Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मूगाची उसळ खाल्ल्याचे समाधान
मूगाची उसळ खाल्ल्याचे समाधान मिळाले. >>

मुगाची उसळ आणि फरसाण तसे चांगले लागते. पण मटकी मध्ये जी मजा आहे ती अजून कशात नाही.
किल्ली येस
किल्ली येस
मलाही भातात फरसाण आवडते. पण शक्यतो गोडे वरण नाही. तिखट डाळ, उसळ, मिसळ, कांदा, फरसाण, फ्रीजमधील हाताला लागतील त्या भाज्या, झाल्यास अंडे वगैरे वगैरे जे काही बनेल ते चपातीसोबत खाऊन झाले की तेच कॉम्बो सरळ भातात किंवा भात त्याच्यात मिक्स करून हादडायचे.
अश्या रावडाचिवडा भातासोबत लोणच्याची फोड छान लागते आणि पेय म्हणून सुमधुर ताक घ्यावे.
या निमित्ताने माझी एक फार जुनी तुमचा अभिषेक आयडी मधून लिहिलेली रेसिपी कम लेख शेअर करतो.
पाककृती - रावडाचिवडा (पाककौशल्यात "ढ" असलेल्यांसाठी)
https://www.maayboli.com/node/48902
rmd तुमचे प्लेटिंग मस्त असते.
rmd तुमचे प्लेटिंग मस्त असते.. >>> _/\_
मंजूताई , मोकळ भाजणी चांगली दिसतेय.
मिसळीत मूग नाही आवडत मला. डाळिंब तर त्याहून नाही. पण तर्री वगैरे लूक मस्त दिसतोय.
मानव मिसळ स्टोरी हैदराबादी
मानव मिसळ स्टोरी हैदराबादी लहेज्यात आवडली
वरती डाळींब दाणे भ्रमनिरास करत आहेत.
मुगाच्या आणि मटकीची चवीत फरक आहेच.
तर्री देखील जमली नाही का त्यांना.
दिसताना तरी ( डाळींब दाणे वगळून ) छान दिसत आहे फोटो.
डाळ शिजवून पाणी घालून पातळ
डाळ शिजवून, घोटून, पाणी घालून पातळ करून (आणि इतर संस्कार करून) त्याचा पोळी, भाकरी किंवा भातासोबत खाण्यासाठीचा द्रव पदार्थ (काही वेळा घट्ट पदार्थ) याच्या कुठल्याही प्रकाराला आम्ही वरण म्हणतो.
पुणेरी भाषेत डाळ, वरण आणि आमटी यांत नेमका काय फरक आहे?
डाळ म्हणजे किराणा दुकानातून
डाळ म्हणजे किराणा दुकानातून आपण न शिजवलेली डाळ आणतो ती डाळ.
त्याला विशेषण लावले तर खाऊ होऊ शकतो उदा. वाटली डाळ.
वरण म्हणजे डाळीत हळद घालुन शिजवतो आणि मग मीठ घालतो ते, घुसळा अथवा घुसळु नका. त्याला फोडणी दिली की फोडणीचे वरण.
त्यात आंबट (कोकम/चिंचेचा कोळ) गोड (गूळ), टोमॅटो, गोडा मसाला घालुन जे करतात ती आमटी.
त्यात मग कटाची आमटी वगैरे वेगळी.
रावडाचिवडा भातासोबत लोणच्याची
रावडाचिवडा भातासोबत लोणच्याची फोड छान लागते >> मुलगा लहानपणी असा भात करून मागायचा (त्याच्या बाबाला ). त्या भाताचं नाव त्याने ठेवलं होतं, "मश्त मश्त भात".
धन्स् @मानव.
धन्स् @मानव.
मराठवाड्यातले आम्ही (वर सांगितल्याप्रमाणे) डाळींच्या कुठल्याही प्रकाराला वरण म्हणतो.
आमटी ही केवळ दोन प्रकारे होते, एक म्हणजे शेंगदाण्याच्या कुटाची विशेषतः उपवासाला करतात ती आमटी, दुसरी म्हणजे तुरीच्या शेंगांच्या सोल्यांची आमटी.
मलाही कोणत्याही वरण, आमटी
मलाही कोणत्याही वरण, आमटी भाताबरोबर फरसाण, चिवडा मिक्स करून खायला आवडते.
नावडती आमटी असेल तर मुद्दाम फरसाण घालून खातो.
(No subject)
नावडती न्याहरी = उपमा
नावडता, पण करता काय? व्हायरलने फणफणल्यावर असेच काहीतरी गिळगिळीत बेचव खावे (आणि त्याला पौष्टिक / good for the gut म्हणावे) असा नियमच आहे आमच्याकडे 😀
… तुरीच्या शेंगांच्या
… तुरीच्या शेंगांच्या सोल्यांची आमटी.…
बेहद्द पसंतीचा प्रकार ! झणझणीत.
सोले नसले की मटार, हिरवे हरभरे वगैरे वापरून करतो पण तुरीचे सोले ते सोले, त्याची चव युनीक. ती रिप्लिकेबल नाहीच.
मस्त गप्पा आणि फोटो.
मस्त गप्पा आणि फोटो.
मोकळं भाजणी ही छान दिसतेय.
Masht masht भात.
कडधान्यात माला मूगच आवडत नाहीत त्यामुळे त्याच्या कोणत्याही पदार्थाला पास.
रणबीर च्या रेसिपीने उपमा करून बघा एकदा. नावडता एकदम आवडता होऊन जाईल.
डाळ म्हणजे किराणा दुकानातून
डाळ म्हणजे किराणा दुकानातून आपण न शिजवलेली डाळ आणतो ती डाळ.
>>>>
पण डाळभात हा तर प्रचलित शब्द आहे. चुकीचा नसावा.
आमच्याकडे प्रामुख्याने गोडे वरण, आंबटवरण, तिखट डाळ असे तीन प्रकार येतात.
गोडी डाळ, आंबट डाळ, तिखट वरण असे उलटे शब्द कधी वापरले नाहीत. त्यामुळे नुसते डाळ म्हटले तरी ती तिखट हे समजून जातो.
गोडे वरण - नैवेद्य आणि लहान मुले
आंबट वरण - प्रामुख्याने शाकाहार असेल तर
तिखट डाळ - मांसाहार असेल तर याला पर्याय नाही.
सध्या नागपूरला एका
सध्या नागपूरला एका स्नेह्यांकडे आलोय. त्यांनी सकाळी नागपूरचा विशेष चना तर्री पोहा केला. भरपेट खाऊन थोडं अंग टाकलं तर ठार झोप लागली. आता उठून हे फोटो टाकतोय.
वाह मस्त...
वाह मस्त...
मला आधी पटकन पिवळा फोडणीचा भात आणि उसळ वाटले.. फोटो दुपारी आल्यानेही असेल
पण डाळभात हा तर प्रचलित शब्द
पण डाळभात हा तर प्रचलित शब्द आहे. >>> पुणेरी भाषेत?
रणबीर च्या रेसिपीने उपमा ?
रणबीर च्या रेसिपीने उपमा ?
पुढच्या आजारपणात करू की 😀
एकदम आवडता होऊन जाईल.… याबद्दल नॉट शुअर
ओके पुणेरी भाषेची चर्चा चालू
ओके पुणेरी भाषेची चर्चा चालू होती याची कल्पना नव्हती
बाई दवे,
आज जागतिक पोहे दिवस आहे
सगळ्यांनी व्हाट्सअप वर स्टेटस लावा.. कळू दे सगळ्या जगाला...
>>>आज जागतिक पोहे दिवस आहे
>>>आज जागतिक पोहे दिवस आहे
अरेच्चा! हे माहीत नव्हते. फोटो टाकले हे चांगलेच केले म्हणायचं!
>>>सगळ्यांनी व्हाट्सअप वर स्टेटस लावा.. कळू दे सगळ्या जगाला...
लावलेत लावलेत; तीन भाषांत चार स्टेटस लावलेत!
आज जागतिक पोहे दिन आहे.
#LifeIsFunOnWorldPohaDay
https://www.internationaldays.co/event/world-poha-day/r/recIHAb0PZWBbQkcR
आम्ही दुकानातुन डाळ आणतो आणि
आम्ही दुकानातुन डाळ आणतो आणि त्याची डाळ करतो,
डाळभातातली डाळ. ह्याचा पुण्याशी काहीही संबंध नाही.
डाळ नुसती उकडुन घेतली आणि मॅश करुन त्यात हिंग हळद घातले तर ते वरण. फोडणी दिली तर फोडणीचे वरण होईल पण फोडणी देण्याइतपत वेळ्/उत्साह आहे तर डाळच करा की. वरण कशाला? फोडणीत कढीपत्ता मिरची पडली की
उकडलेल्या डाळीची डाळ होते, ती वरण राहात नाही.
कोकणात ओला नारळ वाटुन डाळीत घातल्याशिवाय बायांना चैन पडत नाही आणि पुरुषांना जेवल्यासारखे वा टत naahee.
इती डाळपुरान समाप्त.
आमरस घरच्या हापूस आंब्यांचा
आमरस घरच्या हापूस आंब्यांचा आहे. अल्पना ह्यांनी 'भंडारेके आलु' अशी रेसिपी लिहीली होती, त्याप्रमाणे केलेली बटाटा भाजी आणि पुर्या.
दर वर्षी आंबे व्यवस्थापनाची इतकी धांदल होते, की आमरस पुरी केली जात नाही. आज जरा वेळ हाताशी होता. त्यामुळे 'आली लहर केला कहर' तत्त्वावर आज मस्त बेत झाला.
पूर्वी पत्राखाली अक्षरास हसू नये, अशी टीप असायची. तसं मला फोटो पोस्ट करताना ' छायाचित्रणाला हसू नये' असं लिहावंसं वाटतं...
अरे काय छान लागतो उपमा. आणि
अरे काय छान लागतो उपमा. आणि चावावाच लागत नाही. कम्फर्ट फुड. गपागप गिळा. मस्त बसतो पोटात.
--------
>>>भाताचं नाव त्याने ठेवलं होतं, "मश्त मश्त भात".
की मशी मशी भात?
अनया, छायाचित्रणाबाबत एकट्या
अनया, छायाचित्रणाबाबत एकट्या नाही आहात, मी पण तुमच्या क्लबात.
पण असे साधे फोटो सुद्धा चांगले वाटतात.
मागच्या पानावरच सगळ पहायचं
मागच्या पानावरच सगळ पहायचं राहूनच गेल....
तिखटमिठाची पुरी आणि आंब्याचा शिरा मस्त आहे अश्विनी.
पनीर ६५ आणि spaghetti pasta पण मस्त दिसत आहे.
वामन राव, परवल का भाजा, एकदम टेम्प्टिंग दिसतंय.
एका यूपी कडच्या मित्राकडे खाल्ल्यासारख वाटतंय.
चारीमोरी शब्द पहिल्यांदा ऐकला.
मला ती प्लेट अतिशय आवडली आहे. तिला क्रोकरी धाग्यावर टाका
ऊकड्या तांदुळाची पेज, फणसाची भाजी आणि कैरीचं झटपट आंबटगोड लोणचं.... मस्त साधा मेनू.
मंजूताई, मोकळ भाजणी मस्त. प्लेट पण छान.
जुई उत्तपा छान
मानवदा
स्प्राउटा की तर्री वाली सब्जी तो दिखने में अच्छाच दिखता.
खाली उस्मे अनार दाना नक्को.
अनिंद्य, उपमा मस्त.
काळजी घ्या, सध्या साथ आहे व्हायरलची
वामन राव, तर्री पोहे जबरी.
ते नागपूरला जाऊनच खावे.
जागतिक पोहे दिनाच्या शुभेच्छा!
माझा सर्वात आवडता नाष्टा.
अनया, छान आहे ताट आणि फोटो सुद्धा.
आमरस घरच्या हापूस आंब्यांचा आहे.>>>> रंग सुरेख आहे.
आमरस… सिर्फ नाम काफी है…
आमरस… सिर्फ नाम काफी है…
परवल अजिबात आवडत नाही पण भाजा खाविशी वाटली.
मी आत्ता जागुच्या रेसिपीने कुरकुरीत सुके बोम्बिल केले. पोटेटो फिंगर्ससारखे नुसते खाणार आहे. फोटो देणे जरा कठिण जाते.
आमरस, तर्री पोहे, उप्पीटू
आमरस, तर्री पोहे, उप्पीटू सगळेच आवडते पदार्थ.
जागु तैंच्या रेसिपीने सुके बोंबील अहाहा.
पाऊस,संध्याकाळ, तळलेले बोंबील,हाती पुस्तक आणि बाजूला एक चषक.
वीकांत साजरा करायला अजून काय हवं ?
इच्छुकांसाठी हा दुवा
.
वाह.. बोंबील आणि तांदळाची
वाह.. बोंबील आणि तांदळाची भाकरी भारी कॉम्बिनेशन ..
आलू की पुरी आणि सब्जी छान दिसतेय. उलट फोटो साधा असल्याने ते आणखी टेम्पटिंग दिसतेय.
मुंबईला आम्ही मॉर्निंग वॉकहून परतताना एका चहाच्या हॉटेलमध्ये चहा आणि असेच पुरीभाजी, मिसळ, फाफडा वगैरे पदार्थ हाडदायचो त्याची आठवण झाली. तिकडचा लुक आलाय. स्टीलची प्लेट वगैरे साधीच पण आतला पदार्थ कमाल चवीचा
केन्ट आंबा + स्मोअकड सालमन &
केन्ट आंबा + स्मोअकड सालमन & मेयो सँडविच - आजचा नाश्ता. आंबा काळसर दिसतो पण अतिव गोड आहे आणि तसाच काळसर रेषावाला आहे.

.
हे आमचे पोहे
हे आमचे पोहे
>>>>>>>>>मी आत्ता जागुच्या
>>>>>>>>>मी आत्ता जागुच्या रेसिपीने कुरकुरीत सुके बोम्बिल केले. पोटेटो फिंगर्ससारखे नुसते खाणार आहे. फोटो देणे जरा कठिण जाते.
साधना पाटाखाली (पाटा-वरवंटा) दाबून ठेवलेले का? म्हणजे पाणी निघून जाउन कुरकुरीत होतात.
Pages