काहीच्या काही फॉरवरर्ड्स - २

Submitted by मानव पृथ्वीकर on 2 April, 2025 - 05:31

कायप्पावर, फेसबुक किंवा इतरत्र अनेकदा काहीच्या काही वाटावे असे निनावी लिखाण फिरत असते.
त्यातील काही खास वाटले तर आणि निनावी असले तरच शेअर करण्यास हा धागा.

हा पहिल्या भागाचा दुवा.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

The kind of complex thinking a pani puri vendor does daily is mind-blowing.

Take a simple evening at a stall. Six people standing, each on their 5th or 6th puri, some already demanding a second plate. Suddenly a new customer walks in. Most vendors don’t say, “Wait.” They just weave the person seamlessly into the cycle.

Now imagine the mental math:

Remembering who is at which puri.

Keeping track of whose turn is next.

Managing fresh plates, second plates, and shared plates; all together.

Customizing taste (extra teekha, more meetha, no aloo, jain, swaminarayan).

Balancing chutneys, potatoes, and flavored water so nothing runs out mid-cycle.

Handling payments; immediate, delayed, or credit.

Running logistics: how many plates to sell to survive the day?

And this is just the basic complexity.

All of it is happening in real time, with no Excel sheet, no CRM, no team, no reminder app. One mistake, and the customer knows instantly.

Now compare that with our white-collar world. We call ourselves multitaskers but lean on reminders, tools, meetings, and buffers. A pani puri vendor doesn’t get that luxury. For him or her, complexity is not a skill on the CV; it’s survival.

The next time you eat pani puri, notice not just the taste but the brilliance of the brain behind it.

Lol मला तर आधीच शंका आली होती पाणीपुरी रॉकेट सायन्स आहे, आपल्याला किंमत नाही.
स्वामीनारायण पापु काय आहे? Lol

इथल्या स्वामीनारायण मंदिरावर बहिष्कार टाकला आहे कारण ते स्त्रियांना गाभाऱ्यात येऊ देत नाहीत, पूजेत सहभाग घेऊ देत नाहीत. लांब उभे राहायला सांगितले होते ह्यूस्टन मधे. मंदिर परिसर अतिशय श्रीमंत पण वॅल्यूज महामूर्ख. त्यामुळे माझे एंटिने वर झालेत. Proud

Submitted by vijaykulkarni on 15 September, 2025 - 07:26>>> आयुष्यात दैवयोगाने जर पुढे मागे कधी सिरीयल किलर व्हायचा प्रसंग ओढवला तर हे असे मेसेज बनवणारी लोकं माझ्या हिटलिस्ट वर नक्की असतील... 🤬

इथे व्हाइट कॉलर असू दे नाहीतर ब्लू कॉलर, रोज वरण/आमटी, उसळी, कोशिंबिरी, भाज्या यांची वेगवेगळी कॉम्बिनेशन तिन्ही त्रिकाळ करून शनिवारी पाणीपुरी/पावभाजी/डोसे-इडल्या, खास प्रसंगी पूरणपोळी, बिर्याणी वगैरे फर्माईशी पूर्ण करणाऱ्या बायकांना पाणीपुरीचं कसलं कौतिक ऐकवताय?

त्या पाणी पुरीवाल्यावर लेख पाडताहेत. कुठल्या भांड्यात काय भिजवायचं, शिजवायचं, कुठला मसाला कधी/किती घालायचा आणि किती कप चहाला किती आलं हे मध्यरात्री उठवलेत तरी लीलया सांगणाऱ्या आपापल्या घरातल्या बायकांना स्वतः स्वैपाक करून एक वेळ गरमागरम जेवायला वाढलंय का कधी?

(घरचा भार न सांगता शेअर करणाऱ्या सन्माननीय अपवादांनी स्वतःला वगळावं. त्यांना असले पाचकळ व्हाट्सऍप लिहायला वेळ आणि इच्छा नसेल.)

त्या जात्यावरच्या फॉरवर्डमध्ये खुंटाची भूमिका, जात्यात हळूहळू धान्य सोडणे, प्रसंगी दोन बायकांनी खुंटाला हात लावणे, जात्यावर दळताना अर्ध मांडी घालून दुसरा पाय लांब सोडणे वगैरे उल्लेख आलाच नाही. येणार पण नाही कदाचित कारण कधी स्वतः जात्यावर बसलेच नसतील.

व्हाट्सअप लिहिणाऱ्यांचा अनुभव म्हणजे पिक्चरमध्ये झुंजू मुंजु होताना जयश्री गडकर किंवा सुलोचना यांना सात्विक चेहऱ्याने जात्यावर बसून दळताना सोबत लता किंवा आशाच्या सुरेल आवाजात गाणी म्हणताना पाहणे इतपतच.

आपापल्या घरातल्या बायकांना स्वतः स्वैपाक करून एक वेळ गरमागरम जेवायला वाढलंय का कधी?>>>>>

इथे अप्रस्तुत आहे पण एकदम आठवले. गावचे एक कुटुंब आहे, घरातली तरुण मुले शहरात आणि वृद्ध घरात. त्यातल्या स्त्रियांना आता आजारपणामुळे कामे होत नाहीत. त्या कामांना मोल देऊन माणसे आहेत पण जेवण आजही जमत नाही तरी स्त्रिया करताहेत. घरच्या पुरुषांना उत्तम सैपाक येतो पण घरात करत नाहीत. इतरांनी सुचवले तरीही त्यांना जमतच नाहीय स्वतःच्या घरात सैपाक करायला. परंपरांचे ओझे मनावरुन उतरवणे किती कठिण.

काकाफॉ मॅनिफॅक्चर करणारी मंडळी दिसेल त्या वस्तूवर निबंध पाडू‌ शकतात. काय प्रतिभा असेल!!
उदा.

शिरा खाताना मनात : शिऱ्यात साखर दिसत नाही, पण गोड चव असते. तसा देव दिसत नसला तरी त्याची कृपा जाणवते.
वगैरे वगैरे वगैरे वगैरे

शिरा खाताना मनात : शिऱ्यात साखर दिसत नाही, पण गोड चव असते. तसा देव दिसत नसला तरी त्याची कृपा जाणवते.
>>>> Lol Lol
@अनया होऊन जाऊ दे शिऱ्यावर एक काकाफॉ. वरची फॉर्वर्डस पाठवणाऱ्या सगळ्या ग्रुप्सना आपण स्पॅम करू शिऱ्याचे काकाफॉ पाठवून.

7804a7d0-fc67-4e66-8345-69fd0872a79e.jpeg

मायबोली गणेशोत्सव मतदानाची मुदत संपत आली.

तुमचे मत नोंदवलेत ना?

नसेल नोंदवले तर त्वरा करा, लगेच तुमचे मत नोंदवा.

मतदानाचे सगळ्या धाग्यांचे दुवे https://www.maayboli.com/node/87244 या धाग्यावर आहेत.

… @अनया होऊन जाऊ दे शिऱ्यावर एक काकाफॉ. वरची फॉर्वर्डस पाठवणाऱ्या सगळ्या ग्रुप्सना आपण स्पॅम करू…

हे करायचेच आहे. ईंट का जवाब पथ्थर से 👍

अनया, मनावर घ्या सत्वर 😀

शिरा खाताना कधी कधी खवट काजू येतात पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून शिर्‍याचा अस्वाद घ्यायचा की काजूकडेच लक्ष देऊन मूड खराब करून घ्यायचा हा आपला चॉइस असतो, जीवनाचही तसच आहे, खवट काजू सारखी काही व्यक्तिमत्वे भेटतातच !

जीवनाचही तसच आहे, खवट काजू सारखी काही व्यक्तिमत्वे भेटतातच !
>>>> Lol काकाफॉतील जीवनाच्या प्रकाराचा गर्भित अर्थ -
images-6.jpeg

पिक्चरमध्ये झुंजू मुंजु होताना
<<
क्यामेर्‍यासमोर जिलेटिन पेपर चे 'फिल्टर' लावून तयार केलेली कृत्रीम सकाळ्/संध्याकाळ नीट ओळखू येत असे.

पुढच्या गणेशोत्सवात संयोजकांनी निवडक किंवा स्पर्धकाना स्वेच्छा निवड ठेऊन काकाफॉ द्यायचे लघु कथा बनवायला. अट एकच .... मुळ फॉरवर्ड पेक्षा डबल मज्जा यायला पाहिजे.
स्पर्धा शीर्षक - बापसे बेटा सवाई

दसरा संपला होता, दीपावली जवळ आली होती, तेवढ्यात एके दिवशी कांही तरुण-तरुणींचा NGO छाप कंपू आमच्या महाविद्यालयात शिरला.

त्यांनी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले; परंतु त्यांच्या एका प्रश्नावर सगळे महाविद्यालयीन विद्यार्थी चूप बसले. त्यांना काहीही उत्तर सुचेना. अवघ्या कॉलेजमध्ये शांतता पसरली!

त्यांनी विचारलं, "जर का दीपावली हा सण भगवान रामचंद्रांच्या १४ वर्षांच्या वनवासानंतर ते अयोध्येला परतण्याचा उत्सव म्हणून साजरा केला जातो, तर मग दीपावलीच्या दिवशी "लक्ष्मी पूजन" कां केल्या जातं ? श्री रामाची पूजा कां नाही केली जात?"

या प्रश्नावर कॉलेजमध्ये अचानक शांतता पसरली. कारण त्या काळामध्ये न कुठला सोशल मीडिया उपलब्ध होता न कुठले स्मार्टफोन्स उपलब्ध होते! कुणालाच या प्रश्नाचं उत्तर माहीत नव्हतं! तेवढ्यात, शांततेचा भंग करत आमच्याच विद्यार्थ्यांमधील एक हात या प्रश्नाचं उत्तर द्यायला वर झाला!

त्याला बोलायला सांगितल्यावर त्या विद्यार्थ्यानं उत्तर दिलं, "दीपावली हा सण दोन युगांशी म्हणजेच "सत्ययुग" आणि "त्रेता युग" यांच्याशी जोडलेला आहे!"

“सत्ययुगात समुद्र मंथनातून माता लक्ष्मी याच दिवशी प्रकट झाली होती! म्हणून "लक्ष्मी पूजन" केलं जातं!

भगवान श्री रामसुद्धा त्रेता युगात याच दिवशी अयोध्येला परतले होते! त्यावेळी अयोध्या वासियांनी लक्षावधी दीप प्रज्वलित करून आपल्या भगवंताचं स्वागत केलं होतं! म्हणूनच या सणाचं नाव दीपावली असं आहे!

म्हणूनच या पर्वाची दोन नांवे आहेत, "लक्ष्मी पूजन" हे सत्ययुगाशी संबंधित आहे, आणि दुसरं "दीपावली" हे त्रेता युगातील प्रभु श्रीराम आणि दिव्यांची आरास याच्याशी संबंधित आहे!

हे उत्तर मिळाल्यानंतर थोडावेळ पुन्हा सगळीकडे शांतता पसरली, कारण कुणालाच या उत्तराला खोडून काढता येत नव्हतं! अगदी आम्हाला हा प्रश्न विचारणाऱ्या त्या तरुण-तरुणीच्या चमूला देखील यावर काय बोलावं हे कळेना!

आणि मग आम्हा सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकदमच टाळ्यांचा कडकडाट केला!

एका वृत्तपत्राने माझी मुलाखत देखील घेतली!

त्या काळामध्ये वृत्तपत्रांमध्ये मुलाखत द्यायला मिळणं हेच मोठ अप्रूप होतं!

पुढे कित्येक वर्षानंतर समजलं की तो जो तरुण तरुणींचा कंपू आमच्या कॉलेजमध्ये प्रश्न विचारायला आला होता तो, ज्यांना आजच्या आधुनिक शब्दावलीत "लिबरर्ल्स" (वामपंथी) म्हटल्या जातं त्यांनी पाठवलेला होता. ही वामपंथीयांची चमू प्रत्येक कॉलेजात जाऊन कॉलेज तरुणांच्या डोक्यात ही गोष्ट भरवत असे की जर दीपावली ही श्रीरामाशी संबंधित आहे तर मग दीपावलीच्या सणात "लक्ष्मी पूजना"चं औचित्य काय आहे?" एकूणच ही वामपंथी चमू विद्यार्थ्यांचं ब्रेनवॉश करीत होती!

परंतु आमचं उत्तर मिळाल्यानंतर ती चमू गायबच झाली!

एक आणखीन प्रश्न विचारण्यात आला होता आणि आजही विचारण्यात येऊ शकतो. तो म्हणजे लक्ष्मी आणि श्री गणपती यांचं आपसात काय नातं आहे ? आणि दीपावली मध्ये या दोघांचं पूजन का केलं जातं?

याचं खरं उत्तर पुढीलप्रमाणे

लक्ष्मी जेव्हा सागरमंथनामध्ये सागरातून वर आली आणि तिनं भगवान विष्णूशी विवाह केला तेव्हा ती सृष्टिच्या धनाची आणि ऐश्वर्याची देवी बनली! तेव्हा माता लक्ष्मीने धन वाटून देण्यासाठी कुबेराला या धनाच्या भांडाराचा व्यवस्थापक म्हणून नेमलं.

कुबेराची वृत्ती कंजूषणाची होती. तो धन वाटण्यापेक्षा केवळ त्याचं रक्षण तेवढं करू लागला!

इकडे माता लक्ष्मी त्रासून गेली! तिच्या भक्तांना लक्ष्मीचं धन प्राप्त होत नव्हतं. धनाच्या रूपानं त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा होत नव्हती!

लक्ष्मीनं आपलं गाऱ्हाणं भगवान श्री विष्णूंसमोर मांडलं! भगवान विष्णु लक्ष्मीला म्हणाले, "तू कुबेराच्या जागी रक्षक म्हणून दुसऱ्या कुणाचीतरी नेमणूक कर!"

लक्ष्मी म्हणाली, "यक्षराज कुबेर माझा परम भक्त आहे! त्याला वाईट वाटेल!"

तेव्हा भगवान विष्णुंनी लक्ष्मीला सांगितलं तू श्री गणपतीच्या दीर्घ आणि विशाल बुद्धिचा त्यासाठी वापर कर!

मग लक्ष्मीनं श्री गणपतीला सांगितलं की "कुबेर धनभांडारातील धनाच्या रक्षणाचं कार्य करील आणि तू धनाच्या भांडारातलं धन भक्तांना वाटून द्यायचं काम करावस.!"

श्री गणपती तर महा बुद्धिमान! तो म्हणाला, "देवी, मी ज्याचं नाव तुला सांगेन त्याच्यावर तू कृपा कर! त्यासाठी तू मला विरोध करायचा नाहीस!"

लक्ष्मीनं गणपतीची ही मागणी मान्य केली!

तेव्हापासून श्री गणेश लोकांच्या भाग्यातील विघ्न / अडचणी यांचं निवारण करण्यासाठी त्यांच्यासाठी धनभंडाराचे दार उघडू लागले! कुबेराकडे केवळ धन-भंडारावर पहारा करण्याचंच काम शिल्लक राहिलं.

गणपतीची उदार बुद्धी बघून, लक्ष्मीनं आपला मानसपुत्र असलेला गणेश याला अशी विनंती केली की ज्या ठिकाणी ती आपला पती श्री विष्णू यांचेसोबत नसेल तेव्हा पुत्रवत असलेला श्री गणेश तिच्या सोबत असेल!

दीपावलीत लक्ष्मीपूजन असतं कार्तिक अमावस्येला! भगवान विष्णू त्या समयी योगनिद्रेत असतात! या दिवसाच्या नंतर अकरा दिवसांनी श्री विष्णू प्रबोधिनी एकादशीला निद्रेतून जागे होतात!

लक्ष्मीला नेमकं याच काळादरम्यान पृथ्वीभ्रमण करण्यासाठी म्हणजेच शरद पौर्णिमा ते दीपावली या काळात यायचं असतं. आणि या काळात श्रीविष्णू सोबत नसल्यानं ती गणेशाला आपल्या सोबत घेऊन येते. म्हणूनच दीपावलीला लक्ष्मी-गणेश यांची पूजा केली जाते!

( पहा कसा विरोधाभास आहे की या देशातला आणि हिंदूंचा सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळी ह्या सणाबद्दल पाठ्यपुस्तकात कुठलीही विस्तृत माहिती आढळून येत नाही आणि जी काही माहिती आहे तीही अत्यंत त्रोटक स्वरूपात आहे! )

हा लेख आपणही वाचावा आणि इतरांनाही वाचण्यासाठी कृपया पुढे पाठवावा!!!

या फॉरवर्डने वामच काय सर्वच पंथी लोकांना गप्प केलेले दिसते Happy

दीपावलीत लक्ष्मीपूजन असतं कार्तिक अमावस्येला! >>> कार्तिक? आश्विन अमावस्येला असते ना लक्ष्मीपूजन ! इतके लिहीण्या आधी कालनिर्णय बघितला तरी चालेल Happy

लिबरर्ल्स >>> हा शब्द कसा वाचायचा?

हा वापपंथी चमू बहुधा सिनीयर कट्ट्यावर गेला असणार. कॉलेजात नाही.

कार्तिक? आश्विन अमावस्येला असते ना लक्ष्मीपूजन !
>>>>
उत्तरेकडचं पंचांग आणि आपलं पंचांग याच्यात १५ दिवसांचा फरक असतो ना? त्यांचा महिना विक्रम संवतप्रमाणे म्हणजे त्यांचा कार्तिक सुरु झाला असेल आणि ही कार्तिक अमावस्या.

थोडक्यात हिंदीत लिहून आलेलं फारसा विचार न करता google translate करून फॉरवर्ड केलंय.

हो असेल. मला कल्पना नाही. पण हे मराठीत मराठी लोकांसाठी आहे त्यामुळे आपण आउट ऑफ द वे जाउन ते समजून घेण्यापेक्षा त्यांनीच मराठी लोकांकरता मराठीत अचूक लिहावे असे मनसे मोड मधे जाउन म्हणतो Happy पण तुम्ही दिलेले कारण असेल त्यामागे.

बाय द वे मी कालनिर्णय पाहा असे म्हंटलो, पण तेथे "घरकुल" नावाच्या कोणत्यातरी मराठीच कंपनीने "महीना" असा शब्द दोनदा लिहीला आहे. मार्केटिंग कंपनी हिंदी वापरली असावी (आता मी "समजून" घेतोय. आपलीच सवय जात नाही).

त्या वामपंथीयांनी अजून एक प्रश्न विचारला म्हणे. जर श्रीराम अयोध्येत परत आले म्हणून दिवाळी उत्तरेत साजरी करतात, तर मग गुढीपाडव्याला महाराष्ट्रात राम रावणाला मारून परतला म्हणून गुढी का उभारतात? ह्यावर त्या उत्तर देणाऱ्या चमूने सांगितले की दसऱ्याला रावणाला मारल्यानंतर पुढे साधारण एक वर्षाने दिवाळीत ते अयोध्येत पोहोचले. त्यात मध्ये वाटेत असताना चैत्र महिन्यात ते पुण्याला आले होते. ते वामपंथी लोक पुन्हा कधीच दिसले नाहीत, बहुतेक चक्कर येऊन पडले.

पुढे साधारण एक वर्षाने दिवाळीत ते अयोध्येत पोहोचले>>>>>

कायतरी काय????

रावणाचे विमान धुळ खात पडले होते लंकेच्या रनवेवर.. बिभिषणाला तसेही ते वापरायचे नसणारच.. इतक्या लफड्यानंतर मिळालेले राज्य वापरायचे की लगेच विमानाने परदेशी फिरायला जायचे??? त्यामुळे राम विमानात बसुन परतला असे वाल्मिकींनी लिहुन ठेवलेय का माहित नाही पण मी वाचलेय Happy

Pages