Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ 
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या 
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बीट चा रस घालून केलेले
बीट चा रस घालून केलेले पाहिलेत कुठेतरी, फारच सुंदर फिका गुलाबी रंग आला होता, मला वाटतंय पांढऱ्या मैद्यात मिक्स केल्याने रंग फिका गुलाबी होत असेल. फिका गुलाबी आणि पांढरा असे फारच सुंदर दिसत होते.
लोणच्याची नाही नाही लोण्याची पोळी ही मंजूची सिग्नेचर डिश आहे. मस्तच दिसतात तिच्या ह्या पोळ्या.
सिमरन मस्त फराळ आणि गु जा ही.
कडबोळ्यांसाठी पास . मी कधी करत ही नाही आणि विकत ही आणत नाही.
.. करत ही नाही आणि विकत ही
.. करत ही नाही आणि विकत ही आणत नाही…
मनीमोहोर, द्या टाळी.
याहीपुढचे पाऊल म्हणून गेली काही वर्ष “दिवाळी फराळ” या प्रकाराला पूर्ण सुट्टी दिली आहे. म्हणजे घरी करत नाहीं आणि स्वत: बाजारातून आणत नाही.
वर्षभर घरी सहज होणारे - विकत मिळणारे तेच ते पदार्थ पुन्हा सणावारी करा-खायचा कंटाळा हे मुख्य कारण. नातेवाईक आणि मित्रमंडळींनी पाठवला तर तो जेमतेम संपतो.
सोमीवर इतरत्र / इथे फोटो-मेजवानी होते ती पुरेशी आहे
डिट्टो फॉर सो कॉल्ड “दिवाळीची सफाई”. घर एरवीही स्वच्छ ठेवत असल्याने सणाच्या दिवसात त्या कामात स्वत:ला जुंपून घेत नाही.
सिमरन चीरोटे रेसिपी माबो वर
सिमरन चीरोटे रेसिपी माबो वर आहे. मंजुटाई साधनाताई धन्यवाद. मी vegetable म्हणजेच bitacha रंगच वापरला आहे. करत गेलो की अंदाज येतों रंगाचा. त्याप्रमाणे शेड adjust करायची
अनिंद्यजी मी टाकलेले फुलांचे
अनिंद्यजी मी टाकलेले फुलांचे पिठीसाखर वर टाकलेले चिरोटे आहेत. तसेच लोडाचे पाका तले चिरोटे सुद्धा बनवतात. त्यांचा आकार लांब असतो
चिरोटे फार सुंदर आहेत.
चिरोटे फार सुंदर आहेत.
अनिंद्य, कडबू म्हणजे काय अपेक्षित आहे ?
आमच्याकडे कडबू म्हणजे गोड पुरण भरून तळलेली करंजी. ती दिवाळीला वेगळी अशी मी कुठे खाल्ली नाही म्हणून विचारले.
अनिंद्य, कडबू म्हणजे काय
अनिंद्य, कडबू म्हणजे काय अपेक्षित आहे ?
मला माहित नाही, म्हणून विचारले होते :
कडबू आणि कडबोळी हे एकाच पदार्थाचे नाव आहे का?
Looks like की तसे नाही.
कडबोळी आणि कडबू वेगळे पदार्थ
कडबोळी आणि कडबू वेगळे पदार्थ आहेत.
कडबू म्हणजे वर अश्विनी म्हणतात तसे गोड पुरण भरून तळलेली करंजी. शक्यतो श्रावणात काही जणांकडे करतात.
कडबोळी म्हणजे भाजणीच्या पिठाचा चकली सारखा पदार्थ. ह्यात त्या कडबोळ्यांना, पीठ हाताने वळून शेंगोळ्यासारखा आकार देतात किंवा चकलीसारखा आकार देतात. सोऱ्या वापरत नाही.
महाराष्ट्रात वेगवेगळ्या
महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पदार्थ होतात ज्यांची नावे वेगळी असली तरी पदार्थात साम्य असते.
कडबोळी ही काटे नसलेली चकलीसदृष्य तिखट गोष्ट कुठल्या भागात करतात माहित नाही पण कर्नाटक-आंध्र इत्यादी सीमाभागात जास्त असावी हा एक अंदाज. सावंतवाडीला विकत मिळते म्हणजे या भागातले लोक करत असावेत हा अंदाज. ही दिसायला मात्र काळसर असते.
कडबू हा गोड पदार्थ आहे, वर अश्विनीने लिहिलाय तसा. हा धारवाड, कारवार वगैरे भागातुन आपल्याकडे आला असणार. मी अजुन पाहिला नाहीय. एकदा पुरण उरले होते म्हणुन गव्हाचे पिठ नुसतेच भिजवुन पुरण भरुन मोदकाचा आकार देऊन तळले होते. पिठाला आधी मोहन वगैरे लाड केले असते तर चांगले खुसखुशित लागले असते. तळुन करायच्या पदार्थातल्या गव्हाच्या पिठाचे लाड करावेच लागतात. नाहितर ते रुसुन वातड होतात
मंजुताईच्या हातच्या सायीच्या पोळ्या मी खाल्ल्यात. खुपच सुंदर!!!!
आमच्या विदर्भात पुरणाचे मोदक
आमच्या विदर्भात पुरणाचे मोदक करतात गणपती ला..
कडबोळी करतात ना कोकणात,
कडबोळी करतात ना कोकणात, गोव्याला , पण तो मूळचा कोकणातला नसून कर्नाटकातला असे काहीतरी आजीच्या गोष्टींतून एकलेय.
पीठ वेगळे असते चकलीपेक्षा. मला ते खाताना उग्र चवीचा वाटतो. भरपूर मसाले असतात. प्रत्येकाची पद्धत वेगळी असु शकते. मला नाही आवडत.
त्यात गहु, ज्वारी, वगैरे असते आणि त्याचे पदार्थ जरा अॅसिडिकच वाटतात.
कर्नाटकातला कडबु कोकणातला नक्कीच नाही पण तो उकडून ज्यास्त करतात ( दक्षिणेतले कन्नडिगा). कर्नाटकातला तांदूळाच्या पीठीत बुडवून तळतात किंवा वाफवतात. काही जणं ( भागप्रमाणे) गव्हाच्या पीठात पारी करून वाफवतात.
गव्हाच्या पीठात पुरण भरून वाफवून छान लागतात कडबु. तुप घालून गरम गरम खायचे. नाहितर गव्हाचे चिकट गोळे वाटतात मला.
मग आंध्रा बाजूला गेल्यावर तळून वगैरे. पुरणाचे कडबु उडीदाच्या वाटलेल्या डाळीत बुडवून तळतात.
हे सर्व कन्नडिगा मैत्रीण व तेलुगु मित्राच्या कृपेने झालेले ज्ञान.
अनिंद्य, कडबू किंवा कडबोळी
अनिंद्य, कडबू किंवा कडबोळी केली की फोटो टाकते. म्हणजे फरक अजून कळेल.
So kind of you friends. माझी
So kind of you friends. माझी कडबू आणि कडबोळी यात गल्लत झाली. आता समजले. सर्वांना थँक्यू. I stand enlightened.
कडबोळी चाखली आहेत पण त्याला खूप वर्ष झाली.
dense textured बिनकाट्याची चकली असा काहीसा स्वाद असलेला पदार्थ म्हणून मला आठवतोय. तो तुम्हांसर्वांच्या वरील वर्णनाला match होतो आहे.
तरी कुणी केलेच तर फोटो दाखवा प्लीज. रेसिपीसकट दिल्यास सोने पे सुहागा.
कडबू मी कधी खाल्ले नाहीये; नुसते नावच ऐकले आहे. पण कडबू = पुरण भरलेली करंजी / मोदक असेल तर त्याचा तेलुगु चुलत-आते-मामेभाऊ पुर्नालु/ बुरेलु मी चाखलाय. Deep fried.
Thanks again.
अंड्याची भुर्जी आणि पालेभाजी
अंड्याची भुर्जी आणि पालेभाजी (माझी फेवरेट मेथी) with खोबरे लसूण चटणी आणि भाकरी..
डेडली कॉम्बिनेशन
अंड्याची बुर्जी आणि गरम
अंड्याची बुर्जी आणि गरम तांदूळाची रोटी( पाण्यावर थापलेली पद्धत) मस्त !!
झंपी धन्यवाद आणि हो,
झंपी धन्यवाद आणि हो,
मी कॉलेजमध्ये असल्यापासून लग्नाआधीपर्यंत आमच्याकडे रोज रात्रीचे जेवण म्हणजे तांदुळाची थापलेली भाकरीच असायची. चपाती व्हायचीच नाही संध्याकाळी. तीन माणसांचे घर, कोण किती खाणार विचारून आई पटापट थापायची. सोबत कधी फार आवडीची भाजी नसल्यास तोंडाला लावायला एखादा सुका बोंबील भाजला की काम झाले.
सध्या स्वयंपाकाला ज्या ताई आहेत त्या भाकरी मस्त करतात हा शोध नुकताच लागला आणि त्यांनाही कळले की मला फार आवडतात तर आता रोज त्या इतरांसाठी चपात्या लाटतात आणि माझ्यासाठी भाकऱ्या थापतात
सकाळी मायबोली वर रेसिपी
सकाळी मायबोली वर रेसिपी टाकण्यासाठी दहीभात केलेला, मुख्य जेवणात सांबार बेंगलोर वांग्याचे केले होते. त्या ताटाचा हा फोटो खास या धाग्यासाठी!
.
सकाळी मायबोली वर रेसिपी
१. कडबू == कणकेच्या पारीत सारण म्हणून पुरण घातलेला व तळलेला करंजीसदृश्य पदार्थ
२. फळं == कणकेच्या पारीत सारण म्हणून पुरण घातलेला व वाफवलेला करंजीसदृश्य पण मोठा पदार्थ
आमच्याकडे, नागपंचमीला तव्यावर भाजणं, तळणं, विळीने भाजीपाला चिरणं वगैरे कामे निषिद्ध असतात. त्यादिवशी ठरलेला मेनू म्हणजे वरील व्याख्येप्रमाणे आणि खालील फोटोप्रमाणे केलेली फळं! सोबत मेथीची डाळभाजी अन् भरड्याचे वडे हे असतातच.
जेवणाच्या ताटांकडे बघुन
जेवणाच्या ताटांकडे बघुन प्रक्श्ण पडला की इतकी कमी भाजी पुरते का?
सगळेच फोटो मात्र तोंसुपा आहेत
धन्स् अदिति
धन्स् अदिति
जेवणाच्या ताटांकडे बघुन प्रक्श्ण पडला की इतकी कमी भाजी पुरते का?
>>> बातों को समज लो आपा, फोटू अच्चा उतारने के वास्ते खाने के सामानां थोड़े थोड़े लगाके दिखाना पड़ता.
नइ तो लोगां क्या बोलते मालुम? फुट्टी खजूऽर बोलते!
वामन राव.. ताटांचे फोटो
वामन राव.. ताटांचे फोटो बघुन नेहमीच असले प्रश्न पडतात. कारण आज कळले.
सोबत मेथीची डाळभाजी अन् भरड्याचे वडे हे असतातच>>>> ह्याला तो नियम लागु पडत नाही का??? माझ्या लहानपणी हा नियम शिस्तीत पाळला जायचा. अजुनही त्या दिवशी पातोळे करतातच. बाकी सगळा सैपाक नेहमीसारखा.
ह्याला तो नियम लागु पडत नाही
ह्याला तो नियम लागु पडत नाही का???
>>> हं. आठवते तेंव्हापासून आमच्या घरी दरवर्षी हाच मेनू ठरलेला असतो.
वामन राव
वामन राव
आमच्याकडे नागपंचमीला सेम गोड पुरण कणकेच्या पारीवर ठेऊन चौकोनी दुमडून उकडतात.
आम्ही त्याला दिंड म्हणतो.
आमच्याकडे नागपंचमीला सेम गोड
आमच्याकडे नागपंचमीला सेम गोड पुरण कणकेच्या पारीवर ठेऊन चौकोनी दुमडून उकडतात.
आम्ही त्याला दिंड म्हणतो.>>> +१ आमच्याकडे पण दिन्डच असायचे.
आता दलियाची खिर आणी दाल-बाटी असते.
आमच्याकडे नागपंचमीला
आमच्याकडे नागपंचमीला स्वयंपाकाचे काय नियम पाळतात हे माहीत नाही पण काही वर्षापूर्वी आजी आजोबा होते तोपर्यंत नागाची मूर्ती आणून, तिची पूजा करून, दूध लाह्या गूळ वगैरेपासून बनलेला काहीतरी गोड नैवेद्य दाखवून संध्याकाळी त्या मूर्तीचे विसर्जन करायचे. पूर्ण चाळीत आम्हीच एक होतो ज्यांच्याकडे नागाची मूर्ती आणली जायची. त्यामुळे सगळी पोरे जमवून विसर्जनाला न्यायचो जे एका झाडाखाली केले जायचे.
कडबू च्या फोटोसाठी थँक्यू
कडबू च्या फोटोसाठी थँक्यू वामन राव
कडबू च्या फोटोसाठी थँक्यू
कडबू च्या फोटोसाठी थँक्यू वामन राव
मी टाकलेल्या (नागपंचमीच्या) फोटोत फळं / दिंडं आहेत!
फोटोत फळं / दिंडं आहेत ……
फोटोत फळं / दिंडं आहेत ……
🤦
सर्व मेन्यू आणि फोटोज छान.
सर्व मेन्यू आणि फोटोज छान.
नमस्कारासारखा आकार असतो ते कडबोळे.
करंजी सारखा आकार आणि दुमाडलेल्या कडा असतात तो कडबू हे माहिती आहे.
नमस्कारासारखा आकार असतो ते
नमस्कारासारखा आकार असतो ते कडबोळे.>> आता कुणीतरी फोटो टाकाय खऱ्या कडबू चा ,नक्की कसा दिसतो याची उत्सुकता वाढली.
कालचा मेन्यू
कालचा मेन्यू

वांग्याचं भरीत ,भाकरी आणि गाजर मुळयाचं लोणचं म्हणा किंवा कोशिंबीर.
Pages