Submitted by मानव पृथ्वीकर on 2 April, 2025 - 05:31
कायप्पावर, फेसबुक किंवा इतरत्र अनेकदा काहीच्या काही वाटावे असे निनावी लिखाण फिरत असते.
त्यातील काही खास वाटले तर आणि निनावी असले तरच शेअर करण्यास हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रत्येक प्रयोगानंतर काकू आता
प्रत्येक प्रयोगानंतर काकू आता तारा मध्ये आणुया म्हणतात आणि एका क्षणात तारा समोर येतात. तरी बरं तारांवर माझा काहीच कंट्रोल नाही हे त्या परत परत सांगतात. पण नवा विचार प्रयोग करताना, नवा विचार येण्यापूर्वी त्या कंट्रोल नसलेल्या तारा कुठलाही विचार न करता रीसेट कशा होतात?
तुम कुछ सच्चे दिल से चाहो तो पूरी कायनात ..... यावर मात्र माझा विश्वास आहे. तो या करता की तुमचे सगळे प्रयत्न मग त्याच गोष्टीवर फोकस होतात. आणि प्रयत्नांती परमेश्वर, वाळूचे तेल रगडिता ते तेल ऑलिव्हचे बनून त्यात बदाम पडे इ. इ. कुठली समस्या आली की ती सोडवायचा ध्यास घेतला की दगडाला शेवटी पाझर फुटतोच. अर्थात तो फक्त एकवटलेल्या प्रयत्नानीच.
जीवनाचं पण त्या तारांसारखंच
जीवनाचं पण त्या तारांसारखंच असतं. ते धरून ठेवणं फक्त आपल्या हातात असतं, पण आपल्याला वाटतं की आपले विचार त्याची दिशा ठरवत आहेत.
हर्पा
हर्पा
LoA वाल्यांच्या मते विचार सुद्धा एनर्जी आहे.
तो पाण्याचा सुप्रसिद्ध प्रयोग माहितीये का? त्यात दोन पाण्याचे ग्लास घेऊन एका पाण्याला आय लव्ह यू, थँक्यू वगैरे म्हटले आणि दुसऱ्या ग्लासला शिव्या दिल्या. तर त्या ग्लासमधील पाण्याचे थेंब मायक्रोस्कोप खाली घेऊन निरीक्षण केल्यावर त्यात वेगवेगळे पॅटर्न्स दिसून आले. Water Experiment by Masaru Emoto म्हणून गुगल करा.
श्री व.पु.काळे यांनी थोडक्याच
श्री व.पु.काळे यांनी थोडक्याच शब्दात जीवनातील आनंदाचे रहस्यच उलगडून दाखविले आहे.
" शुभ्र दही पाहिलं ...
की तोंडाला पाणी सुटतं,
खायचा मोह होतो.
पण चमचा बुडवला,
की दही मोडणार,
थोड्या वेळाने चोथापाणी होणार, हे ठरलेलं !
पण म्हणून मी ते मोडलंच नाही तर ?
At the end of the day,
ते आंबट होऊन जाईल.
अजून काही दिवस तसंच ठेवलं,
तर खराब होऊन जाईल.
मग उपयोग काय त्या perfectly set झालेल्या दह्याचा ?
मनात विचार आला,
आयुष्याचंही असंच असतं ... नाही का ?
दह्यासारखं 'set' झालेलं आयुष्य
नक्कीच आवडेल !
पण ते आयुष्य तसंच set राहिलं
तर त्यातली गोडी निघून जाईल.
.... वायाच जाणार ते.
त्यापेक्षा रोजच्या रोज,
आयुष्याचं दही नव्यानं विरजायचं.
आयुष्याची गोडी चाखायला तर हवीच !
आयुष्य जगायला तर हवंच !
दिवसभर ते दही वेगवेगळ्या
form मध्ये अनुभवायचं !
कधी साखर घालून,
तर कधी मीठ,
कधी कोशिंबिरीत,
तर कधी बुंदीत,
तर कधी कोणत्या ग्रेव्हीत !
कधी जेवून तृप्त झाल्यावर ताक म्हणून !
मला ना, ह्या ताकाचा ...
हवं तितकं पाणी सामावून घेण्याचा गुणधर्म फार आवडतो.
अर्थात, कुठलाही अतिरेक झाला
तर आयुष्य पांचटच होतं !
हरेक दिवसाच्या recipe ची नजाकत वाढवता आली पाहिजे.
मात्र एक नियम कटाक्षाने पाळायचा !
पूर्ण दही संपवायच्या आधी,
रोज थोडं विरजण बाजूला काढून ठेवायचं !
'उद्याचं' दही लावायला !
मग रात्री झोपण्यापूर्वी,
दिवसभरात जगलेल्या lukewarm क्षणांनी ,
परत नव्यानं दही विरजायचं.
मला ठाऊक आहे ... रोज ही भट्टी जमेलच असं नाही.
पण नासलंच समजा कधी,
कडवट झालंच समजा कधी,
तर नाउमेद न होता, नव्यानं सुरुवात करायची.
मग त्याकरता दुसर्याकडून विरजण मागायची वेळ आली ... तरी त्यात कमीपणा नसतो.
पण 'दही' मात्र रोजच्या रोज ताजंच लावायचं !
आयुष्य कसं ' चवीनं ' जगायचं !!! "
✒️✒️✒️वपुकाळे...!
हे नक्कीच इथल्याच एखाद्या इरसाल आयडीने लिहिले असणार, अस्मिता. , कहीं ये आप तो नहीं ?
हो, विकु मीच लिहिलेय. आश्रम
हे नक्की अस्मिताने लिहिलं
हो. विकु बहुधा गमतीने म्हणत
हे वपुंनीही लिहीलेले नसावे. कारण त्यांच्या काळात इतके अकारण इंग्रजी शब्द वापरायची पद्धत नव्हती. ही सोमिवर जास्त प्रचलित झाली. मात्र अकारण का होईना पण वापरलेले इंग्रजी शब्द योग्य आहेत (फक्त lukewarm चा तेथे काय संबंध? विरजण कोमट पाण्यात लावतात?) व त्यात स्पेलिंगच्या चुकाही नाहीत याचे श्रेय या लेखकाला/लेखिकेला द्यायला हवे
आणि पुरूष लेखक असेल तर जास्तच, कारण दही लावण्याइतकी साधी गोष्ट असली, तरी पहिल्यांदाच अशा कोणीतरी हे सगळे स्वतः करण्याबद्दल किमान ध्वनित केले आहे. नाहीतर हे सगळे उमाळे "घरातील स्त्री", "गृहिणी" वगैरे पदव्या दिलेल्या बायकांनीच केलेल्या पदार्थांचे असतात.
lukewarm क्षण म्हणजे दूध
lukewarm क्षण म्हणजे दूध म्हणायचंय त्यांना. दूध किंचित कोमट करून विरजण लावतात.
भरपूर मनोरंजक आहे.
भरपूर मनोरंजक आहे.

तळमळीने लिहीलंय
क्रमांक 3 महान आहे.
क्रमांक 3 महान आहे.
सासरकडच्यांनी लिहिलेले मुद्दे
सासरकडच्यांनी लिहिलेले मुद्दे दिसताहेत
हे "औरतों पे चलाई जाने वाली
हे "औरतों पे चलाई जाने वाली हुकूमत की बर्बादी के ७ कारण" असं वाचता येईल.
हपा - अगदी ओळखू येतंय.
हपा - अगदी ओळखू येतंय.

सूनपीडीत सासू
पियू -
3) गैरमर्द च्या चालीवर काळानुरूप अपडेट केलंय असं नाही वाटत?
अच्छा, आता कळलं तुम्ही ३ नं.
अच्छा, आता कळलं तुम्ही ३ नं. का हायलाईट केलात. हो, तसंच वाटतय
एका वाक्यात सांगायचं तर डोकं
एका वाक्यात सांगायचं तर डोकं गहाण ठेवा आणि सासरची मंडळी सांगतील तसं वागा. कदाचित सासरच्या लोकांच्याही अश्या आचरट अपेक्षा नसतील पण फॉरवर्डवाल्यांच्या असतात.
lukewarm क्षण म्हणजे दूध
lukewarm क्षण म्हणजे दूध म्हणायचंय त्यांना. दूध किंचित कोमट करून विरजण लावतात. >>>
हो आले लक्षात.
सासरकडच्यांनी लिहिलेले मुद्दे दिसताहेत >>>
टोटली.
हपा - अगदी ओळखू येतंय. +1
हपा - अगदी ओळखू येतंय. +1
नवऱ्यावरच हसावे सरळ.
सासरच्यांचा कोतबो आहे फॉरवर्डरूपात.
नंबर पाच -
हे असंच्या असं जावयावरही लिहीता येईल.
याचं लोकसत्ता भाषांतर कसं
याचं लोकसत्ता भाषांतर कसं करेल?
४. नवर्याला कमी हसणे आणि दुसर्यांना जरा जास्तच हसणे.
सासरच्यांचा कोतबो आहे
सासरच्यांचा कोतबो आहे फॉरवर्डरूपात >>>
सासरच्यांचा कोतबो >>>
सासरच्यांचा कोतबो >>>
नं ५ अरे कहना क्या चाहते हो?
कारण नसताना नवऱ्यासमोर (किंवा कुणाहीसमोर) हसत राहिलं तर एकंदरीत मानसिक स्वास्थ्याविषयी जाहिर शंका व्यक्त करणारी खौट कुटुंब माहिती नाहीत काय?
सासरच्यांचा कोतबो >>
सासरच्यांचा कोतबो >>
सासरच्यांचा कोतबो >>
सासरच्यांचा कोतबो >>
*अंघोळ झाल्यावर कपाळ मोकळे
*अंघोळ झाल्यावर कपाळ मोकळे ठेवू नये आपले पूर्वज सांगत असत, त्याला शास्त्राधार काय होता ते जाणून घेऊया.*
*धर्मशास्त्र सांगते, गंध ही केवळ धर्माची नाही तर मनुष्याच्या अस्तित्त्वाची खूण आहे;*
*वाचा गंध लावण्याचे फायदे!*
अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ खेळणाऱ्या आर. प्रज्ञानंधा या भारतीय खेळाडूला परदेशात मुलाखतीच्या दरम्यान विचारण्यात आले, 'तू कपाळावर ही विभूती का लावतोस?' त्यावर सोळा वर्षीय प्रज्ञानंधा म्हणाला, 'माझी आई मला सांगते म्हणून!'
मित्रांनो, सोळा वर्षीय प्रज्ञानंधाच्या जागी आपण असतो, तर कदाचित आपणही हेच उत्तर दिले असते. कारण बालपणापासून आपल्यावरही हा संस्कार आपल्या आई आजीने घातला आहे. त्यानुसार आपण कपाळाला गंध लावतोसुद्धा! मात्र ते का लावावे? किंवा ते लावल्याने होणारे फायदे कोणते? की ती केवळ धार्मिक खूण आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
*'देह देवाचे मंदिर' असे आपण म्हणतो. ज्याप्रमाणे मंदिरात सर्वत्र ईश्वर व्यापून उरलेला असतो, त्याप्रमाणे देहातील रोमारोमात होणारे स्फुरण हे ईश्वरीभावाकडे खेचणारे असते. हृदय, यकृत, मेंदू, मूत्रपिंड ही स्थाने तंदुरुस्त असतील, तरच देह तंदुरुस्त राहतो. हे अवयव म्हणजे देहमंदिराचे स्तंभ आहेत.*
*या देहात भगवंत नित्य वास करतो. या देहस्थित मूर्तीस गंध लावणे, म्हणजे छोटीशी देवपूजाच आहे. ज्या संसारी माणसांना पूजेसाठीदेखील वेळ नसतो, त्यांनी किमान स्नान झाल्यावर कपाळावर गंध लावून अंतरात्म्याची पूजा जरूर करावी.*
*गंध लावण्यामागे रहस्य म्हणजे, गंध लावताना अंगुलीस्पर्श होतो. ही अंगुली मध्यमाच असावी, म्हणजे मधले बोट असावे. त्या बोटाचा थेट हृदयाशी संबंध आहे. अंगुलीतून प्रवाहित होणारी स्पंदने थेट हृदयाला जाऊन भिडतात.*
गंध लावण्याचे व्यावहारिक कारण म्हणजे, गंध लावणारा मनुष्य सहसा पापकर्मास प्रवृत्त होत नाही. कारण तो देवाचे अस्तित्व मानणाऱ्यांपैकी एक असतो. सकाळी कपाळावर गंध लावून केलेली मानसपूजा दिवसभर, आपण देवाच्या साक्षीने काम करत आहोत याची जाणीव देत राहते. जणू काही, आपल्या प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणारा तो सीसीटीव्ही कॅमेरा असतो आणि त्याचा ऑपरेटर हृदयसिंहासनावर विराजमान झालेला असतो. आपण कोणाच्या निगराणीत आहोत, हे कळल्यावर जसे वाईट कृत्य करण्यास धजावत नाही, त्याप्रमाणे `माझ्याकडे देव माझा पाहतो आहे' ही जाणीव गंधाद्वारे सातत्याने होत राहते.
गंध लावणाऱ्या व्यक्तीकडे समाजदेखील संस्कृतीरक्षक या भूमिकेतून पाहतो. ही केवळ धार्मिक खूण नाही, तर स्वत:च्या अस्तित्वाची स्वत:ला करून दिलेली जाणीव असते. म्हणून हिंदूधर्माने आणि आर्यसंस्कृतीने तिलकविधीला धर्मात स्थान दिले आहे.
पूर्वीपासून स्त्री-पुरुष कपाळावर गंध लावीत असत़ त्याची जागा आता टिकल्यांनी घेतली. परंतु, गंध लावण्यामागे शास्त्रीय कारणेदेखील आहेत. गंध केवळ सुगंधी म्हणून नाही, तर अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असे चंदन, हळद, अष्टगंध, गुलाल, कृष्णचंदन इ. विविध पदार्थांनी युक्त असते. आपले मस्तक शांत राहावे, गंध दरवळत राहावा आणि कपाळावरील दोन भुवयांच्या मध्ये स्थित असलेले चक्र कार्यरत व्हावे, यासाठीदेखील गंध लावले जाते.
तिलकधारी व्यक्तीचा भक्तिभाव, मनाची निर्मळता, सात्विकता, सोज्वळता इ. सद्गुणांचे दर्शन गंधातून घडते. कोणाही सुवासिनीने हळद-कुंकाची लावलेली दोन बोटं तिच्या चेहऱ्यावरचे तेज वाढवतात. कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते, गुरुजी, पुरोहित मंडळी अबीर, चंदन किंवा अष्टगंधाचा टिळा लावतात. तो पाहता त्यांच्याही चेहऱ्यावरचे सात्विक भाव उठून दिसतात. पूर्वीदेखील लढाईला जाण्यापूर्वी आणि विजयश्री मिळवून परत आल्यावर मधल्या करांगुलीने कपाळावर खालून वरच्या दिशेने गंधाचे बोट उमटवले जाई. त्याला विजयतिलक म्हटले जात असे. त्यालादेखील बहुमान होता. बहीण भावाला, पत्नी पतीला, आई मुलांना गंध लावून त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. यशस्वी व्यक्तीचेही औक्षण करून त्याला उत्तरोत्तर यश मिळत राहावे म्हणून गंध लावले जाते. एवढेच काय, तर नवीन वस्तू आणि नवीन वास्तू यांनादेखील गंध लावून पूजन केले जाते.
*अशा रितीने गंध लावून आपण आपल्या अस्तित्वाची ओळख ठेवावी आणि अंत:पुरातील देवाची पूजा करून त्याच्या साक्षीने सत्कार्य करीत राहावे*
*विशेष सुचना :- हा मेसेज वेळात वेळ काढून ईतरांच्या माहीतीत भर पडावी म्हणून पुढे शेअर करावा
मधल्या करांगुलीने>>>>> मी
मधल्या करांगुलीने>>>>> मी लगेच माझी मधली करांगुली आणि शेवटची मध्यमा बरोबर आहे ना ते चेक केलं
मधल्या पादांगुलीने नव्हे तर
मधल्या पादांगुलीने नव्हे तर करांगुलीने हे स्पष्ट करण्यास तसे लिहिले असावे.
देव सतत पाहत असतो असं म्हटलं
देव सतत पाहत असतो असं म्हटलं तर त्याचं त्याला ठरवू द्या कसं मॉनिटर करायचं आहे ते. तो काय गंध लावणाऱ्यांकडे जास्त लक्ष आणि न लावणाऱ्यांकडे कमी लक्ष देणार आहे का? देव आहे ना?
बाकी गंध लावलं की चेहरा तेजस्वी/छान/सात्विक दिसतो, भारतीय पेहरावात कपाळावरचं गंध खुलून दिसतं असं मलाही वाटतं. अष्टगंध किंवा खऱ्या चंदनाचा मंद सुवास दरवळतो किमान काही काळ हे ही खरं आहे.
दोन भुवयांच्या मध्ये जो
दोन भुवयांच्या मध्ये जो प्रेशर पॉईंट आहे तो रोज दाबण्याचे अनेक फायदे शास्त्राने सिद्ध झाले आहेत. त्यामुळे डॉक्टर लोक गंध/ कुंकू/ चंदन काही लावणार नसलात तरी रोज तो पॉईंट बोटाने नुसता एकदातरी दाबा असं सांगतात.औषधी गुणधर्म असलेल्या गोष्टी लावणे आणि चक्र वाल्या पॉईंट शी देखील सहमत.
वर हे सीसीटीव्ही, सिंहासन, पापकर्म वगैरे लिहिलंय त्याने लावणारे लोक पण सोडून देतील गंध लावायचे. गंध लावून दुसऱ्यांचा छळ करणारे अनेक लोक माहित आहेत.
आमच्याकडे याचं एकदा फॅड
आमच्याकडे याचं एकदा फॅड निघालं होतं, आम्ही शाळेत असताना. त्या पॉइंटवर उभा मसाज करायचा १०८ वेळा. त्याने काहीतरी होतं. ज्यांनी केलं त्यांच्या कपाळावर दुसऱ्या दिवशी उभा चट्टा, त्वचा घासल्याने. जपळपास १/३ वर्ग असे अनोखे गंध लावुन बसलेला.
मापृ
मापृ
मानव त्याला रामाचा बाण असं
मानव त्याला रामाचा बाण असं म्हणायचे, मलाही काढायचा होता ,सगळे मोठे दादा लोकं काढतायत म्हणून ,मग मी अगदी 3 रीत असताना एका गावच्या दादाने ,कसं तुला दुखत नाही कपाळावर(मीही डेरींग म्हणून करू दिलं होतं ) म्हणून काढला होता मी ही ती दुखती जखम घेऊन बरेच दिवस फिरत होते
.नंतर त्या दादाला असं झापलं होतं घरच्यांनी आणि मलाही अतिशानपणासाठी . जवळपास 108 वेळा (बरोबर )करायचे माझ्या कपाळावर 50, 60 वेळा तरी केलं असेल , पण मी जखम झाली तरी रडले नव्हते. अजूनही सगळे आठवन काढतात त्या रामाच्या बाणाची.
Pages