Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
थँक्यू सर्वांना. तळलेले,
थँक्यू सर्वांना.
तळलेले, fattening सर्व छानच असते 😉
Mr, Mrs and Junior साबुदाणा वडे…
Intentional होते ते, तुम्ही नोटिस केले. So nice.
मी मागे एक वाक्य वाचलं होतं.
मी मागे एक वाक्य वाचलं होतं.
Everything you like is either too costly, fattening, not your size or married to someone else!!
… or married to someone else!
… or married to someone else … 😂
मी ऐकलेल्या वर्जन मध्ये
मी ऐकलेल्या वर्जन मध्ये fattening जागी illegal होते. बाकी सेम
इथे ऑलरेडी खूप फोटो शेयर करत
इथे ऑलरेडी खूप फोटो शेयर करत असल्याचा गिल्ट आलाय, त्यात फोटोसाठवणीची जागा संपत आली आहे. तरीही….
पावसाचा सीझन येऊ घातल्याची वर्दी … आणि जिभा निळ्या जांभळ्या
# जांभुळ पिकल्या झाडाखाली
# Jamun, the Harbinger of Monsoon
# Seasonal Delights
आजच मी ऍमेझॉन फ्रेशवर व्हाईट
आजच मी ऍमेझॉन फ्रेशवर व्हाईट जामुन पाहिले. जांभळा रंगच नसेल तर ती जामुन कशी?
आजचा हा अर्ली ब्रंच!
आजचा हा अर्ली ब्रंच!
फ्रिजमध्ये टोमॅटो, पनीर, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, अद्रक आणि फ्रिजबाहेर कांदा व लसूण इतकंच साहित्य होतं. मग मी व ती असं दोघांनी मिळून बगारा खाना, पनीर भुर्जी, सोलापुरी बाजार आमटी असा बेत केला.
सगळंच fusion food झालं आहे पण चविष्ट झालं आहे!
ती सर्व करून कामाला बाहेर पडली; मी खाण्याआधी फोटो काढून आणि खाऊन आता हे लिहीत आहे.
अरे वाह.. मस्त दिसतेय हे..
अरे वाह.. मस्त दिसतेय हे.. रंगसंगती बघून दिवाळीचा फराळ वाटला आधी पटकन.
बरोबर माझेमन, जांभळा रंग आणि
बरोबर माझेमन, जांभळा रंग आणि ती खाल्ल्यावर जिभा निळ्या जांभळ्या होणे Mandatory आहे. नाहीतर काय मजा ?
नावच “जांभूळ” आहे ना
वामनराव, ब्रंच झकास !
वामनराव,
ब्रंच झकास !
कॅरॅमल कस्टर्ड ... Demould
चुकून दोनदा गेला प्रतिसाद .. इथे प्रतिसाद कसा उडवायचा
(No subject)
कॅरॅमल कस्टर्ड ... Demould करताना नीट नाही जमले .. इथे इतके सुंदर पदार्थांचे फोटो पाहून कॉम्प्लेस येतो खरा ... सगळयांचे पदार्थ खरंच खूप छान असतात
ममो तुमच्या नारळाच्या वड्या
ममो तुमच्या नारळाच्या वड्या fb वर आल्यात,पण अशक्य ही शक्य या id ने,तुम्हीच का त्या
.. फोटो पाहून कॉम्प्लेस येतो
.. फोटो पाहून कॉम्प्लेस येतो खरा ...
बिन्दास शेयरायचे हो. तरी अस्मिता आणि म्हाळसा व त्याच्यासारखे भारी कॉम्प्लेक्स देणारे लोकं फारसे एक्टिव्ह नाही आहेत धाग्यावर सध्या 😀
… आणि जिभा निळ्या जांभळ्या>>>
… आणि जिभा निळ्या जांभळ्या>>>>> मला तर तुमच्या हाताला, त्या जांभळाच्या देठाच्या टोकाला सुद्धा जांभळी झाक दिसते आहे.
)
..आणि ती मागची झाडे मस्त आहेत. (आम्ही झूम करून बघणारच
वामन राव,
काय अप्रतिम फोटो टाकता तुम्ही. ते ताट नुसत बघत बसावं वाटतंय.
प्लेट आवडली. तिला क्रोकरी धागा दाखवा.
San deep
कॅरॅमल कस्टर्ड आवडलं.
प्लेट, बॅकग्राऊंड पण आवडल.
ममो तुमच्या नारळाच्या वड्या
ममो तुमच्या नारळाच्या वड्या fb वर आल्यात,पण अशक्य ही शक्य या id ने,तुम्हीच का त्या >>आदू, ती मी नाही. त्यांनी अश्याच त्यांच्या म्हणून लिहिल्या आहेत. दुसऱ्या एकीने ही तिच्या नावावर खपवल्या आहेत. मी दोन्ही ठिकाणी लिहिलं आहे. पण ते तेवढंच... मी ह्याचा जास्त त्रास करून घेत नाही कारण आपण तणतणून काही उपयोग नसतो. मनस्तापाशिवाय हाती काही लागत नाही. असो.
सोलापुरी बाजार आमटी म्हणजे
सोलापुरी बाजार आमटी म्हणजे काय? कशी करतात?
आदू, ती मी नाही. त्यांनी
आदू, ती मी नाही. त्यांनी अश्याच त्यांच्या म्हणून लिहिल्या आहेत.>>>मी खरं तर तुमच्या डब्यावरून ओळखलं,रेसिपी पूर्ण तेव्हाही वाचली नव्हती( मला जन्मात जमणार नाही म्हणून)
जाऊदे डब्बा मस्त फेमस झाला तुमचा
ऋ कडची कोळंबी, वामन रावांकडचं
ऋ कडची कोळंबी, वामन रावांकडचं ताट, आणि संदीप कडचं कॅरॅमल कस्टर्ड... जेवण झालंय तरी भूक लागली पुन्हा.
जांभळं पाहून डोळ्यात जांभळे बदाम आले, अनिंद्य
सॅन दीप मस्त दिसतय कॅरॅमल
सॅन दीप मस्त दिसतय कॅरॅमल कस्टर्ड.
ममो तुमच्या नारळाच्या वड्या
ममो तुमच्या नारळाच्या वड्या fb वर आल्यात,पण अशक्य ही शक्य या id ने,>>> तो आयडी पण महान आहे, तिथे ममो नी रेसीपी हवी असेल तर हेडर मधे अपडेट करते हे सुद्धा कॉपी केलय..
नक्कल करायला ही अक्कल लागते.
>>> सोलापुरी बाजार आमटी
>>> सोलापुरी बाजार आमटी म्हणजे काय? कशी करतात?
मीही अशातच शिकलोय. तीन-चार वेळा केलीय. तेल जास्त हवे, तिखट करायला हवी, गरम खायला हवी, सौम्य आवृत्ती फार चांगली लागली नव्हती.
घ्या:
चार-पाच डाळी - मटकी, तूर, मसूर, हरभरा, मुग प्रत्येकी २ चमचे
काळे व लाल तिखट, गरम मसाला, धणे-जिरे पावडर प्रत्येकी २ चमचे
वाळलेले खोबरे, कल्यापाक, कोथिंबीर, कांदे २, टोमॅटो २, लसूण १०-१२ पाकळ्या, अद्रक, हिंग, हळद, मीठ, मोहरी, जिरे,
तेल १ वाटी
करा:
सर्व डाळी हिंग-हळद घालून शिजवून घ्या. मुलायम घडसून ठेवा. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, अद्रक, लसूण, खोबऱ्याची पेस्ट करा. पातेल्यात फोडणी करून त्यात पेस्ट परता. सर्व मसाले घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्या. गरम पाणी, मीठ व वरण घालून पाच-सात मिनिटे उकळू द्या.
कडक भाकरीबरोबर चांगली लागते. सोबत सोलापुरी भाजलेले शेंगदाणे असेल तर चांगले. आम्ही भाताबरोबरही खातो. (खरंतर आम्ही भाताबरोबर काहीही खातो!)
पुन्हा केल्यावर अजून फोटो टाकीन.
#SubjectFocusPhotography बघत
अप्रतीम #SubjectFocusPhotography बघत #जांभुळ_पिकल्या_झाडाखाली मी उभा आहे जांभळं झेलायला! ♡
वाळलेले खोबरे, कल्यापाक>>
वाळलेले खोबरे, कल्यापाक>> कल्यापाक म्हणजे काय?
जाऊदे डब्बा मस्त फेमस झाला
जाऊदे डब्बा मस्त फेमस झाला तुमचा >> हो ना.. डब्बा फेमस झाला. फोटो काढू या असं मनात ही नव्हतं आलं. कारण मी बरेच वेळा करते ह्या वड्या , प्रत्येक वेळी कुठे काढायचा फोटो. म्हणून त्या नेहमीच्या स्टीलच्या डब्यात भरल्या ही. पण भरल्यावर ह्या वेळच्या वड्यांचा रंग छान आलाय आणि त्यावरचे पिस्त्याचे काप उठून दिसतायत असं वाटलं म्हणून तसाच फोटो काढला आणि आता तोच फिरतोय सगळीकडे. आधी माहित असतं तर चांगली बशी तरी घेतली असती. असो. त्या डब्याच नशीब थोर म्हणायचं.
तो आयडी पण महान आहे, तिथे ममो नी रेसीपी हवी असेल तर हेडर मधे अपडेट करते हे सुद्धा कॉपी केलय.. हे आयडी असेच महान असतात, आणि आपण सांगितलं कॉपी केलीय माझी रेसिपी तरी काही वाटत नाही, ढिम्म हलत नाहीत, क्रेडिट वगैरे काही देत नाहीत.
कल्यापाक = कढीपत्ता, कढीलिंब.
कल्यापाक = कढीपत्ता, कढीलिंब.
त्या डब्याच नशीब थोर म्हणायचं
त्या डब्याच नशीब थोर म्हणायचं >>> हो ना बिचारा, पडद्यामागचा कलाकार. वर्षानुवर्षे तुमच्या वड्या जास्तीत जास्त काळ कश्या टिकतील हे त्यानेच बघितल्या आणि पाहुण्यांसमोर ती नटवी बशीच मिरवत असेल.. जे झाले ते चांगलेच झाले.
ममो तुमच्या नारळाच्या वड्या
ममो तुमच्या नारळाच्या वड्या fb वर आल्यात,पण अशक्य >>> याच पेजवर तहान भूक लाडू पोस्ट आहे त्यात पण सेम डबा आहे.
मी ह्याचा जास्त त्रास करून
….मी ह्याचा जास्त त्रास करून घेत नाही कारण आपण तणतणून काही उपयोग नसतो. मनस्तापाशिवाय हाती काही लागत नाही….
+१
हे बेस्ट. Imitation is the best form of flattery असे समजायचे
साबु वडे, शेवपुरी माझ्या रोज
साबु वडे, शेवपुरी माझ्या रोज वाल्या सिंपल जेवणाला चिडवत आहेत


साबू वडे अ ती प्रिय असून पण करत नाही.. पण कुणाकडे केलेले असले तर मात्र तुटून पडण्यात येते.. गणपती च्या दिवसात एखादी कडे तरि साबू वडा असतोच
Pages