोटक निघालं, सगळ्या पोस्टी धमाल आहेत. Happy
माझ्यासाठी तुम्ही काही ठेवलेय की नाही हे चेक करण्यासाठी पूर्ण फॉरवर्ड वाचलं, कुफेहेपा. रेड्याची बाजू सांभाळली पण म्हशींना विसरलात. त्यामुळे आता हे रिव्हर्स फॉरवर्ड म्हशींकडून -

१. म्हैस आपल्या मुलांकडे पाठ करून बसते कारण माणसं आपल्या मुलांना कराटे क्लासला घालतात, त्याप्रमाणे लाथा मारण्याचे कसब शिकून ते आत्मनिर्भर झालेले असतात. गाईसारखे 'बाबा पुता' करत बसावे लागत नाही.

२. म्हशींना घाण आवडत नाही, त्या गाईपेक्षा जास्त 'या डुंबा डुंबा' खेळत असताना देतात. मैत्रिणीमैत्रिणी मिळून दिवसभर स्पा मधे जातात. त्या जास्त चकाकतात. लाईफस्टाईल मधे उच्चभ्रूपणा दिसतो.

३. दहा म्हशी ज्यांना परवडतात ते एकत्र बांधायचे सल्ले देत नाहीत. प्रयोगात वेळ घालण्याऐवजी रबडी करून खातात. कारण म्हशीचे दूध जास्त स्निग्ध असते.

४. रस्त्यावर मुलं खेळत असली की म्हशी ढुसणी मारतात, पायावर पाय द्यायला गर्दीच्या बसमधे चढत नाहीत.

५. म्हशी व तिचे रेडकू भांग पित नाहीत. ते 'लिव्ह इन द मोमेंट' करत असतात. त्यामुळे रिलॅक्स जीवन जगतात. चिल असतात. म्हशी इतका दुसरा 'चिल' प्राणी फक्त गेंडाच आहे, हिंमत असेल तर त्याच्यावर काकाफॉ करा.

६. गाईच्या दुधाची महती सांगताना इतक्या व्याकरणाच्या चुका झाल्या आहेत की बुद्धी आणि स्मरणशक्ती बाबतचे सगळे दावे लिहिताक्षणीच खोटे ठरलेयत. त्यामुळे म्हशींकडून कोणी लिहिले नाही तरी चालते.

७. गाईचे दूध अमृतासारखे असेल तर म्हशीचे करीनासारखे झाले की काय मग ?

८. मोबाईलपासून निघणाऱ्या किरणांचा (मूळ काकाफॉ तील रेज हे rage - राग या अर्थाने वाचले जातेय) माऱ्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी खिशात गोवरीचा तुकडा ठेवून अहोरात्र काकाफॉरवर्ड तयार करता येतात.

Pages