क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शर्मा आणि गिल येतील
जूरेल आणि पडीकल याना पुढील संधीची वाट बघावी लागेल.

राहुल खेळणार की नाही हा प्रश्नच नाहीये. तो कुठे खेळणार हे बघायला हवे.
त्याला बहुधा पुन्हा सहाव्या क्रमांकावर जावे लागेल.
पण ती जागा त्यासाठी चांगली नाही. तिथे एक वेगळे प्रेशर असते. त्याची आजपर्यंतची कारकीर्द आणि खेळ पाहता. त्याची प्रेशर हॅण्डलिंग ॲबिलिटी कमी वाटते. त्याचा चांगला वापर ओपनर म्हणूनच होईल असे वाटते.

ऋषभ पंतचा मेंटल प्रॉब्लेम आहे वाटते. भारत सुस्थितीत असेल तर त्याला काय करायचे हे समजत नाही.
आता इथून ऑस्ट्रेलियाला गेम मध्ये परत यायला संधी द्यायला नको.
अर्थात पुरेश्या धावा झाल्या आहेत. 400+ धावा इथे चौथ्या डावात नाही होत. त्यांच्या डावाला अनइव्हन बाऊंसला सुरुवात होईल.

यशस्वी पंत जुरेल गेले. सुंदर सेट नाही. लीड 400 झाला नाही. बॉल 20-22 ओवरच जुना झालाय आणि ऑस्ट्रेलियाने हेडला गोलंदाजीला आणले. प्रेशर टाकायला हवे होते. पण बरे आहे आपल्यासाठी..

भारत सुस्थितीत असेल तर त्याला काय करायचे हे समजत नाही
हे मात्र अगदी बरोबर.

झाली 400 ची लीड, ऑस्ट्रेलिया मधील highest चेस 414 आहे.

चुम्मा 27 करोड लखनऊ

आजवरचा आयपीएल मधील सर्वाधिक महागडा खेळाडू

बघूया आता कोणी रेकॉर्ड तोडते का?

*ऑक्शन आहे म्हणून चांगले खेळले. * Wink

बंदरात लिलावात घेतला, तेंव्हा तर ताजा फडफडीत होता, उडत होता !!20190115_203207.jpg

जैस्वाल, कोहली - a tale of two cities!! सर्वस्वी नवख्या वातावरणात जाऊन, एका इनिंगमधे योग्य ते टेक्निकल बदल करण्याची परिपक्वता असणारा एक बावीशीतला खेळाडू आणि करियरच्या उत्तरार्धात, अनेक प्रश्नचिन्हांना पूर्णविराम देत, हुलकावणी देणार्या यशाला(?) गवसणी घालणारा ओल्ड प्रो- दोघा चँपियन्सनी एका मोठ्या स्टेजवर अश्या खणखणीत इनिंग्ज खेळल्या. जबरदस्त!!

मुंबई आधीच शर्मा, सूर्या, टिळक, पांड्या आणि बूमबूम हे पाच भारतीय टॉप प्लेअर घेऊन बसली आहे.
गोलंदाजी योग्य ती बांधायची आहे
बोल्ट एक घेतला आहे.
आता एक चांगला स्पिनर आणि किपर त्यांना हवा आहे. हे विदेशी सुद्धा चालते.

पंतची मात्र कमाल आहे. अपघातात मेला नसता तरी सहज आयुष्यभरासाठी अपंग झाला असता आणि प्रत्यक्ष क्रिकेट खेळून होणारी कमाई शून्य झाली असती.
पण वाचला. पुन्हा खेळू लागला. आणि ते देखील असे की त्याच्यासाठी २७ करोडचा विक्रमी आकडा मोजला गेला.

*त्याच्यासाठी २७ करोडचा विक्रमी आकडा मोजला गेला.* _ कारण, जो मृत्यूला शिवून येऊ शकतो, तो कोणालाही फाडू शकतो !! Wink

जयस्वालबाबत एका इनिंगमध्ये १८० अंशात बदल वगैरे बरेच पोस्ट वाचनात आल्या. पण हे तो ऑस्ट्रेलियात गेल्यापासून सराव करून शिकतच असेल. फक्त पहिल्या डावात मूवमेंट जास्त असल्याने केलेल्या अभ्यासापेक्षा पेपरच कठीण आला असे झाले. दुसरा पेपर तुलनेत सोपा येताच त्याने आपला झालेला अभ्यास आणि हुशारी दाखवली.

आता पुढच्या पेपरात प्रश्न बदलले जातील, फिरवून विचारले जातील. आणि ते सोडवता सोडवता तो बरेच काही शिकेल. या सगळ्यात त्याची धावांची भूक कायम राहणार. म्हणून तो या मालिकेत सर्वाधिक धावा करेल असे वाटले होते. पण आता कोहली सुद्धा स्पर्धेत उतरला आहे. दोघात कोण जास्त धावा करतो याची स्पर्धा सुरू झाली तर मजा येईल Happy

ही मालिका आपल्याला किमान ३-२ ने तरी जिंकायचे आहे. मग स्पर्धेत असलेल्या बाकीच्या देशाच्या सामन्यांचे काय होते ते नंतर बघू

- a tale of two cities!! >> =१. कोहलीकडून अपेक्षा नव्हती Happy

पंत वर लावलेली विक्रमी बोली मला तरी धाडसी वाटते. त्याचे टी २० चे आकडे संख्या बघितली तर फारसे इंप्रेसीव्ह नाहित. घोडामैदान जवळच आहे. काय होते ते.

पाच भारतीय टॉप प्लेअर घेऊन बसली आहे. > हे गेल्या वर्षी पण होतेच.

हे गेल्या वर्षी पण होतेच.
>>>
गोलंदाजीत गंडलेले.. मागे ते आर्चर नादात बाकी काही विचारच केला नव्हता. आता त्या चुका सुधारू शकतात.

त्याचे टी २० चे आकडे संख्या बघितली तर फारसे इंप्रेसीव्ह नाहित.
>>>

आयपीएल मधील आहेत.
३५ सरासरी १४८ स्राईक रेट
हे चांगले नाही तर खूप चांगले आहेत.
तुलनेसाठी हे बघा
संजू ३० सरासरी १३८ स्ट्राईक रेट
ईशान २८ सरासरी १३५ स्ट्राईक रेट

आणि त्याची ब्रँड व्हॅल्यू अफाट आहे. पैशाचा खेळ आहे. क्रिकेट मैदान पलीकडे विचार करा.. बिझनेस माईंड. आणि म्हणून लिलाव सुरू व्हायच्या आधीच पंत वर सर्वाधिक बोली लागणार असा अंदाज होता. हेच अपेक्षित होते.

इथे आपण जिंकतो आणि तिथे त्या पाकिस्तानचे दिवस फिरले.
काल झिंबाब्वे सोबत हरले.
सारे पुन्हा सुरळीत चालू झाले.

टेस्ट मॅच जिंकूनही एकही पोस्ट नाही
Uhoh

अरे कुठे नेऊन ठेवला क्रिकेट बाफ...

पण मस्त झाली मॅच
मेजर क्रेडिट्स बॉलर ना... कारण 20 विकेट्स काढल्याशिवाय टेस्ट जिंकता येत नाही. बॅटर लोकांनी दुसऱ्या डावात त्यांना डिफेंड करायला मोठ्ठं टार्गेट दिलं होतं ही पण जमेची बाजू. राहुल नी पहिल्या डावात या विकेट वर काय करायला हवं ते दाखवून दिलं अन् इतरांनी दुसऱ्या डावात त्याचा कित्ता गिरवला. हा अप्रोच घेणं गरजेचं आहे हे ॲक्सेप्ट केलं तिथेच आपले ग्रह फिरले असं म्हणता येईल. (न्यूझीलंड विरुद्ध च्या पूर्ण सिरीज मधे हेच होत नव्हतं असं वाटल्यानी तो पराभव खूप झोंबला होता)

“ हा अप्रोच घेणं गरजेचं आहे हे ॲक्सेप्ट केलं तिथेच आपले ग्रह फिरले असं म्हणता येईल.” - +१

मस्तच जिंकले. अर्थात कालचा दिवस मॅचच्या निकालाच्या दृष्टीनं बर्यापैकी फॉर्मॅलिटी होता (हे ऑसी कॉमेंटेटर्स म्हणत होते. नाहीतर क्रिकेटच्या ग्लोरियस अनसर्टनिटी वर माझं बौद्धिक व्हायचं Happy ). पण कालच्या दिवसाची एक जमेची बाजू म्हणजे सिराजने टाकलेला पहिला भेदक स्पेल. तो गेल्या काही मॅचेस जरा ऑफ-कलर वाटत होता, त्यामुळे त्याला प्रोबिंग बॉलिंग करताना पाहून छान वाटलं.

क्रिकेट मैदान पलीकडे विचार करा. >> माझ्या पोस्ट मधे "टी २० चे आकडे " हे म्हटल्यावर हे सांगण्यात काय अर्थ आहे हे तुझे तुलाच माहित. ते इतरांना कळत नसेल हे धाडसी गृहितक आहे. आयपील मधे घेताना फक्त आयपीलचीच कामगिरी बघतात वगैरे ज्ञान मला नव्हते. ह्या लॉजिकने बाहेरचे खेळाडू किंवा अंडर १८ मधले खेळाडू आयपील मधे खेळणारच नाहीत. ज्या किमतीला त्याला उचललाय त्याला ते आकडे सूट नाहि आहेत हे साधे पोस्ट होते.

हा अप्रोच घेणं गरजेचं आहे हे ॲक्सेप्ट केलं तिथेच आपले ग्रह फिरले असं म्हणता येईल. >> +१. तो नि बुमरा हे कॅटॅलिस्ट होते ह्या विजयाचे. जैस्वाल , कोहली , नितिश नि इतरांनी योग्य वेळी अचूक हातभार लावला. पड्डीकल नि जुरेल आता रोहित नि गिल्साठी जागा करून देतील. पुढच्या कसोटीमधे ऑस्ट्रेइल्या अनचेंङेज्ड असेल नि आपण बदललेला संघ घेऊन ही गमतीची गोष्ट आहे.

Pages