Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
तिथे अॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
* .....खेळतील ते पण चांगले.*
* .....खेळतील ते पण चांगले.* +१ ! हा निरर्थक आशावाद नाही, कारण व्हीव्हीएस व द्रविड, पंत आणि कं. ह्यांनी ऑस्ट्रेलियातच पूर्वी अशी करामत करून दाखवली आहे. मला सध्याच्या आपल्या संघाच्या सातत्याचा अभाव खुपत असला तरीही त्याची एकंदर प्रतिभा, जिद्द व कुवत याबद्दल मला शंका नाहीं.
)
( पोरांनो, आतां मात्र मला तोंडघशी पाडू नका म्हणजे झालं !
पान्ड्या, कुलदीप यादव,
पान्ड्या, कुलदीप यादव, सूर्यकांत यादव, शर्दुल ठाकूर, अक्षर पटेल हे सगळेजण कुठे गेले?
जयस्वाल पहिल्या बॉल ला फोर
जयस्वाल पहिल्या बॉल ला फोर मारून दुसऱ्या बॉल वर स्टार्क ला विकेट देऊन तंबूत परत गेला...
यशस्वी ४
यशस्वी ४
गिल १
कोहली ३
भारत २२-३
फार अपेक्षा नव्हती पण त्याहून खराब सुरुवात झाली
(No subject)
‘क्रिकेटमधे काहीही होऊ शकतं‘
‘क्रिकेटमधे काहीही होऊ शकतं‘ ह्यापलिकडे भारतीय टीम ऑस्ट्रेलियात काहीतरी करेल ह्या माझ्या आणि माझ्यासारख्या असंख्य चाहत्यांच्या आशावादाचा पाया काय आहे? बुमराह सोडून एकही विकेट टेकिंग बॉलिंग ऑप्शन नाही. अश्विन सारखा बॉलर टीममधे सातत्यानं खेळू शकत नाही. कोहली सारखा बॅट्समन करियरच्या शेवटच्या टप्प्यावर आहे (केवळ वय सारखं म्हणून कोहलीबरोबर शर्माचं नाव घ्यायचं), जैस्वाल सारखा गुणी पण नवखा खेळाडू त्याच चुका परत परत करत असताना त्या सुधारल्या जात नाहीत (अॅडलेडला जर त्याने बॉल ची लाईन मिस केली नसती तर तो आजसारखाच आऊट झाला असता. लाईन चुकल्यामुळे तो एलबीडब्ल्यू झाला). हे बघताना मनाला वेदना होतात.
ऑस्ट्रेलियाच्या 445 ला
ऑस्ट्रेलियाच्या 445 ला भारताची 27/3 अशी आश्वासक सुरुवात. आता चुम्माच काय ते करू शकत होता पण पावसाने घोळ केला.
आला आला पाऊस मदतीला आला.
आला आला पाऊस मदतीला आला. फिक्र नॉट.
इतिहास पुनरावृत्ती होतेय..
इतिहास पुनरावृत्ती होतेय..
पाऊस आला आहे आणि ऑस्ट्रेलिया आता रिषभ पंतपासून वाचतोय! एकदा रिषभ मैदानावर आला की ऑस्ट्रेलियालाही डर वाटतो. त्याच्या खेळीला पाहून, पाऊसही घाबरायला लागतो.
बहुतेक जैस्वाल ला आता
बहुतेक जैस्वाल ला आता स्टार्क चे स्लो चेंडू ही खेळता येत नाहीत असच म्हणावं लागेल आता. उगाच काही गरज नसताना स्लेज केलं आणि फोर्मात नसलेला स्टर्क पुढच्याच सामन्यापासून फॉर्मात आला.
उगा चुम्मा चुम्मा करून नाचू
उगा चुम्मा चुम्मा करून नाचू नका
गेला पंत सुद्धा...
फेफ बहुतांशी +१
फेफ
बहुतांशी +१
आता रोहीत शर्मा व राहुल हे
इथल्या कमालीच्या आशावादी पोस्ट्स बघुन मला पण आता वाटायला लागल आहे की की आता रोहीत शर्मा व के एल राहुल हे दोघे डबल सेंचुरी मारणार!
कोहली ऐवजी अनुराग ठाकूरला
कोहली ऐवजी अनुराग ठाकूरला घ्या, काल त्यांनी 111 रन केले आणि मॅच जिंकवून दिली.
*...हे बघताना मनाला वेदना
*...हे बघताना मनाला वेदना होतात.* - यू सेड इट, फेफ !!!
फक्त १४ ओवर खेळलो आपण आणि ४
फक्त १४ ओवर खेळलो आपण आणि ४ विकेट टाकल्या.
पाऊस मदत करायला तयार आहे पण आपले फलंदाज टिकून उभे राहायला तयार नाहीत.
गिल कोहली यशस्वी रोहीत या फलंदाजांनी ही जबाबदारी घ्यायला पाहिजे होती. राहुलचे मात्र यासाठी कौतुक. त्याचे परदेशात सेना देशात एखादे शतक असते. ते यावे. फॉलो ऑन वाचावा. तो वाचला तर सामना सुद्धा वाचेल.
अती डीपेंडान्स मुळे बुमारा ही
अती डीपेंडान्स मुळे बुमारा ही लवकर थकतो आहे असं वाटतंय. पाच टेस्ट च्या सिरीज मधे आपण त्याला एका टेस्ट चा आराम द्यायचा विचारही करायच्या मनस्थितीत नाही आहोत.
गेल्या सिरीज मधे आपले नेट बॉलर पण चालून गेले अन् आत्ता मुख्य बॉलरच निष्प्रभ होताहेत.
गेल्या वर्षभरात एकही बॅटर हुकमी फॉर्म मधे नाहीये. (जयस्वाल सिद्धू कॅटेगरी होतोय - एका सामन्यात कमाल खेळ अन् पुढच्या x सामन्यात काही विशेष नाही, बेशिस्त वर्तन चालू राहिलं तर कांबळी - शॉ कॅटेगरी मधे जाईल). मिडल ऑर्डर पार बेभरवशी झालिये. त्यात लोअर मिडल ऑर्डर पण स्टेबल नाही आहे (आश्विन, जडेजा चा ही फॉर्म रुसला आहे).
जो राहुल पूर्वी ओपन करताना गांडायचा म्हणून मिडल ऑर्डर मधे शिफ्ट झाला होता तो अचानक ओपन स्लॉट फ्री असल्याने तिथे काय येतो, त्यातल्या त्यात बरा काय खेळतो अन् त्यामुळे मिडल ऑर्डर मधे फेल झाल्यावर ओपन म्हणून टेस्ट मधे जम बसवलेला शर्मा परत मिडल ऑर्डर मधे काय येतो (अन् पुन्हा फेल होतो). सारंच अनाकलनीय आहे.
एखाद्या गेम मधे एखादी गोष्ट चालून जाणं वेगळं अन् एखाद्या गेम मधे चालून गेलेल्या गोष्टी भोवती पूर्ण प्लॅन ठरवणं वेगळं. लीडरशिप टीम चा हा प्लॅन च गांडल्यागत दिसतो आहे.
2011 ऑस्ट्रेलिया दौऱ्या नंतर टीम मधे भरपूर बदल झाले होते. 2011 वर्ल्डकप विजेत्या टीम मधले 8-9 प्लेअर्स पुढच्या 1.5 वर्षात कायमचे टीम बाहेर गेले होते.
या दौऱ्यानंतर परत एकदा तसंच झालं तर आश्चर्य नाही वाटणार. नाही झालं तर मात्र धक्का बसेल...
खूप चांगले पर्याय एकाच वेळी
खूप चांगले पर्याय एकाच वेळी उपलब्ध असणं हेच तर घातक ठरतं नसेल ना, अशी शंका येते. त्यामुळे, निवड समिती नवनवीन प्रयोग करण्याच्या मोहात पडते व खेळाडू अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकतात, असं तर होत नसेल ?( *पान्ड्या, कुलदीप यादव, सूर्यकांत यादव, शर्दुल ठाकूर, अक्षर पटेल हे सगळेजण कुठे गेले * ही पोस्टही म्हणूनच बोलकी आहे ! ) हेवा वाटावां इतकी भरगच्च प्रतिभा देशात उपलब्ध असूनही आपली कामगिरी अशी ढिसाळ कां व्हावी ? Too many slips spoil the catch असं तर नाही ना ?
फेफ +१. त्याच त्याच चुका परत
फेफ +१. त्याच त्याच चुका परत दिसतात.
एखाद्या गेम मधे एखादी गोष्ट चालून जाणं वेगळं अन् एखाद्या गेम मधे चालून गेलेल्या गोष्टी भोवती पूर्ण प्लॅन ठरवणं वेगळं. >> रोहित ओपनर म्हणून इतका जमला असताना त्याचे सलग दुसर्या सामन्यामधे मधल्या फळीत खेळणे डीफेंसिव्ह वाटले. 'नसेन मी फॉर्ममधे पण तरिही मी ओपन करेन नि स्कोअर करेन' हा मेसेज कप्तानाकडून दिला गेला असता तर आवडले असते.
खूप चांगले पर्याय एकाच वेळी उपलब्ध असणं हेच तर घातक ठरतं नसेल ना, अशी शंका येते. >> पटले नाही भाऊ. टेस्ट चा संघ इंग्लंड सिरीजपासून फारसा बदललेला नाहिये (इंजरी सबस्टिट्यूट वगळता). ऑस्ट्रेलिया विरुद्ध अचानक राणा, रेड्डी ह्यांना नेणे हा जुगार होता नि कोच कप्तानाला तेव्हढी सूट असायला हरकत नाही असे वाटते. कंम्फ्युजिंग डावपेच नि त्याच त्याच चुका परत करत राहणे हि मुख्य कारणे वाटतात. (ह्या दोन्हीचा ठपका माझ्या मते नविन कोचिंग स्टाफ वर जातो. उदा. : मॉर्केल ने दुसर्या टेस्टधे पहिल्या दिवशी राणाच्या लेंग्थ वर टीका केली होती जी योग्य होती पण पूर्ण दिवसभर कोचिंग स्टाफला त्यात काहीच बदल करता आला नाही हे कसे ?)
दुसर्या इनिंगमधे काय होतंय ते
दुसर्या इनिंगमधे काय होतंय ते बघून, बॉक्सिंग डे टेस्टला जैस्वालच्या जागी रोहितला ओपनिंगला आणून, सर्फराझला मिडल ऑर्डरमधे खेळवावं का?
जर पुढच्या 3 डावांपैकी 2 डाव
जर पुढच्या 3 डावांपैकी 2 डाव फेल गेले अन् 1च डाव कितीही जबरी खेळले तरीही कोहली, गिल, जयस्वाल अन् रोहित यापैकी दोघांना शेवटच्या टेस्ट साठी बसवायची वेळ आली आहे...
चौघांपैकी कुणा दोघांना बाहेर घ्यायचं हे ठरवायची वेळ येऊ नये म्हणजे झालं
“ चौघांपैकी कुणा दोघांना
“ चौघांपैकी कुणा दोघांना बाहेर घ्यायचं हे ठरवायची वेळ येऊ नये म्हणजे झालं” - आयडियली सिडनेला अश्विन आणि जडेजा, दोघांनी खेळायला हवं. पण नितिशच्या बॅटिंगची इतकी निकड निर्माण झालीय कि आवश्यक ते बॉलिंग काँबिनेशन पण खेळवता येत नाहीये.
राहुलचे परदेशात सेना देशात
राहुलचे परदेशात सेना देशात एखादे शतक असते. ते उद्या यावे आणि फॉलो ऑन वाचावा.. >>> हुकले शतकं. बसली कॅच स्मिथच्या हातात. पण ८४ मारले राहुलने. वेल पलेड.. आता जडेजा रेड्डी जोडीने सामना वाचवावा. हे दोघे सुद्धा शतकी भागीदारी करू शकतात.
हा सामना वाचवावा.. मालिका आणि WTC चान्स जिवंत ठेवा. बघू मग पुढे.
*पटले नाही भाऊ. टेस्ट चा संघ
*पटले नाही भाऊ. टेस्ट चा संघ इंग्लंड सिरीजपासून फारसा बदललेला नाहिये ...* - मान्य. इतक्या चांगल्या संघाकडून इतकी वाईट कामगिरी होत असलेली बघून बुचकळ्यात पडलो व म्हणून मनातल्या शंका व्यक्त केल्या होत्या !
201 - 7 - फॉलो ऑन टळेल ?
201 - 7 - फॉलो ऑन टळेल ? सामना वाचवता येईल ? इतक्या वाईट सूरवाती नंतर चांगली झुंज !
आकाशदिव्याने फॉलोऑनच्या
आकाशदिव्याने फॉलोऑनच्या अंधारातून बाहेर काढले!
शेपटाला सलाम !
शेपटाला सलाम !
जडेजा आणि आकाशदीप हे दोन बदल
जडेजा आणि आकाशदीप हे दोन बदल गोलंदाजीत नाही पण फलंदाजीत कामाला आले.
जुना बॉल नि थकलेले बॉलर्स हे
जुना बॉल नि थकलेले बॉलर्स हे लक्षात ठेवून मॅच सिच्युएशनला हवा तसा खेळ केल्याबद्दल बुमरा नि आकाश्दीपचे कौतुक करावे तितके कमीच आहे. जडेजा चे कंत्रोल पर्सेंट बघितले कि कमाल वाटते. तो भारतापेक्षाही चांगला स्पिन ऑस्ट्रेलियामधे खेळतो हि गमतीची बाब आहे. त्याच्या वॅगन व्हील मधे जवळजवळ सगळ्या धावा समोरच्या व्ही मधे किंवा स्केवर ला दिसतात. काश कोहली, रोहित ह्यातून धडा घेऊन तिरक्य अबॅटने खेळणे - किमान पहिल्या १०-१५ ओव्हर्स पर्यंत थांबवतील.
ऑस्ट्रेलियामधे पहिली ३०-३५ ओव्हर्स बॉल करामती दाखवत राहतो नि नंतर बॅटींग सोपी होत जातेय . ऑस्ट्रेलिया गेले दोन सामने ह्या भरोअशावर खेळली आहे. आपण खेळू का उद्या असेच ? पाऊस, तीन सेशन्स नि एक बॉलर कमी हे बघितल्यावर निकाल लागू न देणे आपल्याला शक्य आहे.
बॉक्सिंग डे टेस्टला जैस्वालच्या जागी रोहितला ओपनिंगला आणून, सर्फराझला मिडल ऑर्डरमधे खेळवावं का? >> मला जरुरू वाटत नाही. जैस्वालचा शॉत वाईट वाटला तरी तो कंट्रोल मधे होता. बहुधा डॉमिनेट करायची हुक्की कॅरी झाली. त्याने बरेचदा मॅच्युरिटी दाखवली आहे त्यामूळे ड्रॉप करू नये असे वाटते. मधल्या फळीत सर्फराज पेक्षा जुरेल ला आणता आले तर जास्त योग्य वाटते मला. गिलच्या जागी कदाचित ?
उद्या सामना वाचवताना आपली
उद्या सामना वाचवताना आपली बॅटिंग ऑर्डर काय असावी?
मला वाटते सुरुवातीचे टॉप तीन ओके आहेत. त्यानंतर पंत जडेजा रेड्डी यांनी पुढे यावे. रोहीत आणि कोहली यांनी मागे राहावे. कोणी हसणार नाही.
Pages