काहीच्या काही फॉरवरर्ड्स - २

Submitted by मानव पृथ्वीकर on 2 April, 2025 - 05:31

कायप्पावर, फेसबुक किंवा इतरत्र अनेकदा काहीच्या काही वाटावे असे निनावी लिखाण फिरत असते.
त्यातील काही खास वाटले तर आणि निनावी असले तरच शेअर करण्यास हा धागा.

हा पहिल्या भागाचा दुवा.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हपा Lol

हपा Lol
काकाफॉचा गोठा झालाय येथे.

नवं आणा आता काही.
<<<<<< 'अंधारात म्हैस न दिसल्याने माणूस तिच्या पाठीवरून घसरून आपटला' यात 'अंधेरी रातोंमे, सुनसान राहोंपर, हर जुर्म मिटवायला...' योग्य कँडीडेट शहेनशाह पेक्षा म्हैसच आहे, ही शक्यता जाणवत नाही का? एकतर सर्व चोर हे 'जब अंधेरा होता है, आधी रात के बाद, काली सी सडकपर...' वगैरे निकलत असल्याने अंधारात बेमालूम मिसळून गेलेली म्हैस ही चोराला अटकाव करायला सगळ्यांत योग्य! शिवाय शहेनशाहला दिवसा पोलीस म्हणून ड्युटी असल्याने त्याला विश्रांती मिळणे आवश्यक होऊन बसते. म्हशीला तो इश्यू नाही.
(पण प्रायव्हेट डिटेक्टिव्ह नसलेल्या म्हशींना मात्र अंगावर चमकते ठिपके हवेत! #चमचमकरताहैयेम्हशीलाबदन) या प्लस पॉइंटचा म्हशींच्या खात्यात उल्लेख केल्याशिवाय नवीन विषयाला कसा काय हात घालता येईल?

बाकी, इकडे डोकावण्यास वाईच उशीर झाल्याने आधीच्या सगळ्या कहर डिस्कशनला घाऊक हसून घेते. Lol Lol

चमचमकरताहैयेम्हशीलाबदन >>> Lol मीही स्पा ला जाऊन चकाकते लिहिले ते त्यामुळेच. कोरिअन स्किन केअर सारखे.

मी फिरून आले माझ्या कायप्पात पण सगळे सुधारलेत, एकही काकाफॉ सापडले नाही.

.. म्हशींना मात्र अंगावर चमकते ठिपके हवेत! #चमचमकरताहैयेम्हशीलाबदन …

What imagary ! Next level hilarious

म्हशीलाबदन 😂

आले माझ्या कायप्पात पण सगळे सुधारलेत,>>>सेम,मला तर वाटलं होतं आज वट पौर्णिमा तर बऱ्याच पोस्ट येतील,फेऱ्या,दोऱ्या किंवा वडा बद्दल
पण एकही नाही कुठेच

Lol
>>> रेड्याची बाजू मांडली गेली म्हणून म्हशीची मांडावी लागली
पण म्हैस त्यासाठी रेडी आहे का हे तपासलं का आधी? Proud

चमचमकरताहैयेम्हशीलाबदन
No-bail prize
म्हैस रेडी आहे का
>>>>>>
सगळेच Lol

आता म्हशींवर Ready, Kick असे सिनेमे येऊ शकतात.

म्हैस त्यासाठी रेडी आहे का???
>>>
रिश्तों के भी रुप बदलते हैं
नये नये सांचे में ढलते हैं
एक पिढी आती हैं, एक पिढी जाती हैं
बनती कहानी नयी
क्यों की
.
.
.
.
.
म्हैस भी कभी रेडी थी…

बापरे...कहर आहात तुम्ही सर्व...

अस्मिता,फारएण्ड, माझेमन, मानव सर, श्रद्धा, हपा... ऑफीसात बसून हसतोय. म्हशीलाबदन ला खतरनाक हसलोय.

पण म्हैस त्यासाठी रेडी आहे का हे तपासलं का आधी?>>
चमचमकरताहैयेम्हशीलाबदन>>>
bail application....No-bail prize>>>

हसून हसून गाल दुखायला लागले Rofl

कुटूंब घड्याळाच्या काट्यासारखं
असलं पाहिजे ...
कोणी लहान,कोणी मोठा ,
कोणी स्लो, कोणी फास्ट
पण जेव्हा कुणाचे बारा वाजणार
असेल, तेंव्हा सगळे
एकत्र पाहिजे ...
*शुभ प्रभात*

https://www.maayboli.com/node/86847
मायबोली वर्षाविहार २०२५ मुख्य नावनोंदणीचा धागा आला आहे. पटापट नावनोंदणी करा, लोकहो.

Pages