Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
वजन वाढले, रक्तात साखर वाढली की गुलाबजाम पुढ्यात आलेच म्हणून समजा. 😀
धन्यवाद वामन राव. छान आहे
धन्यवाद वामन राव. छान आहे रेसिपी. कल्यापाक हा नवीन शब्द कळला.
गुलाबजाम म्हणजे डोळ्यांत बदाम
गुलाबजाम म्हणजे डोळ्यांत बदाम
आज rmd ने केलेला स्पेशल मश्रुम राईस!
मस्त धनि आणि प्लेटिंग छान
मस्त धनि आणि प्लेटिंग छान करतोस.
अन्नपूर्णाकृपेने आमच्या घरी
अन्नपूर्णाकृपेने आमच्या घरी अन्न सहसा वाया जात नाही.
पोळ्या उरल्या तर त्याचा कुस्करा हा पहिला पर्याय. माझ्या घरी इतर सर्वांना आवडतो, मला फारसा आवडत नाही.
नाहीतर उरलेल्या पोळ्या उन्हात कडक वाळवायच्या. आणि त्याचे तुकडे करायचे. (शेतातल्या भाषेत कुटके करायचे!) हा प्रकार मला अतिशय आवडतो. तुकडे अत्यंत चविष्ट लागतात.
ओबडधोबड कापलेले कांदे, मिरच्या, टोमॅटो, कल्यापाक वगैरेंची फोडणी करुन तिखट, मीठ घालून, त्यात गरम पाणी घालून, पाणी उकळायला लागल्यावर त्यात कडक वाळलेल्या पोळ्यांचे तुकडे स्वच्छ धुवून घाला. दोन मिनिटांनी कोथींबीर घालून गरमगरम, जिभेला चटके देत खाऊन टाका.
मज्जानु लाइफ!
काल केलेले तुकडे -
वरील फोटोत तुकडे करून थोडा वेळ झाला होता म्हणून तुकडे आहाळलेले दिसत आहेत. तुकडे वेगळे आणि पाणी वेगळे असे थोडेसे मॅगीसारखे सूपी दिसायला हवेत. हवंतर चमचाभर बेसन घालू शकता.
वाळलेल्या पोळ्या १
वाळलेल्या पोळ्या २
पोळ्या नरम असतानाच एक चौरस इंच आकाराचे कात्रीने कापलेले आणि नंतर वाळविलेले तुकडे

अजून एक फोटो
@धनि
@धनि
मश्रूम भाताची वाढणी व पदार्थांची रंगसंगती सुंदर आहे. चविष्ट झाला असणारच!
मानव +1
मानव +1
रोजच्या जेवणाचे प्लेटिंग किती सुरेख करता तुम्ही .. मस्त
वामनरावांची dish नवीनच ऐकते आहे..झकास फोटो..
धन्यवाद सर्वांना पण आज शेफ मी
धन्यवाद सर्वांना पण आज शेफ मी नसून rmd आहे
गुलाबजाम तोंपासु , कसले गोल
गुलाबजाम तोंपासु , कसले गोल गरगरीत आहेत . मस्तच. ,शिळ्या चपातीचा काला पण मस्तच . मी एका कामाच्या काकूंन कडून ऐकले होते त्या त्यांच्या मुलांना अशाच भाकरी/ चपात्या सुकवून पाठवायच्या. त्यांचा मुलगा जिथे कामाला होता तिथंल मुख्य अन्न भात होते आणि मुलाला भाकरी /चपाती शिवाय अंग मेहनतीची काम जमत नसे मग त्या त्याला अशाच १५ दिवसांसाठी सुकवून पाठवायच्या चपात्या .
>>>>गुलाबजाम तोंपासु , कसले
>>>>गुलाबजाम तोंपासु , कसले गोल गरगरीत आहेत . मस्तच.
+१
>>>>मुलाला भाकरी /चपाती शिवाय अंग मेहनतीची काम जमत नसे मग त्या त्याला अशाच १५ दिवसांसाठी सुकवून पाठवायच्या चपात्या .
मस्त आयडिया आहे.
नाहीतर उरलेल्या पोळ्या उन्हात
नाहीतर उरलेल्या पोळ्या उन्हात कडक वाळवायच्या. आणि त्याचे तुकडे करायचे.
>>>
आमच्याकडे रात्रीच्या चपात्या मी तव्यावर कडक करून खातो. मुलांनाही आवडतात.
पावभाजी स्मॅश करायचे ते हत्यार असते ते वापरतो जेणेकरून सगळीकडे छान दाबल्या जाऊन फटाफट होतात. छान कडक होत जळत नाहीत. हलकेसे तूप वगैरे लाऊन खाकऱ्यापेक्षा जास्त आवडतात त्या मला.
त्यालाच गुजराथी लोक खाकरा
त्यालाच गुजराथी लोक खाकरा म्हणतात.
हा पण ते बनवायची पद्धत
हा पण ते बनवायची पद्धत थोडीफार वेगळी असेल ना. चवीत फरक पडत असेलच. मला खाकरा मूड असेल तरच आवडतो. विविध फ्लेवर असून सुद्धा. पण हे मात्र माझी शिळी चपाती माझी जबाबदारी म्हणून सलग चार पाच दिवस सुद्धा आवडीने खातो. कंटाळा येत नाही.
किंबहुना मागे एकदा घरचे सगळे परगावी गेलेले आणि मी एकटाच होतो आठवडाभर तेव्हा रात्री स्वयंपाकाच्या बाई यायच्या त्यांना आठवडाभर रोज मुद्दाम एक्स्ट्रा चपात्या करायला सांगायचो जे दुसऱ्या दिवशी सकाळी दुपारी कडक करून खाता याव्यात.
त्यांनीच मला दाबून कशा पटापट बनवायच्या हे शिकवले होते. अन्यथा आधी मी थोडेफार जाळायचो.
नाही ऋन्मेष, तोच खाकरा,
नाही ऋन्मेष, तोच खाकरा, तव्यावरती दाबून कडक बनवलेली पोळी म्हणजे खाकरा. मग कधी थेपल्याचा बनवा कधी कशाचा.
अच्छा.. मग मी घरात बनवतो
अच्छा.. मग मी घरात बनवतो त्यामुळे फिनिशिंग मध्ये फरक वाटत असेल...
मी मेथी किंवा पालक पराठ्याचे बनवून पाहिले.. पण त्यात मजा नाही आली. किंबहुना जरा कडवट झाले.
ओके.
ओके.
गुजा,
गुजा,
मशरुम राइस मस्तच ( रेसिपी देणे)
वामनरावानी सागितलेय तसे मारवाडी लोक पण पोळ्ञा कडक वाळवुन पापडासारख साठवण करुन ठेवतात...एन वेळेस तळून त्यावर चाटमसाला, तिखट मिठ भुरभुरवुन किवा पिठीसाखर घालुन खायच.
मश्रूम राईस रेसिपी अगदीच
मश्रूम राईस रेसिपी अगदीच सोप्पी. तेलावर खडा मसाला जरासा परतून घ्यायचा, त्यावर उभा चिरलेला कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा, कांदा ब्राऊन झाल्यावर त्यावर कापलेले मश्रूम घालायचे, त्यावर मीठ, थोडासा एव्हरेस्ट शाही बिर्याणी मसाला आणि एव्हरेस्ट गरम मसाला घालायचा, सगळं परतून झाकण ठेवायचे म्हणजे मश्रूमला पाणी सुटतं, त्यानंतर त्यात धुऊन निथळलेला बासमती घालायचा आणि पुन्हा परतून घ्यायचं, पाणी घालायचं, यानंतर मीठ आणि मसाले चवीनुसार अॅडजस्ट करायचे, आवडत असल्यास लाल तिखट घालायचं, चमचाभर तूप घालायचं आणि झाकण ठेवून मंद आचेवर हा मश्रूम राईस शिजवून घ्यायचा.
मी सगळं अंदाजाने घालते. तरी साधारण एक वाटी तांदुळाला मश्रूमचं एक पाकीट (मी ट्रेडर जोसच्या क्रेमिनी मश्रूम्स वापरते), दीड मिडिअम कांदे, १ टीस्पून गरम मसाला, दीड टीस्पून बिर्याणी मसाला इतकं पुरतं. खडा मसाला - २-३ मिरे, दालचिनीचा छोटुसा तुकडा, १ तमालपत्र, थोडी जावित्री आणि एक बडी इलायची - ही खूप मोठी असेल तर अर्धी घालते मी. तांदूळ जरासे आधी धुवून पाणी घालून भिजत ठेवले तर भात मोकळा होईल. पाणी तांदुळाच्या दुप्पट + अर्धी वाटी.
मशरूम ऐवजी आपलं ते हे घातलं
मशरूम ऐवजी आपलं ते हे घातलं तर चालेल का?
.
पनीर
.
छान पाकृ
किल्ले, तूच करून पहा आणि
उरलेल्या चपातीची फोडणीची पोळी
उरलेल्या चपातीची फोडणीची पोळी हा माझाही आवडीचा प्रकार
फोडणीत अगोदर शेंगदाणे काजू तळून घ्यायचे
त्यातच कांदा टोमॅटो मटार कोथिंबीर घालून पाणी टाकायचे
उकळी आली की चपाती चे तुकडे टाकून, गॅस बंद करुन झाकण ठेवून दोन मिनिटे चपाती मुरू द्यावी रश्श्यात
सावित्रीच्या लेकी तुमची
सावित्रीच्या लेकी तुमची पद्धतही मस्त दिसतेय. मला काजू नाही आवडत पण फोडणीत, तळलेले शेंगदाणे मात्र खूप आवडतात.
वामन राव, वाळवायला मुद्दाम
वामन राव, वाळवायला मुद्दाम जास्तीच्या पोळ्या केल्यात का? त्यांना इतके श्रम आणि वेळ दिलेत, म्हणजे तुमच्या खास आवडीचा पदार्थ दिसतो आहे.
मी उरलेल्या चपात्यांचे हाताने होतील तेवढे तुकडे करून मिक्सरमध्ये भुर्र करून मग फोडणीवर परततो. काजू दाणे इ. वगळून चिवड्याची फोडणी. चटपटील हवं असेल आणि घरात असेल तर केचप किंवा चिंचगुळाची चटणी.
या प्रकाराल इंदूरमध्ये शिवाजी चिवडा म्हणत. आता असं काही म्हणायला बंदी आली असावी.
>>>>>मी उरलेल्या चपात्यांचे
>>>>>मी उरलेल्या चपात्यांचे हाताने होतील तेवढे तुकडे करून मिक्सरमध्ये भुर्र करून मग फोडणीवर परततो.
रोचक आहे.
>>>>या प्रकाराल इंदूरमध्ये शिवाजी चिवडा म्हणत. आता असं काही म्हणायला बंदी आली असावी.
कै च्या कै नाव देतात.
रमड थॅन्क्स फॉर द रेसिपी, नोट
रमड थॅन्क्स फॉर द रेसिपी, नोट करुन ठेवलीये..नक्की करुन बघेल..
मशरुम राइसच प्लेटिग छान केलयस...एकदम अॅपेटायझिन्ग.
मश्रुम राईस सुंदर दिसतो आहे
मश्रुम राईस सुंदर दिसतो आहे खरा.
वामन राव, वाळवायला मुद्दाम
वामन राव, वाळवायला मुद्दाम जास्तीच्या पोळ्या केल्यात का?
मुद्दामहून जास्त नाही करत आम्ही. एक-दोन पोळ्या उरतात अधूनमधून. मग त्या वाळवितो. अश्या सात-आठ पोळ्या कडक वाळवून झाल्या की मग (वरच्या रेसिपिप्रमाणे) तुकडे करतो. दोन-तीन आठवड्याला तरी एकदा तुकडे ही पाकृ होतेच. मागच्या महिन्यात एकदा चार पोळ्या उरल्या होत्या. त्या पोळ्या नरम असतानाच त्यांचे गंमत म्हणून कात्रीने कापून चौरस तुकडे केले नि मग वाळविले.
त्यांना इतके श्रम आणि वेळ दिलेत, म्हणजे तुमच्या खास आवडीचा पदार्थ दिसतो आहे.
पोळ्यांचे तुकडे माझ्या आवडीचे आहेतच!
...गुलाबजाम पुढ्यात आलेच
...गुलाबजाम पुढ्यात आलेच म्हणून समजा.
गुलाबजाम मलाही आवडतात, पण मराठी पद्धतीचे. इथे तेलंगणात पाक अगदीच पातळ असतो तो थोडासा पाणचट / अगोड असा लागतो.
Mint mojito by Pari
Mint mojito by Pari
छान.
छान.
Pages