खाऊगल्ली - आजचा मेनू - (६)

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ Happy

क्रमवार पाककृती: 

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415

तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रमड च्या रेसिपीने मशरुम राइस, मी थोडे मटार आणी कसुरी मेथी पण घातली वरुन कोथिबिर मस्ट असल्याने ती पण आलिच..मस्त झालाय.
IMG_5816.jpeg

RMD , मश्रुम राईस tempting दिसतोय. प्लेटिंग ही छान केले आहे . रेसिपी घरी मुलीकडे देते , तिला मश्रुम खूप आवडतात. केल्यावर इथे अपडेट देईनच.

rmd,
मश्रुम राईस मस्तच. रेसिपीसाठी धन्यवाद.
वामन्याचे रिकामे उद्योग!>>>>> हे जबरी आहेत. आम्ही वाळवत नाही. असेच मिक्सरमधून काढतो. तुकडे भाकरीचे जास्त आवडतात.
प्राजक्ता, तुमचा मश्रुम राईस सुद्धा मस्त दिसतोय

प्राजक्ता, मश्रुम राईस भारी दिसतोय. अशी व्हेरीएशन्स करून पाहण्यातच मजा आहे. आवर्जून सांगितलंस ते खूप छान वाटलं.

अश्विनी, नक्की करून पाहा आणि सांग

डोसा एकदम सुरेख !! Texture छान आलं आहे . पण मी सोबत बटाटा भाजी खाईन .>>>> मी पण C59BB0DA-6E89-4D6E-95F0-106FEAC887E7.jpeg
सखुबत्ता

म्हटले तर नेहमीचा आपला हॉटेल मध्ये जाऊन ऑर्डर करायचा ओनियन रवा मसाला डोसा आहे ...

पण रविवारच्या पहाटे सहा वाजता मॉर्निंग walk ला बाहेर पडून नंतर आठ वाजता कडकडून भूक लागलेल्या आणि पावसात चिंब भिजलेल्या अवस्थेत अंगाला ऊब मिळवून देणाऱ्या हॉटेलला शिरून पोटाला ऊब म्हणून हा ऑर्डर केला. अश्या माहोलमध्ये खायची एक वेगळीच मजा. तीन वाट्या तर सांबार झाले. केवढीशी ती वाटी पण त्यामुळे प्रत्येकवेळी आधीपेक्षा गरम आले.

अश्या वातावरणात मुले पिझ्झा ज्यूस आईसक्रीम कसे खात होते हे बघून प्रश्न पडला. थोडेसे त्यांच्याबद्दल वाईट देखील वाटले.. पण ते त्यातच खुश आहेत बघून मग आपल्या मसाल्या डोशावर कॉन्सन्ट्रेट करून त्याचे पोट फाडले Happy

अवांतर - @ rmd तुमच्या नावाचा फ़ुल्फॉर्म सुद्धा रवा मसाला डोसा होतो Happy

हा आमचा ओनियन rmd Happy

IMG-20250602-WA0023.jpg

rmd तुमच्या नावाचा फ़ुल्फॉर्म सुद्धा रवा मसाला डोसा होतो >>> Rofl मनापासून हसू आलं.

ओनियन rmd भारी आहे दिसायला Happy

वरचा सखुबत्ता पण सहीच!

जाळी पडलेला व कुरकुरीत दिसतोय >>> हो, मी रवा मसाला असल्यास ऑर्डर करताना "क्रीस्पी बनाने को बोलना" हे आवर्जून सांगतो. पुढे नशीबात असेल ते पण आपण आपले काम करावे.

Pages