क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोक पण असे तात्पुरती स्मरण शक्ती वाले असतात. बुमाराची आरती ओवाळताना शमीला सोयीस्कर विसरून जातात. पाकिस्तान एका पाठो पाठ पेसर काढतोय , आपणही काढू. काही सेरीज नंतर बुमराला स्मृतीच्या गर्तेत फेकून देऊ. नवीन बुमरा-२ येईल त्याची आरती गाऊ.

*मला भारतीय बॅटिंगची इतकी काळजी वाटत नाही* - मला खरी काळजी वाटते कसोटी सामने सर्रास 2-३ दिवसात संपताना दिसतात याची ! मला नाहीं वाटतं की गोलंदाजीचा दर्ज खूपच उंचावल्यामुळे असं होतंय. भारतात मुख्यत: खेळपट्ट्या खराब बनवल्यामुळे व ऑस्ट्रेलियात फलंदाजी ढिसाळ झाल्यानेच हे होत असावं. जर फलंदाजी हे आपलं शक्तिस्थळ मानलं जातं, तर त्यातला ढिसाळपणा काळजी वाटण्यासारखाच आहे !

<<<<मी जर क्याप्टन असतो तर ऑस्ट्रेलियाला शेवटचे १९ रन्स काढायला बोलावलं नसतं. बोललो असतो जिंकलात तुम्ही विनाकारण बॅटिंग करायला येऊ नका.>>>
आशा असते हो. देवाचे मनःपूर्वक स्मरण करून गोलंदाजी नि क्षेत्ररक्षण केले तर कदाचित १८ मधेच सगळे बाद होतील.
किंवा या सामन्यावर जसे पैसे लावले अस्तील त्याप्रमाणे ऑस्ट्रेलियाने १० धावातच डाव घोषित करून पराभव स्वीकारला तर?...
आजकालचे क्रिकेट कठिण झाले आहे.

भारतात मुख्यत: खेळपट्ट्या खराब बनवल्यामुळे व ऑस्ट्रेलियात फलंदाजी ढिसाळ झाल्यानेच हे होत असावं.
>>
बिलकुल पटलं नाही

भारतात पाहुण्यांची फलंदाजी ढिसाळ झाल्याने अन् ऑस्ट्रेलियात मुख्यात: खराब खेळपट्ट्या बनवल्याने हे होत असावं
हे म्हणणं जर चूक असेल तर वरचं ही चूक च आहे...

जर जोखायचं असेल तर सगळीकडे एकच प्रमाण असूदे...

भारतात पाहुण्यांची फलंदाजी ढिसाळ झाल्याने अन् ऑस्ट्रेलियात मुख्यात: खराब खेळपट्ट्या बनवल्याने हे होत असावं
हे म्हणणं जर चूक असेल तर वरचं ही चूक च आहे... >> नाहि रे ते म्हणतायेत कि भारतात खेळपट्ट्या खराब होत्या म्हणुन सामने तीन दिवसात संपले. ऑस्ट्रेलियात आपली फलंदाजी ढिसाळ झाल्यानेत२-३ दिवसात संपले.

फेफ, राणाला फास्ट ट्रॅक करण्यामागे गंभीरचा हात आहे ह्याबद्दल शंका नाही. फक्त एका मॅचच्या दोन दिवसांवरून एकदम त्या कनेक्शन वर दोषारोप करणे ऑड वाटले. हाईंडसाईट्वमधे आकाशदीप हवा होता हे मान्य. फक्त बॉल एव्हढा सीम होत असाताना बुमरा - सिराज नि रेड्डी कामाला पुरेसे पडले नाहित हे ऑड वाटले. पहिल्या दिवशी आपण कमी बॉल्स त्यांना खेळायला लावले असे वाटत होते. अश्विन चा बॉल हातभर वळूनही काही उपयोनाझाला नाही, बुमरा ह्या स्पीडा ने आयपील खेळेल का ह्याची शंका वाटते Happy

काल पंतने प्रत्येक मॅच मधे एक ड्रॉप केलाय असे स्टॅट्स पाहिले. हे अ‍ॅब्रशन असेल अशी आशा धरूया.

मला खरी काळजी वाटते कसोटी सामने सर्रास 2-३ दिवसात संपताना दिसतात याची!
>>>>>

कसोटी चॅम्पियनशिपमध्ये जिंकल्यावर १२ पॉइंट आणि सामना अनिर्णीत राहिला तर फक्त ४
त्यामुळे प्रत्येक देश आपल्या देशात प्रत्येक सामना जिंकायला बघतोय.. खेळपट्ट्या निकाली बनवल्या जात आहेत. खेळ निकाल लागावा असा खेळला जात आहे.

“ मला खरी काळजी वाटते कसोटी सामने सर्रास 2-३ दिवसात संपताना दिसतात याची !” - हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. अ‍ॅडलेडला भारताची फलंदाजी ढिसाळ होती हे ही खरंच आहे. मी त्या अर्थानं नाही म्हटलं की बॅटिंगची काळजी वाटत नाही. माझ्या म्हणण्यामागचा विचार इतकाच होता कि उरलेल्या टेस्ट्स मधे तरूण आणि अनुभवी - गुणी - बॅट्समनच्या फळीत २-३ जण तरी चमकतील. पण बॉलिंगमधे अश्विन आणि सिराज ला फॉर्म गवसला नाही तर बुमराह एकटा दर वेळी २० विकेट्स काढेल ही अपेक्षा थोडी अवाजवी आहे. कधी रन्स कमी असतील तरी चांगल्या बॉलिंगच्या जीवावर मॅच जिंकता येते, पण सहसा ह्याच्या उलट होत नाही.

“ फक्त एका मॅचच्या दोन दिवसांवरून एकदम त्या कनेक्शन वर दोषारोप करणे ऑड वाटले.” - दोषारोप नाही रे, पण फ्रस्ट्रेशन होतं थोडं त्या दिवशी लिहिताना, हे नक्की. हेडने हल्ला चढवल्यावर तो अगदीच क्लूलेस होता - स्वाभाविकही आहे. असो. होपफुली, त्याचा ‘बॅड-डे‘ होता आणि तो त्याच्यावर टाकलेल्या विश्वासाला जागेल. टीम सिलेक्शनही कंडिशन्सना पूरक असेल (कदाचित ब्रिस्बेन राणासाठी redemption opportunity ठरू शकेल) अशी आशा करू या.

*माझ्या म्हणण्यामागचा विचार इतकाच होता कि उरलेल्या टेस्ट्स मधे तरूण आणि अनुभवी - गुणी - बॅट्समनच्या फळीत २-३ जण तरी चमकतील. पण बॉलिंगमधे अश्विन .....* फेफ, हे स्पष्टीकरण एकदम मान्य !
*जिंकल्यावर १२ पॉइंट आणि सामना अनिर्णीत राहिला तर फक्त ४..* - सामना 5 दिवसांपेक्षा कमी वेळात संपला, तर कमी दिवसांसाठी यजमान जेत्याला प्रतिदिन 3 गुण कमी द्यावे ! Wink

नाहि रे ते म्हणतायेत कि भारतात खेळपट्ट्या खराब होत्या म्हणुन सामने तीन दिवसात संपले. ऑस्ट्रेलियात आपली फलंदाजी ढिसाळ झाल्यानेत२-३ दिवसात संपले.
>>
I know
माझं ऑब्जेक्शन या मुद्द्याला आहे की एक तर दोन्हीकडे फलंदाजीला दोष द्या किंवा खेळपट्टी ला.
भारतात खेळपट्टी वाईट अन् बाहेर गेलं की फलंदाजी वाईट हे नको...

माझं ऑब्जेक्शन या मुद्द्याला आहे की एक तर दोन्हीकडे फलंदाजीला दोष द्या किंवा खेळपट्टी ला. >> जनरली हे मान्य. पण विशेषतः किवीज किंवा बांगलाच्या विरुद्ध असलेल्या आपल्या पिचेस च्या काँटेक्स्ट मधे थोडे वेगळे वाटते. तिथे पिचेस दोन्ही संघांसाठी बर्‍यापैकी एक समान होती जशी ह्या सिरीजमधे आहेत असे म्हणून शकतो. फार तर पहिल्या इनिंग मधे थोडा वेळ आपल्याकडे बॅटीग सोपी होती असे म्हणू शकतो. फक्त ती अन्प्लेयेबल फारच फास्ट बनली हा प्रकार असह्य होता. ह्या उलट ऑस्त्रेलियामधली कधीच अन्प्लेयेबल वाटली नाही. त्या काँटेक्स्ट मधे दोषाचा मोठा ठपका कोणाला अधिक द्यायचा हे भाऊंचे पटले.

जर मुख्य प्लॅन चालत नसेल तर रोहित फार लवकर हात टेकतो, पलिकडाच्यांकडून चुका होतील याच्या अपेक्षेत वाट पहात रहातो असं मला वाटतं. वर्ल्डकप फायनल असो, डब्ल्यूटीसी फायनल असो की कीवी / बॉगा सिरीज...
टी 20 मधे हा अप्रोच चालून जातो. पण वन डे अन् टेस्ट ला नाही होत.

अँकिने पिवळा फॉस्फरस सल्फ्युरीक अ‍ॅसिड मधे सोडला आहे Happy

मला वाटते धोनीपासून रोहित पर्यंत सर्वांचा हनीमून पिरीयड संपल्यावर प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅप्रोच अधिकाधिक रीअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅप्रोचमधे बदलत गेला. त्यात परत टेस्ट मधे विशेषतः भारतामधे अ‍ॅश-जडेजा च्या उमेदिच्या काळात नि बाहेर कोहली ने पेसर्सची फौज वापरायला सुरूवात केल्यापासून समोअरच्याचा पेशन्स पाहायचा हा आपला मुख्य डावपेच राहिला आहे त्यामूळे हे इंप्रेशन येत असावे.

कसोटी सामना दोन-तीन दिवसात संपतो असा ओरडा करणाऱया टीकाकारांना आता चोख उत्तर मिळाले असेल..
दिवसभरात एकही विकेट नाही.

बाई दवे तिथे तो रहाणे धुमाकूळ घालत आहे.

अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीच्या जोरावर मुंबईनं सेमीफायनलमध्ये बडोद्याचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे.

रहाणेच्या शेवटच्या सहा इनिंग
५२ (३४)
६८ (३५)
२२ (१८)
९५ (५३)
८४(४५) क्वार्टर फायनल
९८(५६) सेमी फायनल

काल भारताने टॉस जिंकून बॉलिंग घेतली आणि दिवसभरात ऑस्ट्रेलियाला फक्त २८ धावांत रोखलं. >>>> धन्यवाद फेफाजी. एक मोठी गोष्ट शिकलो आज तुमच्या या कमेंटमुळे.

“ एक मोठी गोष्ट शिकलो आज तुमच्या या कमेंटमुळे.” - सर! तुम्ही आमच्यासारख्या पामराकडून शिकणं म्हणजे बोरटाके गुरुजींच्या भाषेत सांगायचं झालं तर ‘काजव्याने सूर्व्यासमोर चमकण्यासारखे‘ आहे. Lol

हा सामना इथून जिंकू शकत नाही.
अनिर्णीत राखायचा तर टिकून खेळावे लागेल. ते अवघड आहे.
त्यामुळे चांगला स्कोअर टाकला तरी पाचव्या दिवशी हरतील अशी शक्यता जास्त वाटत आहे.अनिर्णीत हा देखील विजय ठरेल हे डोक्यात ठेवून फलंदाजी करायला हवे. बघूया कसे खेळतात ते. उत्सुकता आहे.

Pages