Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अगं ओले नाही सुके बोम्बिल
अगं ओले नाही सुके बोम्बिल केले.
सुके बोम्बिल केले.>>
सुके बोम्बिल केले.>> आमच्याकडे त्याला काड्या म्हणतात.
(No subject)
@ वामनराव,
तुम्हाला हा झब्बू.
जागतिक पोहे दिवस २४ तास उशिरा साजरा केला. तर्री आवडत नाही पोह्यांवर, सो पास.
अर्थातच खोबरे- डाळिंबाचे दाणे वगैरे असलेली प्लेट माझी नाही हे इथले चाणाक्ष लोक लागलीच ओळखतील.
अनिंद्य काय मस्त सजावट आहे हो
अनिंद्य काय मस्त सजावट आहे हो.
वामन राव आणि अनिंद्य,
वामन राव आणि अनिंद्य,

दोघांना झब्बू.
आमचाही पोहे दिवस २४ तास उशिरा.
हायब्रीड कोथिंबिरीबद्दल माफी. मला ती आवडत नाही पण कोथिंबीर हवीच.
पोहे फार आवडतात.
पोहे फार आवडतात. आज करेन व झब्बू देइन. पण मी वरती फरसाण भुरभुरवणार आहे.
पण कोथिंबीर हवीच +786
पण कोथिंबीर हवीच +786
लहानपणी आईच्या राज्यात आमच्याकडे पोहे म्हटले की एका ताटात खोबरे, कोंथिबीर, लिंबाच्या फोडी ठेवले असायच्या. आपल्या हिशोबाने घ्यायचे प्रत्येकाने. पण या तिन्हीशिवाय पोहे नाहीत हे मनावर घट्ट कोरले गेले होते तेव्हापासून..
कोथिंबीर हवीच. + ११११११
कोथिंबीर हवीच.
+ ११११११
सोबतीला तिखट लवंगी शेव असल्यास सोन्याला सुवास.
सुके बोंबिल पाहून भूक चाळवली.
सुके बोंबिल पाहून भूक चाळवली. आणलेच पाहिजेत.
सुके बोम्बिल केले.>>
सुके बोम्बिल केले.>> आमच्याकडे त्याला काड्या म्हणतात.
>>>
हो. आकाराने काड्याच
सुके बोंबील आमच्याकडे पापडासारखे तोंडी लावायचा पदार्थ आहे.
म्हणजे भाजी फारशी आवडीची नसली की लहान मुलांना जसे आपण म्हणतो पापड तळून देऊ का तसे आमच्याकडे बोंबील भाजून देऊ का असे म्हटले जाते.
लहानपणी आईवडील कामाला गेले आणि मी घरी एकटा असलो की चिमट्यात पकडून माझे मी भाजून घ्यायचो. सोबत आई ने ऑफिसला जायच्या आधी केलेला फोडणीचा भात.. मग बाकी कशाची गरज नाही.
पण सर्वात डेडली कॉम्बिनेशन म्हणजे बाहेर पाऊस पडत असताना गरमागरम पिठी भात आणि भाजलेले बोंबील.
पिठी अर्थात कुळीथ पिठाची.
आता हे लिहिताना लक्षात आले की माझ्याकडे आठवण म्हणून याचा एकही फोटो नाही. आता आईकडे गेले की काढायला हवा. आणि या आठवणीचा वेगळा लेख सुद्धा लिहायला हवा.
जागतिक पोहे दिवस माहीतच
जागतिक पोहे दिवस माहीतच नव्हता .पण खरा पोहे दिवस संडे

सोबतीला तिखट लवंगी शेव असल्यास सोन्याला सुवास.+1
लवंगी शेव नाहीये पण तिखट लसूण शेव आहे .
सकाळचे ५ वाजलेत. पोहे रेडी
सकाळचे ५ वाजलेत. पोहे+ लोणचे व कॉफी रेडी आहेत.

.
(No subject)
सिमरन कपचा रंग काय गोंडस आहे.
सिमरन कपचा रंग काय गोंडस आहे.
-------------
मानव त्या बिया कसल्या? तीळ?
चिया
चिया
ओह वॉव.
ओह वॉव.
क्या बात है.
क्या बात है.
आज पोहे दिवस झाला खरा 👍
थॅंक्यु सामो. पिस्ता ग्रीन
थॅंक्यु सामो. पिस्ता ग्रीन आवडता कलर आहे त्यामुळे माझ्याकडे बर्याच गोष्टी पिस्ताग्रीन कलरच्या आहेत अगदी घराच्या भिंतींचा आणि पडद्याचा कलर ही पिस्ता आहे. हा कप मलाही बघता क्षणी आवडला होता कलरमुळे .बाय द वे तुझा कपही सुंदर आहे गुलाबाचा.
(No subject)
काल पोहे डे साजरा केला
सगळ्याचे पोहे दिनाचे फोटो
सगळ्याचे पोहे दिनाचे फोटो मस्त !
वाह भारी रमड.. पोहे अगदी
वाह भारी रमड.. पोहे अगदी तोंडासमोर धरले आहेत असे वाटत आहे
पोहे अगदी तोंडासमोर धरले आहेत
पोहे अगदी तोंडासमोर धरले आहेत असे वाटत आहे >>>
खाऊन घे मग पटकन
हो.. ते नजरेने खाल्लेच!
हो.. ते नजरेने खाल्लेच!
काही पदार्थांची चव आपल्याला न खाता रंग रूप पोत बघूनच समजून जाते आणि खाल्यावर देखील ते अंदाज बरोबरच येतात. माझ्यासाठी पोहे हा त्यापैकी एक पदार्थ.
मागच्या आठवड्यात नागपूरला
मागच्या आठवड्यात नागपूरला गेलो होतो. मग शनिवारी तिथून नांदेडला गेलो.
सगळ्यात आधी बाफना रोडवर नांदेडची प्रसिद्ध खिचडी खाल्ली.
त्यानंतर मराठवाड्यातील एका तालुक्याच्या ठिकाणी एका लग्नाला जायचे होते. तिकडे जाताना एका ठिकाणी अजून एक प्लेट खिचडी खाल्ली.
लग्नाच्या गावी रविवारचा आठवडे बाजार असतो. बाजारात थोडी भटकंती केली.
बाजारातील हा चटकदार शेव चिवडा, जेनेरिक नाव "खारा".
चिवडा, दाळमोठ, मिच्चर, बुंदी, पापडी, शेव... अहाहा तोंपासू!
खिचडी looks so colourful !
खिचडी looks so colourful !
Ditto for the खारा plates.
खिचडी सोबत भजे नसतील तर फाउल
खिचडी सोबत भजे नसतील तर फाउल धरतात म्हणे
सर्व पदार्थ मस्त दिसत आहेत
नांदेडची, गावाकडची खादाडी
नांदेडची, गावाकडची खादाडी टेम्टिंग! नागपूरला काय खाल्ले?
बाफना रोडवर नांदेडची प्रसिद्ध
बाफना रोडवर नांदेडची प्रसिद्ध खिचडी >>> भारी दिसतेय
>>>खिचडी सोबत भजे नसतील तर
>>>खिचडी सोबत भजे नसतील तर फाउल धरतात म्हणे
भजे व्हायला थोडा वेळ होता तोपर्यंत खिचडीचे फोटो काढून घेतले, नंतर एकदा भजे पुढ्यात आल्यावर मग कसले फोटो, कोणती मायबोली!
तरीही नांदेडच्या खिचडी-भज्यांची इतरांना एकदा कल्पना यावी म्हणून, पूर्वी काढलेलेला एक फोटो -
>>> नांदेडची, गावाकडची खादाडी
>>> नांदेडची, गावाकडची खादाडी टेम्टिंग!
धन्स्!
>>> नागपूरला काय खाल्ले?
घरी आलूपोहा, चनापोहा खाल्ला, संत्रा बर्फी व किरकोळ पदार्थ खाल्ले; बाकी कामे भरपूर होती, खादाडीला बाहेर कुठे गेलो नाही.
Pages