खाऊगल्ली - आजचा मेनू - (६)

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ Happy

क्रमवार पाककृती: 

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415

तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून एक माबो अकाउंट - उदा: अनिंद्य_फोटो…

हे सुद्धा केले. पण ३-४ दिवस “पेंडिग Approval / email or name not recognised असाच संदेश येतो आहे.

बघू.

वाट पाहातो

इथे भरपूर फोटो डकवायचे असतात, परंतु “खाजगी जागा” फोटो अपलोड मुळे संपली असे दिसत आहे. नवीन फोटो अपलोड करायला काय करावे लागेल ?>>>>
हे माझ्या बाबतीत लवकर घडणार आहे.

मी सध्या गूगल फोटोजवरूनच शेअर करते आहे लिंक देऊन. >>>> हे ट्राय करायचं आहे.

वेमांना रिक्वेस्ट करून बघा….

हे सुद्धा केले.

सर्वांना थँक्यू. हे जमले तर मग तुम्हां सर्वांचा फोटोछळ करणार 😀

सब्ज़ बिरयानी. साथ में बुरहानी रायता और मिर्ची का सालन.

व्हेज मागितल्याने तो हैदराबादकर शेफ़ कष्टी झाला पण मला ठोसा न मारता दिली करून बापड्याने 😀

सर्व सल्लादात्यांचे विशेषत: सुनील यांचे खूप आभार.

आता गुगल ड्राइव्हवरून जमेल असं वाटतयं फोटो शेयर करायला. 👍

हा ट्रायल फोटो.

शेफ कशाला.. माझाही मूड ऑफ केला ही व्हेज आहे सांगून.. अन्यथा नजरेने गिळलीच होती अर्धीअधिक Happy

@ बिरियानी, सर्वांना थँक्यू.

Culinary Delights @ Friend’s Place :
मेन्यू = पाणी पुरी, बदाम हलवा, केक आणि मँगो शेक. सर्व मैत्रिणीने घरी स्वत: केले.

माझे तर “दिल गार्डन गार्डन हो गया” असे झाले. 😍

मँगो शेकचा फोटो कैरी-आंब्याच्या धाग्यावर टाकलाय.

आज बरेच दिवसांनी इथे हजेरी लावतेय.
मुलाने केलेले साबुदाणे वडे, फोटो मी काढलाय.
साबुदाणा वडे हा खूप रिस्की प्रकार आहे. कधी कधी फुटतात कढईत घातले की . आणि तेल उडतं खूप अंगावर. पण आज तसं काही झालं नाही. तरी पण त्याने तोंडावर एक स्टीलची मोठी प्लेट धरली होती आणि तिच्या खालून हळुच डोकावून बघत बघत तळत होता. तो फोटो काढायला हवा होता असं आत्ता वाटतंय. Happy

20250516_203717.jpg

छान झालेत वडे

मी सुद्धा कॅन्टीन मध्ये साबुदाणा वडा आधी कसा झाला आहे ते बघतो, किंवा एखादा खाऊन बघतो... मग जास्त ऑर्डर करतो. कधी कच्चे कधी चिवट कधी करपलेले अशा व्हरायटी असतात. पण जमलेले असतात तेव्हा भारी लागतात. बाहेरचे क्रिस्पी आवरण आत लुसलुशीत या कॉम्बिनेशनमुळे खिचडी पेक्षा जास्त आवडतात.

तोंडासमोर स्टील प्लेट धरलेला फोटो बाकी काढायला हवा होता.. हेल्मेट घालून कांदा कापल्यासारखा आला असता Happy

मुलाने केलेले साबुदाणे वडे >>> फारच छान झालेले दिसत आहेत. लगेच प्लेट उचलून घ्यावीशी वाटली.

तोंडावर एक स्टीलची मोठी प्लेट धरली होती आणि तिच्या खालून हळुच डोकावून बघत बघत तळत होता >>> Lol असं माझ्याकडे एक गोल हॅडलवालं झाकण आहे. त्याला मी ढाल म्हणते. कढीपत्ता फोडणीत टाकला आणि उडायला लागला की मी ही ते कढई आणि माझ्यामधे धरते. टोटल समरप्रसंग Lol

मस्त मस्त.
बिर्याणी, पाणी पुरी, बदाम हलवा, केक ...भारीच आलेत फोटो
साबु वडा मस्त दिसतोय एकदम.
तोंडावर एक स्टीलची मोठी प्लेट धरली होती आणि तिच्या खालून हळुच डोकावून बघत बघत तळत होता. तो फोटो काढायला हवा होता >>>>> खरंच काढायला हवा होता.

साबुदाणे वडे आवडले, सांगते मुलाला.
आज वीक एंड त्यात मे महिना म्हणजे स्पेशल चटपटीत म्हणून पाणी पुरी ! मस्त दिसतायत दोन्ही. छोट्या शेफ च विशेष कौतुक.

तरी पण त्याने तोंडावर एक स्टीलची मोठी प्लेट धरली होती आणि तिच्या खालून हळुच डोकावून बघत बघत तळत होता>>>>>>माझा मुलगा कोरोनामध्ये मिळालेले फेस शील्ड लावून जेवण बनवायचा.

विकेंड शॉपिंग..
ही सगळी एका पोराची आहे. आणि फोटो काढायला त्यानेच सांगितला कारण तिथे नसलेल्या बहिणीला जळवायला आणि चिडवायला की त्याने किती शॉपिंग केली Proud
फोटो छान यायला टॉवेल ठेवायची आयडिया सुद्धा त्याचीच Happy

IMG-20250419-WA0001.jpg

Pages