Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गेल्या आठवड्यातले डिनर. चे
गेल्या आठवड्यातले डिनर. चे मेनू...

तिखटमिठाची पुरी आणि आंब्याचा शिरा ( मोसमातला शेवटचा)
लेकीने केलेला मेनू - पनीर ६५
लेकीने केलेला मेनू - पनीर ६५ आणि spaghetti pasta

उत्तप्पा मस्त दिसतोय.
उत्तप्पा मस्त दिसतोय.
पहिली बाजू होताना वर पेरलेल्या कांदा कोथिंबिर मिरच्यांचा पलटी मारल्यावर येणारा गरम तव्याचा च्यॅर्र.. आवाज आणि तो स्वर्गीय गंध पोहोचतोय फोटूतून.
झंप्या दामले मोड ऑन.
"ओल्या खोबर्याची पुदिना घालून केलेली चटणी बरीक हवी होती हो"
दामले मोड ऑफ.
पनीर ६५ मस्त पण कधी ट्राय
पनीर ६५ मस्त पण कधी ट्राय केले नाही. चिकन ६५ मात्र फेवरेट.. त्या ६५ नावामागे आय मीन नंबरमागे काही इतिहास भूगोल आहे का? कोणाला आयडिया?
परवल का भाजा हा चारीमोरी
परवल का भाजा हा चारीमोरी म्हणून खाण्याचा बांगला पदार्थ आहे. रविवारी संध्याकाळी केला होता.
ताजे परवल (मराठीत?) घेतले.

दोन भागात चिरून घेतले. (साल काढली तरी चालते). हळद, मीठ लावून दहा मिनिटे झाकून ठेवले.
तव्यावर चमचाभर तेल घालून दोन्ही बाजूंनी नीट परतून घेतले. (पॅनही चालतो)
चाट मसाल्याबरोबर खाल्ले.
आंबट असते का हे कैरी सारखे?
आंबट असते का हे कैरी सारखे?
मला बघून दिवाळीतले कारटे आठवले.
मराठवाड्यात शन्नि (अनेकवचन
मराठवाड्यात शन्नि (अनेकवचन शन्न्या) ही एक फळभाजी मिळते. (वाळकांची लहान आवृत्ती) ती गाभुळी झाल्यावर आंबट लागते.
परवल वेगळे आहे. आंबट नसते, साधारण दोडक्यासारखे लागते, काकडीसारखे कच्चे खाता येत नाही.
बिहारी / बंगाली लोक भाजी सुद्धा करतात.
शन्न्या
शन्न्या
मला एकदा इकडे मिळाल्या होत्या.
वाळूक मिळत. नाही पण
भारी फोटो
भारी फोटो
रमद, चिकन चेट्टींनाड ची रेसिपी टाक ना
परवल पाक प्रपंच आ वडला.
परवल पाक प्रपंच आ वडला.
भारीच दिसतोय परवल का भाजा
भारीच दिसतोय परवल का भाजा वामन!
अश्विनी लेक केवढी आहे, अगदी
अश्विनी लेक केवढी आहे, अगदी प्रोफेशनल जेवण बनवल आहे.
धन्यवाद लोक्स!
धन्यवाद लोक्स!
@ऋ, चिकन असं उरतं होय?
रमद, चिकन चेट्टींनाड ची रेसिपी टाक ना
>>> मी ही रेसिपी वापरून केलं - https://www.youtube.com/watch?v=Rg-TUzA12LY
त्यात फक्त अॅडिशन इतकीच की थोडं दगडफूल आणि चमचाभर हरबरा डाळ खडा मसाला भाजताना अॅड केली.
वामन, आसाममध्ये पाहुणचारात
वामन, आसाममध्ये पाहुणचारात तळलेले पतोल हवेच ... मी तळून करते आता ह्या पध्दतीने करीन.
अश्विनी लेक प्रोफेशनल शेफ दिसतेय.
@अश्विनी,
@अश्विनी,
मेन्यूज अगदी तोंपासू दिसत आहेत.
@वामन राव,
परवर प्रचंड आवडते. पुढच्या वेळी हे नक्की करून बघेन. कातिल दिसतंय!
@ अश्विनी११
@ अश्विनी११
पनीर ६५ आणि spaghetti pasta !
हटके मेन्यू. 👍
@ वामन राव,
सुंदर प्लेटिंग. हेच पुढे बघारे बैगनच्या मसाल्यात टाकले तर बघारे परवल म्हणून मजा घेता येईल. 👍
ती stone finish प्लेट देखणी आहे, तिला ऋतुराजचा धागा दाखवा.
लेक कॉलेजयुवती आहे आणि आवड
लेक कॉलेजयुवती आहे आणि आवड म्हणून करते. विशेष म्हणजे माझ्यापेक्षा निगुतीने करते. Insta वर पोस्ट टाकायची असली की प्लेटिंग वगैरे ...
rmd डोसा एकदम झकास!
rmd डोसा एकदम झकास!

परवल कधी खाल्ला नाही पण वरील रेसिपी करून बघणार.
अश्विनी शिरा पुरी मस्त दिसतेय.
हा आमचा साधासा मालवणी बेत
ऊकड्या तांदुळाची पेज, फणसाची भाजी आणि कैरीचं झटपट आंबटगोड लोणचं.
rmd तुमच्या उत्तप्पा ला माझा
rmd तुमच्या उत्तप्पा ला माझा झब्बू

वाह! जुई, फारच भारी दिसतायत
वाह! जुई, फारच भारी दिसतायत उत्तप्पे!
किट्टु, साधा मेनू नाहीये हा, फारच जबरदस्त दिसतोय. मला असं जेवण कोणी आत्ता दुपारी आणून दिलं तर ... *स्वप्नरंजनात रमलेली बाहुली*
rmd, पुढच्या वेळेस तुला
rmd, पुढच्या वेळेस तुला नक्कीच बोलावेन. पण हा योग आता पुढच्याच वर्षी येईल कारण परवा गावातून येताना फणस आणलेला, अर्धा काल भाजी केली, अर्धा आज पिकला.

या गरे खायला.
जुई, मस्त दिसताहेत उत्तपे
जुई, मस्त दिसताहेत उत्तपे चटणी
मोकळ भाजणी
किट्टु गरे खायची इच्छा झाली. ह्यावर्षी खाल्लेच नाहीत.
rmd, मंजूताई धन्यवाद
rmd, मंजूताई धन्यवाद
rmd तुमचे प्लेटिंग मस्त असते..
"उधर पुनामे एक मिसल पाव करके
"उधर पुनामे एक मिसल पाव करके मिलता मियां. टेस्टी रैता कैते."
"अच्छा?"
"हां भोत फेमस है कैते."
"काय का बनाते वो?"
"मूगा जैसे दिखते ना, उस के स्प्राउटा की तर्री वाली सब्जी बनाते . उस मे फरसाना डालते और डबल रोटी के साथ खाते.
" मूगा जैसे कौन से स्प्राउटा रे?"
"क्या की, नै मालूम. लेकिन मूगा भी चल जाता. अपुन बना के बेचे तो इधर भी फेमस हो जाता. क्यों बोले तो, अपुन के एरिया मे फौजी लोगा ज्यादा. उनकी फॅमिली पुना बंबई के आयटमा पसंद करते खाने मे. अपुन थोडा अनारदाना डाले उसमे तो अच्छा भी दिखता और हेल्दी भी लगता लोगोकू"
"ऐसा! तो मूग के स्प्राउटां की शूरु कर देंगे मिया कलसेइच!"
आणि अशा तऱ्हेने वायुपुरीतील आमण्ड हाऊसने सुरू केला अतिसॉफीस्टिकेटेड मिसळ-पाव:
मुगाची मिसळ? अरेरे. जाऊ दे
मुगाची मिसळ? अरेरे. जाऊ दे तुम्ही हलीम नायतर बिर्याणीच खा.
मुगाची मिसळ आणि त्याच्यावर
मुगाची मिसळ आणि त्याच्यावर डाळिंब ... कशी वाटली? मुगाची उसळ फरसाण घालून खाल्ली आहे पण अशी मिसळ कशी लागेल त्याचा अंदाज नाही.
आत्ताच मूगाची मिसळ खाल्ली. अ
आत्ताच मूगाची मिसळ खाल्ली. अॅक्च्युअली - मूग-मटकी उसळ + खजुराची/चिंचेची चटणी + दही + फरसाण
मिसळ दिसतेय तर छान..
मिसळ दिसतेय तर छान..
मला तर घरात कुठलीही उसळ दिसली की मी त्यात फरसाण टाकून खातो. पाव नसेल तर चपाती सोबत खातो. कारण माझ्यासाठी फरसाण हा मिसळीतील महत्वाचा घटक.
बहुधा मूग उसळ सोबत सुद्धा खाल्ले असावी. मला कडधान्यातील फरक फार ओळखता येत नसल्याने खात्रीने सांगू शकत नाही.
पण नाहीच आवडली तर नुसते मूग गिळून गप बसावे.. हाकानाका..
ती मिसळ आहे असे तर चवीला
ती मिसळ आहे असे तर चवीला अजिबात वाटत नाही.
दुधाची तहान पाण्यात थोडसं ताक घालुन भागवायची असेल कुणाला तरच खा कधी इथे आलात तर.
त्यात मी पाव खात नसल्याने नुसती खाल्ली, मूगाची उसळ खाल्ल्याचे समाधान मिळाले. अपेक्षा अजिबातच ठेवल्या नसल्याने हे जमले.
(ते पाव पावभाजी खाणाऱ्यांनी संपवले.)
ऋ +११
ऋ +११
मी पण same करते
वरण भात तिखट चटणी कांदा फरसाण सुद्धा mix करून खाते
Pages