क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता आयपी एल साठी दुसरा धागा काढा. इथे फक्त ऑस्ट्रेलिया भारत कसोटी सामन्यांची चिरफाड करू.
>>>>

पडत्या फळाची आज्ञा...
काढला धागा.. आज एक मोठ्ठा धमाका झाला..
वाचा तिथे
https://www.maayboli.com/node/86033

भाऊ कार्टून आवडले. मस्त झाले आहे एकदम.

बुमरा मुळे जिंकले असे मला वाटते. त्याने भारताने डाव सोडल्यावर पण मस्त दोन विकेट घेतल्या. सगळा ॲप्रोच वेगळा वाटला या मॅच मध्ये

टेस्ट मॅच जिंकूनही एकही पोस्ट नाही
>>>
परवा, काल इथे डोकावून गेले होते, तर सेम वाटलं!
इथे आयपीएल लिलावाच्याच गप्पा चालू होत्या Uhoh

टेस्ट मॅच जिंकूनही एकही पोस्ट नाही
>>>>

शनिवारी रविवारी मी सुट्टी वर होतो..
सोमवारी ऑफिस..
त्यामुळे हा फरक पडला

दुसरे कारण म्हणजे सामना रविवारीच क्लोज झाला होता.
सोमवारी किती धावांनी औपचारिकता शिल्लक राहिली होती.

तिसरे कारण म्हणजे आपल्याला म्हणजे मला तरी ऑस्ट्रेलियाला दाखवायचे नव्हते की आपण किती खुश झालो आहोत. त्यांना असे दाखवायचे होते की हे आमच्यासाठी नेहमीचे काम आहे. गेले दोन दौरे आम्ही तुम्हाला हरवले. आताही तेच करणार आहोत.
(२००९ साली सीबी सिरीज मध्ये पहिली फायनल जिंकल्यावर धोनीने असेच केले होते. सर्वाँना सांगितले होते की पाहिला सामना जिंकल्यावर कोणीही जास्त सेलिब्रेट करायचे नाही)

तिसरे कारण म्हणजे आपल्याला म्हणजे मला तरी ऑस्ट्रेलियाला दाखवायचे नव्हते की आपण किती खुश झालो आहोत. >> कसला अमाप आत्मविश्वास आहे हा कि तमाम ऑसी लोक ( खेळाडू, कॉमेंट्रेटर, सोशल मिडिया) इथे येऊन तुझे पोस्ट वाचत असतात. मानले बुवा.

RSA v SL, 1st Test
RSA 80-4
Kyle Verreynne*: 9 (16)
Temba Bavuma: 28 (47)
Vishwa Fernando 6.4-0-17-1
Day 1: Stumps

इतर सामन्यांवर सुद्धा लक्ष ठेवा आता..

आफ्रिकेला आहेच सुवर्ण संधी म्हणून तर ते हरताहेत का यावर लक्ष ठेवायचे आहे.
यंदाच्या WTC सीजन मध्ये सगळ्या संघाचे मिळून होम अवे जिंकलेले सामने २४-२५ अश्या बरोबरीत आहेत.. त्यामुळे आफ्रिका सुद्धा आपल्या घरात हरू शकते हा विश्वास कायम ठेवा Happy

*इतर सामन्यांवर सुद्धा लक्ष ठेवा * _ हे इथल्या खेळाडूंसाठी ठीक आहे; कसोटी खेळाडूंनी आपल्या सामन्यांवरच लक्ष केंद्रित केलेलं बरं !! Wink

जाऊ द्या नका लक्ष ठेवू कुठल्याच सामन्यांवर..
लंका ८३ चेंडूंत ४२ धावात सर्वबाद झाली Proud

ॲडलेड कसोटीसाठी संघ (अर्थातच माझ्या मते) असा असावा.

  1. जैस्वाल
  2. राहुल
  3. गिल
  4. कोहली
  5. शर्मा
  6. पंत
  7. जडेजा
  8. रेड्डी
  9. राणा
  10. सिराज
  11. बुमरा

अ‍ॅडलेडमधे अश्विन खेळेल का? पर्थ इतकी फास्ट विकेट नसते अ‍ॅडलेडला. बॉल अगदी सिडनीइतका नसला तरी बर्यापैकी वळतो.

बाऊन्सपेक्षा स्विंग जास्त मिळेल (पिंक बॉल) - त्यामुळे हर्षित ऐवजी आकाश जास्त चांगला पर्याय होऊ शकेल का?

काही तासात सामना सुरू होईल
राहुलच ओपन करणार आहे.
संघहितासाठी रोहीत शर्मा मिडल ऑर्डर खेळणार आहे.
अशी न्यूज आहे. खरी असेल तर कौतुकास्पद निर्णय.

*संघहितासाठी रोहीत शर्मा मिडल ऑर्डर खेळणार आहे.* -
संघहितासाठी कुणी मुख्यमंत्रीपद सोडतंय, कुणी फलंदाजीचा क्रम सोडतंय ! एकंदरीतच, संघ परिवारासाठी बरे दिवस आलेत असं वाटतं !!20190118_083103.jpg

छान झाले नोंद करून ठेवली
आपण पुन्हा एकदा एका ऐतिहासिक भारत ऑस्ट्रेलिया मालिकेचे साक्षीदार होणार आहोत.

OMG!
"You're bowling too slow," were Jaiswal's words to Starc in the previous Test. Falls for a golden duck against the same bowler today

पंत समयोचीत छान खेळत होता. बॅड लक !
मला रेडीचा ॲप्रोच खूप आवडला. घाई न करता तो गोलंदाजी अभ्यासत होता व मग त्याने सुरवातीलाच मारलेले ऑफ ड्राईव्ह व कव्हर ड्राईव्ह तंत्रशुद्ध व देखणे होते. आशादायक खेळाडू !!

Pages