क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कमिन्स ने ४१+४९=९० मारले जो त्याचा एका टेस्ट मधील सर्वाधिक स्कोअर आहे.
या कसोटीत हेडला ० आणि १ वर घेतले तर याने त्रास दिला..

ही मॅच बघू नका निराशा हाती लागेल. काल आपले जुने कबड्डी खेळाडू ऑस्ट्रेलियाला गेलेत कबड्डीचा प्रचार करण्यासाठी. तिथे ते मुद्दामून हारण्याची एक्टिंग करताहेत आणि ऑस्ट्रेलिया टीमला पॉइंट देताहेत. ते बघा मजा येते. क्रिकेटची मॅच गेल्यात जमा आहे.

शेपूट गुंडाळायला एकही प्रभावी स्पिनर भारताकडे नसावा, हे माझ्यासारख्या जुन्या पिढीतल्या क्रिकेटप्रेमींना खूपच खटकत असावं ! अर्थात, शेवटच्या दिवशी विकेट फार खराब नसेल, ही बाब कांहिधी आशादायक !

जायस्वालने ३ आणि सिराजने १ झेल सोडलेत ते मी बघितले. याव्यतिरिक्त आणखी सुटलेत का झेल?

कॅचेस विन मॅचेस हे जर खरं असेल तर भारत हरल्यात जमा आहे.

*कॅचेस विन मॅचेस हे जर खरं असेल तर भारत हरल्यात जमा आहे.* -.... जर ऑसीजनी देखील उद्या झेल सोडले नाहीत तर ! Wink
ऑसीजना मानलं. शेवटच्या जोडीची नाबाद 50+ची भागीदारी !!
जयस्वालला झेल सोडल्याचं, कोहली व रोहित याना अपेक्षित धांवसंख्या न उभारल्याचं आणि पंतला पहिल्या डावात ' स्टूपिड'शॉट ' खेळल्याच पाप धुवून काढायची उद्या मोठी संधी आहे !

आज दिवसभरात ऑस्ट्रेलियाने जेवढे रन्स केले त्यापेक्षा १००+ आपल्याला उद्या दिवसभरात करायचे आहेत.
जर यशस्वी, पंत, रेड्डी असे फास्ट खेळणारे प्लेअर खेळले तर हे शक्य होईल.

*ऑल फोर रिझल्ट्स पॉसिबल नाऊ* - फॉर मी, ओन्ली वन रिझल्ट पॉसिबल - इंडिया विन ! बाकी सर्व शक्यता , केवळ बॅड ॲक्सीडंटस ! Wink
*सुट्टी टाका उद्या..* - मला आता तो प्रॉब्लेमच नाहीं ! फक्त,
थंडी आहे व उद्या सामना लवकर सुरू होणार आहे. त्यामुळे जरा गैरसोय आहे, इतकंच. Wink

२५० च्या आसपासचं टार्गेट आवाक्यात होतं.

ऑसीजनी आजच्या स्कोर वर डिक्लेअर केलं तरी.... ३३४ धावा ९५ ओवर्स मधे अशक्य नसलं तरी अवघड आहे.

उद्याही खेळ लवकर सुरु होणार आहे. ४.३० ला उठावं लागणार.

*३३४ धावा ९५ ओवर्स मधे अशक्य नसलं तरी अवघड आहे.* - चॅम्पियन व्हायचंय तर चॅम्पियनसारखं खेलावंच लागेल व हा आपला संघ चॅम्पियन व्हायच्या लायकीचा निश्चितच आहे, if they play to their full potential , which I am sure they will do
to-morrow !! शुभेच्छा !!!(

*एक दिन बुरी तरह फसोगे...* - माझ्या पिढीने जिंकण्याची शक्यताही नसलेल्या संघांवर व खेळाडूंवर वर्षानुवर्ष प्रेम केलंय ! आता जिंकण्याचा जमाना आलाय, फसेंगे तो परवाह नहीं, लेकीन अब हरनेकी बात नहीं करेंगे !! Wink

मला वाटते सुरुवातीचे दोन सेशन (आपण टिकलो तर) ज्याला जे जमते तसेच सुरुवातीला खेळणार. सकाळीच सामना ड्रॉ करायचा की जिंकायला जायचे ठरवून उतरू शकत नाही.
सुरुवातीलाच ड्रॉ करा ठरवले तर यशस्वी स्लो खेळणार किंवा जिंकायला जायचे ठरवले तर राहुल मारायला बघणार असे आधीच उगाच कम्फर्ट झोन बाहेर येण्यात अर्थ नसतो.

माझ्या पिढीने जिंकण्याची शक्यताही नसलेल्या संघांवर व खेळाडूंवर वर्षानुवर्ष प्रेम केलंय !
>>>>

अगदी खरे आहे.
परदेशात तर एकेकाळी एखादा सामना जिंकलो तरी बोनस समजून जायचो. सचिन काहीतरी छान फटके मारून मनोरंजन करेल इतकीच अपेक्षा असायची.

अपयशाने सध्या ग्रासलं असलं तरीही फलंदाजी हे आता आपलं खरं शक्तिस्थळ आहे, यावर ठाम विश्वास ठेवून खेळणं हीच यशाची गुरुकिल्ली आहे ! पीच चांगलं आहे. उद्या जिंकायला षटकामागे काय सरासरीने धांवा काढाव्या लागतील, त्यानुसार खेळावं ! सिंपल !!!

परवा कधी नव्हे ते सकाळी टीव्ही लावला आणि नितीश कुमार रेड्डी शतकाच्या उंबरठ्यावर असताना दिसला. मग तिथून पुढे खेळ पाहिला. टीव्ही म्यूट होता. पण त्याचे शतक झाले तो क्षण , टीव्हीवर दिसलेले त्याचे वडील हे सगळं फारच भावुक करणारं होतं.
इथे त्याबद्दल काही वाचायला मिळेल असं वाटलं होतं.

याचं सुंदर वर्णन आजच्या इंडियन एक्स्प्रेसमध्ये आलं आहे.
https://indianexpress.com/article/sports/cricket/nitish-reddy-mcg-specia...

या पिच वर चौथ्या इंनिंग्ज मध्ये एका दिवसात आपले फलंदाज जवळपास 350 धावा काढतील अशी अपेक्षा करणे म्हणजे अत्यंत अवास्तव, अतार्किक आणि भाबडे ठरेल.

<<थंडी आहे व उद्या सामना लवकर सुरू होणार आहे. त्यामुळे जरा गैरसोय आहे, इतकंच. >>
अशी किती थंडी आहे? नि घरात बसूनच तर बघणार सामना, मग एक ब्लँकेट घेऊन बसा. जवळ चहा किंवा इतर पेय, नि तोंडात घालायला काहीतरी घेऊन छानपैकी मॅच बघा.
आमच्याकडे १ डिग सेंटिग्रेड आहे नि संध्याकाळी ६ वाजता सामना सुरु होईल तो बहुधा रात्री २ - ३ वाजेस्तवर चालेल. (चालावा. रोहित, कोहली खेळावे. जैस्वालने धावा नाही काढल्या तर पुढच्या सामन्यात जयस्वाल बाहेर नि गिल आत. गिलने दाढी वाढवली असेल अशी आशा आहे. भारताच्या संघात बिनादाढीचे कसे काय खेळू शकतात हे लोक? )

परदेशात उणे तापमान असले तरी ते लक्षात घेऊन घरे उबदार असतात.
इथे थंडी वाढली तर ती घरात शिरू नये यासाठी खास उपाय योजना नसते. थंडी वाजतेच Happy

<<घरे उबदार असतात.>>
घरे उबदार नसतात, बरेच काही काही करून घरात गरमी आणली जाते.
आपण फक्त भाराभर पैसे ओतायचे.

*अत्यंत अवास्तव, अतार्किक आणि भाबडे ठरेल.* -
पहिल्या डावात आपण फॉलो ऑन टाळून 300 वर स्कोअर करणं, ऑसीजनी 91-६ वरून एवढा मोठा स्कोअर करणं, हे देखील तसं होण्यापूर्वी " अवास्तव, अतार्किक आणि भाबडे " याच्या सीमारेषेवरचंच वाटतं होतं ! Wink

*..त्यामुळे जरा गैरसोय आहे, इतकंच. * * अशी किती थंडी आहे* -
- सध्या मुलीकडे रहायला आलो आहे म्हणून थंडीत सक्काळी इतरांना त्रास होईल, ही खरी गैरसोय . Wink

<<माझ्या पिढीने जिंकण्याची शक्यताही नसलेल्या संघांवर व खेळाडूंवर वर्षानुवर्ष प्रेम केलंय !>>

मर्चंट, हजारे, अमरनाथ, रॉय, उम्रिगर, सदु शिंदे, गोपिनाथ, नंतर रमाकांत देसाइ, रॉय मंकड ओपनिंग जोडी, विजय मांजरेकर, बोर्डे, नाडकर्णी. मग इंजिनियर, हनुमंत सिंग, पतौडी, वाडेकर! कसले एकेक हिरो आमचे! परदेशात सगळ्या मॅचेस हरायचे. पण आमचे हिरो!
नंतर पन्नास वर्षे अंधार.
एकदा मराठी विश्वच्या कार्यक्रमात सुरेश वाडकरची ओळख अजित वाडेकर अशी करून दिली. मनात अनेक प्रश्न - अरे
हा क्रिकेट खेळतो का गातो?
१९८३ मधे कपिल देव, गवासकर, शास्त्री, विश्वनाथ कुणि टकल्या विकेट कीपर असे इकडे आले होते. गवासकरचा पाय मोडला होता. तो एकटाच सकाळी १० वा, हजर होता. बाकीचे लोक, काल न्यू यॉर्कला जाऊन दारू ढोसून आले, ते बारा वा. येतील म्हणाला. तीहि मॅच लोकल लोकांनी जिंकली. भारतीय क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावणे, अडवणे, खाली वाकणे असली क्षुद्र कामे करत नव्हते.
२००॑१ मधे ऑस्ट्रेलियाला गेलो असता भारत वि. ऑस्ट्रेलिया पूर्ण मॅच टीव्ही वर पाहिली - द्रविड नि लक्ष्मण ही नावे कळली.
टी२०, वन डे हे प्रकार काय नि का असतात ते कळत नाही.
नंतर हळू हळू तेंडूलकर, गांगुली वगैरे नावे समजली. बरेच सामने भारत जिंकते आहे असे ऐकले.
२०२० मधे विलो क्रिकेट घेतल्यावर जरा जरा परत कोहली, वगैरे नावे ओळखीची झाली.
आता खेळाडूंपेक्षा खेळावरच जास्त प्रेम.

.We r going to win.

Excuse me . Navin phone aahe. Marathi lihaayache udya haryana shodhin. Must celebrateour victory..

.We r going to win.

Excuse me . Navin phone aahe. Marathi lihaayache udya haryana shodhin. Must celebrateour victory..

नंद्या भाऊ जाऊ दे ना. खेळाडू पण येवढा विचार करत नाहीत.
तुमच्या नंतरच्या पाच पिढ्या निवृत्त झाल्या आहेत. Happy

Pages